भूतकाळ ,चौथी नवता आणि मोबाईल श्रीधर तिळवे नाईक 

चौथा नवतेच्या केंद्रस्थानी जालकी आली, जंत्र आले जाल आले जाल विज्ञान आले जालतंत्रज्ञान आले जाललोक आला आणि मुख्य म्हणजे जाल वस्तू किंवा चिन्ह वस्तू आल्या 

आज एकच चिन्ह सृष्टी मध्ये भूतकाळ हा जाल काळ बनलेला आहे . त्यामुळेच एका अर्थांना इतिहासाला आणि परंपरेला आता जालकी रिप्लेस करत आहे . भूतकाळाच्या आकलनाला भूतजाल म्हणणे आता आवश्यक बनत चाललेले आहे आणि इतिहासाला आणि परंपरेला भूतजालकी असा नवीन शब्द त्यामुळेच द्यावा लागतो. मुळातच अलीकडे जवळजवळ महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अनेक चिन्ह वस्तू ज्याला वस्तू बनलेले आहेत सेमीओडिटी नेटोडिटी बनलेली आहे . हा एक फार मोठा बदल आत्ताच्या काळात झालेला आहे जो साधारणपणे 1995 नंतर हळूहळू स्थिर होत गेला . याला पोस्ट डिजिटल यश सुद्धा म्हटले गेले आणि ते आता समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थिर झालेले आहे.

याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून सध्या जगामध्ये मोबाईलचा उल्लेख होतो मोबाईल मध्ये नेमके कशाकशाचे नेटवर्क एक जाल म्हणून उभे राहते ?

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल हा टेलिफोनचे काम करतोच करतो आणि त्यासाठीच तो जन्मलेला आहे पण तो तिथेच थांबत नाही तो एक स्क्रीन सादर करतो आणि त्यामुळे संपूर्ण स्क्रीनकला आता मोबाईलवर शिफ्ट झालेल्या आहेत आणि आपण मोबाईलच्या स्क्रीनवर टेलिव्हिजन आणि चित्रपट या दोन मुख्य स्क्रीनकला सहजरित्या पाहू शकतो याशिवाय इतर स्क्रीन कला आहेतच आपण पेंटिंग सुद्धा मोबाईलवर पाहू शकतो याचे कारण हा स्क्रीन मल्टीपर्पज झालेला आहे . मोबाईल हा आता कागद झालेला असल्यामुळे तो पुस्तक आणि नोटबुक या दोन्हीचे काम करत असतो. तो कागदापासून तयार होणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे पोस्टकार्ड, चिट्ठी ,आंतरदेशीय कार्ड यांचे काम सहजरीत्या करत असतो किंबहुना त्याची मेसेज सिस्टीम जास्त वेगाने धावत असते. गुगलने हा वेग अधिक वाढवला .

मोबाईलने अलीकडे रेडिओ सुद्धा सहजरीत्या सांभाळून घेतलेला दिसतो आणि त्याचबरोबर युट्युब सारखे प्रकार सुद्धा सहजरीत्या सामावून घेतले गेलेले दिसतात त्यामुळे संपूर्ण ऑडिओ ची तंत्रना आता मोबाईलवर साकार होतात त्याच्याही पुढे जाऊन काही मोबाईल मध्ये एडिटिंग पण आलेले आहे .

हे सर्व कमी पडते म्हणून की काय मोबाईलवर कॅल्क्युलेटर पण आहे आणि आश्चर्यकारकरीत्या टॉर्च पण आहे त्यामुळे अंधारात सुद्धा मोबाईल टॉर्च म्हणून काम करू शकतो जे जवळ जवळ अशक्य वाटत होते पण शक्य झाले .

आज कम्प्युटरची जवळजवळ सर्वच कामे मोबाईल मध्ये शिफ्ट झालेली दिसतात आणि मोबाईल स्वतःच कॅम्पुटर झालेला दिसतो. मी आत्ता सुद्धा हे सर्व लिहीत आहे ते मोबाईल वर लिहीत आहे कारण ते शक्य झालेले व्हाट्सअप सारखा अतिशय उत्तम प्रकार याबाबतीत फार चांगल्या रीतीने फंक्शनिंग करत असतो . मोबाईल इथेच थांबत नाही तो रेकॉर्डिंग पण करत असतो त्यामुळे साहजिकच रेकॉर्डिंगचे सुद्धा काम मोबाईल करतो आणि तुम्हाला जर का यदाकदाचित काही सुचले तर तुम्ही रेकॉर्ड करून ठेवू शकता. 

अलीकडे मोबाईलवर डेव्हलप झालेला सर्वात मोठा प्रकार म्हणजे कॅमेरा सिस्टीम आहे त्यामुळे आता अचानक स्टोरेज सिस्टीम सुद्धा मोबाईलवर प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत गेल्या कारण व्हिडिओ आला त्याची स्टोरेज आली .

त्यामुळे चिन्ह सृष्टीने निर्माण केलेली प्रत्येक जालवस्तू ही आता ऑल राऊंडर वस्तू झालेली आहे. हीच गोष्ट आत्ताच्या नवीन टेलिव्हिजन बाबत आहे .तिथे सुद्धा जवळजवळ या सर्व गोष्टी आता उपलब्ध आहेत . किंबहुना या सर्व जाल वस्तूंची सुरुवात टेलिव्हिजन पासून झाली टेलिव्हिजन प्रथम नेट सिस्टीम नेटवस्तू जाल वस्तू म्हणून सेट झाला आणि जाल वस्तू म्हणून प्रथम लॅपटॉप वाला आणि नंतर मोबाईल आला . यांना आपण आता netodity सुद्धा म्हणू शकतो .

प्रश्न असा आहे की यामुळे इतिहासातले भूतकाळाच्या रचनेतले प्रश्न बदलणार आहेत का ? एका बाजूला या नेटवस्तू जाल वस्तू सर्वच्या सर्व काही नोंद करून ठेवत असतात पण त्याचबरोबर हेही तितकेच खरे की हॅकर या सर्व नोंदी हॅक करून स्वतःला हवे तसे हव्या त्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन नेट वस्तूंच्यावर घडवून आणत आहे. मी स्वतः या सर्व प्रश्नांना हल्ली तोंड देतो आहे कारण अगदी तारखा सुद्धा हलवण्यामध्ये हॅकर एक्सपर्ट असतात. एकेकाळी मला याबाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात चिन्ह वस्तूची जाल वस्तूंची गॅरंटी वाटायची परंतु आता ती वाटत नाही कारण हॅकर्स बऱ्याच गोष्टी आता हॅक करत आहेत आणि मुख्य म्हणजे चेंज करत आहेत सर्वात वाईट गोष्ट म्हणजे काही सोशल अँप याला परमिशन देतात वास्तविक त्यांनी हा क्राईम करायला नको पाहिजे . कारण त्याचा इतिहासाच्या लेखनावर फार विपरीत परिणाम होत आहे अनेक क्राईम कॉपी पेस्टिंगमुळे सहज शक्य झालेले दिसतात विशेषता ज्याला प्राचीन काळामध्ये हार्य ( यावरूनच पुढे हडपणे हा शब्द आला असे मला वाटते)म्हटले जात होते म्हणजे चिन्ह वस्तूंची चोरी यामध्ये प्रसिद्धीचोरी सुद्धा आली ते मोठ्या प्रमाणात अलीकडे होत आहे. वास्तविकेला पाय बंद घालायला पाहिजे होता कारण त्याचा इतिहासाच्या लिखाणावर अत्यंत विपरीत परिणाम होणे अटळ आहे कारण इतिहास लिहिणारे लोक फारसे खोलात जात नाहीत असा माझा अनुभव आहे एक तर हे लोक अजून कागदातून बाहेर पडायला तयार नाहीत आणि हे जेव्हा चिन्ह कागदावर येतात तेव्हा त्या चिन्ह कागदाचे पुरेसे उत्खनन सुद्धा हे लोक करत नाहीत असा माझा अनुभव आहे .परंतु हा क्राईम करायला परमिशन वारंवार दिली जात आहे. तारखा कशा काय तुम्ही बदलू देता ? त्यामुळे इतिहास बदलतो याचे सुद्धा तुम्हाला भान नाही ? पूर्वी कागदांच्या मध्ये फोरजरी करणारे लोक होते परंतु ते सुद्धा खूप कमी होती. हा प्रॉब्लेम असा आहे की हॅकर्स सर्वच्या सर्व ताब्यात घेतात आणि हवा तो बदल घडवतात. मधल्या काळात माझ्या नावाने काही कॉमेंट सुद्धा अशा आल्या होत्या की ज्या मी केल्याच नव्हत्या. तुमचे क्रिएटिव्ह काम तर अख्ख्यच्या अख्ख उचललं जातं . त्याचा बंदोबस्त कसा करायचा हा एक फार मोठा डोक्याला ताप होऊन बसलेला आहे वास्तविक जालसुरक्षा यंत्रणा ही प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण व्हायला हवी होती परंतु तशी ती निर्माण होत नाही कारण अनेकदा सुरक्षा यंत्रणा, सुरक्षातंत्रणा , सुरक्षाजंत्रणा सहजरीत्या ताब्यात घेतली जाते . म्हणजे ज्याप्रमाणे प्रति लोक तयार झाला आणि त्याची प्रतिसुरक्षातंत्रणा म्हणून निर्माण करावी लागली तशा प्रकारे जाललोक तयार झाल्यानंतर जालरक्षण जंत्रणा तयार व्हायला हवी होती. पण जालसुरक्षाजंत्रणा तयार झाली नाही आणि जोवर ती व्यवस्थित तयार होत नाही आहे तोपर्यंत हे लोक सतत जालभेद करत राहणार. याचे कारण अनेकदा प्रतिस्पर्धी लोकच एकमेकांच्या सुरक्षा जंत्रणा भेदत असतात . फेसबुक वरचे तुमचे सगळे काम हे सरळ सरळ अलीकडे शेतकऱ्यांच्या पिकासारखे उघड्यावर पडलेले काम झालेले आहे आणि स्वतःला महाधुरंदर समजणाऱ्या तथाकथित जालदारांना आपल्याच निर्माण केलेल्या जालनेचा प्रश्न सोडवता आलेला दिसत नाही किंबहुना त्यांना तो सोडवायचा आहे की नाही याबद्दलच अलीकडे शंका आहे याबाबतीत काही प्रमाणात व्हाट्सअप नीट आहे अन्यथा बाकीच्या सुरक्षा जंत्रणा यंत्रणांच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात गोंधळ तयार झालेला आहे. याचे एकमेव कारण म्हणजे व्हाट्सअप ने अजून तुमचे व्हाट्सअपचे अकाउंट दुसऱ्यांच्या साठी खुले केलेले नाही ज्या दिवशी ते ओपन होईल त्या दिवशी तिथेही हे सगळे प्रश्न निर्माण होणे अटळ आहे . फेसबुक ने खरे तर कुणाला फॉलोवर ठेवायचे आणि कोणाला नाही याबद्दल काही कारवाई करायला होती हवी होती हा त्या त्या व्यक्तीचा अधिकार आहे आणि कोणीही येऊन हा अधिकार कसा काय हिसकावून घेऊ शकतो ? आज ग्राहक बळी पडलाय पण उद्या तुम्ही स्वतःच बळी पडाल त्याचे काय ? गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक फक्त तुमच्या कस्टमर लोकांना सतावतील आणि तुम्हाला सतावणार नाहीत असा गैरसमज तुम्ही का करून घेत आहात ? उद्या कदाचित तुमचीच मुले यामध्ये ट्रॅप होतील तुम्हाला या गोष्टी दिसत नाहीत ? 

तेव्हा जागे व्हा जेवढे दरवाजे उघडे ठेवाल तेवढे सगळे दरवाजे तुमच्या घरात सुद्धा खोलणार आहेत उघडे राहणार आहेत याचे भान बाळगा म्हणजे झाले . विनाशकाले विपरीत बुद्धी तसे तुमचे काहीसे झालेले आहे .

यामुळे बदलत जाणारा भूतकाळ इतिहास उद्या तुमच्यावर उलटू शकतो आणि फेसबुकचा व्हाट्सअप चा संगणकाचा शोध एखाद्या हॅकरने लावला म्हणून प्रस्थापित होऊ शकते . शेवटी तुमचाही इतिहास नीट यावा असे तुम्हाला वाटत नाही काय ?

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती