भगवान शंकर : मोक्षकही आणि शासकही श्रीधर तिळवे नाईक 


श्रद्धेचे युग निर्माण झाल्यानंतर भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या आदिवासी जमातींच्या मध्ये अनेक श्रद्धा निर्माण झाल्या आणि त्या श्रद्धांच्या आधारे टोळ्या जाऊन जमाती निर्माण झाल्या भारतामध्ये साधारणपणे या श्रद्धांच्यामधून वाटचाल करत आणि नंतर त्यांच्या जनजालातून जंजालातून बाहेर पडत भगवान शंकर मोक्षाला पोहोचले ते पहिले मोक्षक होते पण ते तिथे थांबले नाहीत त्यांनी मोक्ष प्रचार सुरू केला वेगवेगळ्या आदिवासी जमातींना भेट द्यायला सुरुवात केली यातूनच अनेक जण प्रभावित झाले पण काही असेही होते ज्यांच्याबरोबर त्यांना युद्ध करावे लागले उदा जालंदर आणि त्यामुळेच त्यांना शासकही बनावे लागले 


जगाच्या इतिहासात ते एकमेव त्या काळात असे होते जे मोक्षकही होते आणि शासकही होते पुढे सुद्धा जेव्हा ते निवृत्तीकडे गेले तेव्हा विनायकाची गणपती म्हणून नियुक्ती झाली आणि तो सुद्धा प्रथम मोक्षक होता आणि ज्ञानतंत्राच्या साह्याने विनायकाला मोक्ष मिळाला होता आणि त्यानंतरच गणपती हे पद मिळालेले आहे किंबहुना तो महागणपती होता सगळ्या गणपतींचा गणपती ! यामुळेच भारत एका संपूर्ण मोक्ष संस्कृतीमध्ये बांधला गेला आणि भारताची आजची जी ओळख आहे ती हीच आहे की मोक्ष संस्कृती जन्माला घालणारा देश ! 


यामुळेच नंतर मोक्षक आणि शासक हे एकत्र आले आणि कळत नकळत जो शासक आहे तो तेव्हा शासक होऊ शकेल जेव्हा तो मोक्ष प्राप्त करत असेल. मोक्ष प्राप्त न करणाऱ्या माणसाच्या ताब्यामध्ये शासन संस्था दिली जात नव्हती .


हे आधीच्या सर्व श्रद्धांना छेद देणारे होते कारण श्रद्धांच्या काळामध्ये मांत्रिकी केंद्रस्थानी होती आणि मांत्रिक वेगळा आणि राजा वेगळा असे समीकरण होते अर्थात याला सुद्धा अपवाद होते काही संस्कृतीमध्ये आपणाला असे दिसते की जो मांत्रिक आहे तोच शासकही आहे . उदाहरणार्थ आफ्रिकेमधल्या काही संस्कृतीमध्ये जो राजा होता तोच मांत्रिक होता . काही ठिकाणी मात्र उदाहरणार्थ ग्रीक संस्कृतीमध्ये मांत्रिक किंवा द्रष्टा हा वेगळा आणि राजा वेगळा होता त्यामुळेच किंग ईडीपस मध्ये आपणाला ईडीपस राजा आहे तर त्याचा जो seer आहे तो वेगळा आहे 


भारतामध्ये जेव्हा वैदिक श्रद्धा आली तेव्हा नेमकी काय स्थिती होती तर ऋषि हे मांत्रिक होते तर विश् पती इंद्र हा राजा होता किंवा जो राजा होता त्याला इंद्र मानले जात असे आणि इथे मांत्रिक आणि राजा या दोन भिन्न गोष्टी मानल्या जात होत्या म्हणजेच एका अर्थाने जी श्रद्धेची परंपरा होती ती इथे चालवली जात होती पुढे मग ब्राह्मण लोकांनी पूर्ण पणे मांत्रिक पुरोहित वर्ग वेगळा काढला इतकेच नव्हे तर तो राजाच्या सुद्धा वर ठेवला त्यामुळेच ब्राह्मण विरोधी क्षत्रिय निर्माण झाले आणि त्यातूनच पुढे ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय असा संघर्ष निर्माण झाला आणि या संघर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसे उपनयनविधी महत्त्वाचा ठरत गेला . अर्थात हे सर्व फक्त वैदिक संस्कृतीमध्ये घडत होते हे आपण लक्षात घ्यायला हवे त्याचा प्रत्यक्ष इथे असलेल्या बहुजनांच्या शैव संस्कृतीशी काडीचा सुद्धा संबंध नव्हता बाबासाहेब आंबेडकर कधीही अनार्य लोकांच्या संस्कृतीचा विचार करत नाहीत ही त्यांच्या विचाराची गंभीर मर्यादा आहे. गौतम बुद्धाचा सिद्धांत स्वीकारत आर्य म्हणजे सभ्य आणि अनार्य म्हणजे असभ्य अशी व्याख्या करत युरेशियन बौद्धवादी होतात पण प्रत्यक्षात भारताचा इतिहास हा गौतम बुद्धाच्या खूप पलीकडे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा फारसा विचारच केलेला नव्हता हे स्पष्ट दिसते त्यामुळे ब्रिटिश लोकांनी शिकवलेल्या इतिहासाच्या चौकटीमध्ये त्यांची इतिहासाची मांडणी फिरत राहते जी इतिहास वैदिक काळापासून सुरू करते याचा परिणाम असा होतो की शैव संस्कृती बाबतीतले त्यांचे आकलन अर्धवट राहते ते भगवान शंकर ही अनार्य देवता आहे हे मान्य करतात पण त्यामागे काय असू शकते याचा शोध ते घेत नाहीत ते कळत नकळत येथे रुद्र चौकटीत सापडतात . म्हणजेच एका अर्थाने वैदिक लोकांनी फेकलेल्या वैचारिक जालामध्ये ते फसतात . तेच नाही बहुतेक आंबेडकरवादी लोकांची ही शोकांतिका आहे .


ही जी वैदिक परंपरा आहे तीच वैदिक परंपरा पुढे गौतम बुद्ध सुद्धा गिरवतो आणि धम्म वेगळा आणि शासन संस्था वेगळी असे काहीतरी करतो त्यामुळे त्याच्या समकालीन असलेल्या राजाच्या राज्यकारभारामध्ये तो नैतिकता आणण्याचा प्रयत्न करतो तसा उपदेश करतो परंतु कसल्याही प्रकारची सक्ती करत नाही. साहजिकच गौतम बुद्धाचे म्हणणे अनेक शासक आताच्या राजकारणी लोकांच्या प्रमाणे ऐकतात आणि सोडून देतात ते त्याचा समोर आदर करतात पण प्रत्यक्षात त्यांच्या कृतीमध्ये मात्र फरक पडलेला दिसत नाही त्याचा अंतिम परिणाम असा होतो की खुद्द गौतम बुद्धाचा शाक्य गण सुद्धा शाबूत राहत नाही एक राजा अजातशत्रू पूर्णपणे या शाक्य गणाला पराभूत करून या गणाची जवळजवळ 70% लोकसंख्या मारून टाकतो इथे शासक म्हणून जी जबाबदारी गौतम बुद्धावर एकेकाळी होती तिचा मागमुस सुद्धा दिसत नाही. कळत नकळत इथे बुद्ध फक्त मोक्षक आहे तो शासक होत नाही .


प्रश्न असा आहे की मोक्षक आणि शासक एक असावा का ? माझ्या मते "हो" याचे कारण असे की त्यामुळे संपूर्ण शासन संस्थेला एक नैतिक व्यवस्था लाभते अनुशासन लाभते आणि नैतिक वाटचाल अतिशय दीर्घ आणि चांगली होते आपणाला सिंधू संस्कृतीमध्ये फारशी युद्ध झालेली आढळत नाहीत याचे कारण जे शासक होते त्यांना मोक्षक व्हायचे होते आणि त्याचा परिणाम झालेला दिसतो . युद्ध करण्यापेक्षा मोक्ष मिळवणे हे जास्त महत्त्वाचे वाटलेले दिसते. अहिंसा ही कळत नकळत धोरण बनलेली दिसते यामुळेच भरभराट पण झालेली दिसते दुर्दैवाने निसर्गाने हे सर्व काही पराभूत केले . आणि या संस्कृतीला निसर्गाने उत्तर भारतामधल्या जंगलामध्ये आणि दक्षिण दिशेला दक्षिण भारतात पाठवून दिले 


आपण जर का भारताचा इतिहास पाहिला तर ज्या शासकाला मोक्ष हवा झाला तो कळत नकळत वेगळा झाला . आपण अनेकदा सम्राट अशोक किंवा सम्राट अकबर यांची उदाहरण घेत असतो प्रत्यक्षामध्ये हे दोघेही अत्यंत हिंसक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि अत्यंत कटकारस्थान करणारे लोक होते पण आयुष्याच्या शेवटी शेवटी या लोकांना अचानक कळले की या जगाच्या पलीकडे काहीतरी असे आहे जे फार महत्त्वाचे आहे अशोकाने याचा शोध बुद्ध धर्मामार्फत घेतला तर सम्राट अकबराने स्वतःचाच धर्म स्थापन केला . हर्षवर्धन सुद्धा मोक्षाचा साधक होता आणि शिवाजी महाराज स्वतःला उपभोग शून्य स्वामी बनवायलाच तयार करत होते . जोपर्यंत भारतातले शासक मोक्षाला धरून असतात निर्वाणाला धरून असतात तोपर्यंतच ते नीट असतात अन्यथा ते सैतान बनत जातात 


त्यामुळेच भारतामध्ये वारंवार मोक्ष केंद्रस्थानी आणावा लागतो तसा तो आला नाही की राज्यकर्ते अत्यंत वाईट पद्धतीने घोळ घालत बसतात शोषण करत बसतात . नैतिकतेची कसलीही चाड त्यांना उरत नाही.


मी मोक्षाचा आग्रह त्यासाठीच धरतो भारताला धर्माची नाही तर मोक्षाची गरज आहे पण दुर्दैवाने धर्म कायमच मोक्ष कसा संपवता येईल ते पाहत असतो किंबहुना भारतामध्ये धर्म हा शोषक लोकांचा धंदा आहे आणि हा धंदा करताना शोषक जणू काय मोक्षाचा कैवारी आहे असा आव आणत असतो प्रत्यक्षामध्ये मूळ उद्योग मोक्ष संपवणे हाच असतो पंचशील द्वादशीशील संपवणे हाच असतो. बहुतेक शासकांना बेबंध अनैतिक आचरण करायचे असते आणि हे सर्व करताना आम्ही काहीतरी धर्माचे काम करतो असेही दाखवायचे असते . किंबहुना ब्राह्मण धर्म सर्व प्रकारचा नालायकपणा धर्माच्या नावाखाली खपवत असतो . त्यासाठी अनेक दंतकथा आणि भाकडकथा तयार करतो . अशावेळी जनतेला नास्तिक बनवून काहीतरी प्रतिकार करण्याचा उद्योग विरोधी पक्ष करत असतो पण तो यशस्वी होत नाही कारण या देशाच्या मातीतच कळत नकळत मोक्ष मिसळलेला आहे . जेव्हा मोक्ष मिळत नाही तेव्हा धर्म मिसळला जातो . त्यामुळेच जनतेपुढे धर्माला शह देणारा मोक्ष हा पर्याय आपण सातत्याने दिला तरच काही पॉझिटिव्ह परिवर्तन होऊ शकते. धर्म नेहमीच वेगवेगळी धर्म कांडे मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करायला पाहतो जेणेकरून लोकांना मोक्षाचा विसर पडावा आणि त्यांनी नैतिक प्रश्न राजकीय संस्थेला विचारू नयेत . याबाबतीत जनतेला सावध करणे खूप गरजेचे असते आणि म्हणूनच जनतेला हे सतत सांगावे लागते की धर्म वेगळा आणि मोक्ष वेगळा आहे.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय