कसोटी क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू सुनील गावस्कर श्रीधर तिळवे नाईक 

सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरवताना अलीकडे एक नवीनच कॅटेगिरी आली आहे ती म्हणजे सर्वोत्कृष्ट टीमच्या विरोधात कोणाचा किती स्कोर झाला आणि कोण किती एव्हरेज न लढले 


यामध्ये सर्वाधिक स्कोर म्हणून सचिन तेंडुलकर प्रथम स्थानी असला तरी तो सर्वोत्कृष्ट म्हणता येईल का असा प्रश्न येतो कारण थेट स्पर्धा दिसते ॲलन बॉर्डर ची सरासरी थोडी जास्त आहे पण स्पष्ट सांगायचे तर त्याला त्या काळातील सर्वोत्कृष्ट बॉलिंग ऑस्ट्रेलियाचे होती ती फेस करावी लागलेलीच नाही हीच गोष्ट डेव्हिड ग्रोवरची आहे मात्र तो एक सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे याबद्दल कोणाला शंका नसावी सचिन सुरुवातीला फारच आक्रमक खेळायचा त्याचा थेट परिणाम त्याच्या सरासरीवर झालेला दिसतो सर्वाधिक शतके त्याच्या नावावर आहेत मात्र सर्वोत्कृष्ट असा एकच एक खेळाडू यातून काढता येत नाही . नेहमीप्रमाणे डॉन ब्रॅडमन टॉप वर पण बाकीच्याचे काय ? दोन नंबर वरच खरा प्रश्न आहे आणि तिथे मग आपणाला सगळ्या वातावरणाचा विचार करता आणि सरासरीचा विचार करता चक्क सुनील गावस्कर दिसायला लागतात त्यांची थोरवी कळायला लागते त्यांची सरासरी चक्क सचिन तेंडुलकर पेक्षा जास्त आहे . आणि त्यांनी ज्या बॉलर्स ना तोंड दिले तेही हेल्मेट शिवाय ते बघता दोन नंबरला निर्विवादपणे सुनील गावस्कर यांना ठेवावे लागते आता हा निष्कर्ष फार विचित्र वाटेल पण मला तरी असेच वाटते. जो रूटसारखा आत्ताचा खेळाडू तर पहिल्या दहात पण येत नाही ब्रायन लारा कायमच सरासरी चा प्रश्न आला की बारगळत जातो त्याचे सातत्य हे अव्वल दर्जाचे नव्हते ही गोष्ट नेहमीच त्याच्या विरोधात जात आलेली आहे . पण एकाच खेळीमध्ये प्रचंड सातत्य ठेवत दोन वेळा सर्वोत्कृष्ट सर्वात जास्त स्कोर करणे यामुळे तो ग्रेट वाटत राहतो . विराट कोहली ची सुद्धा स्थिती पहिल्या दहात नाही एकंदरीत कसोटीचा प्रश्न आला की विराट कोहलीने निवृत्ती घेतली ते बरे झाले असेच वाटते . त्यालाही बहुदा हे कळाले असावे म्हणूनच त्यानेही निवृत्ती घेतली शेवटी पाच पाच दिवस खेळणे प्रचंड स्टॅमिना मागते आणि हा स्टॅमिना कसोटी मध्ये वाया घालवण्यापेक्षा आपण ५०-५० मध्ये अनेक विक्रम करावे असे वाटले असावे कारण तिथे त्याच्या आसपास सुद्धा सध्या कोणी नाही. जी स्पर्धा होती ती सचिन तेंडुलकरची होती . कसोटी मध्ये मात्र सचिन फारच पुढे आहे. 


एकंदरीतच सर्व गोष्टींचा विचार करता डॉन ब्रॅडमन हे पहिले असले तरी आधुनिक क्रिकेटमध्ये सर्वात उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुनील गावस्कर यांचेच नाव घ्यावे लागते . त्या काळामध्ये टीमचा फार सपोर्ट त्यांना नव्हता हे लक्षात घ्यायला हवे . कारण मुळात भारतीय टीम फार मजबूत नव्हती. 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती