नेहरू निशिकांत दुबे आणि हिंदुत्ववाद श्रीधर तिळवे नाईक
चार वेळा लोकसभेत निवडून आलेल्या एखाद्या खासदाराने संसदेमध्ये कसे बोलावे याविषयी काही अपेक्षा असतात या अपेक्षा बहुदा धुळीला मिळालेल्या आहेत की काय अशी शंका निशिकांत दुबे यांच्यामुळे आता येत आहे. वास्तविक सगळे दुबे हे मूळचे पंडित तरीही असे व्हावे हे पंडित किती ब्राह्मनाईजड झाले आहेत त्याचे लक्षण आहे.
या सगळ्याचा संदर्भ नेहरू आणि गांधी असतो आणि आहे . मी नेहमीच सांगत आलेलो आहे की भाजपचा पराभव झाला तर तो ब्राह्मणी हिंदुत्वामुळे होईल . त्या दिशेने जायचे की नाही हे भाजपने ठरवायचे आहे पण हे नक्की पराभवाकडे वाटचाल असणार आहे याबद्दल खात्री बाळगा . ब्राह्मणी हिंदुत्व हे कायमच हिंदूंना पराभवाच्या दिशेने नेते इतिहास साक्षी आहे त्यामुळेच ते अत्यंत वाईट पद्धतीने नेहरू यांच्यावर हल्ले करत असते आणि अनेकदा बाकीचे लोक सुद्धा त्यांच्या कह्यात येतात. निशिकांत दुबे यांचे असे झालेले आहे त्यामुळेच आता अनेकदा काय घडले हे नीट सांगण्याची गरज भासत आहे म्हणून सांगतोय .
मी स्वतः नेहरूंच्यावर आणि गांधींच्या वर या अंगाने कायम टीका केलेली आहे किंबहुना या दोन लोकांना इस्लाम काय आहे ते कधीच कळले नाही असे माझे स्पष्ट मत आहे . त्यामुळे त्यांच्या अनेक चुका झाल्या ही वस्तुस्थिती ! दुर्दैवाने त्यांनी आपल्या या चुका सुद्धा दुरुस्त केल्या नाहीत आणि त्या आज सुद्धा जशाच्या तशा मिरवल्या जातात . याचा सर्वच हिंदुत्ववादी लोकांना राग येणे अटळ आहे. पण हा राग कसा असावा हे ठरवावे लागते
खुद्द काँग्रेसमध्येच याबाबतीत हळूहळू जागा झालेला एक गट आहे आणि हा गट शरद पवारांच्या सारखा आहे चूक कुठे झाली हे त्याला कळते आहे परंतु ती मान्य करण्याची तयारी नाही .सर्वसाधारणपणे कुठलाही पक्ष आपल्या चुका दुरुस्त करत असतो परंतु हिंदूंच्या संदर्भात काँग्रेस कडून झालेल्या चुका काँग्रेस अजूनही स्वीकारायला तयार नाही आणि शरद पवार यांना या चुका स्पष्टपणे दिसत असल्यामुळे त्यांना काय करायचे ते कळत नाही कारण त्यांच्याबरोबर या मुद्द्यावर काँग्रेस यायला तयार नाही . अशावेळी शरद पवार यांनीच खरंतर सरळ सरळ स्वतंत्र पणाने मांडणी करायला हवी पण सेक्युलर संस्कार इतके घट्ट असतात की ते निसटता निसटत नाहीत सुटता सुटत नाहीत .
दुसरा गट मात्र सोनिया गांधी यांचा आहे ज्याला सेक्युलर वाद अजिबात सोडायचा नाही . त्या मागचे कारण उघड आहे स्वतः सोनिया गांधी ख्रिश्चन आहेत आणि त्यांनी आपली मुलगी सुद्धा ख्रिश्चन मुलाला दिलेली आहे. ख्रिश्चन असणे हा गुन्हा नाही पण ख्रिश्चन असण्यासाठी आंधळा सेक्युलर वाद हा अवगुण आहे.
मुळातच एक गोष्ट मला इथे सांगणे आवश्यक आहे कारण हे सर्व जिथून आलेले आहेत त्याचा अनेकदा अनेकांना विशेषतः पुरोगामी लोकांना अंदाज नसतो . भारतामधील वसाहतवादाची आणि युरोपियन साम्राज्यवादाची जी विरासत आहे ती याला प्रामुख्याने जबाबदार आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे अनेक काँग्रेसी लोकांना कधीही आपण कलोनाइज्ड कुठे होतो हेच कळत नाही . हे जरा नीट समजवायचे असेल तर मला भूतकाळात जावे लागेल एक किस्सा या निमित्ताने सांगावासा वाटतो त्यावरून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट व्हाव्यात
ब्रिटिश इतिहासामध्ये सॅम्युअल जॉन्सन हा कदाचित सर्वाधिक विद्वान मानलेला मानला गेलेला गृहस्थ आहे त्याचा हा किस्सा आहे काळ आहे १७३३ !
१७३३ मध्ये सॅम्युएल जॉन्सन एकदा बॉसवेलला उत्सुकतेबद्दल आणि ज्ञान आणि उत्सुकता यांच्या संबंधाबद्दल क्युरिऑसिटी बद्दल इंटरव्यू मध्ये बोलत होता आणि क्युरासिटी ही नेमकी कशाबद्दल असते या प्रश्नावर दोघे चर्चा करत होते आणि त्यावेळी तो अचानक या अंगाने इंटरव्यू देताना म्हणाला " मला दुसऱ्या एका देशात ज्याचा धर्म वेगळा आहे संस्कृती वेगळी आहे त्या देशात जाऊन अभ्यास करायचा आहे अनुभव घ्यायचा आहे "(पुढे अर्थातच तो उत्सुकतेने झोपी गेला ते सोडून द्या पण इंटरव्यू देताना तरी त्याला जागरूकपणे जायचे होते ) तेव्हा त्याला बॉसवेलने विचारले ," कुठला देश आवडेल?" तर त्याने नाव तुर्कस्तानचे घेतले होते आणि मग म्हणाला," ज्यांच्याबद्दल उत्सुकता वाटावी अशी दोन जगे आहेत पहिले ख्रिश्चन जग आणि दुसरे मुस्लिम जग ! बाकी जे आहे ते सर्व रानटी आहे" त्याने barbarous असा शब्द वापरला होता . लक्षात घ्या १७३३ मध्ये या विद्वान माणसाला आशिया बद्दल काहीही माहिती नव्हती आणि हो तो त्या काळातला सर्वाधिक वाचन केलेला पुरोगामी म्हटला जात असे .
भारतातले पुरोगामी हे बहुतांशी या काळातल्या युरोपभर उभ्या राहिलेल्या आणि इंग्लंडमध्ये विशेष प्रोटेस्टंट पद्धतीने प्रचलित झालेल्या इंग्लंडच्या पुरोगामी वादावर उभे असतात. ते युरोपचा इतिहास नीट वाचत नाही आणि त्यातील काही अति शहाणे तर या काळातल्या युरोपियन लोकांच्या प्रमाणेच भारतीय लोकांना रानटी समजतात. आजही राजू परुळेकर सारखे रानटी समजणारे आहेतच. मुळात त्या काळात काय पद्धतीच्या साम्राज्यवादी धारणा होत्या आणि त्या या लोकांनी कशा स्वतःच्या साम्राज्यासाठी सोयीस्करित्या राबवल्या हे अनेकदा युरोपला आणि युरोप मधल्या पुरोगामी लोकांना कळाले नाही मग ते भारतातल्या लोकांना कसे काय कळणार ? चर्चिलचा साम्राज्यवादी माज हा थेट या राजेशाही पिंड असलेल्या पुरोगामी परंपरेपासून सुरू होतो. हे युरोपियन लोक मुस्लिमांशी भांडले होते आणि त्यांच्या पुरोगामी वादासाठी कळत नकळत मुस्लिम संस्कृती जबाबदार