अन्विक्षिकीचा अस्त आणि जगभरात राजकारणाची अर्थकारणाची लागलेली वाट श्रीधर तिळवे नाईक शैव श्रुतीमध्ये श्रद्धा युगाला आव्हान देत भगवान शंकरांनी अनेक गोष्टी आणून ठेवल्या त्यातील एक गोष्ट म्हणजे शास्त्र ! गणित ,भूमिती आणि आण्विक्षिकी म्हणजेच तर्कशास्त्र आणि त्याच्या साह्याने घेतले निर्णय जाणारे निर्णय ! भगवान शंकर यांनी ही तीन शास्त्रे मान्य केली आणि मला सुद्धा फक्त तीच मान्य आहेत . इतर जी शास्त्रे म्हणून सांगितली जातात ती शास्त्रे नाहीत श्रद्धा युगाने अनेक विद्या निर्माण केल्या त्यांचा मुख्य आधार अनुभव , जाण , शहाणपण आणि पिढ्यान पिढ्या केली गेलेली प्रॅक्टिस होती आज सुद्धा आदिवासी लोकांच्यात अनेक विद्या आपणाला दिसतात. भगवान शंकर यांनी या विद्यांच्यामध्ये शास्त्र आणि विद यांची भर टाकली . विद मध्ये १ आयु विद २ ज्योतिष विद यात भूगोल सुद्धा येतो ३ नाट्यविद ४ कामविद यांचा समावेश होता आणि ज्यांना कोणाला या गोष्टी प्राप्त करायच्या असत ते गुरु शिष्य परंपरेने या गोष्टी प्राप्त करत ज्यांना वैदू म्हणत ( तामिळ भाषेमध्ये आज सुद्धा ही परिभाषा उपस्थित आहे ) मराठीत आज सुद्धा वैदू हा शब्द प्रच...
सत्य किती ? सत्ये किती?श्रीधर तिळवे नाईक गेले कित्येक लेख आपण सत्याविषयी चौथी नवता काय म्हणते याचा शोध घेत आहोत. पुरोगामी वाद आणि आधुनिक वाद यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जर काही असेल तर ते म्हणजे दोघेही एकच एक सत्य मानत होते आणि तशी मांडणी करत होते. याला शह देण्यासाठी म्हणून उत्तराधुनिकतेने सत्य अनेक असतात असा सिद्धांत मांडला आणि संपूर्ण आधुनिक वाद मोडीत काढला . यामागे नेमके काय कारण होते? यामागे कारण होते उत्तराधुनिक ज्ञानाची quantam प्रक्रिया जी मुळातच ऑब्जेक्टिव्ह कडून सब्जेक्टिव्ह कडे आली. सर्वसाधारणपणे पुरोगामी युग हे ऑब्जेक्टिव्ह सत्य शक्य आहे असे मानत होते तर आधुनिक युग ऑब्जेक्टिव्ह सत्य एक आहे हे स्वीकारत होते परंतु ते वेगवेगळ्या ठिकाणी फॅक्चर झालेले आहे अशी मांडणी करत होते त्यामुळेच फ्रॅक्चरड सब्जेक्ट फ्रॅक्चरड माईंड फ्रॅक्चरड सोसायटी हे आधुनिकतेचे एक फार मोठे समीकरण उदयाला आले. उत्तर आधुनिकतेने याही पुढे जाऊन अनेक सत्ये असतात असा सिद्धांत मांडला आणि सब्जेक्ट इज डेड असे जाहीर केले . त्यातूनच मग बहुविध दृष्टिकोन आणि बहुविध multiple सत्ये यांचा सिद्धांत स्वीकारला गेल...
महाशिवरात्र आणि विरोधाभास श्रीधर तिळवे नाईक युरेशियन लोकांच्या पुढे जे काही अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न असतात त्यापैकी एक प्रश्न नेहमी शिव शक्ती या दोन तत्त्वांना आणि शंकर पार्वती विनायक (गणपती) कुमार कार्तिकेय (स्कंद )नंदी (बैल नव्हे मित्र ) या आदिपंचसिद्धांना कसे सामावून घ्यायचे आणि भगवान शंकरांचे भगवती पार्वतीचे करायचे काय हा असतो. ज्याला ते लोकधर्म म्हणतात तोच शैव धर्म आहे आणि त्यामध्ये लोक खूप असल्याने त्याला लोकधर्म म्हटले जाते साहजिकच एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या उपस्थितीचे शेवटी तुम्हाला काही ना काही तरी करावे लागते . ब्राह्मण वर्णाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना एकीकडे यज्ञ ही संस्था आपल्या ताब्यात राहिली पाहिजे असे वाटत असते ती कोणाला दुसऱ्याला देता कामा नये असे वाटत असते आणि जो बहुजन समाज आहे त्याच्यावर धार्मिक राज्य करायचे आहे असेही वाटत असते . या परस्परविरोधी अपेक्षांच्यामुळे अनेक विरोधाभास तयार होत असतात. हे विरोधाभास प्रामुख्याने शैव उत्सवांच्या आणि सणांच्या वेळी अधिकच मोठ्या प्रमाणात अधोरेखित होत राहतात . शैव धर्म कसाही करून स्वतःच्या ताब्यात आ...
Comments
Post a Comment