लग्नाचे खरे सात फेरे काय आहेत
शैव लोकांच्यातील सात फेरे श्रीधर तिळवे नाईक
खूप लोक विचारतात की सात फेरे ही संकल्पना कोणाची? तर ती शैव लोकांचीच आहे फक्त वैदिक लोकांनी ती उलटी केली ज्याला आज आपण सुलट समजतो म्हणजे जी क्लॉकवाईज आहे ती प्रत्यक्षात शैव लोकांच्या दृष्टीने त्यांची सुलट सिस्टीम वैदिक लोकांनी उलट केलेली आहे याचे कारण काय आहे हा एक फार मोठा प्रश्न नेहमी विचारला जातो
मुळात शैव लोकांच्या ती अँटी क्लॉकवाईज का आहे ते पाहिले पाहिजे शैव लोकांच्यातला सातवा फेरा प्रथम सुरू होतो आणि मग हळूहळू पती-पत्नी सहावा पाचवा चौथा तिसरा दुसरा आणि पहिला असा क्रम पाळत सात फेरे पुरे करतात आणि पहिल्या फेऱ्याला सात फेरे कम्प्लीट होतात त्याचा अर्थ आहे तुमच्यातली अंतर संपले आणि तुम्ही आता एक झालात द्वैत सुद्धा उरले नाही कारण दुसऱ्या फेऱ्यांमध्ये दोन म्हणजे शिवशक्ती युग्म सुद्धा संपते उरतो तो फक्त एक अभेद! हा अर्थ न समजल्याने वैदिक लोकांना फक्त एवढेच माहिती होते की आपल्याला फेरे व्यवस्था हवी आहे पण ते आपल्या पद्धतीने आले पाहिजे. तुम्ही जर का इतर जगभर पसरलेल्या युरेशियन लोकांच्यात गेला तर तुम्हाला हे सात फेरे दिसणार नाहीत म्हणजे रोमन लोकांच्यात तुम्हाला साथ फेरे दिसणार नाही ते फक्त भारतात दिसतात कारण ती पद्धतच मुळात इंडियन शैव लोकांची आहे आज सुद्धा काही आदिवासी लोकांच्या मध्ये हे अँटी क्लॉकवाईज फेरे असतात
दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ब्राह्मण लोकांनी जेव्हापासून सगळे उलट फेर चालू केले आणि सिस्टीम तर स्वीकारायची पण तिला आपला टच द्यायचा असे धोरण स्वीकारले तेव्हा त्या धोरणाच्या नादामध्ये मूळ अर्थ काय आहे हे सुद्धा समजून घ्यायचा नाही असला काहीतरी विचित्र उद्योग सुरू केला. आज अवस्था अशी आहे कि ती सिस्टीम क्लॉकवाईज वाटल्याने अनेकांना तीच योग्य वाटते पण त्यामुळे अर्थ बदलतो म्हणजे होते असे की पहिल्या फेऱ्यातील अभेदातून तुम्ही सातव्या फेऱ्यातील पूर्ण भेदाकडे जाता जी पूर्ण पणे पूर्णभेद अवस्था आहे . अति शहाणा त्याचा बैल रिकामा तसा हा प्रकार होतो
संसार हा क्लॉकवाईज पहिला वर चाललेला आहे पण प्रत्यक्षात स्त्री-पुरुष एकत्र येतात तेव्हा त्यांनी एकमेकापासून दूर जायचे नसते तर एक व्हायचे असते फैलाव जितका अधिक तितके तुमच्या मधले अंतर जास्त !
अर्थात हे कळून सुद्धा आपली मॅरेज सिस्टीम बदलेल असे नाहीकारण बहुजन लोक ब्राह्मण वादाने आंधळे झालेले आहेत त्यांना आता आपली मूळ पद्धत आणि संस्कृती काय होती ते सुद्धा आठवत नाही एक प्रकारचा मोठा स्मृती भ्रंश आहे हा ! पण निदान जे शंकर पार्वतीला मानतात त्यांनी तरी ही सिस्टीम काय आहे हे एकदा नीट समजून घ्यावे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment