सावरकर ३ सावरकर , रचित आणि धर्म हाच आधार असणे श्रीधर तिळवे नाईक मागील लेखात आपण सत्तेचे प्रमाणीकरण या अंगाने काही मुद्दे घेतले आणि युरोप मधला पुरोगामी कालखंडामधला संपूर्ण सत्ता विचार हा कसा धार्मिक सत्ता विचार आहे ते पाहिले. पुरोगामी वादाला धर्मशास्त्र आणि धर्म टाळता आला नाही आणि तो प्रामुख्याने राज्य आणि सत्ता विचार यांच्या बाबतीत टाळता आला नाही ही गोष्ट अधोरेखित केली प्रत्यक्ष पुरोगामी कालखंडामध्ये ही गोष्ट पुरेशा प्रमाणात इतिहासकारांना लक्षात आली नाही पण आधुनिक काळामध्ये फ्रेडरिक नीत्शे नावाचा एक मोठा विचारवंत निर्माण झाला त्याने सर्व काही रचित असते त्यात इतिहास पण येतो असे प्रतिपादन करून आत्तापर्यंत चालत आलेले सर्व पुरोगामी सिद्धांत नाकारले. त्यांचा पाया उध्वस्त केला . ही उत्तराधुनिकतेची सुरुवात होती आणि आधुनिकतेचीही ! अस्तित्व स्वतःला हवे तसे स्वतःला रचत असते की काय असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला . सावरकरांच्या बाबतीत हा प्रश्न वारंवार निर्माण होतो कारण सावरकर यांचा जीवन प्रवासाने वैचारिक प्रवास पाहिला तर सावरकर स्वतःला वारंवार रचत असतात आणि वारंवार त्यांना स्...
Posts
Showing posts from May, 2026
- Get link
- X
- Other Apps
सावरकर , श्रद्धा, मोक्ष, धर्म, विज्ञान आणि राष्ट्र श्रीधर तिळवे नाईक मी एक गोष्ट सातत्याने मांडत आहे ती म्हणजे श्रद्धा वेगळी, मोक्ष वेगळा आणि धर्म वेगळा आणि महाश्रद्धा म्हणजेच रीलिजन मजहब वेगळा ! सावरकर यांच्या संदर्भात थोडीशी चर्चा झालीच होती आता नेमकी गोची काय होती आणि पुरोगामी नेमके कुठे थकले आणि चकले या अंगाने अधिक खोलात जाऊ . सर्वसाधारणपणे पुरोगामी कालखंडामध्ये एक नवीन गोष्ट उदयाला आली ती म्हणजे विज्ञान ! किंबहुना विज्ञानानेच पुरोगामी वाद सुरू केला. पुरोगामी वादाने विज्ञाननिष्ठता जेव्हा स्वीकारली तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की विज्ञानामुळे धर्म महाश्रद्धा रेलिजन मजहब नाहीसा होतो आणि मजहब नाहीसा झाला की मग जी त्यांच्या मुळे अस्तित्वात असलेली प्रस्थापित राज्यव्यवस्था होती तिला सुद्धा भोके पडायला लागतात. साहजिकच मग प्रश्न निर्माण होतो की धर्माशिवाय रिलिजन शिवाय राज्यबांधणीसाठी लोकांना एकत्र बांधायचे कसे ? धर्म ,महाश्रद्धा ही एक अशी राजकीय प्रणाली होती की जी लोकांना बांधून ठेवत होती आणि ती जर का आपण विज्ञाननिष्ठतेच्या आधारे नष्ट करणार असू तर तिला पर्याय काय असू शकतो ...
