वि दा सावरकर : ब्राह्मणी हिंदुत्वाचा तिसरा चेहरा श्रीधर तिळवे नाईक 

भारतामध्ये नानासाहेब पेशवे यांच्यानंतर हळूहळू ब्राह्मण धर्म महाराष्ट्रात पूर्णपणे प्रस्थापित झाला आणि त्याने इथल्या सर्व व्यवस्था आपल्या ताब्यात घेतल्या साहजिकच या उत्तरपेशवाईचे पतन होणे आणि त्यांचे ब्रिटिशांच्याकडून पराभूत होणे हे अटळ होते आपला पराभव का झाला याची कसलीही मीमांसा सुरुवातीच्या काळामध्ये झाली नाही पण एकदा इंग्रजांची राज्य व्यवस्था हलवता येणार नाही याची कल्पना आल्यानंतर काही लोकांनी विश्लेषण करायला सुरुवात केली आणि यातूनच एक विचार प्रणाली हळूहळू उदयाला आली ती म्हणजे हिंदू वाद आणि तिला शहर द्यायला उभा राहिला हिंदुत्ववाद !


या हिंदुत्ववादात सर्वात प्रथम वैदिक हिंदुत्व उदयाला आले आणि त्याची मांडणी आर्य समाजाने आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली . भारताचा इतिहास नेहमीच सांगत आलेला आहे की वैदिक धर्म पुन्हा एकदा उदयाला आला की ब्राह्मणधर्म गप्प बसत नाही तो आपोआपच स्वतःची जागा तयार करायला बघतो वैदिकता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो इथेही तेच घडले आणि ब्राह्मण लोकांनी आर्य वैदिकत्वात हिंदुत्वात शिरकाव केला . पहिले ब्राह्मणी हिंदुत्व हे पूर्णपणे ऐतिहासिक आणि पेशवाईला मराठेशाहीला धरून होते आणि त्याची मांडणी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी केली. तिच्यावर मी सविस्तर लिहिले आहे दुसरी मांडणी ही लोकमान्य टिळक यांनी केली त्यांनी ब्राह्मणी हिंदुत्वाला वैष्णव गीता धर्माची जोड दिली म्हणजेच हे ब्राह्मणी हिंदुत्व गीता केंद्री होते आणि जन्मदत्त वर्ण व्यवस्थेचे समर्थक सुद्धा होते . टिळकांचे शिष्य असलेले विनायक दामोदर सावरकर नंतर तिसरा चेहरा घेऊन आले हा चेहरा वेदांताचा होता पण वर्ण व्यवस्थेवर प्रचंड विश्वास ठेवणारा होता . मात्र टिळकांच्याप्रमाणेच सावरकरांचे हिंदुत्व सुद्धा जातिव्यवस्था नाकारते पण वर्णव्यवस्था स्वीकारते . म्हणजेच एका अर्थाने ब्राह्मणी चौकटीमधून सावरकरांना मुक्त होता आले नाही आणि त्यांच्या हिंदुत्वाला पडलेली ही सर्वात मोठी मर्यादा आहे. टिळक तत्त्वज्ञाननिष्ठ होते तर सावरकर हे विज्ञाननिष्ट होते याचे एकमेव कारण म्हणजे तत्कालीन ब्राह्मण समाजाला जर पुढे जायचे असेल तर ब्राह्मण समाजाने युरोपियन ज्ञान आणि तत्त्वज्ञान स्वीकारले पाहिजे त्यातील काही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत याची जाणीव टिळकांना होती तर सावरकरांना सर्व ब्राह्मणांनी आता विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे त्याशिवाय उपाय नाही हे कळून चुकले होते त्यामुळेच या दोघांनी तत्त्वज्ञाननिष्ठता आणि विज्ञाननिष्ठता यांचा प्रचंड पुरस्कार केलेला दिसतो मात्र हा पुरस्कार ब्राह्मणांच्या भल्यासाठी केला गेला आहे किंबहुना ब्राम्हणांना नव्या जगात टिकून राहण्यासाठी हे आवश्यक आहे हे कळाल्यामुळे केलेला आहे त्यामुळेच तो हिंदुत्वाच्या चौकटीत फिरत असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे .


या तिन्ही लोकांची हिंदू या शब्दाची व्याख्या स्पष्ट होती तिघेही वेद आणि स्मृती प्रमाण मानत होते त्यामुळे जेव्हा भारतीय संविधान म्हणजेच घटना तयार झाल्यानंतर घटनेवर टीका करताना सावरकर यांनी ही घटना भारतीय नाही तिच्यावर मनुस्मृतीचा प्रभाव नाही अशी टीका केली होती आता मनुस्मृतीचा प्रभाव घेतला असता तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही . माझे उलट मत असे आहे की कळत नकळत मनुस्मृतीच्या प्रभावाखाली काही ठिकाणी धार्मिक कायदे बनवताना बाबासाहेब आंबेडकर आलेले आहेत तेवढा सुद्धा प्रभाव त्यांनी घ्यायला नको होता . सावरकरांनी मनुस्मृतीचा हा जो पुरस्कार केलात त्याचा परिणाम नंतर हिंदुत्ववादावर असा झाला की अनेकदा मनुस्मृतीच्या नावाने आज सुद्धा गळे निघत असतात .


ब्राह्मणी हिंदुत्वाचा हा जो नवीन हिंदू धर्म होता तो काय होता तर तो शैव वैष्णव या दोघांना मुख्य संप्रदाय मानणारा होता आणि भारतात शैव श्रुती पराभूत करण्याचे जे कारस्थान नंतर उदयाला आले त्याची सुरुवात इथेच झाली होती. हिंदू या नावाखाली वैष्णव धर्माच्या पोटात शैवधर्म सामावून घेणे रुद्राच्या पोटात भगवान शंकर सामावून घेणे महालक्ष्मीच्या पोटात अंबाबाई सामावून घेणे असा हा अजेंडा आहे आणि त्याची सुरुवात याच काळामध्ये झालेली दिसते या कारस्थानाला इंग्रजांनी सुरुवात केली आणि हिंदुत्ववादाने हे कारस्थान स्वीकारले आणि आता ते तडीस नेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे . ते थांबवण्याचा एकच उपाय आहे शैव हिंदुत्व ! कारण पुरोगामी लोक आणि पुरोगामी वाद शैव धर्माच्या बाजूने उभे नाहीत. असो.


या ब्राह्मणी हिंदुत्वाने अधोरेखित केलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ख्रिश्चन आणि मुस्लिम हे दोन धर्म सावरकरांच्या भाषेत सांगायचे तर भारतीय संस्कृतीमध्ये मिस फिट आहेत . हिंदुत्ववादाचा त्यामुळे साहजिकच पहिला अजेंडा हा मुस्लिम विरोध असतो. जर का भारतामधून सर्वच्या सर्व मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानामध्ये गेली असती तर कदाचित हिंदुत्ववाद फोफावलाच नसता कारण विरोध करायला मुस्लिम शिल्लक नसते पण काँग्रेसच्या कृपेने मुस्लिम या देशात शिल्लक राहिले आणि सेक्युलर वादाच्या नावाखाली त्यांचे अधिकार वाढवले गेले त्यांना स्वतंत्र कायदा सुद्धा देण्यात आला .त्याचा व्हायचा तो परिणाम झाला तो म्हणजे हिंदुत्ववादाला मिळालेला शिरकाव ! खरे तर हिंदुत्ववादाने काँग्रेसचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी मुस्लिम लोकसंख्या भारतामध्ये ठेवली अन्यथा त्यांचा मुख्य अजेंडाच गायब झाला असता . त्यामुळे भारतातल्या हिंदुत्ववादाला एका अर्थाने काँग्रेसच जबाबदार आहे .


सावरकरांचा जो मुस्लिम विरोध आहे त्याची नेमकी कारणे काय आहेत हे तपशीलवारपणे पुढे येत नाही आणि त्यामुळेच प्रचंड मोठा घोळ निर्माण होतो . ते देत असलेली कारणे अत्यंत तकलादु आहेत . ते म्हणतात की या लोकांचा धर्म परदेशात जन्मलेला आहे त्यामुळे त्याची नाळ भारतीय संस्कृतीशी जोडली जाणे शक्य नाही. हे कारण बरोबर आहे का? तर नाही खरे कारण असे आहे की या दोन धर्मांची जडणघडण भारतीय धर्मांच्या पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे आणि त्यामुळे त्यांची संरचना सुद्धा वेगळी झालेली आहे आणि हेच कारण आपण दिले पाहिजे जे दुसरे कारण सावरकर यांनी दिले आहे ते म्हणजे या जुडाईक धर्मातील लोकांची श्रद्धास्थाने भारताबाहेर आहेत म्हणून त्यांना भारतात स्थान असू नये ते फार काही खात्री लायक आणि पटणारे नाही . हाच न्याय जर का मग आपण अमेरिकेतल्या हिंदूंना लावला तर त्यांच्या अमेरिकाप्रेमाबद्दल तुम्ही शंका घेणार काय ? अमेरिकेतल्या स्थानिक लोकांचा धर्म सोडला तर कुठलाच धर्म अमेरिकन नाही कारण तिथे 80% लोकसंख्या बाहेरून आलेली आहे आणि यामध्ये अनेकदा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या अनेकांच्या कन्या आणि पुत्र असतात त्यांच्या संदर्भात मग राष्ट्रवाद आणि धर्म यांचा संबंध कसा जोडायचा ? कॅनडा बाबत सुद्धा हीच स्थिती आहे मग तिथल्या शिखांचे काय करायचे? त्यामुळे हा तर्क फारसा पटत नाही . आणि आत्ताच्या काळात तर तो फारसा वेलिड वाटत नाही .


माझ्या मते सर्वात मोठा प्रॉब्लेम अंतिम श्रेय काय आहे या प्रश्नाचे उत्तर आहे . जुडाईक धर्माचे अंतिम घटीत कयामत आहे तर भारतीय धर्मांचे अंतिम घटीत मोक्ष किंवा निर्वाण किंवा कैवल्यप्राप्ती किंवा मुक्ती आहे . या दोन मूलभूत दृष्टिकोनातच इतका मोठा फरक आहे की भारतातल्या संस्कृतीमध्ये हे दोन धर्म तेव्हाच बसू शकतात जेव्हा ते मोक्ष स्वीकारतील . अशा प्रकारच्या प्रक्रियेची सुरुवात आपल्याकडे रुमी रहीम कबीर या लोकांनी केली होती परंतु ही प्रक्रिया अधिकाधिक वाढवत नेणे अतिशय गरजेचे आहे आणि भारतीय ख्रिश्चनिटी आणि भारतीय इस्लाम धर्म आपणाला स्वतंत्रपणे निर्माण करावा लागेल आणि तो इथल्या ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकांना मोक्ष स्वीकारून निर्माण करावा लागेल सावरकर हे उपाय सांगत नाही ते या भूमीवरचे प्रेम पुरेसे आहे असे सांगतात याचे कारण ते स्वतः निरेश्वर वादे आहेत त्यांचा मोक्षावर तरी विश्वास होता की नाही याबद्दल संशय आहे साहजिकच मग धर्मप्रेम आणि भूमी सातत्यावरचे प्रेम आवश्यक अट मानावी लागते आता हे प्रेम तपासायचे कसे ते ते सांगत नाहीत वस्तुस्थिती अशी आहे की त्यांना या दोन पुर्णपणे भिन्नधारा आहेत हेच पुरेशा प्रमाणात कळलेले नाही आणि ही त्यांच्या विचाराची एक मोठी मर्यादा आहे . ते जणू काय कबीर अस्तित्वात नाही रहीम अस्तित्वात नाही अशा थाटात बोलत राहतात वस्तुस्थिती अशी आहे की मुळात ख्रिश्चन काय किंवा मुस्लिम काय या दोन्ही धर्मामध्ये मोक्ष नाही त्यामुळे हे धर्मच नाहीत या महासत्ता आहेत हे रिलीजन आहेत हे मजहब आहेत. म्हणजेच ते श्रद्धेत अडकलेले लोक आहेत आणि भारतीय धर्म हे या श्रद्धेच्या पुढे जात मोक्षा पर्यंत आलेले आहेत एका अर्थाने हे श्रद्धेच्या संदर्भातले मागासले पण आहे आणि ते युरोपियन लोकांचे किंवा आरब लोकांचे आहे म्हणून स्वीकारण्यात काहीही अर्थ नाही . असो.


तिसरी गोष्ट भारतीय इस्लाम असे मानतो की ॲडम आणि ईव्ह हे तामिळनाडू किंवा श्रीलंका येथे जन्मले होते त्यामुळे इस्लामची सुरुवात भारतात झाली आता हे गृहीतक पूर्णपणे वेगळे आणि खास भारतीय म्हणावे असे आहे . खुद्द अरबस्थानचा इतिहास लिहिताना सुद्धा तिथे प्रथम द्रविड होते अशी मांडणी करणारे इतिहासकार आहेत आणि सावरकरांना या गोष्टीची कल्पना नाही किंबहुना अतिशय मर्यादित वाचन ही सावरकरांची खासियत आहे . ते फार कमी सोर्सेस शोधतात आणि त्याच्या आधारे विधाने करत असतात . 


एकदा का ही पार्श्वभूमी लक्षात आली तर मग काय करता येईल ते पाहता येते मी जेव्हा शैव हिंदुत्व असे म्हणतो तेव्हा मला जे अपेक्षित आहे ते हेच आहे ते म्हणजे इस्लामचे मूळ भारतात आहे आणि ख्रिश्चनेटीला भारतीय चेहरा देता येणे आता सहज शक्य आहे कारण ख्रिश्चन धर्मामध्ये एक चिंचोळा प्रवाह असा तयार झालेला आहे की त्यामुळे हळूहळू मोक्ष स्वीकारली जाण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. या प्रोसेस ना अधिकाधिक चालना देण्याची गरज असताना हे जणू काय शत्रू आहेत असे मानणे हा मूर्खपणा आहे. आता या प्रक्रियेला विरोध करणारे जे आतंकवादी मुस्लिम आहेत त्यांना आपण वेगळे काढले पाहिजे आणि त्यांच्या विरोधात सर्व प्रकारचे युद्ध सुरूच केले पाहिजे. इथे बुद्ध कामाचा नाही . परंतु अशी लोकसंख्या नेमकी किती आहे ते पाहून या संदर्भात निष्कर्ष काढावे लागतील . याचा अर्थ बुद्ध नको असा नाही बुद्ध हा शांततेच्या काळात आपणाला हवा असणार आहे आणि राष्ट्राच्या आयुष्यामध्ये बुद्धाचा काळ शांततेचा काळ हा सर्वाधिक असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दुसरी गोष्ट हिंदूंनी हिंदूंच्या बरोबर कसे वागावे तर त्याचा नमुना तयार करताना आपणाला महावीर आणि बुद्ध यांची सुद्धा भगवान शंकर यांच्या इतकीच आवश्यकता आहे . त्यामुळे सावरकरांचे किंवा इतर ब्राह्मणी हिंदुत्वांचे जे काही योगदान आहे ते जुडाईक महा श्रद्धा पूर्णपणे भिन्न संस्कृती निर्माण करणारे आहेत आणि त्यामुळे ते मिस मॅच होतात यामध्ये तथ्य आहे हे दाखवून देणे हे आहे . किंबहुना या दोन्ही धर्मांनी आणि तो धर्म स्वीकारलेल्या भारतीय लोकांनी आता आत्मपरीक्षण करणे खूप आवश्यक आहे. 


सावरकर हा जो सिद्धांत मांडत होते त्याचा परिणाम शेवटी जो व्हायचा तोच झाला तो म्हणजे त्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत स्वीकारला. आपण जर का या संदर्भात सावरकर यांची विधाने पाहिली तर ते दोन्ही गोष्टी एकाच वेळेला बोलताना दिसतात किंबहुना ते भयंकर चंचल विचारवंत आहेत हे अनेकदा सिद्ध होत असते त्यापैकी ही एक जागा आहे ते अखंड भारताचा घोष करतात आणि त्याच वेळेला अनेकदा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत ही स्वीकारतात आता याला जर कोणी डिप्लोमसी म्हणत असेल तर ती बिनकामाची आहे किंबहुना सर्व मुस्लिमांना या काळामध्ये स्थलांतर करता यावे म्हणून संघाने काय मदत केली हिंदू महासभेने काय ॲक्शन घेतली असा प्रश्न विचारावासा वाटतो फाळणी बाबतची वस्तुस्थिती अशी आहे की कृतीच्या संदर्भात हिंदुत्ववाद पूर्णपणे फेल गेला आहे आणि होता.



सावरकरांची ही चंचल भूमिका ब्राह्मण धर्माला साजेशी असली तरी राष्ट्रकारणामध्ये ती बिनकामाची आहे. पुढे पुढे तर सावरकर अनेक राष्ट्रे निर्माण करण्याच्या बाजूने होत गेले आणि या संदर्भात आता पुरावे आलेले आहे त्यावरून स्पष्ट होते की सावरकरांचे कुठेतरी याबाबतीत राजकीय ताळतंत्र सुटलेले आहे . मुळातच गांधी यांना इतके मोठे राजकीय यश मिळेल याची त्यांना कल्पना आली नाही हीच वस्तुस्थिती आहे. भारताला स्वातंत्र्य देण्यामध्ये काँग्रेसचा सर्वात मोठा वाटा आहे हे आता हिंदुत्ववाद्यांनी स्वीकारावे हे उत्तम ! उगाच कुठल्यातरी तिसऱ्याच घटकांना महत्त्व देणे थांबवावे. याचा अर्थ असा नाही की नेताजी सुभाष चंद्र बोस आणि दुसरे महायुद्ध यांचा या स्वातंत्र्य देण्यामध्ये वाटा नाही तो आहेच परंतु कुठलेही स्वातंत्र्य केवळ बाह्य घटकांनी मिळत नाही ते आतल्या घटकांनी मिळावे लागते भारतामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा हिंसावादी सशस्त्र क्रांतिकारक वाद जशास तसे वादी उठाव आणि गांधी यांचा अहिंसावादी प्रयत्न यांचा मेळ बसला आणि म्हणूनच स्वातंत्र्य मिळाले . यातील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रयत्नावर हिंदुत्ववाद्यांनी एकतर्फी प्रेम करण्यात काहीही अर्थ नाही कारण ते सरळ सरळ डावे होते त्यामुळे त्याचे श्रेय खरे तर डाव्या लोकांना किंवा काँग्रेसलाच द्यायला हवे कारण शेवटी सुभाष चंद्र बोस हे काँग्रेसचे बाय प्रॉडक्ट होते . मग हिंदुत्ववादी लोकांचे श्रेय नाही का? तर आहे आणि मी ते स्पष्टपणे मांडलेले आहे की शेवटी स्वातंत्र्याचा मुद्दा खऱ्या अर्थाने केंद्रस्थानी आणला तो लोकमान्य टिळक यांनी आणि लाल बाल पाल हे तिघेही हिंदुत्ववादी होते त्यामुळे स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या प्रमाणात आकाराला सुरुवातीच्या कालखंडामध्ये हिंदुत्ववादी लोकांनी आणली हे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे आपल्याकडे एकंदरीत इतिहास जसा घडला तसा लिहिला जात नाही जे घडले ते तसे पाहिले जात नाही . पण लाल बाल पाल हे तिन्हीच्या तिन्ही हिंदुत्ववादी नेते काँग्रेसमध्ये होते हे लक्षात घेतले पाहिजे नंतर मग हिंदुत्ववादी काँग्रेस मधून बाहेर पडले . याबाबतीत काँग्रेस जो आडमुठेपणा दाखवायला बघते त्यात पण तथ्य नाही या काळामध्ये काय पद्धतीने मवाळ लोक काम करत होते याचे सर्व डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे स्वतःच्या नोकरीपलीकडे न पाहणारे हे काँग्रेसचे लोक काय मागत होते हे जरा एकदा काँग्रेसने अभ्यास करून पहावे. स्वातंत्र्याची सनदशीर डरकाळी ही या देशात प्रामुख्याने लोकमान्य टिळक यांनीच फोडली. ज्याला राष्ट्रीय क्रांतिकारक प्रयत्न म्हणावा असा प्रयत्न असे संघटन हे सुद्धा प्रामुख्याने हिंदुत्ववादी आणि डाव्या लोकांनी सुरू केलेले दिसते . याबाबतीत ज्याचे जे श्रेय आहे ते त्याला द्यावे हे उत्तम ! सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणून मान्यता न देणे या सारखा मूर्खपणा नाही त्यांना ही मान्यता दिलीच पाहिजे कारण यााा संदर्भातले त्यांचे कार्य स्पष्ट दिसते 

सावरकरांच्या सुरुवातीच्या हालचाली स्पष्टपणे नोंदवल्या गेल्या आहेत जोसेफ मॅझिनी हा इटलीचा स्वातंत्र्य योद्धा त्याच्यावर त्यांनी इंग्लंडमध्ये भारत भवन मध्ये असलेले ग्रंथ आणि त्यांचे संदर्भ तपासत ग्रंथ लिहिला आणि बाबाराव सावरकर यांनी तो प्रकाशित केला तर त्याच्यातली धग इतकी होती की पहिल्या आवृत्तीनंतर आपोआपच त्याच्यावर बंदी आली जोसेफ मुळेच सावरकरांना सुद्धा आपण असे काही बंड करू शकतो आपण संघटना उभी करू शकतो असे वाटत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे म्हणजे त्यांच्या क्रांतिकारकत्वाची पायाभूत जडणघडण करण्यामध्ये मॅझिनी याचा खूप मोठा वाटा होता 


नंतर दुसरा जो ग्रंथ आहे 1857 चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाच्या संदर्भात सुद्धा तो छापायला सुद्धा कोणी तयार नव्हते हे लक्षात घेण्याजोगे आहे. हा एक असा ग्रंथ होता ज्याने भारतीय इतिहासामध्ये 1857 च्या बंडा कडे पाहण्याची नजर पूर्णपणे बदलली आणि भारतीय पद्धतीने हा इतिहास येऊ शकतो न्याहाचा येऊ शकतो तपासता येऊ शकतो याची जाणीव करून दिली आणि सावरकरांचे इतिहासकार म्हणूनही योगदान मान्य करावे लागते याबाबतीत तुम्ही विरुद्ध भूमिका घेऊ शकता जी ऑलरेडी इंग्रज लेखकांनी घेतलेलीच आहे पण राष्ट्रीय पद्धतीने एखादा घटनेचा क्रम तपासणे हे इथे प्रथमच घडलेले दिसते .


1907 स*** जेव्हा पन्नास वर्षे या बंडाला पूर्ण झाली तेव्हा साहजिकच असे बंड पुन्हा होणार आहे अशी शंका इंग्रजांना येऊ लागली आणि त्यांनी या विरोधात काही प्रचारही केला आपल्याकडे इंग्रजांच्या प्रचाराला सर्वात अधिक बळी पडलेले कोणी असतील तर ते जो महात्मा फुले होते त्यांनी याबाबतीत इंग्रज सांगतात ते वाक्य प्रमाण असे काहीशी भूमिका घेतली होती आणि नंतर ही त्यांच्या अनुयायांनी 1907 स*** अशीच भूमिका घेतलेली दिसते आजही या बंडाचे स्वरूप नेमके काय ठरवायचे हा फार मोठा प्रश्न आहे . पण सावरकरांच्या या काळातल्या संपर्कातील भारत भवनांमध्ये मात्र 10 मेला स्वातंत्र्याचा सोहळा म्हणूनच याला साजरे केले गेले कारण याच दिवशी पहिली गोळी मंगल पांडेने झाडली होती. फुले आंबेडकरवादी मात्र या सगळ्याला केवळ एक धार्मिक प्रूफ देण्याचा प्रयत्न करतात आणि सनातन धर्माचा प्रयत्न अशा तऱ्हेने प्रोजेक्शन देतात .


सावरकर असे प्रोजेक्शन द्यायला तयार नव्हते किंबहुना फुले यांच्या बाबतीत त्यांचे निगेटिव्ह मत होण्याचे सर्वाधिक मोठे कारण बहुदा हेच होते की फुले हे कळत नकळत इंग्रजधार्जिणे आहेत असे त्यांना वाटत असावे.


यानंतरही त्यांच्या ऍक्टिव्हिटी अशाच राहिलेल्या दिसतात .


मात्र त्याचबरोबर 1922 नंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या विरोधात फारश्या क्रांतिकारक कारवाया केलेल्या नाहीत हीच वस्तुस्थिती आहे . या काळामध्ये ते एका अर्थाने भारतामधले ब्रिटिशांच्याकडून पेन्शन घेणारे ब्रिटिश सिटीजन बनले हीच वस्तुस्थिती ! आज हिंदुत्ववादी लोक भारतरत्न सावरकरांना देत नाहीत त्याचे कारण कळत नकळत या विरोधाभासामध्ये आहे. हिंदुत्व ही संकल्पना आपणाला टिळकांच्या काही निबंधामध्ये अत्यंत विस्तृत प्रमाणात दिसते त्यामुळे तिचे श्रेय सुद्धा आपणाला सावरकरांना देता येत नाही आणि या संकल्पनेचा सुतोवाच हा विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनीच केलेला आहे हे मी सिद्ध केलेले आहे . मात्र हिंदुत्ववादाला तात्विक संकल्पनेचा पाया पुरवण्यासाठी म्हणून सावरकरांचा हिंदुत्व हा ग्रंथ महत्त्वाचा आहे 


हा पाया धार्मिक आहे हे स्पष्ट आहे पण त्याचबरोबर हेही खरे की त्यावर युरेशियन धर्माचा प्रचंड प्रभाव आहे उदाहरणार्थ हिंदुत्व ही संकल्पना मांडताना ते ज्याची पितृभूमी भारत वर्ष आहे तो हिंदू असा शब्दप्रयोग वापरतात आणि हे लक्षात घेण्याजोगे आहे की ते तात्विक पातळीवर मातृभूमी ही संकल्पना न वापरता पितृभूमी संकल्पना वापरतात कारण सर्वच्या सर्व युरेशियन धर्म हे पितृसत्ताक होते आहेत. पण त्याचबरोबर कळत नकळत एक गोंधळ आलेला आहे तो म्हणजे बहुदा आपण स्थलांतर करून या देशांमध्ये आलेलो आहोत ही जी त्या काळातल्या ब्राह्मणांची संकल्पना होती आणि त्या काळातले ब्राह्मण जे स्वतःला आर्य म्हणवून घेत होते त्याचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर आहे किंबहुना आर्य लोकांची मातृभूमी कुठेतरी भारताबाहेर आहे याची त्यांना कल्पना होती. त्यामुळेच वारंवार पितृभू ही संकल्पना येते आणि ज्यांनी भारत वर्षाला पितृभूमी मानलेले आहे ते हिंदू अशी भूमिका मांडलेली आहे त्यांच्या या भूमिकेत जैन ,बौद्ध ,शीख आणि हिंदू समाविष्ट होतात. लिंगायत समाविष्ट होत नाहीत हेही पाहण्यासारखे आहे . यामागचे कारण उघड आहे हे पुस्तक जेव्हा लिहिले जात होते तेव्हा लिंगायत लोकांचा समावेश शूद्र वर्णांमध्ये करावा की नाही या अंगाने वाद सुरू होता.


आता एकीकडे जैन आणि बौद्ध येतात आणि तरीसुद्धा सावरकर गौतम बुद्धाला ठाम आणि स्पष्टपणे विरोध करतात हा सावरकरांच्या मांडणी मधला आणखी एक विरोधाभास आहे . या मागचे कारण अत्यंत स्पष्ट आहे सावरकर शाक्त आहेत . मात्र ते शैवशाक्त नाहीत तर ब्राह्मणी शाक्त आहेत त्यामुळे ते एका बाजूला वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवतात पण त्याचबरोबर शक्तीचीही उपासना करायला हवी म्हणतात . खरे तर शीख धर्म सुद्धा त्यामुळेच ते हिंदूंच्यात घालतात कारण शीख धर्म हा शक्तीची उपासना करतो असे त्यांना वाटते. त्यांच्या या शाक्त उपासनेत गौतम बुद्ध बसत नाही . मुळातच अहिंसेने काही साध्य होईल असे त्यांना वाटत नाही आणि यामागचे सर्वात मोठे गृहीतक असे आहे की ख्रिश्चन आणि विशेषत: मुस्लिम हे प्रचंड हिंसक आहेत शक्तीची उपासना करणारे आहेत ते तलवारच घेऊन येणार अशी त्यांची धारणा आहे जर त्यांच्याशी लढाईचे असेल तर आपणाला तलवारीनेच प्रतिकार करावा लागेल अशी त्यांची ठाम श्रद्धा आहे मुस्लिम लोक स्वतःच्या धर्मासाठी काहीही आणि कोणतेही टोक गाठू शकतात आणि त्यांचा प्रतिकार करायचा असेल तर गौतम बुद्ध आपल्या काहीही कामाचा नाही याची त्यांची पक्की खात्री झालेली आहे. त्यातूनच मग प्रथम गौतम बुद्ध यांना आणि मग गांधी यांना विरोध येतो . हिंदूंचा मुख्य शत्रू हिंदूच आहे असे विधान ते वारंवार करतात आणि मग तुमच्या लक्षात येईल की ते हिंदूंचा जो मुख्य त्या काळातला शत्रू आहे त्या जिना यांना दूर लोटत नाहीत उलट मुस्लिम लीग शी युती करतात आणि कळत नकळत गांधींच्या मात्र विरोधात जातात ज्याचा परिणाम शेवटी गांधी यांच्या हत्येत होतो. म्हणजेच इथे सावरकर या हिंदूचा खरा शत्रू गांधी हा दुसरा हिंदू आहे त्यांचा गांधीजींच्या हत्येमध्ये वाटा आहे असे निर्विवादपणे कोर्टात सिद्ध झालेले नाही त्यामुळे मला वाटते की यावर फार बोलू नये . पण गोडसे हे हिंदुत्ववादी होते हे नक्की आहे त्यामुळे गांधी हत्येची जबाबदारी ही हिंदुत्ववादी विचारसरणी वरच येते. वास्तविक हा सगळा मूर्खपणा आहे त्यावर मी खूप तपशिलात लिहिलेले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी गोडसे याला वाट चुकलेला म्हटलेले आहे तेच बरोबर आहे निदान ह्या बाबतीत तरी हिंदुत्ववादी लोकांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे अनुकरण करावे .


सावरकर यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी स्थापन केलेला ब्राह्मणी हिंदुत्ववाद वेदांती अंगाने पुढे नेला त्याचा विस्तार केला आणि मुख्य म्हणजे त्याला एक अजेंडा दिला . त्याची चर्चा अत्यंत नि:पक्षपातीपणे झाली पाहिजे . मुख्य म्हणजे पुरावे देत बोलले पाहिजे . अनेकदा राजकीय अजेंडा त्या त्या काळातला पुढे येतो आणि विकृत पद्धतीने इतिहासलेखन करतो ते टाळले पाहिजे .


सावरकरांना माफी वीर म्हणणे हा नालायकपणा आहे. तो करण्याची काहीच गरज नव्हती . उलट त्यामुळे हिंदुत्ववाद्यांचाच फायदा झाला . सावरकर इंग्रजांना वचन देऊन फसले आणि इन ऍक्टिव्ह झाले ही परखड वस्तुस्थिती आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासारखे त्यांना सुद्धा भारतामधून पलायन करता आले असते आणि भारताबाहेर क्रांतिकारक कार्य करता आले असते पण त्यांनी हा पर्याय निवडला नाही ही वस्तुस्थिती आहे . याची दोन कारणे आहेत त्यांना स्पष्टपणे कळून चुकले होते की भारतातली स्वातंत्र्य चळवळ ही पूर्णपणे गांधी यांच्या हातात गेलेली आहे . त्यामुळे त्यांनी काही प्रयत्न केला असता तरी त्यांना कितपत प्रतिसाद मिळाला असता याबद्दलच मला शंका आहे कदाचित त्यांनाही शंका होती आणि दुसरी गोष्ट कळत नकळत ते अंदमानच्या तुरुंगवासामध्ये एक्झॉस्ट झाले होते . त्यांच्या दुर्दैवाने त्यांना अर्जुन मिळाला नाही त्यामुळे त्यांचा सांगेन गोष्टी युक्तीच्या चार हा कृष्ण बाणा फार कामाला आला नाही . किंबहुना मुळात युद्धभूमीच गांधीजींचे आणि काँग्रेसच्या ताब्यात गेली होती त्यामुळे अर्जुन बनवले तरी रथ चालणे शक्य नव्हते मुळातच जो टिळकांचा प्रॉब्लेम होता तोच त्यांचा होता तो म्हणजे ब्राह्मण अनुयायी ! स्वतःच्याच ब्राह्मण धर्मामध्ये आत्मरत असलेला असा हा पुरोहितांचा वर्ग आहे तो स्वतःला खूप भव्य दिव्य समजतो खरा परंतु प्रत्यक्ष भारतीय समाजावर त्याचा प्रभाव नाही. लोक त्यांना सोयीस्करपणे वापरत असतात . अनेकदा तर फक्त कर्मकांड करण्यापुरते बोलवायचे असा फंडा ब्राह्मणेतर लोकांनी चालवलेला असतो. ते पुजेपूरते पाया पडतात आणि विसरून जातात . आता यात किती मोठेपणा शोधायचा ? पूजा पाठ सोडणे अलीकडच्या काळामध्ये सर्वच ब्राह्मण वर्गाने स्वीकारलेला अजेंडा आहे . दुर्दैवाने ब्राह्मणांची लोकसंख्या एवढी वाढली की आता काही लोक ब्राह्मणांच्यातसुद्धा बेकार झाले त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना रोजगार मिळावा म्हणून पूजापाठ पुनर्जीवन सुरू झाले शिवाय याचे पैसेही चांगले मिळतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की पूजा पाठ करण्यामध्ये खुद्द ब्राह्मण वर्गामध्येच सन्मान नाही जे काय सन्मान पूजापाठ नावाच्या गोष्टीमुळे दिला जातो तो फक्त तोंडापुरता आहे आणि आता याची कल्पना सर्व ब्राह्मण लोकांना आलेली आहे म्हणूनच कोणीही पूजा पाठांमध्ये आपल्या मुलांना घालायला उत्सुक नाही. ब्राह्मण वर्गांमधील सर्वात ढ विद्यार्थी आता पुरोहित बनतो ही वस्तुस्थिती आहे.


सावरकरांचा अनुयायी वर्ग हा असा होता आता अशा वर्गामधून अर्जुन कसा तयार होणार ? नेताजी सुभाष चंद्र बोस यांना अर्जुन बनवण्याचा काल्पनिक प्रयत्न झाला परंतु स्पष्ट सांगायचे तर बोस यांच्या कार्यामध्ये सावरकरांचे योगदान नाही . स्वतःचा अहंकार कुरवाळण्यासाठी हे ठीक आहे पण नेताजी सुभाष चंद्र बोस स्वयंभू होते गांधींच्या मुळे स्वातंत्र्य मिळाले नाही हे सिद्ध करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले असे सिद्धांतन करण्यासाठी केवळ हिंदुत्ववादी लोकांना नेताजी सुभाषचंद्र बोस हवे असतात पण याला प्रत्यक्षात फार काही अर्थ नाही. कल्पनेच्या आधारे फार उड्डाण भरता येत नाही .


मात्र सावरकरांच्या नावाने एक गोष्ट नक्की सांगता येईल ती म्हणजे हिंदूंचे स्वतंत्र संघटन त्यासाठी लागणारे स्वतंत्र तत्त्वज्ञान सावरकरांनीच दिले ही वस्तुस्थिती आहे . अशाच प्रकारचे दुसरे राजकीय तत्त्वज्ञ म्हणजे प्रबोधनकार ठाकरे त्यांच्यामुळे ही क्षात्र हिंदूंचे स्वतंत्र संघटन तयार झाले . धर्म केंद्री राजकीय विचार प्रणालीचे पुरोगामी शिल्पकार म्हणून सावरकरांचे नाव अतिशय महत्त्वाच्या राजकीय विचारवंतांच्या मध्ये कायमच घ्यावे लागेल . त्यांचा अभ्यास करावा लागेल .असा अभ्यास होऊ नये याची पुरेपूर काळजी काँग्रेसने घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच हिंदुत्ववाद वाढला त्याऐवजी जर का हिंदुत्ववादाची साधक बाधक चर्चा सुरुवातीपासूनच झाली असती तर कदाचित हिंदुत्ववाद एवढा वाढला नसता. राजकीय विचारांचा इतिहास लिहिणाऱ्या डोळे यांच्या पुस्तकांमध्ये हिंदुत्ववादाची फारशी चर्चा येत नाही यातच सर्व काही दिसते . तुम्ही विचारांच्या इतिहासात स्थान दिले नाही आणि या माणसाच्या राजकीय तत्वज्ञानातून नवा इतिहास निर्माण झाला हा काळाने केलेला काव्यगत न्याय म्हणावा काय ?


श्रीधर तिळवे नाईक



Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय