शिक्षण आणि त्याविषयीचे काही प्रश्न १ श्रीधर तिळवे नाईक
१ सर्वात पहिला प्रश्न ज्ञानातून राजकीयता निर्माण व्हायला हवी कायदा निर्माण व्हायला हवा की राजकीय इथून गोष्टीतून ज्ञान आणि कायदा निर्माण होतो याचे स्पष्ट उत्तर ज्ञानातून राजकीयता निर्माण होते कायदा निर्माण होतो आणि त्या कायद्यानुसार सत्ताही निर्माण होते मी जेव्हा धर्माला राजकीय विचार प्रणाली म्हणतो तेव्हा मला हेच म्हणायचे असते की प्रत्यक्षामध्ये सत्तेने कसे वागावे हेच धर्म सांगत असतो मोक्ष हा सत्तेने कसे वागावे ते सांगत नाही तो सत्य काय आहे ते सांगतो आणि सर्व क्षेत्रांना आपली द्वादशशीलता अप्लाय करतो तो ज्ञानातून नव्हे तर ज्ञानाच्या अंतातून जन्मतो आणि त्यामुळे एक अलौकिक शहाणपण तो व्यक्त करतो आणि त्या अलौकिक शहाणपणाचा अविष्कार म्हणून द्वादशशीलता जन्मते ही सर्वसाधारणपणे पूर्वीच्या काळी फक्त पंचशील होती पण आत्ताच्या काळात ती द्वादशशील झालेली आहे . ज्याप्रमाणे सर्वच व्यक्तींनी ती पळायला हवी त्याचप्रमाणे राजकीय व्यक्तीने सुद्धा ती पाळायला हवी.
२ एकदा ज्ञानातून कायदा जन्मतो हे स्पष्ट झाल्यानंतर ज्ञान हे सर्व राजकीय गोष्टींच्या बाहेरच राहिले पाहिजे खडा गोंधळ आहे खरा गोंधळ हा आहे की राजकीय लोक आपली सत्ता ज्ञानाला ताब्यात घेण्याच्या संदर्भामध्ये वापरायला पहात असतात कारण त्यांना आपली राजकीय सत्ता कायमच विद्यार्थी वर्गावर चालवायची असते कारण विद्यार्थी हे भविष्यातले नागरिक असतात मुळातच राजकीय संस्थांना या गोष्टी करू देणे हाच मूर्खपणा होता परंतु हा मूर्खपणा धर्माने केलेला आहे आणि म्हणूनच सर्व गोंधळ निर्माण झालेला आहे याला अपवाद फक्त भारतीय शैव श्रुतीतले धर्म आहेत त्यांनी कायमच राजकीय सत्तांच्या पासून ज्ञान व्यवस्था वेगळी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंबहुना त्याचाच भाग म्हणून सर्व ज्ञान हे मंदिर व्यवस्थेच्या माध्यमातून चालले पाहिजे असा तत्कालीन आग्रह भगवान शंकर यांनी धरला होता आत्ताच्या काळात तो शक्य नाही म्हणून आपण शिक्षण मंदिरे स्वतंत्र हवी केली पाहिजेत उभी केली पाहिजेत आणि त्यांची व्यवस्था ही पूर्णपणे ज्ञाने लोकांच्या हातामध्ये दिली पाहिजे म्हणजेच भौतिकशास्त्राचे संपूर्ण ज्ञान व्यवस्थापन हे भौतिक शास्त्रज्ञांनी चालवले पाहिजे त्यांनी ठरवले पाहिजे की नवीन ज्ञान आले आहे ते कसे स्वीकारावे परंपरेतले ज्ञान खरोखर प्रामाण्यावर उतरते की नाही आणि जे प्रामाण्यावर उतरते ते कसे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावे अभ्यासक्रम काय असावा . दुर्दैवाने या संदर्भातच नको त्या सत्ता राजकीय लोकांना दिल्यामुळे आत्ताचे सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत जोपर्यंत भारत आपल्या प्राचीन शैव शहाणपणाकडे आणि अनुशासनाकडे येत नाही तोपर्यंत याबाबतीत काही प्रगती होणे शक्य नाही. जगातले सर्व धर्म जेव्हा ज्ञान ही फिक्स गोष्ट समजत होते तेव्हा शैवच फक्त असे होते की जे ही व्यवस्था चंचल आहे हे जाणून होते त्यामुळेच ते वास्तवाला माया म्हणत होते आणि वास्तवाचे प्राप्त होणारे ज्ञान म्हणजेच माया होय याची त्यांना कल्पना होती त्यांना हे माहीत होते की वास्तव उपस्थितीमध्ये वेगळे असते आणि आपणाला दिसते ते वेगळे आहे आपणाला ज्ञात होते ते वेगळे आहे आणि म्हणूनच आकलना नुसार तुम्हाला स्वतःचे अभ्यासक्रम सतत बदलावे लागणार याचा त्यांना अंदाज होता. त्यामुळे सनातन वगैरे सनातन धर्म वगैरे अशा गोष्टी कधीही शैव लोकांनी शैव धर्मांनी सांगितलेल्या नाहीत त्यांनी कायमच नवीन गोष्टी येत राहणार हे स्वीकारलेले आहे आणि म्हणूनच आज सुद्धा शैव-धर्म शैव श्रुती स्वीकारायला प्रॉब्लेम येतो . पण मला असे वाटते की आत्ताचा जो काळ आलेला आहे त्याने शैव लोकांना बरोबर आणि इतरांना चुकीचे ठरवलेले आहे.
३ प्रश्न असा आहे की मग राजकीय गोष्ट कुठे येते तर जेव्हा गरिबांना शिक्षण घेणे परवडणारे असत नाही तेव्हा त्यांना शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे हे प्रशासनाचे काम आहे आणि प्रशासनाने ते व्यवस्थित पार पाडले पाहिजे आता त्यासाठी आवश्यक त्या ज्ञाने लोकांची नियुक्ती झाली पाहिजे. ज्ञानी लोकांची नियुक्ती झाली पाहिजे परंतु हितेच अनेकदा अत्यंत अडाणी असणारे राज्यकर्ते अत्यंत फालतू लोकांना कधी कधी शैक्षणिक अनुशासनांमधली पदे देताना दिसतात आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि या नेमणुका मुळात सरकारला करू देऊच नयेत यासाठी स्वतंत्र शैक्षणिक स्वयंभू अनुशासन अस्तित्वात असले पाहिजे तरच शिक्षण नीट चालणे शक्य आहे पण हे कधीही घडू दिले जात नाही याचे कारण आपल्यावर झालेले ब्रिटिशांचे संस्कार ब्रिटिशांना सर्वच देशाला गुलाम ठेवायचा असल्यामुळे त्यांनी पूर्णपणे शैक्षणिक व्यवस्था आपल्या गुलामगिरीत राहील याची काळजी घेतली आणि त्यानंतर आलेल्या सर्व राज्यकर्त्यांनी मग ते काँग्रेसचे असून किंवा भाजपचे असो किंवा समाजवादी असो किंवा साम्यवादी असो सर्वांनी शैक्षणिक व्यवस्था इंग्रजांच्या सारखीच आपल्या सत्तेच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच हा सर्व गोंधळ निर्माण झालेला आहे .
४ प्रश्न असा आहे की समजा अशा प्रकारची स्वतंत्र राजकारणापासून पूर्णपणे वेगळी आणि स्वतःच्या पैशाने चालणारी व्यवस्था आपण निर्माण केली तर तिच्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही का आणि हितेच द्वादशीशीलतेचा प्रश्न येतो आणि या अंगाने स्पष्ट आणि स्वच्छपणाने जे लोक द्वादशशीलता पाळतात त्यांच्याच नेमणुका हिते झाल्या पाहिजेत जर का हे लोक द्वादशशीलता पाळत नसतील तर त्यांना शांतपणाने सांगावे की तुम्ही प्रमुख प्रशासकाच्या आणि समितीच्या हाताखाली काम करा तुमची तज्ञता आम्ही व्यवस्थितपणे वापरू पण जोपर्यंत तुमची द्वार दशशीलता आम्हाला गॅरंटी ची वाटत नाही तोपर्यंत तुमचा प्रशासक म्हणून किंवा शासक म्हणून या ज्ञान व्यवस्थेमध्ये समावेश होणार नाही . जोपर्यंत मूळ नेमणुकीमध्येच द्वादशशीलता येत नाही तोपर्यंत नैतिकता प्रस्थापित होणे अत्यंत अवघड आहे
५ आपणाला एकदा का अभ्यासक्रम कोण निश्चित करणार हे निश्चित झाले की मग शिकवणार कोण हेही निश्चित करता येते त्यांच्या नेमणुका या ज्ञानस व्यवस्थेकडूनच झाल्या पाहिजेत राजकीय व्यवस्थे कडून नाही एखादा माणूस किंवा संस्था काढतो म्हणून त्याच्याकडे हा अधिकार येत नाही येता कामा नये उलटा त्याने आपले नाव द्यावे परंतु उरलेले सर्व अधिकार पूर्णपणे स्वतंत्र असलेल्या ज्ञान समितीकडे असल्या पाहिजेत असले पाहिजेत तरच ही व्यवस्था नीट चालेल . पुरोगामी कालखंडाने ज्ञान आणि सत्ता यांचा आपस आपापसात असलेला संबंध नको तितका घट्ट केला आणि जणू काय सत्ता म्हणजे शिक्षण आणि शिक्षण म्हणजे सत्ता अशा प्रकारचे समीकरण हृदयाला आले आणि आपले सर्व प्रश्न हे केवळ शिक्षणाने सुटतील अशा प्रकारचा अडाणीपणा निर्माण झाला प्रत्यक्ष मध्ये द्वादश शीलता शिक्षणामुळे प्राप्त होत नाही त्यासाठी व्यवस्थित वेगळे ट्रेनिंग द्यावे लागते आणि त्याचबरोबर त्या प्रकारचे आचरण होईल अशा प्रकारचे अनुशासन निर्माण करावे लागते . यामध्ये सुद्धा प्रत्येक विषयाचे अनुशासन वेगळे असल्याने आपणाला प्रत्येक ज्ञान विषयाचे वेगवेगळे तज्ञ लोक बोलवून त्यांच्याकडून ही व्यवस्था राबवावी लागेल . आज आपण असे पाहतो आहोत की प्राध्यापकांच्या नेमणुका सुद्धा ८० लाख आणि 70 लाख रुपये घेऊन होताना होत आहेत अशा वेळेला तुमच्या शैक्षणिक व्यवस्थेचे दिवाकर व्यवस्थेची दिवाळखोरी निघाली तर त्यात आश्चर्य काय ? जर प्राध्यापकांच्याच नेमणुका अशा पैसे घेऊन होणार असतील तर मग उरलेल्या अधिकारांच्या नेमणुका सुद्धा हळूहळू पैसे घेऊन होणार नाही त्यांची काय गॅरंटी ? शिक्षण क्षेत्र हे गंगोत्री आहे आणि पुढची गंगा काय पद्धतीने वाहील हे त्या गंगोत्री वर अवलंबून असते आता ही गोष्ट आम्ही वारंवार सांगण्याची गरज आहे का वास्तविक प्रशासन करणाऱ्या प्रत्येक माणसाला ही गोष्ट नीट माहीत असली पाहिजे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment