भारतीय राजकारण स्थिती आणि गती
अन्विक्षिकीचा अस्त आणि जगभरात राजकारणाची अर्थकारणाची लागलेली वाट श्रीधर तिळवे नाईक
शैव श्रुतीमध्ये श्रद्धा युगाला आव्हान देत भगवान शंकरांनी अनेक गोष्टी आणून ठेवल्या त्यातील एक गोष्ट म्हणजे शास्त्र ! गणित ,भूमिती आणि आण्विक्षिकी म्हणजेच तर्कशास्त्र आणि त्याच्या साह्याने घेतले निर्णय जाणारे निर्णय ! भगवान शंकर यांनी ही तीन शास्त्रे मान्य केली आणि मला सुद्धा फक्त तीच मान्य आहेत . इतर जी शास्त्रे म्हणून सांगितली जातात ती शास्त्रे नाहीत श्रद्धा युगाने अनेक विद्या निर्माण केल्या त्यांचा मुख्य आधार अनुभव , जाण , शहाणपण आणि पिढ्यान पिढ्या केली गेलेली प्रॅक्टिस होती आज सुद्धा आदिवासी लोकांच्यात अनेक विद्या आपणाला दिसतात. भगवान शंकर यांनी या विद्यांच्यामध्ये शास्त्र आणि विद यांची भर टाकली . विद मध्ये १ आयु विद २ ज्योतिष विद यात भूगोल सुद्धा येतो ३ नाट्यविद ४ कामविद यांचा समावेश होता आणि ज्यांना कोणाला या गोष्टी प्राप्त करायच्या असत ते गुरु शिष्य परंपरेने या गोष्टी प्राप्त करत ज्यांना वैदू म्हणत ( तामिळ भाषेमध्ये आज सुद्धा ही परिभाषा उपस्थित आहे ) मराठीत आज सुद्धा वैदू हा शब्द प्रचलित आहे पण या शब्दामागे अत्यंत जाणीवपूर्वक हेटाळणी शिकवली गेलेली आहे. भगवान शंकर यांनी श्रद्धा युगातील मांत्रिकी नाकारली आणि तर्कशास्त्राच्या आणि विद्येच्या आधारे विद निर्माण केले . विदच्या आधारे निर्माण केली गेलेली कृती म्हणजे विधि होय. याशिवाय मोक्षासाठी पाच महातंत्रे आणि 114 तंत्रे निर्माण करण्यात आली . कला आणि विद्या हे जर का श्रद्धा युगाचे वैभव असेल निर्माण असेल तर शास्त्र ,विद आणि तंत्रे हे मोक्ष युगाचे वैभव आहे यातूनच पुढे दर्शन सुद्धा निर्माण झालेले दिसते.
मोक्ष युगात जो गणपती म्हणजे गणाचा अधिपती असे त्याला श्रद्धायुगात निर्माण झालेल्या विद्या आणि कला अवगत कराव्या लागत होत्या पण त्याचबरोबर त्याला एक महत्त्वाची गोष्ट अवगत करावी लागत होती ती म्हणजे आण्विक्षिकी! अन्वेषण करणे आणि ते तर्कशास्त्रीय पद्धतीने करणे हे जो मुख्य राज्यकारणी मोक्षयुगात गणपती असे त्याला अत्यंत आवश्यक मानले जाई. पुढे मग मोक्षानंतर आलेल्या धर्मयुगात ब्राह्मण धर्माने गणपती ही ज्ञानाची देवता वगैरे संकल्पना पुढे आणली आणि आज समाजात तीच जास्त प्रस्थापित आहे . इतकेच नव्हे तर या लोकांनी नंतर मांत्रिकीलाच वेद म्हणायला सुरुवात केली प्रत्यक्षामध्ये त्यांना म्हटले जात होते संहिता ! अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये प्रस्थानत्रयीचा अर्थ ऋग्वेद साम्यवेद आणि यजुर्वेद हे तीन वेद होते . नंतर वैदिक श्रद्धेने इथल्या स्थानिक शैव लोकांचे ब्रह्मसूत्र आणि सांख्यतंत्र स्वीकारल्याने वैदिक धर्म निर्माण झाला आणि या धर्मामध्ये जेव्हा ब्रह्म सूत्र आणि उपनिषदे आली तेव्हा वेद, उपनिषद आणि ब्रह्म सूत्र यांना मिळून प्रस्थान त्रयी म्हणण्यात येऊ लागले
वैदिक धर्माने शैव श्रुतीकडून अनेक गोष्टी आत्मसात केल्या त्यातील एक मोक्ष होती आणि त्याचबरोबर आण्विक्षिकीही होती . तीच अर्थशास्त्राचा सुद्धा कणा होती आणि विष्णू गुप्त जो शैव होता याने जे अर्थशास्त्र लिहिले ज्याच्या आधारे नंतर कौटिल्य याने आपले वर्ण वर्चस्ववादी अर्थशास्त्र लिहिले आणि जे आता कौटिल्याच्याच नावाने ओळखले जाते त्यानेही स्पष्ट उल्लेख केला आहे की काही झाले तरी राजाला आण्विक्षीकी आलीच पाहिजे . विष्णू गुप्त हा नंदांच्या साम्राज्यात होऊन गेला याचे अनेक पुरावे आपणाला खुद्द कौटिल्याच्याच अर्थशास्त्रातच मिळतात त्याचे मूळ अर्थशास्त्र जे अनेक सेवा आचार्यांच्या अर्थशास्त्रावर आधारित होते ते मात्र आता पूर्णपणे गुप्त करण्यात आलेले आहे. अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये तिबेट मधून आलेल्या युरेशियन लोकांच्या पैकी प्रथम अगस्तीने धर्मांतर केले आणि त्याच्यानंतर शुक्राचार्याने! यातील शुक्राचार्याने आपले स्वतःचे अर्थशास्त्र निर्माण केले होते आणि त्याचा उल्लेख अनेकदा अर्थशास्त्राच्या इतिहासात तसा येतो त्या उलट इराण मधून आलेल्या युरेशियन लोकांच्या पैकी जे संहिता घेऊन आले होते त्यांच्यात प्रथम विश्वमित्रांने धर्मांतर केले आणि शैव श्रुती स्वीकारली होती. एकेकाळी ऋग्वेदातील एक मंडल निर्माण करणारा हा ऋषी नंतर मात्र शैव होत गेला . त्यानेच प्रथम ब्रह्मसूत्रांचा स्पष्टपणे प्रचार केला . या दोघांच्या प्रभावाखाली नंतर याज्ञवलक निर्माण झालेला दिसतो .
याचा एक परिणाम असा झाला की अन्वेक्षीकी ही शैव आणि वैदिक युरेशियन अशा दोन्ही श्रुतींनी स्वीकारली. साहजिकच मग भारतात होऊन गेलेल्या सर्व राज्यकर्त्यांना ती येणे अत्यंत आवश्यक होते. जवळजवळ वैष्णव धर्म येईल तोपर्यंत हे सर्व चालू होते . पण मग अचानक अन्विक्षिकीला पर्याय म्हणून स्मृती वांग्मय आणले गेले आणि वैष्णव लोकांनी रामायण व महाभारताला वैष्णव स्मृति म्हणायला सुरुवात केली आणि आण्विक्षिकीचे महत्व कमी होत गेले
हे सर्व ब्राह्मण लोकांनी का घडवले?
सर्वात प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मंत्री हा शब्द मांत्रिक या शब्दापासून तयार झालेला आहे .ज्याला मंत्र येतात तो मांत्रिक ! मांत्रिकाच्या संहिता व विद्या म्हणजेच मांत्रिकी आणि राजासाठी काम करणारा मांत्रिक म्हणजे मंत्री होय . ब्राह्मण धर्माने सर्व क्षत्रियांना मंत्री म्हणून अधिकाधिक ब्राह्मण लोकांची नियुक्ती केली पाहिजे असे सांगायला सुरुवात केली. म्हणजे अनेक राजांच्या दरबारी असणारे शैव पंडित गायब होत गेले आणि अनेक राजांच्या दरबारी हळूहळू वैदिक ब्राह्मणधर्मी मांत्रिक आले . साहजिकच पंडितांची उपजिविका होईना म्हणून त्यांनी स्वतःच मांत्रिकी स्वीकारली आणि ब्राह्मण व्हायला सुरुवात केली . या धर्मांतराने शैव-धर्माचा पूरता सत्यानाश केला . पण त्याचबरोबर राज्य दरबारी मुख्य स्थान असलेली आण्विक्षीकी हलली. राजा अडाणी असला तरी चालेल अशी धारणा आली. काही राजे चक्क निरक्षर असूनही चालू लागले . त्यातच इस्लामचा प्रचंड प्रभाव पडला आणि इस्लाम मध्ये अशी एक गैरसमजुत होती की महंमद पैगंबर निरक्षर होते त्यामुळे निरक्षर माणसाचे ऐकणे म्हणजे काही दैवी असते असे म्हणणारेही लोक आले. अडाणीपणाचे स्तोम माजले . ब्राह्मण लोकांना राजा असा अडाणी असणे हवे होते कारण त्यामुळे त्यांना संपूर्ण राज्यकारण हवे तसे चालवता येत होते कारण मंत्रीपदी अनेकदा तेच असत . या सगळ्याचा दुष्परिणाम भारतातल्या लोकशाहीवर पण नंतर झाला अनेक निरक्षर आणि अडाणी लोक सहजरीत्या निवडून यायला लागले अनेक सुशिक्षित लोक त्यांची सेवा करायला लागले . हा तोच राजा मंत्री फॉर्मुला होता ज्यात राजा अडाणी आणि मंत्री विद्वान असे समीकरण जुळायला लागले. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू झाला जेव्हा 1960 पासून विद्वत्ता ही प्रचंड गुंतागुंतीची गोष्ट होत गेली. वस्तुस्थिती अशी आहे की जसे जसे विज्ञान तंत्रविज्ञान वाढत गेले तशी तशी राजाला त्यांची अन्विक्षिकी जमेना तर्कशास्त्र जमेना अनेकांना तर विज्ञानाचे तर्कशास्त्र येईना . त्यामुळे त्यांच्यासाठी कुठल्याही गोष्टीचा साधक बाधक वादक विचार करणे अवघड होऊन बसले . त्यासाठी मग स्पेशल ऍडमिनिस्ट्रेशन अधिकारी निर्माण करण्यात आले आणि नोकरीच्या तालावर शासन संस्था नाचायला लागली. भारतामध्ये ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये ब्राह्मणांनी पुन्हा एकदा शासन संस्था आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. क्षत्रियांना शिकवण्याच्या संदर्भात ब्राह्मण अत्यंत जाणीवपूर्वक दूर होते. राजा जितका अडाणी तितकी मंत्री बुद्धी शहाणी असे समीकरण तयार झाले .
आज भारतातल्या राजकारणात जी बजबज पुरी निर्माण झालेली आहे ती अन्विक्षिकी च्या अभावातून निर्माण झालेली आहे कसलेही नैतिक कर्तव्य आपले आहे असे राजकारणी लोकांना वाटतच नाही कारण त्यांना लहानपणापासून अन्विक्षिकी शिकवली जात नाही जी राज्यकारण या व्यवसायाची गरज आहे प्राचीन काळापासून गणपती असणे प्रमुख असणे हे विद्येचे ज्ञानाचे काम मानले जात होते परंतु हळूहळू ब्राह्मणांनी गणपती देव्हाऱ्यात बसवला आणि राज्यावर मात्र अडाणी लोक आणायला सुरुवात केली. त्यातच इस्लामने अडाणीपणाचे स्तोम वाढवले . याचा व्हायचा तो परिणाम आज झालेला दिसतो.
आज अवस्था अशी आहे की राजकारणी लोकांना निर्णय घेता येत नाहीत .ते फक्त मतदारांना कसे संघटनात्मक पातळीवर सांभाळता येईल एवढेच बघत आहेत .राज्याच्या संदर्भात एक विशिष्ट भविष्यकालीन दिशा निश्चित करण्यासाठी आण्विक्षिकी शिकणे व अवगत करणे फार आवश्यक असते परंतु ती कोणालाही येत नाही जगभरामध्ये एकापेक्षा एक आडानी लोक आता राज्यकर्ते झालेले दिसतात हे सर्व उत्तर आधुनिक कालखंडामध्ये धर्माचे जे पुनरागमन झाले आणि त्याबरोबर मांत्रिकीचे जे पुनरागमन झाले श्रद्धेचे जे पुनरागमन झाले त्यामुळे घडले आहे . कम्युनिस्ट लोक सुद्धा यामध्ये कमी पडले नाहीत माओ तुंग सारखा आण्विक्षिकीबाबत अडाणी असलेला हाआडेल तट्टू माणूस या लोकांनी गाजवला . त्याच्या रानटी अडाणी पण आला या लोकांनी शहाणपण म्हटले हे सर्व सुशिक्षित असलेल्या बुर्जवा वर्गाच्या हेटाळणी फेटाळणीतून आले होते . राज्यकर्त्यासाठी आणि राज्य करण्यासाठी राज्य चालवण्यासाठी आण्विक्षीकी ही मूलभूत गरज आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि ती शिकणे सर्व राजकारणी लोकांच्यासाठी कंपल्सरी करणे अत्यंत आवश्यक आहे पण आपण हे करत नाही आणि परिणाम असा झालेला आहे की अत्यंत अडाणी राज्यकर्ते आपण निवडून देत आहोत . राज्य चालवता येणे यापेक्षा संघटन करता येणे या गोष्टीला कमालीचे महत्त्व आपल्याकडे दिले गेलेले आहे. भारतीय लोकशाहीमध्ये तर हा संघटनवाद पराकोटीला पोहोचला परिणामी ज्यांच्याकडे संघटन आहे मते आहेत असे लोक पुढे यायला लागले त्यांना आण्विक्षिकी येते की नाही हे कोणी विचारेनासे झाले . भाजप आल्यानंतर हे सर्व कमी होत जाईल असे वाटले होते पण भाजपच्या काळात सुद्धा हेच वाढत गेले याचे कारण भाजपमध्ये ब्राह्मणी हिंदुत्व वाढत गेले .
या सगळ्या प्रकारामध्ये कसलीही नैतिक जबाबदारी राज्यकर्त्यावर पडत नाही . याचा व्हायचा तो परिणाम आता सर्वत्र उगवत आहे तो म्हणजे जवळजवळ जगातल्या सर्वच राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेचा सत्यानाश समोर दिसतो आहे . आणि सर्वत्र मूलभूत कारण एकच आहे ते म्हणजे राज्यकर्त्यांच्या ठाई असलेला अन्विक्षिकीचा अभाव ! खरे तर माझा हा लेख सुद्धा अरण्य रुदन आहे इतके आपण संघटनाला सोकावलेले आहोत . राज्य करण्यापेक्षा सत्ता मिळवणे अधिक महत्त्वाचे झालेले आहे . अलीकडे सत्ता वाढवणे सुद्धा महत्त्वाचे करण्यात आले. परिणाम एकच आहे नैतिकतेला सर्वच लोकांनी तिलांजली दिलेली आहे . आत्ताच्या राजकारणाची स्थिती वर्णन करायची तर मला फक्त वाळवंटात बुडणारी जहाजे दिसत असतात .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment