मोक्ष वैयक्तिक असतो का श्रीधर तिळवे नाईक 

प्रश्न: तुम्ही नेहमी सांगता की मोक्ष हा वैयक्तिक असतो तो तसा का वैयक्तिक असतो यावर प्रकाश पडणे गरजेचे आहे या संदर्भात तुम्ही काही स्पष्टीकरण देऊ शकाल का 


श्रीधर तिळवे नाईक: काम या अक्षामध्ये चार क्रिया अत्यंत वैयक्तिक आहेत आणि त्यावर बंधने आणू नयेत असाच मुख्य ट्रेंड आहे 

१ जतन 

२ उत्सर्जन 

३ रक्षण 

४ सर्जन 

या शिवाय जी पाचवी गोष्ट आहे ती आहे मरण तिचा विचार आपण शेवटी करू.

प्रत्यक्षामध्ये हे खरे आहे का? खरोखर हे वैयक्तिक आहे का ? 

वस्तुस्थिती अशी आहे की पूर्वी जतन करण्यासाठी जे अन्न मिळवावे लागेल त्यामध्ये शिकार ही एक गोष्ट होती आणि ही सामूहिक होती म्हणजेच किमान अन्न मिळवणे याबाबतीत आपण सामूहिक आहोत वैयक्तिक नाही आहोत त्यानंतर मग ग्रहण येते तर अन्नग्रहण आणि पाणीग्रहण हे सुद्धा पूर्वी संपूर्ण टोळी एकत्र करत असल्याने सामूहिकच होते . म्हणजे किमान अन्नाच्या आणि पाण्याच्या बाबतीत तरी आपण वैयक्तिक नाही आहोत आज सुद्धा आपले अन्न आणि पाणी हे सामूहिक वितरणातून आपल्याकडे आलेले असते आणि अनेकदा त्यांचे सामुदायिक ग्रहण सुद्धा चालू असते

याबाबतीत होते काय की अन्नाचे पैसे जे दिले जातात ते वैयक्तिक पातळीवर अनेकदा दिले जातात म्हणजेच हिते इथे वितरण सार्वजनिक असले तरी ग्रहण कळत नकळत कौटुंबिक होऊन जाते आणि ही पशुपालन अवस्था अधिक विकसित होऊन आपण शेतीकडे सरकत गेलो तसे घडलेले आहे 

आधुनिक काळामध्ये तर या संदर्भातले सर्व नियम हे त्या त्या कुटुंबानेच करायचे आहेत म्हणजे काय जेवायचे काय जेवायचे नाही वगैरे वगैरे 

आता दुसरी गोष्ट पाहू रक्षण ही नेहमीच सामाजिक गोष्ट होती टोळीची गोष्ट होती म्हणजे ही सुद्धा वैयक्तिक गोष्ट नाही आणि आत्तासुद्धा ती वैयक्तिक गोष्ट राहिलेली नाही . मात्र वैयक्तिक प्रॉपर्टी चे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे असे कुटुंब मानते म्हणजेच कौटुंबिक गोष्ट इथे येते पण ती नंतर आलेलीच गोष्ट आहे प्रत्यक्षात सुरुवातीच्या काळामध्ये टोळीच रक्षण करत होती . नंतरच्या काळात हस्तक्षेप सुरू झाले आणि राज्य नावाची संस्था कुटुंबात घुसली सुरुवातीच्या काळात या गोष्टी सामुदायिक होत्या त्यामुळे फारसे कोणी एकमेकापासून वेगळे नव्हते त्यामुळे आपोआपच रक्षण सुद्धा सामुदायिक होते म्हणजेच रक्षण सुद्धा नंतर सामूहिकच राहिले 

आता आपण सर्जनाचा विचार करू . सर्जन म्हणजेच ज्याला आज आपण मुलांना जन्म देणे म्हणतो ते ! इथे एक गोष्ट स्पष्ट आहे ते म्हणजे ही गोष्ट युग्मिय आहे म्हणजे ही गोष्ट सुद्धा वैयक्तिक राहत नाही . कुटुंब व्यवस्था विकसित झाल्यानंतर यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये समुदाय पुन्हा घुसला तरीसुद्धा एक वैयक्तिक आणि युग्मिय स्पर्श कायमच कायम राहिला 

एकेकाळी उत्सर्जन सुद्धा सार्वजनिक रित्या करत होतो सामूहिकरीत्या करत होतो हे खरे आहे एकेकाळच्या टोळी आयुष्याची ती आठवण आहे पण काहीजणांना आज सुद्धा ही आठवण ताजी करावीशी वाटते मला स्वतःला असा एक ग्रुप माहिती आहे जिथे हे लोक सामुदायिक पद्धतीने हे सर्व करायचे आणि सांगितले जायचे की त्यामुळे प्रेम वाढते. त्यांचा बॉण्ड स्ट्रॉंग होता याबद्दल वाद नाही पण तरीसुद्धा मी त्यांच्यात सामील होणे नाकारले कारण खाजगीकरणाला काही प्रमाणात का होईना पण महत्त्व द्यावे लागते असे मला वाटते . काही लोक असे आहेत की ज्यांना सर्जन सामुदायिकरीत्या करणे हल्ली योग्य वाटत आहे त्यातूनच कलेक्टिव्ह सेक्स चे प्रकार उदयाला आलेले दिसतात . हा ही टोळीवादाचा प्रकार आहे . मुळातच काही माणसे अशी असतात जी फार आतूनच टोळीप्रवण असतात त्यांचे काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न असतो याचे कारण हे पूर्णपणे अनैसर्गिक नाही 

उत्सर्जन म्हणजे अर्थातच संडास करणे , लघवी करणे उलटी करणे आणि घाम फेकणे हे अत्यंत वैयक्तिक राहिले कारण ते फक्त त्या त्या बॉडी मधून होते तुम्ही दुसऱ्याच्या बॉडी मधून उत्सर्जन करू शकत नाही आणि इथे मला वाटते की व्यक्तीवादाची सुरुवात होते आणि इथूनच मोक्षाच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी वेगळ्या घडतात याचे कारण मोक्षामध्ये सुद्धा सर्वात प्रथम तुम्ही जे काही आसक्तीमळ साठवलेले असता त्यांचे उत्सर्जन करावे लागते आणि हे उत्सर्जन वैयक्तिक असते आणि मग पाचवी गोष्ट येते ती म्हणजे मरण ! सर्वात गुंतागुंतीचा प्रकार हा मरणाचा आहे मरण हे सामूहिक आहे की वैयक्तिक आहे ? तर मरणाऱ्या देहाचा विचार केला तर ते वैयक्तिक आहे पण मग अन्नग्रहण आणि पाणी ग्रहण सुद्धा कौटुंबिक किंवा टोळीक आहे सर्जन युग्मिय आहे फक्त मरणच असे आहे की जे वैयक्तिकच येते कारण तुम्ही दुसऱ्याचे मरण मरू शकत नाही किंवा दुसऱ्याला आपले मरण उसने देऊ शकत नाही अपवाद फक्त कदाचित साथीचे रोग पण तिथे सुद्धा तुम्ही व्हायरस देता किंवा तत्सम जंतू देता मरण देत नाही. मरण कोणालाच देता येत नाही कोणाचे मरण मरता येत नाही आणि मोक्ष मरण असतो आणि म्हणूनच तो वैयक्तिक होत जातो . 

थोडक्यात मोक्षाचे दोन टप्पे असतात उत्सर्जन आणि मरण आणि या दोन्ही टप्प्यांमध्ये सर्वात प्रथम उत्सर्जन जे असते ते वैयक्तिक असते आणि नंतर मरण येते ते वैयक्तिक असते आणि नंतर अनंतिक होत जाते किंवा शून्यिक होत जाते. मला वाटते इतके स्पष्टीकरण पुरेसे आहे.

श्रीधर तिळवे नाईक 



Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती