भारतीय राजकारणामधल्या दोन छावण्या आणि तिसरी शैव छावणी श्रीधर तिळवे नाईक 

अलीकडे फेसबुक वर दोन व्यक्तींनी कॉमेंट टाकल्या आहेत प्रथम पैगंबर शेख यांनी सुरुवात केली आणि मग त्याला त्याच पोस्ट नक्कल मारत फक्त शब्द बदलून दुसरी पोस्ट आली पण त्यामुळे माझी जी मांडणी आहे तिला पुष्टता मिळते. 

या दोन्ही पोस्ट पुढील प्रमाणे आहेत .


"देशाची मोठी समस्या ब्राम्हणवाद आहे. या गोष्टी पेठीय छावणीतले लोक पुढे येऊन स्वीकारू लागले आहेत. देशात धार्मिक तेढ आणि जातीय तणाव निर्माण करण्यात, तो वाढवण्यात ब्राह्मणी डोक्यांचे मोठे योगदान राहिले आहे. हे त्यांना माहिती असल्याने ते सद्य स्थितीत थोडे भयग्रस्त झालेले आहेत.


भाजप गेल्याने सर्वात जास्त नुकसान ब्राह्मणी छावणीचे झाले आहे. बहुजन फक्त पालखीचे भोई आहेत."


पैगंबर शेख 


"जगाची मोठी समस्या इस्लामी आतंकवाद आहे. या गोष्टी इस्लामी छावणीतले लोक पुढे येऊन स्वीकारू लागले आहेत. जगभरात धार्मिक तेढ आणि जातीय तणाव निर्माण करण्यात, तो वाढवण्यात इस्लामी डोक्यांचे मोठे योगदान राहिले आहे. हे त्यांना माहिती असल्याने ते सद्य स्थितीत थोडे भयग्रस्त झालेले आहेत. 


काँग्रेस गेल्याने सर्वात जास्त नुकसान इस्लामी छावणीचे झाले आहे. फुरोगामी फक्त पालखीचे भोई आहेत."


अश्विनी रोहित कुलकर्णी 


प्रश्न असा आहे की या दोन्ही पोस्टमध्ये सत्य आहे की नाही तर माझ्या मते या दोन्ही पोस्ट वस्तुस्थितीला धरून आहेत पण तरीही त्या एकमेकांच्या विरोधात वाटतात मग प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे ?

वस्तुस्थिती अशी आहे की जगभरात सर्वात मोठा प्रॉब्लेम इस्लामचा आहे आणि या देशांमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम हा इस्लाम बरोबरच ब्राह्मण्य वादाचा आणि या ब्राह्मण्याने (मी इथे ब्राह्मण म्हणत नाही कारण काही ब्राह्मण हे सरळ सरळ ब्राह्मण धर्माच्या स्पष्ट आणि स्वच्छ विरोधात आहेत ) स्पॉन्सर केलेल्या ब्राह्मण धर्माचा आहे .

गेली कित्येक शतके हे दोघेही एकमेकात लढत आहेत आणि आत्ताही लढत असतात पण प्रत्यक्षामध्ये दोघेही एकमेकांशी लढत असताना बहुजन लोकांना फक्त आपल्या लढाईसाठी वापरत असतात आणि एकमेकात झुंजवत असतात 

वस्तुस्थिती अशी आहे की जो तिसरा पक्ष आहे तो या दोघांनाही आळा घालायला बघतो त्यांचे योग्य ते यथार्थ मूल्यमापन करतो पण हा पक्ष कधीही आपल्या मीडियामध्ये पुढे येत नाही . हा पक्ष अर्थात हर हर महादेव वाल्यांचा आणि शिवाजी महाराजांचा पक्ष आहे पण तो कधीही स्पष्ट आणि स्वच्छपणाने मांडला जात नाही. उलट दोन्ही छावण्या शिवाजी महाराजांना आपल्या हिशेबाने वापरायला बघत असतात .

आपल्या अकॅडमीक चर्चेमध्ये हा पक्ष चर्चेला येत नाही कारण हा शिवपक्ष दोघांनाही शत्रू वाटतो मग ते फुलांचे नाव किती वेळा ही घेत असोत आणि आपल्याकडचा मीडिया आणि आपल्याकडचा अकॅडमीया हे दोघेही वरील दोन छावण्यांचा अड्डा बनून वावरत आहेत आणि असतात. साहजिकच तिसरा पर्याय जो बहुजन समाजातल्या ऍक्च्युली वस्तुस्थितीशी सर्वाधिक निगडित आहे त्याला कसलाही स्कोप मिळत नाही आणि त्याच्यातून कुठली राजकीय पार्टी सुद्धा उभी राहत नाही आणि झाली तरी तिला टिकू दिले जात नाही सर्वात वाईट गोष्ट म्हणजे बहुजन समाजाचे जे राजकीय पुढारी आहेत ते अत्यंत नालायक निघतात आणि आपल्या बहुजन वादाला पूर्णपणे मोडीत काढून फक्त स्वतःची सत्ता सांभाळत बसतात . ते अनेकदा या दोन छावण्यांशी वाटेल त्या तडजोडी करत बसतात दुसरी गोष्ट आंबेडकरांचा आवाका एकाही नेतृत्वाकडे नाही . किंबहुना भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर बहुजन समाजाला एका अत्यंत उंच अशा नेतृत्वाची गरज होती ती दुर्दैवाने कधीही पूरी झाली नाही . छोटे छोटे बारके बारके लोकच नेते म्हणून पुढे आले . त्याचा प्रचंड तोटा बहुजन समाजाला झालेला आहे. हिंदुत्ववादाच्या नवीन आगमनानंतर या बहुजन समाजाने नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आपले नेतृत्व पाहिले कारण ते तसे आहे अशी प्रतिमा खुद्द भारतीय जनता पक्षाने निर्माण केली त्याचा भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला . आजही पुरोगामी लोकांना नेमके काय झाले हे कळलेले नाही ते अजूनही आयडिया लॉजिकल वावड्या उडवत आहेत .

सर्वसाधारणपणे आपण पाहिले तर आपणाला असे दिसते की गांधीवादी ,आंबेडकरवादी, समाजवादी ,साम्यवादी वगैरे लोक हे सर्वसाधारणपणे पहिल्या छावणीत आहेत . त्यातील गांधी सुवर्ण मध्य काढताना दिसतात आणि त्यामुळे गांधीवादी सुद्धा मध्य काढताना दिसतात आणि त्याच्या जीवावर काँग्रेस हा पक्ष उभा आहे पण हा सुवर्णमध्य इस्लामकडे झुकलेला होता आहे आणि शहाबानो प्रकरणानंतर तो नको तितका उघडा पडला यावर मी खूपदा लिहिले आहे आणि तिथूनच हिंदुत्ववादाला नवा स्कोप मिळाला आणि हळूहळू एक सरकार सुद्धा त्यांचे आले 

गांधीजींचा हा सुवर्ण मध्य जवळ जवळ २०१४ पर्यंत अनेक वर्ष सत्तेवर होता. जेव्हा काँग्रेस सत्तेवर नव्हती तेव्हा सुद्धा इतर लोक सत्तेवर होते त्यामुळे एकंदरच २०२४ पर्यंत भारतावर या छावणीचे प्रभुत्व दिसते . गेल्या बारा वर्षात मात्र या छावणीला पराभव चाखावा लागला आणि तो फार जिव्हारी लागलेला दिसतो म्हणूनच आता फार मोठ्या प्रमाणामध्ये बोंबाबोंब होताना दिसते आहे .

त्या उलट दुसऱ्या छावणीचे जे लोक आहेत ते सत्तेची वाट बघत राहिले . हे प्रामुख्याने हिंदुत्ववादी आहेत . गेल्या काही वर्षांमध्ये हिंदुत्ववादी कधी नव्हे ते सत्तेवर आलेले आहेत आणि तेही सातत्याने सत्तेवर आलेले आहेत . साहजिकच वरच्या दोन्ही पोस्ट एकमेकांशी संघर्ष करताना दिसत आहेत.

या सगळ्यांमध्ये सर्वाधिक भरडला गेलेला जो समाज आहे तो बहुजन समाज आहे . मुळात त्याला आपल्या शैव-धर्माची जाणीव नाही इतका त्याला या दोन्ही छावण्यांनी स्वतःमध्ये वळवून हवा तो आकार दिला आहे. महाराष्ट्रामध्ये हा आकार देण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले त्यामुळे बहुजन समाज वैष्णव झाला पुढे वर्ण जातीवादी झाला आणि हळूहळू आता तो हिंदुत्ववादी छावणीला जाऊन पूर्णपणे मिळेल अशी चिन्हे दिसत आहेत . जवळजवळ ६०% वाटचाल या संदर्भामध्ये पूर्ण झालेली आहे आणि जी पहिली सेक्युलर छावणी आहे तिचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की तिला वारकरी संप्रदाय आणि वारकरी नीट हाताळता आले नाहीत याचे कारण त्यांनी वारकरी संप्रदाय हा सेक्युलर आहे किंवा ब्राह्मण विरोधी आहे असा बाळगलेला गैरसमज ! प्रत्यक्षामध्ये असे काहीही नव्हते हे एक ब्राह्मण लोकांनी रचलेले फिक्शन होते आणि आहे त्याला महाराष्ट्रातले सर्व पुरोगामी लोकांनी बळी पडावे याहून मोठी शोकांतिका नाही . अपवाद फक्त फुले आणि बाबासाहेब आंबेडकर ! त्यांना मात्र राम कृष्ण काय आहेत हे कळले होते शेवटच्या काळातला मोक्ष मिळवलेले तुकाराम वारकरी संप्रदायाने स्वीकारलेले नाही ते मग तोंडाने काहीही म्हणोत. त्यांच्या सामाजिक व्यवहारांमध्ये हा असामान्य आणि अद्भुत असा संत तुकाराम दिसत नाही . त्यांना तो स्वीकारायचा आहे असेही आता वाटत नाही इतके आता वर्ण जा त्यांचे पुनरागमन वारकरी संप्रदायामध्ये झालेले आह ते खरे तर होणारच होते कारण एकदा तुम्ही वैष्णव हाच आधार स्वीकारला गीता हा आधार स्वीकारला की मग पाठीमागून आपोआपच वर्णजातव्यवस्था येते पण हे तरी आता कितीदा आणि कोणाला समजावणार ? 

प्रश्न असा आहे की या सर्व पार्श्वभूमीवर तिसऱ्या छावणीने करायचे काय जिला या दोन्ही छावण्यांच्या मर्यादा कळलेल्या आहेत . 

याबाबतीत सध्या तरी स्थिति अशी आहे की जर का तुम्ही हिंदुत्ववादी छावणीत असाल तर शैव हिंदुत्ववाद स्वीकार करून त्याची व्याप्ती वाढवत न्या किंवा मग जर का तुम्ही पहिल्या छावणीत असाल तर मग शैव बसवेश्वर फुले वादी सेक्युलर वाद स्वीकारा आणि त्याची व्याप्ती वाढवत न्या 

सर्वात उत्तम पोझिशन स्वतःची स्वतंत्र तिसरी छावणी निर्माण करा परंतु सध्या तरी या गोष्टी होताना दिसत नाहीत म्हणून मग तडजोड म्हणून दोन्ही छावण्यांच्या मध्ये आपला पसारा वाढवत नेणे असा उद्योग सुरू आहे . भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे विचारवंत असे होऊन गेले की ज्यांना ब्राह्मण आणि इस्लाम या दोन्ही धर्मांच्यातले आणि त्यांच्या आक्रमणातले सगळे दोष व्यवस्थित दिसले होते . फुले यांच्या काळामध्ये मुस्लिम राजवटींचा इतिहास उपलब्ध न्हवता त्यामुळे त्यांना इस्लाम हा काय आहे हे नीट कळले नव्हते परंतु आंबेडकरांच्या बाबतीत मात्र हे घडले नाही त्यांना इस्लामचा इतिहास उपलब्ध झाला होता आणि म्हणूनच ते आपोआपच इस्लामच्या विरोधी गेले .नंतरच्या आंबेडकरवादी लोकांनी आंबेडकरांचा विचार या अंगाने पुढे नेण्याऐवजी काँग्रेसच्या अंगाने गांधीवादाच्या नव वैष्णव अंगाने पुढे नेणे सुरू केले आणि शेवटी आपले सगळे स्वयंभू विचारप्रणालीचे अस्तित्व काँग्रेसमध्ये विसर्जित करून टाकले नंतर हाच उद्योग हिंदुत्ववादाबाबत झाला . याला जबाबदार पुन्हा या तिसऱ्या छावणीचे राजकीय नेते आहेत या लोकांना बहुजन समाजाबद्दल कसलेही प्रेम नाही हे लोक फक्त त्याला आपली निवडून येण्याची आणि शत्रूला पाडण्याची सापशिडी म्हणून वापरतात . 

यामुळेच मग शैव आचार्यांच्या बाजूने राजर्षी महाराजांच्या नेतृत्वाखाली शैव हिंदुत्वाच्या हिशेबाने एक खेळी खेळली गेली आणि ती होती नरेंद्र मोदी ! तिने हर हर महादेव ची व्याप्ती वाढवली ही वस्तुस्थिती किंबहुना शैव धर्माचा जेवढा विचार हिंदुत्ववादी लोकांनी अलीकडच्या काळामध्ये केला तेवढा विचार पुरोगामी लोकांनी आधी केला असता तर ते ज्या ट्रॅप मध्ये फसले त्या ट्रॅप मध्ये ते फसलेच नसते . पण पुरोगामी लोकांना एकंदरच जैन, बौद्ध, वैष्णव , आणि वैदिक लोकांच्या बद्दल प्रचंड प्रेम आहे आणि ते प्रेम इतके आहे की बहुजन समाजाचा धर्म शैव धर्म आहे ही साधी बेसिक गोष्ट सुद्धा यांच्या लक्षात आली नाही . अगदी बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा ही गोष्ट लक्षात आली नाही आणि कळत नकळत ते बौद्ध धर्माच्या तत्कालीन प्रभावाखाली आले . अर्थातच बौद्ध धर्म हा मुळात शैव धर्मच आहे असे मी मानतो त्यामुळे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला हे एका अर्थाने योग्यच झाले पण आज जो बौद्ध धर्माचा ना इतिहास उपलब्ध होत आहे तो पूर्णपणे समाधान करणारा नाही हे सुद्धा सांगावे लागते . जैन धर्म हा सुद्धा शैव धर्माचाच भाग होता तो पुढे नंतर वेगळा करण्यात आला . त्यामुळे जे लोक बौद्ध धर्मात गेले ते शत्रू नाहीत असे मी नेहमीच ओबीसी लोकांना सांगत असतो . असो. पण याचा परिणाम काय होतो तर आज सुद्धा कुंभमेळा आला की या पुरोगामी लोकांची बोंब सुरू होते अशा प्रकारची बोंब कधी वारकरी चळवळीची वारी सुरू होते तेव्हा कधी मारलेली दिसत नाही याचे कारण हे लोक बहुजन विरोधी आणि शैवविरोधी आहेत मग ते स्वतःला कितीही पुरोगामी समजोत. एकेकाळी या धर्माच्या विरोधात जाऊन सुद्धा तुम्ही बहुजन समाजाची मते मिळवू शकत होता म्हणून तुम्ही निवडून येत होता पण आता बहुजन समाज स्वतःच्या धर्माविषयी जागृत होत चालला आहे आणि म्हणूनच तुम्ही निवडणुकीत सातत्याने पडत आहात . शेवटी नाईलाजाने ममता बॅनर्जी यांनी अतिरेक केला तेव्हा त्यांना सुद्धा शैव लोकांनी बंगालच्या निवडणुकीत व्यवस्थित पाडले . यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा शाक्त पंथाचा आहे हे यांना कळले नाही. मुस्लिमांचे अतिरेकी लाड ममता बॅनर्जी यांनी करायला सुरुवात केली आणि मग तिथल्या शाक्त लोकांनी बरोबर त्यांना धडा शिकवला . पुरोगामी लोक अजूनही या भ्रमात आहेत की बहुजन समाज पूर्वीसारखा सेक्युलर आहे तो आता पूर्वीसारखा राहिलेला नाही दुर्दैवाने तुमच्या नतत्रष्टपणामुळे तो तुमच्यापासून वेगळा झाला आणि आता तो हिंदुत्ववादाला मिळालेला आहे किंबहुना त्याने हिंदुत्ववादाकडे जावे अशी सोय तुम्ही तुमच्या सगळ्या युरेशियन राजवटींच्या मध्ये करत होता आजही तुम्हाला अक्कल आलेली नाही . आता तर अवस्था अशी आहे की नव बौद्ध विरुद्ध शैव असे द्वंद्व निर्माण करण्यात आलेले आहे आणि हे द्वंद्व अंतिमतः ब्राह्मण्यवादाला मदत करणार आहे हे नव बौद्ध लोकांच्या लक्षातच येत नाही . हे लोक व्यवस्थितपणे ब्राह्मण्याचा आणि ब्राह्मण धर्माचा अजेंडा शैव लोकांना विरोध करून चालवत आहेत. बौद्ध लोकांचा आंधळेपणा हा काही आत्ताचा नाही त्याने आठव्या शतकात हाच उद्योग केला आणि स्वतःची वैचारिक आत्महत्या ओढवून घेतली नव बौद्ध पुन्हा एकदा दुसऱ्या आत्महत्ये कडे जात आहेत पण त्यांना हे कोण सांगणार ? 

इस्लाम या लोकांचा फक्त वापर करत आहे कारण त्याला हे माहित आहे की अंतिम लढाई जेव्हा आपल्यात आणि ह्यांच्यात होईल तेव्हा आपण सहजरीत्या यांना निपटून काढून फेकून देऊ . पुरोगामी लोकांना इस्लामी विचार प्रणाली आणि डोके कसे काम करते याची कल्पना येत नाही त्यांना हे कळतच नाही की शेवटी इस्लामिक राजवटीमध्ये सर्वात प्रथम पुरोगामी लोक कापले जातील. कदाचित ब्राह्मण लोक आपले वेद दाखवून आणि बौद्ध लोक स्वतःचे धर्मग्रंथ पिटक दाखवून पुन्हा एकदा हे पहा आम्ही किताबी धर्मात येतो असे सांगून जिझिया कर देत स्वतःला वाचवू शकतील वैष्णव लोक सुद्धा गीता दाखवून वाचतील पण पुरोगामी लोकांना अशा प्रकारची वाचण्याची कसलीही संधी नाही आज अफगाणिस्तानामध्ये एकही पुरोगामी शिल्लक नाही इतकी साधी गोष्ट सुद्धा यांना लक्षात येत नाही . नास्तिक धर्म आणि लोकायतवाद हा इस्लामचा सर्वात मोठा आणि पहिला शत्रू आहे हे जोपर्यंत पुरोगामी लोकांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत पुरोगामी वादाचे काहीही खरे नाही . आज ना उद्या पुरोगामी वादाला शैववादाकडेच यावे लागेल . फक्त हे लोक आंधळेपणात किती काळ काढणार एवढाच प्रश्न उरलेला आहे . जेवढ्या लवकर डोळे उघडतील तितके बरे. 

अर्थात एक तिसरा पर्याय सुद्धा उदयाला येऊ शकतो आणि हा तिसरा पर्याय लोकायतवादाचा आहे. नास्तिक लोकांची बहुसंख्यांक पार्टी तयार होणे हे त्यासाठी आवश्यक आहे एकेकाळी कम्युनिस्ट पक्ष असा नास्तिक होता परंतु या नास्तिक पक्षाने भांडवलशाहीच्या विरोधासाठी आणि अमेरिकेच्या विरोधासाठी म्हणून इस्लामला नको तितकी मदत केली . परिणामी अमेरिका थेट रशियाच्या विरोधात अफगाणिस्तान मध्ये उतरली आणि तिने कम्युनिझम विरोधात इस्लामला विजयी केले. भारतातल्या कम्युनिस्टंना आपण अफगाणिस्तानामध्ये इस्लाम कडून पराभूत झालेलो आहोत इतकी बेसिक गोष्ट पण कळलेली नाही . त्यांना असे वाटते की आपण अमेरिकेकडूनच पराभूत झालो आहोत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ही अमेरिका आणि इस्लाम यांची युती होती आणि लक्षात ठेवा इस्लाम हा वेळ प्रसंगी भांडवलशाहीशी युती करू शकतो किंबहुना भांडवलशाहीला इस्लाम इतका फायदेशीर दुसरा धर्म नाही . त्यामुळेच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आज सुद्धा इस्लाम शी तडजोडी करतात सर्व इस्लामिक कंट्री मध्ये इस्लाम हा भांडवलदारबरोबर राज्य करतो आहे आणि युरो अमेरिकन भांडवलदारांच्या बरोबर युरोअमेरिकन कंपन्यांच्या बरोबर युती पण करतो आहे. एकंदरीत कम्युनिस्ट लोकांचे आकलन दिवाळखोरीत गेलेले असते. या लोकांनी जर का युरोपमध्ये विशेषत: इंग्लंड मध्ये ज्याप्रमाणे ठामपणाने नास्तिक भूमिका घेतली गेली तशी घेतली असती तर कदाचित कम्युनिजम इतक्या लवकर नाहीसा झाला नसता पण दुर्दैवाने असे घडलेले नाही माझे स्वतःचे स्पष्ट मत असे की समाजवादी आणि साम्यवादी लोकांनी स्वतःची पार्टी नास्तिक म्हणून डिक्लेअर करावी आणि सर्वच्या सर्व धर्मांच्या वर यात आमचे शैव धर्म सुद्धा येतात क** टीका करायला घ्यावी अन्यथा तुम्हाला काहीही भविष्य नाही. आत्ताच्या कॉक्रोच पार्टीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जर काय असेल तर ते म्हणजे कळत नकळत तिथे एक प्रकारचा नास्तिकपणा चमकताना दिसला . या नास्तिक वादाला हवा कशी देता येईल ते खरे तर पाहायला हवे पण ते पाहण्या ऐवजी या लोकांनी काही भलतेच अर्थ काढले कारण भाजप विरोधात जाऊन पुन्हा एकदा सत्ता प्राप्त करणे हाच या लोकांचा मुख्य अजेंडा आहे . भारतातला नास्तिक वाद हा फार जुना वाद आहे कारण ज्या अर्थाने क्रिएटर म्हणून ज्यू ख्रिश्चन आणि इस्लाम मध्ये विश्वास ठेवला जातो तशा प्रकारचा विश्वास भारतात ना शैव धर्म ठेवतो ना जैन ना बौद्ध ! हे एका अर्थाने सगळे नास्तिक धर्म आहेत. त्यामुळेच आंबेडकर या आंदोलनामध्ये अधिक उचलले गेले कारण एका बाजूला ते बुद्धाकडे आहेत व दुसऱ्या बाजूला ते नास्तिक आहेत. प्रश्न असा आहे की नवीन पिढी नास्तिक बनली आहे का ? माझ्या मते जगभरातच नास्तिकांची संख्या वाढत चाललेली आहे . आपल्याकडची झेड जनरेशन त्याला अपवाद नाही . तुम्ही त्यांना चंगळवादी बनवणार त्यासाठी भांडवलदारांना कार्पोरेट कंपन्यांना मदत करणार आणि दुसरीकडे ती धर्मनिष्ठ राहावी अशी अपेक्षा करणार यामध्ये विरोधाभास आहे हे सुद्धा हिंदुत्ववादी लोकांना कळत नाही . दारू पाण्याइतकी स्वस्त आणि अवेलेबल केल्यानंतर ती पिल्याशिवाय थोडीच ही पिढी थांबणार आहे ? नशिले पदार्थ काँग्रेसच्या काळात कंट्रोलमध्ये आणता आले नाहीत पण तुम्ही तरी काय केले अगदी तुम्हाला सुद्धा हिंदुत्ववादी असून सुद्धा ते तुमच्या राजवटींच्या काळात कंट्रोल मध्ये आणता आले नाहीत ही वस्तुस्थिती ! मग ही पिढी जर का ड्रगच्या आहारी गेली तर बोंबा कशाला मारता? ये तो होना ही था . ही पिढी देवा बाबत सुद्धा अत्यंत सोयीस्कर रित्या अस्तिक आहे जो पावतो तो देव अशी यांची देवाची व्याख्या आहे कदाचित हिंदूंची सनातन व्याख्या सुद्धा हीच असावी . ( अलीकडे मात्र झपाट्याने ही नवीन पिढी शैव देवतांच्याकडे भगवान शंकर पार्वती आणि त्यांची विविध रूपे यांच्याकडे सरकताना दिसत आहे यांच्या स्टेटस मध्ये अनेकदा आज-काल भगवान शंकर दिसत असतात त्याचे कारण तेच आहे )त्यामुळे साम्यवादी लोकांना एका अर्थाने ही नवी जनरेशन म्हणजे नास्तिक तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याची प्रचंड मोठी संधी आहे पण गमतीचा भाग असा की हे लोक इस्लाम शी युती करून बसलेत . आता नास्तिक पणा आणि इस्लाम यांचे नाते कसे जुळावे ? याबाबत जो कठोरपणा चीनने दाखवला आहे तोच भारतातल्या कम्युनिस्टांना आणि सोशालिस्ट लोकांना स्वीकारावा लागेल . पण हे करण्याचे धाडस इथल्या डाव्या लोकांच्यात आहे असे मला वाटत नाही मुळात पूर्वीही ते नव्हते . त्यामुळे नास्तिक पणाची तिसरी पार्टी तयार होणे फार अवघड झाले .

या सगळ्या प्रकारामध्येच मग एक तडजोड म्हणून शैव हिंदुत्ववाद आणि शैव सेक्युलर वाद अशा दोन विचार प्रणाली चालवणे माझ्यासारख्या लोकांच्यासाठी अटळ बनत गेले. कारण दोन्ही पक्षांच्या मध्ये दोन्ही छावण्यांच्या मध्ये बहुजन समाज विभागला गेलेला आहे यामध्ये बहुजन वादाची मांडणी करणाऱ्या लोकांना आता जरी रस नसला तरी त्यांना एक ना एक दिवस याशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात येईलच . आणि समजा तुमच्या लक्षात नाही आले तर तुम्हाला विचारतो कोण नवीन पिढ्या आमच्या बाजूने आता झुकत चाललेल्या आहेत .

श्रीधर तिळवे नाईक 


Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती