युरोशियन फोबिया आणि जागतिक राजकारण श्रीधर तिळवे नाईक
जागतिक राजकारणाची समीकरणे पुन्हा एकदा बदलत चाललेली आहेत आणि उत्तराधुनिकतेने रशियन साम्राज्याचा जो अस्त घडवला त्या मागची कारणे हल्ली शोधली जात आहेत . मधल्या काळामध्ये जी युक्रेन विषयी प्रचंड सहानुभूती निर्माण झाली होती ती सहानुभूती अचानक कमी झाले की काय अशी शंका येण्या इतपत गोष्टी बदललेल्या आहेत . मुळातच या मागचे सर्वात मोठे कारण कदाचित खुद्द अमेरिकेलाच रशियाकडून तेल घेण्याची वेळ येते की काय अशी आलेली शंका आहे. मुळातच मुस्लिम प्रदेशांच्या मध्ये तेलामुळे जे काही फ्रेश पेच प्रसंग निर्माण होत आहेत त्याने संपूर्ण युरोप आता हादरलेला दिसतो. या लोकांनी आपापसात लढून सर्वच्या सर्व तेल विहिरी जाळून टाकल्या तर करायचे काय असाही टोकाचा विचार काही लोकांच्या मनात येतो आहे .
साहजिकच या सगळ्यांमध्ये आपण रशियाशी नेमका का पंगा घेत होता होतो असा प्रश्न सर्वांना पडला आहे . याचे एक कारण अलीकडे आपण खरोखरच येडेशियन लोकांना घाबरण्याचे कारण आहे का हा पडलेला प्रश्न आहे.
मुळातच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे युरोशियन फोबिया काही युरोपने निर्माण केलेला नाही तो मुळातच रोमन साम्राज्याच्या इतिहासामधून निर्माण झालेला आहे हळूहळू युरोपचे असे लक्षात आले आहे की ग्रीकांची मूळ संस्कृती वेगळी होती आणि ती रोमन लोकांनी बिघडवली आणि हे सर्व रोमन लोक युरेशिया मधून आलेले होते . मात्र हा सिद्धांत ते भारताबाबत अप्लाय करत नाहीत . वास्तविक जी स्थिती युरोपची होती तीच स्थिती भारताची आणि दक्षिण आशियाची होती येथे सुद्धा शैवशृती अस्तित्वात होती आणि तिला नंतर आलेल्या युरेशियन श्रुतीने अनेक पद्धतीने बिघडवण्याचा प्रयत्न केला . वर्ण आणि जातीव्यवस्था ही त्यातूनच आली . स्वतःला उच्च स्थानी ठेवण्याचा युरेशियन लोकांचा अहंकार ब्राह्मण धर्म निर्माण करता झाला. ब्राह्मण आणि क्षत्रिय लोकांना वर बसवायचे आणि बाकीच्या सर्व लोकांना खाली ठेवायचे असा हा देश प्रसंग आहे मात्र हे करताना शैव लोकांच्यातले श्रीमंत आणि दमदार असणारे वाणीपणी लोक आपल्या बरोबर असले पाहिजेत म्हणून त्यांना वैश्य म्हणून जागा करून द्यायची आणि मधला वर्ण द्यायचा अशी ही पॉलिसी आहे.
साहजिकच शैव श्रुती मधल्या लोकांच्या मध्ये सुद्धा हा युरेशियन फोबिया दिसतो .भय आणि आदर यांचा विचित्र संगम या फिलिंग मध्ये आहे .
या भयाचे दुसरे सर्वात मोठे कारण अर्थातच चंगेज खान चे आक्रमण आहे. युरोप अजय आहे हा सिद्धांत चंगेज खान ने पूर्णपणे मोडीत काढला . मुख्य म्हणजे या सर्व आक्रमणामध्ये असलेला रानटीपणा हा इतका स्पष्ट होता की अशा प्रकारचा रानटीपणा आपण करू शकत नाही असे काहीतरी फिलिंग नंतरच्या युरोपियन सभेत आले.
पुढे मग साहजिकच जेव्हा जेव्हा रशियाच्या संदर्भात धोरण ठरवणे आले तेव्हा तेव्हा रशियाचा अवाढव्य आकार हा नेहमीच घाबरवणारा राहिला . त्यातच पुढे नेपोलियनला रशियन लोकांनी पराभूत केले त्यामुळे हा युरेशियन रशियन फोबिया अधिकच वाढत गेला यामध्ये नंतर हिटलरला पराभूत करण्यामध्ये रशियाचा जो अतिशय महत्त्वाचा रोल होता त्याचाही वाटा प्रचंड राहिला त्यामुळे साहजिकच शीतयुद्ध निर्माण झाले . रशिया काही करून दुर्बळ राहिला पाहिजे असे काहीतरी युरोपियन लोकांनी मनावर घेतले आणि त्यातूनच मग अनेक कटकारस्थानांची निर्मिती होत राहिली यामध्ये अमेरिका आणि ब्रिटन आघाडीवर राहिले . अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सुद्धा हिटलरला हरवल्यानंतर रशिया युरोपमध्ये प्रवेश करणार नाही याची काय गॅरंटी असा प्रश्न युरोपियन लोकांना नेत्यांना पडला होता .
हे सर्व कमी पडले म्हणून की काय नंतर अचानक सोवियत युनियन ने अफगाणिस्तानावर आक्रमण केले साहजिकच मग एक फार मोठी कॉन्फ्युरसी रसली गेली आणि सोवियत युनियनचा काही झाला तरी पाडाव केला पाहिजे अशी भावना प्रबळ झाली . सोवियत युनियन कोसळले . पण त्याचबरोबर रशियाकडून पुन्हा असे काही होऊ नये म्हणून नाटो ने अनेक पद्धतीने क्षेपणास्त्रे आणि इतर बंदोबस्त रशियाच्या भोवती लावले . पण या सगळ्याला रशियाने युक्रेन वर हल्ला करून आपल्या पद्धतीने उत्तर दिले . एकेकाळी युक्रेनला साथ देणाऱ्या लोकांना आता यु करेन वरून रशियाला घेता येणे शक्य नाही असे वाटायला लागलेले आहे आणि त्यातूनच मग आपण रशियाशी असे का वागतो आहोत असा प्रश्न पडायला लागला.
साहजिकच मग युरेशियन फोबियाची चर्चा सुरू झाली आणि माझा अंदाज चुकला नाही तर भारताच्या संदर्भात आज ना उद्या ज्याला आपण आज ओरिएंटालिझम म्हणतो तो शैव श्रुतीच्या अंगाने इतिहासाची नवीन रचना केल्याशिवाय राहणार नाही . पण त्याचबरोबर याचीही काळजी घेतली जाईल की हा युरोशियन फोबिया भारताने बाळगू नये.
हे नेहमीच सांगत आलेलो आहे की भारतामध्ये जे काही झाले ते झाले आता आपण दोन्ही श्रुतींनी एकत्र आले पाहिजे पण वर्ण जात व्यवस्था दोन्ही श्रुतींच्या मधून हाकलले पाहिजे . युरेशियन लोक जेवढ्या लवकर स्वतःची मुळे विसरतील आणि हा परदेशात असलेला रमणारा देशीवाद त्यागतील तेवढे बरे . त्यांनी आता स्वीकारावे की ते आता दक्षिण आशियामध्ये राहतात . भारतामध्ये राहतात . मुख्य म्हणजे भारताचा युरेशिया करायचा प्रयत्न करू नये. खुद्द रशिया सुद्धा आता याबाबतीत फारसा आग्रही राहिलेला नाही. पूर्वी डाव्या लोकांना आर्य आक्रमण सिद्धांताने वेड लावले होते याचे कारण त्यांनाही सोवियत युनियनशी जुळवून घ्यायचे होते . एकविसाव्या शतकामध्ये त्याचे काही पुरावे सुद्धा हाताशी आले . प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टीच्या पाठलागामध्ये किती वेळ घालवायचा ?
त्यापेक्षा आपणच सर्वांनी मिळून हिंदवी ही ओळख उभी करावी त्यातच सर्वांचे भले आहे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment