Posts

Showing posts from October, 2026
 युरोशियन फोबिया आणि जागतिक राजकारण श्रीधर तिळवे नाईक  जागतिक राजकारणाची समीकरणे पुन्हा एकदा बदलत चाललेली आहेत आणि उत्तराधुनिकतेने रशियन साम्राज्याचा जो अस्त घडवला त्या मागची कारणे हल्ली शोधली जात आहेत . मधल्या काळामध्ये जी युक्रेन विषयी प्रचंड सहानुभूती निर्माण झाली होती ती सहानुभूती अचानक कमी झाले की काय अशी शंका येण्या इतपत गोष्टी बदललेल्या आहेत . मुळातच या मागचे सर्वात मोठे कारण कदाचित खुद्द अमेरिकेलाच रशियाकडून तेल घेण्याची वेळ येते की काय अशी आलेली शंका आहे. मुळातच मुस्लिम प्रदेशांच्या मध्ये तेलामुळे जे काही फ्रेश पेच प्रसंग निर्माण होत आहेत त्याने संपूर्ण युरोप आता हादरलेला दिसतो. या लोकांनी आपापसात लढून सर्वच्या सर्व तेल विहिरी जाळून टाकल्या तर करायचे काय असाही टोकाचा विचार काही लोकांच्या मनात येतो आहे . साहजिकच या सगळ्यांमध्ये आपण रशियाशी नेमका का पंगा घेत होता होतो असा प्रश्न सर्वांना पडला आहे . याचे एक कारण अलीकडे आपण खरोखरच येडेशियन लोकांना घाबरण्याचे कारण आहे का हा पडलेला प्रश्न आहे.  मुळातच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे युरोशियन फोबिया काही य...
हेमंत दिवटे यांच्या आरोपांना दिलेले उत्तर श्रीधर तिळवे नाईक  हेमंत दिवटे यांनी अचानक संवाद सुरू केला तो पुढील प्रमाणे होता  नेमाडेंचा देशीवाद हिंदुत्ववादाला कवेत घेतो आणि त्यामुळेच या लेखकरावांना पीएम च्या हस्ते पुरस्कार हवा असतो, मुलाखती द्यायच्या असतात, सगळी व्यासपीठ उपलब्ध हवी असतात. प्रतिभावंत लेखक अश्या फंदात कधी पडतात का? उदय प्रकाश म्हणूनच नेमाडेंपेक्षा चांगला वाटतो. नेमाडेंचे लेखन बाह्य पराक्रम तुला माझ्यापेक्षा जास्त चांगले माहीत आहेत. सट्टाक वाचवत नाही कारण करप्ट माईंड कॅनॉट राईट फाइन पोइट्री. मी समीक्षक नाही. श्रीधरचे आता काय मत आहे ते मला जाणून घ्यायचे आहे. मध्यंतरी तो नेमाडे भक्त झाला आहे असे मला जाणवले होते. ही सतीश तांबे यांच्या बॉलवर केलेली कॉमेंट आहे वॉल वर केलेली कॉमेंट आहे मी नेमाडे भक्त झालो आहे असा अचानक जाणवलेला आरोप आला  म्हणून त्याला मी उत्तर दिले  Hemant Divate मी कधीही नेमाडे भक्त झालेलो नाही शब्दवेधशी युती करून तूच नेमाडे यांना व्यवस्थित अंडरग्राउंड सपोर्ट दिलेला आहेस . तुला काय शब्दवेध किंवा दर्शन देशीवादी आहे माहित नव्हते ? तुझ्या या देशी...
पुन्हा नेमाडे पुन्हा उत्तराधुनिकता पुन्हा देशीवाद आणि आडगळ झालेली गोची श्रीधर तिळवे नाईक  खरे सांगायचे तर नेमाडे यांच्याकडे सांगायला फारसे नवे उरलेले नाही त्यांची गाडी कोणत्या दिशेने जाणार हे मी आधीच सांगितले होते आणि ती तिथेच म्हणजेच वैष्णव हिंदुत्वामध्ये गेली आहे अलीकडच्या त्यांच्या या वक्तव्यावरून हे सिद्ध होते आहे  ते म्हणालेत ," देशाचे दुर्दैव असे की आपण वर्तमानाच्या मागे लागलो आणि भूतकाळ विसरलो. त्यामुळे आपले वाईट दिवस आले. जितके भूतकाळाला विसराल, तितके वाईट दिवस येतील . भारताचा बहुमान त्याच्या भूतकाळातील ज्ञान आणि कर्तृत्वामुळे आहे. त्यामुळे इतिहासातील चांगल्या गोष्टी शोधून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवायला हव्यात शून्याचा शोध, शरीरशास्त्र आणि शस्त्रक्रियेसारख्या क्षेत्रांत भारताने योगदान दिलेले आहे पूर्वी खेड्यातील न्हावीदेखील ओठ आणि दात यांसारख्या अवयवांशी संबंधित दुरुस्तीची कामे करायचे. हिंदुत्वाचा व्यापक अर्थ मांडण्याची गरज हिंदू या शब्दाला संकुचित अर्थ प्राप्त झाला असून तो बदलण्याची गरज आहे हिंदुत्वाचा अर्थ केवळ गोधरा घटनेपुरता मर्यादित नसून सर्वांना जवळ घेणारी व्य...
 भूतकाळ ,चौथी नवता आणि मोबाईल श्रीधर तिळवे नाईक  चौथा नवतेच्या केंद्रस्थानी जालकी आली, जंत्र आले जाल आले जाल विज्ञान आले जालतंत्रज्ञान आले जाललोक आला आणि मुख्य म्हणजे जाल वस्तू किंवा चिन्ह वस्तू आल्या  आज एकच चिन्ह सृष्टी मध्ये भूतकाळ हा जाल काळ बनलेला आहे . त्यामुळेच एका अर्थांना इतिहासाला आणि परंपरेला आता जालकी रिप्लेस करत आहे . भूतकाळाच्या आकलनाला भूतजाल म्हणणे आता आवश्यक बनत चाललेले आहे आणि इतिहासाला आणि परंपरेला भूतजालकी असा नवीन शब्द त्यामुळेच द्यावा लागतो. मुळातच अलीकडे जवळजवळ महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अनेक चिन्ह वस्तू ज्याला वस्तू बनलेले आहेत सेमीओडिटी नेटोडिटी बनलेली आहे . हा एक फार मोठा बदल आत्ताच्या काळात झालेला आहे जो साधारणपणे 1995 नंतर हळूहळू स्थिर होत गेला . याला पोस्ट डिजिटल यश सुद्धा म्हटले गेले आणि ते आता समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थिर झालेले आहे. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून सध्या जगामध्ये मोबाईलचा उल्लेख होतो मोबाईल मध्ये नेमके कशाकशाचे नेटवर्क एक जाल म्हणून उभे राहते ? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल हा टेलिफोनचे काम करतोच करतो आणि त्...
 कला,निर्मिती मीमांसा आणि महाप्रणाली १ फायनल  श्रीधर तिळवे नाईक  १ मार्गी आणि देशी प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यावर सर्वाधिक प्रतिक्रिया या तरुण पिढीच्याच आल्या होत्या. अपवाद फक्त मीनाक्षी पाटील ! यामध्ये एक प्रश्न अतिशय कॉमन होता तो म्हणजे तुमचा अनुक्रम चुकला असे तुम्हाला वाटत नाही का ? निर्मितीमीमांसा सर्वात प्रथम तुम्ही का घेतली? त्या ऐवजी मार्गी आणि देशी हा दुसरा भाग प्रथम घ्यायला पाहिजे होता असे तुम्हाला वाटत नाही का ?  मुळातच एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे चौथी नवता म्हणजे केवळ देशीवादाविरोधातील बंड नव्हे तर ते उत्तरआधुनिकतेच्या विरोधातले सुद्धा बंड आहे त्यामुळे साहजिकच उत्तर आधुनिकतेचे काही मूलभूत सिद्धांत खोडून काढणे आणि त्याला पर्यायी सिद्धांत मांडणे हे सुद्धा चौथ्या नवतेचे काम असते . उत्तरआधुनिकवादाने निर्मितीवादाच्या अंगाने अत्यंत क्रांतिकारक सिद्धांत मांडले त्यातील एक म्हणजे निर्मिती ही आधी निर्माण झालेल्या निर्मितीच्यामधून निर्माण होते संहिता ही संहितेकडूनच निर्माण होते टेक्स्ट इज क्रिएटेड बाय टेक्स्ट ! देरिदा याने हा सिद्धांत मांडला होता. आणि त्यात...
माणसाची व्याख्या , शून्यता आणि वस्तुनिष्ठता श्रीधर तिळवे नाईक  संपूर्ण विसावे शतक माणसाची व्याख्या करताना माणसाच्या रॅशनॅलिटीला किंवा जाणिवेला किंवा आत्मज्ञाने ला किंवा जाणिवेला किंवा स्वतंत्र इच्छेला किंवा नैतिकतेला केंद्रस्थानी ठेवून माणसाची व्याख्या करण्याचा प्रयत्न करत होते परंतु या सर्व गोष्टी पोस्ट मॉर्डन सायन्स मध्ये कालबाह्य होत गेल्या कारण या सायन्स मध्ये ज्या ज्या इतर मानवे तर प्राण्यांचा अभ्यास करण्यात आला त्या सर्व मानवेतर प्राण्यांच्या मध्ये या गोष्टी आंशिक प्रमाणात का होईना पण आढळून आल्या त्यामुळे त्यांना अनुसरून माणसाची व्याख्या करणे अशक्य होत गेले साहजिकच मग चौथ्या नवते मध्ये या गोष्टी वगळून आणखीन काही गोष्टी आढळतात का याचा शोध सुरू झाला आहे. माझ्या मते माणसांमध्ये असलेली त्याला माणूस करणारी सर्वात मुख्य गोष्ट कुठली असेल तर ती गोष्ट म्हणजे मोक्षता म्हणजेच शून्यता होय . माणसाची ही शून्य असण्याची किंवा शून्यात परतण्याची क्षमता माणसाला इतर सर्व प्राण्यांच्या पेक्षा वेगळी काढते . आणि माझे स्वतःचे म्हणणे असे आहे की या शून्यतेमुळेच माणूस वस्तुनिष्ठता विकसित करू शकतो आणि ...
 ब्राह्मण धर्म विरुद्ध बौद्ध धर्म संघर्षाचे मूळ आणि विस्तार श्रीधर तिळवे नाईक  अलीकडे कुशावाहा समाजाने अचानक मौर्य वंशावर आपला दावा सांगितला आणि पुन्हा एकदा वैचारिक वाद उफाळला. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सुरू झाले याचे कारण असे होते की मौर्य वंशातला अशोक राजा हा बौद्ध धर्माच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा राजा आहे आणि तोच जर का कुशावाहा झाला तर त्यातून निर्माण होणारा परिणाम हा बौद्ध धर्माच्या प्रचाराला क्षती पोहोचवू शकतो असे बौद्धांना वाटते . सर्वसाधारणपणे या वादा मधले अनेक मुद्दे अलीकडे नव बौद्ध लोकांनी महाराष्ट्रामध्ये आयात करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा हा वाद अलीकडे खेळला जाताना दिसतो . मुळातच आपण हे लक्षात घेतले पाहिजे की हा वाद फार जुना आहे. यासाठी इतिहास पाहिला पाहिजे.  मी हे खूपदा सांगितलेले आहे की भारताचा इतिहास क्रम हा भारताचाच इतिहास क्रम आहे म्हणजे आफ्रिकेत श्रद्धा निर्माण झाली आणि राज्य प्रणाली निर्माण झाली युरोपमध्ये श्रद्धा निर्माण झाली आणि त्यातून ग्रीक तत्त्वज्ञान निर्माण झाले पण युरेशियामध्ये मात्र श्रद्धा निर्...