शिवाजी महाराज स्वामी रामदास तुर्क हिंदवी आणि वस्तुस्थिती भाग चार श्रीधर तिळवे नाईक
आपण मागील तीन भागात शिवाजी महाराज आणि स्वामी रामदास यांच्या संदर्भात जे वैचारिक वादळ निर्माण झालेले आहे त्या अंगाने चर्चा केली आहे आता एक प्रश्न आपण इथे उपस्थित करायचा आहे तो म्हणजे हा प्रश्न वारंवार का उपस्थित होतो त्यामागे काही मानसशास्त्रीय कारण आहे का ?
मानसशास्त्रामध्ये सिग्मंड फ्राईड नंतरचा दुसरा महत्त्वाचा जो मनोवैज्ञानिक मानला जातो तो म्हणजे कार्ल गुस्टाफ युंग होय त्याने सामूहिक मनाची संकल्पना मांडून पुढे ती डेव्हलप करत आणखी एक संकल्पना डेव्हलप केली ती म्हणजे आदिबंधाची संकल्पना जिला तो आरकेटाइप archetypes म्हणतो.
आता याचाच वापर करून आपण जर का पुढे गेलो तर आपणाला कलेक्टिव्ह जेनेटिकल आर्कि टाईप अशी संकल्पना स्वीकारता येईल का ? त्याला आवश्यक असलेले पुरावे आपल्या जीन्स मध्ये मिळतात का ?
सध्या आपण या दोन्हींना सामावून घेणारी समूहबंध अशी संकल्पना स्वीकारू आणि ती इथे लागू होते का ते पाहू हे समूहबंध जितके जीन्समध्ये असतात तितकेच ते संस्कृतीमध्ये सुद्धा असतात म्हणजेच एका अर्थाने संस्कृती आणि जीन्स यांचा तो मिलाफ असतो . ते genetical cultural genes असतात
प्रश्न असा आहे की जीन सारखी वाटणारी कल्चरल जीन्स निर्माण करणारी ही संस्कृती नेमकी कुठल्या काळात निर्माण झाली? आणि तिचा आत्ताच्या प्रकाराशी काय संबंध ?
माणसाच्या आदीम काळामध्ये तो नेहमीच आपल्या कळपाशी एकनिष्ठ असायचा आणि सर्वसाधारणपणे या कळपांच्या मध्ये दीडशे ते 200 माणसे असायची माणसाची नैसर्गिक कळप क्षमता ही एवढीच आहे आणि हीच त्याच्या निष्ठेची मर्यादा आहे माणूस हा फक्त जास्तीत जास्त दीडशे ते दोनशे लोकांशी एकनिष्ठ राहू शकतो त्यांच्यावर प्रेम करू शकतो त्यांच्याशी संबंध जमवून घेऊ शकतो यापेक्षा अधिक संख्येशी नाही यापेक्षा अधिक लोक झाले की माणसांच्यात फूट पडते आणि दोन कळप तयार होतात .
याबाबतीत माणसाचे साम्य हत्तीशी आणि माकडाशी आहे आणि म्हणूनच अनेकदा माणूस माकडापासून तयार झाला आहे अशी अफवा उठत असते . वास्तविक होमो सेपियन आणि माकड या दोघांचा कदाचित एक कॉमन पूर्वज असावा अजून याबाबतीत काही स्पष्ट झालेले नाही . पण एक मात्र नक्की आहे माणसाचा पूर्वज आदीम काळामध्ये कळप संस्कृतीत जन्मत होता वाढत होता जगत होता आणि मरत होता. आणि त्याच्यापुढे नेहमीच हत्ती आणि माकड यांचे कॉम्बिनेशन जेनेटिकेली वावरत होते आज सुद्धा ते वावरत आहे यातील हत्ती हा सज्जनपणाचे प्रतीक आहे तर माकड हे त्याच्या मनाच्या माकडचाळ्याचे प्रतीक आहे. यातील माकडावर नियंत्रण ठेवणारा जो देव आहे तो हनुमान मारुती आहे . याचे कारण मन हे वाऱ्यासारखे असते वायू असते आणि जो या मन नावाच्या वायूवर नियंत्रण ठेवतो तो मनावरही नियंत्रण ठेवतो आणि त्याचेच प्रतीक म्हणजे मारुती होय या उलट गणपती हा हत्तीचे प्रतीक आहे आणि तो शहाणपणाचे ही आगर आहे प्रतीक आहे हनुमान आणि गणपती ही शैव लोकांची कळप प्रतीके आहेत आणि आज सुद्धा सर्व होमोसेपियन्स मध्ये ती वावरत असतात अगदी पाश्चात्त्य देशातील लोकांना सुद्धा या दोन दैवतांचे जे विलक्षण आकर्षण 21 व्या शतकामध्ये निर्माण होते आहे त्याचे कारण मुळात हे एका अर्थाने आर्के टाईप सारखे आहेत .
माणूस लाखो वर्षे हा असा या कळप संस्कृतीत जगलेला आहे माकड आणि हत्ती म्हणून जगला आहे आणि म्हणूनच त्याच्यावर या कळप संस्कृतीचे अत्यंत घनदाट संस्कार आहेत जे त्याला आजही पुसता येत नाहीत .
माणसाच्या या आदीम अवस्थेनंतर पुढे जेव्हा माणसाला भाषेचा शोध लागला तेव्हा मग त्याला संघटनेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकता आले . त्याचा जो कळप होता त्यातून त्याने भाषेच्या साह्याने भाषेच्या दवारे कला आणि विद्या यांची निर्मिती करून एक जमात संस्कृती जन्माला घातली . कळप आणि जमातीमध्ये एक फरक होता तो म्हणजे जमातीमध्ये सर्वांना आधारभूत अशी एक विचार जीवन प्रणाली होती जिला आता आपण श्रद्धा म्हणतो या श्रद्धेला निर्माण करणारे चार घटक होते एक भाषा दुसरी कला आणि तिसरी विद्या आणि चौथी शहाणपण सहाजिकच प्रत्येक संस्कृतीच्या चार खांबांना आपण नीट पाहिले तर हे चार घटक तुम्हाला तिथे सळसळताना दिसतील . आणि या चार घटकांच्या मुळेच माणसाला सामूहिक शहाणपण प्राप्त होत होते आणि त्याचबरोबर या सामूहिक शहाणपणाचे जतन करण्यासाठी परंपराप्राप्त होते ही परंपरा निर्माण करण्यासाठी कला वापरली जाऊ लागली.
भाषा, कला, विद्या आणि शहाणपण यांच्यातूनच श्रद्धा निर्माण होते हे आपण लक्षात घेतले म्हणजे एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भाषेने माणसांमध्ये सर्वात मोठी गोष्ट कुठली निर्माण केली असेल तर ती म्हणजे परंपरा ! कारण माणूस परंपरा देतो म्हणजे दुसरे तिसरे काहीच देत नसून भाषा देत असतो. या भाषेमध्ये कधी कला असते कधी विद्या असते आणि कधीकधी शहाणपण असते आणि या सगळ्यांच्यामुळे माणसाच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होत असते ही श्रद्धा नेहमीच संस्कृतीला कारण ठरत जाते .
प्रश्न असा आहे की मग ही संस्कृती ज्या संस्कृती बंधांच्या अंगाने मानवी जीवनावर बिंबवली जाते त्याची सुरुवात होते तरी कशी कारण मानवी जीवनामध्ये संघटन ही एक फार महत्त्वाची गोष्ट असते माणूस कधीच एकटा प्राणी म्हणून जगत नसतो आणि यासाठी काही वेगळ्या पुराव्याची गरज नाही . त्याचे बालपण हेच मुळात असहाय्य असते त्याला सुरुवातीच्या कालखंडामध्ये इतर माणसांची गरज लागते त्याशिवाय तो जगू शकत नाही याची सुरुवात आईपासून होते ती त्याच्या अन्नाचा प्रमुख सोर्स असते त्यामुळे व्यक्तिवादाचे सगळे स्तोम हे नंतरचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे . म्हणजेच बिंबवले गेलेले व्यक्तिमत्व फार महत्त्वाचे ठरत असते आणि याची सुरुवात जर का आपण कुठे झाली असा प्रश्न विचारला तर उत्तर येते आई आणि अर्थातच नंतर गुरु आणि नंतर पुढे व्यवस्था शिक्षण व्यवस्था!
आई ही फक्त आई नसते तर प्रत्येक मुलाची ती प्रथम गुरू असते आणि इथेच हा समूहबंध जन्म घेतो पुढे मग त्याला कळपात आवश्यक असणारी सर्व कौशल्य शिकवणारे गुरु भेटत राहतात .
म्हणजे आयुष्याच्या सुरुवातीपासूनच माणूस हा कळपाचा भाग म्हणूनच जगत आलेला आहे आणि तिथेच त्याला गुरु शिष्य परंपरा भेटत राहिलेली आहे .
ब्राह्मण धर्म यामध्ये नेमकी अपेक्षा काय करतो तर या क्षत्रिय शिष्याने आपल्या ब्राह्मण गुरूला सर्व प्रकारच्या सुविधा पुरवाव्यात अशी अपेक्षा करतो किंबहुना तो या समूह बंधाचा पाया आहे . आणि त्यामुळे समर्थांचे शिष्य हे शिवाजी राजे यांच्या वंशाकडून सातत्याने काही ना काहीच आपल्या संप्रदायासाठी मागत आहेत आणि हा वंश हे सर्व काही पुरवत आहे. त्याचा आधारच मुळात गुरु रामदास आणि शिष्य शिवाजी महाराज हा समूह बंध आहे . साहजिकच आपण जर का समर्थ साहित्याचा आणि समर्थ संप्रदायातील शिष्यांच्या साहित्याचा अभ्यास केला तर तिथे हा पुन्हा पुन्हा रिपीट केलेला दिसतो कारण पुन्हा पुन्हा या संबंधाचा फायदा घ्यायचा आहे. त्यातूनच मग संभाजी महाराजांना सज्जनगडावर शिवाजी महाराजांनी पाठवलेले होते अशी ही नवी दंत कथा तयार होते तिचाही समकालीन ऐतिहासिक पुरावा मिळत नाही त्यामुळेच अनेकदा काही मराठा विचारवंत या सर्व अनुबंधाला सज्जनगड बळकवण्याचे कारस्थान म्हणून पाहतात . यातील गड बळकवणे वगैरे मला अवघड वाटते पण सज्जनगडावर संप्रदायाला आवश्यक असलेली मोकळीक मात्र आपल्याला सतत मिळत राहावी आणि मुख्य म्हणजे अनुदान मिळत राहावे ही भावना मात्र नक्की आहे. त्यामुळेच समर्थ संप्रदायांमध्ये ही दंतकथा वारंवार रिपीट झालेली आहे आणि जोपर्यंत हा संप्रदाय आहे तोपर्यंत ती रिपीट केली जाईल
आता प्रश्न असा आहे की हे सर्व ब्राह्मण का करतात ? मुख्य म्हणजे एक कळपच्या कळप या अंगाने अचानक समर्थन करायला कसा काय येतो? या प्रश्नाचे उत्तर इतिहासात आहे
आपण जर का माणसाच्या इतिहासाकडे पाहिले तर आपणाला सात मोठ्या संस्कृती दिसतात ज्यांचे पुरावे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपणाला उपलब्ध झालेले आहेत त्यांचा आधार भाषा किंवा चिन्हकी कला विद्या शहाणपण म्हणजे फिलॉसॉफी यांच्यामुळे तयार झालेली श्रद्धा होता
पहिली संस्कृती ही शैव वा इंद संस्कृती
दुसरी सुमेरियन मेसोपोटियम संस्कृती
तिसरी ग्रीक संस्कृती
चौथी माया संस्कृती
पाचवी चायनीज संस्कृती सहावी इजिप्शियन
सातवी युरेशियन ( रोमन मंगोलियन कॉकेशियन पर्शियन आणि वैदिक या सर्वच युरेशियन संस्कृती आहेत )
पुढे जेव्हा इंद संस्कृतीमध्ये जेव्हा मोक्ष भगवान शंकर यांच्या रूपाने जन्मला तेव्हा संघटन कसे करायचे असाही प्रश्न होता आणि भगवान शंकर यांनी तर्क नावाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणली प्रमाण नावाची गोष्ट आणली आणि याचा परिणाम म्हणून विद्येबरोबर आता शास्त्र अस्तित्वात आले . साहजिकच गणित भूमिती आणि आण्विक्षिकी यांचे निर्माण झाले ज्यांची पुढे भारतातून इतर संस्कृतीमध्ये निर्यात झाली मोक्ष नसता तर शून्याचा शोध लागला नसता आणि शून्य नसते तर गणित भूमिती आणि तर्कशास्त्र जन्मलेच नसते भारताने जगाला दिलेल्या सर्वात मोठ्या पाच देणग्या कोणत्या असा प्रश्न विचारला तर मोक्ष आणि मोक्षा मधून निर्माण झालेली गणित भूमिती आणि तर्कशास्त्र ही तीन शास्त्रे आणि पाचवी शैवांच्या भाषेत अनुशासन किंवा नंतर गौतम बुद्धाच्या भाषेत धम्म होती ज्यामध्ये मोक्ष सामावून घेतला गेला आणि एक शिस्त ही दिली गेली भारताने दिलेले हे सर्वात महत्त्वाचे पाच घटक जगाच्या विकासामध्ये आजही कार्यरत आहेत. पाश्चात्त्य देशातले लोक हे सर्व नाकारण्याचा प्रयत्न करत असतात पण तो प्रयत्न फोल आहे .
भगवान शंकर त्यांचा मोक्ष आणि अनुशासन यांच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न हा नेहमीच पुन्हा एकदा टोळीचा आणि कळपाचा होता यांचे काय करायचे हा होता
भगवान शंकर यांनी कळपा मधून समाज निर्माण केला. या समाजाचा आधार त्यांनी कार्यक्षेत्र बनवले आणि ज्यांचे समान कार्यक्षेत्र आहे त्यांनी स्वतःचा गट बनवावा स्वतःचा कळप बनवावा अशी आज्ञा दिली त्यातूनच ज्यांना आज आपण कुंभार समाज , लोहार समाज पंडित समाज गुरव समाज वीर समाज असे म्हणतो ते सर्व समाज निर्माण झाले यातल्या जवळजवळ सर्व समाजांनी आपल्या निर्माण कथा जतन केलेल्या आहेत आणि तुम्ही जर का या निर्माण कथांच्या मुळात गेला की तुम्हाला नेहमी "शंकराने किंवा पार्वतीने आमचा समाज निर्माण केला "अशी निर्माण कथा दिसेल आणि मग पुढे गेलात तर तुम्हाला असेही दिसेल की शंकर आणि पार्वती यांनी निर्माण केलेल्या या सर्व समाजांना अत्यंत पद्धतशीरपणे युरेशियन लोकांनी शूद्र या कॅटेगरीमध्ये ढकलत नेलेले आहे आणि आजचा ओबीसी समाज म्हणजे दुसरे तिसरे काही नसून शंकर आणि पार्वती यांनी निर्माण केलेले सर्व समाज आहेत. म्हणजे अगदी वैश्य वर्णांमध्ये सुद्धा अत्यंत पद्धतशीरपणे वाणी आणि पणी हे मूळचे शैव असलेले समाज ओबीसीमध्ये टाकण्यात आलेले आहेत . आज ना उद्या त्यांचा वैश्य दर्जा काढून घेतला गेला तर मला आश्चर्य वाटणार नाही . त्यासाठीच आर्य वैश्य ही एक कॅटेगरी अत्यंत पद्धतशीरपणे निर्माण करण्यात येत आहे . म्हणजे तुम्ही जर का आमची वर्ण जात व्यवस्था स्वीकारणार असाल आणि समाज म्हणून तुमच्याकडे जर पैसा असेल तर आम्ही तुम्हाला आर्य वैश्य म्हणून मान्यता देतो असा हा मान्यतेचा गेम आहे शेवटी मुळात वर्णव्यवस्था आहे काय तर मान्यतेचा गेमच आहे . तसाच सुरुवातीला होता का तर नाही तो फक्त कार्यक्षेत्राशी निगडित होता .
भगवान शंकर आणि पार्वती यांनी हे सर्व समाज संघटित व्हावे म्हणून टोळी संस्कृती मधून गण निर्माण केला प्रत्येक गणाला गणपती दिला आणि त्याचबरोबर स्वतःच्या मुलाला विनायकला महागणपती म्हणून सर्व गणपतींचा प्रमुख करून टाकले . दक्षिणेकडे स्कंद महागणपती होता ज्याला आज आपण खंडोबा म्हणतो. पेशवे काळामध्ये अत्यंत पद्धतशीरपणे खंडोबाला रिप्लेस करण्यासाठी म्हणून शंकराचा हा दुसरा मुलगा विनायक गणपती म्हणून आणला गेला तो पेशव्यांचा कुलदैवत होता म्हणूनच त्यांची नेमणूक पेशवे म्हणून करण्यात आली होती साहजिकच गणपतीला अधिकाधिक खोडे आणण्यात आले पण व्यवहारामध्ये मात्र हे लोक ब्राह्मण बनत गेले आणि त्यांनी ब्राह्मण धर्माचे सगळे निगेटिव्ह उद्योगधंदे स्वीकारले पुढे पुढे लोकमान्य टिळकांनी त्याचा गणेशोत्सव निर्माण केला . म्हणजे लोकांना जमा करण्यासाठी शिव उत्सव आणि गणपती उत्सव आणि समाज रचना करताना वर्ण व्यवस्था असा हा विरोधाभास आहे आणि आता सुद्धा नेमके तेच चाललेली आहे लोकांना जमवण्यासाठी कुंभमेळा आणि प्रत्यक्ष समाजामध्ये मात्र वर्ण आणि जाती !
शैव इंद् संस्कृती मधूनच पुढे शैव धर्म तयार झाला आणि त्यातूनच पुढे सिंधू मेलुहा (म्हणजे मेळ घालणारे आणि बनवणारी ) नावाची सभ्यता तयार झाली तिचा आधार शहाणपण ,मोक्ष आणि अनुशासन म्हणजेच धम्म होता या धर्माला आदिम धर्म असे म्हणता येते कारण तो जगाचा पहिला धर्म होता या धर्म संस्कृतीचा प्रभाव जवळजवळ सर्वांच्यावरच पडलेला दिसतो आणि अनेक सभ्यता यातून निर्माण झाल्या . संस्कृती आणि सभ्यता यांच्या मधला सर्वात मोठा फरक म्हणजे संस्कृती ही बहुदेववादी असते तर सभ्यता ही द्वितत्ववादी किंवा एकदेववादी असते भारतामध्ये शैव सभ्यता निर्माण झाली ती यामुळे झाली. या सभ्यतेच्या केंद्रस्थानी शिव आणि शक्ती ही दोन तत्वे होती याउलट एक देव वादातून ज्यू ख्रिश्चन अशा सभ्यता तयार झाल्या. अपवाद फक्त इस्लाम आहे इस्लामी सभ्यता नाही इस्लाम ही संस्कृती आहे जी एका देवाच्या आधारे निर्माण झालेली बहुदा एकमेव संस्कृती आहे. ती टोळी आहे. अगदी ह्या इस्लाम सारखेच ब्राह्मण लोकांचे झालेले आहे ब्राह्मण संस्कृती ही टोळी संस्कृती आहे .या सगळ्या भारताच्या इतिहासामध्ये मग ब्राह्मण संस्कृती बनवणाऱ्या ब्राह्मणांची एन्ट्री झाली कधी आणि कशी? सुरुवातीपासूनच ब्राह्मण हा समुदाय कळप म्हणून वावरत होता का आणि आत्ताही असतो का ?
भारतामध्ये जेव्हा वैदिक लोक आले तेव्हा त्यांच्याबरोबर ब्राह्मण नव्हते ऋग्वेदामध्ये कुठेही ब्राह्मणांचा फार उल्लेख येत नाही आणि जो उल्लेख येतो तो सरळ सरळ घुसवलेला उल्लेख दिसतो मग वैदिक आले तेव्हा त्यांच्याबरोबर कोण होते तर या प्रश्नाचे उत्तर ऋषी असे आहे . वैदिकांच्याजवळ फक्त श्रद्धा होती या श्रद्धेबरोबरच त्यांच्यासोबत त्यांची भाषा होती त्यांची कला होती आणि त्यांचे म्हणावे असे एक शहाणपण होते बहुदेव वाद होता यातूनच त्यांनी भारतामध्ये एक नवीन इंडोयुरेशियन संस्कृती घडवायला प्रारंभ केला . जिला आपण वैदिक संस्कृती असे म्हणतो . पुढे नॉन युरेशियन लोकांच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी मोक्ष स्वीकारला आणि स्वतःचे दोन धर्म निर्माण केले ब्रह्म धर्म आणि सांख्य धर्म
ज्याला आज आपण वैदिक संस्कृती म्हणतो तिचे त्यामुळे तीन आधार आहेत
१ ऋग्वेद ज्याच्या आधारे पुढे सामवेद आणि यजुर्वेद तयार झाला पुढे मग इराण मधून आलेल्या पुरोहितांनी त्यामध्ये अथर्ववेद ॲड केला . हा अथर्ववेद मात्र खरे तर ऋषीमुनींनी रचलेला नव्हता म्हणूनच त्यामध्ये तारण मारण मंत्र खूप आहेत हा एका अर्थाने ब्राह्मण नावाच्या मांत्रिकांनी तयार केलेला स्वतःचा तारण मारण धर्म आहे आणि त्याचा संबंध थेट श्रद्धेशी आहे धर्माशी नाही
२ ब्रह्म धर्म जो प्रामुख्याने नंतर उपनिषदांच्या मध्ये व्यक्त झाला हा प्रामुख्याने शैव उपदेश संहितांच्या मधून निर्माण झाला विशेषता आरंभाची उपनिषदे
३ सांख्य धर्म जो छोट्या छोट्या ग्रंथातून व्यक्त झाला उदाहरणार्थ सांख्य कारिका
जिला वैदिक संस्कृतीची प्रस्थान त्रयी म्हणता येईल ती ही आहे
ही वैदिक संस्कृती प्रामुख्याने ऋषी आणि विश् (हे आले तेव्हा मेंढपाळ होते )यांनी घडवलेली आहे . या संस्कृतीत ब्राह्मणांचे योगदान शून्य आहे .
वैदिक संस्कृतीत जेव्हा यज्ञ केले जात तेव्हा ब्राह्मण अस्तित्वात नव्हते ब्राह्मण हे हळूहळू या संस्कृती मधून आणि नंतरच्या पुरोहित इराणी संस्कृती मधून विकसित होत गेले म्हणजे जे यज्ञ करत होते ते स्पेशलाईज बनत गेले आणि त्यातून हा पुरोहितांचा वर्ग तयार होत गेला . मात्र वैदिक संस्कृतीमध्ये यज्ञ नेहमीच ऋषी करत होते अगदी महाभारतात आणि रामायणात सुद्धा अनेकदा ऋषीमुनी यज्ञ करताना दिसतात मुळातच मंत्र सुद्धा ऋषी निर्माण करत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि हे ऋषी जन्मदत्त नव्हते कर्म दत्त होते म्हणूनच ते अनेक समाजातून उदयाला आलेले दिसतात मी वैदिक संस्कृतीच्या विरोधात नाही याचे सर्वात मोठे कारण हेच आहे . माझा ठाम विरोध ब्राह्मण संस्कृतीला आहे . वैदिक संस्कृतीला मात्र कोणी जतन करत असेल तर मी नेहमीच म्हणतो की तसे धर्मस्वातंत्र्य द्यावे पुरुष सूक्त हे नंतर घुसवण्यात आलेले प्रकरण आहे ते मात्र आता ऋग्वेदातून काढून टाकण्याची वेळ आलेली आहे . कारण त्या एकासुकतामुळे इतके गोंधळ होतात की बोलण्याची सोय नाही. याचा अर्थ ही संस्कृती युद्ध प्रधान नव्हती असा कोणी घेऊ नये त्यांची युद्ध नेहमीच सुरू होती आणि शत्रू नष्ट व्हावा म्हणून त्यांनी प्रार्थना केले त्या प्रार्थना सुद्धा वेदांच्या मध्ये आहेत. ऋषींनीच ह्या प्रार्थना रचलेले आहेत मात्र नंतरचे वेद हे मात्र संकलनाच्या पातळीवर ब्राह्मणांनी निर्माण केलेले आहेत आणि हे व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहेत ज्यांना आपण वेदव्यास म्हणतो . महाभारत लिहिणारे व्यास आणि वेद निर्माण करणारे व्यास एक होते का हा फार मोठा प्रश्न आहे . माझ्या मते दोन भिन्न व्यास आहेत . वेदव्यास हे वैदिक आहेत तर महाभारत लिहिणारे व्यास हे वैष्णव आहेत ज्यांना त्यामुळेच सांख्य धर्म पाशुपत धर्म जैन धर्म आणि बौद्ध धर्म माहित आहेत त्यांचे तसे उल्लेख महाभारतात आलेले दिसतात आणि रामायण तर त्यानंतरच लिहिण्यात आलेले आहेत त्याबद्दल एक मत आहे
प्रश्न असा आहे की ब्राह्मण पुरोहितांना स्वतःचा स्वतंत्र असा ब्राह्मण धर्म का तयार करावासा वाटला ? तर त्याचे कारण स्पष्ट आहे. मुळात ब्राह्मण हा मांत्रिकांचा वर्ग पर्शिया मधून हाकलला गेला . तिथल्या झोराष्ट्रियन धर्माने पारंपारिक चालत आलेला वेद नाकारला आणि स्वतःचा अवेस्ता नावाचा स्वतंत्र धर्म ग्रंथ निर्माण केला . हे लोक आणि वैदिक लोक यांचा एक कॉमन प्राचीन धर्म आणि प्राचीन धर्मग्रंथ होता या धर्मग्रंथापासून झोराष्ट्रीयन लोकांनी फारकत घेतली आणि एक नवा परंतु मागील धर्माला काही प्रमाणात जतन करणारा नवीन धर्म निर्माण केला . हा नवीन झोराष्ट्रीयन धर्म स्वीकारण्याची तयारी ज्या लोकांची नव्हती जे लोक परंपरा सोडायला तयार नव्हते त्यांचे काय करायचे असा प्रश्न झोराष्ट्रियन धर्मापुढे उभा राहिला आणि एक तर आमचा धर्म स्वीकारा किंवा राज्य सोडा असा बहुदा आदेशच निघालेला असावा किंवा मुळातच या पारंपारिक मांत्रिक धर्माला तिथे वाव न उरल्याने हे स्थलांतर घडलेले असावे . साहजिकच वैदिक संस्कृतीमध्ये सुरुवातीपासून असलेले ऋषी आणि नंतर इराणमधून आलेले हे पुरोहित ब्राह्मण लोक यांचा भारतामध्ये एक विचित्र संबंध तयार झाला . यातील ऋषी बदलत गेले त्यांनी इथल्या स्थानिक लोकांच्याकडून मोक्ष घेतला आणि साहजिकच स्वतःमध्ये परिवर्तन घडवत मोक्ष स्वीकारणारी एक वैदिक संस्कृती निर्माण केली . त्या उलट हे जे इराणमधून आलेले इराणी ब्राह्मण होते त्यांना हे मान्य नव्हते त्यांना मोक्ष मान्य नव्हता त्यांना श्रद्धा आणि मांत्रिकी मान्य होती आणि ते आपल्या श्रद्धेला मांत्रिकीला वेदाला धरून होते . त्यांच्या मुळ वेदामध्ये काही गोष्टी ज्यादा होत्या ज्या त्यांनी पुढे ऋग्वेदातल्या सुक्तांच्या मध्ये ऍड करून आणि नंतर भारतातल्या भूगोलामध्ये शिरल्यानंतर काही गोष्टी ऍड करत सामवेद तयार केला. यज्ञ कसा करावा हे परंपरेत जतन व्हावे म्हणून यजुर्वेद तयार केला . आणि तीन वेदांची ब्राह्मण संस्कृती तयार झाली. या इराणी ब्राह्मणांना मोक्ष सुद्धा आपल्या ताब्यात हवा होता आणि मोक्षाबाबतचा प्रॉब्लेम असा होता की मोक्ष हा असा ताब्यात घेता येत नाही . या लोकांनी आम्ही यज्ञांच्यामार्फत मोक्ष देऊ अशी घोषणा केली हा मूर्खपणा होता . किंबहुना मूर्ख अहंकार होता मोक्षाकडे वळत चाललेल्या वैदिक संस्कृतीला स्वतःकडे वळवण्याची ही शेवटची धडपड होती पण ही यशस्वी झाली नाही कारण यज्ञ करून मोक्ष मिळणे शक्य नसते. मुळातच झाले असे की वैदिक लोकच अधिकाधिक ब्रम्हधर्म आणि सांख्य धर्म यांच्याकडे आकर्षित व्हायला लागले सरकायला लागले . अनेक लोक असे होते ज्यांनी शैव धर्म स्वीकारला साहजिकच संपूर्ण यज्ञ संस्थाच धोक्यात आली . या यज्ञ संस्थांचे जतन करणारी म्हणून मग जी धर्मव्यवस्था तयार झाली ती धर्म व्यवस्था म्हणजे ब्राह्मणधर्म होय.
ब्राह्मणांनी आपल्या वेदांच्या बरोबर ब्राह्मण्य ,अरण्यके आणि स्मृती तयार केल्या ही सुद्धा आपली मांत्रिकी शाबूत ठेवण्याची अत्यंत केविलवाणी धडपड होती या ब्राह्मण धर्माच्या नवीन प्रस्थान त्रयी होत्या. प्रश्न होता ह्या गळी कशा उतरवायच्या आणि त्यासाठी त्यांनी एक व्यवस्था निर्माण केली ती म्हणजे क्षत्रिय व्यवस्था होय . आपणच लोकांच्या मधून क्षत्रिय निर्माण करायचे क्षत्रिय म्हणून त्यांना मान्यता द्यायची आणि त्यांच्याद्वारे आपला हा ब्राह्मण धर्म संपूर्ण समाजावर लादायचा असे धोरण तयार झाले वैदिक धर्मातील जे राजे स्मृती स्वीकारतील त्यांना क्षत्रिय म्हणून मोठेपण देणे आणि जे स्वीकारणार नाहीत त्यांना शूद्र म्हणून बहिष्कृत करणे असा एक भलताच उद्योग ब्राह्मण लोकांनी या काळामध्ये सुरू केलेला दिसतो . त्यामुळेच अलीकडच्या काळामध्ये ज्यांनी ब्राह्मण धर्म स्वीकारला ते 96 कुळी मराठा झाली तर ज्यांनी तो नाकाराला ते कुणबी मराठा झाले .
आज सुद्धा ब्राह्मण धर्म ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि स्मृती ही आपली प्रस्थान त्रयी विसरायला तयार नाहीत यातूनच मग एक गोष्ट घडते ती म्हणजे ब्राह्मण नावाचा एक कळप तयार होतो ज्याची या प्रस्थान त्रयी वर श्रद्धा असते हा ब्राह्मणांचा कळप असतो आणि तो आपली श्रद्धा सोडायला अजिबात तयार नसतो आणि आजही नाही आणि म्हणूनच सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत .
थोडक्यात काय ब्राह्मण हे संस्कृतीतल्या कळपाप्रमाणे आणि नंतर जमातीप्रमाणे वागत जातात आणि त्यामुळेच ते अतिशय एकमेकाला पूरक पणे अत्यंत संघटितपणे काम करत राहतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा यातूनच निर्माण झाला.
या ब्राह्मण धर्मामध्ये ब्राह्मण गुरु आणि क्षत्रिय शिष्य जो ब्राह्मण जे जे म्हणेल ते ऐकतो अशीच मूलभूत संकल्पना आहे ही राज्य संकल्पना आहे आणि ही श्रद्धेच्या आधारे उभी आहे .
या ब्राह्मण धर्माचा स्वीकार करायचा की नाही असा फार मोठा प्रश्न नंतर बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये तिबेट मधून आलेल्या लोकांच्या पुढे पडला . त्यांना हा ब्राह्मण धर्म मान्य नव्हता आणि त्यांनी त्या विरोधात उठाव करून जैन धर्म आणि बौद्ध धम्म स्थापन केले.
माझ्या मते हा प्रश्न वारंवार निर्माण होण्याचे कारण हेच आहे की ब्राह्मण धर्माची आणि त्याने निर्माण केलेल्या ब्राह्मणी संस्कृतीमध्ये ब्राह्मणी संस्कृतीची ब्राह्मण गुरु आणि क्षत्रिय शिष्य ही समूहबंधात्मक संकल्पना सोडायला अजिबात तयार नाही तो पुन्हा पुन्हा हा आधीबंद घेऊन येतो आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा हा प्रश्न निर्माण होतो
अगदी प्राचीन काळामध्ये सुद्धा असे दिसते की ही संकल्पना आज समूह बंध अनेक पद्धतीने आपल्याला वैदिक आणि ब्राह्मणी साहित्यामध्ये प्रकट झालेला आहे . एका बाजूला कठोपनिषदामधील यम नचिकेत यांचा संबंध आहे जिथे यम क्षत्रिय आहे तर नचिकेत ब्राह्मण आहे आणि तो यमाकडून शिकतो आहे तर दुसरीकडे महाभारतामध्ये द्रोण अर्जुन आणि द्रोण एकलव्य असे समूहबंध आहेत . अष्टावक्र गीतेमध्ये अष्टावक्र हा ब्राह्मण गुरु आहे तर शिष्य क्षत्रिय आहे पुढे बौद्ध लोकांच्या महायान मध्ये सुद्धा आपणाला दिसते की मिन्यांडर म्हणजेच मिलिंद क्षत्रिय आहे आणि नागसेन हा ब्राह्मण आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की हा समूहबंध वारंवार युरेशन संस्कृतीमध्ये येत आहे आणि ब्राह्मण धर्म सातत्याने गुरु ब्राह्मण आणि शिष्य क्षत्रिय हा अनुबंध पुन्हा पुन्हा सादर करत असतो त्यामुळे ज्यांना कोणाला वाटते की हे पुन्हा निर्माण होणार नाही ते एका भ्रमात आहेत जोपर्यंत या पृथ्वीतलावर ब्राह्मण धर्म अस्तित्वात आहे तोपर्यंत हा ब्राह्मण धर्म आणि त्या ब्राह्मण धर्माला चिटकून असलेले कर्मठ ब्राह्मण कायमच हा सामूहिक अनुबंध आणत राहणार आहेत .
ब्राह्मण धर्म यामध्ये नेमकी अपेक्षा काय करतो तर या क्षत्रिय शिष्याने आपल्या ब्राह्मण गुरूला सर्व प्रकारच्या सुविधा पुरवाव्यात अशी अपेक्षा करतो किंबहुना तो या समूह बंधाचा पाया आहे . आणि त्यामुळे समर्थांचे शिष्य हे शिवाजी राजे यांच्या वंशाकडून सातत्याने काही ना काहीच आपल्या संप्रदायासाठी मागत आहेत आणि हा वंश हे सर्व काही पुरवत आहे. त्याचा आधारच मुळात गुरु रामदास आणि शिष्य शिवाजी महाराज हा समूह बंध आहे . साहजिकच आपण जर का समर्थ साहित्याचा आणि समर्थ संप्रदायातील शिष्यांच्या साहित्याचा अभ्यास केला तर तिथे हा पुन्हा पुन्हा रिपीट केलेला दिसतो कारण पुन्हा पुन्हा या संबंधाचा फायदा घ्यायचा आहे. त्यातूनच मग संभाजी महाराजांना सज्जनगडावर शिवाजी महाराजांनी पाठवलेले होते अशी ही नवी दंत कथा तयार होते तिचाही समकालीन ऐतिहासिक पुरावा मिळत नाही त्यामुळेच अनेकदा काही मराठा विचारवंत या सर्व अनुबंधाला सज्जनगड बळकवण्याचे कारस्थान म्हणून पाहतात . यातील गड बळकवणे वगैरे मला अवघड वाटते पण सज्जनगडावर संप्रदायाला आवश्यक असलेली मोकळीक मात्र आपल्याला सतत मिळत राहावी आणि मुख्य म्हणजे अनुदान मिळत राहावे ही भावना मात्र नक्की आहे. त्यामुळेच समर्थ संप्रदायांमध्ये ही दंतकथा वारंवार रिपीट झालेली आहे आणि जोपर्यंत हा संप्रदाय आहे तोपर्यंत ती रिपीट केली जाईल मुख्य म्हणजे ब्राह्मण हे सर्व कळक म्हणून करत राहतील कळपच्या कळप या अंगाने अचानक समर्थन करत अंगावर येत राहतील काही उदारमतवादी ब्राह्मण ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद का निरर्थक आहे हेही सांगत राहते पण प्रत्यक्षामध्ये ते ब्राह्मण धर्मासाठीच काम करीत राहतील
थोडक्यात काय ब्राह्मण हे जोपर्यंत ब्राह्मण धर्माचे पालन करत आहेत तोपर्यंत ब्राह्मण गुरु आणि इतर सर्व एक तर दास किंवा शिष्य या दोन रोलमध्येच वावरत राहतील.
श्रीधर तिळवे नाईक
"पकर्बे राहा पिर पैगंबरो के बडे हो गये है
न छोडि इनो कि ईसिमो हि है रे भला फायदा हि
रे भला फायदाहि भला है भला है
भला हे कहेगा सबोंहि।।
-समर्थ रामदास (मुसलमानी अष्टके)
(तू पीर पैगंबरांचा मार्ग स्वीकार, तो पकडून रहा, कारण तोच भल्याचा मार्ग आहे. तो तू सोडू नकोस त्याच्या मार्गाने जाण्यात तुझा फायदा आहे.)
अल्लख वो निरंजन कैसा यह रे आलखवो।
किसेहि सारिखा नाहीं क्या कहुरे।।
नहि रंग ना रूप रेखा कछुही।
मुँह से हि कहेसा नूहि वो ईलाहि।।
सभी ज्यातसे वो है रे नियारा।
कहे रामदासो चला वेहि सारा।।
(समर्थ रामदास )
मुसलमानी अष्टके
(अर्थ- अल्ला हे सर्वश्रेष्ठ तत्त्व असून, ते अलख निरंजन म्हणजे डोळ्यांनी पाहता येण्यासारखे नाही. ज्ञानचक्षूनेच अल्लाला जाणता येते. माझ्या पीरानेच अल्ला हे तत्त्व मला समजावून सांगितले. अल्लाचा शोध घेण्यासाठी माणसाला आत उतरावे लागेल. अल्लाला कोणताही रंग नाही. अल्लाला जाणून घेणे जास्त चांगले,.)
Comments
Post a Comment