हिंदूंचे मुख्य देव किती? श्रीधर तिळवे नाईक 

सर्वसाधारणपणे हिंदू धर्माची मांडणी करताना अलीकडे हिंदूंचे मुख्य देव हे तीन आहेत असे सांगितले जाते . हे तीन देव म्हणजे ब्रम्हा विष्णू महेश ! यातील जो ब्रह्मा आहे तो निर्माण करत आहे विष्णू आहे तो सांभाळत आहे आणि महेश आहे तो विनाश करत आहे . सर्वश्रुतीमध्ये श्रेय व स्मृतीमध्ये शैव श्रुतीमध्ये या तिन्हींची जबाबदारी शिवावर आहे आणि त्याच्यासोबत अर्थातच निर्माण करताना सांभाळताना विनाश करताना शक्ती आहे 

या ज्या तीन मुख्य जबाबदारी आहे त्यांचा संबंध थेट शैव अक्षांशी आहे पण अनेकदा त्याबद्दल साधी चर्चा सुद्धा होत नाही याचे कारण मला जे माझ्या शिव तत्वावर ही जबाबदारी टाकण्यात आलेली होती तेव्हा त्यामागे काय तर्क होतात याचा विचार करण्याची जबाबदारी हिंदूंच्यावर नाही पण आपल्याला मात्र तिचा विचार करावा लागेल 

मी हे अनेकदा सांगितलेले आहे की शैव श्रुतीमध्ये तीन अक्ष आहेत आणि या श्रुती मधून निर्माण झालेल्या सर्व धर्मांच्या मध्ये हे तीन अक्षर कॉमन आहेत हे तीन अक्ष म्हणजे काम अर्थ आणि मोक्ष या अक्षांच्या मध्ये धर्म ही गोष्ट नंतर आलेली आहे साधारण इसवी सन पूर्व दहा हजारच्या आसपास हे घडलेले असावे. 

या तील पहिली जबाबदारी काम आहे जिचा संबंध निर्माण या अक्षाशी आहे जे जे निर्माण होते ते ते सर्व काम आहे . त्यामुळेच अनेकदा माणसांमध्ये शक्ती सृजनशील शक्ती म्हणूनच जास्त ऍक्टिव्ह असते . 

त्यानंतर अर्थातच अर्थ येतो इथे संसार पूर्णपणे मांडला गेलेला आहे कारण आता संसार फक्त निर्माण झालेला नाही तर तो आता वाढवला पाहिजे सांभाळला पाहिजे त्यामुळे ही जबाबदारी शिव आणि शक्ती या दोघांनाही परस्पर पूरक करून टाकते . पहिल्या जबाबदारीमध्ये शिव गुप्त आहे तर शक्ती प्रकट आहे दुसऱ्या जबाबदारी मध्ये मात्र शिव सूप्त आहे आणि शक्ती प्रकट आणि जागृत आहे 

यानंतर अर्थातच मोक्ष आहे तो महाअक्ष आहे . इथे शिव मुक्त आहे आणि शक्ती आता पूर्णपणे शिवाच्या आधीन आहे.

या तीन गोष्टी नेमक्या काय आहेत हे न समजल्याने फार मोठा गोंधळ झालेला आहे त्यातूनच मग शिवाची प्रतिमा संहार करता अशी करून टाकली प्रत्यक्षामध्ये तिन्ही अक्षांमध्ये असलेला शिव एकच आहे पण ब्रह्माचा त्याग करायचा नव्हता आणि विष्णू जग विष्णू हा वैदिक देव काही करून केंद्रस्थानी आणायचा होता त्यातून घडवलेला हा खटाटोप आहे आणि हे करताना आम्ही शिवाचा त्याग केलेला नाही हे दाखवण्यासाठी महेश नावाची देवता निर्माण करण्यात आली . मात्र प्रत्यक्ष निर्माण मध्ये आणि सांभाळण्यामध्ये त्याचा जो मुख्य रोल असतो तोच काढून घेण्यात आला जेणेकरून प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये शिव येऊ नये . आणि सर्व व्यवहारावर आपले नियंत्रण राहावे. 

पण ब्राह्मण फक्त हेच करत नाहीत ते कधीही म्हणत नाहीत की चौथा देव आहे किंवा चौथा अक्ष आहे वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी चौथा अक्ष निर्माण केलेला आहे आणि त्यामुळेच सर्व अक्षांना पुरुषार्थ म्हटले गेले म्हणजे स्त्रीचा रोल पण काढून घेण्यात आला शक्ती दुय्यम करण्यात आली . तिला अत्यंत जाणीवपूर्वक विष्णूचे पाय चेपायला लावले . म्हणजे सांभाळताना स्त्रीचा संसारामधला रोलच संपला . हे सर्व करण्यासाठी चौथ्या पुरुषांसाठी गरज होती आणि त्याचा देव कोण हे मात्र ब्राह्मण बोलत नाहीत पण प्रत्यक्षात तो देव दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द ब्राह्मणच आहेत . म्हणजेच प्रत्यक्ष हिंदुधर्मामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आणि ब्राह्मण असे चार मुख्य देव आहेत आणि हे हिंदूंच्या व्यवस्थित लक्षात येत नाही आणि म्हणूनच हा सगळा गोंधळ बांधलेला दिसतो. यामागे एक प्रकारचा धूर्तपणा आहे आणि तो टिकवण्यासाठी नाना युक्तिवाद केले जातात म्हणजे अलीकडे किती वाद नेहमी केला जातो की जेव्हा जेव्हा ब्राह्मणांचे वाईट दिवस सुरू होतात तेव्हा तेव्हा धर्मांतर सुरू होते प्रत्यक्षात गोष्ट नेमकी उलटी आहे जेव्हा जेव्हा ब्राह्मणांचे अत्याचार वाढतात तेव्हा तेव्हा धर्मांतर वाढते . सनातन धर्म नावावर अनेक ब्राह्मण पुन्हा एकदा ब्राह्मण शाही आणण्याच्या मूडमध्ये आलेत पण त्यामुळे धर्मांतर वाढत जाणार आहे कमी नाही होणार आणि ब्राह्मणांना या गोष्टीमुळे काहीही फरक पडत नाही कारण मुळातच ब्राह्मण एका स्वतंत्र धर्मात वावरत असतात आणि त्यांचा धर्म ते स्वतः जगत असतात तो धर्म म्हणजे ब्राह्मण धर्म होय तो ते कधीही हिंदू धर्मात विलीन करत नाहीत . त्यामुळेच वेदांचे सगळे अधिकार ते स्वतःकडे ठेवतात संस्कृत भाषेचा सगळा अधिकार आपल्याकडे ठेवतात आणि म्हणूनच त्यांना संस्कृत राष्ट्रीय भाषा म्हणून डिक्लेअर करायची नसते . प्रत्यक्षामध्ये वेद काही त्यांनी निर्माण केलेले नाही ते सर्व ऋषींनी निर्माण केलेले आहेत संस्कृती भाषा सुद्धा त्यांनी निर्माण केलेली नाही तर ती सिद्ध, ऋषी आणि मुनी आणि भाषातज्ञांनी लोकांनी निर्माण केलेली आहे. पण तरीही ब्राह्मण ती बळकावून बसलेले आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे सर्व धर्म संस्कारांच्या वर आपले नियंत्रण राहिले पाहिजे हा अट्टाहास आहे ही मक्तेदारी आहे आणि हे मक्तेदारी तुटू नये म्हणून मग संस्कृत वर पूर्णपणे स्वतःचे नियंत्रण ठेवले गेले. म्हणजेच एका अर्थाने धर्म पूर्णपणे ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे आणि ब्राह्मणच ह्या पुरुषार्थाचे मुख्य देव आहेत म्हणूनच स्वतःला ते भुदेव म्हणवून घेतात . ब्राह्मण नेहमी जन्मदत्त ब्राह्मणच असतो मग ते कितीही करमदत्त वगैरेच्या गप्पा मारोत . अजून तरी अभ्यंकर चप्पल वाल्यांना कोणी चांभार म्हटलेले दिसत नाही . म्हणणार पण नाहीत . फडणवीसांना कोणी क्षत्रिय म्हणत नाही ब्राह्मणच म्हणतात त्यामुळे उगाच खोट्या गप्पा कशाला मारता . सरळ सांगा ना की तुम्हाला सर्व काही जन्मदत्तच हवे आणि हिंदू धर्म हा जन्मदत्त अर्थ वर्णव्यवस्थेवरच विश्वास ठेवतो मग तो काहीही म्हणो उगाच पुरानातली उदाहरणे सांगू नका आत्ताच्या वर्तमानाच्या व्यवहारामध्ये तुम्ही कोणाला काय म्हणता ते सांगा . वर्तमानातला तुमचा एकही व्यवहार करमदत्त नाही आणि कशाला शहाणपण सांगता? कुठलाही ब्राह्मण डॉक्टर स्वतःला कर्म दत्त वर्णव्यवस्थेनुसार शूद्र म्हणवून घेत नाही . तो स्वतःला ब्राह्मणच म्हणतो . त्यामुळे उगाच जुनी उदाहरणे सांगू नका आत्ताच्या व्यवहारामध्ये वर्तमानामध्ये तुम्ही स्वतःला काय म्हणता त्यावरून वर्ण हा करमदत्त आहे की नाही हे आम्ही ठरवणार . आणि स्पष्टपणे दिसते की तुम्ही वर्ण जात व्यवस्था जन्मदत्तच मानता करमदत्त मानत नाही 

साहजिकच मग धर्म या पुरुषार्थाचा मुख्य देव ब्राह्मणच राहतो भूदेवच राहतात हे आपले राजकारण सतत खेळत राहतात म्हणजे आता कोणी रामाविरोधात काही बोलले तर यांना चालत नाही धर्मावर आघात झाला असे म्हणतात . अरे पण तुमची रामाची पद्धत आणि बहुजन समाजातल्या रामायणाची पद्धत जर वेगळी असेल तर काय करणार ? वाल्मीकि रामायण हेच प्रमाण रामायण म्हणून कोणी ठरवले? तुम्ही ठरवले. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? तर हा अधिकार तुम्ही धर्म या व्यवस्थेचे मुख्य देव आहे म्हणूनच स्वतःकडे ठेवता पण समजा जर एखादा माणूस हिंदूच नसेल तर तुमचा धर्म या गोष्टीवर असणारा अधिकार त्याच्यावर चालू शकत नाही. ख्रिश्चन धर्मातील माणसाने तुम्हाला त्याच्या धर्माच्या अधिकारात जर काही नावे ठेवली तर तुम्हाला ती ऐकून घ्यावी लागतील तुम्ही त्याचा प्रतिकार करू शकता परंतु तुमचा धर्मावरचा अधिकार फक्त हिंदू धर्मापुरताच मर्यादित राहतो हे लक्षात ठेवा .कारण त्याला सुद्धा तो अधिकार आहे आणि तुम्हाला सुद्धा ख्रिस्तावर टीका करण्याचा अधिकार आहे . आम्ही जे म्हणतो अंतिम शब्द यातून आता बाहेर या . शैवधर्मामध्ये तर तुम्ही कोणीही नाही आहात कारण शैव धर्मामध्ये वर्ण जात व्यवस्थाच नाही . कुठल्याच अक्षावर ब्राह्मणाचा अधिकार नाही . शिव ही अनार्य देवता कशी सामावून घ्यायची हा तुमचा प्रश्न झाला त्याच्याशी अनार्यांना काय कर्तव्य ?

आणि सर्वात मूळ प्रश्न तुम्ही स्वतःची इंद्र ही देवता मुख्य मानत होता तर ती तुम्ही का त्यागली ? विष्णू ही देवता तुम्ही मुख्य देवता म्हणून का स्वीकारली ? हे वेदाच्या विरोधी नाही का ? की कुठली देवता मुख्य असणार हे ठरवण्याचा अधिकार ऋषींच्याकडे नसून ब्राह्मणांच्याकडे आहे असाच तुमचा समज आहे ? तुम्ही ब्राह्मण वैदिक ऋषींच्या पेक्षा मोठे आहात काय की त्यांनी ठरवलेली मुख्य देवता इंद्र ही साईडलाईन करून तुम्ही विष्णू ही देवता आणली ? 

प्रश्न तुम्हालाही विचारता येतात . हे सर्व मी सांगतो आहे कारण ब्राह्मणेतर हिंदूंना एकदा शांतपणाने एकत्र बसून ठरवावे लागेल की ब्राह्मणांचा नेमका हिंदू धर्मातला अधिकार काय आहे ? तो त्यांनी स्वतःकडे कसा काय घेतला? हे लोक कधीपासून स्वतःला ऋषींच्या पेक्षा अधिक महान समजायला लागले ?

 श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय