हेमंत दिवटे यांच्या आरोपांना दिलेले उत्तर श्रीधर तिळवे नाईक 

हेमंत दिवटे यांनी अचानक संवाद सुरू केला तो पुढील प्रमाणे होता 

नेमाडेंचा देशीवाद हिंदुत्ववादाला कवेत घेतो आणि त्यामुळेच या लेखकरावांना पीएम च्या हस्ते पुरस्कार हवा असतो, मुलाखती द्यायच्या असतात, सगळी व्यासपीठ उपलब्ध हवी असतात. प्रतिभावंत लेखक अश्या फंदात कधी पडतात का? उदय प्रकाश म्हणूनच नेमाडेंपेक्षा चांगला वाटतो. नेमाडेंचे लेखन बाह्य पराक्रम तुला माझ्यापेक्षा जास्त चांगले माहीत आहेत. सट्टाक वाचवत नाही कारण करप्ट माईंड कॅनॉट राईट फाइन पोइट्री. मी समीक्षक नाही. श्रीधरचे आता काय मत आहे ते मला जाणून घ्यायचे आहे. मध्यंतरी तो नेमाडे भक्त झाला आहे असे मला जाणवले होते.

ही सतीश तांबे यांच्या बॉलवर केलेली कॉमेंट आहे वॉल वर केलेली कॉमेंट आहे मी नेमाडे भक्त झालो आहे असा अचानक जाणवलेला आरोप आला 

म्हणून त्याला मी उत्तर दिले 

Hemant Divate मी कधीही नेमाडे भक्त झालेलो नाही शब्दवेधशी युती करून तूच नेमाडे यांना व्यवस्थित अंडरग्राउंड सपोर्ट दिलेला आहेस . तुला काय शब्दवेध किंवा दर्शन देशीवादी आहे माहित नव्हते ? तुझ्या या देशीवादी लोकांना अंडरग्राउंड सपोर्ट देण्याच्या पद्धतीमुळेच मी तुझ्याशी असलेले नाते तोडले . बाकी माझे मत काय मी स्वतंत्र लेखच लिहिलेला आहे . उलट नेमाडे याच दिशेने जाणार हे माझे प्रेडिक्शन होते आणि ते गेलेले आहेत .

यावर त्याची प्रतिक्रिया पुढची होती ती खालील प्रमाणे 

Shridhar Tilve माझ्या घरी विजू चित्रे यांना भेटायला आला होतास तेव्हा तू जे म्हणाला होतास ते मला आठवते. शब्दवेध आणि दर्शन हा माझा वैयक्तिक निर्णय नव्हता हे तुला माहीत आहे पण धर्माधिकारी या संघी माणसाशी तू स्वतःला मस्त जोडून युती केलीस हे उघड सत्य आहे आणि ते तू चक्क मिरवत होतास!

त्याला मी दिलेले उत्तर पुढील प्रमाणे 

सर्वात पहिली गोष्ट मी तुझ्या घरी आलो नव्हतो तू मला विजू ताईंना तुला भेटायचे आहे असे सांगून घरी येण्याचे आमंत्रण दिले होते . त्या भेटीत बऱ्याच मुद्द्यांच्यावर चर्चा होती आणि चित्रे आले की नेमाडे येतातच त्या न्यायाने नेमाडे यांच्यावरही चर्चा झाली . ही चर्चा काय होती हे तू अभिधाच्या अंकात छापू शकतो फक्त एडिटिंग नको जशी चर्चा झाली तशी छाप . 

आता शब्दवेध दर्शन वगैरे शी असलेली युती पहिली गोष्ट जेव्हा निर्णय घेतला होता तेव्हा तो निर्णय नव्वदोत्तरी विशेषांक काढायचा आहे म्हणून आहे असे तू सांगितले होतेस म्हणून आम्ही पण आलो . आणि तो निर्णय फक्त त्या विशेषांकापुरताच होता कारण तो सर्वांनी मिळूनच घेतला होता . त्यामुळे मुळातच ही युती शब्द वेध या देशीवादी नियतकालिकाशी नव्हती तर ती नवोदत्तरी विशेषांक काढायचा आहे या अंगाने होती आणि ती तिथेच थांबायला हवी होती पण प्रत्यक्षामध्ये विशेषांकापुरती असलेली युती पुढे तू शब्दवेध या अनियतकालिकाशी कायमस्वरूपी केलीस कारण तुला मनातच नेतृत्व करण्याची आकांक्षा होती आणि आहे . सुरुवातीपासूनच तू नव्यांची अक्षराची चळवळ प्रमाण मानतोस आणि सर्वांना सोबत घेऊन जायला हवे अशी तुझी भूमिका आहे या भूमिकेला महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाठिंबा आहे. माझे यावर त्यावेळी ही म्हणणे असे होते की चौथ्या नवतेने स्वायत्तपणेच काम केले पाहिजे . जास्तीत जास्त देशीवादी सोबत घ्यावेत पण ते सुद्धा काही काळ कारण ते अजूनही लोकांच्या पर्यंत पोहोचलेले नाहीत पण डोके चौथ्या नवतेचेच असले पाहिजे . प्रत्यक्षात असे झाले नाही . 2000 पर्यंत देशीवाद केवळ प्रस्थापित झाला नाही तर हळूहळू संस्थानिक झाला नेमाडे संस्थानाधिपती झाले. नेमाडेंचा प्रतिकार करणारे किती लेखन शब्दवेध आणि दर्शनने छापले ? उलट अभीधानंतरच्या कार्यक्रमाला नेमाडे चित्रे पाठारे हे सर्व देशीवादी वक्ते होते . देशीवाद ही प्रामुख्याने साहित्यिक चळवळ आहे आणि तिला ठाम विरोध आणि चौथ्या नवतेचे समर्थन ही माझी मांडणी होती . चौथी नवता मांडायची असेल तर मार्गी, देशी ,पोटी ,जमाती अशा भारताच्या चारही उपसंस्कृती आणि त्यांचे नेटवर्क नवतेच्या जालीयतेच्या जालतेच्या अंगाने उभे करावे लागेल ही माझी मांडणी आहे देशीवाद देशीच्या विरोधात जातो . देशी नेहमीच खुले असते पण देशीवादी चळवळ देशी असण्याला ओपन असणारा पायबंध घालायला बघते . देश हा अवकाश आहे . तो टाळता येत नाही पण तो आकाराने केवढा ठेवायचा हे आपल्या हाती असते आपण सर्वांनी मिळून भारत हा देश निर्माण केलेला आहे आणि म्हणूनच आपला देश संपूर्ण भारत असला पाहिजे . हा देश जगासाठी खुला असला पाहिजे सांस्कृतिक येणे जाणे झाले पाहिजे वेळप्रसंगी आयात झाली पाहिजे निर्यात ही झाली पाहिजे . देवाणघेवाण आवश्यक आहे . पण ही फक्त बाहेरच्या देशांच्या पाशी नाही तर आपल्या अंतर्गत सुद्धा ही देवाण-घेवाण सतत चालली पाहिजे . देशीवाद ही क्लोज बंदिस्त व्यवस्था सिस्टीम आहे त्यामुळेच तिला माझा ठाम विरोध आहे . ती अनेकदा क्षात्रण्य बनत जाते आणि स्मृती श्रुती पुराणोक्त ब्राह्मण धर्माच्या वैष्णव धर्माच्या रक्षणाचे काम करते . आपल्याकडे वारकरी संप्रदायाने हे काम केलेले आहे . म्हणूनच नेमाडे यांना चित्रे यांना त्याच्या विषयी प्रेम आहे . 

तुझा याबाबतीतला स्टान्स कधीच तू स्पष्ट केला नाहीस कारण मुळातच तुझ्याजवळ काय भूमिका आहे हे तू कधीही स्पष्ट केले नाहीस तुला सर्वांचे नेतेपद हवे होते आणि त्यासाठीच शब्दवेध दर्शन वगैरे सर्वांशीच तुझी युती चाललेली होती. त्यांनी तुला वापरले की तू त्यांना वापरले हे ठरवणे इतके नाही . कदाचित दोघांनीही एकमेकांना वापरले माझे या संदर्भातले कायमच म्हणणे असे होते की सर्वांना सोबत घेऊन जाणारे ऑलरेडी अनुष्ठभ नावाचे मासिक आहे आणि ते दर्जेदार आहे तेच काम आपण करत राहणार असू तर मग आपले आणि आपल्या चळवळीचे वेगळेपण काय ? याशिवाय अरुण म्हात्रे यांचे नव्यांची अक्षर चळवळ तू चालवत होतास तिथूनच तुझी सुरुवात होती अरुण म्हात्रे याचीच ही भूमिका होती तू ही भूमिका कंटिन्यू ठेवलीस ही वस्तुस्थिती ! या भूमिकेला अनुयायी खूप मिळतात कारण सर्वच प्रकारचे लोक घेऊन जाता येते ते तुम्हाला भेटायला लागतात आणि त्यांचे त्यांचे हितसंबंध पेरायला लागतात . तुमचेही हितसंबंध सांभाळायला सुरुवात करतात तेव्हा जो काही निर्णय झाला तो फक्त नव्वोदत्तरी विशेषांक या घटने पुरता होता . त्यानंतरची युती हा केवळ तुझा वैयक्तिक निर्णय आहे आणि तुझ्याशी सहमत असणारे जे आणखी काही संधी साधू लोक होते त्यांचा आहे . या लोकांचा श्रीधर तिळवेचा मत्सर हा एक फार वैयक्तिक मुद्दा तिथे होता अन्यथा सौष्ठवचा एवढा द्वेष केला गेला नसताच . माझे नाव वारंवार वगळले गेले नसते किंवा मला फक्त समीक्षक म्हणून प्रमोट करण्याचे कारस्थान सुद्धा रचले गेले नसते किमान प्रामाणिकपणा सुद्धा यामध्ये पाळला गेला नाही अभिधाची गोष्ट आली तर त्यामध्ये आम्ही सुद्धा संपादक होतो ही गोष्ट व्यवस्थित लपवायची खेळी वारंवार खेळली गेली . मी येण्याआधी अभिधा कुठे होते याचे पुरावे मी संपादक म्हणून येण्याआधी तू काढलेले आणि आता अभिधाचे उपलब्ध झालेले अंक आहेत. हे अंक कालांतराने गायब केले गेले तरी मला आश्चर्य वाटणार नाही . कारण साहित्याच्या क्षेत्रामध्ये तू स्पष्ट आणि स्वच्छपणे राजकारणी आहेस असे माझे मत आहे फक्त तुझे राजकारण हे कार्पोरेट माणसाचे राजकारण असल्याने ताबडतोब कळत नाही . याबाबत माझे थोडे उलट आहे राजकारण माझ्या घरातच चालत आलेले आहे आणि म्हणूनच इतर क्षेत्रांमध्ये ते अजिबात येऊ नये असे माझे मत आहे . राजकारण नेहमीच सर्व गोष्टी ताब्यात घ्यायचा प्रयत्न करत असते पण जेव्हा त्या क्षेत्रातलीच माणसेच स्वतः राजकारण घेऊन येतात तेव्हा त्यांचे काय करायचे हा राजकारणी लोकांच्या पुढचा फार मोठा प्रश्न असतो आणि तो मी अनेकदा बघितलेला आहे अपवादात्मक वेळेला हाताळलेला आहे . साहित्याच्या क्षेत्रातले राजकारणी लोक आम्ही पाहिलेले आहेत . त्यातले काही तर हलकट म्हणावे इतके नीच असतात . तू एका अशाच माणसाच्या सहवासात आलास त्यामुळे बदललास की मुळातच तू राजकारणी होतास म्हणून अशा माणसाला जवळ केलेस हा मला कायमच पडलेला प्रश्न आहे. एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे तू बदललास . या बदललेल्या हेमंत दिवटेशी मला काहीही देणे घेणे उरले नाही . चित्रे यांना इंटरनॅशनल कवी व्हायचे होते तुला इंटरनॅशनल व्हायचे होते. हे साधले की नाही हे मला माहित नाही कारण मला या भानगडी कळत नाहीत मी कधी त्यात पार्टीसिपेट व्हायलाही गेलो नाही . तुझ्या या इंटरनॅशनल होण्याच्या आकांक्षातूनच अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. फक्त एक गोष्ट नक्की सांगेन कारण काही लोकांचा हल्ली त्याबाबत गैरसमज आहे. पॉप्युलर प्रकाशनाने तुझा काव्यसंग्रह नाकारला त्यामध्ये माझा काडीचासुद्धा वाटा नव्हता .

आता प्रश्न धर्माधिकारी यांचा ! मी यापुढे तुझ्या कविता छापणार नाही हा तू स्वतः घेतलेला stance आहे. मी तो स्वीकारला . माझ्यासाठी व्यक्ती किती पारदर्शक आहे ही पहिली मूलभूत कसोटी आहे कारण ती मोक्षाच्या जास्त जवळ आहे. या कसोटीवर अविनाश धर्माधिकारी उतरले म्हणून त्यांच्या प्रपोजलचा विचार आम्ही केला. 

धर्माधिकारी हिंदुत्ववादी असले तरी ते पारंपारिक हिंदुत्ववादी नाहीत. मी जेव्हा त्यांच्याशी युती केली तेव्हा राईट टू इन्फॉर्मेशन नावाची चळवळ ज्या मोजक्या लोकांनी इंडियामध्ये सुरू केली जे या चळवळीचे पायोनियर होते त्यापैकी एक धर्माधिकारी होते म्हणजेच एका अर्थाने चौथ्या नवतेची एक चळवळ चाललेली होती आणि तिच्याशी तिचा संबंध होता आणि म्हणून ही युती घडली ही चौथ्या नवतेतील चळवळीची युती होती आता तुझा राईट टू इन्फॉर्मेशन ला नकार होता का हा प्रश्न तू स्वतःला विचारायला हरकत नाही . खरे तर 1985 नंतर हिंदुत्ववाद बदलण्याच्या ज्या शक्यता प्रमोद महाजन यांच्यामुळे निर्माण झाल्या होत्या त्या अविनाश धर्माधिकारी यांच्यामध्ये सुद्धा उमललेल्या होत्या . हे लोक एका अर्थाने नव हिंदुत्ववादी होते ज्यांना गुरुजींच्या आणि संघाच्या ब्राह्मणी हिंदुत्वाशी काहीही देणे घेणे नव्हते . गोव्यामध्ये असे मनोहर पर्रीकर होते आणि त्यामुळेच जेव्हा गोव्यामध्ये 1990 पासून सोनिया गांधी यांनी गोव्यात काँग्रेसला ख्रिश्चनवादी बनवायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातले लोक म्हणजे महाराष्ट्रातून स्थलांतरित झालेला मराठी माणूस आणि त्यांनी केलेले राजकारण आणि स्थापन केलेला पक्ष अशा प्रकारचे आमच्या या पक्षाविषयी अत्यंत विपरीत आणि चुकीचे चित्र तिथले ख्रिश्चन लोक तयार करू लागले तेव्हा हिंदूंना एकत्र येणे गरजेचे आहे हे स्पष्ट झाले आणि 1994 ला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले .

माझे स्वतःचे घराणे हे राजकारणात आहे हे मी स्पष्ट आणि उघडपणे नेहमी सांगत आलेलो आहे . त्यामुळेच या काळामधली माझी अविनाश धर्माधिकारी यांच्याबरोबर असलेली युती सुद्धा अत्यंत उघड होती. त्या काळात माझा नामदेव ढसाळ झाला असाही आरोप माझ्यावर झाला होता. म्हणजे नामदेव ढसाळला जसे नाईलाजाने शिवसेनेत जावे लागले तसे मला अविनाश धर्माधिकारी यांच्याकडे जावे लागले असे म्हणणारे लोक त्यावेळेला पदोपदी भेटत होते . मुळात त्याला फार मोठी पार्श्वभूमी होती आणि ती माझ्या घराण्याशी जोडली गेलेली आहे .माझ्या घराण्याची राजकीय लाईन ही नेहमीच रोहिदास नाईक ठरवतात जे एकेकाळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार होते आणि अध्यक्षही होते . सुदीन ढवळीकर हे त्यांचे विद्यार्थी आहेत . माझी ही राजकीय पार्श्वभूमी मी कधीही लपवलेली नाही कारण माझ्या वडिलांनी ती कधी लपवली नाही आणि याबाबतीत रोहिदास म्हणेल तोच शेवटचा शब्द हा नियम सुद्धा त्यांनीच माझ्या कुटुंबात घालून दिलेला होता आणि तो योग्य असल्याने आम्ही नेहमीच पाळत आलेलो आहोत . आज सुद्धा त्यांच्याबरोबर सुरेल तिळवे हा राजकारणात आहे आणि तो चक्क विरोधी पक्षात म्हणजे आप पक्षात आहे त्या पक्षाचा पदाधिकारी आहे .

त्यामुळे या काळात आम्ही हिंदुत्ववादी लोकांच्या बरोबरच युतीमध्ये होतो आणि आम्हाला आम्ही कशासाठी युतीमध्ये आहोत हे पूर्णपणे त्याकाळी ही माहिती होते आणि आताही आम्ही युतीत आहोत तर का आहोत हे आताही माहिती आहे. त्यामुळे तुला धर्माधिकारी संघवादी वगैरे वाटत असतील तर तसे वाटण्याचा हक्क तुला आहे कारण अलीकडच्या काळामध्ये मलाही हा बदल तीव्रपणे त्यांच्यामध्ये झालेला आहे हे स्पष्ट दिसते. ते पूर्वी इतके कडवे नव्हते पण आता झाले याचे सर्वात मोठे कारण कळत नकळत त्यांचा उदारमतवादी कल हा त्यांना सत्ता आणि पद मिळवून देण्याच्या संदर्भात महागात पडला की काय असे त्यांना बहुदा वाटत असावे . मुळातच प्रमोद महाजन यांची मांडणी मोदी पुढे घेऊन जातील अशी अपेक्षा होती परंतु वैष्णव हिंदुत्वाने शेवटी आपल्या चाली खेळून त्यांना पूर्णपणे घेरून टाकलेले आहे. किंबहुना संघा मधला जो नवीन उदारमतवादी हिंदुत्ववाद होता तो व्यवस्थित ठेचण्याची जी प्रोसेस ब्राह्मणी हिंदुत्वाने सुरुवात केली त्याचा सर्वात पहिला बळी अविनाश धर्माधिकारी आहेत. त्यांना हे मान्य नाही पण मी माझे म्हणणे त्यांना एकदा सांगितलेले होते आणि शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिला होता . पुढे मी त्यांना शरद पवार यांच्याबरोबर युती करा असेही एकदा सांगितलेले होते पण त्यांनी ते ऐकले नाही तेव्हा प्रत्यक्ष राजकारणातल्या गोष्टी फार गुंतागुंतीचे असतात मित्रा प्रश्न इतकाच असतो की आपण त्यात वहावत जातो की नाही मी असा गेलो नाही आणि म्हणूनच मग तिथून मला सौष्ठव काढून घ्यावे लागले . जर मी तडजोड केली असती तर ती युती खूप काळ चालली असती . पण मी ती केलेली नाही तिच्यातून बाहेर पडलेलो आहे . त्यामुळे त्या काळात राईट टू इन्फॉर्मेशन साठी ही झालेली युती ही एका संघी माणसाशी नसून चौथ्या नवतेची राईट टू इन्फॉर्मेशन ही चळवळ चालवणाऱ्या माणसाबरोबर असलेली ती युती होती. आणि ती ताबडतोब मोडली कारण मला तडजोड करायची नव्हती . तेव्हा फॅक्ट काय आहे त्या समजून घ्याव्यात म्हणून हे सांगतो आहे . एक गोष्ट मात्र सर्व लोकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे . चौथ्या नवतेबाबत जेवढे भाजप केंद्री हिंदुत्ववादी ओपन होते तेवढे बाकीचे नव्हते . एका अर्थाने ही सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे . किंबहुना चौथ्या नवतेच्या जंत्रणेच्या जीवावरच भारतीय जनता पक्षाची वाढ झाली . चौथी नवता नसती तर कदाचित भाजप सुद्धा एवढा वाढला नसता. हे अजूनही आपल्याकडच्या विरोधी पक्षांना लक्षात येत नाही . काँग्रेस जेवढी राजीव गांधी नरसिंहराव यांच्या काळामध्ये चौथ्या नवतेसाठी ओपन झाली होती तेवढी जर का पुढे राहिली असती तर कदाचित हे घडले नसते . आश्चर्यकारकरीत्या राजीव गांधी यांच्या काळामध्ये भाजप चौथ्या नवतेच्या विरोधात होती पण ती 90 नंतर ताबडतोब बदलत गेली असो.

माझी भूमिका क्लियर आहे. प्राचीन काळामधला वर्ण जात व्यवस्था न मानणारा मोक्ष ( यात शैव जैन बौद्ध येतात) पुरोगामी कालखंडामधला बसवेश्वर गुरुनानक शिवाजी महाराज यांचा वारसा पुढे नेणारा फुले आंबेडकरवाद जो देशी नाही तर मार्गी, देशी, पोटी जमाती यांचा समतोल साधणारा आहे आधुनिकतेमध्ये आद्य काडसिद्धेश्वर गुरजीफ जे कृष्णमूर्ती आणि आत्ताच्या काळामध्ये चौथी नवता यांचे एकत्र नेटवर्क विकसित करत मी चालतो आहे. या सर्वाला मिळून मी शैवजालकी म्हणतो. ही एक समग्र चिन्ह सृष्टी केंद्रित दृष्टी आहे नेटवर्कच्या जमान्यामध्ये ती आवश्यक आहे . अभिधा या पद्धतीने गेली असती तर मतभेद झालेच नसते . दिलीप चित्र विशेष अंक काढणे हे सुद्धा यानुसारच होते . पुढेही चौथी नवता विशेषांक काढला होता तोही याला धरूनच होता . ही कंटिन्युटी मोडण्याचा निर्णय तुझा होता माझा नाही . अभिधा कमर्शियल करण्याचा निर्णय तुझा होता माझा नाही. तुझ्या त्या कमर्शियल अंकांच्या वर माझे नाव सुद्धा नाही कारण माझा त्यांच्याशी संबंध नाही . तो प्रयोग यशस्वी झाला असता तर कदाचित अभिधानंतर आत्ताच्या वाटेने जे आले आहे त्याही वाटेने आले नसते कदाचित लोकप्रभेच्या वाटेने गेले असते . तुला त्यामध्ये अपयश आले म्हणून मग पुन्हा एकदा तू मूळ ट्रॅक वर आलास . कदाचित तू कमर्शियल होतास पण स्वतःच्या द्वित्रिमासिकाचे कमर्शिअल सक्सेस मध्ये रूपांतर करण्याइतका कमर्शियल नव्हतास . प्रायोगिकता ही एका अर्थाने तुझ्यासाठी तडजोड होती करियर करण्याची संधी होती कारण प्रस्थापित होण्यासाठी लागणारे गुण साहित्याच्या क्षेत्रामध्ये तुझ्या ठाई नव्हते तू कुमार केतकर नव्हतास . मात्र संधी मिळाली असती तर तू कदाचित झाला असतास .

माझा अविनाश धर्माधिकारी यांच्याबरोबरचा खेळ हा धड वर्षभर सुद्धा टिकला नाही याचे कारण त्यानंतर माझ्यावर आलेले प्रेशर होय. तिथेही मी तडजोड न करता शांतपणे बाहेर पडलेलो आहे . आणि मी असे बाहेर पडावे हे धर्माधिकारी यांना मान्य होते कारण ते पुन्हा एकदा पारंपारिक हिंदुत्व वादामध्ये त्यांच्या राजकारणासाठी जाणे त्यांना आवश्यक वाटत होते . इथला माझा कालखंड वादळीच होता . याही अंकातल्या मजकुरावर प्रचंड टीका झाली होती . बाय द वे तुझ्या लाडक्या दिलीप चित्रे यांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्या एका अंकात उपलब्ध आहेत कारण त्या आम्ही छापल्या होत्या आता त्यामुळे त्यांना काही कोणी ते हिंदुत्ववादी होते असे म्हणणे शक्य नाही . वस्तुस्थिती अशी आहे की त्यांना सुद्धा राईट टू इन्फॉर्मेशन चळवळ आवश्यक वाटत होती . अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मी कायमच पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचे समर्थन पण केलेले आहे. माझ्या भूमिका कायमच स्पष्ट आहेत . एक बीसी मुख्यमंत्री होणे फार आवश्यक होते म्हणून आम्ही मायावतींना पाठिंबा दिला होता अण्णा हजारे यांचे आंदोलन आवश्यक वाटले म्हणून त्यालाही पाठिंबा दिला होता एक ओबीसी पंतप्रधान येणे फार आवश्यक होते म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता . नरेंद्र मोदी काही जय श्रीराम म्हणत आले नव्हते ते हर हर महादेव म्हणतच आले होते . आज सुद्धा ब्राह्मण क्षत्रिय लोक ज्यांना आरक्षण नको आहे आणि जे ओबीसी बीसी विरोधात आहेत ते मोदी यांच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात मोहीम चालवतच आहेत. किंबहुना मोदी नकोत ही चळवळ प्रथम या लोकांनी भाजपमधून चालवलेली आहे. त्याचे एकमेव कारण याच लोकांनी दिलेले आहे . ते म्हणजे मोदी उच्चवर्णीय लोकांच्या विरोधात आहेत . ते आरक्षणाला पाठिंबा देतात . त्यांच्या आर्थिक धोरणाविषयी अनेक गोष्टी अजून स्पष्ट झालेल्या नाहीत . पण जिथे गोष्टी नीट नव्हत्या तिथे मी नेहमीच टीका केलेली आहे. राजकारण ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पाहता येत नाही . समाज पुढे जाईल की नाही याचा विचार करावा लागतो . काँग्रेसने जर का ओबीसी आणि बीसी यांचा नीट विचार केला असता तर त्यांच्याकडून सत्ता काढून घेणे झालेच नसते . क्षत्रियांच्या आणि सरंजामवादी दादांच्या साह्याने ब्राह्मण लोकांनी चालवलेला पक्ष हे काँग्रेसचे कायमचे स्वरूप आहे . ते राहुल गांधी बदलण्यात यशस्वी होतील की नाही हा खरा प्रश्न आहे. भाजपमध्ये ब्राह्मणी हिंदुत्वाने पुन्हा एकदा हिंदुत्ववादी वैष्णव धर्म किंवा वैष्णव हिंदुत्व केंद्रस्थानी आणलेले आहे . जय श्रीराम ही त्यांची घोषणा आहे . या ब्राह्मणी आणि वैष्णव हिंदुत्वाच्या मी पूर्णपणे विरोधात आहे आणि हे मी ठामपणे मांडत असतो. त्याचबरोबर मी इस्लामवादाच्या सुद्धा विरोधात आहे आणि हेही मी ठामपणे मांडत असतो . त्याची किंमत सुद्धा प्राणाची बाजी लावून मी मोजलेली आहे. एकाच वेळेला ब्राह्मण धर्माला आणि इस्लाम धर्माला विरोध करणारा मनुष्य असल्याने माझ्या बाबतीत सगळ्यांचीच पंचाईत झालेली आहे. पण ज्यांना ब्राह्मणधर्म आणि इस्लाम धर्म मनुस्मृती आणि कुराण या एकाच कट्टर धार्मिकतावादी नाण्याच्या दोन बाजू आहेत हे लक्षात येते त्यांना मला समजून घेणे फार अवघड जाणार नाही ब्राह्मण धर्म शूद्र बनवतो आणि इस्लाम धर्म गुलाम बनवतो पण दोघांच्या स्टाईल एकच आहेत. त्यामुळे अधून मधून एकमेकांशी हे युती सुद्धा करू शकतात कारण शेवटी भावंडे आहेत . असो.

तू माझा मित्र आहेस म्हणून हे सर्व विस्ताराने लिहितो आहे तुझ्या माझ्यात कितीही वैचारिक वाद झाले तरी आपले एकमेकावरचे प्रेम कमी होत नाही आणि आपल्याला आतून याची जाणीव आहे. ते प्रेम ही खरी गोष्ट . बाकीचे हे साहित्यिक फाहित्यिक वाद किरकोळ आहेत . सुदैवाने हे तुलाही कळते हे मला माहित आहे. असो. तर प्रेमाने भांडत प्रेमात राहूच. 

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती