कॉकरोच आणि अप्रोच श्रीधर तिळवे नाईक 

कॉकरोच जनता पार्टी स्थापन झाल्यापासून अनेक वेगवेगळी मते आलेली दिसतात यातच अलीकडे काही लोक पुन्हा एकदा शंका घ्यायला लागलेले आहेत ही शंका म्हणजे ही पार्टी भाजपची बी पार्टी आहे यासाठी कारण दिले जात आहे ते अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनाचे!

त्यावेळेला अण्णांच्या आंदोलनाचे मूल्यमापन करताना मी सांगितले होते की मुळातच जयप्रकाश नारायण यांनी जे केले ते सर्व गांधिवादासारखे आहे म्हणजे असे की गांधींनी आंदोलन उभे केले पण पंतप्रधान झाले नाहीत आणि हा जो संत अप्रोच आहे हा फार भंपक आहे एक तर तुम्ही पूर्णपणे राजकारणात आले पाहिजे किंवा मग यायचेच नाही पण गांधींनी हे केले कारण त्याला ऋषी परंपरा जबाबदार आहे असे ते म्हणत म्हणजे ऋषी लोकांनी मार्गदर्शन करावे पण राजकारणात भाग घेऊ नये राजा नेमावा व त्याच्यावर सर्व काही सोपवून आपण नैतिक अंकुश ठेवावा आता ही वर्णव्यवस्थेमुळे आलेली थिंकिंग आहे हे सुद्धा गांधी यांना कळले नाही त्याचा परिणाम व्हायचा तो झाला माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की गांधी जर का पंतप्रधान झाले असते तर त्यांच्यावर हल्ला करण्याची गोडसे यांची हिम्मत झाली नसती . निदान या पंतप्रधानपदामुळे त्यांचे प्राण नक्की वाचले असते . असो. नैतिकतेची नशा ही सर्वोच्च असते .

जयप्रकाश नारायण यांनी हाच गांधीवादी धडा आणीबाणी विरोधातील आंदोलनात गिरवला . आणि आंदोलनाचे मूल्यमापन करताना माझे म्हणणे हेच होते की या दोघांनी जे केले ते हजारे करू शकतात आणि पुढे अण्णा हजारे यांनी सुद्धा नेमके हेच केले . त्यांनी तर त्या आंदोलनात असलेल्या नेत्यांनी स्थापन केलेल्या आम पार्टीलाही विरोध केला हा मूर्खपणा होता यामध्ये आपले कापड स्वच्छ ठेवण्याचा उद्योग दिसतो पण अशा स्वच्छ कापडाचा उपयोगच काय जे घालायलाच मिळणार नाही .

प्रश्न असा आहे की हा जो घोळ गांधीवादी विचारसरणीतून झालेला आहे त्याला जनसंघाची बी टीम म्हणायला केव्हापासून सुरू झाले ? वास्तविक ही जनतेची उत्स्फूर्त आंदोलने होती आणि ज्यांनी ती घडवली त्यांचे हेतू प्रामाणिक होते. दुर्दैवाने ती ज्या पार्टी विरोधात होती ती काँग्रेस होती आणि त्यामुळेच या आंदोलनाचा काँग्रेस ला खूपच तोटा झाला . यातली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे गांधी पुढे काँग्रेस विरोधात आंदोलन करायला जिवंत राहिले नाहीत जयप्रकाश नारायण जनता पक्ष विरोधात आंदोलन करण्याच्या आधीच बेबस झाले पण अण्णा हजारे यांना संधी होते आणि अण्णा हजारे यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात आंदोलन केले नाही त्यांनी जर का भाजप विरोधात पण तेवढेच मोठे आंदोलन सुरू केले असते सुरू ठेवले असते तर कदाचित बी टीमचा शिक्का बसलाच नसता त्यातूनच मग अण्णा हजारे ही किंवा आप ही भाजपची बी टीम आहे असा सिद्धांत उदयाला आला . वास्तविक झाले असे की अण्णा थकले . शिवाय त्यांच्याबरोबर असणारे सर्व लोक इतके पॉलिटिकल झाले की त्यांनी पार्टी स्थापन केली आणि काहीजण चक्क भाजपाला जॉईन झाले अण्णांना हे अपेक्षित नव्हते अर्थातच हा अण्णा हजारे यांचा वैचारिक भोळसटपणा होता आपली माणसे इतकी सत्तावादी निघतील याची अण्णांना कल्पना आली नाही . पण यात अण्णांचाही दोष होता जर का त्यांनी स्वतःच आप पार्टीला आशीर्वाद दिले असते तर सर्वजण पार्टीमध्ये थांबले असते आणि एक चांगला पर्याय उभा राहिला असता पण हे झाले नाही आणि नेमके तेच झाले जेव्हा चांगला पर्याय नसतो .

जेव्हा चांगला पर्याय निर्माण होत नाही तेव्हा मग वाईट पर्याय पुढे येतो . काँग्रेस नको तर मग काय हवे हा प्रश्न या काळामध्ये निर्माण झाला आणि या प्रश्नाचे उत्तर पद्धतशीरपणे फार मोठी प्रचार यंत्रणा राबवत भाजपने दिले. भारतीय जनता पक्ष हा त्या काळामध्ये सर्वांना विशेषता समाजवादी लोकांना वाईट पर्याय वाटत होता तरीही त्याचा पुरेपूर फायदा भाजपाला मिळाला आणि त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा उचललाही . 

कॉकरोच जनता पक्ष हा असा गांधीवादी पक्ष आहे का ? जर का तो गांधीवादी पद्धतीने गेला तर मग काय होणार ? सर्वात पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आंदोलन सुरू होण्याआधीच इथे नावच कॉकरोच जनता पार्टी हे पार्टी युक्त आलेले आहे म्हणजे गांधीवादी जी जबाबदारी टाळत होते ती तर या लोकांनी सुरुवातीपासूनच घेतलेली दिसते आता खरोखरच हे लोक पार्टी निर्माण करणार की नाही हा खरा प्रश्न आहे कारण मग अण्णा हजारेंच्या सारखे हे आणखी एक आंदोलन असेच जर काही याचे स्वरूप असेल तर त्यातून कॉंक्रीट काहीही निर्माण होणे शक्य नाही . काही काळापुरते भाजपवर दडपण येईल आणि यातले काही चांगले नेते भाजप स्वतःच्या पक्षासाठी निवडेल किंबहुना अमित शहा हाच विचार करत असतील . तसेही काँग्रेस मधले चांगले नेते घेऊन घेऊन भाजप कंटाळलेली आहे त्यापेक्षा या पार्टी मधून येणारे तरुण नेतृत्व हे भाजपाला कधीही परवडणारे आहे त्यामुळे काही झाले नाही तरी भाजपला या पार्टीतून काही चांगले नेते मिळून जातील.

आणि जर का या लोकांनी खरोखरच पार्टी उभी केली तर मात्र ते फार मोठे आव्हान असेल याबाबतीत पहिला मूर्खपणा आम आदमी पक्षाने दाखवलेलाच आहे वास्तविक त्यापेक्षा या पक्षाबरोबर कसे कोलाब्रेशन करता येईल ते पाहायला हवे . पण ते न करता विरोध केलेला आहे याला आगाऊपणा म्हणतात आणि आडवांस मूर्खपणा ! कदाचित ही पार्टी आप पक्षाची रिकामी झालेली जागा खाईल असे भय निर्माण झालेले असावे . कदाचित उद्या काँग्रेसलाही असेच भय वाटेल त्यामुळे हा पक्ष म्हणजे भाजपची बी टीम आहे हा आरोपही वारंवार विरोधकांच्याकडून येण्याची शक्यता आहे अर्थात त्याचा अंतिम फायदा भाजपलाच मिळणार . आपण काय करतो आहोत ते बहुतेकदा विरोधकांना लक्षात येत नाही आणि माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की विरोधक नेहमीच भाजपला मदत करत असतात. या उदाहरणात असे घडले तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे जी पार्टी भाजपची बी टीम नाही ती आपोआपच विरोधकांच्या या असल्या उद्योगामुळे भाजपाला काही जागा काही स्पेस मिळवत नवे नेतृत्व मिळवून देणारी ठरेल.

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय