सांस्कृतिक जालता श्रीधर तिळवे नाईक
जगातील प्रत्येक संस्कृती प्रत्येक देश आणि प्रत्येक राज्य हे एक नेटवर्क कार्यजाल असते असते
जगातल्या प्रत्येक संस्कृतीच्या मागे शिव शक्ती संसार महाप्राण किंवा ईश्वर आणि जीव हे पाच आयाम असतात
शिव म्हणजे शून्य होय आणि तेच अभाव निर्माण करते हा अभाव जीवामध्ये अज्ञानामुळे निर्माण होतो
प्रत्यक्ष जगताना हा अभाव हाच स्थायीभाव असतो त्यातूनच शरीराला अस लागते आस लागते . तिच्यामधून आसक्ती आणि असोशी निर्माण होतात . जी असण्याची असते ती असोशी आणि जी जगण्याची असते ती आसक्ती .
आसक्ती घन , द्रव व वायुरूपात प्रकट होत राहते तिचे वायुरूप निकड माणसांमध्ये श्वास द्रवरूप तहान माणसांमध्ये पाणी आणि घनरूप भूक असते माणसांमध्ये अन्न असते
जीवाच्या बाहेर जगत असते जे जीवन पुरवत असते . अण्णा असो किंवा पाणी असो किंवा श्वास असो हे सर्व त्याला जगा मधून घ्यावे लागते यासाठी जगाशी जे काही चलनवलन होते त्याला व्यापार आणि हा कसा करायचा याचे जे नियम म्हणतात त्याला व्यवहार म्हणतात .
सर्व संस्कृतींच्या मध्ये या गोष्टी असतातच असतात.
या सर्व संसारामधला जो भाग जो भाग माणसाला जगण्यासाठी उपलब्ध होतो त्याला आपण जग म्हणतो या जगाला इतिहास असतो भूगोल असतो आणि हितेच प्रत्येक जीवाची स्वतंत्र संस्कृती तयार व्हायला लागते कारण त्याला मुळातच जगावर संस्कार करावे लागतात आणि जगात चे संस्कार आत घ्यावे लागतात हे अटळ असते या संस्कारामध्येच ठसे असतात प्रतिमा असतात प्रतीक असतं प्रतीक असतात
या सर्वांच्या उपस्थितीने मेंदूमध्ये जी जालना तयार होते ती जालना म्हणजे मेंदूची संस्कृती होय आणि ही संस्कृतीच माणसाचे संपूर्ण शरीर हाताळत असते
माणूस हा एकटा असत नाही तो अनेकदा समुदायात असतो आणि म्हणूनच या सगळ्या मेंदू संस्कृतींची मिळून जी तयार होते ती त्या समुदायाची संस्कृती असते. एका अर्थाने प्रत्येक माणूस हा स्वतःची आत्मसंस्कृती असतो किंवा जीव संस्कृती असतो.
यातूनच मग समुदायामध्ये आत्मसंस्कृती किंवा जीव संस्कृती आणि समुदाय संस्कृती अशा दोन पातळीवर संस्कृती वावरायला लागते यातील आत्मसंस्कृती ही सापेक्ष असते तर समुदाय संस्कृती ही निरपेक्ष असते
पुढे मग प्रत्यक्षात असे होते की फक्त एका समुदायाची संस्कृती अस्तित्वात येत नाही तर त्या समुदायाला अनेक इतर समुदाय भेटायला लागतात आणि त्यामुळे मग सांस्कृतिक मिलन तयार व्हायला लागते यातून एक बृहद संस्कृती तयार व्हायला लागते जी दोन संस्कृतींचे मिलन असते यातूनच मग या बृहद संस्कृतीचे निरपेक्ष असे काही तयार होते त्याला निरपेक्ष गृहद संस्कृती असे म्हटले जाते त्या उलट त्या संस्कृतीच्या अंतर्गत ज्या लघु संस्कृती असतात त्यांना सापेक्ष लघु संस्कृती म्हटले जाते
या बृहद संस्कृती सुद्धा एकट्या राहत नाही त्यामुळे अनेक इतर बृहद संस्कृतींशी त्यांचा संपर्क येतो आणि त्यातूनच राज्य संस्कृती तयार होते या राज्य संस्कृती एकमेकात तक्रायला लागतात आणि त्यातून राष्ट्र संस्कृती तयार होते आणि जेव्हा राष्ट्र संस्कृती एकमेकाला भेटायला लागतात तेव्हा मग त्यातून जिल्हा आज आपण जागतिक संस्कृती किंवा वैश्विक संस्कृती म्हणतो ती तयार होते
दोन संस्कृतींच्या दरम्यान व्यापार होतो आणि व्यवहारही होतो
प्रश्न असा आहे की मग प्रत्येक संस्कृती स्वतःची स्वायत्तता का टिकवायला बघते आणि ती खरोखर टिकते का ?
वास्तविक जी मेंदू संस्कृती असते ती मेंदू संस्कृती नेहमीच अनुभवत असते की तिचे शरीर हे मर्यादित आहे आणि ते स्वतंत्र आहे म्हणजेच आपली जी स्वतःची संस्कृती आहे आपल्या स्वतःच्या शरीराची जी संस्कृती आहे ती संस्कृती व्यापार आणि व्यवहार या दृष्टीने आपल्या शरीरापुरती मर्यादित आहे हे तिला कळत असते हितेच तिला सीमांचे भान येते हे सीमाभान माणसांमध्ये आपोआपच अनुवंशिक पद्धतीने चालत राहते आणि पुढे ते अधिक पुढे गेले की अण्णांनी उत्सर्जन यांच्या संदर्भामध्ये ते क्षेत्रभान बनते म्हणजेच अनेकदा मूत्र मारून प्राणी आपले स्वतःचे क्षेत्र निश्चित करतात आणि त्यातूनच क्षेत्रभान येथे तर मुळातच या सगळ्या संदर्भाच्या मुळाशी जे काही आहे ते सीमा भान आहे आणि हे सीमा बाण आपल्या जनुकांच्या मधून वाहत असते एकाच वेळेला आपण हे सीमाभान राखत असतो आणि ओलांडतही असतो कारण आपला व्यापार आणि व्यवहार हा असा आहे की अनेकदा त्याला सीमा ओलांडावे लागते
हीच गोष्ट नेमकी संस्कृतीच्या बाबतीत घडते आणि म्हणूनच संस्कृती सुद्धा स्वतःचे म्हणून संस्कृती भान नावाची गोष्ट निर्माण करते यातूनच अनेकदा प्रत्येक संस्कृती वेगळी आहे असा सिद्धांत निर्माण होतो परंतु प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती अशी असते की सर्व सिद्धांत सापेक्ष पातळीवरच खरे असतात तसा हा सुद्धा सिद्धांत सापेक्ष पातळीवरच खरा असतो अनेकदा संस्कृतींच्या मुळाशी आपण गेलो तर आपणाला तिथे अनेक घटक असेच सापडतात ज्यांना आपण निरपेक्ष संस्कृती घटक म्हणू शकतो उत्तर आधुनिक वादाने नको तितका सापेक्षत्रावर सापेक्षतावर भर दिला तर पुरोगामी लोकांनी नको तितका निरपेक्ष वादावर भर दिला प्रत्यक्षामध्ये जे जाल असते ते संस्कृती जाल नेहमीच सापेक्ष आणि निरपेक्ष अशा दोन तणावातून स्वतः ला जाणत असते त्यामुळेच आपणाला उत्तर आधुनिक सिद्धांत स्वीकारता येत नाही कारण तो अनेकदा संस्कृतींना पूर्णपणे विघटित करायला लागतो हे जगा आणि जगणे विघटित करायला लागतो आणि त्यामधून फक्त भांडणे उद्भवतात संघर्ष उद्भवतो . त्यामुळे जर का आपणाला समायोजन वाढवायचे असेल युद्ध टाळायचे असतील तर सीमा भान आपण स्वीकारलेच पाहिजे पण त्याचबरोबर सीमा विस्तार हा घटक सुद्धा अस्तित्वात असतो आणि त्याचबरोबर सीमा आलिंगन सुद्धा अस्तित्वात असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. संस्कृती या एकमेकाला मिठ्या मारतात आणि त्यातून अनेकदा नवीन मुले जन्माला घालतात नवीन संस्कृती जन्माला घालतात .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment