प्राणाचे आणि समाजाचे सैतानीकरण श्रीधर तिळवे नाईक मला असे वाटते की आता आपण डी कन्स्ट्रक्शन वगैरे गोष्टी जास्त विचारात घेण्यापेक्षा ज्या मूलभूत गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे त्याच घ्याव्यात अनैतिक सैतानी गोष्टींचा भडीमार आणि प्रचार हे आजच्या युगाचे वैशिष्ट्य बनून गेलेले दिसते हे वैशिष्ट्य नेमके कोण स्पॉन्सर करते हे सुद्धा एकदा बघणे आवश्यक आहे जगामध्ये अनेकदा या वाईटपणाचे काय करायचे हा प्रश्न सर्वत्र उपस्थित झालेला असतो मानवाच्या संस्कृती पासूनच हा प्रश्न निर्माण झालेला आहे. सर्वसाधारणपणे दोन पद्धतीने याचा विचार झालेला दिसतो पहिली पद्धत शैव धर्माची शैव श्रुतीची आहे तर दुसरी पद्धत जुडाईक धर्माची आहे शैव श्रुतीमध्ये सर्वसाधारणपणे शक्तीच्या दोन दिशा दिसतात पहिली ही मोक्षाकडे जाते तर दुसरी संसाराकडे जाते परंतु ही दुसरी जेव्हा अधिकाधिक प्रवृत्ती बनते आणि संसाराच्या दिशेने आणि संसाराच्या विस्ताराच्या दिशेने जायला लागते तसे तसे मनुष्य आपले तारतम्य विसरायला लागतो आणि कुठल्याही मार्गाने आपला विस्तार झाला पाहिजे १ कुठल्याही मार्गाने आपले जैविकीकरण सर्वत्र पसरले पाहिजे आपला वं...
Posts
Showing posts from September, 2026
- Get link
- X
- Other Apps
गोत्र: काश्यप आणि शैव श्रीधर तिळवे नाईक अलीकडे अनेकांना आपल्या अस्तित्वात नसलेल्या गोत्राचा प्रश्न पडायला लागलेला आहे ब्राह्मण धर्माचा हा एक अर्थाने सर्वात मोठा विजय म्हणायला हरकत नाही. वास्तविक शैवांच्या मध्ये गोत्र नसते तर कुलदेवता असते परंतु स्वतःच्या देवाऐवजी ब्राह्मणाने दिलेल्या ऋषीवर संतुष्ट होणे आता अनेकांना जास्त सोयीचे वाटते. एखादा बहुजन समाजातला मनुष्य वैष्णव किंवा ब्राह्मण धर्मी कधी बनतो या प्रश्नाचे साधे उत्तर जेव्हा तो मनुष्य स्वतःच्या कुलदेवतेचा त्याग करत जेव्हा ब्राह्मणाने दिलेले गोत्र लावायला लागतो तेव्हा असे आहे . अर्थातच काही जिज्ञासू लोक असतातच ते मग काही प्रश्न विचारतात तर हे प्रश्न पुढे उपस्थित होऊ नयेत म्हणून ब्राह्मण धर्मामध्ये एक खास सोय केलेली आहे हिला मी कश्यप सोय म्हणतो म्हणजे काय ,"गोत्रस्य परिज्ञाने काश्यपं गोत्रमुच्यते" ज्याला कोणाला गोत्र सांगता येत नाही माहित नाही त्याने कश्यप हे गोत्र लावावे असा हा नियम आहे त्यामुळे अलीकडे बहुतांशी मूळ शैव असणाऱ्या लोकांचे गोत्र काश्यप झालेले दिसते यातून असा प्रश्न निर्माण ह...
- Get link
- X
- Other Apps
मैथिली ठाकूर आणि फक्त ब्राह्मण क्षत्रिय महान असतात श्रीधर तिळवे नाईक अलीकडे मैथिली ठाकूर यांनी आपण भाजपमध्ये का आलो याची काही मीमांसा केलेली आहे तिच्यामध्ये मोदी यांना त्यांच्याकडून देव मानले गेले आहे . त्यांच्या या निवेदनामुळेच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे मला या प्रश्नाच्या मुळात जाणे आवश्यक आहे असे वाटते. प्रश्न असा आहे की अशा प्रकारचे एखाद्या व्यक्तीचे दैवीकरण ब्राह्मण धर्माला का आवश्यक वाटते ? मुळातच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे देव हा शब्द शैव आणि युरेशियन अशा दोन्ही श्रुतींच्या मध्ये सारख्याच अर्थाने उपस्थित आहे आणि हा शब्द मुळात भारतातूनच निर्यात झालेला आहे . त्याचा मूळ अर्थ आसमंत प्रकाशमान करणारे शरीर असा आहे आणि त्यामुळेच भगवान शंकर यांना बडा देव असे आदिवासी परंपरेमध्ये मानले जाते. तिथे एका अर्थाने देव याचा अर्थ सिद्ध असा आहे . पण आता तो कोणीही त्या पद्धतीने घेत नाही . प्रत्येक सिद्ध पुरुषाला किंवा स्त्रीला देव किंवा देवी म्हणणे हे शैव-धर्मांमध्ये अत्यंत सामान्य होते . विज्ञान भैरव तंत्रामध्ये भगवान शंकर आणि भगवत...
- Get link
- X
- Other Apps
तुम्हाला शैव धर्मात पंडित का हवे आहेत श्रीधर तिळवे नाईक हा एक प्रश्न अली वारंवार विचारला जात आहे म्हणून त्याचे उत्तर देत आहे .ब्राह्मण वर्ण प्रामुख्याने ज्ञानाच्या केंद्रात आहे त्यामुळे ज्ञानाची इज्जत निदान युरेशियन लोकांच्या तरी टिकलेली दिसते आणि राहते. बहुजन समाजात काय दिसते? विचारवंतांची हालत काय आहे ? महात्मा फुले यांचे आपण नेमके काय केले ? हरी नरके पासून संजय सोनवणी पर्यंत अत्यंत चांगले विचारवंत बहुजनांच्या मध्ये झाले आहेत आणि आत्ताही आहेतच. पण त्यांची काय कदर आपला बहुजन समाज करतो किंवा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची काय कदर मराठा समाजाने केली ? आता सुद्धा आ ह साळुंखे यांची काय कदर आपण करत आहोत? किती लोकांचा त्यांना पाठिंबा आहे ? बहुजन समाजातल्या किती राजकीय पुढार्यांनी हे विचारवंत वाचलेले आहेत ? माझ्या दृष्टिकोनातून हे सर्वच्या सर्व पंडित आहेत. पंडित याचा अर्थ विद्वत्ता असलेला मनुष्य पांडित्य असलेला मनुष्य ! आपल्याकडे मोक्ष मिळालेला मनुष्य अनेकदा पंडितांची खिल्ली उडवत असतो परंतु पंडित हे फक्त काय मोक्षाच्या क्षेत्रात काम करत नसतात आपल्याकडे ओशो रजनीश्यांच्या सारख्य...
- Get link
- X
- Other Apps
अलका गांधी यांची पोस्ट आशुतोष दिवाण यांची कॉमेंट आणि मी तिला दिलेला प्रतिसाद श्रीधर तिळवे नाईक अलका गांधी म्हणतात हिंदुत्ववादी मुस्लिम लोकांची भीती घालतात.. माझा अनुभव असा आहे, की आम्ही पाच ते सहा पिढ्या मुस्लिमबहुल गावात जन्मलो, वाढलो, राहिलो. आमची घरे सात आठ. अल्प मतीत. बाकी हिंदू पण गरीब आणि मोजके. याउलट मुस्लिम सारे सधन. बहुसंख्य. शिवाय आम्ही कट्टर शाकाहारी. कांदा लसूण देखील वर्ज्य असलेले. बाकी अख्खा गाव मासे खाऊ, मांसाहारी. पण आमच्या समाजाला कुणी कधी एक टक्का पण त्रास केला नाही कधी, आमच्या शाकाहाराला कधी एका शब्दाने हिनवले नाही, खिजवले नाही की डिवचले नाही. उलट आता इथे फेबूवरच आणि तेही इतर हिंदूंकडूनच शाकाहाराची खिल्ली उडवली जातेय. आम्ही कसे म्हणू की मुस्लिम भीतीदायक आहेत? उलट आमच्या अंतर राखून वागण्याचाही त्यांनी नेहमी आदर केला. त्याला अपमान मानले नाही. आमच्या सात आठ घरात देखण्या लेकीबाळी होत्या. प्रत्येक पिढीत. कधी कुणी वाकड्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं नव्हतं की छेडलं नव्हतं. उलट आदरानेच बघत. रात्री बेरात्री तिथे प्रातरविधीसाठी हिंदू बाया एकट्या गावाबाहेर...
- Get link
- X
- Other Apps
महात्मा फुले यांचे वसाहतीकरण आणि त्याचा शैवधर्मावर झालेला परिणाम श्रीधर तिळवे नाईक इंग्रजांनी भारताचे वसाहतीकरण केल्यानंतर महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात गेला त्याला लोकहितवादी ने पहिली प्रतिक्रिया दिली याच वेळेला बंगालमध्ये राजा राम मोहन राय यांनी वेदांताचे पुनर्जीवन केले आणि नववेदांत मांडायला सुरुवात केली अर्थात हा नववेदांत पंडिती होता तरीही त्याचा परिणाम पडून ब्राह्म समाजाची चळवळ उभी राहिली गुजरात आणि पंजाब मध्ये स्वामी दयानंद सरस्वतीने आपली नाळ वैदिक धर्माची जोडली आणि आर्य समाज निर्माण केला त्यांनी हिंदू या शब्दाला चक्क नकार दिला कारण त्यांच्यामध्ये हा शब्द गुलामी अर्थानेच वापरला जात होतो आणि तो मुसलमानानेच दिलेला आहे साहजिकच त्यांनी आर्य हा शब्द निवडला मात्र आर या शब्दाला असलेला प्राचीन अर्थ त्यांना माहीत नव्हता आणि त्यातून खूप काही गोंधळ झाले मुख्य म्हणजे आनार यांचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला याचवेळी महाराष्ट्रातून सर्व धर्मातून महात्मा फुले आले त्यांनी खंडोबा आणि ज्योतिबा यांना स्वीकारले एक प्रकारचा देशीवाद शैवदेशी वाद निर्माण झाला निर्माण केला मात...
विषय घटनाच्या कविता
- Get link
- X
- Other Apps
Resurrection श्रीधर तिळवे नाईक आणि तू म्हणालास I will resurrect you हिरव्या रंगांच्या भिंती अधिक हिरव्या जणू सपाट झाड किरण पोहोचत नाही तिथे छतातून सूर्य पोहचलेला जमिनीवर यमाने टाकलेली अदृश्य चादर आता मान मोडून पडलेली मी विषप्रयोगाने मेलो होतो आणि तू म्हणालास I will resurrect you ऑथर इज डेड आयडिया लॉजि इज डेड हिस्टरी इज डेड मृत्यूचे युग सर्वत्र आणि झालेला हिरवा विषप्रयोग मारणारा मर्डर करून निघून गेला आणि माझे डोळे तुझ्या मध्ये उघडे आणि तू म्हणालास I will resurrect you तुला हो म्हणावे की शांतपणाने नाहीसे व्हावे पुन्हा या जगात जन्मून तरी करणार काय ? त्याच आसक्त भुका तृष्णा आणि प्रदूषित झालेले श्वासहवामान बदल करायला जावे तर सनातनांची दलदल ,दलाल आणि दल उभे लोकांना शहाणे करून सोडावे म्हणावे तर कित्येक जणांना मूर्ख ठरवून लोक शांत डोळे द्यायला जावे तर आंधळेच तुमच्या विरोधात कान उघडे करा म्हटले तर वाजणारे डीजे...
- Get link
- X
- Other Apps
श्रद्धा विरुद्ध मोक्ष अर्थात मोक्षाने श्रद्धेचा विरोध का केला नाही ? भारताच्या इतिहासामध्ये ज्या काही गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत त्यामधील एक गोष्ट म्हणजे श्रद्धा निर्माण झाल्यानंतर जी एक श्रद्धा प्रणाली उभी राहिली तिच्या विरोधात आश्चर्य कारकरीत्या संघर्ष झालेला नाही जगामध्ये सर्वत्र मांत्रिकांच्या विरोधातल्या लढाया लढल्या गेलेल्या आहेत अगदी पारंपारिक बनवल्या जाणाऱ्या इस्लामने सुद्धा आणि त्यांच्या प्रेषिताने सुद्धा त्याच्या काळामध्ये अस्तित्वात असलेल्या श्रद्धेशी लढाई लढली आणि स्वतःची नवीन महाश्रद्धा निर्माण केली म्हणजेच मजहब निर्माण केला. भारतामध्ये अशा प्रकारचा संघर्ष फार निखराला कधीच पोहोचलेला दिसत नाही याचे कारण काय आहे हा एक फार मोठा प्रश्न आहे. जगभरात श्रद्धे विरोधातल्या लढाया यशस्वी कितपत झाल्या याविषयी मात्र फार मोठा प्रश्न आहे आणि मांत्रिक जिवंत राहिल्यामुळे साहजिकच आपोआपच मांत्रिकी( हिला समाजशास्त्रामध्ये यातू म्हणतात ) जिवंत राहिली आणि मांत्रिकी जिवंत राहिली म्हणून श्रद्धां आणि अंधश्रद्धा यांचा गजबजाट कायमच या जगामध्ये होत राहिला . भारतामध्ये हा संघर्ष टोकाला न जाण्याच...
- Get link
- X
- Other Apps
जंगल नेट श्रीधर तिळवे नाईक १ मोक्षा शिवायचा पशु विंडो मधून डोकावयाला लागलाय तो डिजिटल आहे की रियल ? २ लोकांनी माणुसकी कायद्याला भाड्याने दिलीये ती स्वतःजवळ ठेवता येत नाही म्हणे मला माहित नाही त्यांना भाडे म्हणून नेमके काय मिळते ? ३ मोक्षाची साधना करणारा मनुष्य आता आऊटडेटेड वाटायला लागलाय अपवाद फक्त फेम असेल तर आता फेमच्या मागे लागलेला माणूस मोक्षाला उपलब्ध होत नाही हे कोण सांगणार ? आणि कोणाला ? ४ लॅपटॉप मिळाला की मुक्ती मिळते असे वाटणारी मुलगी माझ्या शेजारी आयुष्याच्या ग्रेड्स इम्प्रूव करता येत नाहीत सतत मेंदू क्लिक करणारी प्रेशर्स झेलता येत नाहीत प्रत्येक जण मोबाईल मध्ये जातो आणि इन्सायडर होतो आयुष्यात सगळेच आऊटसाईडर तिच्या आईला वाटते की तिच्याजवळ मोबाईल असेल तर पाठलाग सोपा होईल सुपर विजनचा मॅच्युअर नमुना म्हणावा की प्रॅक्टिकल नियंत्रण म्हणावे ? क्रेझी संहिता बिझनेसचे बिझी गणित ना बीज ना गणित मला कधीच मोबाईलखाली मी वटवृक्षाखाली बसल्याचा फील आला नाही ज्याचा जितका वट ...
- Get link
- X
- Other Apps
ज्ञानाची ज्ञानता , निष्कर्षता , निश्चितता ,अनिश्चितता आणि चौथ्या नवतेचा आरंभ श्रीधर तिळवे नाईक ज्ञानाच्या प्रक्रियेविषयी आपण सातत्याने विचार करत आहोत कुठलेही ज्ञान जेव्हा होते तेव्हा ते शरीरजन्य किंवा साधनशरीरजन्य किंवा उपकरण शरीरजन्य बनावे लागते तरच त्याची पडताळणी शक्य होते ते प्रमाण आहे की नाही ते तपासता येते आणि प्रामाण्यता नीट अभिव्यक्ती पण होते आणि या ज्ञानाच्या अभिव्यक्तीला ज्ञानता असे म्हणतात जोपर्यंत ज्ञान अभिव्यक्त होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला फारशी किंमत असत नाही कारण निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये अशा प्रकारचे सुप्त असलेले गुप्त असलेले ज्ञान काहीही काम करू शकत नाही ज्ञान हे फक्त तेव्हाच काम करते जेव्हा ते प्रकट असते जागृत असते ही प्रकट असलेली ज्ञानाची गोष्ट जी असते तिलाच आपण ज्ञानता म्हणतो सुरुवातीला ती जरी प्रायोगिक असली तिला फारशी मान्यता नसली तरी नंतर तिला हळूहळू समांतर म्हणून मान्यता मिळायला लागते आणि मग हळूहळू विकसित होत समाजाचा भाग बनत अर्थचा कणा बनत समाजामध्ये हळूहळू प्रस्थापित होत जाते मग सर्व गणामध्ये प्रस्थापित होते आणि मग कालांतराने अभ्यासक्रमात समाव...