ऑलम्पिक कडे का लक्ष नाही या मुद्द्यावर गजू तायडे यांच्या पोस्टवर केलेली कॉमेंट श्रीधर तिळवे नाईक
आपल्याकडे ऑलम्पिकचा गाजावाजा कमी आहे मुळात क्रिकेटचे जे काही तोटे आहेत त्यात इतर खेळांची झालेली उपेक्षा हा तोटा ऑलिम्पिक कडे आपले पुरेसे लक्ष नसते मुळात एक्साईटमेंट नसते त्यामुळे साहजिकच टीआरपी नाही आणि जिथे टीआरपी नाही तिथे सगळे कोमट आणि फिकट ही आपली वृत्ती आहे मुळात कुठल्या खेळाचा आपल्या आयुष्यातल्या कुठल्या गोष्टीची नेमका संबंध आहे हे सांगणारे लोक आपल्याकडे संख्येने खूप कमी आहेत आपल्याकडे थेट खेळाची विश्लेषण होते पण खेळाचे समाजशास्त्र आपणाला कळत नाही क्रिकेट हा दीर्घकाळ शेतीशी निगडित असलेला खेळ वारी करण्याऐवजी इंग्लिश शेतकऱ्यांनी क्रिकेट खेळणे पसंत केले. कारण व्हॅटिकन सिटीला जाणे परवडणारे नव्हते
क्रिकेट हा खेळ आपल्याकडे लोकप्रिय झाला खरा पण अनेकांना त्या मागचे गणितच कळले नाही कारण त्यात असलेली गणिते आकडेमोड भारतीय लोकांना आकडेमोडीचा प्रचंड मोठा शौक आहे क्रिकेटमध्ये हा पुरा होतो. ऑलम्पिक मध्ये तो पुरा होत नाही कारण मेडल मिळत नाहीत आणि ज्यात यश नाही तिथे भारतीय मीडिया जात नाही भारतीयांना फक्त यशात रस असतो पण यश मिळवण्यासाठी काय केले पाहिजे किंवा कोणी काय करत आहे यात त्यांना फारसा इंटरेस्ट असत नाही यश मिळाल्यानंतर मात्र ते आपलेच मानण्याची आपली वृत्ती आहे भले त्यात आपला काही वाटा नसो तुम्ही तुमच्या जीवावर यश कमवा मग आम्ही प्रसिद्धी द्यायला येतो ही मीडियाची पॉलिसी आहे ज्यांना मेडल्स मिळतील त्यांचा गाजावाजा आपला मीडिया करेलच आणि मग जे ऑलम्पिक आता फिके वाटते ते अचानक गडद वाटायला लागेल
श्रीधर तीळवे नाईक
Comments
Post a Comment