Posts

Showing posts from July, 2026
माणसाचा आहार ,काळ आणि ठरवण्याची कसोटी श्रीधर तिळवे नाईक  भारतामध्ये सध्या जे काही जबरदस्त वाद चालू आहेत त्यामध्ये आहाराचा वाद हा एक प्रचंड मोठा वाद आहे आणि आता श्रावण आला की तो पुन्हा चालू येईल म्हणून हा लेख लिहितोय .यावर मी इतरत्रही लिहिलेले आहे परंतु आज मी थोडा वेगळा अँगल पकडणार आहे . आपण आहारावर बोलताना नेहमी अलीकडे विज्ञानाचा आधार घ्यायला बघतो किंवा इतिहासाचा आधार घ्यायला बघतो म्हणजेच एका अर्थाने आपण काळ बघतो कालिक होतो  आहाराबाबत असे कालिक होण्याची कसोटी खरोखर योग्य आहे का ? सर्वसाधारणपणे एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे आपण आहार वर्तमानात खातो त्यामुळे आपण जर का नैसर्गिक वर्तमानाच्या नैसर्गिक आहाराबद्दल विचार करायला लागलो तर काय दिसते ?  आपल्याकडे आहार दोन प्रकारच्या शेतीमुळे येतो पहिली शेती ही जमिनीची शाकाहारी शेती आहे तर दुसरी शेती ही प्राण्यांची मांसाहारी पशुपालन शेती आहे. आता आपण सर्वसाधारणपणे शिकार करून अन्न मिळवत नाही आपल्या मांसाहारी आहाराचा मुख्य source हा पशुपालन आहे . अपवाद फक्त अजूनही शिकार करून जगणारे काही लोक आहेत टोळ्या आहेत . पण या टोळ्या आपल्यापैकी बऱ्...
सांस्कृतिक जालता श्रीधर तिळवे नाईक  जगातील प्रत्येक संस्कृती प्रत्येक देश आणि प्रत्येक राज्य हे एक नेटवर्क कार्यजाल असते असते  जगातल्या प्रत्येक संस्कृतीच्या मागे शिव शक्ती संसार महाप्राण किंवा ईश्वर आणि जीव हे पाच आयाम असतात  शिव म्हणजे शून्य होय आणि तेच अभाव निर्माण करते हा अभाव जीवामध्ये अज्ञानामुळे निर्माण होतो  प्रत्यक्ष जगताना हा अभाव हाच स्थायीभाव असतो त्यातूनच शरीराला अस लागते आस लागते . तिच्यामधून आसक्ती आणि असोशी निर्माण होतात . जी असण्याची असते ती असोशी आणि जी जगण्याची असते ती आसक्ती .  आसक्ती घन , द्रव व वायुरूपात प्रकट होत राहते तिचे वायुरूप निकड माणसांमध्ये श्वास द्रवरूप तहान माणसांमध्ये पाणी आणि घनरूप भूक असते माणसांमध्ये अन्न असते  जीवाच्या बाहेर जगत असते जे जीवन पुरवत असते . अण्णा असो किंवा पाणी असो किंवा श्वास असो हे सर्व त्याला जगा मधून घ्यावे लागते यासाठी जगाशी जे काही चलनवलन होते त्याला व्यापार आणि हा कसा करायचा याचे जे नियम म्हणतात त्याला व्यवहार म्हणतात . सर्व संस्कृतींच्या मध्ये या गोष्टी असतातच असतात.  या सर्व संसारामधला जो...
भारतीय राजकारणामधल्या दोन छावण्या आणि तिसरी शैव छावणी श्रीधर तिळवे नाईक  अलीकडे फेसबुक वर दोन व्यक्तींनी कॉमेंट टाकल्या आहेत प्रथम पैगंबर शेख यांनी सुरुवात केली आणि मग त्याला त्याच पोस्ट नक्कल मारत फक्त शब्द बदलून दुसरी पोस्ट आली पण त्यामुळे माझी जी मांडणी आहे तिला पुष्टता मिळते.  या दोन्ही पोस्ट पुढील प्रमाणे आहेत . "देशाची मोठी समस्या ब्राम्हणवाद आहे. या गोष्टी पेठीय छावणीतले लोक पुढे येऊन स्वीकारू लागले आहेत. देशात धार्मिक तेढ आणि जातीय तणाव निर्माण करण्यात, तो वाढवण्यात ब्राह्मणी डोक्यांचे मोठे योगदान राहिले आहे. हे त्यांना माहिती असल्याने ते सद्य स्थितीत थोडे भयग्रस्त झालेले आहेत. भाजप गेल्याने सर्वात जास्त नुकसान ब्राह्मणी छावणीचे झाले आहे. बहुजन फक्त पालखीचे भोई आहेत." पैगंबर शेख  "जगाची मोठी समस्या इस्लामी आतंकवाद आहे. या गोष्टी इस्लामी छावणीतले लोक पुढे येऊन स्वीकारू लागले आहेत. जगभरात धार्मिक तेढ आणि जातीय तणाव निर्माण करण्यात, तो वाढवण्यात इस्लामी डोक्यांचे मोठे योगदान राहिले आहे. हे त्यांना माहिती असल्याने ते सद्य स्थितीत थोडे भयग्रस्त झालेले आहेत.  काँग्...
कसोटी क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू सुनील गावस्कर श्रीधर तिळवे नाईक  सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरवताना अलीकडे एक नवीनच कॅटेगिरी आली आहे ती म्हणजे सर्वोत्कृष्ट टीमच्या विरोधात कोणाचा किती स्कोर झाला आणि कोण किती एव्हरेज न लढले  यामध्ये सर्वाधिक स्कोर म्हणून सचिन तेंडुलकर प्रथम स्थानी असला तरी तो सर्वोत्कृष्ट म्हणता येईल का असा प्रश्न येतो कारण थेट स्पर्धा दिसते ॲलन बॉर्डर ची सरासरी थोडी जास्त आहे पण स्पष्ट सांगायचे तर त्याला त्या काळातील सर्वोत्कृष्ट बॉलिंग ऑस्ट्रेलियाचे होती ती फेस करावी लागलेलीच नाही हीच गोष्ट डेव्हिड ग्रोवरची आहे मात्र तो एक सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे याबद्दल कोणाला शंका नसावी सचिन सुरुवातीला फारच आक्रमक खेळायचा त्याचा थेट परिणाम त्याच्या सरासरीवर झालेला दिसतो सर्वाधिक शतके त्याच्या नावावर आहेत मात्र सर्वोत्कृष्ट असा एकच एक खेळाडू यातून काढता येत नाही . नेहमीप्रमाणे डॉन ब्रॅडमन टॉप वर पण बाकीच्याचे काय ? दोन नंबर वरच खरा प्रश्न आहे आणि तिथे मग आपणाला सगळ्या वातावरणाचा विचार करता आणि सरासरीचा विचार करता चक्क सुनील गावस्कर दिसायला लागतात त्यांची थोरवी कळायला लागते त...
 मराठी वाचनसंस्कृती श्रीधर तिळवे (गणेश कनाटे ह्यांच्या पोस्टवर कॉमेंट ) पहिला अक्ष संस्कृतीच्या चार म्हणजे मार्गी देशी पोटी आणि जमाती अंगाचा सर्वात पहिली गोष्ट मार्गी आणि देशी ह्यांचा समतोल वाचनसंस्कृतीत पूर्ण ढळला आहे कुठल्याही वाचन संस्कृतीत मार्गी वाचन फक्त २० टक्के हवं आणि देशी ५० टक्के किमान १५ टक्के पोटी व १५ टक्के जमाती हवं पण मराठीत मार्गी म्हणजे हिंदी व इंग्लिश वाचन हे स्टेट्स आहे मराठी वाचन बिलो स्टेट्स आहे मग नेमाडे म्हणतात तसं तुकाराम वाचला नाही तर चालेल पण शेक्सपियर वाचला पाहिजे ही वृत्ती बळकावले चेतन भगत वाचणे म्हणजे प्रेस्टिज कमवणे पिंजरापेक्षा शोलेचीच (तो पिंजरापेक्षा निर्विवाद टेक्निकल पातळीवर उजवा आहे ) चर्चा करणे हे घडते  ह्यात पुन्हा दुसरा अक्ष नवता व जूनता ह्यांचा आहे मराठी वाचक जो इंग्रजी वाचनाबाबत नवताप्रोन असतो मराठीत वाचताना जूनताप्रोन असतो वाचनाबाबत शिळी भाकरी खाण्यात मराठी लोकांना मजा येते वास्तविक आता महाराष्ट्रात काय चाललंय हे कळणं खूप आवश्यक असतं आणि ते कळण्याचा उत्तम मार्ग नवतावादी वाङ्मय वाचणे हाच असतो विशेषतः कविता पण मराठी लोकांना इतिहासात आ...
 सांख्य धर्म आणि राहून गेलेले षष्ठी तंत्र श्रीधर तिळवे नाईक  सांख्य दर्शनावर उपलब्ध असलेल्या ईश्वराच्या सांख्यकारिका या एकमेव पुस्तकात सुद्धा स्पष्टपणे षष्ठी तंत्राचा उल्लेख आहे आणि तरीसुद्धा या संदर्भामध्ये अतिशय व्यवस्थितपणे मौन पाळले जाते  सर्वात आश्चर्यकारक भाग जर कुठला असेल तर तो म्हणजे सांख्य दर्शनामध्ये फक्त दर्शनीक भाग आलेला आहे आणि ज्या 60 क्रियांच्या साठी म्हणून हे तंत्र प्रामुख्याने अवलंबले जाते त्याचा मात्र कसलाही विचार आलाच नाही वास्तविक त्या साठ क्रियांच्या मुळे या तंत्राला षष्टी तंत्र म्हणतात यातली जी षष्ठी आहे ती साठी ( पासष्टी वगैरे )आहे संस्कृत मधली सहा नव्हे . ज्या 60 क्रियांचा 60 क्रियांचा उल्लेख या तंत्रामध्ये मोक्षाची साधना म्हणून केला जातो त्या क्रिया मात्र अत्यंत व्यवस्थितपणे टाळलेल्या आहेत किंबहुना ईश्वर चंद्राला या यांच्या विषयी काही माहिती तरी होती की नाही असा आता प्रश्न पडतो हे असे का घडले हे उघड आहे ब्राह्मण लोकांना श्रम करायचे नसतात त्यामुळे त्यांनी हा काम करण्याचा भाग जो सर्वात महत्त्वाचा आहे तो वगळला आणि उरलेला बौद्धिक चर्चेचा भाग दर्शन म्ह...
 ऑलम्पिक कडे का लक्ष नाही या मुद्द्यावर गजू तायडे यांच्या पोस्टवर केलेली कॉमेंट श्रीधर तिळवे नाईक आपल्याकडे ऑलम्पिकचा गाजावाजा कमी आहे मुळात क्रिकेटचे जे काही तोटे आहेत त्यात इतर खेळांची झालेली उपेक्षा हा तोटा ऑलिम्पिक कडे आपले पुरेसे लक्ष नसते मुळात एक्साईटमेंट नसते त्यामुळे साहजिकच टीआरपी नाही आणि जिथे टीआरपी नाही तिथे सगळे कोमट आणि फिकट ही आपली वृत्ती आहे मुळात कुठल्या खेळाचा आपल्या आयुष्यातल्या कुठल्या गोष्टीची नेमका संबंध आहे हे सांगणारे लोक आपल्याकडे संख्येने खूप कमी आहेत आपल्याकडे थेट खेळाची विश्लेषण होते पण खेळाचे समाजशास्त्र आपणाला कळत नाही क्रिकेट हा दीर्घकाळ शेतीशी निगडित असलेला खेळ वारी करण्याऐवजी इंग्लिश शेतकऱ्यांनी क्रिकेट खेळणे पसंत केले. कारण व्हॅटिकन सिटीला जाणे परवडणारे नव्हते  क्रिकेट हा खेळ आपल्याकडे लोकप्रिय झाला खरा पण अनेकांना त्या मागचे गणितच कळले नाही कारण त्यात असलेली गणिते आकडेमोड भारतीय लोकांना आकडेमोडीचा प्रचंड मोठा शौक आहे क्रिकेटमध्ये हा पुरा होतो. ऑलम्पिक मध्ये तो पुरा होत नाही कारण मेडल मिळत नाहीत आणि ज्यात यश नाही तिथे भारतीय मीडिया जात नाही भ...
 आंदोलनातील कॉकरोच , घोडे आणि हत्ती श्रीधर तिळवे नाईक  शैव श्रुतीचे राजकीय सिद्धांत हे नेहमीच काळानुसार योग्य ती भूमिका घेत असतात . सनातन असे काहीही नसते राजकारणामध्ये तर बिलकुल नसते आणि धर्मकारण हे राजकारणाचा भाग असल्याने त्यातही सनातन असे काही नसते. सनातन फक्त मोक्ष असतो धर्म नसतो ही शैव श्रुतीची गेली बारा हजार वर्षे अस्तित्वात असलेली मांडणी आहे त्यामुळेच कुठलीही राजवट ही द्वादशशीलयुक्त असली पाहिजे मात्र ही द्वादशशीलता राबवताना जे अनुशासन निर्माण होते जी शिस्त निर्माण होते ती प्रत्येक वेळेला काळानुरूप व्यवस्थित बदलली पाहिजे अनेकदा साधना करताना व्यक्तिगत पातळीवर बदल करावे लागतात तेही केले पाहिजेत  त्यामुळेच दिल्लीत जे काही घडले ते अभूतपूर्व होते आणि मी त्याला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे आणि कायमच भाजपला काय चालले आहे ते ओळखा असे सांगितलेले आहे मात्र भाजपाने ते ओळखले आहे की नाही याबद्दल मला अजूनही शंका आहे. मोक्षकेंद्री राजकारणाला कुठलाही पक्ष नसतो कारण त्यांचा पक्ष सत्य असतो. खऱ्या विधानांना प्रमाणाच्या आधारे तपासत तो खऱ्या खोट्याची चर्चा करतो आणि कुठल्याही पक्षाची बाजू न ...

मोक्ष शेवटच्या कविता

 इच्छा साधी होती  जाण्यापूर्वी जग बदलेन आणि जाईन मनुष्य नावाचा जो प्राणी आहे त्याला सिद्ध बनविन  विज्ञानाने बळ दिले पंख दिले पण विवेक दिला नाहीं  थोडासा विवेक देईन आणि जाईन  विज्ञानाने कॅमेरा दिला पण न्याय दिला नाही  मनुष्याच्या ठायी असलेले अद्वितीयता उमलु दिली नाही फक्त फॉलोवर बनवण्याचे युक्तिवाद झाले  वॉलवर चालण्याचे जिम्नॅस्टिक झाले भक्तांच्या झुंडी झाल्या आणि देवांच्या पार्ट्या वाटलं होतं मनुष्यालाच देव बनविन आणि मग जाईन जाण्यापूर्वी जग बदलेन मग जाईन मनुष्य ज्याने नेहमीच निराश केले  व्यवस्था जिने फक्त फ्रस्ट्रेशन दिले  तिला कन्स्ट्रक्शन शिकवीन आणि मग जाईन  सतत जनावरे दाखवणारे व्हिडिओ  हिंसा दाखवणारे व्हिडिओ  बलात्काराला नैसर्गिक मान्यता मिळवून देणारे व्हिडिओ  मी बाजूला धाडायला शिकवीन शिकवीन की तू किंगडम प्लांट नाहीं आहेस  तू किंगडम ॲनिमल नाहीस  तू किंगडम मोक्ष आहेस  प्रत्येकातला सिद्ध जागृत करेन आणि मग जाईन प्रगतीचे अवाढव्य नकाशे गुगलणारे  विकासाचे ताशे नेटणारे  स्पॉन्सर केलेले पडघम  प्...
भाव, इबादत devotion, भक्ती आणि विठ्ठलीकरण १ श्रीधर तिळवे नाईक  आपल्याकडे एक फार मोठी समजूत अशी आहे की विठ्ठल संप्रदाय हा फार सुरुवातीपासूनच मोठा विशाल संप्रदाय होता प्रत्यक्षामध्ये याचे कसलेही पुरावे मिळत नाहीत पण हे इतक्यांदा ब्राह्मण लोक सांगत असतात की आपणाला हळूहळू असे वाटायला लागते की हे खरे आहे पण प्रत्यक्षात ब्राह्मण लोक असे का सांगत आहेत हे मात्र कोणी बघत नाही विठ्ठल संप्रदाय हा तथाकथित पुरोगामी लोकांच्या दृष्टीने कितीही पुरोगामी असो परंतु ब्राह्मण लोकांच्या मते तो सनातन धर्माचा भाग आहे आणि कदाचित उद्या जर का सार्वजनिक बहुमत या संदर्भात घेतले गेले तर कदाचित ते ब्राह्मण धर्माच्या म्हणजे हिंदू धर्माच्या बाजूने पडेल. तुम्ही कितीही वैदिक विरुद्ध हिंदू असा संघर्ष मांडला तरी प्रत्यक्षामध्ये मात्र वैदिक हा हिंदू धर्माचाच भाग आहे आणि हिंदू हा वैदिक धर्माचा विस्तार आहे अशीच जनतेची समजूत आहे त्याला उपाय एकच असतो तो म्हणजे एक तर शैव धर्म स्वतंत्र आहे हे सत्य त्यांच्या लक्षात आणून देणे किंवा मग हिंदू धर्म स्वतंत्र आहे असे सांगणे यातील दुसऱ्या गोष्टीला आवश्यक असणारे पुरावे प्राचीन काळामध...
 मी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का मागितला? श्रीधर तिळवे नाईक  मी सहसा कोणाकडेच राजीनामा दे असे म्हणत नाही पण अनेकदा सार्वजनिक जीवनामध्ये अपवादात्मक वेळेला का होईना पण अशी स्थिती येते की काही गोष्टी बोलाव्या लागतात . मी फार पूर्वीच आंदोलन सुरू होण्यापूर्वीच राजीनामा घ्या असे लिहिले होते याचे कारण हे प्रकरण चिघळत जाणाऱ याची कल्पना मला आली होती . काळ बदललेला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला मंत्री माणसाला जबाबदार धरणे हे योग्य राहिलेले नाही अनेकदा मंत्री लोकांना कसलीही कल्पना न देता त्यांच्या नावाने व्यवस्थित खंडणी घेणारे लोक सुद्धा आहेत . त्यामुळे उठ सूट मंत्र्यांना जबाबदार धरणे बडे नाही पण त्याचबरोबर काही गोष्टी जर वेगळ्या घडत असतील तर त्या तपासाव्या लागतात धर्मेंद्र प्रधान यांच्याबाबतीत अशा वेगळ्या गोष्टी घडल्या आहेत . सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे शिक्षण क्षेत्र आहे आणि शिक्षण क्षेत्र म्हणजे सरळ सरळ पुढच्या पिढ्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असते. रीत असते . आपण हा सांभाळ नीट केला नाही आपण ही जबाबदारी नीट पार पाडली नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणे कधीही शक्य नाही त्...
 शिक्षण आणि त्याविषयीचे काही प्रश्न १ श्रीधर तिळवे नाईक  १ सर्वात पहिला प्रश्न ज्ञानातून राजकीयता निर्माण व्हायला हवी कायदा निर्माण व्हायला हवा की राजकीय इथून गोष्टीतून ज्ञान आणि कायदा निर्माण होतो याचे स्पष्ट उत्तर ज्ञानातून राजकीयता निर्माण होते कायदा निर्माण होतो आणि त्या कायद्यानुसार सत्ताही निर्माण होते मी जेव्हा धर्माला राजकीय विचार प्रणाली म्हणतो तेव्हा मला हेच म्हणायचे असते की प्रत्यक्षामध्ये सत्तेने कसे वागावे हेच धर्म सांगत असतो मोक्ष हा सत्तेने कसे वागावे ते सांगत नाही तो सत्य काय आहे ते सांगतो आणि सर्व क्षेत्रांना आपली द्वादशशीलता अप्लाय करतो तो ज्ञानातून नव्हे तर ज्ञानाच्या अंतातून जन्मतो आणि त्यामुळे एक अलौकिक शहाणपण तो व्यक्त करतो आणि त्या अलौकिक शहाणपणाचा अविष्कार म्हणून द्वादशशीलता जन्मते ही सर्वसाधारणपणे पूर्वीच्या काळी फक्त पंचशील होती पण आत्ताच्या काळात ती द्वादशशील झालेली आहे . ज्याप्रमाणे सर्वच व्यक्तींनी ती पळायला हवी त्याचप्रमाणे राजकीय व्यक्तीने सुद्धा ती पाळायला हवी.  २ एकदा ज्ञानातून कायदा जन्मतो हे स्पष्ट झाल्यानंतर ज्ञान हे सर्व राजकीय गोष्टीं...