- Get link
- X
- Other Apps
वि दा सावरकर : ब्राह्मणी हिंदुत्वाचा तिसरा चेहरा श्रीधर तिळवे नाईक भारतामध्ये नानासाहेब पेशवे यांच्यानंतर हळूहळू ब्राह्मण धर्म महाराष्ट्रात पूर्णपणे प्रस्थापित झाला आणि त्याने इथल्या सर्व व्यवस्था आपल्या ताब्यात घेतल्या साहजिकच या उत्तरपेशवाईचे पतन होणे आणि त्यांचे ब्रिटिशांच्याकडून पराभूत होणे हे अटळ होते आपला पराभव का झाला याची कसलीही मीमांसा सुरुवातीच्या काळामध्ये झाली नाही पण एकदा इंग्रजांची राज्य व्यवस्था हलवता येणार नाही याची कल्पना आल्यानंतर काही लोकांनी विश्लेषण करायला सुरुवात केली आणि यातूनच एक विचार प्रणाली हळूहळू उदयाला आली ती म्हणजे हिंदू वाद आणि तिला शहर द्यायला उभा राहिला हिंदुत्ववाद ! या हिंदुत्ववादात सर्वात प्रथम वैदिक हिंदुत्व उदयाला आले आणि त्याची मांडणी आर्य समाजाने आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली . भारताचा इतिहास नेहमीच सांगत आलेला आहे की वैदिक धर्म पुन्हा एकदा उदयाला आला की ब्राह्मणधर्म गप्प बसत नाही तो आपोआपच स्वतःची जागा तयार करायला बघतो वैदिकता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो इथेही तेच घडले आणि ब्राह्मण लोकांनी आर्य वैदिकत्वात हिंदुत्वात शिरकाव के...
लग्नाचे खरे सात फेरे काय आहेत
- Get link
- X
- Other Apps
शैव लोकांच्यातील सात फेरे श्रीधर तिळवे नाईक खूप लोक विचारतात की सात फेरे ही संकल्पना कोणाची? तर ती शैव लोकांचीच आहे फक्त वैदिक लोकांनी ती उलटी केली ज्याला आज आपण सुलट समजतो म्हणजे जी क्लॉकवाईज आहे ती प्रत्यक्षात शैव लोकांच्या दृष्टीने त्यांची सुलट सिस्टीम वैदिक लोकांनी उलट केलेली आहे याचे कारण काय आहे हा एक फार मोठा प्रश्न नेहमी विचारला जातो मुळात शैव लोकांच्या ती अँटी क्लॉकवाईज का आहे ते पाहिले पाहिजे शैव लोकांच्यातला सातवा फेरा प्रथम सुरू होतो आणि मग हळूहळू पती-पत्नी सहावा पाचवा चौथा तिसरा दुसरा आणि पहिला असा क्रम पाळत सात फेरे पुरे करतात आणि पहिल्या फेऱ्याला सात फेरे कम्प्लीट होतात त्याचा अर्थ आहे तुमच्यातली अंतर संपले आणि तुम्ही आता एक झालात द्वैत सुद्धा उरले नाही कारण दुसऱ्या फेऱ्यांमध्ये दोन म्हणजे शिवशक्ती युग्म सुद्धा संपते उरतो तो फक्त एक अभेद! हा अर्थ न समजल्याने वैदिक लोकांना फक्त एवढेच माहिती होते की आपल्याला फेरे व्यवस्था हवी आहे पण ते आपल्या पद्धतीने आले पाहिजे. तुम्ही जर का इतर जगभर पसरलेल्या युरेशियन लोकांच्यात गेला तर तुम्हाला हे सात फेरे दिसणार ...
- Get link
- X
- Other Apps
वर्तमानात या श्रीधर तिळवे नाईक जे शिक्षण वर्तमानाला हाताळू शकत नाही हाताळायला शिकवत नाही ते कालबाह्य असते शिक्षणाचे केंद्र नेहमीच वर्तमान असायला हवे पण दुर्दैवाने आपल्याकडे अनेकदा शिक्षणाचे केंद्र इतिहास असतो हा इतिहास सुद्धा राजकीयच असतो ज्याचा प्रत्यक्ष वर्तमान हाताळताना काडीचाही फायदा होत नाही उदाहरणार्थ एखादा मनुष्य वैद्यकीय शिक्षण घेत असेल तर त्याला त्या राजकीय इतिहासाचा काय फायदा ? कुठल्या राजाने आणि महाराजांनी काय केले या गोष्टीचा तो जो ऑपरेशन करत आहे त्या ऑपरेशनशी काय संबंध ?p नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्ही जे वर्तमानात करायला निघालेले आहात अगदी एक्टिंग सुद्धा करायला निघालेला आहात तर त्या अॅक्टींगला तुमच्या या तथाकथीत इतिहासाचा कितपत फायदा असणार आहे भूतकाळाचा फायदा असणार आहे ? शेवटी याबाबतीत त्याला आत्तापर्यंत कोण कोणती ऑपरेशन शोधली गेली कोण कोणते मेडिकल सायन्सेस कसे कसे डेव्हलप होत गेले कशा प्रकारच्या औषधी योजना नव्या शोधल्या गेल्या याचा इतिहास शिकवणे हेच शेवटी गरजेचे बनते म्हणजे संपूर्ण मेडिकल इतिहास हाच त्याच्या कामाचा असतो पण हा इथे आज पार्श्वभूमीवर असत...
- Get link
- X
- Other Apps
न्यू कॉलेजमधली वडील गिरी गेली श्रीधर तिळवे नाईक यादव सर गेले ते लोकांच्यासाठी न्यू कॉलेजचे प्राचार्य होते पण आम्हा विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्या मागे ठाम उभे राहणारे यादव सर होते . त्यांच्या प्रथम भेटीतच माझ्यावर ठसला होता तो त्यांचा ठळकपणा आणि ठसठशीत पणा ! एखादा मलखांब जर बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आला तर तो कसा दिसेल तसे ते दिसत . काळा सावळा वर्ण आणि धिप्पाड मूर्ती ठसठशीत नाक नजर एकदम भेदक उंचीही चांगलीच त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दिसता क्षणीच जड वजनी वजन दार इम्प्रेशन पडायचे आणि मग तो त्यांचा येणारा अत्यंत भारदस्त आवाज! तो कानावर पडला की हा माणूस प्राचार्य या पोस्ट शिवाय दुसरा काही या कॉलेजमध्ये असूच शकत नाही असे वाटायचे . ते केमिस्ट्री चे प्राध्यापक होते त्यामुळे साहजिकच अकरावी बारावीला क्लासमध्ये कधीकधी ते आम्हाला रसायनशास्त्र शिकवायला यायचे . एक प्रकारे घाबरवणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते पण तरीही मला गोष्ट कळली नाही तर मी त्यांना सरळ उभा राहून दोनदा आयुष्यात मला तुम्ही शिकवता ते कळले नाही असे सांगितले होते . आणि त्यांनीही न कंटाळता पुन्हा एकदा सर्व काह...
- Get link
- X
- Other Apps
अवकाशता , देशीयता , स्थानिकता आणि देशीवाद (फिरसे) श्रीधर तिळवे नाईक नेमाडेंनी देशीवाद मांडला आणि तो मराठी साहित्याने कवटाळला ह्यालाही आता पन्नास वर्षे पूर्ण होतील ह्या देशीवादाने प्रथम नेमाडे शहाणे मग चित्रे कोलटकर बदलले आणि मग मराठी साहित्य ! ह्या लोकांनी स्वतःच्याच कोसला , कविता , अरुण कोलटकरांच्या कविता , जेजुरी ह्या माईलस्टोन ठरलेल्या आधुनिक कलाकृती नाकारल्या आणि देशीवादी लेखन करायला सुरवात केली चित्रेंचा कवितानंतरच्या कविता हा संग्रह , नेमाडेंच्या बिढार जरीला झूल ह्या कादंबऱ्या कोलटकरांचे नंतरचे संग्रह हे देशीवादी वाङ्मय हे उत्थान होते कि पतन हे ठरवणे आजही अवघड आहे माझ्या मते हे पतन होते मात्र पुढे देशीवादाचा बोभाटा नाकारून ह्यांनी जेव्हा पुन्हा एकदा अवकाशतेवर फोकस ठेवला तेव्हापासून हिंदू , भिजकी वही सारख्या कलाकृती जन्मलेल्या दिसतात अवकाशाचे वर्गीकरण करणे अवघड असले तरी ते करावे लागते ह्यात प्रथम प्रायोजित अवकाश व नैसर्गिक अवकाश असे दोन प्रकार होतात प्रायोजित अवकाश हे इंटेन्शनल असतात ते मानवी हितसंबंधांनी प्रायोजित केलेले असतात नैसर्गिक अवकाश हे निसर्गाने निर्माण केल...
गौतम बुद्ध आणि माझी कविता
- Get link
- X
- Other Apps
गौतम बुद्ध आणि माझी कविता श्रीधर तिळवे नाईक आज बुद्ध पौर्णिमा साहजिकच गौतम बुद्धावर अनेकांच्या पोस्ट पडणे स्वाभाविक आहे ज्याला त्याला आज बुद्धाचा ग्रेटनेस सांगणे आवश्यक वाटणे हेही स्वाभाविक आहे सर्वसाधारणपणे भारत हा बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो तो संपूर्ण आशियात बौद्ध धर्माच्या झालेल्या प्रसारामुळे ! गौतम बुद्धाने त्याचा धर्म किंबहुना धम्म आपल्या अनुयायांना संपूर्ण जगात न्या असे सांगितले साहजिकच त्याच्या अनुयायानी संपूर्ण आशियाभर त्याचा धम्मं नेला जर बुद्ध धम्म प्रमाण मानायचा ठरवला तर अलीकडच्या काही संशोधनानुसार कदाचित युरोपमध्येही हा धम्म पोहोचला असावा एक गोष्ट नक्की आहे की हा धर्म एकेकाळी आशियातील तब्बल 70 टक्के लोकांचा धर्म होता प्रश्न असा आहे की तो असा का राहिला नाही आज जगभर बौद्ध धम्म पाळणाऱ्या लोकांची संख्या घटलेली आहे एकेकाळी आशियातील 70 टक्के लोकांचा असलेला हा धम्म आता आशियातही केवळ वीस ते तीस टक्के लोकांचा झाला आहे आपल्याकडे एक अशी समजूत आहे की आद्य शंकराचार्याने बौद्ध धर्म पळवून लावला प्रश्न असा येतो की असे होते तर आज चायना मध्ये हा धर्म का घटत आहे किंवा अफगाणिस्तानामध...
- Get link
- X
- Other Apps
भगवान शंकर : मोक्षकही आणि शासकही श्रीधर तिळवे नाईक श्रद्धेचे युग निर्माण झाल्यानंतर भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या आदिवासी जमातींच्या मध्ये अनेक श्रद्धा निर्माण झाल्या आणि त्या श्रद्धांच्या आधारे टोळ्या जाऊन जमाती निर्माण झाल्या भारतामध्ये साधारणपणे या श्रद्धांच्यामधून वाटचाल करत आणि नंतर त्यांच्या जनजालातून जंजालातून बाहेर पडत भगवान शंकर मोक्षाला पोहोचले ते पहिले मोक्षक होते पण ते तिथे थांबले नाहीत त्यांनी मोक्ष प्रचार सुरू केला वेगवेगळ्या आदिवासी जमातींना भेट द्यायला सुरुवात केली यातूनच अनेक जण प्रभावित झाले पण काही असेही होते ज्यांच्याबरोबर त्यांना युद्ध करावे लागले उदा जालंदर आणि त्यामुळेच त्यांना शासकही बनावे लागले जगाच्या इतिहासात ते एकमेव त्या काळात असे होते जे मोक्षकही होते आणि शासकही होते पुढे सुद्धा जेव्हा ते निवृत्तीकडे गेले तेव्हा विनायकाची गणपती म्हणून नियुक्ती झाली आणि तो सुद्धा प्रथम मोक्षक होता आणि ज्ञानतंत्राच्या साह्याने विनायकाला मोक्ष मिळाला होता आणि त्यानंतरच गणपती हे पद मिळालेले आहे किंबहुना तो महागणपती होता सगळ्या गणपतींचा गणपती ! यामुळेच भारत एका...
- Get link
- X
- Other Apps
कॉकरोच आणि अप्रोच श्रीधर तिळवे नाईक कॉकरोच जनता पार्टी स्थापन झाल्यापासून अनेक वेगवेगळी मते आलेली दिसतात यातच अलीकडे काही लोक पुन्हा एकदा शंका घ्यायला लागलेले आहेत ही शंका म्हणजे ही पार्टी भाजपची बी पार्टी आहे यासाठी कारण दिले जात आहे ते अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनाचे! त्यावेळेला अण्णांच्या आंदोलनाचे मूल्यमापन करताना मी सांगितले होते की मुळातच जयप्रकाश नारायण यांनी जे केले ते सर्व गांधिवादासारखे आहे म्हणजे असे की गांधींनी आंदोलन उभे केले पण पंतप्रधान झाले नाहीत आणि हा जो संत अप्रोच आहे हा फार भंपक आहे एक तर तुम्ही पूर्णपणे राजकारणात आले पाहिजे किंवा मग यायचेच नाही पण गांधींनी हे केले कारण त्याला ऋषी परंपरा जबाबदार आहे असे ते म्हणत म्हणजे ऋषी लोकांनी मार्गदर्शन करावे पण राजकारणात भाग घेऊ नये राजा नेमावा व त्याच्यावर सर्व काही सोपवून आपण नैतिक अंकुश ठेवावा आता ही वर्णव्यवस्थेमुळे आलेली थिंकिंग आहे हे सुद्धा गांधी यांना कळले नाही त्याचा परिणाम व्हायचा तो झाला माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की गांधी जर का पंतप्रधान झाले असते तर त्यांच्यावर हल्ला करण्याची गोडसे यांची हिम्म...
- Get link
- X
- Other Apps
माझ्या समिक्षालेखनाच्या अटी श्रीधर तिळवे नाईक कुठलाही कलावंत हा रसिकांचा भुकेला असतो त्यांची दाद मिळणे हे त्याला जगण्यासाठी कलेसाठी अत्यंत आवश्यक वाटते हे अत्यंत नैसर्गिक आहे त्यामुळे मला त्यात काही वावगं वाटत नाही प्रश्न तेव्हा येतो जेव्हा दबाव आणला जातो मी दबाव घेत नाही मी दाद देतो आणि अर्थातच दाद देण्याची जी अट असते ती मी पूर्ण झाली तरच दाद देतो ही अट काय आहे सर्वात पहिली अट ती कलाकृती मला आवडली पाहिजे मला सर्वसाधारणपणे त्याच कलाकृती आवडतात ज्या चौथ्या नवतेशी संबंधित असतात कोणाला माझी ही मर्यादा वाटू शकते पण जो नवता मांडतो त्याला त्या नवते विषयी जिव्हाळा वाटत असतो म्हणूनच तर तो नवता मांडत असतो जर मला चौथ्या नवते विषयी जिव्हाळा नसता तर मी कशाला ती मांडली असती? कुठल्याही नवताकाराला केवळ गंमत म्हणून कधीच नवता मांडायची नसते त्याचे त्या आशयाशी इमोशनल बॉण्डिंग असते त्यामुळे अनेक लोक निराश होतात पण माझा नाईलाज आहे किंवा मग आधीच्या नवतेतील असतील तर किमान त्यात ताजेपणा मला आवश्यक वाटतो निकडीचा वाटतो दुसरी गोष्ट जर एखादी कलाकृती चौथ्या नवतेला पुढे घेऊन जात असेल किंवा एखाद्या नवतेत काही...
- Get link
- X
- Other Apps
हिंदूंचे मुख्य देव किती? श्रीधर तिळवे नाईक सर्वसाधारणपणे हिंदू धर्माची मांडणी करताना अलीकडे हिंदूंचे मुख्य देव हे तीन आहेत असे सांगितले जाते . हे तीन देव म्हणजे ब्रम्हा विष्णू महेश ! यातील जो ब्रह्मा आहे तो निर्माण करत आहे विष्णू आहे तो सांभाळत आहे आणि महेश आहे तो विनाश करत आहे . सर्वश्रुतीमध्ये श्रेय व स्मृतीमध्ये शैव श्रुतीमध्ये या तिन्हींची जबाबदारी शिवावर आहे आणि त्याच्यासोबत अर्थातच निर्माण करताना सांभाळताना विनाश करताना शक्ती आहे या ज्या तीन मुख्य जबाबदारी आहे त्यांचा संबंध थेट शैव अक्षांशी आहे पण अनेकदा त्याबद्दल साधी चर्चा सुद्धा होत नाही याचे कारण मला जे माझ्या शिव तत्वावर ही जबाबदारी टाकण्यात आलेली होती तेव्हा त्यामागे काय तर्क होतात याचा विचार करण्याची जबाबदारी हिंदूंच्यावर नाही पण आपल्याला मात्र तिचा विचार करावा लागेल मी हे अनेकदा सांगितलेले आहे की शैव श्रुतीमध्ये तीन अक्ष आहेत आणि या श्रुती मधून निर्माण झालेल्या सर्व धर्मांच्या मध्ये हे तीन अक्षर कॉमन आहेत हे तीन अक्ष म्हणजे काम अर्थ आणि मोक्ष या अक्षांच्या मध्ये धर्म ही गोष्ट नंतर आलेली आहे साधारण ...