सांख्य धर्म आणि राहून गेलेले षष्ठी तंत्र श्रीधर तिळवे नाईक
सांख्य दर्शनावर उपलब्ध असलेल्या ईश्वराच्या सांख्यकारिका या एकमेव पुस्तकात सुद्धा स्पष्टपणे षष्ठी तंत्राचा उल्लेख आहे आणि तरीसुद्धा या संदर्भामध्ये अतिशय व्यवस्थितपणे मौन पाळले जाते
सर्वात आश्चर्यकारक भाग जर कुठला असेल तर तो म्हणजे सांख्य दर्शनामध्ये फक्त दर्शनीक भाग आलेला आहे आणि ज्या 60 क्रियांच्या साठी म्हणून हे तंत्र प्रामुख्याने अवलंबले जाते त्याचा मात्र कसलाही विचार आलाच नाही वास्तविक त्या साठ क्रियांच्या मुळे या तंत्राला षष्टी तंत्र म्हणतात यातली जी षष्ठी आहे ती साठी ( पासष्टी वगैरे )आहे संस्कृत मधली सहा नव्हे . ज्या 60 क्रियांचा 60 क्रियांचा उल्लेख या तंत्रामध्ये मोक्षाची साधना म्हणून केला जातो त्या क्रिया मात्र अत्यंत व्यवस्थितपणे टाळलेल्या आहेत किंबहुना ईश्वर चंद्राला या यांच्या विषयी काही माहिती तरी होती की नाही असा आता प्रश्न पडतो हे असे का घडले हे उघड आहे ब्राह्मण लोकांना श्रम करायचे नसतात त्यामुळे त्यांनी हा काम करण्याचा भाग जो सर्वात महत्त्वाचा आहे तो वगळला आणि उरलेला बौद्धिक चर्चेचा भाग दर्शन म्हणून सादर केला आणि त्याचाच प्रसार केला जेणेकरून ज्या क्रिया करावयाच्या असतात त्या क्रियांचा अंमल करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊ नये याचा एक दुष्परिणाम असा झाला की सांख्य दर्शनाचा अनुनय करणारे जे साधक होते ते साधारणपणे जोपर्यंत षष्ठीत तंत्रातले गुरु अस्तित्वात होते तोपर्यंत मोक्ष मिळवत होते परंतु इसवी सन नवव्या शतकानंतर मात्र सांख्य दर्शनाच्या द्वारे कोणी मोक्ष मिळवलाय किंवा कोणाला मोक्ष मिळालाय असे दिसत नाही याचे कारण असे आहे की मुळात या तंत्राचा भाग केवळ दर्शन नाही तर अनुशासन सुद्धा आहे आणि त्या अनुशासनाचा उल्लेख सुद्धा या सांख्यकारिकेमध्ये नाही. याचा फार मोठा तोटा नंतर ब्राह्मण धर्माला सोसावा लागला कारण ब्राह्मण धर्म म्हणजे कर्मकांड असे समीकरण दूर झाले त्याचे कारण ब्रह्म तंत्र आणि षष्ठीतंत्र या दोन्ही तंत्रांच्या मधून उधारी करताना नेमका साधनेचा कार्यशील भागच वगळण्यात आला आणि त्यातून आताचे ब्रह्मदर्शन व सांख्य दर्शन सादर करण्यात आले. हे एक अपुरे सादरीकरण होते आणि त्याबद्दल कोणालाही माहिती नसावी हे खरोखर आश्चर्य आहे फक्त पाशुपत दर्शनामध्येच याच्याबद्दल जे आचार्य होते त्यांच्यात काही तुकडे शिल्लक राहीले आता अवस्था अशी आहे की हे सर्व काही नव्याने सादर करावे लागेल मी ते अधून मधून सादर करतो परंतु हा जो घोटाळा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माजला त्याच्यामुळे खूप मोठे नुकसान झाले . कितीतरी साधकांच्या साधना अपूर्ण राहिल्या आणि हे साधक प्रामुख्याने ब्राह्मण होते . अर्धवट ज्ञान हे नेहमीच धोकादायक असते तसे इथे घडलेले दिसते .
प्रश्न असा आहे की मग आता काय करायचे तर आता पुन्हा एकदा मूळ गोष्टी काय आहेत ते नीट तपासल्या पाहिजेत आणि त्यासाठी शैव श्रुतीकडे वळण्याशिवाय पर्याय नाही .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment