ज्ञान म्हणजे काय श्रीधर तिळवे नाईक 

माया म्हणजे एका अर्थाने सत्यार्थ यथार्थ किंवा वास्तवार्थ , तथ्यर्थ आणि चिन्हार्थ यांचे घडलेले घटन, संघटन , विघटन आणि नि: घटन ! 

मी हे नेहमीच मांडत आलेलो आहे की सत्य हे शिव आहे शिव हे शून्य आहे त्यामुळे शून्य हेच सत्य आहे पण त्याचबरोबर शक्तीही आहे शक्ती ही सत्य आहे शक्ती ही अनंत आहे म्हणजेच शिव शून्य सत्य आणि शक्ती अनंत सत्य हे सर्व युग्म पद्धतीने अस्तित्वात आहे शिव आणि शक्ती हे युग्म आहे 

यांच्या युग्मामुळेच संसार निर्माण होतो या संसाराला प्राण असतो त्याला आपण ईश्वर म्हणतो किंवा महाप्राण म्हणतो जीव हा शिव शक्ती यांनी युक्त असतो त्याच्यामध्ये शिव हा प्राणयुक्त असतो तर शक्ती मात्र विविध शक्ती रूपांनी असते . या शक्तीचे चेक रूप म्हणजे सांभवी शक्ती अथवा ज्ञान शक्ती होय शांभवी जेव्हा मोक्षाकडे जाते तेव्हा ती शांभवी असते परंतु जेव्हा ती संसाराकडे जाते तेव्हा ती ज्ञानशक्ती किंवा प्रज्ञाशक्ती बनते .

आपले सर्व आकलन हे या प्रज्ञाशक्तीमुळे होत असते .

सर्वसाधारणपणे आपणाला सत्य हे अति प्रत्यक्ष पद्धतीने अनुभवता येते आणि अनेकदा ते ज्ञानाचा अंत झाल्याशिवाय प्राप्त होत नाही . त्यामुळे साहजिकच शिव आणि शक्ती यांच्या सत्यपाशी आपण पोहोचत नाही कारण ते मुळात रूपच नाही 

ज्ञानाची सर्वात मोठी मर्यादा म्हणजे ते नेहमी मिती मध्ये वावरत असते. किंबहुना मिठी हा शब्द हाच मिती आहे. जीवाची मिती म्हणजे मिठी ! आपण कोणाला जेव्हा मिठीत घेतो तेव्हा आपण त्याला आपल्या अवकाशात आणि काळात कवटाळतो .

प्रश्न असा आहे की आपणाला या भोवती असलेल्या संसाराचे ज्ञान कसे होते ते व्यक्तिगत असते की वस्तूगत असते . खरोखरच ते जसे आहे तसे आपणाला ज्ञान होते की आपण जसे आहोत तसे आपणाला ज्ञान होते असा प्रश्न पाश्चात्त्य देशांमध्ये कायमच वारंवार विचारला गेलेला आहे .

शैव असा विचार करत नाहीत प्रत्यक्षामध्ये जे ज्ञान होते ते नेहमीच तीन पद्धतीने होते असे सर्व गृहीत धरतात 

१ वस्तूगत म्हणजे ऑब्जेक्टिव्ह 

२ जीवगत म्हणजे सब्जेक्टिव्ह 

३ द्वंद्वात्मक म्हणजे डायलेक्टिकल 

माझ्या मते प्रत्यक्षात ज्ञान हे युगमात्मक असते म्हणजे त्यामध्ये या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतातच परंतु प्रत्यक्षामध्ये ज्ञान होत असताना प्राण आणि शक्ती एकवटतात त्यांच्यात संग होतो मग त्यांचा संघात बनतो आणि या संघाताचे जे ज्ञान असते ते आपले जीवगत ज्ञान होऊन जाते . 


पण ज्ञान ही प्रक्रिया केवळ संघाताची असते का तर नसते प्रत्यक्षामध्ये संघाताबरोबरच संघटनाचे म्हणून सुद्धा ज्ञान असते आणि हे ज्ञान नेहमीच आपल्याला संघटना देत असते .

या ज्ञानाला आपण इतिहास दत्त ज्ञान असे म्हणतो म्हणजे आपणाला प्रत्येक ज्ञान शाखेचा इतिहास पुरवला जातो . 

आणि या ज्ञानानंतर मग आपण म्हणतो की आता मला काही विशेष नवीन ज्ञान प्राप्त होणार आहे का ? हे नवीन ज्ञान प्राप्त करणे ही इतकी सोपी गोष्ट नसते आपल्याआधी होऊन गेलेल्या अनेक लोकांनी अनेक गोष्टी आधीच ज्ञानात्मक पातळीवर प्राप्त केलेल्या असतात आणि त्या आपल्याला अनेकदा संहितांच्या रूपाने उपलब्ध असतात म्हणजेच इथे चिन्ह ज्ञान सर्वात महत्त्वाचे होत जाते आणि चिन्ह ज्ञानाच्या साह्याने प्रथम आपणाला होऊन गेलेले सर्व ज्ञान प्राप्त करावे लागते . आणि मग कदाचित तुम्हाला तुमच्या नव्या अनुभवातून सतत आढळणाऱ्या अनुभवातून येणाऱ्या अनुभवातून काही नवीन सापडले तर मग तुम्ही म्हणू शकता की मला नवीन ज्ञान झाले पण हे नवीन ज्ञान जवळजवळ अनेकांच्या आयुष्यात कधीच घडत नाही . 

आपणाला जेवढे प्रत्यक्ष ज्ञान होत असते तेवढेच आपणाला अनेकदा आपल्या भोवतालचा समाज संघटनात्मक ज्ञान म्हणजेच चिन्हात्मक ज्ञान पुरवत असतो . हे ज्ञान संस्कार असतात आणि हे प्रत्येकावर केले जातात . 

मग आपल्यासाठी नवीन काय असते तर आपला वर्तमान असतो आता हा जो वर्तमान उपस्थित असतो त्याच्या बाबतीत हे प्रश्न अधिक तीव्रतेने उपस्थित होतात . म्हणजेच हे ज्ञान प्रत्यक्ष आहे की अनुमानात्मक आहे की चिन्हात्मक आहे ?

हे ज्ञान पूर्णपणे वस्तूगत आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे की जीवघत आहे म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे की डायलेक्टिकल आहे की युगमात्मक आहे 

अनेक लोकांना डायरेक्टीकल म्हणजे डायलेक्टिकल म्हणजे युगमात्मक वाटू शकते परंतु यामध्ये फरक असा आहे की डायरेक्टिकल मध्ये द्वंद्व आहे तर युगमात्मक मध्ये सेक्स आहे या दोन गोष्टी खूप मोठा फरक आहे दुसऱ्या मध्ये प्रेम आहे आस्था आहे करुणा आहे आणि दोघे मिळून ज्ञान प्राप्ती करत असतात . प्रत्येक माणसांमध्ये हे युग्म उपस्थित असते कारण प्रत्येक माणूस शेवटी संसार असतो या संसाराचा भाग असतो .

ज्ञानाचा आरंभ जीवापासून होतो की वस्तूपासून होतो हा खरा प्रश्न आहे . कारण अनेकदा असे होते की संस्कारांच्या मुळे ज्ञान संस्कारांच्या मुळे जीवाला आधीच ज्ञान प्राप्ती झालेली असते आणि नंतर पुढे मग काहीतरी येते म्हणजेच वर्तमानाविषयीचे ज्ञान अनेकदा आधीच संस्कारजन्य ज्ञानामुळे झालेले असल्याने नवीन काही त्याला सापडत नाही . अशावेळी आत्तापर्यंत चालत आलेले ज्ञान आणि आत्ता या क्षणी मला होणारे ज्ञान यांच्यात काही फरक आढळला तर मात्र मग जीवाला पूर्णपणे नव्याने विचार करावा लागतो . उदाहरणार्थ जर का वाघ समोर आला आणि आपण त्या वाघाशी लढू शकत नाही असे कळाले तर पळून जाणे हा पर्याय नेहमीच संस्कारजन्य ज्ञान सांगत असते . आणि अनेकदा आपण संस्कारचंद्र ज्ञानाचेच ऐकतो पण समजा आपणाला एखादा नवाच प्राणी दिसला तर तर मात्र आपले त्या प्राण्याविषयी नवे ज्ञान प्राप्त होणे अटळ असते . हा एक नवीन अनुभव बनतो आणि हा नवीन अनुभव आपण मग इतरांना सांगतो आणि त्यामुळे त्यांना त्या अनुभवाचे अनुमानात्मक अनुभवन प्राप्त होते . अनेकदा हे अनुमानात्मक अनुभवन सुद्धा चिन्हांच्याद्वारे सादर केले जाते त्यामुळे ते एकाच वेळेला अनुमानात्मक असते आणि चिन्हात्मक पण असते . आता हे ज्यांना प्राप्त झालेले आहे ते उल्लेख जेव्हा घरी जाऊन ती गोष्ट सांगतात तेव्हा मात्र ते ज्ञान पूर्णपणे चिन्हात्मक झालेले असते तो अनुभव पूर्णपणे चिन्हात्मक अनुभव झालेला असतो. कारण ज्याची प्रत्यक्ष इंद्रिय त्या ज्ञानाच्या वेळेला अनुभवाच्या वेळेला उपस्थित होते तो आता या प्रोसेस मध्ये कुठेच नसतो. प्रत्यक्षाचा प्रत्यक्ष इंद्रियांचा प्रत्यक्ष उपस्थितीचा अभाव हाच चिन्हात्मक ज्ञानाला जन्म देतो चिन्हात्मक अनुभवाला जन्म देतो . अनेकदा कलाकृती जेव्हा आपण म्हणतो की चिन्हात्मक अनुभवाच्या कृती आहेत तेव्हा आपण हेच सांगत असतो की प्रत्यक्ष अनुभव ज्याला आला तो आम्हाला माहित नाही तो आम्हाला ज्ञात नाही . 

शक्तीग्रहणाचे काम करते परंतु केवळ ग्रहणाने ज्ञान प्राप्ती होत नाही प्राणहि लागतो प्राण गेला की शरीराला ज्ञान प्राप्ती होत नाही . ते मृत बनते याचा अर्थ ते ज्ञानाबाबतीत आणि अनुभवाबाबतीत सुद्धा मृत बनते . म्हणूनच प्राण हा आवश्यक असतो प्राण असला की शक्तीकडे ज्ञानप्राप्तीसाठी लागणारी ऊर्जा आपोआपच ऍक्टिव्ह होते आणि आपण मग त्या ऑब्जेक्ट कडे वळतो. प्राण सुसज्ज असतो त्यामुळेच अनेकदा आपणाला त्याचे असणे कळत नाही आपणाला ते तेव्हा जाणवते जेव्हा एखादी व्यक्ती प्राण सोडून जाते किंवा प्राण शरीर सोडून जातो .

शक्तीला जे काही ज्ञान प्राप्त होते ते शरीरामुळे होते आणि शरीरामध्ये स्मृती असते आणि ती दोन पद्धतीची असते 

पहिली स्मृती ही जन्मदत्त स्मृती असते म्हणजेच जेनेटिक कोड पासूनच ती प्राप्त झालेली असते जन्मापासूनच ती सोबत असते दुसरी अर्थात संस्कार दत्त स्मृती असते म्हणजे आपल्याला कोणीतरी जाणीवपूर्वक संस्कार देऊन ती दिलेली असते . आणि तिसरी जी असते ती आपली स्वतःची म्हणजेच प्राणदत्त आत्मदत्त स्मृती असते 

कुठलेही वस्तुरूप जेव्हा समोर ठाकते तेव्हा अनेकदा आपण आपल्या स्मृती घेऊनच त्या वस्तू विषयीचे ज्ञान त्या वस्तू विषयीचे संवेदन प्राप्त करतो. त्यामुळे अनेकदा आपले ज्ञान आपले संवेदन हे स्मृतिजन्य होऊन जाते . पण जेव्हा आपण पूर्णपणे सर्व स्मृतीजन्यता नाकारली आणि अत्यंत ताजेपणाने नवेपणाने जर का समोरच्या वस्तुमात्राला सामोरे गेलो तर मात्र सारी गणिते बदलू शकतात . अचानक कधीकधी आपल्याला आयुष्यात हा अनुभव येतो की आपण आपण नसतो आणि तेव्हा आपल्याला काहीतरी दिव्य प्राप्त झाले असे वाटते प्रत्यक्षामध्ये काही दिव्य नसते तर प्रत्यक्षामध्ये काही नवे असते. आणि जर का या प्रत्यक्षाच्या पलीकडचेच काही अतिप्रत्यक्ष असेल तर मात्र ते दिव्य असते परंतु असे दिव्य हे फार क्वचित वेळा घडते . मात्र आपण जर का त्याला चिन्ह रुपात रूपांतरित करायला गेलो तर मात्र ते होत नाही याचे कारण अति प्रत्यक्ष कधीही चिन्हात येत नाही . मात्र जे प्रत्यक्ष असते ते मात्र चिन्हात येऊ शकते आणि म्हणूनच आपण प्रत्यक्ष विषयीचा अनुभव किंवा प्रत्यक्ष विषयीचे ज्ञान चिन्हात रूपांतरीत करू शकतो प्रश्न असा आहे की हे जे ज्ञान होते त्यामध्ये वस्तू जशी आहे तशी दिसते की आपण जसे आहोत तशी ती वस्तू दिसते . गेली कित्येक शतके विचारला जाणारा हा प्रश्न आहे .

यामध्ये चौथ्या नवतेच्या कालखंडामध्येच नीट संशोधन झालेले दिसते . आता हे स्पष्ट आहे की आपल्याला रंग मर्यादेतच दिसतात आणि यामध्ये मर्यादा आपल्या डोळ्याच्या आहेत म्हणजेच इंद्रियांच्या मर्यादा सुद्धा तुमच्या वस्तूगत ज्ञानाला जबाबदार असतात प्रश्न असा आहे की म्हणून वस्तूगत ज्ञानाच्या संदर्भात अनेक पद्धतीचे रंग त्या वस्तूचे दिसतात का ? म्हणजे जो घोडा मला हिरवा दिसतो तो घोडा एखाद्या हरणाला पिवळा दिसतो का ? याचे उत्तर हो असे आहे आणि सारा गोंधळ जगात उडलेला आहे तो यामुळे उडलेला आहे .

मग ऑब्जेक्टिव्ह काय होते तर ऑब्जेक्टिव्ह चे नवीन इंटरप्रिटेशन अर्थनिर्णयन असे की ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मानवी ह्यूमन ! म्हणजे सर्व ह्युमन बिंग्स न जे सारखे ज्ञान मिळते ते ऑब्जेक्टिव्ह ज्ञान होय . याचे कारण साऱ्या ह्युमन बिंगची इंद्रियांची जी रचना असते ती जवळजवळ सारखीच असते . म्हणजे मला जेव्हा एखादा वाघ पिवळा दिसतो तेव्हा माझ्या मित्राला सुद्धा तो वाघ पिवळा दिसतो आणि अमेरिकेतून आलेल्या माणसाला सुद्धा तो पिवळा दिसतो याचा अर्थ स्पष्ट आहे की माझ्यासमोरच्या वाघाचा जो रंग मला मानव रंग म्हणून दिसत असतो तोच मानवाच्या संदर्भामध्ये ऑब्जेक्टिव्ह रंग होऊ शकतो. याला मी ज्ञानाची ह्यूमन ऑब्जेक्टिव्हिटी म्हणतो . प्रश्न असा आहे की मग सब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय ? सब्जेक्टिव्हिटी म्हणजे कदाचित माझ्या जेनेटिक कोड मध्ये काही असे असू शकते की त्यामुळे त्या पिवळ्या रंगाचा सुद्धा एक वेगळा शेड मला दिसू शकतो जो कदाचित दुसरा माणसाला दिसणार नाही . अनेक भावभावना आपल्याला जणूकांच्या मुळे प्राप्त झालेले असतात आणि ही प्राप्ती ऑब्जेक्टिव्ह असेलच असे नाही आणि इथेच सब्जेक्टिव्हिटीचा सुद्धा विचार करावा लागतो म्हणजेच आपण आता दोन गोष्टींच्या पुढे पोचतो त्या गोष्टी म्हणजे ह्युमन सब्जेक्टिव्हिटी आणि ह्युमन ऑब्जेक्टिव्हिटी ! आणि हे असे आहे म्हणूनच टेबलावर ऑपरेशन होऊ शकतात एकाचे हृदय दुसऱ्याला कदाचित काही प्रमाणात का होईना पण मॅच होऊ शकते . मी ही लोखंड खाऊ शकत नाही आणि जगातले 99.99% लोक लोखंड खाऊ शकत नाहीत कारण शेवटी आमच्या आहाराची पद्धती एक असते आणि हीच ह्युमन ऑब्जेक्टिव्हिटी असते . ती सर्व मॅमल्स न पण प्राप्त होऊ शकते किंवा कदाचित सर्व किंगडम ॲनिमलिया आणि प्लांट या दोघांनाही ते लागू होऊ शकते . 

त्यामुळेच आपण आता ह्यूमन रेस किंवा होमोसोयपिअन्स म्हणून एकत्र येण्याची शक्यता प्रचंड वाढत चाललेली आहे ह्याला मी ह्यूमन ग्लोबलायझेशन असे म्हणतो आणि हे आता शक्य वाटते. 

अर्थातच या ह्यूमन ग्लोबलायझेशन मुळे काही लोकांचे हितसंबंध धोक्यात येणे अटळ आहे असे लोक युद्धे लढवणे करणारच वस्तुस्थिती अशी आहे की मनुष्य जात ही प्रत्यक्षामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात ह्युमन ग्लोबलायझेशनला सामोरे जात आहे आणि म्हणूनच अनेक ग्रुप आता घाबरलेले आहेत त्यांना स्वतःचे सगळे संस्कार नष्ट होतील अशी भीती आहे त्यांना अनेकदा असे वाटते की आपल्या परंपरा नष्ट होतील आणि म्हणूनच परंपरा जतन केल्या पाहिजेत म्हणून अनेक परंपरावादी हल्ली सत्तेवर येताना दिसतात पण हे परंपरा वादी टिकणार नाहीत त्यांचे नष्ट होणे अटळ आहे याबाबतीत भारताची स्थिती वेगळी आहे कारण भारतात सुरुवातीपासूनच पृथ्वी ही संपूर्ण कुटुंब आहे (वसुधैव कुटुंबम) अशी स्थिती असल्याने भारतात मात्र हे ह्यूमन ग्लोबलायझेशन जास्त साहजिकपणे स्वाभाविकपणे स्वीकारले जाणे अटळ आहे.

त्यामुळेच आपण हे लक्षात घेतले पाहिजे की ज्ञानाची सगळी ही जी बदललेली पद्धत आहे अशा वेळेला आपण हे स्वीकारावे की आपले ज्ञान हे युगमात्मक आहे . तिथे काही गोष्टी प्राणजन्य जन्मदत्त असू शकतात पण त्याचबरोबर काही शक्तीजन्य जन्मदत्त संस्कार दत्त आणि आत्मदत्त असू शकतात या सगळ्यांच्या नेटवर्किंग मधून आता ज्ञान होणार हे अटल आहे ज्ञानाची ही नेटवर्किंग प्रोसेस आपण जर का लक्षात घेतली नाही तर आपण नक्की अनेक गोष्टी गमावून बसू कारण आता आपल्या मदतीला संगणक तर आहेच पण AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आहे . याचा विस्तार वाढत जाणे आता अटर आहे एका अर्थाने भविष्यातील जी युती भविष्यातील जे युग्म आहे ते ह्युमन इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांची युती हेच आहे हेच युग्म भविष्यात अधिक चांगल्या रीतीने काम करू शकते आता काही लोकांना त्यामध्ये द्वंद्वात्मक काही निर्माण करावेसे वाटले तर संघर्ष येतील परंतु हे संघर्ष फार टिकतील असे मला वाटत नाही .

श्रीधर तिळवे नाईक 








Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय