Posts

Showing posts from November, 2026
 उत्तर आधुनिकता ,व्यक्तित्त्वाचा लोप -लोपमुद्रा आणि व्यवहार श्रीधर तिळवे नाईक  उत्तराधुनिकतेची चर्चा आपण करत आहोत आणि ती वेगवेगळ्या संदर्भात करत आहोत. आपण पाहिले की उत्तर आधुनिकतेने घोषणा केली सब्जेक्ट इज डेड आणि त्यामागे नेमके कोणते अर्थकारण होते .  आता आपण याच्याही अधिक खोलात गेले गेलो तर काय दिसते ? मुख्य म्हणजे माणसांमध्येच स्वतः असे काही आहे का की जे लोप पाहू इच्छिते ? मोक्ष युगामध्ये याचे अत्यंत व्यवस्थित उत्तर शोधले गेले किंबहुना भगवान शंकर यांनीच प्रथम माणसाच्या आत असलेल्या या लोपमुद्रेचा शोध लावला . माणसाच्या व्यक्तीमत्वामध्ये दोन मुद्रा असतात १ लोपमुद्रा २ लोक मुद्रा ! या तुमच्या आत असलेल्या असण्याच्या दोन अभिव्यक्ती आहेत यातील एक शून्याकडे म्हणजे पहिली जी आहे ती शून्याकडे जाते शिवाकडे जाते तर दुसरी जी आहे ती समाजाकडे जाते अनंताकडे जाते शक्तीकडे जाते. मोक्ष ही या लोपमुद्रेतून जन्मलेली साधना आहे . त्यामुळेच तिच्यामध्ये व्यक्तित्वाचे व्यक्तिमत्त्वाचे अस्तित्वाचे विसर्जन करावे लागते . किंबहुना ही विसर्जन करण्यासाठी करण्यात आलेली कृती म्हणजे मोक्षसाधना होय. यामुळेच ...