वर्तमानात या श्रीधर तिळवे नाईक
जे शिक्षण वर्तमानाला हाताळू शकत नाही हाताळायला शिकवत नाही ते कालबाह्य असते शिक्षणाचे केंद्र नेहमीच वर्तमान असायला हवे पण दुर्दैवाने आपल्याकडे अनेकदा शिक्षणाचे केंद्र इतिहास असतो हा इतिहास सुद्धा राजकीयच असतो ज्याचा प्रत्यक्ष वर्तमान हाताळताना काडीचाही फायदा होत नाही उदाहरणार्थ एखादा मनुष्य वैद्यकीय शिक्षण घेत असेल तर त्याला त्या राजकीय इतिहासाचा काय फायदा ? कुठल्या राजाने आणि महाराजांनी काय केले या गोष्टीचा तो जो ऑपरेशन करत आहे त्या ऑपरेशनशी काय संबंध ?p नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्ही जे वर्तमानात करायला निघालेले आहात अगदी एक्टिंग सुद्धा करायला निघालेला आहात तर त्या अॅक्टींगला तुमच्या या तथाकथीत इतिहासाचा कितपत फायदा असणार आहे भूतकाळाचा फायदा असणार आहे ? शेवटी याबाबतीत त्याला आत्तापर्यंत कोण कोणती ऑपरेशन शोधली गेली कोण कोणते मेडिकल सायन्सेस कसे कसे डेव्हलप होत गेले कशा प्रकारच्या औषधी योजना नव्या शोधल्या गेल्या याचा इतिहास शिकवणे हेच शेवटी गरजेचे बनते म्हणजे संपूर्ण मेडिकल इतिहास हाच त्याच्या कामाचा असतो पण हा इथे आज पार्श्वभूमीवर असतो आणि नंतर त्या पार्श्वभूमीवर वर्तमानात त्याच्यापुढे जो पेशंट असतो तो त्याला हाताळता येणे फार आवश्यक असते उद्या जर का कोणी म्हणाले की तुम्ही सुशृताप्रमाणे शस्त्रक्रिया करा तर कदाचित त्याला सुश्रुत माहीत पण नसेल पण त्याला ऑपरेशन कसे करायचे हे माहीत असेल तर ऑपरेशन कसे करायचे हे माहीत असणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
आपल्याकडे इतिहास म्हणजे फक्त राजकीय इतिहास किंवा धार्मिक इतिहास अशी जी समजूत हल्ली करून देण्यात येत आहे त्यामुळे वर्तमान कसा हाताळायचा हेच अनेकांना कळत नाही . माझे नवीन पिढीला सांगणे आहे की सर्वात प्रथम वर्तमानावर फोकस करा नंतर मग भविष्यकाळात! आयुष्यात तुम्हाला काय हवे त्याचा मॅप तयार करा आणि मग या दोन्हींच्या मध्ये जे अंतर आहे ते अंतर का निर्माण झाले आहे त्याची कारणे तपासा उपाय तपासा आणि योग्य उपाय सापडल्यानंतर कृती करा जगण्याची खरी शैली हीच असते इतिहास ही जगण्याची शैली असू शकत नाही कारण जीवन कधीच इतिहासात असत नाही जीवन हे नेहमीच वर्तमानात उपस्थित असते तुम्ही जे काय जेवत असता ते वर्तमानात जेवत असता तुम्ही संडासला जात असाल तर तुम्ही संडास वर्तमानत करत असता तुम्ही कपडे घालतात ते वर्तमानातले कपडे घालतात भूतकाळातले नाही तुम्ही ज्या घरात राहता ते घर वर्तमानात उपस्थित असते भूतकाळात नाही तुम्ही जो काही सेक्स करत असता तो वर्तमानात करत असता आणि वर्तमानात जी व्यक्ति तुमच्यासमोर असते तिलाच तुम्हाला हाताळावे लागते . तेव्हा सर्वात प्रथम वर्तमानात यायला शिका अन्यथा जीवन जगणे अशक्य होईल .
आपल्या वर्तमानातल्या राजकीय समस्या नेमक्या काय आहेत हे आत्ताच्या राजकीय लोकांनी बघायला हवे धर्माने काय सांगितले आणि इतिहासात काय घडले या गोष्टींचा आपणाला काडीचाही फायदा नाही . शिवाजी महाराजांच्या पुढे ज्या समस्या होत्या त्या आपल्यापुढे नाही नाहीत समजा आत्ताच्या मुस्लिम समाजाबद्दल किंवा हिंदू समाजाबद्दल किंवा बौद्ध समाजाबद्दल तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम नेमके काय आहेत ते तुम्हाला नीट कळले पाहिजे आणि समजा हा समाज एका पुस्तकात अडकला असेल तर तो तसा पुस्तकात का अडकला याची चिकित्सा करत त्याला पुस्तकाच्या बाहेर यायला शिकवायला हवे त्याला हे सांगायला हवे की जगणे हे एका पुस्तकापेक्षा खूप मोठे असते विशाल असते . कुठल्यातरी अस्तित्वात नसलेल्या स्वर्गासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला हे सांगायला हवे की बाबा रे तुझ्या स्वर्गाचे कसलेही पुरावे या वर्तमानात मला दिसत नाहीत तेव्हा उगाच कुणीतरी लिहिलेल्या काल्पनिक गोष्टींच्या वर विश्वास ठेवू नकोस तू स्वतः तुला असा काही अनुभव येतो का ते पहा आणि हा अनुभव तुला या वर्तमानात घ्यावा लागेल . अगदी ईश्वर ही सुद्धा एक वर्तमानकालीन उपस्थिती असते ईश्वराला भूतकाळ नसतो आणि ईश्वराला भविष्यकाळ ही नसतो त्यामुळे वर्तमानात रहा . आपल्या पूर्वजांना अक्कल होती हा गैरसमज आहे त्यांना अक्कल होती परंतु त्यांच्याजवळ आपल्याकडे असलेले ज्ञान नव्हते ते काही चंद्रावर पोचले नव्हते त्यामुळे त्यांना चंद्र देवता वाटला तर ते समजण्यासारखे आहे परंतु आपल्याला आता पूर्णपणे हे माहित आहे की चंद्र हा एक पृथ्वीचा उपग्रह आहे कालगणनेसाठी त्याचा वापर करावा पण त्याची पूजा करणे त्याला काहीतरी पवित्र बीवित्र मानणे याला काहीही अर्थ नाही . चंद्राचे वर्तमानातले जे ज्ञान आहे विज्ञान आहे आणि चंद्रावर जाण्याचे जे तंत्रज्ञान आहे तेच आता महत्त्वाचे ठरेल भविष्यकाळात आज ना उद्या चंद्रावर सुद्धा वस्ती करण्यासाठी युद्ध झाली तर आश्चर्य वाटायला नको . तेव्हा चंद्राबाबत काही विचार करणारा असाल तर हाच विचार करा की माझी पुढची पिढी चंद्रावर कशी जाईल किंवा मी कसा चंद्रावर लँड होईन करवा चौथ करून या गोष्टी साध्य होत नाहीत त्यासाठी मुळातच हे भूतकाळात उड्या मारणे बंद केले पाहिजे तुम्ही ज्या रस्त्यावरून आता चालत आहात तो रस्ता जर खड्ड्या खड्ड्यात असेल तर तो वर्तमानात आहे आणि त्याचे खड्डे सुद्धा वर्तमानात आहेत आणि ते तुम्हाला वर्तमानातच नीट करावे लागतील कुठलाही धार्मिक ग्रंथ येऊन तुमचा रस्ता नीट करणार नाही . तेव्हा तुमच्या घरातला एक सुद्धा प्रश्न इतिहास किंवा धर्म सोडवणार नसेल तर त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचे याविषयी सजग राहा . कालबाह्य झालेले ज्ञान हे तुम्ही कितीही वर्तमानकालीन करायचा प्रयत्न करा ते वर्तमानकालीन राहणार नाही आज ना उद्या त्याची जागा कचऱ्याचा डबाच असणार आहे . फक्त कोण ते कालबाह्य झालेले ज्ञान कचऱ्याच्या डब्यात फास्ट टाकतो त्यावर त्याची प्रगती अवलंबून आहे . प्रगती तुम्ही किती ओझे वाहता त्यावर अवलंबून असते आणि हे ओझे नेहमीच भूतकाळाचे असते इतिहासाचे असते धर्मग्रंथांचे असते जो हे ओझे लवकर फेकतो तो जास्त चपळतेने कार्यक्षम होत पुढे निघून जातो .
तेव्हा मित्रांनो काहीही करा पण वर्तमानातच ते करावे लागणार आहे याची जाणीव ठेवा तेव्हा वर्तमानात या . आयुष्य वर्तमान आहे .
श्रीधर तिळवे नाईक
नारळीकर आणि शैव
श्रीधर तिळवे नाईक
जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचे मूल्यमापन सुरू होणे अटळ होते ते महाराष्ट्राचे विज्ञान पुरुष होते याबद्दल कुणाला शंका असू नये किमान वीस वर्षे तरी त्यांच्यासाठी हा किताब लागू होऊ शकतो अर्थात त्यानंतर अनेक वैज्ञानिक महाराष्ट्रात आणि मराठी संस्कृतीत उदयाला आले मात्र मराठी संस्कृतीशी नाळ जुळवून वैज्ञानिक असणारा हा कदाचित पहिला वैज्ञानिक असावा ते आयुष्यभर महाराष्ट्रात आणि भारतभर विज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून कार्यरत होते हे सर्वश्रुत आहे त्याविषयी अनेकांनी लिहिलेले असल्याने मला लिहिण्याची काही गरज नाही
शिवांड व ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या प्रक्रिये संदर्भात माणसाला विलक्षण कुतूहल आहे आणि प्राचीन काळामध्ये अनेकदा श्रद्धा , मोक्ष आणि धर्म या तिन्ही आयामांनी यासंदर्भात अनेक सिद्धांत मांडलेले आहेत यातील बहुतांशी सिद्धांत काल्पनिक असल्याचे सिद्ध झाल्याने आता त्यांना फारसा आदर देता येत नाही म्हणजे जुडाईक धर्मातील सात दिवसात जग तयार झाले हा सिद्धांत आता एकदम बाळबोध वाटतो याबाबतीतली सर्वात समजूतदार मांडणी ही गौतम बुद्धाने केली कारण त्याने आदिचा शोधच घेतला नाही जे आहे ते वर्तमान आहे आणि वर्तमानात दुःख आहे त्या दुःखाचे कारण तृष्णा आहे आणि तृष्णा नाश केला की मोक्ष किंवा कैवल्य किंवा निर्वाण प्राप्ती होते अशी ही मांडणी आहे जिला आदिअंताची गरज नाही
शैवांच्या बाबतीत मात्र असे झालेले नाही त्यांनी या जगाला आदी आणि अंत नाही ते अनादी आणि अनंत आहे अशी स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका घेतली होती साहजिकच जेव्हा बिग बँगचा सिद्धांत आला तेव्हा त्या सिद्धांताला कसे हाताळायचे हा एक फार मोठा प्रश्न सर्व शैव आचार्यांच्या पुढे होता आणि त्याचे एक सोल्युशन नारळीकरांच्या सिद्धांतात आढळले होते
बिग बँग थेअरी ही विश्वाला आरंभ आहे असे मानते एक आरंभाचा विशिष्ट कालखंड ही देते हल्ली आरंभ सतत बदलत असतो ते सोडून द्या ती सांगते की कधी हा महास्फोट झाला व त्यासंदर्भात प्रत्यक्ष गणिती समीकरण मानते आणि त्या अंगाने काही प्रेडिक्शन्स देते ही प्रेडिक्शन्स खरी झाल्याने अनेकदा आजही बिग बँग सिद्धांत अधिक खरा आहे असे अनेकांचे म्हणणे आहे शैव मोक्षाला हे मान्य नाही त्याच्या मते विश्वाला आदि नाही त्यामुळे हा महास्फोट हा अनेकदा होऊन गेलेल्या आधीच्या स्फोटांपैकी एक आहे आणि पुढेही असे महास्फोट होणार आहेत प्रश्न असा आहे की महास्फोट झाल्यानंतर ब्रह्मांड प्रचंड गतीने विस्तार पावत आहे शैव मोक्षाला अनेक विश्वे आहेत हे मान्य आहे आणि ती सुद्धा अनंत आहेत असंख्य आहेत एवढे नक्की आहे शिवांडा मध्ये अनेक ब्रम्हांडे आणि एका ब्रम्हांडात अनेक विश्वे हा मूळ सिद्धांत आहे त्यामुळे जिला आज मल्टी वर्सेस म्हटले जाते ती शैव मोक्षाला मान्यच आहेत साहजिकच जेव्हा जयंत नारळीकर यांनी स्टडी सिद्धांत मांडला तेव्हा मोक्षाला आवश्यक असलेला एक आधार उपलब्ध झाला मात्र हा सिद्धांत वैज्ञानिक कसोटीवर अजूनही सिद्ध झाला असे म्हणता येत नाही मुळातच या मधला स्टेडी हा प्रकार शेव मोक्षाला मान्य नाही शून्य हेच शिव आहे आणि शून्यातून शिवांड निर्माण होत असते आणि नाहीसेही होत असते प्रश्न असा आहे की हे नाहीसे होणे आपणाला कळणार आहे का ? सध्याची परिस्थिती पाहता हे ब्रम्हांड इतक्या वेगाने फैलावत आहे की त्याचा साधा पाठलाग करणे सुद्धा आपणाला शक्य होणार नाही अशी आता शक्यता निर्माण झालेली आहे अशावेळी नेमके निष्कर्ष काय काढायचे ? विज्ञानाला निरीक्षण लागते आणि इथे निरीक्षणाची अशक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळेच ज्ञानाची ही अशक्यता निर्माण झालेली आहे आणि खरा पेच हाच आहे
मग इथे आपण बुद्धाकडे वळावे का ? म्हणजेच आदि आणि अंताचा विचार करण्यापेक्षा आपल्या वर्तमानाचा विचार करणे योग्य नव्हे का? जे विश्व आपल्याला आत्ता ज्ञात होते त्या ज्ञात विश्वाचे काय करायचे हा खरा प्रश्न नाही का ? मुळात आपल्याला जे विश्व दिसते ते जर अब्जावधी वर्षापूर्वीचे असेल तर निरीक्षणे या गोष्टीचा काय अर्थ होतो ? आणि या गोष्टीला काय अर्थ उरतो? आपल्या विश्वा पेक्षा अधिक विश्वे असतीलही पण ती आपणाला दिसणार नसतील तर आपण त्यावर विचार का करावा ? मोक्ष मिळालेल्या माणसाला शून्यत्वाचा आणि अनंतत्वाचा एक समग्र आणि अनंत अनुभव असतो तो शब्दात मांडता येत नाही त्यामुळे मोक्षाकडून या संदर्भात काही मदत मिळण्याची शक्यता नाही हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो मोक्ष मिळालेला माणूस म्हणजे सर्वज्ञ असतो हा एक फार मोठा गैरसमज आहे आणि आपल्याकडे तो पद्धतशीरपणे टिकवणारे भुक्कड लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे ज्या मोक्ष मिळालेल्या लोकांना साधा पाण्याचा एच टू ओ हा फॉर्मुला सुद्धा सापडला नाही त्या मोक्ष मिळालेल्या माणसाला सर्वज्ञ म्हणतात ही खरंतर xमेडी आहे पण ती मोक्ष मिळालेल्या माणसांच्या मुळे निर्माण झालेली नाही तर मोक्ष मिळालेल्या माणसांच्या भोवती जे अति शहाणे आणि अंध भक्त असतात त्यांच्यामुळे झालेली आहे
विश्व स्थिर आहे म्हणजे स्थिरता म्हणजे काय आणि स्थिरतेची नेमकी व्याख्या काय करता येईल हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण लवचिक स्थिरता असे काही आपण गृहीत धरले तर लवचिकता नेमकी किती ताणली जाते असा प्रश्न निर्माण होतोच नारळीकरांच्या मुळे असे अनेक प्रश्न माझ्या आयुष्यात निर्माण झालेले होते. लवचिकतेचा ताण ही एक समजा आपण वैज्ञानिक संकल्पना मांडली तर तिच्याविषयीची अनेक वैज्ञानिक समीकरणे आपणाला शोधावी लागतात दुसरी गोष्ट हा ताण अनंत असू शकतो का असाही प्रश्न निर्माण करता येईल नारळीकर असे अनेक भंजाळून जाणारे प्रश्न निर्माण करतात दुर्दैवाने मराठीत त्याच्यावर जशी चर्चा व्हायला हवी तशी चर्चा झाली नाही ज्या काळामध्ये महास्फोटाचा सिद्धांत स्थिर झाला होता त्या काळात आपल्या स्थिरतेच्या सिद्धांताने नारळीकरांनी तो विचलित करून टाकला ही वस्तुस्थिती ! या सिद्धांताच्या शक्यता अजूनही संपलेल्या नाहीत मात्र त्यामध्ये विश्व आणि अर्थात शिवांड सतत निर्माण होते आणि नाहीसे होते ही भर टाकावी लागेल ती वैज्ञानिक पातळीवर कशी टाकता येईल हा एक फार मोठा प्रश्न आहे मुळातच मानवी प्रज्ञेचा आवाका मर्यादित असल्याचे लक्षात आल्याने आता फार मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत किंबहुना ज्ञानाची मर्यादा अशी एक संकल्पना आता तत्त्वज्ञानामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत जाण्याची शक्यता आहे यासाठी मुळातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हाच असा पर्याय आहे जो आपणाला भविष्यातल्या वैज्ञानिक सिद्धांतांच्या अनेक शक्यता उकलून दाखवू शकतो काही आत्तापर्यंतचे अशक्य वाटणारी पोस्ट पोस्ट क्वांटम उपकरणे जर का तयार होत गेली तर कदाचित प्रकाशापेक्षा अधिक वेगाचे इप्सित साध्य होऊन आपण या संदर्भात काही गोष्टी करू शकतो मात्र अजून तरी या सर्व गोष्टी वैज्ञानिक दंतकथा आहेत त्या प्रत्यक्षात सिद्ध झालेल्या नाहीत जयंत नारळीकर यांच्या बद्दल भाऊक पद्धतीने लिहिणारे ही खूप लोक आहेत परंतु ती पद्धत फारशी आता कामाची उरलेली नाही माणसाचे भावनाशील असणे हेच कदाचित विचारांच्यावर अवलंबून असू शकते इथपर्यंत सर्व काही आलेले आहे किंबहुना तर्कशून्य तीव्र विचार म्हणजे भावना असेही म्हणता येईल त्यामुळे कलेचे अस्तित्व धोक्यात आलेले असल्याने अनेक कलावंत हल्ली खूपच भावनाळु होतात पण त्याने फार काही साध्य होईल असे मला वाटत नाही याचा अर्थ कलेचा व्यवसाय बंद होईल असे नाही कारण शेवटी भावना वाचणे व भावनाळू असणे ही माणसाची आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता कला साध्य करत असते
नारळीकरांच्यावर मी ताबडतोब लिहिणार होतो परंतु त्यांच्यावर काही सुंदर पोस्ट आल्या आणि मी थांबलो माझ्या तरुण वयात मला त्यांच्याबद्दल प्रचंड फॅसिनेशन होते कारण समाज, विज्ञान आणि वैज्ञानिक सिद्धांत यांचा जो समतोल त्यांच्याकडे होता तो महाराष्ट्राच्या एकाही माणसांमध्ये नव्हता 1990 नंतर हळूहळू काही माणसे उदयाला आली परंतु नारळीकर हे या संदर्भातील पहिले विज्ञान पुरुष होते असे म्हणावयास हरकत नाही
त्यांना माझी आदरांजली महाराष्ट्राचा विज्ञान पुरुष निघून गेलेला आहे आता आपण विज्ञानाचे काय करणार आहोत हा खरा प्रश्न आहे बाकी भावनिक उमाळे काढून ज्यांना जागरच करायचा आहे त्यांना काय बोलावे?
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment