फुले यांच्यानंतर ओबीसी शैव लोकांनी काय करायचे ७ ब्राह्मणी संवेदनशीलतेची नवी धर्म मांडणी आणि त्यामुळे निर्माण झालेला पेच श्रीधर तिळवे नाईक
हिंदू धर्म हा शब्द अडचणीचा झाला म्हणून सनातन धर्म हा शब्द आणला पण तो काही कोणी स्वीकारेना आणि बुद्धानेच तो वापरला होता हे लक्षात आले आता नवीन शब्द आणलेला आहे "आर्य धर्म" त्यामध्ये वैदिक धर्म तसाच आहे मात्र ब्राह्मण धर्म हा शब्द वगळलाय वैष्णव धर्म हा शब्द वगळलाय आणि आश्चर्यकारकरीत्या वैष्णव धर्मासाठी आता गीता धर्म हा शब्द स्वीकारलेला आहे हा शब्द लोकमान्य टिळक यांच्या हिंदुत्व च्या संकल्पनेतला आहे . याचबरोबर जैन धर्म आणि बौद्ध धर्म यांचाही समावेश आर्य धर्मात केलेला आहे
एका अर्थाने हे बरे झाले की युरेशियन धर्म हा एक धर्मांचा समूह आहे हे मान्य करण्यात आले आणि त्यात वैदिक ,गीता, जैन आणि बौद्ध अशा चार धर्मांचा समावेश केलेला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे दलितांना विशेषत: अस्पृश्यांना बौद्ध धर्माच्या साह्याने तर वैश्य लोकांना जैन आणि वैदिक धर्माच्या साह्याने क्षत्रियांना गीता धर्माच्या साह्याने यापुढे बांधण्याचा प्रयत्न केला जाईल . म्हणजे पुन्हा एकदा ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि आश्चर्यकारकरीत्या अस्पृश्य यांची युती बनवण्याचा प्रयत्न आहे. आता उरतात फक्त ओबीसी आणि आदिवासी बहुदा हिंदुत्ववादी लोकांना आता या दोन्ही प्रवर्गांची गरज नाही पुन्हा एकदा सर्व गणित 50% वर उभे केले गेलेले आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य साधारणपणे 26 टक्के अस्पृश्य अति शूद्र 12% जैन एक टक्का आणि ओबीसींच्या मधील वैष्णव झालेले जे हमखास आर्य लोकांची सत्ता स्वीकारायला तयार आहेत असे वाटते ते अकरा टक्के ज्यामध्ये वारकरी वगैरे अनेक वैष्णव पंथ येतात .ब्राह्मण धर्मातले लोक वैदिक धर्मात पुन्हा एकदा सामील करून कर्म दत्त वर्ण व्यवस्था स्वीकारण्याची तयारी सुरू केलेली दिसते . मात्र दोन्ही बाजूंना जाता यावे म्हणून गीता धर्म आहे . हे सगळे 50% लोक संघटितपणे मतदान करतील असा अंदाज आहे .
अर्थातच आपल्याकडचे विरोधक नेहमीप्रमाणे झोपलेले आहेत मी नेहमीच सांगत आलेलो आहे की युरेशियन धर्माचा कायमच शत्रू नंबर एक शैव धर्म होता फक्त हे सांगितले जात नव्हते आणि कधीही सांगितले जाणार पण नाही जोपर्यंत हा धर्म नष्ट होत नाही . भारताचे युरेशीयकरण असे याला म्हणता येईल पण असे म्हणू नये म्हणूनच सुरुवातीला सांगितलेले आहे की आर्य आक्रमणाचा सिद्धांत खोटा आहे आणि आर्य भारतातलेच आहेत .
शैवधर्म नेहमीप्रमाणे वगळलेला आहे पण तो वगळला आहे असे सांगितलेले मात्र नाही . त्याला वैदिक धर्माशी जोडली जाईल आणि शंकराच्या जागी रुद्र प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल फक्त नाव घेतलेले नाही मुख्य म्हणजे हिंदू धर्म हा शब्द समूह सुद्धा नाकारलेला आहे जो शैव लोकांना सामील करून घेण्यासाठी निर्माण करण्यात आला होता .
साधारणपणे येऊ घातलेली दोन वर्षे हा प्रयोग राबवण्याचा प्रयत्न होईल जर तो यशस्वी झाला तर कंटिन्यू राहील अन्यथा पुन्हा एखादी नवी शब्दसमूहाची खेळी खेळली जाईल . शैव हिंदुत्व हळु हळु डॉमिनेट होत जाईल असे लक्षात आल्यामुळे हे झाले आहे .
मग हिंदू व हिंदुत्व या शब्दाचे काय करणार ? तर त्या जागी बहुदा आर्य असा शब्द आणला जाईल आणि त्यापासून आर्यत्व आणि आर्यत्ववाद असे शब्द निर्माण करून ते व्यवहारात प्रचलित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल .
याचाच दुसरा अर्थ असा आहे की मोदी यांचा ओबीसी यांना भाजपशी जोडून घेण्याचा जो रोल होता तो संपलेला आहे . साहजिकच मग एक अर्थ असाही आहे की नरेंद्र मोदी यांना बहुदा मुदतवाढ मिळणार नाही . पुढच्या इलेक्शनला नरेंद्र मोदी पंतप्रधान उमेदवार असण्याची शक्यता कमी आहे. थोडक्यात काय आणखी एका माणसाने शिवाजी महाराजांच्या शैलीमध्ये ब्राह्मण लोकांना हवे असलेले राज्य आणले आणि आता पुन्हा एकदा नवी पेशवाई येणार आहे मात्र या पेशवाईत आंबेडकरवादी लोकांना सामील करून घेण्याचा जो डाव असेल तो बेहतरीन आहे.
ओबीसी लोकांना कोर्टामध्ये आता गीतेची शपथ घ्यावीच लागते त्यामुळे कदाचित असा आत्मविश्वास आलेला आहे की जय श्रीराम हा नारा ओबीसी लोकांनी स्वीकारलेला आहे . आता ओबीसी लोकांनी ठरवायचे आहे की गीता धर्म स्वीकारायचा की नाही कारण गीता धर्म स्पष्ट आणि स्वच्छ पणाने वर्णव्यवस्था स्वीकारतो. आता ती जन्मदत्त असेल की कर्मदत्त असेल की सोयीप्रमाणे होत जाईल हे भविष्य ठरवेल.
मला कायमच ब्राह्मण लोकांचे म्हणूनच कौतुक आहे . ते परफेक्ट वेळी अतिशय परफेक्ट खेळी खेळत असतात . अनेकदा खेळी संपल्यानंतर लक्षात येते की अरे हे होते . तोपर्यंत आरोपी न्यायालयात सुटलेले असतात .
यापुढे सर्वाधिक कसोटी ही ओबीसींची आणि शैव लोकांची राहणार आहे . जैन आधीच युरेशियन लोकांना सामील झालेले आहेत जर भविष्यात बौद्ध लोक सुद्धा युरेशियन धर्माला सामील होणार असतील तर आपण काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न असेल .
बुद्धिबळ मांडलेले आहे. सर्वात प्रथम ओबीसींनी व आदिवासी लोकांनी शैव या टायटल खाली संघटित व्हावे हे उत्तम . जर का वर्ण जात व्यवस्थेचा अंत होत असेल तर पाठिंबा द्यायचा की नाही हे ठरवता येते पण जर का वर्ण जात व्यवस्था प्रमाण मानणारे धर्मराज्य येणार असेल तर मात्र फार मोठ्या संघर्षाची तयारी शैव लोकांना पुन्हा एकदा करावी लागेल
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment