सत्य किती ? सत्ये किती?श्रीधर तिळवे नाईक गेले कित्येक लेख आपण सत्याविषयी चौथी नवता काय म्हणते याचा शोध घेत आहोत. पुरोगामी वाद आणि आधुनिक वाद यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जर काही असेल तर ते म्हणजे दोघेही एकच एक सत्य मानत होते आणि तशी मांडणी करत होते. याला शह देण्यासाठी म्हणून उत्तराधुनिकतेने सत्य अनेक असतात असा सिद्धांत मांडला आणि संपूर्ण आधुनिक वाद मोडीत काढला . यामागे नेमके काय कारण होते? यामागे कारण होते उत्तराधुनिक ज्ञानाची quantam प्रक्रिया जी मुळातच ऑब्जेक्टिव्ह कडून सब्जेक्टिव्ह कडे आली. सर्वसाधारणपणे पुरोगामी युग हे ऑब्जेक्टिव्ह सत्य शक्य आहे असे मानत होते तर आधुनिक युग ऑब्जेक्टिव्ह सत्य एक आहे हे स्वीकारत होते परंतु ते वेगवेगळ्या ठिकाणी फॅक्चर झालेले आहे अशी मांडणी करत होते त्यामुळेच फ्रॅक्चरड सब्जेक्ट फ्रॅक्चरड माईंड फ्रॅक्चरड सोसायटी हे आधुनिकतेचे एक फार मोठे समीकरण उदयाला आले. उत्तर आधुनिकतेने याही पुढे जाऊन अनेक सत्ये असतात असा सिद्धांत मांडला आणि सब्जेक्ट इज डेड असे जाहीर केले . त्यातूनच मग बहुविध दृष्टिकोन आणि बहुविध multiple सत्ये यांचा सिद्धांत स्वीकारला गेल...
Posts
Showing posts from June, 2026
- Get link
- X
- Other Apps
भारतातील बहुओळखींचा प्रश्न आणि त्यातून निर्माण होणारी राजकीय गुंतागुंत श्रीधर तिळवे नाईक सर्वसाधारणपणे जगामध्ये एक अशी समजूत आहे की आपली जी ओळख असते ती एकच असते. प्रत्यक्षामध्ये असे घडेलच असे नाही. भारतासारख्या देशांमध्ये तर वैचारिक नेतृत्व ज्यांच्या हातात आहे तेच लोक बहुओळखवाले असतात आहेत. साहजिकच मग ओळखींचा कोलाहल Chaos तयार होतो . याचा एक दुष्परिणाम असा होतो की एकसंध राष्ट्र किंवा एकसंध राज्य निर्माण करणे किंवा एकसंध समाज निर्माण करणे अतिशय अवघड होऊन बसते किंवा गुंतागुंतीचे बनते . या बहुओळखवाल्यांच्यात सुद्धा दोन प्रकार असतात १ परस्पर पूरक बहु ओळखी असलेला समुदाय २ परस्पर विरोधी बहु ओळखी असलेला समुदाय उदाहरणार्थ ब्राह्मण धर्म ही एक ओळख आणि हिंदू धर्म ही एक ओळख अशी ओळख सर्वसाधारणपणे आपणाला अनेक ब्राह्मण लोकांची दिसते त्यांना जी तिसरी ओळख आहे ती जातीची आहे जी असतेच म्हणजे देशस्थ कराडे वगैरे तिचा आता फार परिणाम राहिला नाही परंतु ब्राह्मण ओळख हिंदू ओळख या ज्या दोन ओळखी आहेत त्या युरेशियन ओळखी असल्याने अनेकदा परस्पर पूरक होऊन जातात . या उलट जर का आपण बाळासाहेब ठाकरे यांच...
- Get link
- X
- Other Apps
मराठीची भावता ही आरती प्रभू ग्रेस आणि गझल यांच्या पुढे का सरकत नाही ? भाग १ श्रीधर तिळवे नाईक सावित्रीबाई फुले आणि केशवसुत यांच्यामुळे मराठीमध्ये विसाव्या शतकातील पहिली भावनवता सुरू झाली आणि तिला समीक्षकांनी नंतर सौंदर्यवादी नवता असे म्हटले. सौंदर्यवाद हा शब्द रोमँटिसिझम या युरोपियन शब्दाचे भाषांतर होते आणि हा सौंदर्यवाद प्रत्यक्षात सावित्रीबाई फुले यांनी सुरू केला होता अशी मांडणी मी एका लेखात केली होती आणि या लेखानंतरच सावित्रीबाई फुले यांच्या कवितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. सावित्रीबाई फुले या महात्मा फुले यांच्या अनुयायी असल्या तरी सौंदर्यवादाच्या बाबतीत त्या थोड्या आपल्या पतीपेक्षा वेगळ्या होत्या आणि त्यामुळेच कवितेत मात्र त्यांची स्वायत्त ओळख उमटली . सावित्रीबाईंचे हे स्कूल शैव होते हे तर उघडच आहे त्यांनी शिव आणि शंकरांवर कविता लिहिल्या याचे त्यामुळेच आश्चर्य वाटत नाही पण त्या शैव असल्यामुळेच मराठी समीक्षकांनी त्यांच्या कवितेला डावलले जे वारकरी संप्रदायाला साजेशे होते . वास्तविक सर्व शैव संत तुकाराम यांनासुद्धा फार मान देतात कारण मोक्ष मिळाल्यानंतर शेवटच्या टप्प्...
- Get link
- X
- Other Apps
सदानंद रेगे यांची कविता श्रीधर तिळवे नाईक मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये "मराठी वाङ्मय परपुष्ट आहे परंतु ते परेसे पुरेसे परपुष्ट नाही " या मर्ढेकर यांच्या निरीक्षणाला ज्या काही मोजक्या कवींनी छेद दिला त्यापैकी एक म्हणजे सदानंद रेगे होय. त्यांचे लिखाण परपुष्ट होते परंतु सशक्त होण्याइतके ते परपुष्ट होते . हा परपुष्टपणा अस्तित्ववादी तत्त्वज्ञानातून आणि साहित्यातून त्यांच्याकडे आला होता किंबहुना सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी काही कविता पु शि रेगे यांच्या प्रमाणे सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला काही बोरकरांच्या वाट्याने गेल्या होत्या . मात्र ते नंतर परपुष्ट झाले आणि म्हणूनच सशक्त झाले अन्यथा कदाचित ते रोमँटिक परंपरेत काहीतरी फालतुगिरी करत बसले असते आणि मराठीला कदाचित पाडगावकरांच्या आधीच एक पाडगावकर मिळाला असता . रेगे फक्त कविता करत नव्हते तर त्यांच्या कविते सारख्याच असणाऱ्या कथा सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत . जगामध्ये आधुनिकतेची सुरुवात ज्या काही गोष्टींनी केली त्यातील सर्वात साहित्यावर प्रभाव टाकणारी जर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे अस्तित्वमीमांसा! हीची सुरुवात कांट पासू...
- Get link
- X
- Other Apps
आणीबाणी तिचा मेसेज आणि माझ्या कविता कवितेच्या शोधात १ क श्रीधर तिळवे नाईक दहा वर्षे पूर्ण झालेल्या आणि अकरावे चालू असलेल्या मुलाला राजकीय गोष्टींच्या विषयी काय कळतं ? आणीबाणी जेव्हा जाहीर झाली तेव्हा ती काय असते हेही मला कळत नव्हते पण काही गोष्टीच अशा असतात की ज्या थेट तुमच्या घरात घुसतात आणिबाणी ही माझ्या घरात घुसलेली गोष्ट होती आणीबाणीचा खरा प्रॉब्लेम एकच होता तो म्हणजे आपल्या विरोधकांना वाटेल त्या आरोपाखाली अटक करणे आणि त्यांची रवानगी तुरुंगात करणे . याबाबतीत जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दाखल केलेले आरोप बघण्याजोघे आहेत . माझ्यासाठी आणीबाणी म्हणजे वडिलांना झालेली अटक ! माझे वडील गांधीवादी होते आणि गांधीवादी असल्याने साहजिकच जयप्रकाश नारायण जे करत होते त्याला त्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे त्यांच्याकडे आज ना उद्या नजर जाणे अटळ होते शिवाय ते काही कार्यकर्त्यांना मदत करत होते त्यामुळे जे अंगावर येईल असे त्यांना वाटत होते ते शेवटी त्यांच्या अंगावर आले . माझ्यासाठी आणीबाणीची पहिली ओळख म्हणजे जेव्हा काहीच पुरावे मिळाले नाहीत तेव्हा काय करायचे म्हणून एक पैसा जास्त घेतला असा...
- Get link
- X
- Other Apps
भय धर्म आणि हिंदुत्व श्रीधर तिळवे नाईक आपण काही लेखांच्या मध्ये भयाचा विचार करतो आहे आणि त्यामध्ये आपण नैसर्गिक भय कसे टाळता येत नाही तेही पाहिले होते पण भय हे कधीच फक्त वैयक्तिक असत नाही याचे कारण मी मागे मागच्या लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे अनेकदा आपल्या कृती सामुदायिक असतात वैयक्तिक असत नाहीत हे आहे त्यामुळे सामुदायिक कृती करताना आपोआपच काही वेळा सामुदायिक भय निर्माण होते . म्हणजे होते असे की अनेकदा एका सभासदाचे भय दुसऱ्या सभासदाला सुद्धा वाटायला लागते आणि त्यांच्या संभाषणातून हळूहळू हे सामुदायिक भय निर्माण होते. म्हणजे तुम्ही हरणाची शिकार करत असताना अचानक समजा एखादा वाघ समोर आला किंवा चक्क सिंहाची झुंड समोर आली तर जे भय निर्माण होते ते फक्त एका व्यक्तीला एका सभासदाला असत नाही अचानक सर्वजण त्या भयाच्या पट्ट्यात सापडतात आणि अशा प्रकारच्या सिच्युएशन्स कायमच आदीम काळात निर्माण झालेल्या असणार. त्या भयाचा नेमका परिणाम काय होतो ? सर्वात पहिला परिणाम हा नेहमीच संशय असतो. आपल्याकडे डेकार्टचे एक वाक्य नेहमी सांगितले जाते ते म्हणजे मी विचार करतो म्हणून मी आहे. पण मुळात ते वाक...
- Get link
- X
- Other Apps
मोक्ष वैयक्तिक असतो का श्रीधर तिळवे नाईक प्रश्न: तुम्ही नेहमी सांगता की मोक्ष हा वैयक्तिक असतो तो तसा का वैयक्तिक असतो यावर प्रकाश पडणे गरजेचे आहे या संदर्भात तुम्ही काही स्पष्टीकरण देऊ शकाल का श्रीधर तिळवे नाईक: काम या अक्षामध्ये चार क्रिया अत्यंत वैयक्तिक आहेत आणि त्यावर बंधने आणू नयेत असाच मुख्य ट्रेंड आहे १ जतन २ उत्सर्जन ३ रक्षण ४ सर्जन या शिवाय जी पाचवी गोष्ट आहे ती आहे मरण तिचा विचार आपण शेवटी करू. प्रत्यक्षामध्ये हे खरे आहे का? खरोखर हे वैयक्तिक आहे का ? वस्तुस्थिती अशी आहे की पूर्वी जतन करण्यासाठी जे अन्न मिळवावे लागेल त्यामध्ये शिकार ही एक गोष्ट होती आणि ही सामूहिक होती म्हणजेच किमान अन्न मिळवणे याबाबतीत आपण सामूहिक आहोत वैयक्तिक नाही आहोत त्यानंतर मग ग्रहण येते तर अन्नग्रहण आणि पाणीग्रहण हे सुद्धा पूर्वी संपूर्ण टोळी एकत्र करत असल्याने सामूहिकच होते . म्हणजे किमान अन्नाच्या आणि पाण्याच्या बाबतीत तरी आपण वैयक्तिक नाही आहोत आज सुद्धा आपले अन्न आणि पाणी हे सामूहिक वितरणातून आपल्याकडे आलेले असते आणि अनेकदा त्यांचे सामुदायिक ग्रहण सु...
- Get link
- X
- Other Apps
अज्ञेय तंत्र, ज्ञायक आणि आण्विक्षीकी अर्थातच आण्विक्षिकीकडून मोक्षाकडे श्रीधर तिळवे नाईक मागच्या लेखांमध्ये आपण आण्विक्षिकीच्या संदर्भात काही चर्चा केली होती पण या आण्विक्षिकीच्या मुळापाशी आपण पोहोचलो नव्हतो. आता आपण थोडे याच्या मुळाशी असलेल्या एका तंत्रापाशी जायचे आहे . भगवान शंकर यांनी जी ११४ तंत्रे दिली त्यातील सर्वच्या सर्व तंत्रे त्यांच्या आसपासच्या लोकांना कळालीच असे नाही . या तंत्रांच्या पाच पद्धती होत्या या पाच पद्धतीना अलीकडे आपण पंचतंत्र म्हणतो . अर्थातच काळाच्या ओघात पुढे त्याचेही डिस्टर्बॅशन झाले पण मुळात या पंचतंत्रापैकी जे ज्ञानतंत्र आहे त्याच्या अंगाने अनेक तंत्रे दिली गेली आणि त्यातील एक महत्त्वाचे तंत्र म्हणजे अज्ञेय तंत्र होय. ज्ञान तंत्रांपैकी अनेक तंत्रे अशी होती की ती ज्यांना दिली होती त्यांनाच कळाली पण नंतर अनेक तंत्रांची वाट लागत गेली असेच एक वाट लागलेले तंत्र म्हणजे अज्ञेय तंत्र होय . आपल्याकडे नंतर यातूनच अज्ञेय वाद निर्माण झाला. आज आपल्याकडे साधारणपणे एक शब्द प्रचलित आहे तो म्हणजे नायक पण या शब्दाचा मूळ अर्थ आदिवासी लोकांच्यात एकेकाळी खूप वेगळा ...
- Get link
- X
- Other Apps
मेलोनी, मोदी आणि ट्रम्प श्रीधर तिळवे नाईक कोणतीही दोन माणसे एकमेकांच्या प्रेमात पडली की संपूर्ण जग अधिक सुंदर होऊन जाते. प्रेम जगाला सुंदर बनवते साहजिकच याबाबतीत एक प्रकारची सभ्यता पाळली जावी अशी सर्वांचीच अपेक्षा असते. प्रेमात लैंगिक वासना सुद्धा सभ्य बनते किंबहुना प्रेमात जर का लैंगिक वासना सभ्य बनत नसेल तर त्याचा अर्थ तिथे प्रेम नाही फक्त शरीर आहे असा घ्यावा . प्रेम, लैंगिक वासना आणि त्यातून होणारे मुलांचे सृजन त्यांचे पालन पोषण यांच्यामुळे काम बनतो . साहजिकच माणूस हा नेहमी प्रेम उत्सुक आणि काम उत्सुक असतो ही उत्सुकता फक्त वैयक्तिक राहत नाही ती इतरांच्या बाबतीत सुद्धा अनेकदा तितकीच जाज्वल असते काही जणांच्या बाबतीत तर वैयक्तिक उत्सुकतेपेक्षा इतरांच्या बाबतीतली उत्सुकताच जास्त असते . पण तरीही याबाबतीतला एक संकेत असा असतो की सार्वजनिक जीवनामध्ये याची चर्चा होऊ नये. साहजिकच यासंदर्भात मी कधीही काही लिहिले नव्हते . पण अचानकपणे ट्रम्प यांच्या बेतालपणामुळे ही गोष्ट राजकीय झाली आणि ती राजकीय झाली म्हणून सामाजिक सुद्धा झाली . त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले . उदारणार्थ ट्रम्प यांच्यासा...
- Get link
- X
- Other Apps
सत्य , सूर्य , वैद्यकीय व्यवसाय, सूर्य ज्ञान प्रणाली , तिचा उदय आणि अस्त श्रीधर तिळवे नाईक अनारीय शैव आणि युरेशियन आर्य अशा दोन्ही श्रुतींच्या मध्ये आपणाला एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे दोन्हीमध्ये वारंवार सत्याचा विचार केला गेलेला दिसतो आणि हा विचार अनेकदा सूर्य विचाराशी निगडित असलेला दिसतो . या सगळ्या विचार करण्याच्या प्रक्रियेला मी सूर्यज्ञानप्रणाली असे म्हणतो . भारतानेच प्रथम सूर्य सिद्धांत मांडला हे तर आता स्वयं स्पष्ट आहे त्यामुळे त्यात जास्त घुसत नाही पण या सूर्य ज्ञान प्रणालीच्या संदर्भात काही गोष्टी सांगणे आता आवश्यक वाटते म्हणून बोलत आहे शैव श्रुतीमध्ये सत्य शिव म्हणजे शून्य आहे . ज्ञानाचा अंत झाल्याशिवाय तुम्ही शिवाला उपलब्ध होऊ शकत नाही असे स्पष्ट प्रतिपादन या श्रुतीमध्ये केले गेलेले आहे . काम अर्थ मोक्ष हे तीन अक्ष इथे स्वीकारले गेलेले आहेत . धर्म मात्र स्पष्टपणे नाकारला आहे आणि त्या ऐवजी दंड स्वीकारला गेला आहे आणि पुढे त्यातूनच अर्थविद्या जिला पुढे अर्थ शास्त्र म्हंटले गेले आहे ती आलेली आहे. वैदिक परिभाषेत सांगायचे तर शैव श्रुतीमध्ये धर्म हा अर्थाचा दास...