कला,निर्मिती मीमांसा आणि महाप्रणाली १ फायनल
श्रीधर तिळवे नाईक
१
मार्गी आणि देशी प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यावर सर्वाधिक प्रतिक्रिया या तरुण पिढीच्याच आल्या होत्या. अपवाद फक्त मीनाक्षी पाटील ! यामध्ये एक प्रश्न अतिशय कॉमन होता तो म्हणजे तुमचा अनुक्रम चुकला असे तुम्हाला वाटत नाही का ? निर्मितीमीमांसा सर्वात प्रथम तुम्ही का घेतली? त्या ऐवजी मार्गी आणि देशी हा दुसरा भाग प्रथम घ्यायला पाहिजे होता असे तुम्हाला वाटत नाही का ?
मुळातच एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे चौथी नवता म्हणजे केवळ देशीवादाविरोधातील बंड नव्हे तर ते उत्तरआधुनिकतेच्या विरोधातले सुद्धा बंड आहे त्यामुळे साहजिकच उत्तर आधुनिकतेचे काही मूलभूत सिद्धांत खोडून काढणे आणि त्याला पर्यायी सिद्धांत मांडणे हे सुद्धा चौथ्या नवतेचे काम असते .
उत्तरआधुनिकवादाने निर्मितीवादाच्या अंगाने अत्यंत क्रांतिकारक सिद्धांत मांडले त्यातील एक म्हणजे निर्मिती ही आधी निर्माण झालेल्या निर्मितीच्यामधून निर्माण होते संहिता ही संहितेकडूनच निर्माण होते टेक्स्ट इज क्रिएटेड बाय टेक्स्ट ! देरिदा याने हा सिद्धांत मांडला होता. आणि त्यातूनच मग जुलिया क्रिस्तव हिचा Intertextuality सिद्धांत आला होता . कुठलीही संहिता पोकळीमध्ये निर्माण होत नाही हे कम्प्युटर विज्ञानाचे एक मुख्यतत्त्व आहे . किंबहुना आरटीफिशियल इंटेलिजन्स दुसरे तिसरे काहीच करत नसतो तर तो फक्त तुम्ही निर्माण केलेल्या आधीच्या सर्व सहिता गोळा करत असतो त्यांना इंटर कनेक्ट करत असतो आणि त्यातून मग आपले काम निर्माण करत असतो म्हणजेच इथे एका अर्थाने Intertextuality फंक्शनिंग असते त्यामुळे संगणकाच्या क्षेत्रामध्ये हा सिद्धांत प्रचलित होताच . माझ्या या स माझा या सिद्धांताला ठाम विरोध आहे याचे कारण ओरिजिनॅलिटी ही अशी दुसऱ्या संहितेवर अवलंबून असली तरी ती त्या संहितेतून जन्मत नाही . तिला शून्य नावाचे गर्भाशय लागते आणि गर्भाशय असले तरच निर्माण शक्य असते जेनेटिकोड अस्तित्वात असते परंतु गर्भाशय सुद्धा अस्तित्वात असते आणि हे गर्भाशय म्हणजेच शिव होय शून्य होय ती रिकामी जागा नसेल तर काहीही शक्य होत नाही आणि हे रिकामी जागा सृजनाच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असते .
दुसरा सिद्धांत सब्जेक्ट इज डेड हा होता त्याच्यामध्ये पुरोगामी कालखंडामधला विज्ञानाने निर्माण केलेला निरीक्षक म्हणजेच सब्जेक्ट हा आता मृत पावलेला आहे असे प्रतिपादन केलेले आहे हे अर्थातच अटळच होते कारण एकदा का निर्मिक नाकारला आणि संहितासहितांना निर्माण करतात असे सिद्ध झाले तर मग निर्मिक सुद्धा एक संहिताच बनून जातो साहजिकच मग संहिता संहिताला पाहतात असा एक गैरसमज पसरतो आणि हा गैरसमज सिद्धांतिक करण्यामध्ये या सिद्धांताचा फार मोठा वाटा आहे आणि म्हणूनच हा सिद्धांत असे प्रतिपादन करू शकतो की सब्जेक्ट इज डेड प्रत्यक्षात मात्र असे होत नाही कारण अजून तरी कुठल्या प्रेताने दुसरा जीव जन्माला घातलेला नाही . प्रत्येक निर्माण झालेली संहिता ही एका अर्थाने शव असते आणि मग त्या संहितेचा आस्वाद घेणारा जो असतो त्याच्यातला शिव अथवा शक्ती त्या शवाला जिवंत करतो करते
आणि तिसरा सिद्धांत म्हणजे ऑथर इज डेड म्हणजे लेखकाचा मृत्यू झालेला आहे . ऑथर इज सब्जेक्ट subject is dead SO author is dead असे हे तर्कशास्त्र आहे . पहिली दोन गृहीतके आपण नाकारले की आपोआपच तिसरे गृहीतक कसे नाकारायचे हे सांगण्याची गरजच नाही कारण त्यामागे अजमशन आहे ते चुकीचे असेल तर पुढ चा निष्कर्ष चुकीचाच असतो .
साहजिकच या तिन्ही सिद्धांतांना मी आयुष्यामध्ये अतिशय ठामपणे विरोध केलेला आहे अनेकदा हे लक्षात येत नाही हे माझे दुर्दैव आहे.
हे तिनीच्या तिन्ही सिद्धांत एकमेकाला अतिशय पूरक असलेले असे निर्मितीसिद्धांत आहेत आणि ते निर्मितीच्या संदर्भात पूर्णपणे निर्मात्याचा खात्मा करतात सृजनशील माणसाचा खात्मा करतात . ज्याच्या निरीक्षणामधून सृजनशीलता निर्माण होते त्याचा खात्मा करतात. त्यामुळेच या सर्व सिद्धांतांचा फार सुरुवातीपासून मी कायमच प्रतिकार करत राहणे आवश्यक झालेले आहे.
या पुढचा प्रश्न असा की या सिद्धांतांना इतका मोठा पाठिंबा कसा काय समाजाच्या पातळीवर मिळाला ? संपूर्ण युरोपियन फिलॉसॉफी उत्तराधुनिक का होत गेली ? आणि आज भारतामध्ये हा सिद्धांत इतका बोकाळात का चालला आहे ?
याबाबतचे एक कारण अर्थातच देशीवाद आहे कारण देशीवाद हा परंपरेचे सातत्य अधोरेखित करत होता . त्यामुळे साहजिकच परंपरेला पाठिंबा देणारी उत्तर आधुनिकता ही देशी वादाकडून कायमच स्वतःचे वैचारिक बळ घेत राहिली .
दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की 1960 नंतर कार्पोरेट वादाचा अस्त होत उत्तर औद्योगिकता वादाला आणि त्याच्या आधारे उत्तर कार्पोरेट वाद हळूहळू प्रस्थापित होत गेला ज्याने पुढे जागतिकीकरण मोठ्या उत्साहाने अवलंबायला सुरुवात केली आणि त्यामुळेच सोवियत युनियन कोसळले . चायना चा उदय झाला .
या उत्तर कार्पोरेट युगामध्ये जेव्हा हे लक्षात आले की जो निर्माण करणारा मनुष्य आहे तो कार्पोरेट युगामध्ये नको तितका महत्त्वाचा झालेला आहे आणि सर्व सत्ता केंद्र त्याच्या भोवती फिरते आहे त्याने केलेल्या इन्वेंशन वर अवलंबून आहे तेव्हा संपूर्ण निर्मिती व्यवस्था म्हणजेच उत्तर कार्पोरेट वादा मधली औद्योगिक युगातील invention व्यवस्था आपल्या धनशक्तीची गुलाम बनवून तिला आपल्या ताब्यात ठेवणे कार्पोरेट मधल्या धनशक्तींना आवश्यक वाटायला लागले हे करण्यासाठी म्हणून त्यांना सर्वात सोयीस्कर असे एक तत्त्वज्ञान आवश्यक होते आणि हे तत्त्वज्ञान त्यांना उत्तर आधुनिकतेच्या रूपाने उपलब्ध झाले साहजिकच मग या लोकांनी सर्वत्र अकॅडमी मधून उत्तर औद्योगिकता स्पॉन्सर करायला सुरुवात केली उत्तर आधुनिकता स्पॉन्सर करायला सुरुवात केली या दोन्हींच्या मधला संबंध अनेकांच्या लक्षातच आला नाही त्यामुळे अनेक लोक उत्तर आधुनिकतेच्या आपोआपच आहारी जाऊ लागले . त्यातूनच ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो ती धनसत्तेच्या तालावर नाचते काय हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच मार्क्सवाद उत्तर कार्पोरेट वादामध्ये सुद्धा क्रिटिकल थेरी म्हणून कायमच जिवंत राहिला .
नव्या उत्तर कार्पोरेटवादी रचनेने जिला आता आपण पोस्टकार्पोरेटीझम म्हणतो स्वतःच्या काही स्ट्रॅटेजी डिझाईन करायला सुरुवात केली. त्यामध्ये मुळात जे इन्व्हेंटर आहेत ते आपल्या आर्थिक व्यवस्थेच्या पायदळी कसे आणता येतील ते पाहायला सुरुवात केली जेणेकरून सृजनशीलता आपली गुलाम व्हावी. सर्व शास्त्रज्ञांनी वैज्ञानिकांनी आणि मुख्य म्हणजे प्रत्येक तंत्र शास्त्रज्ञानी आणि तंत्र वैज्ञानिकानी आपल्या हाताखाली काम करावे त्यांनी तेच काम करावे जे आपण त्यांना सांगू म्हणजे इन्वेंशन सुद्धा असेच पाहिजे ज्याच्या टर्म्स आणि कंडिशन आपण ठेवू आणि आपण ठरवू . साहजिकच हे करण्यासाठी मुळातच सर्वच्या सर्व तंत्र वैज्ञानिक इन्वेंटर आपल्या व्यवस्थेच्या आपल्या व्यवस्थापनाच्या आपल्या संरचनेच्या हाताखाली कसे येतील या दिशेने तात्विक मांडणी सुरू केली आणि या तात्विक मांडणीचा मुख्य आधार ऑथर इज डेड हा होता उत्तर आधुनिकता ही उत्तर कार्पोरेट वादाने वाढवलेली अशी वैचारिक खेळी आहे आणि अनेकांच्या हे मुळातच लक्षात न आल्याने फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर कार्पोरेट वाद अकॅडमीक लेवलला सुद्धा बोकाळत गेला आणि हळूहळू त्याने लेखकांना संपवायला सुरुवात केली. कलावंतांना संपवायला सुरुवात केली . सर्वात प्रथम हे मुळात वैज्ञानिकाला आणि नंतर तंत्र वैज्ञानिकाला संपवण्यासाठी त्याचे व्यक्तिगत अस्तित्व संपवण्यासाठी आणि त्याला पगारी नोकर बनवण्यासाठी म्हणून अंमलात आणले गेले आणि हळूहळू याचा परिणाम सर्वच वैचारिक जगतावर सुद्धा होत गेला कारण अनेकदा तुमच्या अर्थव्यवस्था तुमच्या संस्कृतीला त्यांच्या मर्जीप्रमाणे डान्स करायला लावतात .
त्यातूनच मला विचारला गेलेला एक प्रश्न येतो तो म्हणजे तू कसा काय तावडीत सापडला नाहीस ?
याचे स्पष्ट कारण मी शेवटी एका दुकानदाराचा आणि व्यवसायिक माणसाचा मुलगा होतो त्यामुळे लहानपणापासूनच भारतातली वैश्यगिरी मी आत्मसात केलेली आहे जरा शक्ती पास झाला नसता तर कदाचित मी सुद्धा मस्तपैकी उद्योगपती झालो असतो तसे माझे प्लॅनिंग होते पण शक्ति पाताने बऱ्याचशा गोष्टी बदलल्या असो.
दुकानदार म्हणून जन्मल्याने मला काही गोष्टी जरा प्रॅक्टिकल जगतानाच कळाल्या होत्या त्यातली एक गोष्ट म्हणजे सृजनशीलता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे साहजिकच ही जी मांडणी येत होती त्या मांडणीला मी कायमच आयुष्यात ठामपणे आणि स्पष्टपणे विरोध करायला सुरुवात केली होती आणि अजूनही तो विरोध सुरूच आहे किंबहुना चौथी नवता ही येण्याची अवतरण्याची जी काही कारणे आहेत त्यामध्ये माझी ही पार्श्वभूमी हे एक फार मोठे कारण होते आणि आहे.
आता प्रश्न असा आहे की मग या सिद्धांतांचा वापर केला कसा गेला ? तर सर्वात प्रथम त्यांनी सब्जेक्ट इज डेड अशी घोषणा व्यवस्थित बिंबवायला सुरुवात केली .एकदा का तुम्ही सब्जेक्ट इज डेड हे तत्व सत्य म्हणून स्वीकारले की मग आपोआपच तुम्ही इंडिज्यूयालिटी इज डेड म्हणायला लागता आणि मग हळूहळू व्यक्तिगत गोष्टींचा व्यक्तिगत सृजनशीलतेचा तुमच्याही नकळत त्यात करायला लागता आणि त्यातूनच तुमच्या व्यक्तिगततेचा विनाश सुरू होतो किंवा ती फक्त एका मोठ्या कार्पोरेट यंत्रणेचा स्क्रू म्हणून काम करायला लागते . उत्तर कार्पोरेट रचनेचा आणि वीर रचनेचा आकारच एवढा मोठा असतो त्याचे अवाढव्य स्वरूपच असे असते की तुम्ही त्या प्रचंडपणाखाली दबून जाता. माझा स्वतःचा जन्मच मुळात दुकानदारीत झाल्याने असे दबदबणे मला शक्य नव्हते आणि आजाद चौकातल्या सर्वात मारा मारी साठी फेमस असणाऱ्या भाईगिरी स्टाईलमध्ये माझी जडणघडण झाली असल्याने दबंग वृत्ती होतीच . साहजिकच या कुठल्याही अवॉर्ड हवी आकाराला न घाबरणाऱ्या आणि दबंग गिरी करणाऱ्या गोष्टीमुळेच मी या सगळ्याचा प्रतिकार सुरू केला आणि अशा प्रकारचा काही प्रतिकार पाश्चात्त्य देशात चालू आहे की नाही असाही मला प्रश्न पडायला लागला होता . या संदर्भात माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी होती की आपल्याला आत्ता या काळात युरोप मध्ये काय चालले आहे हे कळणे शक्य नाही पण पुढे कधी ना कधीतरी असा काहीतरी विचार तिकडे झालेलाच असणार आणि तो कालांतराने कळेलच .
याचा परिणाम काय झाला तर आपण सर्वच कॉपी-पेस्टिंग करायला लागलो आणि काहीजण तर त्यालाच क्रिएटिव्हिटी म्हणून सादर करायला लागले .एकदा का व्यक्तिगतता मेली की मग सृजनशीलता सुद्धा मरायला लागते आणि मग लोक text मधून टेक्स्ट तयार करायला लागतात आणि अलीकडे तुम्ही पहाल की कॉपी पेस्टिंग चा हा जो जमाना तयार झालेला आहे तो या टेक्स्ट इज क्रिएटेड बाय टेक्स्ट यातून जन्मलेला आहे. कुठलीतरी कोणाची तरी संहिता घ्यायची आणि त्याच्यामध्ये काही भुक्कड बदल करायचे आणि ती संहिता आपल्या नावाने खपवायची असाच एक फार मोठा फ्रॉड उद्योग सुरू झालेला आहे त्याच्यामागे ही उत्तर आधुनिकता आहे . आपल्यापर्यंत अनेकदा तत्त्वज्ञानातल्या गोष्टी कशा प्रत्यक्ष आयुष्यात आणि आयुष्याच्या व्यवहारात पोहोचतात ते पोचवले जात नाही पण त्या जेव्हा पोचतात तेव्हा कळते की अरे हे तर आपल्याला आधीच कुणीतरी सांगितले होते आणि हा सांगणारा तत्वज्ञ होता . भारतामध्ये ही जबाबदारी प्रामुख्याने मोक्ष मिळवणाऱ्याची किंवा मोक्षाची साधना करणाऱ्या माणसाची असते . त्यामुळे तत्त्वज्ञानाचा रोल आपल्याकडे मोक्षज्ञ पार पाडतो. मी स्वतः हा रोल पार पाडलेला आहे .
प्रश्न असा आहे की या सगळ्याचा प्रतिकार करायचा तर कसा करायचा किंवा मग नवीन आकार मांडायचा तर कसा मांडायचा ? मला स्वतःला याबाबतीत फार खटाटोप करावा लागला नाही याचे कारण माझी साधना आहे
मुळातच जर का माझे लिखाण पाहिले तर त्यामध्ये एक समग्र निर्मितीमीमांसा आहे आणि त्या अंगाने मी पाच सिद्धांत मांडलेले आहेत
१ शिव सिद्धांत हा प्रामुख्याने मी मोक्षाच्या संदर्भात मांडलेला आहे कारण मोक्ष ही माणसाची सर्वात उत्कृष्ट अशी निर्मिती होय जिथे माणूस स्वतःलाच पुन्हा निर्माण करतो 365 days with your body या 2014 यावर्षी मोक्षप्राप्तीनंतर लिहिलेल्या आणि प्रकाशित झालेल्या ग्रंथामध्ये आलेला आहे . टीका हरण मध्ये सुद्धा काही लिखाण या अंगाने झालेले आहे . काही इतरत्र छापले गेले होते ते आता चौथी नवता नव अनियत कालिकांचा इतिहास या ग्रंथामध्ये आणि मार्गी आणि देशी या ग्रंथामध्ये आहे.
2 शक्ती सिद्धांत हा सिद्धांत मी प्रथम एका लेखात मांडला होता त्यामध्ये दशशक्तींच्या मधून कशा प्रकारे आशयाची निर्मिती होते ते मी मांडले होते हा सिद्धांत आता मार्गी आणि देशी या पुस्तकांमध्ये आहे
3 तृष्णा सिद्धांत हा सिद्धांत मी टीकाहरणमध्ये मांडला होता त्यामध्ये शक्तींच्या पासून ज्या तृष्णा निर्माण होतात त्या नेमक्या काय पद्धतीने कलेमध्ये ऍक्टिव्हेट होतात त्यांचे प्रकार काय याची एक सिस्टीम मांडली होती आणि भावांची यादी दिली होती .
4 तंत्र सिद्धांत प्रत्यक्षामध्ये निर्मिती होताना नेमके काय घडते हेही मांडणे अत्यंत आवश्यक होते आणि त्यासाठी म्हणून मी निर्मितीचा फुटबॉल सिद्धांत मांडला होता हा ही सिद्धांत आता मार्गी आणि देशी या ग्रंथामध्ये आहे ज्याप्रमाणे फुटबॉल खेळाडू गोल करतात त्याप्रमाणे निर्मितीचा गोल केला जातो अशी ती मांडणी आहे
साहजिकच मग निर्मिती मीमांसा ही माझ्या मांडणीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणूनच ती मी प्रथम मांडली चे सर्वात शेवटचे कारण म्हणजे सर्वात प्रथम निर्मिती येते असे माझे म्हणणे आहे निर्माता नसेल निर्मिती नसेल तर पुढचे काहीही साहित्यामध्ये आणि कलेमध्ये शक्य नाही उत्तराधुनिकतेने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मते हा भुक्कड प्रयत्न आहे आणि म्हणूनच तुम्ही उडवून लावला. पण गोष्टी नाकारून चालत नाहीत त्या त्यांच्या जागी पर्याय द्यावे लागतात म्हणून मी माझे निर्मिती सिद्धांत पर्याय म्हणून मांडलेले आहेत त्याचा विचार करण्याची जबाबदारी आता इतर समीक्षकांची आहे माझी नाही मुख्य म्हणजे लेखकांची आहे आणि तिचा मुख्य उद्देश उत्तर आधुनिकतेच्या निर्मिती सिद्धांतांना पूर्णपणे शह देणे आणि निर्मिकाचे स्थान पुन्हा प्रस्थापित करणे हा होता आणि आहे.
कला ,निर्मिती मीमांसा आणि महाप्रणाली २
२
निर्मिती झाल्यानंतर सुद्धा तिच्या विषयीचे सिद्धांत निर्मितीवर परिणाम करायला लागतात हे वरील विवेचनावरून आता थोडी स्पष्ट झाले असेल प्रश्न असा आहे की आपण जर का क्षणभर असा विचार करू की निर्मिती ही उत्तराधुनिकता सांगते त्याप्रमाणे भूतकाळात निर्माण झालेल्या संहितांच्या आधारेच निर्माण होते तर मग प्रश्न असा निर्माण होतो की भूतकाळाचा नेमका निर्मितीमध्ये काय रोल आहे ? हा रोल जर का समजून घ्यायचा असेल तर आपणाला सर्वात प्रथम मानवी भूतकाळ काय आहे ते पाहावे लागते.
सर्वात प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे मानवी भूतकाळ म्हणजे महायुग , युग आणि उप युग यांचा खेळ आहे . या अंगाने निर्माण झालेल्या जाणिवांची चर्चा टीकाहरण या ग्रंथामध्ये मी केली होती त्याच्यावर राहुल कोसंबी सारख्या काही विचारवंतांनी हे पुस्तक न वाचताच टीकाही केली होती आणि तिचा मी समाचार घेतला होता ( चौथी नवता नवं अनियतकालिकांचा इतिहास या ग्रंथामध्ये हा भाग आता आलेला आहे)
अर्थात मी मांडत असलेला युग विचार हा काही आकाशातून पडलेला नाही पण प्रत्येक नवे युग हे आधीच्या युगांना बाजूला सारूनच निर्माण होऊ शकते म्हणजेच निर्माण होण्यासाठी आधी त्या युगाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली पोकळी निर्माण व्हावी लागते शून्य निर्माण व्हावे लागते गर्भाशय निर्माण व्हावे लागते .
भारतामध्ये युगांचा विचार नवा नाही पण या युगाला आत्ताचे चिन्हयुग काही कळाले नव्हते कारण ते नवे होते .
भारतामध्ये कलियुग फारच फेमस आहे कारण संत साहित्यामध्ये त्याची सर्वाधिक चर्चा आहे आणि प्रत्येक संत हा कलियुगाचा काळ असल्याने सर्व काही घडते आहे असा आक्रोश करताना दिसतो . महाराष्ट्रात संत तुकाराम यांनी ते अधिक फेमस केलेले आहे त्याचे पुरोगामी करण आपल्याकडे स्वामी विवेकानंद यांनी केले आणि आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये माझ्यावर स्वामी विवेकानंद यांचा सुद्धा बऱ्यापैकी प्रभाव पडला होता कारण शक्तिपाता नंतर मी जी काही साधना केली होती त्यामध्ये त्यांच्या राजयोग या पुस्तकाचा फार मोठा वाटा होता . त्यामुळेच एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार मध्ये त्यांच्यावर एक कविता सुद्धा आहे जी या राज योगाच्या साधनेच्या अंगाने आली आहे ज्या कालखंडात टीका हरण लिहिले गेले त्या कालखंडामध्ये स्वामी विवेकानंदांच्या या विचारांचा विचार मला करणे भाग पाडले त्यांनी आपल्या ग्रंथांच्या मध्ये वर्णनिहाय युगांची मांडणी केली आणि आत्ताचे युग हे वैश्य लोकांचे युग असून भविष्यामध्ये शूद्र लोकांचे युग येणार आहे अशी मांडणी केली . ते समाजवादी असल्याने आज ना उद्या शूद्र युग म्हणजे कष्ट करणाऱ्या कामगारांचे कष्टकऱ्यांचे युग येईल अशी त्यांना खात्री होती. बंगालमध्ये डाव्या लोकांचे सरकार आले होते त्याची सुरुवात स्वामी विवेकानंदांनी केलेल्या वेगळ्या सामाजिक समाजवादी विचारांमध्ये आहे .ते इंग्रज राजवटीला जी त्यांच्या काळामध्ये भारत चालवत होती वैश्य युग समजत होते . याचे कारण उघड होते कारण इंग्रज व्यापारी होते आणि ते राज्य करत होते. एका अर्थाने भारतीय दृष्टिकोनामधून ते इंग्रजी राजवटीला युगाच्या चौकटीत बसवू पाहत होते .
आपल्याकडे आचार्य जावडेकर यांनी सुद्धा त्यांच्या आधुनिक भारत या पुस्तकांमध्ये त्यांच्या मांडणीच्या पुढे जाऊन मग अधिक पुढची मांडणी केली मात्र ती व्याप्तीने जितक्या मोठ्या प्रमाणात व्हायला हवी होती तितक्या प्रमाणात ती झाली नाही . माझा प्रॉब्लेम असा होता की जे काही नवीन घडत होते ते भारतीय परिभाषित कसे बसवता येईल .
साहजिकच भारतीय परिभाषेत सर्व काही बसवताना ही मांडणी करत असतानाच मी चौथ्या नवतेच्या अंगानेही युगांची मांडणी करत होतो आणि आत्ताचे येऊ हे युग चिन्ह सृष्टीचे युग आहे अशी मांडणी करत होतो जेणेकरून एकाच वेळेला परंपरेशी जोडून तिचे नूतनीकरण करायचे आणि त्याच वेळेला पूर्णपणे चौथ्या नवतेच्या अंगाने वर्तमान काळात यायचे आणि भविष्यकाळात समाजाला न्यायचे अशी माझी पूर्वीपासून एक स्ट्रॅटेजी आहे ती त्या काळामध्ये सुद्धा होती.
ही युगाची मांडणी करताना मी १ आदिम २ पारंपारिक परलोकसृष्टीय ३सृष्टीय ४ प्रतिसृष्टी आणि ५चिन्हसृष्टीय अशा तऱ्हेने मांडणी करत होतो आणि आत्ताचे युग हे चिन्हसृष्टीय युग आहे अशी मांडणी करत होतो . याचे कारण भारतामध्ये या काळामध्ये पुरोगामी, आधुनिकता, उत्तर आधुनिकता आणि येऊ घातलेली चौथी नवता अशी चारी युगे अस्तित्वात होती . आपण जर का नेट प्रतिकार केला नाही तर परलोक केंद्री राजवट पुन्हा परतू शकते असे माझे म्हणणे होते जे पुढे खरे होत गेले.
म्हणजेच एका अर्थाने मी पाच महायुगे मांडत होतो . आणि सहावे महायुग हे काळाच्या पलीकडे असल्यामुळे ते मांडावे की नाही या प्रश्नाला तोंड देत होतो. हे सहावे महायुग मोक्षयुग आहे आणि आजही त्याचा भूतकाळामध्ये कसा समावेश करायचा हा फार मोठा प्रश्न आहे कारण मोक्ष हा कालिक नसतो तर कालातीत असतो .
जेव्हा आपण सत्ययुग म्हणतो तेव्हा आपणाला ते मोक्षयुग म्हणायचे असते आणि माझ्या मते पृथ्वीवर ते कधीच अस्तित्वात नव्हते मात्र भविष्यात ते अस्तित्वात आणता येते त्याची झलक सिंधू संस्कृतीमध्ये आहे . किंबहुना सत्य आणि मोक्ष हे वेगळे नाहीत याची कल्पना शैव श्रुतीला व्यवस्थित आहे . धर्म युगामध्ये या सत्यापासूनच नंतर नाते तुटते आणि त्रियुग वैष्णव भाषेत त्रेता युग उरते यामध्ये तीन गोष्टी उरतात तंत्र, अर्थ आणि काम! पुढे मग तंत्र ही नाहीसे होते आणि फक्त दोन पंख होतात त्याला आपण द्विपर म्हणतो म्हणजेच दोन पंखांचे युग म्हणतो इथे मोक्ष जातो आणि फक्त काम आणि अर्थ उरतो म्हणजेच विज्ञान सुद्धा निघून जाते. कारण विज्ञानाची निर्मिती तंत्रामधून होते . तंत्र गेले की प्रथम विज्ञान जाते आणि मग तंत्रज्ञान जाते . उत्तर आधुनिकता म्हणजे दुसरे तिसरे काही नसून फक्त काम आणि अर्थ यांचा गौरव आहे . यानंतरच्या कलियुगात सर्वनाश व्हायला प्रारंभ होतो .
प्रश्न असा आहे युग ही फक्त सामाजिक संकल्पना आहे की ती प्रत्यक्षामध्ये व्यक्तीला लागू होते ? माझ्या मते ती व्यक्तीला जास्त लागू होते कारण प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत ते घडते सत्य हे आपले सत्व असते आणि हे सत्व प्रथम समाज काढून घ्यायला लागतो . नंतर समाज तुमच्या आतले तंत्रसुद्धा तंत्राचा आवाज सुद्धा म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान सुद्धा काढून घ्यायला सुरुवात करतो आणि तुम्ही फक्त काम आणि अर्थ ( तुमच्याशिवाय उपस्थित असलेले वास्तव म्हणजे अर्थ होय) म्हणजेच समाज यांच्यासाठी तुम्हाला राबवायला लागतो आणि नंतर फक्त तुमच्यासाठी म्हातारपणात फक्त काळच उरतो . तुम्ही काळाची म्हणजेच मृत्यूची प्रतीक्षा करायला लागता. म्हातारपण हेच कलियुग होय .
म्हणजेच युगाची संकल्पना लक्षात घेतांना आपणाला व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर विचार करावा लागतो .
प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रकाराचा कलेशी नेमका संबंध काय ?
कला, निर्मितीमीमांसा आणि महाप्रणाली ३ श्रीधर तिळवे नाईक
कला ही जर का कलेमधूनच निर्माण होत असेल तर मग आपणाला उत्तर आधुनिक गृहीतक स्वीकारावे लागते आणि मग आपणाला या युगांच्या संकल्पनांचा अधिकच खोलात जाऊन विचार करावा लागतो कारण कला जर का भूतकाळापासूनच निर्माण होणार असेल भूतकाळातल्या कलेपासून निर्माण होणार असेल तर आपणाला भूतकाळ समजून घ्यावा लागतो. हा भूतकाळ आपल्यापर्यंत कसा पोहोचतो तर आपल्यापर्यंत पोहोचणार हा भूतकाळ प्रामुख्याने संहिताच असतो तो संहितांच्या मार्फतच पोचतो. म्हणजे शेवटी संहिता आणि त्या संहितांच्यात असलेली चिन्हे फार महत्त्वाची बनून जातात .
संहितेमधून संहिता निर्माण होण्यासाठी मुळातच आधीच्या संहिता माहित असाव्या लागतात.
यातूनच संहितांचा एक वेगळा पाठ्यक्रम तयार होतो कुठल्याही भूतकाळामध्ये खालील प्रकारच्या संहिता असतात
१ गुप्त संहिता : या संहिता गुप्त झालेल्या असतात परंतु त्यांच्या संदर्भातले उल्लेख आपणाला इतर संहितांच्या मध्ये मिळत असतात आणि त्यावरून आपल्याला कळते की या संहिता अस्तित्वात होत्या म्हणजे उदाहरणार्थ जर का आपण कामशास्त्र हा ग्रंथ घेतला तर त्यामध्ये आधीही कामशास्त्र होती असा उल्लेख मिळतो किंवा अर्थशास्त्रामध्ये आपणाला या अर्थशास्त्राच्या आधी सुद्धा अर्थशास्त्र लिहिली गेलेली आहेत असा उल्लेख मिळतो आणि लेखकांची नावेही मिळतात या संहिता गुप्त असतात आणि कधीकधी त्या पुन्हा मिळून सुद्धा जातात म्हणजे अर्थशास्त्र नावाची संहिता आहे याचा अंदाज होता परंतु प्रत्यक्षात ती उपलब्ध झाली विसाव्या शतकात. त्यामुळे गुप्त झालेल्या संहिता सापडू शकतात .
२ लुप्त संहिता : या संहिता अचानकपणे लुप्त होतात आपल्या वर्तमान काळामध्ये निर्माण झालेल्या अनेक संहितांच्या पैकी काही संहिता लुप्त होत जाणे अटळ आहे कारण त्या काळाच्या कसोटीवर टिकत नाहीत आणि हळूहळू त्यांचा कचरा होतो कधी कधी असेही होते की कचरा वाटणारी संहिता अचानक लुप्त झाल्यानंतर प्रकट होते . आपल्याकडे सरस्वती नदीचे मिथक हे यातून तयार झालेले मिथक आहे आणि ते या प्रक्रियेचे सर्वोत्कृष्ट सिम्बॉलिक उदाहरण झालेले आहे म्हणजे असे की नदी होती जी लुप्त झाली . प्रश्न असा आहे की सरस्वती नावाची नदी होती की सरस्वती नावाची संहिता होती ? पाशुपत दर्शनानुसार सरस्वती ही ब्रह्मदेवाची बायको होती आणि ती सुद्धा मोक्षाला पोचली होती तिने स्वतःची जी संहिता लिहिली ती सरस्वती संहिता होय या साहित्याला लुप्त करण्यात आले की ती आपोआपच लुप्त झाली हा फार मोठा प्रश्न आहे कारण याच सरस्वतीच्या आधारे नंतर दंतकथा रचण्यात आल्या त्या विकृत सुद्धा करण्यात आल्या . म्हणजे सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी होती असे सांगण्यात येऊ लागले जेणेकरून ब्रह्मदेवाची पूजा होऊ नये . हे असे होण्याचे सर्वात मोठे कारण सरस्वती ही शैव झाली होती ब्रह्मदेव हा शैव झाला होता . पती आणि पत्नी दोघेही मोक्षाला उपलब्ध झाले आणि त्यांना जी संहिता देण्यात आली तिलाच आपण ब्रह्मसुत्र म्हणतो . म्हणजे ब्रह्मसूत्र प्रकट संहिता आहे परंतु सरस्वती संहिता मात्र काळाच्या ओघांमध्ये नाहीशी किंवा लुप्त झाली किंवा करण्यात आली .
शैव परंपरेमध्ये तिलाच मग सतवाई पुढे सटवाई म्हणण्यात येऊ लागले . आणि तिच्यातूनच सप्तशती नावाची संकल्पना उदयाला आली आणि आपणाला गाथा सप्तशती उपलब्ध आहे जी शैव संहिता आहे सटवाईची ही संहिता सटकमध्ये लिहिली होती. ते मात्र अविष्कार प्रवृत्ती म्हणून टिकलेले दिसते आणि अलीकडे भालचंद्र नेमाडे यांनी त्याची अविष्कार प्रवृत्ती आपल्या कविता संग्रहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे .
या सरस्वतीचे मूळ नाव सरस्वती होते का की तिचे नाव मूळचे सतवाई सतबाई असे होते ? शैव लोकांच्या मध्ये जी सटवाईची पूजा आहे तिच्या मागे ही मोक्षाला पोहोचलेली ब्रह्मदेवाची बायको होती जिने शैव धर्म स्वीकारला होता . पुढे मग सरस्वती नावाच्या नदीचे नावच तिला चिपकवले गेले आणि व्यवस्थित पणे पुन्हा एकदा ब्रह्मदेवाप्रमाणे तिलाही वैदिक परंपरेमध्ये सामावून घेतले गेले मात्र तिची मूळ संहिता नष्ट केली गेली. लोक परंपरेने मात्र तिला व्यवस्थित लक्षात ठेवून तिचा मान कायमच राखला . वीणा हे वाद्य तिने तयार केले होते आणि त्यामुळे काही मूर्तींच्या मध्ये ते तीच्या हातात दिसते. सर्वसाधारणपणे तिची उपस्थिती त्यामुळेच तिच्या गुरु बरोबर असते म्हणजे शंकरा बरोबर असते .
३ सुप्तसंहिता :
या संहिता आपल्या वर्तमानात उपस्थित असतात परंतु आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नसतो. ग्रंथालयात पडून असलेले सर्व ग्रंथ म्हणजे सुप्तसंहिता असतात आणि आपण जेव्हा तो उचलतो तेव्हा तो प्रकट सहिता होतो
४ प्रकट संहिता
या संहिता तुमच्यापुढे साक्षात अवतरीत होत असतात त्या तुम्हाला दिसतात त्या इंद्रियांना दिसतात जाणवतात वाचल्या जातात
५ जागृत संहिता
या संहिता फक्त प्रकट होत नाही तर त्यांच्याविषयी समाजामध्ये चर्चा होत राहते म्हणजेच समाज या संहितांच्या बाबतीत जागृत होतो यामध्ये समीक्षाकांचा वाटा फार मोठा असतो त्यांच्यामुळेच अनेकदा जागरणाला सुरुवात होते .
६ उन्नत संहिता
या संहिता तुमच्या समाजाच्या उन्नतीला सुद्धा कारणीभूत ठरतात त्यांच्यामुळे समाज वाढतो विकसित पावतो प्रगती करतो आणि हळूहळू या संहितांना कल्ट स्वरूप प्राप्त होते . मात्र हे स्वरूप अचानक प्राप्त होत नाही.
प्रत्यक्षामध्ये प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे किती संहिता उन्नत असू शकतात . किती संहिता त्या त्या संहिता प्रकारांचा विकास घडवत असतात प्रगती घडवत असतात या अंगाने आपण जर का पाहिले तर उन्नत संहितांचे सुद्धा काही प्रकार दिसतात
१ प्रायोगिक : या उन्नत संहिता असतात त्यांच्यामुळे समाजाचा विकास होणार असतो संहितांच्या प्रकारांचा विकास होणार असतो
२ समांतर यांच्यामुळे प्रायोगिक संहितांची ओळख समाजाला पटते परंतु प्रायोगिक संहितांनी सुरू केलेला प्रवाह सुरुवातीच्या कालखंडामध्ये समांतर पणे धावत राहतो या एका अर्थाने प्रायोगिकतेची वाढ करतात प्रायोगिकतेची प्रगती त्यांच्यामुळे होते किंवा त्या प्रायोगिकतेचा विकास घडवून आणतात आणि हळूहळू त्यांच्यामुळेच प्रायोगिकता प्रस्थापित होण्याच्या दिशेने वाटचाल करते
३ व्यवसायिक इथे प्रायोगिकता ही विकास पावत व्यवसायिक म्हणून स्थिर होते त्याच्यामुळे आर्थिक उत्पन्न शक्य होते उदाहरणार्थ तू वेडा कुंभार नाटकातून bertolt brescht च्या नाटकामधून आलेले अविष्कार तंत्र घाशीराम कोतवाल या नाटकात व्यावसायिक बनून जाते
४ सांस्कृतिक या त्या संहिता असतात ज्या संस्कृतीने स्वीकारलेल्या असतात
५ अभ्यासक्रमिक म्हणजे ज्या संस्कृतीने स्वीकार केल्यानंतर अभ्यासक्रमात लागतात आता घाशीराम कोतवाल ही संहिता बाकायदा सांस्कृतिक होत अभ्यास क्रमिक झालेली आहे. म्हणजेच एका अर्थाने अभ्यासक्रमामध्ये लागणे हे सर्व संहितांचे सर्वात मोठे यश असते आणि म्हणूनच आपल्याकडे प्रत्येक कलावंत आपली कला अभ्यासक्रमात लागावी म्हणून धडपडत असतो विशेषत: साहित्यामध्ये हा प्रकार तर टोकाला असतो आणि अनेकदा लायकी नसलेल्या संहिता सुद्धा अभ्यासक्रमात लागतात . प्रस्थापित म्हणून मान्यता पावतात आपल्याकडे अशा अनेक वैदिक संहिता अभ्यासक्रमाला लावून प्रस्थापित करण्यात आलेल्या आहेत.
या सगळ्या प्रकारांच्या मध्ये सुद्धा आपणाला काही कलावंत असे दिसतात की जे कलावंत अर्थाने कलावंत असत नाही मात्र तरीही ते स्वतःसाठी संहिता निर्माण करत राहतात किंवा त्यांच्या आसपास असलेल्या लोकांच्या साठी संहिता निर्माण करत राहतात कधी कधी त्यांच्या आसपासचे लोक त्यांच्या बोलण्यातून संहिता निर्माण करतात . आपल्याकडे याचे उत्तम उदाहरण म्हणजे गौतम बुद्ध यांच्या उपदेशामधून निर्माण झालेले पिटक साहित्य आहे . अलीकडच्या काळामध्ये जे कृष्णमूर्ती आणि रजनीश यांच्या बोलण्यातून सुद्धा संहिता निर्माण झालेल्या आहेत. अनेकदा सातवा जो प्रकार आहे तो त्यातूनच सिद्ध होतो
७ मुक्त संहिता
या संहिता मुक्त असतात त्या कुठल्याही भूतकाळाचे ओझे बाळगत नाहीत त्यामुळे त्या ताबडतोब प्रसिद्ध पण पावत नाही पण हळूहळू त्यांची जागा बनत जाते . अनेकदा या संहितांची निर्मिती मोक्ष मिळालेल्या व्यक्ती मुक्त झालेल्या व्यक्ती करत असतात .
एकदा का हे सगळे संहितांचे प्रकार आपण समजून घेतले तर मग निर्माण झालेल्या कला साहित्यातील किती संहिता या मुक्त संहिता असू शकतात . किंवा किती संहिता त्या त्या संहिता प्रकारांचा विकास घडवत असतात प्रगती घडवत असतात त्यांच्यामुळे वाढ होत असते हे आपण पाहू शकतो अनेकदा एखादी मुक्त संहिता समाज स्वीकारतो आणि ती उन्नत म्हणून प्रस्थापित होते . आणि कधीकधी धर्मग्रंथ म्हणून सुद्धा प्रस्थापित होते.
म्हणजेच आपण जर का कला ही कलेमधून निर्माण होते असे गृहीत धरले तर आधीच्या गुप्त लुप्त सूप्त प्रकट जागृत उन्नत मुक्त अशा प्रकारच्या सर्व सहितांच्या मधूनच आपले साहित्य निर्माण होत असते असे आपल्याला स्वीकारावे लागते .
त्यामुळेच उत्तर आधुनिक समीक्षक नेहमीच कुठल्याही संहितेची पार्श्वभूमी तपासतात ती कुठल्या संहितेमधून निर्माण झाली ते तपासतात आपल्याकडे उत्तर आधुनिक बनणाऱ्या लोकांचे भूतकाळाचे वाचन इतके किरकोळ असते की त्यांना उत्तर आधुनिक मीमांसा जमत नाही ते फक्त मिरवण्यापुरते उत्तर आधुनिक असतात . आणि त्यामधून अनेक प्रश्न निर्माण होतात . उत्तर आधुनिकतेला तोंड देण्यासाठी तुम्हाला मुळात तुमच्या परंपरा नीट माहिती असाव्या लागतात कारण उत्तर आधुनिकतेचे सर्वात मोठे यश इतिहासाला विस्थापित करून त्या जागी परंपरा आणणे हे आहे हे उत्तर आधुनिकतेला का करावे लागले याचा तपास आता आपल्याला करायचा आहे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment