Posts

Showing posts from August, 2026
 काँग्रेसचा वांजोटा एक राष्ट्रवाद श्रीधर तिळवे नाईक  हल्ली कपिल सिबल यांचा एक व्हिडिओ सतत फिरतोय त्यामुळे या विषयावर बोलतो आहे  ते म्हणतात की आंबेडकर यांनी असे म्हटले आहे की जिना आणि सावरकर आपापसात भांडत असले तरी आश्चर्यकारित्या दोघेही द्विराष्ट्रवाद स्वीकारतात हे विधान बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते हे बरोबर आहे पण पुढे जे सांगितले जाते ते आंबेडकरांनी स्पष्टपणे म्हटलेले नाही त्यामुळेच याबाबतीत निर्णय घेणे भाग आहे  सर्वात पहिली गोष्ट हिंदू आणि मुस्लिम या दोन संस्कृती आहेत अशी मांडणी मुस्लिम लोकांनी आणि मुस्लिम विचारवंतांनी केली आणि तिथेच द्विराष्ट्रवाद जन्माला आला पुढे करझनच्या काळात बंगालच्या फाळणीच्या वेळी सुद्धा बंगाल मधले असे अनेक मुस्लिम लीगचे विचारवंत द्विसंस्कृतीवादी आणि द्वि राष्ट्रवादी होते तेव्हा याबाबतीत जे हिंदूंना दोष देतात ते नालायक आहेत हिंदूंनी प्रथम ही थेरी मांडलेली नाही द्विराष्ट्र वादाचा सिद्धांत प्रथम मुस्लिम लोकांच्याकडून आलेलां आहे याचे कारण उघड आहे फुटीरता वाद ! फुटीरतावाद मुस्लिम राजकारणाचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे पाकिस्तान निर्मितीनंतर स...
वगळणीचे दोन प्रकार आणि जगाचे आणि भारतातले बदललेले मॅपिंग! श्रीधर तिळवे नाईक  21 व्या शतकामध्ये काही गोष्टी स्पष्टपणे नव्याने सामोरे आलेल्या दिसतात आणि त्या खरोखरच धक्कादायक आहेत त्यातील एक गोष्ट म्हणजे उत्तर आधुनिक संस्कृतीचा विचार करता करतात कळत नकळत काही संस्कृतीनी काही वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे  यामध्ये दोन महत्त्वाचे बदल भारताशी संबंधित आहेत त्यामुळे त्यांची नोंद घ्यायला हवी  पहिला बदल पहिली वगळणी आहे कळत नकळत अलीकडे युरोपमधून रशियाला युरोप खंडाचा भाग म्हणून वगळणे सुरू झालेले आणि त्याला युरेशिया असे स्वतंत्र नाव देऊन आशिया खंडामध्ये सुद्धा अनेकदा ठेवलेले दिसते खरे तर हे फार पूर्वीच राहायला पाहिजे होते कारण आशिया खंडाचेच युरेशिया आणि भारतीय किंवा इंडियाना असे दोन भाग होतात हे आता सर्वांनी स्वीकारावे हे उत्तम आहे त्यातील उत्तर आशिया म्हणजे पूर्वीचा संपूर्ण मोठा महा रशिया चीन मंगोलिया वगैरे सर्व आणि भारतीया किंवा इंडियाना म्हणजे संपूर्ण हिमालयापासून थेट खालपर्यंत पोचलेला सावत एशिया ! खरे तर कधी ना कधीतरी हे होणारच होते ते आता व्हायला लागले असे दिसते...
ज्ञानाला सुद्धा लोक घाबरायला लागले  ज्ञानात सुद्धा लोकांना फील गुड लागायला लागले ब्रेन सुद्धा सतत फील गूड च्या शोधात  बेस्ट मूड च्या संशोधनात  कवी म्हणून भावना पाहायला जाशील  आणि ब्रेनमध्ये फसशील  तुला संत व्हायचंय  आणि ब्रेनला फक्त जिवंत राहायचंय  टिकण्याला धमकी मिळाली  की तो खमका होतो  एरवी नाही तर मिस्टर चमको होतो सतत चुकण्याची वाटणारी भीती  त्याला पळपुटा करते  मोक्ष तर त्याला ठाऊकही नाही  त्याच्या दृष्टीने ते  ऱ्हस्वदृष्टीत दिवा स्वप्न  दीर्घदृष्टीत सूर्य स्वप्न  काजव्याने पाहिलेले  अशावेळी ब्रेनच्याही पलीकडे असलेला तो शिव  तुला कसा शिवणार आहे ? अपयशाच्या शक्यता सावध करतात  आणि यशाच्या शक्यता दिसत सुद्धा नाहीत  नकळत येणारे फ्रस्टेशन  तुला ते ट्रस्टेशन बनवायचे आहे  हे तुझे भाग्यच म्हटले पाहिजे कि  सविकल्प समाधी तू जन्मतःच घेऊन जन्मला होतास  जी सुप्त होती  आणि योग्य वेळ येताच प्रकट झाली  पण बाकीच्यांना हे भाग्य लाभलेले नाही  याची जाण बाळग  मागील जन्मां...
 परंपरेचे नवताकरण श्रीधर तिळवे नाईक  परंपरा वर्तमानात उपस्थित असतातच प्रश्न असा आहे की त्या कोणाच्या हवाली करायच्या मी सुरुवातीच्या दुसऱ्या टप्प्याच्या.कालखंडामध्ये त्यांना प्रचंड विरोध करून बघितलेला आहे चौथ्या नवतेचा जोरदार पुरस्कार करून बघितलेला आहे पण माझा अनुभव असा की यामुळे परंपरांना धक्का लागतो हे खरे आहे आणि तो तसा द्यावा पण तरीही काही परंपरा शिल्लक राहत असतील आणि त्यांच्यात काही दम आढळत असेल तर मग त्यांना कुणाच्या हवाली करायचे हा प्रश्न विचारावा आपण हा प्रश्न विचारत नाही आणि मग फार मोठा गोंधळ निर्माण करतो  एकतर चौथ्या नवतेसाठी कुठली परंपरा निवडायची असा प्रश्न प्रथम विचारायला  हवा एकदा या प्रश्नाचे उत्तर मिळाले किंवा  लक्षात आले की ही परंपरा टिकवण्याच्या लायकीची आहे का हा प्रश्न निवडावा आणि मग त्यात काय टिकवावे आणि त्यातील का फेकून द्यावे याचा सारासार विवेक बुद्धीने विचार करावा आणि मग ती परंपरा  नवतेच्या कशी हवाली करायची ते ठरवावे आणि एकदा ते ठरवले की मग ती संपूर्ण परंपरा नवता बनवावी  माझ्या कवितांच्या मधून हे मी सातत्याने केलेले आहेत अनेक शैव प...
जनरेशन जी चे आंदोलन , आत्म्याचा प्रश्न , व्यवस्था गेली संरचना गेली आणि आता पुढे नेटवर्किंग काय? श्रीधर तिळवे नाईक  अनेक पुरोगामी लोक अलीकडे आपण या z जनरेशनला समजून घेतले पाहिजे आपण या z जनरेशन पासून तुटले आहोत अशी मांडणी करत आहेत त्यांच्याकडे पाहिले की असे वाटते की हे खरे असावे. त्याच वेळेला आपण असे पाहतो की जे सत्ताधारी लोक आहेत त्यांच्यापैकी सुद्धा अनेकांना ही z जनरेशन कशी काम करते हेच लक्षात येत नाहीये त्यामुळेच या आंदोलनाचा प्रतिकार कसा करावा हे काही त्यांना नीट समजलेले नव्हते आणि समजत नाहीये . नेहमीप्रमाणे खोटारडेपणा , खोडसाळपणा आणि अपप्रचार असा प्रकार सुरू झालेला आहे पण त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे या लोकांना कळत नाही. दंतकथांच्यावर विश्वास ठेवण्याचा एक काळ मधल्या काळात आला होता पण आता ही जी नवीन z जनरेशन आली आहे ती या सगळ्या दंतकथांच्या स्पॉन्सरशिपवर कदाचित विश्वास ठेवणार नाही फक्त या z जनरेशन मधले काही अंधताबद्ध लोक यावर विश्वास ठेवतील पण असे अंधताबद्ध लोक प्रत्येक जनरेशनमध्ये असतात आणि अनेकदा ते प्रस्थापित लोकांच्या बाजूने असतात . काँग्रेसच्या काळात हेच लोक काँ...
 इतिहास आणि व्यवस्था यांच्याकडून परंपरा आणि संस्कृती यांच्याकडे श्रीधर तिळवे नाईक  विज्ञान वाद आणि त्यातून निर्माण झालेला पुरोगामी युगाचा टप्पा हा मानवी इतिहासामधला अतिशय महत्त्वाचा असा टप्पा आहे. ज्ञानाची कुठलीही नवीन व्यवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा तिला प्रस्थापित सत्ता विरोध करते किंवा मग समांतर सत्ता तिला अतिशय हुशारीने आपल्या बाजूने वळवत आणि वापरत आपल्या समांतर सत्तेला प्रस्थापित सत्ता करून टाकते युरोपियन राजकारणामध्ये जवळजवळ सर्वच राष्ट्रांच्या मध्ये हे घडलेले दिसते . विज्ञान जेव्हा प्रायोगिक अवस्थेत होते तेव्हा सर्वच राज्यकर्त्या लोकांनी धर्माच्या प्रभावाखाली विज्ञानाला विरोध केला असे आपणाला दिसते परंतु जेव्हा या लोकांच्या हे लक्षात आले की आपणाला हे नवीन आलेले ज्ञान अधिक सत्ता देणार आहे तेव्हा या लोकांनी मग धर्माचा पक्ष सोडून विज्ञानाचा पक्ष घ्यायला सुरुवात केली आणि खरोखरच विज्ञानाने त्यांना आधीच्या धार्मिक साम्राज्यांच्या पेक्षा फार मोठे वैज्ञानिक साम्राज्य निर्माण करून दाखवले ज्याला आपण वसाहतवाद असे म्हणतो . धर्मयुगाने आणि धर्मज्ञानाने निर्माण केलेले मायथॉलॉजीच...
 God is geographical. You either inherit it as inheritance of family geography or from social geography of your childhood.  Shridhar Tilve Naik
तुम्ही दुर्दैवी आहात का या प्रश्नाचे मी दिलेले उत्तर श्रीधर तिळवे नाईक  प्रश्न  तुम्ही दुर्देवी आहात असे म्हटलं जातं तुम्हाला तसे वाटते का ? श्रीधर तिळवे नाईक उत्तर:  नाही! मी स्वतःला भाग्यवान आणि परम भाग्यवान समजतो . प्रश्न :  का? श्रीधर तिळवे नाईक उत्तर:  मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण मला मी व्यवहारिक जीवनामध्ये काय आहे ते कळाले होते. मला अकरावीलाच कळाले की मी कवी आणि तत्वज्ञ आहे भले त्या मागच्या सगळ्या गोष्टी मला कळाल्या नसतील पण मला हे आता नक्की सांगता येते की हो मला हे त्यावेळेला कळाले होते त्यामुळे या दोन गोष्टी एन्जॉय करत मी आयुष्य जगलो ज्या गोष्टींनी आनंद दिला त्याबद्दल कसला खेद आणि कसली खंत ? एका विशिष्ट काळामध्ये कवितेचं काय असा मला प्रश्न पडायचा पण आता तर तोही पडत नाही कारण जी गोष्ट करताना तुम्हाला आनंद मिळतो ना ती बेस्ट तुमच्यासाठी आणि आपल्यासाठी काय बेस्ट आहे हे कळणे म्हणजे भाग्य ! म्हणून मी स्वतःला भाग्यवान म्हणतो परम भाग्यवान मी यासाठी आहे की माझा शक्तिपात झाला . आणि ज्याला मोक्ष कळाला फळाला आला तो परम भाग्यवान ! आपण सगळेच परमभाग्यवान होऊ शकतो आ...