माझ्या समिक्षालेखनाच्या अटी श्रीधर तिळवे नाईक
कुठलाही कलावंत हा रसिकांचा भुकेला असतो त्यांची दाद मिळणे हे त्याला जगण्यासाठी कलेसाठी अत्यंत आवश्यक वाटते हे अत्यंत नैसर्गिक आहे त्यामुळे मला त्यात काही वावगं वाटत नाही प्रश्न तेव्हा येतो जेव्हा दबाव आणला जातो मी दबाव घेत नाही मी दाद देतो आणि अर्थातच दाद देण्याची जी अट असते ती मी पूर्ण झाली तरच दाद देतो ही अट काय आहे सर्वात पहिली अट ती कलाकृती मला आवडली पाहिजे मला सर्वसाधारणपणे त्याच कलाकृती आवडतात ज्या चौथ्या नवतेशी संबंधित असतात कोणाला माझी ही मर्यादा वाटू शकते पण जो नवता मांडतो त्याला त्या नवते विषयी जिव्हाळा वाटत असतो म्हणूनच तर तो नवता मांडत असतो जर मला चौथ्या नवते विषयी जिव्हाळा नसता तर मी कशाला ती मांडली असती? कुठल्याही नवताकाराला केवळ गंमत म्हणून कधीच नवता मांडायची नसते त्याचे त्या आशयाशी इमोशनल बॉण्डिंग असते त्यामुळे अनेक लोक निराश होतात पण माझा नाईलाज आहे किंवा मग आधीच्या नवतेतील असतील तर किमान त्यात ताजेपणा मला आवश्यक वाटतो निकडीचा वाटतो दुसरी गोष्ट जर एखादी कलाकृती चौथ्या नवतेला पुढे घेऊन जात असेल किंवा एखाद्या नवतेत काही वेगळा टप्पा देत असेल तर मला तिला दाद द्यावीशी वाटते माझ्या या दोन कसोट्यात मराठीतल्या 99% कलाकृती बसत नाहीत साहजिकच मी त्यांना दाद देत नाही कारण ती आतून येत नाही आणि जी गोष्ट आतून येत नाही ती मी करत नाही यामुळे अनेकांना माझा प्रॉब्लेम वाटतो पण मला वाटतं प्रामाणिकपणा हा समीक्षेचा सर्वात आद्य गुण आहे तोच नसेल तर तुमची समीक्षा व्यर्थ आहे मराठीत हा प्रामाणिकपणा अत्यंत दुर्मिळ आहे आपल्या गोठ्यातल्या सॉरी गटातल्या कवींना लेखकांना कलावंतांना दाद देणे त्यांच्यावर समीक्षा लिहिणे ही एक फॅशन बनलेली आहे या फॅशनला बळी पडण्याची माझी तयारी नाही यामुळे अनेक लोक दुखावले जातात पण मी त्यांची पर्वा करत नाही ती केली तर मी चांगल्या कविताही लिहू शकणार नाही असे मला वाटते
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment