फुले यांच्यानंतर ओबीसी शैव लोकांनी काय करायचे ७ ब्राह्मणी संवेदनशीलतेची नवी धर्म मांडणी आणि त्यामुळे निर्माण झालेला पेच श्रीधर तिळवे नाईक हिंदू धर्म हा शब्द अडचणीचा झाला म्हणून सनातन धर्म हा शब्द आणला पण तो काही कोणी स्वीकारेना आणि बुद्धानेच तो वापरला होता हे लक्षात आले आता नवीन शब्द आणलेला आहे "आर्य धर्म" त्यामध्ये वैदिक धर्म तसाच आहे मात्र ब्राह्मण धर्म हा शब्द वगळलाय वैष्णव धर्म हा शब्द वगळलाय आणि आश्चर्यकारकरीत्या वैष्णव धर्मासाठी आता गीता धर्म हा शब्द स्वीकारलेला आहे हा शब्द लोकमान्य टिळक यांच्या हिंदुत्व च्या संकल्पनेतला आहे . याचबरोबर जैन धर्म आणि बौद्ध धर्म यांचाही समावेश आर्य धर्मात केलेला आहे एका अर्थाने हे बरे झाले की युरेशियन धर्म हा एक धर्मांचा समूह आहे हे मान्य करण्यात आले आणि त्यात वैदिक ,गीता, जैन आणि बौद्ध अशा चार धर्मांचा समावेश केलेला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे दलितांना विशेषत: अस्पृश्यांना बौद्ध धर्माच्या साह्याने तर वैश्य लोकांना जैन आणि वैदिक धर्माच्या साह्याने क्षत्रियांना गीता धर्माच्या साह्याने यापुढे बांधण्याचा प्रयत्न केला जाईल . म्हणजे पुन्हा एकदा...
Posts
Showing posts from April, 2026
महाराष्ट्र धर्म
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्र धर्म , शिवाजी महाराज, स्वामी रामदास पंडीत ,तुर्क , हिंदवी आणि वस्तुस्थिती भाग पाच श्रीधर तिळवे महाराष्ट्रात अलीकडे काही लोकांनी महाराष्ट्र धर्म ही स्वामी रामदास यांची संकल्पना वापरायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर ते शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते यावरून वाद ही सुरू आहे त्यामुळे आपणाला या संदर्भात नेमके काय आहे ते पाहिले पाहिजे मी एक वस्तुस्थिती नेहमीच मांडत आलेलो आहे ती म्हणजे पंडित वेगळे आणि ब्राह्मण वेगळे आणि सर्वसाधारणपणे इसवी सन ८०० नंतर पंडितांच्या ब्राह्मणीकरणाची सुरुवात झाली यातील पहिला टप्पा आद्य शंकराचार्य यांच्यापासून सुरू होऊन शेवटच्या यादवांच्या काळात पूर्ण झाला तर दुसरा टप्पा हा मुस्लिम राजवटींच्या काळात सुरू झाला पहिल्या टप्प्यामध्ये अगदी चक्रधरांचा महानुभव पंथ सुद्धा पंडितांनी चालवलेला आहे आणि महानुभव पंथ हा वर्ण जात व्यवस्थेवर विश्वास ठेवत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या काळामध्येच महाराष्ट्राचा मूलधर्म असलेला नाथ संप्रदाय हा हळूहळू वारकरी वैष्णव दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे . दुसरा टप्पा साधारणपणे एकनाथांच्या पासून सुरू हो...
- Get link
- X
- Other Apps
शिवाजी महाराज स्वामी रामदास तुर्क हिंदवी आणि वस्तुस्थिती भाग चार श्रीधर तिळवे नाईक आपण मागील तीन भागात शिवाजी महाराज आणि स्वामी रामदास यांच्या संदर्भात जे वैचारिक वादळ निर्माण झालेले आहे त्या अंगाने चर्चा केली आहे आता एक प्रश्न आपण इथे उपस्थित करायचा आहे तो म्हणजे हा प्रश्न वारंवार का उपस्थित होतो त्यामागे काही मानसशास्त्रीय कारण आहे का ? मानसशास्त्रामध्ये सिग्मंड फ्राईड नंतरचा दुसरा महत्त्वाचा जो मनोवैज्ञानिक मानला जातो तो म्हणजे कार्ल गुस्टाफ युंग होय त्याने सामूहिक मनाची संकल्पना मांडून पुढे ती डेव्हलप करत आणखी एक संकल्पना डेव्हलप केली ती म्हणजे आदिबंधाची संकल्पना जिला तो आरकेटाइप archetypes म्हणतो. आता याचाच वापर करून आपण जर का पुढे गेलो तर आपणाला कलेक्टिव्ह जेनेटिकल आर्कि टाईप अशी संकल्पना स्वीकारता येईल का ? त्याला आवश्यक असलेले पुरावे आपल्या जीन्स मध्ये मिळतात का ? सध्या आपण या दोन्हींना सामावून घेणारी समूहबंध अशी संकल्पना स्वीकारू आणि ती इथे लागू होते का ते पाहू हे समूहबंध जितके जीन्समध्ये असतात तितकेच ते संस्कृतीमध्ये सुद्धा असतात म्हणजेच एका अर्थाने...
- Get link
- X
- Other Apps
शिवाजी महाराज स्वामी रामदास तुर्क हिंदवी आणि वस्तुस्थिती भाग तीन श्रीधर तिळवे नाईक आपण मागील दोन भागात शिवाजी महाराज आणि स्वामी रामदास यांच्या संबंधविषयी काही निष्कर्ष काढले . सर्वसाधारणपणे हा निष्कर्ष काढणारे लोक एक गोष्ट गृहीत धरतात ती म्हणजे शिवाजी महाराज हे भक्त होते ते भाव मार्गी भावतंत्री होते प्रत्यक्षात हे सत्य आहे का ? सर्वसाधारणपणे महाराजांचा आयुष्य क्रम बघितला तर आपणाला एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे ते क्रिया तंत्रांच्या अंगाने जातात अगदी समर्थ रामदास यांनी सुद्धा त्यांना भक्त म्हटलेले नाही तर श्रीमंत योगी म्हटलेले आहे. एकीकडे राजकीय ऐश्वर्य आहे आणि दुसरीकडे तरीही वैष्णव भाषेत योगी म्हणजे ज्ञान योगी ,भक्ती योगी वगैरे ते कर्मयोगी आहेत आणि श्रीमंत योगी आहेत महाराजांच्याकडे स्वामी रामदास यांचा बघण्याचा हा दृष्टिकोन मला फार योग्य वाटतो चुकून जरी रामदासांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख भक्त असा केला असता तर कदाचित प्रॉब्लेम झाला असता याचा अर्थ ते बिलकुल भक्त नव्हते असाही नाही ते तुळजाभवानीचे दर्शन घेत होते परंतु मागताना नेहमीच क्रिया योगी मागणे असायचे . पण यामुळेच एक गोष...
- Get link
- X
- Other Apps
शिवाजी महाराज, स्वामी रामदास, तुर्क , हिंदवी आणि वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक गेला एक आठवडा संपूर्ण महाराष्ट्र शिवाजी महाराज आणि स्वामी रामदास यांच्यात काय संबंध होता या प्रश्नाने ढवळला गेला आहे. याबाबतीत दोन्ही बाजूने केले जाणारे युक्तिवाद काही प्रमाणात पूर्वग्रह दूषित असल्याने नेमके चित्र आपल्यापुढे येत नाही . हे चित्र आपल्याला कळणे फार आवश्यक आहे . भारताच्या इतिहासात स्वराज्य या संकल्पनेची सर्वाधिक मोठी शक्ती जर कोणी प्रथम दाखवली असेल तर ती शिवाजी महाराजांनी दाखवली. इतर कोणालाही ती दाखवण्याची तितकी गरज पडली नाही कारण तोपर्यंत जे लोक बाहेरून आले ते नंतर इथले झाले . त्यांनी भारतीय धर्मांचा स्वीकार केला कोणी बौद्ध झाला कोणी शैव झाला .( यातली मिन्यांडरची केस फेमस आहे जो मिलिंद झाला) मात्र भारतात पहिल्यांदाच भारतात येऊन राज्य स्थापन होऊनसुद्धा भारतीय धर्म न स्वीकारणारे जर लोक कुठले असतील तर ते म्हणजे मुस्लिम होय . त्या आधी ख्रिश्चन लोक होते परंतु ते मुळातच धर्मप्रसारासाठी येत होते. त्यांचे राज्य नव्हते. मुस्लिमांचे असे नव्हते ते इथे आले आणि त्यांनी राज्य सुद्धा स्थापन केले आण...
- Get link
- X
- Other Apps
ज्ञान म्हणजे काय श्रीधर तिळवे नाईक माया म्हणजे एका अर्थाने सत्यार्थ यथार्थ किंवा वास्तवार्थ , तथ्यर्थ आणि चिन्हार्थ यांचे घडलेले घटन, संघटन , विघटन आणि नि: घटन ! मी हे नेहमीच मांडत आलेलो आहे की सत्य हे शिव आहे शिव हे शून्य आहे त्यामुळे शून्य हेच सत्य आहे पण त्याचबरोबर शक्तीही आहे शक्ती ही सत्य आहे शक्ती ही अनंत आहे म्हणजेच शिव शून्य सत्य आणि शक्ती अनंत सत्य हे सर्व युग्म पद्धतीने अस्तित्वात आहे शिव आणि शक्ती हे युग्म आहे यांच्या युग्मामुळेच संसार निर्माण होतो या संसाराला प्राण असतो त्याला आपण ईश्वर म्हणतो किंवा महाप्राण म्हणतो जीव हा शिव शक्ती यांनी युक्त असतो त्याच्यामध्ये शिव हा प्राणयुक्त असतो तर शक्ती मात्र विविध शक्ती रूपांनी असते . या शक्तीचे चेक रूप म्हणजे सांभवी शक्ती अथवा ज्ञान शक्ती होय शांभवी जेव्हा मोक्षाकडे जाते तेव्हा ती शांभवी असते परंतु जेव्हा ती संसाराकडे जाते तेव्हा ती ज्ञानशक्ती किंवा प्रज्ञाशक्ती बनते . आपले सर्व आकलन हे या प्रज्ञाशक्तीमुळे होत असते . सर्वसाधारणपणे आपणाला सत्य हे अति प्रत्यक्ष पद्धतीने अनुभवता येते आणि अनेकदा ते ज्ञानाचा अंत झ...
- Get link
- X
- Other Apps
शिव्या देण्याचे प्रकरण , सन्मान आणि वर्ण जातीव्यवस्था श्रीधर तिळवे नाईक सर्वसाधारणपणे वर्ण जाती व्यवस्थेचा विचार करताना ती एक सामाजिक व्यवस्था आहे असे गृहीत धरले जाते आणि अनेकदा ती सर्वांनी मान्य केली आहे असेही गृहीत धरले जाते. परंतु या व्यवस्थेचे सन्मानाशी जे नाते आहे ते अनेकदा लक्षात घेतले जात नाही आणि मग त्यातूनच आत्ताचे जे संजय गायकवाड प्रकरण घडलेले आहे तसे प्रकरण घडत जाते . मुळात सन्मान ही एक माणसाची अत्यंत मूलभूत आसक्ती आहे . ही माणसांमध्ये कशी निर्माण होते ? माणसांमध्ये जे शिव तत्व असते ते प्राण म्हणून उपस्थित असते आणि हे तत्व अनेकदा आत्मा निर्माण करते आणि हा आत्मा सन्मान आणि मान्यता मागत राहतो याचे कारण आत्मा (मी)हा काल्पनिक असतो. प्रत्यक्षात त्याला कसलेही अस्तित्वात नसते साहजिकच जेव्हा तुम्हाला अस्तित्व नसते तेव्हा तुम्ही अस्तित्व प्राप्त करायला सिद्ध करायला धडपडायला लागता . आता ही धडपड कोणत्या माध्यमातून सिद्ध होणार म्हणजे काय झाले म्हणजे मी सिद्ध होणार असे कळीचे प्रश्न साहजिकच निर्माण होतात . मी अस्तित्वात आहे हे मला कसे कळणार ? तर त्याची माध्यमे दोन आहेत पहिले सन्मा...