होते कारण त्यांच्याशी संबंध आल्यानंतरच हे लोक स्वतःच्या ग्रीक वारशाशी पुन्हा जोडले गेले साहजिकच ते मुस्लिम संस्कृती बद्दल कृतज्ञ होते आणि मुस्लिम संस्कृतीचा आधार ख्रिश्चन धर्म आणि ग्रीक तत्त्वज्ञान आहे याबद्दल त्यांना पक्की खात्री होती त्यामुळे हे सर्व लोक इस्लामला स्वतःचा बंधू धर्म समजत होते त्यामुळे त्यांच्या दृष्टीने फक्त ज्यांच्याशी त्यांनी कृसेड म्हणजेच धर्म युद्ध केले तेच फक्त संस्कृती म्हणून अस्तित्वात होते कारण त्यांनी शेवटी युरोपच्या काही भागावर अंशतः तर स्पेन सारख्या राष्ट्रावर संपूर्ण राज्य केले होते(या काळातील युरोपियन लोकांनी लिहिलेली सर्वच पुस्तके त्या काळामध्ये फारशी वाचली जात नव्हती हे आपण लक्षात घेतले पाहिजे) त्यामुळेच त्यांना इस्लामची संस्कृती ही युरोपियन संस्कृतीच्या तुल्यबळ वाटत होती आणि याचेच पडसाद तुम्हाला मानवेंद्रनाथ राय यांनी जो प्रबोधनाचा आणि क्रांतीचा इतिहास लिहिला विशेषता युरोपचा जो इतिहास लिहिला त्यामध्ये तुम्हाला दिसेल. साहजिकच इस्लाम हा कायमच कम्युनिजमचे आकर्षण केंद्र राहिलेला आहे आणि या सगळ्या परंपरेचा प्रचंड प्रभाव नेहरू आणि गांधी यांच्यावर होता आणि म्हणूनच ते लोक इस्लाम बाबत मोहमुलायम होते . शिवाय यांचे काही वैयक्तिक संबंध असे होते की ज्यामध्ये मुस्लिम माणसाने काही ना काही तरी त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्याच्या करिअरमध्ये योगदान दिले होते साहजिकच गणिते बदलत होती पण त्यांच्या हे कधीही लक्षात आले नाही की या इस्लामिक लोकांनी प्रत्यक्षात काय केले ? अनेकदा तर मुस्लिम लोकांचा भारतीय इतिहास दडवून ठेवण्यात आला. वैयक्तिक पातळीवरचा व्यवहार या लोकांनी सार्वजनिक आयुष्यात आणला आयडिया लॉजी म्हणून स्वीकारला पण गमतीचा भाग असा होता की महात्मा गांधी यांचा मुलगा स्वतः जेव्हा मुसलमान झाला तेव्हा त्यांना ते काही आवडलेले दिसत नाही . खरंतर महात्मा गांधी यांनी जे केले ते त्यांच्या घरात कर्मरूप फळाने परत आले आणि शेवटी मुलाला इस्लाम बनवण्यामध्ये कन्व्हर्ट झाले. हे असेच असते. तुमचा बेसावधपणा तुम्हाला कधी ना कधीतरी बुडवणारच असतो शेवटी नेहरू यांच्या घराण्याचे काय झाले तर राहुल गांधी यांचे लग्न नाही आणि प्रियांका आता हळूहळू बौद्ध झालेली आहे म्हणजेच नेहरू यांनी अप्रत्यक्ष स्वीकारलेला धर्म आज त्यांच्या घरामध्ये प्रत्यक्ष झालेला आहे म्हणजेच आता हे घराणे अर्धे ख्रिश्चन आहे आणि अर्धे बौद्ध आहे आणि या लोकांना आता हिंदूंची मते हवी आहेत ती कशी मिळणार ? त्याचा आधार मग एकच उरतो तो म्हणजे धर्मनिरपेक्षता वाद ! त्यामुळे या लोकांना हा धर्मनिरपेक्षतावाद रेटत न्ह्यावाच लागेल प्रश्न असा आहे की बाकी काँग्रेसवाले जे लोक आहेत त्यांनी यामागे फॅमिली ओरिएंटेड रेटत स्वतःला न्यावे का ?
थोडक्यात काय ज्या युरोपियन संस्कृती मधून नेहरू आले होते गांधी आले होते तिथल्याच तथाकथित पुरोगामी लोकांच्या काय धारणा होत्या आणि त्या मग भारत जिंकून घेतल्यानंतर सुद्धा कशा टिकल्या याची सहजासहजी कल्पना त्यांना कधीही आली नाही आणि अद्यापही येत नाही अनेकदा तर या लोकांच्या आधारावर या लोकांनी आपले स्वतःचे भारतीय इतिहास रचले ज्याचा अनेकदा भारतीयांशी काही संबंध नव्हता
थोडक्यात काय हे लोक कळत नकळत वसाहत वादाला बळी पडले त्यातला सर्वात मोठा बळी पडण्याचा हिस्सा हा इस्लामशी निगडित होता
प्रश्न असा आहे की मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याला अपवाद होता का? तर नाही हे लोक दुसऱ्या प्रकारच्या वसाहतवादाला बळी पडले . हा इंडो आर्यन वसाहतवाद होता जो या लोकांना ब्राह्मण लोकांना सांगत होता की ते आर्य आहेत आणि युरोप मधून आलेले आहेत किंवा कॉक्सेस पर्वतावरून किंवा उत्तर खंडावरून आलेले आहेत. पुढे तर हिटलरला सुद्धा पाठिंबा संघाने दिला त्याचे कारण हेच होते की तो स्वतःला आर्य वगैरे म्हणवून घ्यायचा आश्चर्यकारक रित्या तो भारतीयांना आर्य समजत नव्हता आणि याची कल्पना संघाला आलीच नाही. म्हणजेच हिटलर बाबत हे लोक पूर्णपणे चकले होते . आता गांधी नेहरू यांचे इस्लाम बाबत चकणे हा गुन्हा आणि तुमचे हिटलर बाबत चकणे हे मात्र सज्जन पण होता काय ? तुम्ही केलेल्या मुस्लिम लीग बरोबरच्या युतीचे काय करायचे ? म्हणजे स्वतःच्या चुका झाल्या तर त्या बरोबर आणि समोरच्या विरोधकांच्या चुका झाल्या तर मात्र तुम्ही इतक्या खालच्या पातळीवरून टीका करणार ?
माझ्या मते हिंदुत्ववादी लोकांनी आता एकदा नीट आपण विरोधकांशी कसे वागायचे हे ठरवणे आवश्यक आहे काँग्रेसकडून जे काही येते आहे ती तुमच्या क्रियांची प्रतिक्रिया आहे. मुख्य म्हणजे आता लोकांच्या मध्ये त्याचे पडसाद येत आहेत . माझा साधा प्रश्न असा आहे की हे भारतीय संस्कृतीमध्ये बसते का ? भारतीय संस्कृती ही मंडन खंडन आणि मग निर्णयन सुसंवाद अशा पद्धतीने वाद घातला पाहिजे असे सांगते . तुम्ही ही भारतीय संस्कृती का पाळत नाही ? तुम्ही आता जे करता आहात ते ब्राह्मण आणि मुस्लिम संस्कृतीमधून आलेले आहे . तुम्ही हिंदू आहात की फक्त ब्राह्मण की मुस्लिम ?
एकदा शांतपणाने बसून विचार करा आणि मग ठरवा . याबाबतीत शरद पवार हे सर्वात आदर्श व्यक्तिमत्व आहे . त्यांच्यापासून जर काही यासंदर्भात शिकता येण्याजोगे आहे तर शिका. अटल बिहारी वाजपेयी हे सुद्धा याच पद्धतीतले होते . हवे तर त्यांच्या नावाने शिका पण शिका. सहिष्णुता ही निदान बोलण्यात तरी दिसलीच पाहिजे . बाकी युद्धभूमी सुरू झाली की हर हर महादेव आहेच. संसद ही काही युद्धभूमी असत नाही ती वाद भूमी आहे याचे भान राखा .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment