गौतम बुद्ध आणि माझी कविता

गौतम बुद्ध आणि माझी कविता श्रीधर तिळवे नाईक 

आज बुद्ध पौर्णिमा साहजिकच गौतम बुद्धावर अनेकांच्या पोस्ट पडणे स्वाभाविक आहे ज्याला त्याला आज बुद्धाचा ग्रेटनेस सांगणे आवश्यक वाटणे हेही स्वाभाविक आहे सर्वसाधारणपणे भारत हा बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो तो संपूर्ण आशियात बौद्ध धर्माच्या झालेल्या प्रसारामुळे ! गौतम बुद्धाने त्याचा धर्म किंबहुना धम्म आपल्या अनुयायांना संपूर्ण जगात न्या असे सांगितले साहजिकच त्याच्या अनुयायानी संपूर्ण आशियाभर त्याचा धम्मं नेला जर बुद्ध धम्म प्रमाण मानायचा ठरवला तर अलीकडच्या काही संशोधनानुसार कदाचित युरोपमध्येही हा धम्म पोहोचला असावा एक गोष्ट नक्की आहे की हा धर्म एकेकाळी आशियातील तब्बल 70 टक्के लोकांचा धर्म होता प्रश्न असा आहे की तो असा का राहिला नाही आज जगभर बौद्ध धम्म पाळणाऱ्या लोकांची संख्या घटलेली आहे एकेकाळी आशियातील 70 टक्के लोकांचा असलेला हा धम्म आता आशियातही केवळ वीस ते तीस टक्के लोकांचा झाला आहे आपल्याकडे एक अशी समजूत आहे की आद्य शंकराचार्याने बौद्ध धर्म पळवून लावला प्रश्न असा येतो की असे होते तर आज चायना मध्ये हा धर्म का घटत आहे किंवा अफगाणिस्तानामध्ये शंकराचार्य कुठे गेले होते तरीही आज अफगाणिस्तान संपूर्ण इस्लामिक का आहे ? वस्तुस्थिती अशी आहे की जगभर इस्लामने आपला प्रसार इतक्या जोरदारपणे केला की बौद्ध धम्मातल्या जवळजवळ 50 टक्के लोकांनी इस्लाम स्वीकारला अनेक दक्षिणात्य आशियाई देश आज इस्लामिक झालेले आहेत कारण त्यांनी धर्म बदलला या वस्तुस्थितीकडे जास्तीत जास्त दुर्लक्ष करून आजकाल बौद्ध धर्माविषयी भारतात बोलले जाते. यातून खोटे दिलासे मिळतात पण असे दिलासे काही कामाचे नाहीत इतका तेजस्वी आणि तेजपूंज व तर्कशुद्ध असलेला हा धर्म पूर्वेकडे ओहोटीला का लागला आणि आता तो पश्चिमेकडे का वाढतो आहे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे पाश्चात्त्य देशात मात्र वैयक्तिक पातळीवर अनेकांनी गौतम बुद्धाला स्वीकृती दिलेली दिसते याचे कारण उघड आहे गौतम बुद्ध जितका रॅशनल आहे तितका कोणीही रॅशनल नाही शैवांच्यात पंच उपाय आहेत त्यातील फक्त ज्ञान उपाय तेवढाच रॅशनल आहे शैवांच्यात भक्तीला एक उपाय म्हणून स्वीकारलेले आहे बौद्ध धर्मात भक्तीला जागा नाही 

याचा एक परिणाम असा झाला की ज्या लोकांना भक्ती आवश्यक वाटत होती त्यांना ती अवघड बनत गेली. साहजिकच जेव्हा केवळ भक्ती केंद्र असलेला इस्लाम तिथे पोहोचला तेव्हा या लोकांनी त्याला स्वीकृती दिली याशिवाय पराभूत झालेले राजे व त्यांचे झालेले इस्लामीकरण याचा वाटा आहेच याउलट पाश्चिमात्य देशात विज्ञानाची जशी जशी भरभराट होत गेली तसा तसा बुद्ध अधिक रीलेवंट

होत गेला जो जो विज्ञाननिष्ठ असतो तो आपोआपच गौतम बुद्धाच्या मागे जातो किंवा शैवांच्या ज्ञानोपाय पाळणाऱ्या सिद्धांच्याकडे जातो यात वृषभनाथांच्यापासून अमृत अनुभव सांगणाऱ्या ज्ञान नाथांच्या पर्यंत अनेक सिद्धांच्या कडे येतात प्रज्ञेचा मार्ग हा सामान्य माणसाला आजही कठीण का वाटावा वास्तविक अभ्यासक्रमामध्ये विज्ञानाचा समावेश प्रचंड प्रमाणात झालेला आहे असे असूनही भारतात 1950 ते 1990 पर्यंत किती लोक ज्ञानोपायाने सिद्ध अथवा बुद्ध झाले? असे तर नाही ना की वैज्ञानिक शिक्षण हे केवळ पोटापुरते घ्यायचे म्हणून हे झालेले आहे ? विज्ञान ही मोक्षशैली म्हणून सुद्धा विकसित होऊ शकली असती पण दुर्दैवाने यासाठी आवश्यक ते प्रयत्न झाले नाहीत जे कृष्णमूर्तींच्या नंतर ज्याला बुद्ध म्हणावे असा कोणी ताकतीचा आलाच नाही दुर्दैवाची गोष्ट अशी की जे ज्ञानाची आणि विज्ञानाची गोष्ट करतात बुद्धाची गोष्ट करतात ते सुद्धा जे कृष्णमूर्ती नीट वाचत नाहीत त्यामुळेच तरी पीछेहाट झालेली नाही ना? कुठलाही धर्म किंवा धम्म हा सतत जागता आणि जिवंत ठेवावा लागतो त्यासाठी त्या त्या धम्मात नवे सिद्ध व बुद्ध निर्माण व्हावे लागतात दुर्दैवाने गेल्या 50 वर्षात असे काही झालेले दिसत नाही परिणाम असा झाला की भक्ति हीच केंद्रस्थानी आली याला काँग्रेसचे राजकारण ही जबाबदार होते काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींची चिकित्सा होण्याऐवजी भक्ति जास्त उद्भवली त्यानंतर ाजकीय पुढार्‍यांचीच भक्ती वाढत गेली आणि एकंदरच भक्ती हाच आपला जीवन स्वभाव बनला जे राजकारणात पेरले जाते ते शेवटी संस्कृतीत उगवते पण राजकारणात काही खपले तरी चालतं अशी धारणा असणाऱ्या पत्रकारांनी भक्तीला अधिकच चालना दिली. मीडिया भक्तीत फोफावला साहजिकच जिथे तिथे भक्ती ! याचा फायदा सर्वाधिक भाजपला झाला गमतीचा भाग असा की बुद्धाच्या नावाने बुद्ध जयंती साजरी साजरी करणाऱ्या लोकांनी बुद्धाची भक्तीच जास्त केली आणि गौतम बुद्धाकडे त्याच्या निर्वाण मार्गाकडे दुर्लक्ष केले अगदी दलित पुढारी सुद्धा भक्ती आणि निष्ठा मागू लागले यातून व्यायचे तेच झाले हळूहळू या भक्तीने विज्ञान ताब्यात घ्यायला सुरुवात केली. ज्या देशाचे स्वातंत्र्य लोकायत व नवलोकायत दर्शनाने सुरू झाले तो नंतर भक्तीत तल्लीन व्हावा यापेक्षा बौध्द धम्मासाठी अडचणी चे ते काय माझा भक्तीला विरोध नाही परंतु सर्वच भक्त आणि सर्वत्र भक्ती हे मात्र मला नामंजूर आहे भारतातले विज्ञान आणि गौतम बुद्ध हे एकत्र गेले तर त्यात भारताचे कल्याण झाले असते शैवांच्या दृष्टीने भगवान शंकराने जी ११४ तंत्रे दिली त्यातील एक विपश्यना होय ह्या विपशनेच्या आधारे गौतम बुध्दांनी एक स्वतंत्र धम्म निर्माण केला हे त्यांचे वैशिष्ट्य ! अनेक शेव गौतम बुद्धाला परका मानतात हे बरे नाही हा आपलाच माणूस आहे त्याला परका मानू नका गौतम बुद्ध मुळे बुद्धामुळे पंचशीलांचा प्रचार अधिक द्विगुणित झाला मात्र अतिरेकी अहिंसेमुळे काही ठिकाणी विशेषता इस्लामपुढे बौद्ध धर्माचे नुकसान झालेले दिसते वास्तविक गौतम बुद्धाने संरक्षण करा असेच सांगितलेले आहे पण कुठे ना कुठे अतिरेकी अहिंसा पाया बनली आणि त्याचा फटका बौद्ध राज्यांना पडलेला दिसतो जिथे शैव आणि बौद्ध युती झालेली दिसते तिथेच बौद्धांची ही भरभराट झालेली असते दुर्दैवाने भारताचा इतिहास हा इतका बौद्धमय झाला की तो नीट लिहिलाच गेला नाही या मागचे राजकारण काय यात आत्ता मी शिरत नाही पण त्यात बौद्धांचेच नुकसान जास्त झाले खुद्द बौद्ध पंडितान्नी शैवांच्या बाबतीत लोकधर्म हा शब्द वापरला आहे आणि बौद्धांच्या भरभराटीच्या काळातही तो लोकांच्यातच जास्तच प्रचलित होता दुर्दैवाने ही युती तोडली गेली आणि यात दोघांचे नुकसान झाले आज अवस्था अशी आहे की बहुतांशी नवबौद्ध हे वारकरी संप्रदायाशी तडजोड करण्याच्या मूडमध्ये आहेत प्रकाश आंबेडकर हे त्यातूनच विठ्ठलाची पूजा करायला गेले होते त्यानंतर ते भाजपची पाठराखण करतात असा आरोप येण्याइतपत बदललेले दिसतात भारतात नेमके काय चालले आहे आणि काय करायला हवे याचा विवेक भल्याभल्यांचा तुटलाय असो  

अलीकडेच अनेक नव बौद्ध मराठी साहित्यातील अनेकांनी तुकारामाशी सलगता केलेली आहे आणि माझ्या मते देशीवादाच्या वारकरी पुनर्जीवन चळवळीला मिळालेले हे फार मोठे यश आहे संपूर्ण वारकरी संप्रदाय हा खरोखर वर्ण आणि जातीच्या विरोधात आहे का याची जी दलित पॅंथरने चिकित्सा केली होती ती आता मागे पडताना दिसते आहे नव बौद्ध वैष्णवीझ मला जाऊन मिळत असतील तर त्यांना ते नक्कीच स्वातंत्र्य आहे यामुळे जर का वर्ण जाती व्यवस्था नष्ट करण्याबाबत वैष्णव धर्म काही नवे पावले टाकत असेल तर माझ्या दृष्टीने ते चांगलेच आहे वर्ण जाती व्यवस्था जाण्याचे अनेक मार्ग असतात त्याचा हा ही मार्ग असेल तर ते ठीक आहे असो 

गौतम बुद्धांच्या बाबतीत १९८७ ते २००५ या काळात मी अनेक कवितांच्यात वेगवेगळ्या पद्धतीने लिहिले आहे एका अर्थाने माझा हा काळ बौद्ध काळ म्हणावा इतका व्यापक प्रभाव गौतम बुद्धांचा माझ्यावर पडलेला होता हा काळ काहीसा चॅनेल सिरीज चा होता नंतरच्या माझ्या आयुष्यात मी बदलत गेलो कारण ज्ञानोपायाने मला मोक्ष मिळत नव्हता यात नक्कीच माझा दोष होता असो

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय