परंपरेचे नवताकरण श्रीधर तिळवे नाईक 

परंपरा वर्तमानात उपस्थित असतातच प्रश्न असा आहे की त्या कोणाच्या हवाली करायच्या मी सुरुवातीच्या दुसऱ्या टप्प्याच्या.कालखंडामध्ये त्यांना प्रचंड विरोध करून बघितलेला आहे चौथ्या नवतेचा जोरदार पुरस्कार करून बघितलेला आहे पण माझा अनुभव असा की यामुळे परंपरांना धक्का लागतो हे खरे आहे आणि तो तसा द्यावा पण तरीही काही परंपरा शिल्लक राहत असतील आणि त्यांच्यात काही दम आढळत असेल तर मग त्यांना कुणाच्या हवाली करायचे हा प्रश्न विचारावा आपण हा प्रश्न विचारत नाही आणि मग फार मोठा गोंधळ निर्माण करतो 

एकतर चौथ्या नवतेसाठी कुठली परंपरा निवडायची असा प्रश्न प्रथम विचारायला  हवा एकदा या प्रश्नाचे उत्तर मिळाले किंवा  लक्षात आले की ही परंपरा टिकवण्याच्या लायकीची आहे का हा प्रश्न निवडावा आणि मग त्यात काय टिकवावे आणि त्यातील का फेकून द्यावे याचा सारासार विवेक बुद्धीने विचार करावा आणि मग ती परंपरा  नवतेच्या कशी हवाली करायची ते ठरवावे आणि एकदा ते ठरवले की मग ती संपूर्ण परंपरा नवता बनवावी  माझ्या कवितांच्या मधून हे मी सातत्याने केलेले आहेत अनेक शैव परंपरा ज्या पूर्णपणे कालबाह्य झालेल्या नाहीत त्या मी व्यवस्थित आत्ताच्या 21व्या शतकाला धरून पूर्णपणे नवीन करून टाकलेल्या आहेत .

आता या गोष्टी खरे तर मी सांगणे बरे नव्हे परंतु आपल्याकडे जे समीक्षक आहेत ते एकंदरीत बावळट आहेत असे माझे मत आहे किंबहुना परंपरेच्या बाबतीत तरी देशी वादाच्या नावाखाली ते अनेकदा बावळट झालेले दिसतात त्यामुळेच आपणच थोडे सावध असलेले बरे असते अन्यथा होते काय मग की आपण परंपरा वाऱ्यावर सोडून देतो आणि त्या परंपरा कोणीतरी भलताच पंथ भलते लोक उदाहरणार्थ संभाजी भिडे यांच्यासारखे लोक आपल्या हातात घेतात आणि त्यांना वाटेल तो आधार देत त्यांना वाटेल तसा आकार द्यायला लागतात हा असा वाटेल तसा झालेला कर्मठ आकार परवडणारा नसतो  म्हणूनच मग तो अशा लोकांच्या हाती सोपवण्यापेक्षा आपण आपल्या हातात घ्यावा हे उत्तम ते नाही केले की काय होते ते आपल्यासमोर आहे 

तेव्हा मी काय करतो हे तुम्हाला कळत नसेल तर प्रश्न विचारा उत्तरे दिली जातील पण प्रश्न सुद्धा विचारावेसे वाटत नसेल तर माझे काहीच नुकसान नाही कारण माझे कर्तव्य काय आहे ते मला नीट माहिती आहे अनेकदा आपल्याकडे एखाद्या माणसाला  त्याची कर्तव्य नीट कळली तर त्याचा सुद्धा लोकांना प्रॉब्लेम होतो कारण इतका ठामपणे असलेला माणूस आपल्या लोकांना चालत नाही विशेषतः तथागतीत विचारवंतांना तर हे असे ठाम सांगणे आवडत नाही त्यांना वाटते की आपल्यासारखा हा माणूस कन्फ्युज असलेला बरा पण तसा तो नसला की मग त्यांचे प्रॉब्लेम चालू होतात याचा अर्थ असा नाही की मी लवचिक नसतो परंतु लवचिक असणे म्हणजे काय याचेही भान असणे आवश्यक आहे आपल्याकडे अनेकदा लवचिक असण्याचा  अर्थ शरणागती पत्करणे असा होऊन जातो तो होणार नाही याची काळजी सुद्धा आपणच घ्यायची आहे. 

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती