मी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का मागितला? श्रीधर तिळवे नाईक 

मी सहसा कोणाकडेच राजीनामा दे असे म्हणत नाही पण अनेकदा सार्वजनिक जीवनामध्ये अपवादात्मक वेळेला का होईना पण अशी स्थिती येते की काही गोष्टी बोलाव्या लागतात . मी फार पूर्वीच आंदोलन सुरू होण्यापूर्वीच राजीनामा घ्या असे लिहिले होते याचे कारण हे प्रकरण चिघळत जाणाऱ याची कल्पना मला आली होती .

काळ बदललेला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला मंत्री माणसाला जबाबदार धरणे हे योग्य राहिलेले नाही अनेकदा मंत्री लोकांना कसलीही कल्पना न देता त्यांच्या नावाने व्यवस्थित खंडणी घेणारे लोक सुद्धा आहेत . त्यामुळे उठ सूट मंत्र्यांना जबाबदार धरणे बडे नाही पण त्याचबरोबर काही गोष्टी जर वेगळ्या घडत असतील तर त्या तपासाव्या लागतात धर्मेंद्र प्रधान यांच्याबाबतीत अशा वेगळ्या गोष्टी घडल्या आहेत .

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे शिक्षण क्षेत्र आहे आणि शिक्षण क्षेत्र म्हणजे सरळ सरळ पुढच्या पिढ्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असते. रीत असते . आपण हा सांभाळ नीट केला नाही आपण ही जबाबदारी नीट पार पाडली नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणे कधीही शक्य नाही त्यामुळे जर जबाबदारी बाबत हेळसांड झाली असेल तर पुढच्या पिढ्यांनी माफ करणे न करणे राहू दे बाजूला परंतु मुळात आपण अशी हेळसांड किंवा चुकाच का कराव्यात ? असाच प्रश्न विचारणे योग्य असते .

सर्वसाधारणपणे अनेक जण इथे लाल बहादूर शास्त्री यांचे उदाहरण देतात परंतु एक गोष्ट सांगितली पाहिजे की शास्त्री यांना सुद्धा राजीनामा देऊ नका असेच सांगण्यात आले होते कारण अपघाताला तुम्ही जबाबदारी नाही अशी ही मांडणी होती आणि ती बरोबर होती परंतु जेव्हा दुसऱ्यांदा राजीनामा मागितला तेव्हा मग त्यांनी तो दिला तेव्हाही त्यांना थांबवण्यात आले होते परंतु त्यांनाच ते पटले नाही . तो त्यांचा त्या काळातला विवेक होता कारण त्या काळात स्थिती अशी होती आजच्या काळात अशी स्थिती नाही हे मला मान्य आहे परंतु किती वेळा गोष्ट घडली म्हणजे ती हेळसांड मानावी हे ठरवणे शेवटी गरजेचे बनते. लालबहादूर शास्त्रींच्या बाबतीत प्रश्न तर फक्त रेल्वेचा होता शिक्षण क्षेत्रात अपघात होणे हे जर का पुन्हा पुन्हा घडत असेल तर तो फार मोठा भ्रष्टाचार होत जातो कारण प्रश्न फक्त वर्तमानाचा राहत नाही भविष्याचा म्हणत जातो आणि तोही संपूर्ण पिढ्यांचा बनत जातो शिक्षण क्षेत्रातील त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे हे स्वीकारावे लागते .

माझा प्रॉब्लेम याबाबतीत असा होता की पेपर फुटी चे प्रकरण २०१४ पासून सुरू झालेले आहे आणि त्या एकदा झालेल्या फुट्या नाहीत दर दर दोन वर्षातून हा गोंधळ झालेला दिसतो आता प्रत्येक वेळेला कसे काय तुम्हाला सांगणार की "नाही !तुमचा दोष नाही" याबाबतीत पेपर फुटी ला आळा घालणं ही तुमची जबाबदारी असते कारण शासन संस्थेची चूक एकदा झाली तर ती ठीक असते ती प्रशासनाकडे दुर्लक्ष झाले प्रशासनाचा बंदोबस्त करता आला नाही वगैरे मानत माफ करता येते परंतु तीच चूक दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा होते तेव्हा मग प्रशासनावर तुमची पकड उरलेली नसल्याचे ते लक्षण असते आणि नंतर जर का ती गोष्ट चौथ्यांदा होत असेल तर मात्र काहीतरी तुमच्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेमध्येच गोंधळ झालेला आहे त्याचे ते लक्षण असते. अशावेळी खरंतर पंतप्रधानांनी या सगळ्यांमध्ये पडणे गरजेचे असते परंतु बहुदा पंतप्रधान या सगळ्या गदारोळात पडणे आवश्यक मानत नाहीत किंवा त्यांची काही राजकीय मजबुरी दिसते . परंतु एक गोष्ट ही निश्चित आहे ती म्हणजे शिक्षण खात्याकडून तुम्ही सत्तेवर आल्यापासून म्हणजेच २०१४ पासून वारंवार काही ना काही तरी गोष्टी चुकलेल्या दिसतात. किंबहुना ज्या गोष्टी पारंपारिक पद्धतीने सुद्धा दुरुस्त करायला हव्या होत्या त्या सुद्धा झालेल्या नाहीत . त्यामुळे फक्त काळ काढणे वेळ काढणे अशा प्रकारची एक वृत्ती बळावलेली आहे की काय असे वाटते दुसरी गोष्ट भाजपने नेमलेले अनेक लोक हे अनेकदा अपात्र असतात असा माझा अनुभव आहे . तुमच्याकडे पात्र लोक नसतात असे नाही परंतु तुम्हाला मुळात पात्र किंवा प्रामाणिक लोकांच्या बद्दल भीती आहे किंवा प्रॉब्लेम आहे तुम्हाला जर कार्यक्षम लोक नको असतील आणि चाटुगिरी करणारे लोक पाहिजे असतील तर मग तुम्ही प्रशासन नीट चालवू शकणार नाही ही कृष्ण दगडावरची रेघ आहे आज सुद्धा जेव्हा देवेंद्र फडणवीस अजित दादांची आठवण काढतात तेव्हा मुख्यतः मॅनेजमेंट करणारा मनुष्य गेला हेच सर्वात मोठे दुःख असते तुमच्याकडे मॅनेजमेंट करणारी माणसे नाहीत असे नाही परंतु तुमचे त्यांच्याकडे लक्ष नाही कारण तुम्हाला ते लोक मत मिळवून देतील असे वाटत नाही प्रश्न असा आहे की मते मिळवून देणे ही गुणवत्ता आहे का ? आजच्या राजकीय लोकशाही युक्त परिस्थितीत ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठीक असते परंतु कधीतरी शेवटी तुम्हाला गुणग्राहकता दाखवावी लागते आणि तिला योग्य तो न्याय द्यावा लागतो नाहीतर मग काँग्रेसपेक्षा तुम्ही कुठे वेगळे आहात ? उलट काँग्रेसने तुमच्यापेक्षा अधिक चांगले प्रशासक नेमले होते हे आता सगळ्यांच्याच लक्षात यायला लागलेले आहे. प्रशासनाच्या व्यवस्थेमध्ये अतिशय उंचम आणि उत्तम प्रशासक असले पाहिजेत परंतु तुमच्या बाबतीत ते घडताना दिसत नाहीये आणि त्याचा परिणाम तुमच्या चांगल्या धोरणांच्या बाबतीत सुद्धा घडताना दिसतो . चांगल्या लोकांना साधे आमंत्रण सुद्धा तुम्ही देत नाही वास्तविक तुम्ही ते द्यायला हवे कारण चांगले लोक जे असतात ते असे पदासाठी हपापलेले असत नाहीत .त्यामुळे त्यांना तुम्हीच विनंती करावी लागते आणि जर का तुम्हाला याबाबतीत तुमचा अहंकार आडवा येत असेल तर तो अहंकार फार मोठा आहे असे समजावे कारण राष्ट्रापेक्षा मोठे कोणीच नाही आणि जर का तुमचा अहंकार राष्ट्राच्या हितापेक्षा अधिक मोठा असेल तर त्याचा अर्थ तो प्रॉब्लेमॅटिक अहंकार आहे 

प्रधान यांचा कदाचित अनेक वेळा या सगळ्या भ्रष्टाचाराशी काडीचाही संबंध आला नसेल परंतु त्यांचा फक्त संबंध न येणे हे काही गुणवत्तेचे लक्षण नाही तुमच्या खात्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर तो तुम्हाला कधी ना कधीतरी थांबवावा लागेलच पण ते करण्याऐवजी तुम्ही जर का विरोधी पक्षांना शिव्या देत बसणार असाल तर त्याला काही अर्थ नसतो कारण विरोधी पक्षांना विरोधी मुद्दे उपस्थित करण्याचा अधिकार असतो असायला हवा अन्यथा मग लोकशाहीला काहीच अर्थ उरत नाही 

मी सुद्धा याबाबतीत काही गोष्टी नीट होतील म्हणून वाट पाहिलेली आहे परंतु झाले नाही ही वस्तुस्थिती! त्यामुळे शेवटी मग राजीनामा द्या निदान दुसरा एखादा मनुष्य जो अधिक कार्यक्षम असेल तो येईल आणि हे सर्व प्रकार थांबवेल अशी एक आशा निर्माण होत असते. माझे स्वतःचे स्पष्ट मत असे यासंदर्भात सुद्धा एक आता नीतिमूल्य तयार करायला हवे म्हणजे कुठल्याही मंत्र्याच्या खात्यामध्ये कितीदा एकाच गोष्टीबाबत भ्रष्टाचार झाला म्हणजे त्यालाच राजीनामा द्यायला सांगावे माझ्या मते आत्ताचा जो काळ आहे तिथे अनेकदा प्रशासकीय लोक मंत्राला काहीही कल्पना न देता व्यवस्थित भ्रष्टाचार करत असतात .आता अशा लोकांचे काय करायचे हा फार मोठा प्रश्न असतो कारण अनेकदा त्यांचा मंत्र्यांशी काही संबंध पण नसतो हे लोक परस्पर काहीतरी उद्योग करत असतात. त्यामुळेच त्यांना एकदा माफ करावे पण वारंवार होत असेल तर मग आळा घालण्याची जबाबदारी तुमची नव्हती का तुम्ही लगाम का घातला नाही ?

आता फक्त प्रश्न प्रशासनाचा आहे का की काही प्रश्न लोकांचे पण सुद्धा आहेत ? जे काही झाले त्यामध्ये पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा अजिबात दोष नाही असे जर कोणी म्हणत असेल तर तो बरोबर नाही शॉर्टकट घ्यायची सवय अलीकडच्या पिढीमध्ये आलेली आहे आणि ती अलीकडच्या पालकांच्या मध्ये सुद्धा आली आहे की काय असा प्रश्न विचारण्या इतपत परिस्थिती बिघडलेली आहे तेव्हा आपण शॉर्टकट घ्यायला तयार राहायचे आणि मग तो पकडला गेला की गप्प राहायचे याला काही अर्थ नाही यासंदर्भात विद्यार्थ्यांनी ज्यांनी शॉर्टकट घेतले त्यांचा सुद्धा शोध घेतला पाहिजे . त्यांच्याही घरावर छोटा का होईना पण मोर्चा न्यायला पाहिजे तो फार आवश्यक आहे 

प्रत्येक व्यवस्थेमध्ये दहा टक्के लोक भ्रष्टाचारी असतात असे गृहीत धरले जाते पण उरलेल्या ९०% लोकांनी त्या दहा टक्क्यांना आळा घालायचा असतो इतकेच नव्हे तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचे असते शेवटी कायदा आहे कशाला? कायदा गुन्हा होऊ नये यासाठी प्रथम अस्तित्वात येतो आणि यदा कदाचित गुन्हा झाला तर मात्र त्याला पकडणे आणि न्यायव्यवस्थेकडे पाठवणे हा फार मोठा कायदा व्यवस्थेचा भाग आहे .

तेव्हा आंदोलन कर्त्या विद्यार्थ्यांना दोष देण्याऐवजी नेमके कुठे काय चुकले हे पाहायला पाहिजे त्याचे परीक्षण झाले पाहिजे . जेव्हा लोकक्षोभ झाला तेव्हा मग सुधारणा करावी असे वाटले याला काहीही अर्थ नसतो . 

एक प्रकारचा भारतीयांच्या मध्ये अलीकडे चालू द्या चालू द्या असा दृष्टिकोन आलेला दिसतो आणि कळत नकळत राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा हा सुस्त दृष्टिकोन अलीकडे बोकाळत चालला आहे की काय आणि नको तिथे फास्ट चालणे सुरू झाले आहे की काय हे आता विचारायची वेळ आलेली आहे. याला आळा घालायचा असेल तर एक सर्व मंत्री लोकांच्या मध्ये मेसेज गेला पाहिजे तो म्हणजे हलगर्जीपणा एकदा झाला तर समजून घेता येतो परंतु तो जर का रिपीट होणार असेल तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल जोपर्यंत हा मेसेज नरेंद्र मोदी देत नाही तोपर्यंत त्यांच्या भोवती धुके निर्माण होत राहणार . आपल्या खेळाडूंच्या मदतीला कॅप्टनने जावे परंतु जर का खेळाडू वारंवार त्याच्या भागामध्ये चोराला घुसू देत असेल तर त्याला जाऊन सांगावे लागते की बाबा रे तुझे दरवाजे खुले आहेत कुठून लोक येतात ते पहा आणि त्याने जर का हे एकदा नाही दोनदा नाही अनेकदा होऊ दिले असेल तर मग त्याला शांतपणे सांगावे लागते की क्षेत्र खाली कर आणि दुसऱ्यासाठी दे कारण बंदोबस्त करावा लागतो धर्मेंद्र प्रधान हे कदाचित वैयक्तिक पातळीवर अतिशय चांगले असतील पण माहित नाही का आणि कसे ते ढिले पडले मला वाटते की आता वेळ आलेली आहे कारण आंदोलन नको तितके आणि नको तसे चिघळत चाललेले आहे तेव्हा ते आता अधिक वाढू नये असे वाटत असेल तर शांत पणाने त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा हे उत्तम .

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती