भाव, इबादत devotion, भक्ती आणि विठ्ठलीकरण १ श्रीधर तिळवे नाईक 

आपल्याकडे एक फार मोठी समजूत अशी आहे की विठ्ठल संप्रदाय हा फार सुरुवातीपासूनच मोठा विशाल संप्रदाय होता प्रत्यक्षामध्ये याचे कसलेही पुरावे मिळत नाहीत पण हे इतक्यांदा ब्राह्मण लोक सांगत असतात की आपणाला हळूहळू असे वाटायला लागते की हे खरे आहे पण प्रत्यक्षात ब्राह्मण लोक असे का सांगत आहेत हे मात्र कोणी बघत नाही विठ्ठल संप्रदाय हा तथाकथित पुरोगामी लोकांच्या दृष्टीने कितीही पुरोगामी असो परंतु ब्राह्मण लोकांच्या मते तो सनातन धर्माचा भाग आहे आणि कदाचित उद्या जर का सार्वजनिक बहुमत या संदर्भात घेतले गेले तर कदाचित ते ब्राह्मण धर्माच्या म्हणजे हिंदू धर्माच्या बाजूने पडेल. तुम्ही कितीही वैदिक विरुद्ध हिंदू असा संघर्ष मांडला तरी प्रत्यक्षामध्ये मात्र वैदिक हा हिंदू धर्माचाच भाग आहे आणि हिंदू हा वैदिक धर्माचा विस्तार आहे अशीच जनतेची समजूत आहे त्याला उपाय एकच असतो तो म्हणजे एक तर शैव धर्म स्वतंत्र आहे हे सत्य त्यांच्या लक्षात आणून देणे किंवा मग हिंदू धर्म स्वतंत्र आहे असे सांगणे यातील दुसऱ्या गोष्टीला आवश्यक असणारे पुरावे प्राचीन काळामध्ये मिळत नाहीत कारण प्राचीन काळामध्ये हिंदू हा शब्द दिसत नाही . त्या उलट तंत्र श्रुती किंवा शैव धर्म ह्या मात्र पूर्णपणे दहाव्या शतकापर्यंत आपणाला स्वतंत्र श्रुती अथवा धर्म म्हणून वावरताना दिसतात .

मग असे असून सुद्धा हा प्रपोगंडा यशस्वी कसा काय झाला ? हा लेख याचाच शोध घेण्याचा पहिला प्रयत्न आहे.

झाले असे की मुळात शैव ही मौखिक परंपरा असल्याने अनेकांना ही शैव परंपरा उपलब्धच नव्हती त्या उलट वैष्णव लोकांना मात्र मौखिक आणि लेखिका अशा दोन्ही परंपरा व्यवस्थित राबवण्याची सवय झाली होती कारण ब्राह्मण आणि पंडित या परंपरेच्या बाजूने दहाव्या शतकानंतर ठामपणे उभे राहील याचा फायदा त्यांना मुस्लिम कालखंडामध्ये झाला जो शैव कालखंडाला जितका मिळायला पाहिजे होता तितका मिळाला नाही म्हणजे अगदी शिवाजी महाराजांची कागदपत्रे सुद्धा अनेकदा कुठे ना कुठेतरी ब्राह्मणांच्यामुळेच किंवा परदेशी किंवा क्षत्रिय दरबारी शाबूत राहिलेली दिसतात.

पुढे मग ब्रिटिश लोकांनी भारत जिंकल्यानंतर ब्रिटिश लोकांच्यामुळे छापील स्वरूपात जसे अभंग निर्माण झाले तसे शैव लोकांचे साहित्य निर्माण झाले नाही आणि अचानक ब्राह्मण व पंडित हे सर्वात सुशिक्षित असल्याने साहजिकच त्यांनी त्यांच्या धर्माची पुस्तके प्रथम छापायला सुरुवात केली याचा एक दुष्परिणाम असा झाला की भारतामध्ये सर्वाधिक छपाई जी झाली ती वैष्णव पुस्तकांची झाली याचे कारण असे होते की वेद पवित्र असल्यामुळे वेद छापायचे की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता आणि शेवटी वेद प्रथम युरोपियन लोकांनी छापले हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्या उलट पुराणोक्त जे साहित्य होते ते छापायला अनुमती होती कारण ते ब्राह्मणांनी मुळात शूद्र लोकांच्यासाठी लिहिले होते त्यामुळे ते शूद्र लोकांना सुद्धा उपलब्ध असू शकते अशी कल्पना असल्याने वेदांच्या इतके पवित्र मानले जात नव्हते त्यामुळे साहजिकच छापण्याच्या तंत्राचा प्रचंड मोठा विलक्षण फायदा वैष्णव धर्माला या काळामध्ये मिळालेला दिसतो या वैष्णव धर्माने सर्वाधिक मोठी गोष्ट जर कुठली काही केली असेल तर ती म्हणजे बायबल सारखेच एक पुस्तक सर्वत्र प्रचारात आणायला सुरुवात केली हे पुस्तक होते भगवद्गीता ! मराठी भाषेत ज्ञानेश्वरी ! एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे या काळामध्ये ज्ञानेश्वरीची मूळ प्रत सुद्धा माहिती नव्हती या विषयावर प्रति शोधल्या जात होत्या जर का हा संप्रदाय इतका प्रचलित होता तर मग प्रति शोधण्यासाठी इतका आटापिटा का करावा लागला ?

दुसरी गोष्ट अशी होती की ज्या काळामध्ये स्वातंत्र्यसंग्रामाच्या दिशेने आणि आपल्या राजकीय गुलामगिरीच्या आकलनाच्या दिशेने भारतीय जनता प्रवास करत होती त्या दिशेने भारतीय जनतेला आता धार्मिक पुस्तकापेक्षा एका अशा राजकीय पुस्तकाची गरज होती जे एकाच वेळेला धार्मिक आणि राजकीय असू शकते . या दोन्ही गोष्टी आणि त्याला अधिक पूरक म्हणून युद्ध ही तिसरी गोष्ट या पुस्तकामध्ये असल्याने साहजिकच भारतीयांचे या काळातले राजकीय तत्त्वज्ञान हे पूर्णपणे गीता केंद्री होत गेले या गीतेचा अनुवाद सुदैवाने अनेक देशी भाषांच्या मध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या भाष्य पद्धतीने मुस्लिम काळामध्ये झाला असल्याने साहजिकच अचानक भगवान श्रीकृष्ण हे राजकीय पातळीवरचे सर्वात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून हळूहळू उदयाला येऊ लागले आणि ब्राह्मणांनी ते मुळातच केंद्रस्थानी आणायला सुरुवात केले कारण या नेतृत्वाचा एक राजकीय फायदा असाही होता की हे नेतृत्व एकाच वेळेला खांडववनाच्या प्रसंगातून आदिवासींच्या हिंसेला परमिशन देत होते वर्ण व्यवस्थेची अनुमती देत होते आणि त्याचे पावित्र्य टिकवण्यासाठी वर्णसंकर टाळण्याची अनुमती देत होते आणि त्याच वेळेला युद्ध करायचे असेल तर आपल्या स्वतःच्या लोकांचा मित्रांचा सुद्धा विचार करू नकोस त्यांची तू हत्या करू शकतोस त्यांना युद्धात मारू शकतोस अशी शिकवण सुद्धा देऊ शकत होते . याचे कारण असे की स्वातंत्र्यसंग्रामामध्ये सहभागी असणाऱ्या अनेक लोकांचे नातेवाईक हे खुद्द ब्रिटिश लोकांच्या बरोबर काम करणारे होते . आता आपल्याच भावांच्या बरोबर का लढायचे याचे नीट कारण गीतेमध्ये होते आणि ते कारण म्हणजे धर्मासाठी कर्तव्यासाठी हे करावे लागते .

या सगळ्याचा एक फायदा असा झाला की हळूहळू भगवत गीता ही हिंदू धर्माची मुख्य संहिता मुख्य धर्म संहिता म्हणून उदयाला आली आणि हळूहळू ती अतिशय छोटी असल्याने वाचन संस्कृतीची सवय नसणाऱ्या लोकांना वाचनासाठीच छोट्या आकाराची असल्याने सोयीची होती त्यामुळे तिचा प्रचंड प्रसार होत गेला प्रसरण होत गेले आणि सगळ्या समस्त हिंदूंची अशी एक गैरसमजुतच होऊन गेली की हिंदू नावाचा धर्म कोणीतरी आपल्या आधी फार प्राचीन काळी स्थापन केलेला आहे आपण त्या धर्माचे सभासद आहोत आणि आपल्या या धर्माचे बायबल प्रमाणे किंवा कुराणा प्रमाणे प्रमाणे एक पवित्र पुस्तक आहे एक ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीता होय .

मुळातच याची सुरुवात आपल्याकडच्या सर्व संत साहित्याने केली होती . याचे कारण मुस्लिम राजवटीविरोधात लढायचे असेल तर नेमके हेच प्रश्न समोर उभे होते म्हणजे असे की एकाच घराण्यातले जर का पुरुष असतील तर त्यातील काहीजण चक्क मुस्लिम राजवटीला सामील होते तर काहीजण मुस्लिम राजवटीच्या विरोधात होते त्यामुळे आपण अगदी शिवाजी महाराजांची युद्धे पाहिली तर तिथे सुद्धा अनेकदा आपलाच नातेवाईक समोर असायचा. खुद्द शिवाजी महाराजांना सुद्धा आपल्या भावाच्या म्हणजे संभाजी महाराजांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले होते . त्यामुळे महाभारत हे प्रत्यक्ष घरामध्येच लढले जात होते घडत होते अगदी नेमके हेच सर्व काही ब्रिटिश काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आकाराला आले. आता फक्त हे घरात राहिले नव्हते तर आता हे दारात आणि हळूहळू रस्त्यात पोचले .

या सगळ्याचा फायदा भगवद्गीतेला फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि भगवद्गीता आज सुद्धा ज्यांना हिंदू समजायचे आहे त्यांच्या केंद्रस्थानी आलेली दिसते आणि म्हणूनच आपणाला असे दिसते की बाबासाहेब आंबेडकर सुद्धा कळत नकळत हिंदू नावाचा धर्म अस्तित्वात आहे असे मानतात आणि या हिंदू नावाच्या धर्माच्या केंद्रस्थानी भगवद्गीता आहे हे स्वीकारतात . आता जर का बाबासाहेब आंबेडकर यांची ही अवस्था असेल तर विचार करा बाकीच्या लोकांची अवस्था काय असेल ? कारण आंबेडकरच असे होते की जे पुरावे शोधून निष्कर्ष काढत होते बाकी लोकमान्य टिळक यांना भगवद्गीता हवीच होती कारण त्यांच्या तत्त्वज्ञानाला ती सोयीची होती त्यामुळे ते पुरावे सिद्ध होण्या आधीच आपल्या ब्राह्मण धर्माच्या बाजूने बोलत होते आश्चर्यकारकरीत्या नंतर भगवद्गीता गांधी यांना सुद्धा सोयीची वाटली कारण त्यांना सुद्धा तत्वाकरता स्वतःच्या भावाविरुद्ध लढण्यासाठी ती प्रेरणा देत होती कारण ते ब्रिटिशांना स्वतःचा भाऊच मानत होते मुस्लिम लोकांना स्वतःचा भाऊच मानत होते .

भाऊबंदकीचा विषय हा काही आजचा होता अशातला भाग नाही आपल्याकडे रामायणामध्ये खुद्द रावण विरुद्ध विभीषण असा संघर्ष आहे वाली विरुद्ध सुग्रीव असा संघर्ष आहे त्यामुळे प्राचीन काळी भाऊ एकमेकांवर प्रेम करत असा आपला जो समज आहे तो चुकीचा आहे प्रत्यक्ष पुरावे काही तसे सांगत नाहीत अगदी पूर्णपणे अहिंसक असणाऱ्या गौतम बुद्धांना सुद्धा विरोध करणारे आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे त्यांचे भाऊच होते .खुद्द बायबल मध्ये सुद्धा केन आणि एबल यांच्यामध्ये भाऊबंदकी झालेली आहे त्याचे कारण सुद्धा तात्विकच आहे धार्मिकच आहे . खुद्द मोहम्मद पैगंबर यांना सुद्धा आपल्या नातेवाईकांशी लढावे लागले .

म्हणजेच या काळामध्ये आपण जर का डोकावले तर स्पष्ट दिसते की हिंदू असोत किंवा मुस्लिम असोत या दोघांनाही भाऊबंदकीच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत होते . औरंगजेबाने आपल्या भावांना कसे मारले ते समोरच होते म्हणजेच राजकीय लढा अनेकदा भावाच्या आणि भाऊबंदकीच्या संघर्षाला विरोधाला तोंड देत होता हाताळत होता. त्यासाठी त्याला एका राजकीय तत्त्वज्ञानाची गरज होती ते तत्त्वज्ञान भागवत गीतेने पुरवले आणि म्हणूनच मग एखादी गोष्ट तात्विक झाली की जे होते ते घडले ते म्हणजे इंडियामध्ये घराघरांमध्ये भाऊ एकमेकांशी भांडायला लागले आणि म्हणूनच भगवद्गीता अधिकाधिक लोकप्रिय होत गेली कारण भगवद्गीतेमध्ये," तुझा आचार्य असला तरी त्याला मारता येते तुझा आजोबा असला तरी त्याला मारता येते तुझा भाऊ असला तरी त्याला मारता येते "अशी शिकवणच आहे .

इथे प्रश्न अंड्याआधी की कोंबडी आधी असा येतो म्हणजे भगवद्गीतेमुळे आपण महाभारतासारखे युद्ध लढायला भाऊबंदकी करायला शिकलो की भाऊबंदकीमुळे महाभारत आणि भगवद्गीता आवडायला लागली ? 

या सगळ्याचा एक परिणाम असा झाला की ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अचानक लोकप्रिय झाली तुम्ही त्याच्या आधी जर पहाल तर ज्ञानेश्वरीची जी चर्चा होत होती ती फक्त ब्राह्मणांच्यात होत होती असे दिसेल आता मात्र तिची चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये यायला लागली कारण या काळामध्ये अनेक लढणारे लोक हे ब्राह्मण होते किंवा गांधीजींच्या सारखे ब्राह्मण धर्माच्या प्रभावाखाली होते. गांधीजींनी 1945 नंतर हळूहळू ब्राह्मण धर्माचा त्याग करायला सुरुवात केली आणि हे लक्षात घेणे घेण्याजोगे आहे की ज्या क्षणी त्यांनी हे सांगितले की मी वर्ण व्यवस्था मानणार नाही जातिव्यवस्था मांडणार नाही आणि यापुढे फक्त आंतरजातीय लगेच अटेंड करणार त्यानंतरच त्यांच्यावर हल्ले होण्याची प्रोसेस सुरू झाली. जोपर्यंत महात्मा गांधी मी वर्ण व्यवस्था मानतो असे म्हणत होते तोपर्यंत महात्मा गांधींच्या बद्दल कोणालाच काहीही प्रॉब्लेम नव्हता परंतु ज्या क्षणी महात्मा गांधी वर्ण व्यवस्थेच्या विरोधात गेले त्या क्षणापासून ते ब्राह्मण धर्माचे शत्रू झाले .

या भगवद्गीतेला केंद्रस्थानी आणण्यामध्ये जेवढा मराठी लोकांचा वाटा आहे तेवढा कोणाचाच नाही याचे कारण ज्ञानेश्वरी आणि तिला प्रमाण मानणारे भारताचे पहिले राष्ट्रीय नेतृत्व हे लोकमान्य टिळक होते आणि लोकमान्य टिळक भगवद्गीतावादी होते त्यांनी उघड उघडपणे गीतारहस्य लिहिले इतकेच कशाला त्यांनी वैष्णव धर्माला गीता धर्म असे नाव दिले ज्याचा परिणाम संपूर्ण भारतावर झालेला दिसतो साहजिकच लोकमान्य टिळक यांच्या काळामध्ये मराठी माणूस जे म्हणेल तेच सत्य तीच दिशा अशी गोष्ट होती आणि लोकमान्य टिळकांनी ती दिशा भगवद्गीतेच्या दिशेने नेली त्यामुळे साहजिकच भगवद्गीता ही फक्त धार्मिक ग्रंथ राहिली नाही ती भारताचा विशेषत: हिंदू कम्युनिटीचा राजकीय ग्रंथ बनून गेली . अगदी नेहरूंच्यासारख्या मनुष्याला सुद्धा गीतेची चर्चा करावीशी वाटली . कारण एक प्रकारची तशी वैचारिक सक्ती झाली होती.

त्यामुळेच आपण जर का या काळात बारकाईने पाहिले तर आपल्या लक्षात येईल की काँग्रेस सुद्धा भगवद्गीतेच्या समर्थनासाठी ठामपणे उभी आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा गीतेच्या मागे ठामपणे उभा आहे .

अर्थात या मागचे दुसरे कारण अर्थातच सेंसरशिप होते . ब्रिटिश लोकांनी या काळामध्ये ब्रिटिश लोकांनी या काळामध्ये इतके ताठर राजकीय धोरण स्वीकारले होते की त्या राजकीय धोरणातून सुटण्यासाठी धार्मिक पुस्तकांचा आधार घेणे याशिवाय कुठला पर्याय नव्हता साहजिकच धर्माचा आधार घ्यायचा आणि राजकीय आंदोलनाची मांडणी करायची ही या काळातली पद्धत होती आणि तुम्ही जर का खाडील करांची नाटके या काळामध्ये वाचली तर मी काय म्हणतो आहे ते तुम्हाला तपशीलवार कळू शकेल . उदाहरणार्थ बंगालच्या फाळणीवर या काळात लिहिलेले कीचक वध हे नाटक लॉर्ड कर्झनला इथे कीचक बनवले होते . जेव्हा तुमच्या देशामध्ये आणीबाणीची परिस्थिती असते तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे छुपे लिखाण करावे लागते 

तर मग भगवद्गीता राष्ट्रीय धर्माच्या नावाखाली या काळामध्ये राजकीय अजेंडा राबवण्यासाठी सोयीस्कर होती का ? तर होती.या काळातल्या संपूर्ण आंदोलनांच्या मध्ये छुपाछपी लपवा लपवा हा प्रकार फार चालला होता आणि यासाठी भगवान श्रीकृष्ण यांचे तत्त्वज्ञान पूरक होते त्यामुळे साहजिकच भगवद्गीतेचा प्रसार अधिकच झाला . आजही भगवान श्रीकृष्ण यांची लोकप्रियता ओसरत नाही याचे सर्वात मोठे कारण आज सुद्धा राजकारणामध्ये हे सर्व तसेच चालू आहे . अशा गुंतागुंतीच्या राजकारणामध्ये लोकांना कसे हाताळावे हे आपणाला भगवान श्रीकृष्ण यांच्यामुळे कळते असा अनेक लोकांचा या काळामध्ये दावा होता आणि आजही तो टिकून आहे . प्रत्यक्षात सर्वात मोठी समस्या भगवान श्रीकृष्ण होते पण हे कळायला मुळातच व्यवस्था कशा चालतात याच्या आकलन लागते ते फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होते म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांनी या अंगाने रीडल ऑफ श्री कृष्णा लिहिले होते . पण आंबेडकरांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा होता की ते पर्याय देऊ शकत नव्हते आणि जो पर्याय त्यांनी नंतर गौतम बुद्धाच्या रूपाने दिला तो खरोखर राजकीय पर्याय म्हणून यशस्वी झाला का असा प्रश्न आहे किंबहुना लोक जेव्हा महात्मा गांधी यांना विसाव्या शतकातले गौतम बुद्ध म्हणू लागले तेव्हाच गौतम बुद्ध हे स्वतंत्रपणे स्वयंभू म्हणून सिद्ध करणे बाबासाहेब आंबेडकरांना अधिक गरजेचे वाटायला लागले .

एका अर्थाने प्राचीन इतिहासावर आजचे राजकारण प्राचीन परंपरेवर वर्तमानातली राजकीय स्थिती लादण्याचा तिचे अन्वेषण करण्याचा हा प्रयत्न होता . आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा याला अपवाद नव्हते म्हणूनच ते शेवटी बुद्ध धम्माकडे आले 

प्रश्न असा येतो की मग ही बंदी का मोडून काढली नाही तर याचे कारण देणे फार अवघड आहे कदाचित आपण अधिक भयग्रस्त होतो म्हणून झाले असेल. किंबहुना क्रांतिकारक लोकांनी ही बंदी मोडायचा प्रयत्न केला परंतु त्यांना जो जनतेचा पाठिंबा हवा होता तो मिळाला नाही अशा वेळेला लोकसंख्या खूप महत्त्वाची असते आणि अशी लोकसंख्या क्रांतिकारक लोकांच्या मागे उभे राहिली नाही हे भारताचे दुर्दैव म्हणावे की सुदैव हा आज सुद्धा प्रश्न आहे पण एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे सुभाष चंद्र बोस यांच्यापासून याबाबतीत बदल व्हायला सुरुवात झाली होती . जर का ब्रिटिश भारत सोडून गेले नसते तर मला खात्री आहे भारतातल्या लोकांनी सशस्त्र क्रांती करून त्यांना पळवून लावले असते . अशा प्रकारची चाहूल आपणाला आझाद हिंद फौजेमध्येच लागते . किंबहुना ती या गोष्टीची सुरुवात होती आणि याची कदाचित चाहूल ब्रिटिश लोकांना लागली आणि म्हणूनच ब्रिटिश जाण्याचे आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ यशस्वी होण्याचे एक प्रमुख कारण आझाद हिंद फौज आहे हे आपणाला स्वीकारावे लागते. त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांना एक मुख्य स्वातंत्र्य योद्धा म्हणूनच बघावे लागेल . आणि आता आपण जर का हा प्रश्न विचारला की सुभाष चंद्र बोस यांची प्रेरणा कोणती तर त्यांच्यावर सुद्धा आपणाला भगवद्गीतेचा प्रभाव पडलेला दिसतो माझे स्वतःचे स्पष्ट मत असे की नेताजी सुभाष चंद्र बोस ही काँग्रेसची क्रांतिकारक शाखेची संघटना होती . एकीकडे अ हिंसक आणि दुसरीकडे हिंसक अशा दोन्ही पद्धतीने काँग्रेस येथे ऑपरेट झालेली दिसते पण यातल्या हिंसक गोष्टीला उत्तेजन द्यायचे नाही कारण शेवटी आपणाला सुद्धा आज ना उद्या राज्य करायचे आहे याची कल्पना काँग्रेसला होती त्यामुळे त्यांना आपल्या विरोधात सुद्धा यापुढे आंदोलन तेही हिंसक आंदोलन उभारू शकते याची कल्पना होती म्हणूनच त्यांनी हा मार्ग आपला मार्ग आहे हे कधीही सांगितले नाही त्यांनी कायम हा हिंसक मार्ग आऊटसाईडर्स म्हणून ट्रीट केला किंवा डिलीट केला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर का वारकरी संप्रदाय मुख्य म्हणजे त्याचा प्रभाव समजून घेतला तरच तो आपल्याला समजून घेता येतो अन्यथा अवघड होऊन बसते. वारकरी संप्रदाय अत्यंत पद्धतशीरपणे काँग्रेस मधल्या वैष्णव वादाने वाढवलेला संप्रदाय आहे आणि तोच त्यांनी प्रस्थापित संप्रदाय केला कारण त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी हा अत्यंत सोयीस्कर होता अलीकडच्या काळामध्ये नेमक्या याच गोष्टीचा व्यवस्थित विचार करून भाजपने सुद्धा वारकरी चळवळ वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आपल्या राजकीय तत्त्वज्ञानासाठी राबवायला ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळेच पुरोगामी लोकांची सर्वाधिक पंचाईत झालेली आहे . आता गमतीचा भाग असा आहे आम्ही केले तर ते चांगले आणि भाजपने केले तर मात्र ते वाईट असा काहीतरी विचित्र प्रकार विचित्र तर्कशास्त्र नेहमीच पुरोगामी लोक देत असतात पण असे होत नाही किंबहुना ज्यांना वाईट गोष्टी म्हटले जाते त्या सर्व वाईट गोष्टी अनेकदा भाजपने काँग्रेसकडूनच आत्मसात केलेल्या किंवा पुरोगामी लोकांच्याकडूनच शिकलेल्या आहेत प्रत्यक्ष राजकीय व्यवहारांमध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता त्या आज ना उद्या तुमचे विरोधक सुद्धा तुमच्या विरोधात करणार हे तुम्हाला गृहीत धरावे लागत काँग्रेसला हे फार नीटपणे कळत होते. म्हणूनच त्यांनी आपले राजकारण अधिक काळ चालवले आता भाजपची सुद्धा काँग्रेसच झालेली आहे त्यामुळे काँग्रेसच्या प्रमाणे दीर्घकाळ राजकारण करण्यासाठी जे जे करता येणे शक्य आहे ते ते भाजप करत आहे .

येत्या वीस वर्षांमध्ये वारकरी संप्रदाय हा या राजकारणाचा केंद्रबिंदू राहणार हे नक्की आहे . प्रश्न इतकाच आहे की शैव लोकांनी या काळामध्ये काय करावे? हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे तर तो कसा हाताळावा?

श्रीधर तिळवे नाईक 




Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती