भय धर्म आणि हिंदुत्व श्रीधर तिळवे नाईक
आपण काही लेखांच्या मध्ये भयाचा विचार करतो आहे आणि त्यामध्ये आपण नैसर्गिक भय कसे टाळता येत नाही तेही पाहिले होते
पण भय हे कधीच फक्त वैयक्तिक असत नाही याचे कारण मी मागे मागच्या लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे अनेकदा आपल्या कृती सामुदायिक असतात वैयक्तिक असत नाहीत हे आहे त्यामुळे सामुदायिक कृती करताना आपोआपच काही वेळा सामुदायिक भय निर्माण होते . म्हणजे होते असे की अनेकदा एका सभासदाचे भय दुसऱ्या सभासदाला सुद्धा वाटायला लागते आणि त्यांच्या संभाषणातून हळूहळू हे सामुदायिक भय निर्माण होते. म्हणजे तुम्ही हरणाची शिकार करत असताना अचानक समजा एखादा वाघ समोर आला किंवा चक्क सिंहाची झुंड समोर आली तर जे भय निर्माण होते ते फक्त एका व्यक्तीला एका सभासदाला असत नाही अचानक सर्वजण त्या भयाच्या पट्ट्यात सापडतात आणि अशा प्रकारच्या सिच्युएशन्स कायमच आदीम काळात निर्माण झालेल्या असणार.
त्या भयाचा नेमका परिणाम काय होतो ? सर्वात पहिला परिणाम हा नेहमीच संशय असतो. आपल्याकडे डेकार्टचे एक वाक्य नेहमी सांगितले जाते ते म्हणजे मी विचार करतो म्हणून मी आहे. पण मुळात ते वाक्य फार वेगळे आहे. ते वाक्य असे आहे मला संशय आहे म्हणून मी विचार करतो आणि मी विचार करतो म्हणून मी आहे . म्हणजे संशय प्रथम आहे . मी हे वाक्य थोडे अधिक दुरुस्त करून म्हणतो अनेकदा प्रथम भाई आहे भयामुळे संशय आहे आणि संशयामुळे मग विचार येतो भाव निर्माण होतात अहंकार सुखावतो दुखावतो नाहीश्या होण्याच्या चिंतेत पडतो आणि म्हणून पुढचे सगळे गोंधळ निर्माण होतात यातूनच मी सुद्धा निर्माण होतो . तेव्हा भय ही फार मूलभूत गोष्ट आहे आणि डेकार्टने भयाला सर्वात आधी न ठेवल्याने पुरोगामी वादाची वाट लागली . त्यांच्या हे लक्षातच आले नाही की भय धर्माला शक्तिमान बनवते . आता हे कसे होते ? त्यासाठी थोडेसे भयाचे , आणि त्यांच्या संबंधांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे
सर्वात पहिला प्रश्न बेसिक प्रश्न भय नेमके कसे निर्माण झाले तर ते मुळातच निसर्गात जगण्याच्या लढाईतच निर्माण होते फक्त आपण नसतो फक्त मी नसतो इतर पण असतात आणि इतर आपण पण असतात आपल्याकडे अनेकदा इतर मी चा विचार होतो परंतु इतर आपण पण असतात . हे जे इतर आपण असतात ती परकी टोळी असते आणि आपण जे संघटित असतो ती आपली टोळी असते . साहजिक जेव्हा जगण्याच्या लढाईमध्ये आणि विस्तार करण्याच्या लढाईमध्ये जेव्हा या दोन टोळ्यास एकमेकांसमोर टाकतात तेव्हा त्यांच्या जीवन संघर्ष सुरू होतो विस्तार संघर्ष सुरू होतो . शक्तीचा मूळ स्वभावच विस्तार आहे कारण ती अनंत आहे आणि अधिकाधिक पसरण्यावर तिचा विश्वास असतो पसारा अधिकाधिक मोठा करण्याचा एक नैसर्गिक कल असतो . या नैसर्गिक कला मधूनच अनेकदा काळ निर्माण होतो
या जगण्याच्या संघर्षामध्ये आणि विस्ताराच्या संघर्षामध्ये जी टोळी बलवान असते ती जी टोळी दुबळी असते तिला गुलाम बनवण्याच्या प्रोसेस मध्ये जेव्हा आली तेव्हापासून बलवानांच्या बद्दल बलवान टोळ्यांच्या बद्दल दुबळ्या लोकांच्या मनामध्ये दुबळ्या टोळ्यांच्या सामूहिक मनामध्ये भय निर्माण झालेले दिसते निसर्गामध्ये जो शिकारी असतो तो नेहमीच जो भक्ष असतो त्याच्या मनात भय निर्माण करतो कारण शेवटी जीव टिकवण्याची प्रेरणा सर्वांच्या मनात असते.
प्रश्न असा असतो की हे फक्त टोळ्या टोळ्यांच्या मध्ये राहत नाही तर खुद्द टोळीमध्ये निर्माण होते म्हणजेच टोळीमध्ये जो बलवान असतो तो नेहमीच जो दुबळा असतो त्याच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. ही मुळातच अहंकाराची प्रक्रिया असते आणि मुळातच हा अहंकार जो असतो तो सत्ताबाज मी असतो किंबहुना त्यामुळेच तो स्वतःला मी समजत असतो जेव्हा प्राण बाजूला होतो आणि त्याची जागा अहंकार घेतो तेव्हा मग अहंकार स्वतःला श्रेष्ठ मानत इतरांना कनिष्ठ समजायला लागतो . ज्याप्रमाणे सेक्स नंतर अनेक स्पर्म मिलनासाठी धावतात त्याप्रमाणे अनेक मी नेहमीच मनामध्ये नियंत्रण मिळवण्यासाठी धावतात आणि जो मी बलवान असतो तो नियंत्रक बनतो.
बाहेरच्या जगात मात्र अनेकदा होते असे की बलवान लोकांची स्वतःची म्हणून एक अंतर्गत टोळी पण बनते ही सर्वसाधारणपणे मनुष्य शिकार करत होता तेव्हाच निर्माण झाली होती त्यामुळेच श्रद्धेच्या युगामध्येच जो सर्वाधिक पराक्रमी आहे सर्वोत्कृष्ट शिकारी आहे त्याला सत्ता गाजवण्याला थोडा अधिक वाव मिळत होता .
पण याच वेळेला ज्यांच्याजवळ शहाणपण आहे असे लोक सुद्धा होते आणि त्यांचा अनुभव हा या बलवान लोकांना अत्यंत आवश्यक वाटत होता किंबहुना अनेकदा शहाणपणाशिवाय आपला पराक्रम वाया जातो याची त्यांना कल्पना आली होती त्यामुळे साहजिकच टोळीचे नेतृत्व हे नेहमीच पराक्रम आणि शहाणपण या दोन गोष्टी एकत्र असलेल्या माणसाकडे सहजरित्या जात होते. पण कधी कधी असेही होई की बलवान माणसाकडे शहाणपण आणि अनुभव नसे अशावेळी तो मग शहाण्या माणसांना सल्लागार म्हणून वापरायला लागला किंवा त्यांचे नेतृत्व स्वीकारायला लागला. किंबहुना वयाला जे महत्त्व प्राप्त झाले होते त्याचे कारण वयानुसार शहाणपण जास्त प्राप्त होते अशी त्यावेळची असलेली वस्तुस्थिती होती. त्यामुळेच अनेकदा सर्वाधिक जो म्हातारा आहे तो नेतृत्व करत होता आणि त्याच्या हाताखाली जो सर्वाधिक पराक्रम आहे तो काम करत असे. ब्राह्मण आणि क्षत्रिय या युतीची बीजे या सुरुवातीच्या वस्तुस्थितीत पडलेली आहेत. प्रॉब्लेम तेव्हा सुरू झाला जेव्हा ब्राह्मणांच्या कडे कसले शहाणपण नाही हे कळायला लागले . शहाणे असणे आणि ब्राह्मण असणे यामध्ये प्रचंड फरक पडत चालला . पण हे सर्व नंतर घडले हे का घडले?
याचे कारण कुठल्याही गोष्टीची डुप्लिकेट तयार होत असते शहाणपणाची डुप्लिकेट तयार झाली ती मांत्रिकी म्हणून! हे मांत्रिक लोक शहाणपणा असलेले असले तरी त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली ती म्हणजे पराक्रमी लोकांना आपल्या ताब्यात ठेवायचे असेल तर आपण मांत्रिकीला सत्तेत रूपांतरित केले पाहिजे आणि इथेच माणसाच्या धर्माचे प्रथम बीज पडले . याचा एक परिणाम म्हणून जगभर सर्वत्र मांत्रिक राजा नावाची संकल्पना जन्मली आणि ती अनेक संस्कृतीमध्ये नांदताना दिसते . या मांत्रिक राजांनी सर्वात प्रथम धर्म निर्माण केला. हा धर्म नेमका काय होता ? तर प्राचीन काळापासून माणसाच्या मध्ये इतर टोळ्यांच्या बद्दल जे भय होते आणि बलवान असलेल्या अंतर्गत टोळी समुदायाबद्दल जे भय होते त्या भयाचा केलेला महा श्रद्धा किंवा धर्म म्हणजे विकास होता . म्हणजेच
धर्म हा मुळात भयाचा धंदा आहे . आणि त्याचे अंतिम उद्देश संपूर्ण समाजावर समाजातल्या सर्व घटकांच्या वर स्वतःची सत्ता निर्माण करणे हा आहे .
या लोकांच्या हे लक्षात आले होते की आपण इथल्या इहलोकांवर ताबा मिळवू शकत नाही किंवा त्याचा ताबा ज्याच्याकडे आहे त्या पराक्रमी व्यक्तीवर सुद्धा आपण थेट ताबा मिळवू शकत नाही . त्यासाठी आपणाला काहीतरी इन डायरेक्ट म्हणजेच अथेट असे काहीतरी निर्माण करावे लागेल आणि त्याचे बीज त्यांना मागील श्रद्धांच्या मध्ये आदिम युगामधल्या समजूतींच्यामध्ये आढळले ज्याचा वापर करून त्यांनी आपले काम सुरू केले.
श्रद्धा युगामध्येच आपले पूर्वज हे आकाशातल्या कुठल्यातरी ठिकाणी वास्तव करत आहेत अशी समजूत प्रचलित झाली होती किंबहुना आकाशातले तारे म्हणजे आपले पूर्वज आहेत अशा प्रकारची समजूत पसरायला सुरुवात झाली होती आणि त्याचबरोबर आपण आपल्या पितरांची पूजा केली पाहिजे पूर्वजांची पूजा केली पाहिजे अशी श्रद्धा निर्माण झाली होती . आपले पितर मातर आपले आईवडील आपले वाढ आईवडील हे आपले काळजी घेतात अशी या लोकांची पहिली श्रद्धा होती हा पहिला परलोक होता. त्याचाच फायदा या मांत्रिकीने घेतला आणि त्यातून मग महाश्रद्धा निर्माण केली . त्यांनी परलोकाचे दोन भाग केले चांगला लोक आणि वाईट लोक . चांगल्याला स्वर्ग म्हणाले वाईटाला नरक म्हणाले . पितर आकाशात आहे ही श्रद्धा आधीच प्रस्थापित झाल्याने या लोकांचे काम अत्यंत सोपे झाले. साहजिकच मग तुम्ही जर आमच्या महाश्रद्धे प्रमाणे वा धर्माप्रमाणे वागला नाहीत तर तुम्ही स्वर्गात पोहोचणार नाही हे पहिले भय निर्माण करण्यात आले . तुम्ही स्वर्गात पोहोचणार नाही याचा अर्थ तुम्ही तुमच्या पीतरांना भेटणार नाही . याचा अर्थ असा आहे की श्रद्धेतून पितृ श्रद्धा घेण्यात आली पितरांची श्रद्धा घेण्यात आली आणि तिच्या आधारे श्रद्धा स्वर्ग निर्माण करत होती तिचा आधार घेत एक भय निर्माण करण्यात आले तुम्ही जर आम्ही सांगतो तो धर्म ऐकला नाही तर तुम्ही नरकात जाणार स्वर्गात जाणार नाही असे हे भय आहे . त्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये खास श्राद्ध ही गोष्ट या मांत्रिकीने निर्माण केली आणि आज सुद्धा या श्राद्धाचे वर्चस्व आपल्यावर आपल्या समाजावर असल्याचे स्पष्टपणे दिसते आपण जर का आत्ताचा सुद्धा मानसिक पाठलाग केला तर तिथे सुद्धा आपणाला भयच आढळेल
पुढे पुढे तर तुम्ही जर धर्म पाळला नाही तर ईह लोकांमध्ये काय काय तोटे होतील याचे सुद्धा अतिशय तपशीलवार गणित हे लोक सांगू लागले आणि आजही सांगत असतात. प्रत्यक्षात मात्र हे या लोकांमध्ये पृथ्वीवर अतिशय संघटित पणाने काम करेल असे भय तुमच्या मनामध्ये निर्माण करत असतात. तुम्ही आमचे ऐका आणि जर का तुम्ही आमचे ऐकले नाही तर सामाजिक पातळीवर राजकीय पातळीवर आम्ही तुम्हाला ठेचू तुम्हाला आम्ही वाळीत टाकू तुम्हाला आम्ही तुरुंगात टाकू अशी धमकी एखाद्या पवित्र पुस्तकाच्या आधारे देत असतात . धर्म हा मूलतः भयाच्या आधारे सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ही सत्ता नंतर खुद्द क्षत्रियांनाही ताब्यात घेते कारण क्षत्रिय राजे लोकांना सुद्धा स्वर्गाला जायचे होते आणि असते. प्रत्येकाला अमर व्हायचे असते मरणोत्तर जिवंत राहायचे असते त्यातूनच ही लालसा वाढत जाते . मेल्यानंतर साहजिकच त्यांना आपल्या आईबापांना भेटायचे होते असते. आजोबांना पणजोबांना भेटायचे होते आणि असते आजीला भेटायचे होते आणि असते मुख्य म्हणजे नरक यातना भोगायच्या नव्हत्या आणि आताही या यातना भोगावे लागतील असे भय धर्म निर्माण करत असतो जे पूर्णपणे काल्पनिक आहे .एका अर्थाने क्षत्रिय लोकांनी धर्म नावाच्या आयडॉलॉजीची वैचारिक गुलामगिरी पत्करली आणि त्यातूनच मग त्यांनी राजकीय सत्ता सुद्धा या धर्मसत्तेच्या ताब्यात दिली आणि म्हणूनच धर्मसत्ता ही राजकीय विचार पद्धत झाली . म्हणजेच भयाच्या आधारे निर्माण झालेली सत्ता परलोकाच्या आधारे निर्माण झालेली सत्ता आता इह लोकांच्या आधारे सुद्धा काम करायला लागली.
यातला तिसरा टप्पा तेव्हा आला जेव्हा धर्म ही राजकीय विचार प्रणाली म्हणून निर्माण करण्याचे आणि प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करमट वादाने संघटितपणे सुरू केले .हे प्रयत्न सर्वात प्रथम इस्लामने सुरू केले . इस्लामने फक्त धर्म वाढवला नाही तर राज्यसत्ता पण वाढवली कारण इस्लाम मध्ये धर्म आणि राज्य या दोन संस्था वेगळ्या नाहीत . इस्लामचा संपर्क जेव्हा ख्रिश्चन लोकांशी मोठ्या प्रमाणामध्ये आला तेव्हा मग कॅथोलिक रोमन धार्मिक संघटनेनेसुद्धा इस्लामचा आदर्श ठेवत ४ मे १४९३ रोजी अलेक्झांडर सहावा याच्याद्वारे Inter Caetera नावाचा पॅपल बुल रिलीज केला आणि संपूर्ण अमेरिका खंड हा स्पॅनिश लोकांना आणि संपूर्ण आशिया ऑस्ट्रेलिया वगैरे आफ्रिका वगैरे पोर्तुगीज लोकांना धर्मप्रचारासाठी आणि या खंडातल्या लोकांना ख्रिश्चन बनवण्यासाठी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी ख्रिश्चन बनत नसतील तर अत्याचार करण्यासाठी खुला केला. ज्याला आपण पुरोगामी साम्राज्यवाद म्हणतो तो प्रत्यक्षात असा धार्मिक म्हणून सुरू झाला ज्याचे बीज इस्लामच्या संपूर्ण जग जिंकण्याच्या मिशनमध्ये होते अजूनही इस्लामचे आणि ख्रिश्चन लोकांचे ते मिशन सुरू आहे आणि हे मिशन जे या इंटर बुलदवारे प्रामुख्याने पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांना देण्यात आले होते त्यातूनच मग युरोपियन लोकांचा साम्राज्यवाद आणि वसाहतवाद निर्माण झाला उत्तर वसाहतवाद निर्माण झाला युरोपियन लोकांची साम्राज्ये उभी राहिली. भय निर्माण करून बाटवाबाटवी करण्याची ही या बुलद्वारे उघडपणे अनुमतीच परमिशनच देण्यात आली . युरोपियन लोकांचे सुरुवातीचे धार्मिक उद्योग हे या भयाच्या आधारेच तयार झाले होते
पुढे कार्ल मार्क्स याने याचीच कॉपी मारत अर्थ संस्था आणि आपली अर्थविचारप्रणाली राज्यापेक्षा वेगळी होणार नाही याची काळजी घेतली आणि कम्युनिजम नावाचा एक पुरोगामी नास्तिक धर्म स्थापन केला .
एकदा धर्माला राजकीय विचार प्रणाली म्हणून प्रस्थापित केल्यानंतर प्रश्न अर्थातच मग इतर गोष्टीचा असतोच कारण मी मागे म्हटल्याप्रमाणे फक्त तुम्ही अस्तित्वात नसता इतर मी सुद्धा अस्तित्वात असतात आणि इतर आपण सुद्धा अस्तित्वात असतात या इतर आपण मध्ये तुमच्या धर्माशिवाय इतरांचाही धर्म असतो आधुनिक काळामध्ये आणि उत्तर आधुनिक काळामध्ये काही राजकीय लोकांनी मग विशेषतः इस्लाम मधल्या लोकांनी धर्मगंडामुळे भय निर्माण करायला सुरुवात केली . साहजिकच याची प्रतिक्रिया इतर धर्मांच्या मध्ये येणे अटळ होते . त्यातूनच मग दुसऱ्या धर्माचे विशेषता इस्लामचे भय निर्माण करणे सुरू झाले कारण ते प्रत्यक्षातही अस्तित्वात होते आणि आहे . अनेक लोक प्रत्यक्षातही हे भय अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न विचारत असतात पण एक गोष्ट लक्षात घेतलीच पाहिजे ती म्हणजे धर्म स्वभावत: राजकीय असतो आणि राजकीय पातळीवर इथेच इस्लाम येतो इस्लामने निर्माण केलेले भय येते आता प्रश्न असा आहे की इस्लामेतर धर्म जे आहेत ते कसे काय याला तोंड देणार ? मुख्य म्हणजे जे इस्लामेतर इतर धर्म आहेत त्यांचे राजकीय नेते या संदर्भात नेमके काय करत आहेत ? त्यांना खरोखर इस्लामचा मुकाबला करायचा आहे की स्वतःची सत्ता शाबूत ठेवायची आहे ? मुस्लिमांचे भय हिंदूंच्या मनात निर्माण करणे आणि प्रत्यक्षात मुस्लिमांच्या पासून हिंदूंच्या धर्मांतराच्या सर्व केसेस थांबवणे यामध्ये फरक आहे आणि हा फरक कृतीचा आहे अशा प्रकारची कृती हिंदुत्ववादाने किंवा हिंदुत्ववादी लोकांनी कधी केली का ? बाकी जाऊ द्या आपल्या स्वतःच्या घरातल्या पोरी सुद्धा या लोकांना जर सांभाळता आल्या नसतील तर मग हे कोणत्या आधारे हिंदू लोकांच्या रक्षणाची गॅरंटी देत आहेत? शत्रुघन सिन्हाला स्वतःच्या घरामध्ये काय चाललंय हे दिसत नसेल तर मग कुठल्या आधारे हे हिंदुत्व रक्षण करायला हिंदूंचे रक्षण करायला चालले होते ? ती मुलगी मुस्लिम माणसाच्या प्रेमात पडल्यानंतर हिंदुत्वाचा त्याग करण्यात आला ? आज सुद्धा लंडनमध्ये जे काय चालले आहे त्याची पुरेशी जाणीव तिथल्या लोकांना आहे का ? आणि जर का इस्लामी तर मेतर धर्म केवळ धर्मनिरपेक्षतेच्या प्रभावाखाली येत येऊ घातलेल्या रानटीपणाकडे दुर्लक्ष करत असतील तर मग त्यांना मूर्ख का म्हणू नये ? काही कट्टर मुसलमान अनेकदा अशा सेक्युलर लोकांना खाजगीत उल्लू म्हणत असतात . सभ्य माणसांचा सर्वात मोठा दोष हाच असतो की त्यांना रानटीपणाचे लक्षण स्पष्टपणे दिसत नाही आणि जेव्हा ते दिसते तोपर्यंत रानटी लोकांनी त्या संस्कृतीचा सत्यानाश केलेला असतो . गेल्या सातशे वर्षातल्या युरोपियन लोकांच्या सर्व अचिवमेंट्स या सध्या धोकादायकपणे नष्ट होण्याच्या क्षेत्रामध्ये आहेत .
हे घडण्याचे कारण असे आहे की बाकीचे सर्व धर्म अचानक धर्मनिरपेक्षतेच्या दिशेने वाटचाल करू लागले आणि इस्लाम मात्र उलट वाटचाल करू लागला आणि संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा जिला धार्मिक शोकांतिका म्हणता येईल ती धार्मिक शोकांतिका इस्लामने उलट वाटचाल करत घडवली . याबाबतीत इस्लामला जबाबदार धरणे राहिले बाजूला तर आपल्याकडचे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी हिंदूंना जबाबदार धरायला लागले आणि हा हलकटपणा होता मूर्खपणा होता म्हणजे भारताची दोन राष्ट्रे मुस्लिम लोकांनी निर्माण केली आणि धर्मनिरपेक्ष लोक शिव्या घालतात कोणाला तर ज्याने काहीच केले नाही त्या हिंदूंना ? मुस्लिम लीगने पाकिस्तान जेव्हा निर्माण झाला तेव्हाच तुमच्या धर्मनिरपेक्षतेचा इस्लामने पराभव केला हा पराभव तुम्हाला दिसत नाही ? आंधळे कोण आहे ? त्या वेळेला पूर्णपणे मुस्लिम लोकसंख्या का पाकिस्तानला पाठवली नाही ? इथल्या मुस्लिमांच्या इच्छेचा प्रश्न तुम्हाला कळतो मग हिंदूंच्या इच्छेचा प्रश्न का कळत नाही का कळला नाही ? हिंदूंना पाकिस्तान मधून व्यवस्थित सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यायची नव्हती आणि म्हणूनच मग इथल्या मुस्लिमांना परत पाठवण्याची जबाबदारी तुम्ही घेतली नाही . याचे कारण त्यासाठी लागणारी एक प्रकारची कठोर अंमलबजावणी करण्याची मानसिक तयारी तुमच्याजवळ नव्हती . तुमची वैष्णव मानसिकता नेहमीच डरपोक होती . आता सुद्धा हीच मानसिकता काँग्रेसमध्ये सुद्धा आहे आणि हिंदुत्ववादी लोकांच्या मध्ये सुद्धा तीच आहे . हर हर महादेव म्हटले म्हणून कोणी शैव होत नाही पराक्रमी होत नाही त्यासाठी तांडव करता येणे पण गरजेचे असते. जीनाने ते डायरेक्ट ॲक्शनच्या नावाखाली केले त्याला उत्तर देण्याची जबाबदारी तुमच्यावर होती . तुम्ही आक्रमण केले नसते तर समजण्याजोगे होते पण संरक्षण करण्यासाठी आक्रमण तर करायलाच पाहिजे होते . पार्टीशन म्हणजे काही घराच्या भिंती पाडण्याची गोष्ट नव्हती किंवा उभ्या करण्याची गोष्ट नव्हती . पार्टिशन हे युद्ध होते आणि तुम्ही ते नीट लढला नाहीत .महात्मा गांधी याबाबतीत पूर्णपणे चुकले . मानवतावाद त्या ठिकाणी लागू होतो जेव्हा माणसे मानव असतात ती जेव्हा आणि जिथे जनावर बनलेली असतात तेव्हा त्यांना नीट काबुत आणावे लागते . नेहरूंच्या जवळ या गोष्टी नव्हत्या मुळात त्यासाठी लागणारी will पावरच नव्हती . नेहरूंची मानसिकता इस्लाम बाबत ही पूर्णपणे ब्राह्मणी वैष्णव मानसिकता आहे आणि ती त्यांना महात्मा गांधी यांच्याकडून मिळालेली आहे . मूळ घरांमधली क्षत्रिय शैव परंपरा त्यांनी नाकारली आणि महात्मा गांधींची वैष्णव परंपरा त्यांनी स्वीकारली हा खरे तर आत्मघात होता कारण भारताचा पहिला पंतप्रधान क्षत्रिय शैव मानसिकतेचा असणे अत्यंत गरजेचे होते कारण जेव्हा इस्लाम समोर ठाकतो चीन समोर उभा राहतो तेव्हा इस्लाम अथवा चीन फक्त क्षत्रिय असतो . प्रश्न असा आहे की ही फक्त नेहरूंचीच वैयक्तिक मानसिक शोकांतिका होती का ? की याचे मूळ हिंसेबद्दल बद्दल वाटणाऱ्या भयात आहे ? दुबळे लोक अनेकदा दुबळे असतात याचे कारण प्रतिकाराची हिंसा करण्याची सुद्धा ताकत त्यांच्यात नसते तशी इच्छाशक्ती नसते . हिंदूंचे असे काही झाले आहे काय हे एकदा नीटपणे तपासण्याची गरज आता वाटते. आणि ही त्यांच्या आत त्यांच्या धर्माने घातली आहे काय ? हा संतांच्या चळवळीचा साईड इफेक्ट आहे का ? माझ्या मते हो हा संतांच्या चळवळीचा प्रामुख्याने वैष्णव संतांच्या भक्तीचळवळीचा साईड इफेक्ट आहे . आपल्याकडे फार मोठी अफवा संत चळवळीतून निर्माण झालेली आहे ती म्हणजे संतांनी इस्लामचा इफेक्ट कमी केला वस्तुस्थिती नेमकी उलटी आहे संतांच्या चळवळीने इस्लामला अधिक शक्तिशाली बनवले . त्यामुळेच एवढा मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर होऊ शकले . कारण संतांनी एकीकडे ब्राह्मण धर्माचे आणि वर्णजाती व्यवस्थेचे वर्चस्व कायम ठेवले आणि त्याचबरोबर प्रतिकाराची हिंसा करणाऱ्या शैव लोकांना त्याच्या धर्माला साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला . महात्मा गांधी हे या अहिंसक शैवविरोधी भक्ती चळवळीतून निर्माण झालेले संत प्रॉडक्ट होते . मोदींना आज सुद्धा जी मते मिळतात त्याचे सर्वात मोठे कारण प्रत्यक्षात ते शैव असोत किंवा नसोत पण निदान पक्षी हर हर महादेव म्हणणारा हा पहिला पंतप्रधान आहे आणि याचाच त्यांना प्रचंड फायदा झालेला दिसतो हीच बेसिक गोष्टच आपल्याकडे अजून सुद्धा पुन्हा पुन्हा मी बोंबलून सांगून सुद्धा काही अतिशहाण्या धर्मनिरपेक्ष लोकांना लक्षात येत नाही .
हे असे का होते ? म्हणजे भय निर्माण करण्याची उत्पादन व्यवस्था चालू राहते परंतु भयाला प्रतिकार करण्याची उत्पादन व्यवस्था मात्र भारतामध्ये पुन्हा पुन्हा बंद का पडते ? याचे कारण ज्याला वीर पुरुषांची खरी क्षत्रिय योद्येय वीरमानसिकता म्हणता येईल तिचा झालेला आदीबंधात्मक वांदा आहे
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ही क्षत्रिय मानसिकता का तयार झाली नाही हा खरा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कधीही हिंदुत्ववादाने विचारला नाही. सावरकरांच्या ठाई जो सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो हाच आहे की हिंदुत्व हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी सावरकर आश्चर्यकारकरीत्या क्षत्रिय मानसिकतेचे आहेत म्हणूनच ते ब्रिटिशांच्या विरोधात लढायला ठाकतात पण ते जेव्हा तुरुंगातून बाहेर येतात तेव्हा त्यांच्यातला हा क्षत्रिय पूर्णपणे नाहीसा झालेला आहे म्हणूनच मग ते घरात बसून युद्धाची चर्चा करणाऱ्या ब्राह्मणासारखे बोलायला लागतात . मुस्लिम लीगशी झालेली युती सुद्धा त्यांना चालते .
वस्तुस्थिती अशी आहे की क्षत्रिय वर्ण हा नेहमीच अस्तित्वात असावा असे ब्राह्मण वर्णाला वाटत असते आणि ह्या एका गोष्टीच्या गृहीतकामुळे टिळकांचा अपवाद विचारता कोणीही क्षत्रियांना प्रश्न विचाराला नाही की तुम्ही खरोखर क्षत्रिय आहात का? तुम्ही क्षत्रिय धर्म पार पाडला आहे का ? शाहू महाराज आणि टिळक यांच्या वादामध्ये धार्मिक बाबतीत वैदिक की पुराणोक्त पुराणोक्त हा वाद सरफेस लेव्हलचा आहे प्रत्यक्षामध्ये टिळकांना जो प्रश्न विचारायचा होता तो हा होता की खरोखर इंग्रजांची गुलामी करत सत्तेवर बसणारा मनुष्य क्षत्रिय असतो का ? आणि हा असा प्रश्न आहे जो थेट विचारता येत नव्हता आणि जो थेट विचारता येत नव्हता म्हणून टिळकांनी तो धर्माच्या आधारे वेगळ्या मार्गाने विचारला. पण या सगळ्या प्रकाराला जे काही वळण नंतर मिळत गेले त्यामुळे हा प्रश्न फक्त धार्मिक राहिला वास्तविक हा प्रश्न राजकीय सुद्धा होता . कारण वर्णव्यवस्थेनुसार राजकारण प्रामुख्याने क्षत्रिय वर्णाने हँडल करायचे असते आणि क्षत्रिय काय करत होते? तर ब्रिटिशांची चाकरी करत होते . ब्रिटिशांनी दिलेल्या पैशाचे काय करत होते? तर मिस मॅनेजमेंट करत होते. अपवाद फक्त शाहू महाराज , सयाजीराव गायकवाड यांच्यासारखे काही मोजके क्षत्रिय होते इतर क्षत्रिय काय दिवे लावत होते ? प्रत्यक्षामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी जी मदत स्वातंत्र्य चळवळीला आवश्यक होती ती किती क्षत्रीयांनी केली ? उलट इंग्रजांच्या पुढे आम्ही क्षत्रिय क्षत्रिय म्हणत क्षत्रिय होण्याचे सगळे फायदे या लोकांनी लाटले होते . ते पेन्शन घेत होते ते पैसे घेत होते इतकेच कशाला ते संरक्षणाची आपली सगळी काळजी सुद्धा ब्रिटिशांच्यावर सोपवून रिकामे झाले होते . जे लोक स्वतःच्या संरक्षणासाठी ब्रिटिशांच्या अवलंबून होते ते लोक स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेत होते हा एक फार मोठा विरोधाभास होता पण हा विरोधाभास टिळक सोडले तर कोणाच्याही लक्षात आलेला नव्हता . पण टिळकांच्या जवळ या संदर्भात प्रश्न विचारण्याची राजकीय ताकदच नव्हती कारण त्यांच्या पुढे यदाकदाचित उद्या स्वातंत्र्य मिळाले तर काय हा फार मोठा प्रश्न होता . शिवाय क्षत्रिय काय रिएक्शन देतील याबद्दलचे भय होते. भारतातल्या अनेक लढणाऱ्यांना मुस्लिम आणि ब्रिटिश या परक्यांच्या विरोधात लढता येत नाही पण स्वकीयांच्या विरोधात मात्र शूद्र अति शूद्र यांच्या विरोधात मात्र व्यवस्थित लढता येते हा इतिहास आहे त्यामुळे साहजिकच टिळकांना जे भय वाटले ते आपण समजू शकतो .
आधी मुसलमान नंतर ब्राह्मण पेशवे आणि नंतर ब्रिटिश यांची चाकरी करणाऱ्या लोकांना मी किती आदर द्यावा? असा हा प्रश्न होता आणि आहे आणि तो अजूनही पुरेशा प्रमाणात सुटलेला नाही .
यापुढचा मग मुख्य आणि कळीचा प्रश्न असा निर्माण होतो की वर्णव्यवस्था जर का चांगले क्षत्रिय निर्माण करू शकली नसेल तर ती एक अपयशी संस्था आहे हे सत्य ब्राह्मण वर्ण या काळामध्ये का स्वीकारत नव्हता ? तुम्ही जर हजार वर्षे सातत्याने पराभूत होत असाल आणि तुमची वर्णव्यवस्था पूर्णपणे संपूर्ण भारतीय समाजाला खड्ड्यात घेऊन जात असेल तर मग तुमची वर्णव्यवस्था ही चुकीची आहे तिच्यातून निर्माण होणारी सामाजिक व्यवस्था चुकीची आहे ही गोष्ट तुम्ही अजून सुद्धा का स्वीकारत नाही ? केवळ तुमच्यावर दोष आरोप येतो म्हणून तुम्ही तिचे समर्थन करत बसला ? आणि बसता आहात ? आणि पुढे किती काळ बसणार आहात ? ज्या वैष्णव धर्माने इस्लामशी युती करून इथली सर्व सत्ता मुस्लिम लोकांच्या ताब्यात जाऊ दिली त्या धर्माचे तुम्ही समर्थन करता आहात?
भारतातले क्षत्रिय जोपर्यंत हर हर महादेव म्हणत होते तोपर्यंतच प्रतिकाराला सज्ज होते. त्यांनी जय श्रीराम आणि जय श्री कृष्ण करायला सुरुवात केली आणि आपोआपच त्या नंतर मग ते पराभूत होत गेले त्यांची सीतेप्रमाणे, द्रौपदी आणि राधेप्रमाणे फरफट होत गेली .
तेव्हा जरा क्षत्रियांचा इतिहास जसा गेल्या हजार वर्षात घडला तसा प्रथम उभा करा समजून घ्या अन्यथा आपण काय प्रकारची आत्महत्या करायला चाललेलो आहोत हे तुम्हाला कधीही कळणे शक्य नाही
भय हे धर्माचे मुख्य साधन आहे त्याच्या जीवावर तुम्ही काही काळ राज्य कराल परंतु एक लक्षात ठेवा या देशात भयाचा प्रतिकार कसा करायचा हे सांगणारी शैव परंपरा अस्तित्वात आहे .
तुम्ही करत चाललेल्या चौथ्या राजकीय आत्महत्येचा तात्कालीक फायदा तुम्हाला सत्ता मिळण्यात आणि टिकवण्यात होईल . तिथेही नरेंद्र मोदी अधून मधून हर हर महादेव म्हणतात म्हणून ठीक चाललेले आहे ज्या दिवशी ते हर हर महादेव चा त्याग करतील फक्त जय श्रीराम म्हणतील त्या दिवशी काय होईल ते तुम्ही पहालच .
ते पाहणे तुमच्या नशिबी येऊ नये म्हणून जागृत करण्यासाठी हे चार शहाणपणाचे शब्द बोललो .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment