मेलोनी, मोदी आणि ट्रम्प श्रीधर तिळवे नाईक
कोणतीही दोन माणसे एकमेकांच्या प्रेमात पडली की संपूर्ण जग अधिक सुंदर होऊन जाते. प्रेम जगाला सुंदर बनवते साहजिकच याबाबतीत एक प्रकारची सभ्यता पाळली जावी अशी सर्वांचीच अपेक्षा असते. प्रेमात लैंगिक वासना सुद्धा सभ्य बनते किंबहुना प्रेमात जर का लैंगिक वासना सभ्य बनत नसेल तर त्याचा अर्थ तिथे प्रेम नाही फक्त शरीर आहे असा घ्यावा . प्रेम, लैंगिक वासना आणि त्यातून होणारे मुलांचे सृजन त्यांचे पालन पोषण यांच्यामुळे काम बनतो . साहजिकच माणूस हा नेहमी प्रेम उत्सुक आणि काम उत्सुक असतो ही उत्सुकता फक्त वैयक्तिक राहत नाही ती इतरांच्या बाबतीत सुद्धा अनेकदा तितकीच जाज्वल असते काही जणांच्या बाबतीत तर वैयक्तिक उत्सुकतेपेक्षा इतरांच्या बाबतीतली उत्सुकताच जास्त असते . पण तरीही याबाबतीतला एक संकेत असा असतो की सार्वजनिक जीवनामध्ये याची चर्चा होऊ नये. साहजिकच यासंदर्भात मी कधीही काही लिहिले नव्हते . पण अचानकपणे ट्रम्प यांच्या बेतालपणामुळे ही गोष्ट राजकीय झाली आणि ती राजकीय झाली म्हणून सामाजिक सुद्धा झाली . त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले .
उदारणार्थ ट्रम्प यांच्यासारखा लैंगिक बाबतीत ओबडधोबड दगड असलेला मनुष्य अमेरिकन मतदारांनी निवडून दिला यावरून आता त्यांची आपण लायकी काढावी का ? राजकारणामध्येच पोस्ट मॉडर्न उथळपणातून बटबटीतपणा आलेला आहे पण तो वैयक्तिक पातळीवर सुद्धा इतका राजकीय होईल असे कोणाला स्वप्न पडले होते का? पोस्ट truth काळामध्ये राजकीय नेत्यांची लैंगिकता ही सुद्धा राजकीयच बनते का ? इथे तशी ती बनली आहे का ?
भारतीय नाटकांचे जे काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये राजा आणि राणीचे प्रेम ही एक दीर्घकाळ चाललेली सनातन आशय रेखा आहे शेक्सपियरच्या नाटकांमध्ये सुद्धा अनेकदा तीच येते रामायण आणि महाभारत यासारख्या महाकाव्यांच्या मध्ये सुद्धा ती येते साहजिकच साहित्याचा वारसाच इतका बिंबवला गेला आहे की दोन राज्याचे प्रमुख एकमेकांच्या प्रेमात आहेत की नाही याची उत्सुकता सर्वांना लागून जाते आणि मग त्यातून अनेक प्रकारच्या अफवा तयार व्हायला लागतात अशा अफवा तयार होऊ नयेत म्हणून राजकीय नेतृत्वाला खूप सावधान असावे लागते आत्ताच्या काळात तर मीडिया हा केंद्रस्थानी आल्यामुळे अधिक सावधान व्हावे लागते . दुर्दैवाने हा पोच ट्रम्प यांनी दाखवला नाही आणि थेट सार्वजनिक प्रक्षेपण करत नको तो नंगानाच केला . याचे तीव्र पडसाद उमटणे अटळ होते. मेलनी यांनी त्यामुळेच त्यांना सडेतोड उत्तर देऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी केले .
ट्रंप Italy's La7 TV channel ला phone interview देताना alleged: "She begged me to take a photo with her; I felt sorry for her."
म्हणजे झाले असे की जी सेव्हन परिषदेत ट्रम्प यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी इटालीच्या राज्यप्रमुख मेलोनीनं त्यांच्यापुढे भीक मागितली . तिच्याबद्दल त्यांना वाईट वाटलं. त्यामुळेच मी तिच्याशी बोललो .
यावर अर्थातच मेलोनीला धक्का बसून त्या भडकल्या आणि त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ जारी केला. त्यात त्या म्हणाल्या , "I don't know why the US president behaves this way towards allies,"
पुढे त्या म्हणाल्या it was not the first time it had happened.
नंतर त्या म्हणाल्या , "I can only say it is regrettable he does not show the same determination towards the enemies of the West and towards the enemies of the US - [enemies] whose leaders he instead appears to be far more accommodating with."
एका अर्थाने इनडायरेक्टली हा पॉलिटिकल पण बायकी टॉन्ट आहे म्हणजे मर्दा सारखे वागायचे तर शत्रूशी तसा वाग पण प्रत्यक्षात मात्र जे तुझे मित्र आहेत जे तुला काही करणार नाही त्याची तुला खात्री आहे त्यांच्याशी तू असा वागतो आहेस. जर खरा मर्द असतास तर शत्रूंशी मर्दासारखा वागला असतास.
प्रश्न असा आहे की हे सर्व आले कुठून? माझा एक अंदाज असा आहे मात्र हा अंदाजच आहे की मेलोनी कळत नकळत मोदी यांना जे म्हणाल्या की इंस्टाग्राम वरचे आपण सर्वात फेमस कपल आहोत त्याने याला हवा दिली आहे . बहुदा ट्रम्प यांचा मत्सर जागा झाला असावा. मी अमेरिकेचा राष्ट्रप्रमुख असून सुद्धा माझ्या बाबतीत काही नाही आणि एक ज्याला मी वाटेल तसे बडबडत असतो त्याला मात्र इतका पॉझिटिव रिमार्क ? असा काहीतरी प्रकार झालेला दिसतो . राजकीय पातळीवर हे सर्व काही सभ्य मानले जाणार हे ट्रम्प यांना समजू नये याचे खरोखरच आश्चर्य वाटते . याबाबतीत मोदी यांनी जी परिपक्वता दाखवली ती त्यांनी दाखवली असती तर बरे झाले असते . आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मध्ये अशा प्रकारच्या कॉमेंट्स होत असतात पण त्याचा कोणी थेट अर्थ घेत नाही . इथे कपल या शब्दाचा अर्थ मैत्री असा असतो . पण ट्रम्प पडले अमेरिकन त्यांना बहुदा या वाक्यात अमेरिकन वास आला.
याचा व्हायचा तो परिणाम झाला इटलीच्या परराष्ट्र मंत्र्यांची अमेरिकन भेट रद्द झालेली आहे . Post truth काळामध्ये खोटे बोलणे चालू शकते अर्थात पूर्वीही सर्वोच्च स्थानी असणारे लोक असे करत होते मला आठवते शबाना आजमी यांनी एका इंटरव्यू मध्ये राजेश खन्नाचा एक किस्सा सांगितला होता त्यात त्या म्हणाल्या होत्या की एकदा शूटिंगमध्येच इंटरव्यू सुरू झाला . ते पडल्यामुळे जखमी झाले होते आणि त्या इंटरव्यू मध्ये स्त्री पत्रकाराला राजेश खन्ना या पडण्याचे स्पष्टीकरण देताना म्हणाले की ते काल हत्तीवरून शूटिंगला पडल्यामुळे असे झाले . शबाना आजमी या सत्यप्रिय असल्याने त्यांनी ताबडतोब विचारले काल आपले एकत्र शूटिंग झाले कुठे आणि हत्ती कुठे होता ? तर ते म्हणाले की तुझी अशी इच्छा आहे काय की मी तिला लुंगीत पाय अडकून पडलो असे सांगावे ? राजेश खन्ना सुपरस्टार राजेश खन्ना लुंगीत पाय अडकून पडला हे ऐकायला बरोबर वाटते का " त्यावर अर्थातच शबाना खूप वेळ हसत राहिली . पुरुषांचे इगो असतात आणि त्यांची साईज अनेकदा त्यांच्या प्रसिद्धीवर आणि सत्तेवर अवलंबून असते . प्रत्यक्ष खरी साइज ज्यांना कळायची त्यांना बरोबरच ऑफिसमध्ये वाटाघाटी करताना किंवा बेडवरच कळते.
प्रश्न इतकाच आहे की हा सर्व प्रकार अहंकाराचा आहे की आणखी कशाचा ? सध्या तरी तो ट्रम्प यांच्या अहंकारामुळे आलेला आहे असे वाटते पण प्रॉब्लेम एकच आहे इतिहास साक्षी आहे की राजे लोकांच्या आणि राज्य प्रमुखांच्या झालेल्या तथाकथित इगोच्या अपमानामुळे सुद्धा या जगात युद्धे झालेली आहेत.
थोडक्यात काय सई ताम्हणकरच्या एका पात्राला एका लेखकाने दिलेल्या एका डायलॉगच्या भाषेत सांगायचे तर ज्याने त्याने आपल्या चड्डीत राहावे हे उत्तम !
माझ्या मते याबाबतीत मोदी हे अत्यंत आदर्श आहेत ते असे काही अंगावर आले की अजिबात प्रतिक्रिया देत नाहीत . किमान याबाबतीत तरी ट्रम्प यांनी त्यांना विश्वगुरू मानावे हे उत्तम .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment