उत्तर आधुनिकता ,व्यक्तित्त्वाचा लोप -लोपमुद्रा आणि व्यवहार श्रीधर तिळवे नाईक 

उत्तराधुनिकतेची चर्चा आपण करत आहोत आणि ती वेगवेगळ्या संदर्भात करत आहोत. आपण पाहिले की उत्तर आधुनिकतेने घोषणा केली सब्जेक्ट इज डेड आणि त्यामागे नेमके कोणते अर्थकारण होते . 

आता आपण याच्याही अधिक खोलात गेले गेलो तर काय दिसते ? मुख्य म्हणजे माणसांमध्येच स्वतः असे काही आहे का की जे लोप पाहू इच्छिते ?

मोक्ष युगामध्ये याचे अत्यंत व्यवस्थित उत्तर शोधले गेले किंबहुना भगवान शंकर यांनीच प्रथम माणसाच्या आत असलेल्या या लोपमुद्रेचा शोध लावला . माणसाच्या व्यक्तीमत्वामध्ये दोन मुद्रा असतात १ लोपमुद्रा २ लोक मुद्रा ! या तुमच्या आत असलेल्या असण्याच्या दोन अभिव्यक्ती आहेत यातील एक शून्याकडे म्हणजे पहिली जी आहे ती शून्याकडे जाते शिवाकडे जाते तर दुसरी जी आहे ती समाजाकडे जाते अनंताकडे जाते शक्तीकडे जाते. मोक्ष ही या लोपमुद्रेतून जन्मलेली साधना आहे . त्यामुळेच तिच्यामध्ये व्यक्तित्वाचे व्यक्तिमत्त्वाचे अस्तित्वाचे विसर्जन करावे लागते . किंबहुना ही विसर्जन करण्यासाठी करण्यात आलेली कृती म्हणजे मोक्षसाधना होय. यामुळेच जगामध्ये मग हळूहळू या लोप मुद्रेला स्थान मिळत गेले मोक्ष हा तिसरा अक्ष म्हणून प्रस्थापित होत गेला आणि याची सुरुवात भारतामधून झाली आणि म्हणूनच भारत हा मोक्षाचा देश बनला .

आणि मोक्ष ही व्यक्तित्वाच्या विसर्जनाची जागा झाली . मोक्ष ही एक माणसाची मूलभूत महाप्रेरणा आहे त्यामुळे ती पाठलाग सोडत नाही त्यातूनच पुढे स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित होतो जो प्रामुख्याने सामाजिक असतो . किंबहुना स्वातंत्र्याची संकल्पना ही मोक्षाची साईड कन्सेप्ट अतिसंकल्पना आहे. संपूर्ण जगापासून स्वतंत्र होत स्वतःचे स्वतंत्र शोधत संपूर्ण शिवा मध्ये जीवाचे केलेले विसर्जन म्हणजे मोक्ष होय. याला आत्मलोप सुद्धा म्हटले जाते आणि यासाठी जी मुद्रा धारण केली जाते तिला लोप मुद्रा म्हणतात . रामायणामध्ये तिला अत्यंत विपरीत अर्थ दिला गेला जे वैष्णवांना साजेसे आहे . आपल्याकडे त्यामुळे स्त्रीला कधी कधी लोपामुद्रा असे नाव दिले जाते ती एका अर्थाने आपण जपलेली शैव आठवण आहे . भारतामध्ये हे मोक्षाचे युग जवळजवळ आठ ते दहा हजार वर्षे चालले आणि इसवी सन पूर्व 1500 पर्यंत धर्म येईपर्यंत ते व्यवस्थित चाललेले होते दुर्दैवाने नंतर दुष्काळाच्या घटना किंवा तत्सम घटना अशा काही घडत गेल्या की या सर्व संस्कृतीला जिला अलीकडे सिंधू संस्कृती म्हटले जाते तिला दक्षिणेकडे किंवा जंगलाकडे सरकायला लागली आणि मग मोक्ष हा थोडासा बाजूला होत गेला. 

याच काळामध्ये मग आपल्याकडे युरेशियन लोकांचे आगमन होऊ लागले आणि बहुदा ते सुद्धा त्यांच्याकडच्या नैसर्गिक विचित्र वातावरणामुळेच स्थलांतरित झालेले असावेत ते स्वतःच्या सोबत धर्म घेऊन आले आणि त्यांनी इथली मोक्ष ही संकल्पना स्वीकारली आत्मसात पण केले त्यातून मग त्यांचे म्हणावे असे काही धर्म तयार झाले विशेषता वेदांत , ब्रह्म आणि सांग खेळ असे तीन धर्म या लोकांनी निर्माण केलेली दिसतात केलेले दिसतात आणि या सर्वांना मिळून आपण वैदिक धर्म असे म्हणतो . जेव्हा सुरुवातीला आहे स्थलांतरित लोक आले तेव्हा ते अतिशय ओपन होते त्यामुळे ते लोप मुद्रेबाबत सजग होते त्यामुळेच मी नेहमी सांगतो की सर्व लोकांचे वैदिक लोकांशी काहीही शत्रूत्व नाही . त्यांना समजावून सांगता येते किंबहुना त्यांनी सुरुवातीच्या प्रतिकारनंतर शैव लोकांचे व्यवस्थित ऐकलेले होते . परंतु त्यानंतर आलेल्या ब्राह्मण धर्माला मात्र समजावून सांगणे कठीण जाते किंबहुना जवळजवळ अशक्यप्राय आहे . हा एक सत्ताबाज असा धर्म आहे त्यामुळेच तिथे लोप मुद्रेला फक्त सुपारी इतके स्थान आहे . यातूनच एक विशेष प्रयत्न सुरू झाला कारण या युरेशियन लोकांच्या मध्ये सुद्धा असे काही लोक होते ज्यांच्यामध्ये जन्मदत्त लोपमुद्रेचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होते आणि त्यांना काय करायचे किंवा काय करायला सांगायचे हा फार मोठा प्रश्न या संस्कृतीच्या पुढे होता .

पुढे मग धर्म या राजकीय विचार प्रणालीने याच्याच आधारे हौतात्म्य वीरमरण शहिद ही संकल्पना पुढे आणली आणि धर्मयुद्धांमध्ये ती सातत्याने वापरली याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण अर्थातच महाभारत आहे महाभारत म्हणजे हौतात्म्य साजरे करणे आहे आणि कौरव आणि पांडव असे दोन्ही पक्ष हे करत असतात . ब्राह्मण प्राण देणार नाही क्षत्रियांनी धर्मासाठी प्राण द्यावा हे तत्त्व रुजवण्यासाठी म्हणून महाभारत लिहिले गेले . किंबहुना क्षत्रिय वर्ण स्वतंत्र ठेवून आपल्या बरोबरीचा दर्जा त्याला देण्यामागे स्वतःचे प्राण वाचवणे हा एक फार मोठा उद्देश होता . रणांगणात युद्ध लढता लढता जो मरण पावतो त्याला स्वर्ग मिळतो ही संकल्पना वैष्णव लोकांच्यानंतर सर्वात अधिक उत्कृष्टपणाने मोहम्मद पैगंबर यांनी राबवली आणि त्याचा परिणाम जो व्हायचा तोच झालेला आता दिसतो. हौतात्म्य हा स्वर्गाकडे जाण्याचा शॉर्टकट झाला पण त्याचबरोबर युद्धामध्ये मारणे हे सुद्धा कॉमन होत गेले . हिंसा हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव असल्यासारखे आणि तो प्रथमच सापडल्यासारखे सर्वजण वावरायला लागले आणि साम्राज्यवादाचा प्रचंड मोठा जयजयकार या काळामध्ये धर्माच्या नावाने साजरा झाला . रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्ये साम्राज्यवादाला हातभार लावतात आणि साम दाम दंड भेद या तत्त्वज्ञानाचा प्रचार करतात हे तत्त्वज्ञान ब्राह्मणांचे की क्षत्रियांचे हे ठरवणे आज सुद्धा अवघड आहे . माझे वैयक्तिक मत असे आहे की हे तत्व क्षत्रियांनीच सत्तेसाठी म्हणून डेव्हलप केले आणि ब्राह्मणांनी त्याची फक्त तात्विक मांडणी केली . धर्म हा फक्त पुरोहित लोक स्पॉन्सर करत नाहीत तर शासकवर्ग सुद्धा धर्म स्पॉन्सर करत असतात आणि म्हणूनच धर्म नष्ट पण होत नाही कारण कुठल्या ना कुठल्या तरी राजकारणासाठी तो कायमच उपयुक्त राजकीय विचार प्रणाली म्हणून सतत उदय करत राहतो .

प्रश्न पुढे ठाकला तो पुरोगामी लोकांच्या पुढे कारण त्याही युगामध्ये पुरोगामी लोकांच्या टाईप मध्ये सुद्धा" लोप मुद्रा" असतेच .

साहजिकच जेव्हा धर्माचा प्रभाव विज्ञानाने कमी केला तेव्हा या स्वतःचा लोप करू इच्छिणाऱ्या लोप मुद्रांचे ती बाळगणाऱ्या लोकांचे काय होणार असा प्रश्न होता . या प्रश्नाचे उत्तर अर्थातच मार्क्सवादामध्ये मिळाले म्हणजेच मोक्ष युगामध्ये जे लोक मोक्षवादी होते ते धर्माच्या युगामध्ये धर्मवादी झाले विशेषत : ज्यू, ब्राह्मण ,इस्लाम , वैष्णव आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे झाले आणि मग पुरोगामी युगामध्ये या लोकांनी समाजवाद आणि मार्क्सवाद असे दोन वाद आणि भारतामध्ये आंबेडकरवाद आणि गांधीवाद स्वीकारले हे सर्वच लोक लोपमुद्रा मागत होते साहजिकच त्यांच्यासाठी एखादी विचार प्रणाली येणे आवश्यक होते त्या काळाची गरज म्हणून लोपमुद्रा स्पॉन्सर करणारे सर्व एजंट सर्व ईझम उदयाला आले जे त्यांचा लोप करायला तयार होते. हा लोपवाद इतका वाढला की जेव्हा या लोकांच्या ताब्यात सत्ता आली तेव्हा त्यांनी ज्यांनी लोप पावायला नकार दिला त्यांचा नंतर लोप करायचा असाही उद्योग सुरू केला आणि मग स्टालिन आणि माओ वगैरे लोकांनी तो सरकारी केला इथे डाव्या विचाराचा समाज हाच ब्रम्हांड होता आणि त्यामध्ये स्वतःचा लोप करून ब्रह्मप्राप्ती करायची होती . ज्यांनी याला नकार दिला ज्यांनी आपले अस्तित्व व्यक्तित्व प्रमाण मानून लोप पावायला नकार दिला आणि आपले आधुनिक अस्तित्व सतत जिवंत ठेवले त्यांना मग अर्थातच मारले गेले किंवा त्यांना हद्दपार शिक्षा ठोठावली गेली . त्यांचा गुन्हा हाच होता की ते लोक अस्तित्वाचे प्रामाण्य मांडणाऱ्या दिशेने सरकायला लागले होते. ते गेंडा बनले नाहीत मनुष्यच राहीले. ते भक्त बनले नाहीत मोक्षाचे साधकच राहिले .

याबाबतीत भारताकडे काय स्थिती होती ? आपल्याकडे समाजवाद मार्क्सवाद वगैरे विचार प्रणाली आयात झाल्या आणि त्यांना लोप पावणारे लोपमुद्रेबाज कार्यकर्ते सुद्धा मिळाले. पुढे दहा वर्षातच हिंदुत्ववाद ही विचार प्रणाली सुद्धा लोप मुद्रा मागणारी विचार प्रणाली उदयाला आली आणि आजही ती जिवंत आहे . हिंदुत्व वाद असा लोप मागतो कारण तो धार्मिक आहे आणि धर्म लोप मागतो. पुरोगामी युगामध्ये धर्म जाऊन राष्ट्र केंद्रस्थानी आले हिंदुत्ववाद हा सुद्धा केंद्रस्थानी राष्ट्र ठेवतो सावरकरांच्या भाषेत सांगायचे सर तुझ्यासाठी जनन ते मरण तुझ्यासाठी मरण ते जनन होय.किंबहुना राष्ट्र प्रथम ही हिंदुत्ववादाची मुख्य घोषणा आहे आणि लोकांच्या राष्ट्रामधल्या विसर्जनाची मागणी तो सातत्याने करतो . आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मार्क्सवाद आणि समाजवाद हीच मागणी करतो मात्र आम्ही मागणी केली तर ती सज्जन आणि दुसऱ्यांनी केली तर मग ती वाईट असे दोघे एकमेकाला वाईट ठरवत आणि स्वतःला चांगले ठरवत वाटचाल करत आहेत . प्रत्यक्षात दोघांनाही व्यक्तित्वाचे व्यक्तिमत्त्वाचे आणि अस्तित्वाचे आयडिया लॉजी मध्ये विसर्जन हवे आहे.

प्रश्न यामुळेच निर्माण होतो की हे मोक्षासारखे आहे का? तर नाही ! शिवामध्ये जीव विसर्जित करण्याचा अर्थ हौतात्म्य होत नाही कारण त्यामध्ये शरीर नाहीसे होत नाही उलट शरीर उन्नत होत जाते . धर्मामध्ये मात्र असे होत नाही धर्म सरळ सरळ युद्ध भूमीवर आणि युद्धाच्या कारणासाठी तुमचे शरीर मागतो . हीच गोष्ट समाजवाद , मार्क्सवाद , हिटलर वाद , फाशी वाद , हिंदुत्ववाद मागतात . त्यामुळेच काहीही झाले तरी संघाचे कार्यकर्ते हे शेवटी राष्ट्र प्रथम म्हणत राष्ट्रासाठी लोप पावायला तयार असतात. अगदी मार्क्सवादाला सुद्धा जे राज्य आणायचे होते त्या राज्यामध्ये सर्व नागरिकांचा नागरिक म्हणून लोपच होणार होता. 

त्यामुळे साहजिकच समाजामध्ये विशेषतः पुरोगामी समाजामध्ये आणि डाव्या लोकांच्या राष्ट्रांमध्ये १ लोप पावायला तयार असणारे लोक आणि २ लोप पावायला तयार नसणारे लोक असे दोन प्रकार पडतात. यामध्ये एक तिसरा प्रकार आपोआपच घुसतो तो नेहमीच सर्वत्र सर्व ठिकाणी असतो आणि तो संधी साधू असतो. तो अशा लोपमुद्रा टाईप लोकांना व्यवस्थित हेरतो आणि पक्षाच्या नावाखाली राबवतो आणि पक्षांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करतो हे लोक सत्तावादी असतात आणि त्यांच्यासाठी लोपमुद्रा ही एक सोयीस्कर सोय असते . मार्क्सवादाच्या नावाखाली अनेक स्वतःला निस्वार्थी दाखवणारे लोकांचे लढे लढतो असे दाखवणारे सत्ताबाज लोक प्रत्यक्षामध्ये राजकीय लोक होते आणि त्यांनी व्यवस्थित समाजवादी आणि मार्क्सवादी कार्यकर्ते आपल्या कामाला राबवून घेतले त्यांच्या लोपमुद्रेचा गौरव करत आपल्यासाठी वापरली आणि समाजाचे खरे शत्रू हे असे सत्तावादी लोक असतात

उत्तर आधुनिक कालखंडामध्ये तर ओशो रजनीश्यांच्या सारख्या लोकांनी हेच उद्योग केलेले दिसतात . 1960 नंतर असे अनेक हुकूमशाही प्रवृत्तीचे सत्ताबाज लोक सत्तेवर आलेले दिसतात . हे असे लोक पूर्वी राजे व्हायचे बादशाह व्हायचे आता ते लोकांच्याकडून निवडून आल्याचे भासवतात दुर्दैवाने त्यांच्याकडे उंगली केली जात नाही उंगली नेहमी केली जाते ती भलत्याच लोकांच्याकडे प्रत्यक्षामध्ये सत्ताबाज आणि अनेकदा आपल्याकडे ज्यांना क्षत्रिय म्हंटले जाते असे लोक हे लोपमुद्रा टाईप लोकांचा युज करण्यामध्ये प्रचंड वाकबगार असतात. दुसऱ्यांना ताटाखालची मांजर बनवण्यामध्ये त्यांना फार मजा येत असते . यामध्ये काही संपादक सुद्धा असतात जे व्यवस्थित आपल्या हाताखालच्या लोकांना कमीत कमी पैसे देत त्यांच्याकडून अनलिमिटेड काम करून घेऊन वर त्यांना आणि सगळ्या जगाला शहाणपण सांगत बसतात अगदी साहित्याच्या चळवळीमध्ये सुद्धा लेखकांनी एकही पैसा मागू नये त्यांनी सर्व काही फुकट द्यावे अशी अपेक्षा करत त्यांना आपल्या कामाला लावत आपली प्रतिमा उंचावणारे काही साहित्यिक असतातच संपादक असतातच . ही मुळातच माणसांच्या मधली एक विलक्षण सत्ताबाज अशी झुंड आहे जिला खोटे बोलायला कसली लाज असत नाही. मुख्य म्हणजे हे लोक जाहिरातींच्या साह्याने एका बाजूला उत्पन्न कमवत असतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र इतरांना फुकट राबवत असतात .यांचा माज सुटत नाही. कारण यांच्या डोक्यावर ताज असतो . कलावंतांच्या मध्ये यामध्ये प्रामुख्याने अभिनेते असे असतात . ते बिनधास्तपणे लेखकाने लिहिलेले डायलॉग आपले म्हणून सांगतात . संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शित केलेली गाणी आणि गायकांनी गायलेली गाणी आपली गाणी म्हणून सांगतात वास्तविक त्या गाण्यातल्या क्रिएटिव्हिटीशी यांचा घंटा संबंध असत नाही . आणि लोक पण इतके नादान की हे सर्व खपवून घेतात कारण लोकांची अक्कल एकंदरीत तेल लावायला गेलेली असते . आज सुद्धा अमिताभ बच्चन ची गाणी म्हटली म्हणजे लोक त्याला जास्त मान्यता देतात आता लोकच जर या लायकीचा आयक्यू बाळगून असतील तर मग त्यांची लायकीच असे हलकट लोक नेतृत्व म्हणून मिळावेत अशी असते असे म्हटले तर त्यात चुकीचे काय ? पण असे लोकांनाच खडसावले की लोक तुमच्यावर बहिष्कार टाकायला लागतात आणि ते परवडणारे नसते त्यामुळे याबद्दल अनेक विचार करणारे विचारवंत लोकसुद्धा मौन पाळतात पण याने काय होणार जे सत्य आहे ते सत्य आहे. अशाच लोकांची सेवा करण्यामध्ये अनेक लोकांना मजा येते याचे कारण असे आहे की लोक कुणीकडे आपण तिकडे असा सर्वसाधारणपणे ठरावच सामान्य माणसांनी स्वतःच्या मनामध्ये पास केलेला असतो. तेव्हा ही जी शोषणाची टाळी वाजत असते ती कधीही एका बाजूने वाजलेली नसते ती दोन्ही बाजूने वाजलेली असते शोषकाने आणि शोषिताने दोघांनी मिळून ही टाळी वाजवलेली असते आणि हे मार्क्सवादी लोकांना कधीही कळाले नाही म्हणूनच त्यांची समाज रचना कधीही नीट झाली नाही . फक्त चायना सारख्या काही मोजक्या देशांनी हे ओळखून व्यवस्थित धोरण बदलले .

याचा एक परिणाम अनेकदा मग एकाधिकारशाहीमध्ये होतो . आणि ज्या व्यक्तीचा अधिकार प्रस्थापित होतो ती व्यक्ती अक्षरश: तिच्या भोवतालच्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या यंत्रणेचा मंत्रणेचा एक screw किंवा nut समजायला लागते. समाज हा असा चालत राहतो आणि त्यामुळे तो बदलत पण नाही कारण ज्यांचे मुळात शोषण होते असे लोकच राज्य सत्तेला शोषण करणाऱ्यांना मानसिक पातळीवर सामील असतात विचारवंत लोक "लोकांचे अज्ञान लोकांचे अज्ञान" म्हणत किंचाळ्या टाईप करत बसतात परंतु जे शोषित असतात त्यांनाच मुळात आपल्याच बाजूने उभ्या असणाऱ्या विचारवंतांची कसलीही फिकीर असत नाही त्यामुळेच मोक्षवादी असणे कधीही फायद्याचे असते कारण मोक्षवादी माणसाला अशा अपेक्षा नसतात . लोक काय लायकीचे असतात आहेत हे त्याला त्यांच्या भुका , निकड, तृष्णांच्यामुळे व्यवस्थित माहिती असते . तो लोकांच्याकडून अपेक्षा करत नाही तो लोकांची उपेक्षाही करत नाही लोकांच्या विषयी करुणा असावी तळमळ असावी मात्र लोक आसक्तीच्या चिखलामध्ये बागडत आहेत पोहत आहेत एन्जॉय करत आहेत आणि दुःख झाले तर दलदलीत फसले तर ओरडत पण आहेत हे ते अत्यंत उघड्या डोळ्यांनी व्यवस्थित नीट पाहत असतात. मला असे अनेक सिद्ध माहित आहेत जे समाजात सिद्ध म्हणून येत नाहीत. फक्त जगण्यासाठी आवश्यक असलेला जगण्याचा व्यवहार पार पाडण्यासाठी येतात .अनेकदा जेव्हा एखादा मोक्ष मिळाल्यानंतर नवीन धम्म कोणी चालू करतो तेव्हा तो नेहमीच अज्ञानाकडे बघत असतो लोकांचे अज्ञान दूर केले की ताबडतोब परिवर्तन होईल असे त्याला वाटत असते पण प्रत्यक्षामध्ये अज्ञान हे कारण एका अर्थाने सामाजिक आहे . खरे कारण आसक्ती हेच आहे . त्यामुळे अज्ञान निर्मूलनाची चळवळ अंतिमत: कोसळतच जाते . अनेकदा लोकांना ही आपली आसक्ती आहे हे माहीत असते तरीसुद्धा लोक ती गोष्ट करतात . ते कधी कधी तिला स्वार्थ म्हणतात तर कधी कधी तिला सामूहिक स्वार्थात रूपांतरीत करून पेश करतात. यामध्ये सर्वात मोठी गोची ही खऱ्या लोपमुद्रा टाईप लोकांची होते कारण अनेकदा हे लोपमुद्रा टाईप लोक समाजाकडून समाजातल्या धूर्त राजकारणी सत्ता कारणी लोकांच्याकडून व्यवस्थित वापरले जातात . त्यांना अलीकडे खुर्च्या आणि सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते असे म्हटले जाते . हे नव्या युगाचे योद्धे आहेत जे संघटनेसाठी पक्षासाठी अपवादात्मक वेळेला एखाद्या कार्पोरेट हाऊस साठी राजकीय किंवा आर्थिक रणांगणावर शहीद होत असतात . त्यांच्या या हौतात्म्याचे आपण काहीच करू शकत नाही अनेकदा फक्त हळहळू शकतो . या मधले सर्वात मोठे बळी भारतामध्ये मार्क्सवादी पक्षाचे कार्यकर्ते होते त्या खालोखाल समाजवादी आणि अलीकडे त्यांच्या आसपास हिंदुत्ववादी कार्यकर्ते ठरलेले दिसतात . आंबेडकरी वादी लोक याबाबतीत जास्त चाप्टर आहेत ते स्वतःला सहजासहजी शहीद होऊ देत नाहीत . ते अनेकदा आपली नोकरी व्यवस्थित शाबूत ठेवून किंवा धंदा शाबूत ठेवून काम करत असतात . याचे कारण त्यांचा आदर्श आंबेडकर आहे . आत्मभान आणि समाजभान यांचे जे समतोल समीकरण असते ते आंबेडकर यांच्याकडे कमालीचे होते . साहजिकच आंबेडकरवादी लोकांच्या मध्ये अशा बळी पडणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या खूप म्हणजे खूपच कमी आहे. मात्र तिथेही असे लोक आहेत .

थोडक्यात काय तुम्ही जर का लोप मुद्रा आत मध्ये उपस्थित असलेले मनुष्य असाल तर थोडेसे स्वतःच्या या लोपमुद्रेविषयी जागे व्हा . जागृत रहा काम करा परंतु नेमके काय होते आहे ते लक्षात घ्या. सारेच्या सारे पक्ष हे फक्त तुम्हाला राबवून घेणाऱ्या यंत्रणा राबवत असतात . त्या तंत्रयंत्रणेमध्ये मध्ये आपले नेमके काय काम चाललेले आहे आपल्याला काय काम सांगितले जात आहे ते नीट तपासा योग्य असेल ते काम नीट करा मात्र स्वतःच्या अस्तित्वाचा व्यक्तिमत्त्वाचा व्यक्तित्वाचा बळी देताना दहा वेळा विचार करा. मुळात हे लक्षात घ्या की ही तुमची मोक्षाची प्रवृत्ती आहे जी नैसर्गिक आहे . ती तुम्हाला मोक्षाकडे वळवायला बघणार परंतु तुम्ही जर का मोक्षाकडे वळत नसाल तर तिला पर्याय म्हणून नेमके कशाकडे वळत आहात ते लक्षात घ्या. ही आतली असोशी असते आणि ती संपूर्ण जीवाला आनंदात विसर्जित करण्यासाठी अनंतात विसर्जित करण्यासाठी तुमच्या आत मध्ये टपलेलीच असते . ती तुम्हाला संगीतात संगीतमय करून टाकते चित्रकलेत चित्रमय करून टाकते पण तीच कधीकधी तुम्हाला पक्षमय संघटनामय करून टाकते . हे असे पक्षमय आणि संघटनमय होणे हे कळत नकळत बाहेर जे आहे त्याला शरण जाणे असते . मोक्षामध्ये तुम्ही कोणाला शरण जात नाही उलट सतत आत्मभान टोकावर ठेवता परंतु बाहेरच्या दिशेने जाणारा मोक्षम आणि मोक्षक्षेम हा अनेकदा तुमचे आत्मभान काढून घेणारा असतो तेव्हा सावध असा. ही लोपमुद्रा अत्यंत प्रबळ असते . तिला विधायक रूप द्या. तिची कला करा . निदान रसिक करा . तिची ध्यानधारणा करा पण जे काय कराल ते आनंदाने करा आनंदात राहण्यासाठी करा जे आनंद देते त्यासाठी करा . बाहेरून कोणीतरी सत्ता देईल म्हणून जर का तुम्ही हे करायला जाल किंवा तुम्हाला सत्तेचा फील येतो म्हणून तुम्ही करायला जाल तर मग तुम्ही नरकाची वाट चालायला लागलेल्या व्यक्ती बनू लागलेले आहात आणि हे नरक तुम्हीच निर्माण केलेले असतात एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा सत्ता नेहमीच नरक निर्माण करते.

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती