माणसाची व्याख्या , शून्यता आणि वस्तुनिष्ठता श्रीधर तिळवे नाईक
संपूर्ण विसावे शतक माणसाची व्याख्या करताना माणसाच्या रॅशनॅलिटीला किंवा जाणिवेला किंवा आत्मज्ञाने ला किंवा जाणिवेला किंवा स्वतंत्र इच्छेला किंवा नैतिकतेला केंद्रस्थानी ठेवून माणसाची व्याख्या करण्याचा प्रयत्न करत होते परंतु या सर्व गोष्टी पोस्ट मॉर्डन सायन्स मध्ये कालबाह्य होत गेल्या कारण या सायन्स मध्ये ज्या ज्या इतर मानवे तर प्राण्यांचा अभ्यास करण्यात आला त्या सर्व मानवेतर प्राण्यांच्या मध्ये या गोष्टी आंशिक प्रमाणात का होईना पण आढळून आल्या त्यामुळे त्यांना अनुसरून माणसाची व्याख्या करणे अशक्य होत गेले साहजिकच मग चौथ्या नवते मध्ये या गोष्टी वगळून आणखीन काही गोष्टी आढळतात का याचा शोध सुरू झाला आहे.
माझ्या मते माणसांमध्ये असलेली त्याला माणूस करणारी सर्वात मुख्य गोष्ट कुठली असेल तर ती गोष्ट म्हणजे मोक्षता म्हणजेच शून्यता होय . माणसाची ही शून्य असण्याची किंवा शून्यात परतण्याची क्षमता माणसाला इतर सर्व प्राण्यांच्या पेक्षा वेगळी काढते . आणि माझे स्वतःचे म्हणणे असे आहे की या शून्यतेमुळेच माणूस वस्तुनिष्ठता विकसित करू शकतो आणि या वस्तुनिष्ठतेमुळेच विज्ञाननिष्ठ बनण्याच्या माणसाच्या शक्यता सर्वात जास्त होत जातात.
अर्थात माणूस आसक्ती ग्रस्त असतो त्यामुळे या आसक्ती मधून निर्माण होणाऱ्या भुका निकड आवश्यकता तृष्णा यांच्यामुळे तो भारावून जात असतो आणि शक्तीने निर्माण केलेल्या अनंततेकडे सतत धावायला बघतो यातूनच मग अनेकदा तो ऑब्जेक्टिव्ह होण्यापेक्षा सब्जेक्टिव्ह होत जातो आणि त्याची विज्ञाननिष्ठता हळूहळू लोप पावायला लागते .
अर्थातच सदा सर्वकाळ वस्तुनिष्ठ राहणे ऑब्जेक्टिव्ह राहणे माणसाला शक्य आहे का हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण शेवटी त्याला श्वास घ्यावा लागतो आणि श्वास घेणे हे त्याचे सब्जेक्टिव्ह बनत जाते अन्न लागते आणि अन्न घेणे सब्जेक्टिव्ह बनत जाते वस्त्र घालणं सब्जेक्टिव्ह बनत जाते त्याच्या आसक्ती त्याला नेहमीच व्यक्तिगत जीव टिकवणे आवश्यक बनवत जातात. असे असून सुद्धा मनुष्य हा टोळी म्हणूनच टोळीचा भाग म्हणूनच जगत असतो आणि त्यातूनच मग तो अनंततेकडे अधिकाधिक सरकायला लागतो . आपले हे सरकणे आसक्तीमुक्त करणे त्याला अवघड बनत जाते. प्रत्यक्षात मात्र वस्तूनिष्ठतेसाठी तुम्ही अधिकाधिक आसक्ती मुक्त असणे गरजेचे असते अन्यथा तुमची असती आसक्ती तुमच्या ठाई आसक्तीग्रह निर्माण करत राहते आणि त्यातून मग पार्शलटी आणि पूर्वग्रह लोभ मोहमाया इत्यादी विकार निर्माण होत राहतात . तुमचे विचार सुद्धा विकारग्रस्त होत तुम्हाला भटकवत राहतात आणि जे समोर आहे ते जसेच्या तसे पाहणे अशक्य करून टाकतात . समता आणि न्यायता ही दोन मूल्ये थोडे मग तुम्ही साईडलाईन करायला लागता. समते आणि न्यायतेएवजी आपोआपच टोळीयता मूळ धरायला लागते . अनेकदा तर फक्त स्वतःच्या टोळीसाठी तुम्ही समता मागायला लागता न्याय मागायला लागता त्यातूनच टोळीचे आंदोलन तयार होते . अशा वेळेला वस्तुनिष्ठतेची जितकी गरज भासते तितकी इतर वेळी भासत नाही.
सुदेवाने माणसाच्या ठाई अधून मधून का होईना पण ही वस्तुनिष्ठता उगवत राहते आणि त्याला सांगत राहते की जे चालले आहे ते वस्तुस्थितीला धरून नाही सत्याला धरून नाही खरेपणाला धरून नाही . अर्थातच काही लोक इतके अट्टल खोटारडे असतात की त्यांना कशानेच फरक पडत नाही . विषमता आणि अन्याय यांनी ग्रस्त असलेले हे लोक सतत असत्य बोलत राहतात असत्याचा प्रचार करत राहतात . कारण वस्तुनिष्ठते ऐवजी त्यांना आत्मनिष्ठ हितसंबंध किंवा टोळीनिष्ठ हितसंबंध सांभाळणे गरजेचे वाटते .
त्या उलट तुम्ही जेव्हा शून्य ते कडे, मोक्षतेकडे किंवा शिवतेकडे किंवा त्या शून्यतेमुळे निर्माण झालेल्या वस्तुनिष्ठतेकडे सरकायला लागता तेव्हा तुमची संपूर्ण उद्दिष्टेच बदलायला लागतात . साहजिकच अनेकदा धर्मनिष्ठ जीवनशैली बद्दल तुम्हाला अनेक प्रश्न पडायला लागतात कारण तुम्ही आता जे प्रश्न निर्माण करतात ते वस्तुनिष्ठतेच्या आधारे निर्माण करतात आणि वस्तुनिष्ठता ही कुठल्याही धर्माला कधीही परवडत नाही. त्यामुळे जगातले सर्व धर्म हे नेहमीच वस्तुनिष्ठतेला आणि तिच्या मुळाशी असलेल्या शून्य तेला विरोध करत असतात. एका अर्थाने प्रत्येक धर्म हा मोक्ष विरोधीच असतो . त्यामुळेच विसाव्या शतकामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये धर्माने निर्माण केलेले पूर्व दूषित पूर्वग्रह कसे काढून टाकता येतील असा एक प्रश्न निर्माण झाला आणि नंतर उत्तराधुनिकतेने त्याला सह म्हणून परंपरा पुन्हा एकदा मानवी जीवनामध्ये आणली. एकोणिसाव्या शतकामध्येच मुळात विज्ञान पूर्णपणे प्रस्थापित झाले आणि अनेकदा वस्तुनिष्ठतेचे शरीर म्हणजे विज्ञान अशी व्याख्या बनली आणि ती सर्व मान्य सुद्धा होत गेली . इतिहास आणि कायदे या दोन महत्त्वाच्या शाखा या काळामध्ये म्हणजेच एकोणिसाव्या शतकामध्ये अधिकाधिक वस्तुनिष्ठ होण्याचा प्रयत्न करू लागल्या. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वच्या सर्व महत्त्वाचे नेते म्हणजेच बॅरिस्टर गोखले बॅरिस्टर जिना बॅरिस्टर गांधी, बॅरिस्टर नेहरू बॅरिस्टर पटेल बॅरिस्टर आंबेडकर बॅरिस्टर (पूर्ण बॅरिस्टर झाले नाहीत) सावरकर हे बॅरिस्टर होते हा काही योगायोग नव्हता तर तो एकोणिसाव्या शतकात निर्माण झालेल्या वस्तुनिष्ठतेचा कायद्यावर पडलेला आणि कायद्यामुळे भारतीय जनतेवर पडलेला परिणाम होता. ब्रिटिशांचे कायदे जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत ब्रिटिशांची संस्कृती आपण शिकू शकणार नाही त्यांच्या साम्राज्यवादाची जडणघडण समजू शकणार नाही याची जाणीव झालेला जो नवा मध्यमवर्ग होता त्या नव्या मध्यमवर्गाने ही बॅरिस्टरकी निर्माण केली . या काळामध्ये बॅरिस्टर होणे किती महत्त्वाचे होते ते त्या काळामध्ये आपण जर का केले गेलेले लिखाण व्यवस्थित वाचले तर लक्षात येते.
या काळातले एकमेव महत्त्वाचे नेते जे बॅरिस्टर नव्हते पण महत्त्वाचे होते ते म्हणजे महात्मा फुले ते मात्र बॅरिस्टर नव्हते. याचा नेमका शैवकीवर किती परिणाम झाला हे सांगणे फार कठीण आहे. मात्र मानव हक्काच्या प्रश्नावर त्यांच्या इतका जागृत या काळात दुसरा नेता दिसत नाही. किंबहुना 19 व्या शतका मधले सर्व नेते हे धर्म नेते सुद्धा होते त्यांनी धर्म स्थापन केले आणि विसाव्या शतकातले नेते मात्र बॅरिस्टर होते म्हणजेच कायद्याकडे सरकणारे होते म्हणजेच एका अर्थाने हे धर्माकडून संविधानाकडे झालेले स्थलांतर होते विज्ञानाकडे झालेले स्थलांतर होते . पारंपारिक धार्मिक कायदे आपल्याला फारशी मदत करू शकणार नाहीत याची जाणीव यामागे होती . नव्या समाजासाठी नवे कायदे हवेत नवे संविधान हवे हे कळलेले हे सर्व लोक होते. हिंदुत्ववादी लोकांच्या मध्येच फक्त सावरकरच बॅरिस्टर अभ्यासक्रम अभ्यासणारे होते आणि त्यामुळेच त्यांचा हिंदुत्ववाद वेगळा पडला असे विधान करता येईल का असा प्रश्न मला नेहमीच पडलेला आहे. ते तसे असल्यामुळेच ते हिंदुत्ववादी नेत्यांच्या मध्ये सर्वाधिक वस्तुनिष्ठ झालेले दिसतात . मात्र कायद्याच्या अभ्यासक्रमानेच त्यांना हिंदुत्व निर्माण करणे आवश्यक वाटले का हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण हिंदू आणि मुस्लिम धर्मातला जो काही फरक आहे त्यामध्ये दोन्ही धर्मामधील कायद्यांचा फरक हा सर्वात महत्त्वाचा फरक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. इस्लामविरुद्धची लढाई अंतिमतः इस्लाम मध्ये असलेल्या कायदेपद्धती विरोधातली लढाई आहे हे सुद्धा अनेक पुरोगामी लोकांना अजूनही कळलेले नाही. वस्तुनिष्ठतेचा पूर्ण असलेला लोप आणि ऑब्जेक्टिव्हिटी चा पूर्ण अभाव हे इस्लाम धर्माचे आणि ब्राह्मण धर्माचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच त्या विरोधात सर्वाधिक आंदोलन झालेले दिसते आणि पुढेही होणार आहे .
निर्माण होणारा पुढचा प्रश्न हा इंटरप्रिटेशनचा आहे अर्थनिर्णयणाचा आहे . ऑब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशन करणे ऑब्जेक्टिव्हिटीला वाव देऊ शकते का असा एक फार मोठा प्रश्न अलीकडे धार्मिक सहितांच्या इंटरप्रिटेशन मधून निर्माण होतो विशेषता एकोणिसाव्या शतकामध्ये आपल्या धार्मिक ग्रंथांचे ऑब्जेक्टिव इंटरप्रिटेशन करण्याचा प्रयत्न अनेक धार्मिक नेत्यांनी केलेला दिसतो. त्यातूनच मग आपला धर्म कसा अधिकाधिक वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक आहे हे सांगण्याची धडपड उदयाला आलेली दिसते .
पण मुळातच वस्तुनिष्ठता ही अर्थनिर्णयावर किंवा ऑब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशन वर अवलंबून नसते तर ती प्रत्यक्षात ऑब्जेक्टिव्ह एक्सपरिमेंटवर अवलंबून असते ऑब्जेक्टिव्ह प्रयोगांच्यावर अवलंबून असते.
विज्ञाननिष्ठता आणि वस्तुनिष्ठता या दोन वेगळ्या गोष्टी मानण्याची गरज पुरोगामी युगात नव्हती कारण त्या जवळजवळ एकच झाल्या होत्या . साहजिकच ज्याला आज आपण ह्युमानिटीज म्हणजे मानव्यशाखा म्हणतो त्या सर्वांच्या मध्ये ऑब्जेक्टिव्हिटी अप्लाय करण्याची कला उदयाला यायला लागली. याला नंतर डिसिप्लिन असा शब्द सुद्धा वापरला जायला लागला . आपल्याकडे आगम धर्मामध्ये यासाठी शिस्त असा शब्द आहे . ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये शिस्त आली पाहिजे आणि ही शिस्त वैज्ञानिक शिस्त असली पाहिजे अशी ही संकल्पना आहे. साहजिकच यामधून संख्यागणनता आणि वस्तुनिष्ठ मापनता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कार्यान्वित झाली कारण त्याशिवाय वस्तुनिष्ठ निदान शक्य नाही आणि त्यामुळे वस्तुनिष्ठ निर्णयही शक्य नाही अशी कल्पना उदयाला आली. कुठलाही निर्णय मग तो वैयक्तिक असो किंवा सामाजिक जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे असा हा आग्रह होता आणि त्यासाठी मग या सर्व गोष्टी स्वीकारणे भाग होते. यातूनच मग संख्याशास्त्र सुद्धा फार महत्त्वाचे बनत गेले . आपण घेतलेल्या निर्णयांची अचूकता संख्याशास्त्राच्या आधारे तपासली जाऊ लागली.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment