जंगल नेट श्रीधर तिळवे नाईक 

१


मोक्षा शिवायचा पशु 

विंडो मधून डोकावयाला लागलाय 

तो डिजिटल आहे की रियल ?


२


लोकांनी माणुसकी कायद्याला भाड्याने दिलीये 

ती स्वतःजवळ ठेवता येत नाही म्हणे 


मला माहित नाही 

त्यांना भाडे म्हणून नेमके काय मिळते ?


३


मोक्षाची साधना करणारा मनुष्य आता आऊटडेटेड वाटायला लागलाय 


अपवाद फक्त फेम असेल तर 


आता फेमच्या मागे लागलेला माणूस मोक्षाला उपलब्ध होत नाही हे कोण सांगणार ? आणि कोणाला ?


 ४


लॅपटॉप मिळाला की मुक्ती मिळते 

असे वाटणारी मुलगी माझ्या शेजारी


आयुष्याच्या ग्रेड्स इम्प्रूव करता येत नाहीत 

सतत मेंदू क्लिक करणारी प्रेशर्स 

झेलता येत नाहीत 


प्रत्येक जण मोबाईल मध्ये जातो आणि इन्सायडर होतो 


आयुष्यात सगळेच आऊटसाईडर


तिच्या आईला वाटते की तिच्याजवळ मोबाईल असेल तर पाठलाग सोपा होईल 


सुपर विजनचा मॅच्युअर नमुना म्हणावा की प्रॅक्टिकल नियंत्रण म्हणावे ?


क्रेझी संहिता 

बिझनेसचे बिझी गणित 

ना बीज ना गणित 


मला कधीच मोबाईलखाली मी वटवृक्षाखाली बसल्याचा फील आला नाही 


ज्याचा जितका वट 

तितका त्याचा मोठा नेटवर्कवड 


हेडफोन लागतो काढला जातो 

मोबाईलवर माहित असलेले प्राणी 

धिंगाणा घालतानाही रोमँटिक वाटतात 


जंगल जंगल पता चला है 

मोबाईल पहन के फूल खिला है 


तिला भेटीत मिळालेला कुत्रा 

पॅकेज डील मध्ये वफादारी देणार का एवढाच प्रश्न 


ती कदाचित सगळे तारुण्य त्याच्याबरोबर शेअर करीत वाटचाल करेल 


 ५


सेक्सल म्युझिक व्हिडिओज 

पिक्सल पिक्सल पिक्सलणारे कॅमेरे 


कोणा कोणाचा कसा कसा ट्रॅक ठेवावा ?


भाचीची मैत्रीण म्हणून 

नेमके कशाकशात का वाकून पहावे 


प्रत्यक्ष क्षण अंडी घालून जातो 

प्रत्येक कण आमलेट बनवून जातो 


शरीराचा गुरुत्व भाग सांगत रहा 

शरीराचे वजन करत रहा 

शरीर कुठल्या शरीराला भेटते ते नीट पहा 


पालकत्व म्हणजे रोमँटिक पावसाळा नव्हे 

जंगलामध्ये राहून बागेचे रक्षण करणे 


इंटरनेट ऑपरेट करणारे पशु दाखल झालेले आहेत 

आणि मला त्यांचा पशुपती व्हायचा आहे 


६


"म्हातारपणी कोण कुणाला बघते राजा? "


"मला तिने बघावी अशी अपेक्षा नाही "


"तुला तुझ्या नातेवाईकांची गाढवे उचलून घेण्याची सवय लागलीये"


"मी तिला उत्तम जॉकी बनवेन "


"ती घाबरट आहे राजा ताबडतोब प्रेशर खाली येईल 

आणि प्रेम सोडून देईल "


लोकांचे दूरवरून येणारे टॉन्ट 

त्यांना वाटते ते मला सावध करत आहेत 


नकाशाची करंट पोझिशन एकालाही कळत नाही 

पण सल्ले देताना सगळे भूगोल तज्ञ 


सेफ रूट काढणारा मी कधीच नव्हतो 

आयुष्य असेंबल करणाऱ्यांना अनेकदा जे असेम्बलाज असेल त्याचीच भीती वाटते 


"भयाने नको आनंदाने कर 

जे आवडते ते कर 

करिअरमध्ये वाकायला जाशील तर केवळ फॅशन बनशील 


शोषक बनू नकोस 

पण शोषणही होऊ देऊ नकोस हाच आजच्या काळातला बुद्धमध्य "


भाची नुसतीच पाहत राहते 


माझ्या चेहऱ्यावर अजून तरी पौर्णिमा उमललेली नाही 

 

७


हृदयाच्या झेपवणाऱ्या बागा 

या वयात अटळ आहेत 


वासनेचे सतत झूमीन होणे, झुमाऊट होणे अटळ आहे 


थरथरणारी बोटे काही काळ लंपट होणे अटळ आहे 


सतत नवीन नवीन ॲप्स उघडत जाणे 

आणि काल्पनिक खड्ड्यात पडणे अटळ आहे 


आपण फक्त दुरूनच साई ट्रॅक ठरवायचा 

आणि तिच्या वाटेतले काटे फुफाटे आणि चाटे 

खूपच आडवे आले 

तर त्यांना

चड्डीत ठेवायचे 

फारच उनाड झाले तर ठेचायचे 


८


नवीन नवीन फुटेज मिळवत चाललेले डोळे 

फुटेज हीच मिळकत 


धपापणारे श्वास 

हपापणारे श्वास 

गोलगप्पा पाणीपुरी सारख्या 

गोड ही आंबटही 

तुरट ही खारटही 


भाची आणि भाचीची मैत्रीण

डिजिटल सावल्या पडलेल्या संपूर्ण आयुष्यावर 


त्यांना जाडी नाही असे म्हणावे 

की त्या फ्लॅट आहेत असे म्हणावे ?


"क्षण जगताना रेकॉर्ड कसा करता येतो ?"

"येतो मामा येतो तुला कळत नाही 

किंवा तुला जमत नाही "


९


परिस्थितीचा अंदाज घ्यावा 

हाताळावा एक एक बारकावा 


कोल्हे सिच्युएशन क्लिअर करून घेतात 

समजून घ्यावा त्यांचा एकेक कावा 


लांडगा आला रे आला येतच नाही 

फक्त जंगलाला बसतो एक हेलकावा 


शूटिंग मागे पुढे झोके घेते 

पॅकअप झाले की शांतपणे आपण आपला देह काढून घ्यावा 


१०


आपल्याशिवाय ती जगू शकेल का 

हा एक बाळबोध प्रश्न आहे 


तिची बालवाडी जेव्हा खेडेगावात झाली 

तेव्हा आपण थोडेच तिच्यासोबत होतो ?


पण कोल्हापूरला आलीच ना ?


रिस्क घेताना सुद्धा विचार करेलच 


विजेसारखी ती जेव्हा नाहीशी होईल 

तेव्हा ढग सुद्धा मोजण्याची संधी तुला मिळणार नाही 


एक पावसाळा कोसळेल 

आणि तू ओलेत्या अंगाने एका नात्यात मरून जाशील 


नवीन युग आहे 

नाते हे फक्त खाते आहे 


उघडले इतके पुरे 


११


लाल डॉट हिरवे डॉट 

प्रतिमांचा खच 

एक काळी नॉट 


रोटन टोमॅटोमध्ये काय काय दिसणार ?


ती उमलत चाललेली आहे 

ती जग पहात चाललेली आहे 


टेन्शन मधून सुद्धा झपाझप चाला 

एक्साईटमेंटमधूनसुद्धा गपागप बोला 

भयामध्ये सुद्धा टपाटप हला 

आणि आनंद येईल तेव्हा 

रपारप रॅपचीक डोला 


काळ त्यांचा आहे 

तू त्यांचा भूतकाळ आहेस 

ते तुझा भविष्यकाळ आहेत 


कालातित मोक्षा बद्दल बोलू नको 

जेव्हा काळाचा कंटाळा येईल 

तेव्हा टाळा 

ताळेबंदात आपोआप बदल करेल


मोक्ष आणि मुलीची वाढ 

यांच्यात फरक नसतो 


जबरदस्ती दोन्ही ठिकाणी 

त्वचा बिघडवून टाकते 


तिला उमलू दे सावकाश स्वतःचा अवकाश घेत स्वतःचा प्रकाश घेत 


तिलाही तिचे आभाळ तिच्या पद्धतीनेच प्राप्त करू दे 


कडी तेव्हाच लाव 

जेव्हा जेल डरकाळी फोडत येते आहे असे तुला वाटेल 


१२


रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला 

असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा 


गळा भरून येईल तेव्हा गाणे गा 

हृदय भरून येईल तेव्हा कविता लिही 


मेंदू अवघडेल तेव्हा 

स्नायूंच्यामध्ये जाऊन व्यायाम कर 


शेवटी तिची बॉडी तिची 

तिचे आयुष्य तिचे 


तू फक्त सुरक्षारक्षक आहेस 

बापाला याहून अधिक मोठा रोल असत नाही  


१३


या नव्या मुली सेकंदात मोजतात

आणि कालचा काळ विसरून जातात 


पाहणे आणि पुन्हा पाहणे 


पुन्हा पाहण्याने यांचे फिलिंग बदलत असेल काय ?


बाम लावण्याचे व्यसन डोके बदलत असेल काय 


लाईफचे डॉक्युमेंटेशन उत्साहाचे घडे 


कधी कधी शेअर करायला जावे तर एंड सापडत नाही 

शेवटी सगळ्यांचे इंडस होते 

आणि सिव्हिलायझेशन म्हणून अभ्यासाला लागते 


 १४


पार्ट्यांना जाऊ द्यावे की न द्यावे 

पार्टीमध्ये दारू प्यायला द्यावे की न द्यावे 

की आपल्यासारखेच निर्व्यसनी करावे? 


आपल्या हुकलेल्या संध्यांचा उल्लेख करावा का ?


नवीन युग फेटाळता येत नाही 

जुने युग जाळता येत नाही 

आत्ताचे युग टाळता येत नाही 


आपण तळहातावर काय ठेवावे 


की फक्त काळाचे निवडक तुकडे ठेवावेत 


की सरळ भूतकाळ टाळून जगा असे सांगावे 


आपणही शेवटी तिचा भूतकाळ होणार आहोत 


काय करावे ? 


१५


आपण मुलांना जन्म दिला नाही 

कारण मुलांच्या जन्मानंतर संसार सुरू होतो 

आणि संसार सुरू झाला की मोक्ष हुकतो 


आपल्या या गृहीतकावर 

कोणीही फिदा नाही 


सेक्स हवा आणि मूल नको 

हे का 

असे विचारणारे काका 

नाक्या नाक्यावर 


तरी बरे 

आपले लिव इन रिलेशनशिप समजून घेतले 


पण हिला मुले झाल्यानंतर 

ती आपला हा भूतकाळ कसा सांगेल 


यदा कदाचित परंपराच विजयी झाल्यानंतर 

तिचे कथन बदलेल की न बदलेल ?


लोक भूतकाळ सुद्धा वर्तमानात रचून सांगत असतात 

प्रत्यक्षात तो तसा असतोच असे नाही 


१६


तिला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता येतो 


समोर ओढा वाहतो नदीसारखा 

तो पाहता येतो


अजूनही एनएनपी मध्ये झाडे शाबूत आहेत 


उद्या या गोष्टी फक्त सॉफ्टवेअर मध्ये आठवणी म्हणून इन्स्टॉल होणार आहेत का ?


डोंगर पाडायला सुरुवात करणार म्हणतात 


पशुपक्ष्यांना सिम्बॉलिक पाहणाऱ्या लोकांना 

आपण कधीच टिळा लावला नाही 


प्रत्येक वेळेला रिइंट्रोडक्शनचा प्रोग्राम 

कोण उभा करेल ?


सॅटेलाइट्स पृथ्वीला आलेली नवी फळे आहेत 


ना ड्रामा ना ट्रॉमा 

आपण फक्त मामा 

तिची मामाज गर्ल होणार नाही याची काळजी घेत 


शेवटी बिंबवावे लागते 

आणि स्वतःचा आरसा करावा कसा 

हे शिकवावे लागते 


१७


भाची नाही एक अख्खी जनरेशन आहे 


प्रेफरन्स आणि रेफरन्स 

बदललेले 


टॉक शोमध्ये सुद्धा स्वतः च्या रक्तातून वॉक करण्याची क्षमता 


इकॉलॉजिकल फेल होत गेल्याचे दुःख 


निसर्गाबरोबर नवीन संवाद साधावा 

तर इंडस्ट्रीलायझेशन मधला पुरुष विचारतो 

प्रकृती म्हणजे काय 


आता याला तब्येतीबद्दल काय सांगावे 


आपल्या पोरी म्हणजे प्रकृती आहेत 

असे म्हणायला जावे 

तर त्याच इंडस्ट्रियल पोस्ट इंडस्ट्रियल 


"तू इतका काळा तुझी भाची इतकी गोरी ?"

"माझी आई काळी मी आईवर गेलो 

हिची आई माझ्या वडिलांच्यावर गेली "


प्रत्येक वेळी त्वचेवर स्पष्टीकरण 


"तू तुझ्या भाचीबरोबर राहू नको 

तुझी काम वासना कमी होत चाललेली आहे 

तू मलासुद्धा आता माझा बाप वाटतो "


प्रेयसीची तक्रार 


"सॉरी ती माझ्या आयुष्याचे अपरिहार्य अंग आहे 

एक वेळ तू जाशील पण ती जाणार नाही "


फणकारा 

तिटकारा


ढासळणारी कनेक्शन ढिसाळ असतात 


पिक्चर्स पिक्चरची पिक्चर्स 


मला सिम्युलेशन्स स्टिम्युलेशन देत नाहीत 


एक ऑथेंटिक मुलगी 

अख्खा पोस्टमॉडर्निझम उथळ करते 


१८


संस्कृतीचे अति झाले की तिची माती होते 


माणसे दंतकथा नसतात त्यांना स्वतःचे दात असतात 


या वस्तीमध्ये अनेकांना जेलचा फील येतो 

कारण सर्वांना कामावर जायला लागते


मी कंटाळा टाळत टाळत आत्म्याच्या काल्पनिक मिसिंग लिंक्स कोण कमावणार ?

त्यापेक्षा बॉडी पुरते कमवावे 


जे तुम्हाला उथळ वाटते

ते फार सखोल आहे 


हे जंगलच एक इंटरनेट आहे

जुळवून घ्या 


नाहीतर एक दिवस फक्त मोबाईल टॉवर्स दिसतील सिव्हिलायझेशन म्हणून 


ती डोंगरावर जाते 

डोंगरांशी जुळवत असते 

कपड्यांना पद्धतशीरपणे लोकेशन बनवते 


तिने बॅक टू नेचर अशी घोषणा दिली तर मला आश्चर्य वाटणार नाही 


आमच्या शेजारीच मॉल उभा राहत आहे 


दिं

डोशीची दिंडी निघणार की मार्केट ?


१९


मला माहित नाही 

आयुष्यात कधीतरी हा निसर्ग टर्म्स कंडिशन डिक्टेट करणार आहे की नाही 


मला आनंद आहे माझी भाची अजून नॅचरल आहे 


तिला बिसलरीत भरून घेण्याचे सारे कारस्थान तिने हाणून पाडले आहे 


ती समोरून चालत राहते 

आणि मला एक समुद्र हलताना दिसतो 


तिच्या साधेपणातच कदाचित 

मला न दिसणारी दादागिरी असावी 


श्रीधर तिळवे नाईक 

( चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरिच्युअल या काव्य फाईलीतून)


Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती