महाशिवरात्र आणि विरोधाभास श्रीधर तिळवे नाईक 

युरेशियन लोकांच्या पुढे जे काही अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न असतात त्यापैकी एक प्रश्न नेहमी शिव शक्ती या दोन तत्त्वांना आणि शंकर पार्वती विनायक (गणपती) कुमार कार्तिकेय (स्कंद )नंदी (बैल नव्हे मित्र ) या आदिपंचसिद्धांना कसे सामावून घ्यायचे आणि भगवान शंकरांचे भगवती पार्वतीचे करायचे काय हा असतो. ज्याला ते लोकधर्म म्हणतात तोच शैव धर्म आहे आणि त्यामध्ये लोक खूप असल्याने त्याला लोकधर्म म्हटले जाते साहजिकच एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या उपस्थितीचे शेवटी तुम्हाला काही ना काही तरी करावे लागते . ब्राह्मण वर्णाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना एकीकडे यज्ञ ही संस्था आपल्या ताब्यात राहिली पाहिजे असे वाटत असते ती कोणाला दुसऱ्याला देता कामा नये असे वाटत असते आणि जो बहुजन समाज आहे त्याच्यावर धार्मिक राज्य करायचे आहे असेही वाटत असते . या परस्परविरोधी अपेक्षांच्यामुळे अनेक विरोधाभास तयार होत असतात. हे विरोधाभास प्रामुख्याने शैव उत्सवांच्या आणि सणांच्या वेळी अधिकच मोठ्या प्रमाणात अधोरेखित होत राहतात . शैव धर्म कसाही करून स्वतःच्या ताब्यात आला पाहिजे असे वाटत असल्याने आपल्या पद्धतीने काय स्पष्टीकरण देता येईल याचा सतत विचार चाललेला असतो आणि मी मागे म्हटल्याप्रमाणे ब्राह्मण अतिशय व्यवस्थितपणे कलेक्टिव्हली काही मांडणी करत जातात . पण जेव्हा ती एकमेकाला परस्पर पूरक होते तेव्हा ते ठीक असते पण जेव्हा त्याच्यामध्ये परस्पर विसंवाद निर्माण होतो तेव्हा मात्र गोंधळ सुरू होतो महाशिवरात्रीच्या बाबतीमध्ये हे नेहमीच घडत असते याचे कारण असे की महाशिवरात्रीचे काय कारण द्यायचे असा एक फार मोठा प्रश्न युरेशियन श्रुती पुढे नेहमीच ठाकत असतो सर्वसाधारणपणे शिवाचे रुद्रिकरण हे सुरूच आहे अलीकडे ते उलट वाढलेले आहे पण हे करताना अनेक विरोधाभास निर्माण होत जातात . मुळात रुद्र ही वेगळीच देवता आहे आणि ती वैदिक देवता आहे ऋग्वेदामध्ये तिचा स्पष्ट उल्लेख आहे. अपवादात्मक वेळेला शंकरासारखा उल्लेख आहे आणि मरुतगणा संदर्भात तो अधिक होतो कारण हा एक असा गण होता जो शंकर आणि रुद्र अशी दोघांची ही पूजा करत असावा. 


मी यावर एक स्वतंत्रपणे लेख टाकून सांगितले होते की महाशिवरात्र हा मुळातच भगवान शंकरांचा मोक्ष दिवस आहे . आणि हाच शैव कॅलेंडरचा शेवटचा महिना आहे आणि तो महाशिवरात्रीने साजरा केला जातो . याच कालखंडामध्ये भगवान शंकर यांनी मोक्षा विषयीची ११४ तंत्रे सांगितलेली असल्याने साहजिकच त्याचा उत्सव साजरा होतो. यातील काही तंत्रे ही भाव ( भक्ती )तंत्रे आहेत . भाविक (भक्त )लोकांना नेहमीच उत्सव साजरे करायचे असल्याने आचरणापेक्षा त्यांचे लक्ष हे नेहमीच सण साजरा करण्याकडे असते. मोक्षप्राप्तीनंतर शंकर यांनी जे नृत्य केले ते तंद्रा नृत्य विलोभनीय होते पुढे रुद्रीकरण करण्याच्या नादामध्ये अनेकांनी त्याचे रूपांतर तांडव नृत्यात केले पण प्रत्यक्षात तांडव नृत्य हे नंतर आलेले आहे महाशिवरात्रि मध्ये तंद्रा नृत्य आलेले आहे . आज सुद्धा आपण त्याची काय तंद्रा लागली असे म्हणत असतो त्याचे कारण हे नृत्य आहे कारण इंद्रियांचा संपूर्ण विलोप शिवतत्वात झालेला असतो आणि त्या अंतिम सत्याशी एकरूपता असते ही निर्वीकल्प समाधी असते जी नृत्य करत असते . त्यामुळेच या काळामध्ये शैव मंदिरांच्या मध्ये नृत्यांचे कार्यक्रम ठेवले जातात .


आता प्रॉब्लेम असा आहे की हे स्वीकारायचे की नाही असा प्रश्न असतो . स्वीकारायचे असे ठरवले तर त्यातून पुढचा प्रश्न हे कसे करायचे ? आपल्या युरेशियन परंपरेमध्ये कसे काय याचे कारण द्यायचे?


यासाठी मग उत्सवाचे कारण म्हणून शिव आणि पार्वतीचा विवाह झाला असे सांगितले जाते आणि फार पूर्वी पुराण हे यासाठीच वापरले जात होते पण झाले असे की पुरानातले जे पुरावे आहेत त्यामध्ये प्रचंड विरोधा भास आहे शिवपुराणानुसार (सती खंड अठरावा अध्याय )हा विवाह चैत्र महिन्यात झाला शुक्लत्रयोदशी त्यादिवशी झाला आणि महाशिवरात्र चैत्राच्या आधीच साजरी होते त्या उलट शिवमहापुराण मध्ये या विवाहाचा उल्लेख मार्गशीर्ष महिन्यात होतो असा केलेला आहे यातला मोठा विरोधाभास असा असतो की हे उल्लेख वारासहित येतात आणि वार ही संकल्पना मुळात भारतामध्ये ग्रीक लोकांच्या नंतरच आली . भारतातले कॅलेंडर हे नेहमी तिथ्यांच्यानुसार चालते . अमावस्या आणि पौर्णिमा पुनम यांच्या हिशोबाने चालते.


प्रश्न असा आहे की हा उल्लेख असा का झाला तर त्याचे कारण स्पष्ट आहे वसंत पंचमीलाच मुळात पार्वतीने आजच्या भाषेत सांगायचे तर भगवान शंकर यांना प्रेम स्वीकृती विनंती दिली होती म्हणजे प्रपोज केले होते . त्यासाठीच वसंत पंचमी हा दिवस साजरा केला जातो आणि तो तसाच रंगोत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे . पण या दिवशी अलीकडे जाणीवपूर्वक सरस्वती आणली जाते जेणेकरून पार्वतीने स्वखुशीने शंकरांच्या पुढे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या आणि हे फार आधुनिक आहे ही आधुनिकता झेपत नसल्यामुळे मग परंपरेकडे वळावे म्हणून सरस्वती या दिवशी आणली गेली आणि या वसंत पंचमीला प्रचंड प्रमाणात त्याचा प्रचार केला गेला वास्तविक शिव आणि पार्वती हा प्रेमविवाह आहे आणि नंतर तो संपूर्ण शैव लोकांच्यासाठी अत्यंत आदर्श विवाह म्हणूनच प्रचलित आहे. किंबहुना शंकरासारखा नवरा मिळावा म्हणून पार्वतीकडे सोळा सोमवारचे व्रत करणारे जे व्रत आहे ते यामुळे सुरू झाले. जर का युरेशियन लोकांना आधुनिक व्हायचे नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहेत आणि शंकर कसा सामावून घ्यायचा हा सुद्धा त्यांचा प्रश्न आहे परंतु हे सामावून घेणे परस्पर विरोधी होणार असेल तर मग ते तर्कशुद्ध ठरत नाही . मुख्य म्हणजे कधीही मूळ खरे वास्तव हे बिघडवून सामील करून घेऊ नये . महाशिवरात्र साजरी करा आणि मोक्षाचा उत्सव म्हणून साजरी करा ते जास्त भारतीय परंपरेला धरून आहे आणि मुख्य म्हणजे ते सर्वसमावेशक होत जाईल आणि परस्परविरोध निर्माण होणार नाही बाकी तुमची मर्जी आहेच

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय