काँग्रेसचा वांजोटा एक राष्ट्रवाद श्रीधर तिळवे नाईक
हल्ली कपिल सिबल यांचा एक व्हिडिओ सतत फिरतोय त्यामुळे या विषयावर बोलतो आहे
ते म्हणतात की आंबेडकर यांनी असे म्हटले आहे की जिना आणि सावरकर आपापसात भांडत असले तरी आश्चर्यकारित्या दोघेही द्विराष्ट्रवाद स्वीकारतात हे विधान बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते हे बरोबर आहे पण पुढे जे सांगितले जाते ते आंबेडकरांनी स्पष्टपणे म्हटलेले नाही त्यामुळेच याबाबतीत निर्णय घेणे भाग आहे
सर्वात पहिली गोष्ट हिंदू आणि मुस्लिम या दोन संस्कृती आहेत अशी मांडणी मुस्लिम लोकांनी आणि मुस्लिम विचारवंतांनी केली आणि तिथेच द्विराष्ट्रवाद जन्माला आला पुढे करझनच्या काळात बंगालच्या फाळणीच्या वेळी सुद्धा बंगाल मधले असे अनेक मुस्लिम लीगचे विचारवंत द्विसंस्कृतीवादी आणि द्वि राष्ट्रवादी होते तेव्हा याबाबतीत जे हिंदूंना दोष देतात ते नालायक आहेत हिंदूंनी प्रथम ही थेरी मांडलेली नाही द्विराष्ट्र वादाचा सिद्धांत प्रथम मुस्लिम लोकांच्याकडून आलेलां आहे याचे कारण उघड आहे फुटीरता वाद ! फुटीरतावाद मुस्लिम राजकारणाचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे पाकिस्तान निर्मितीनंतर सुद्धा पाकिस्तान फुटला आणि बांगलादेश निर्माण झाला आज ना उद्या पाकिस्तान सुद्धा फुटणार आहे इस्लाम लोकांना एक करतो हा गैरसमज आहे मुळात खलिफा हे पद निर्माण होत असताना मुस्लिम एक झाले नाहीत तर आता काय होणार ? उद्या जगभर मुस्लिमांची सत्ता आली म्हणजे एक राष्ट्र होईल या भ्रमात कोणीही राहू नये माझा अंदाज चुकला नाही तर उलट दोनशे तीनशे राष्ट्रे वाढतील कारण अथपासून ईती पर्यंत हा धर्म राजकारणी आहे मुळात मोहम्मद हेच एक मोठे क्रांतिकारक राजकारणी माणूस होऊन गेले जे त्यांचे पैगंबर सुद्धा होते त्यामुळे राजकीय सत्तेची आकांक्षा ही नसानसात भिनलेले हे लोक आहेत म्हणूनच मुस्लिम राजवटी पाहिल्या तर त्या प्रचंड कारस्थानांनी भरलेल्या दिसतात तेव्हा याच प्रवृत्तीतून आपणाला संपूर्ण हिंदुस्तानावर राज्य करता येणार नाही हे मुस्लिम लोकांना मुळात मराठ्यांच्या कारकीर्दीतच कळालेले होते त्यामुळे त्यांनी आधीच स्वतंत्र राष्ट्र मागण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली एका अर्थाने हा द्रष्टेपणा होता किंबहुना इस्लाम मुळे राजकीय द्रष्टेपणा येतो की काय अशी मला नेहमीच शंका येते इतके उत्कृष्ट पद्धतीने राजकारण मुस्लिम राजकारणी खेळत असतात विशेषतः नॉन मुस्लिम लोकांशी !
आता राहिली गोष्ट सावरकरांची! तर सावरकर त्यांच्या राष्ट्रवादाबाबत पाया काय याबाबतीत गोंधळलेले नव्हते धर्म हा त्यांच्या राष्ट्र वादाचा पाया होता आणि त्याबाबतीत ते ठाम होते पण एक राष्ट्र की दोन राष्ट्रे की अनेक राष्ट्रे याबाबतीत मात्र ते कायमच प्रचंड गोंधळलेले होते देश स्वतंत्र होणार होता तेव्हा त्यांनी अनेक राजांना तुम्ही स्वतंत्र राष्ट्र व्हा असे सांगितलेले आहे ही वस्तुस्थिती आहे अखंड राष्ट्राचा जप ते कधी कधी करत पण त्यासाठी त्यांनी काय केले? त्यांनी जिना जेव्हा डायरेक्ट ॲक्शनची बात करत होते तेव्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून उलटी डायरेक्ट ॲक्शन घेतली का ? त्यांचे बहुतांश अनुयायी हे ब्राह्मण होते आणि त्यांनी संघटित रित्या उलटी डायरेक्ट ॲक्शन घेतले असती हा विश्वास बहुदा त्यांना नव्हता याबाबतीत कळत नकळत त्यांचे राजकारण प्रतिक्रियात्मक होते म्हणजे मुस्लिम काय क्रिया करतात त्यानुसार आपण प्रतिक्रिया करायची प्रत्यक्षामध्ये खरोखर प्रतिक्रिया दिली का हा फार मोठा प्रश्न आहे किंबहुना हिंदुत्ववादी लोकांच्या क्रियांचा इतिहास कोणीतरी लिहिला पाहिजे जीनाला मारण्याऐवजी गांधींना मारणे यावरूनच क्रीयात्मक बाबतीत वैचारिक लेवल लक्षात येते अर्थात त्यांचा यामध्ये सहभाग होता की नाही हा वादाचा विषय असला तरी त्यांना संशयाचा फायदा देता येतो थोडक्यात काय सावरकर कधी एक राष्ट्रवादी कधी द्वि राष्ट्रवादी कधी बहुराष्ट्रवादी असे भूमिका बदलताना दिसतात ही वस्तुस्थिती आहे
आता काँग्रेसकडे वळू काँग्रेसने तरी त्यांच्या वन नेशन थेरीसाठी काय केले ? तर काहीही केले नाही कारण त्यासाठी मुळात पाकिस्तान आम्ही होऊच देणार नाही अशी ठाम भूमिका घ्यायला लागते ती भूमिका काँग्रेसने घेतली नाही त्या मागच कारणे काहीही असोत पुढेही पाकिस्तान जिंकल्यानंतर पाकिस्तान भारताचा भाग बनवावा हे वन नेशन थेरीला धरून होते पण असे काही भारताने किंवा काँग्रेसने काँग्रेस सरकारने केले नाही काँग्रेसच्या राजवटीत किमान दोन मोठी युद्धे काँग्रेसने जिंकली त्यामुळे ही नक्की संधी होती पण असे काही झाले नाही कारण उघड होते मुस्लिम मतदार काय करतील याचा काँग्रेसला अंदाज येत नव्हता अगदी समजा आपण पाकिस्तान जिंकले तर पाकिस्तानात सुद्धा उद्या निवडणुका घेतल्या तर ते हिंदू उमेदवाराला मत देतील का हा प्रश्नच आहे म्हणजे फक्त मुस्लिम खासदार वाढतील आता हे फायद्याचे होईल की नुकसानीचे होईल हे ठरवणे फार अवघड आहे त्यामुळेच खरे तर वन नेशन कोणालाच नको होते कारण सर्वांनाच माहिती होते की मुस्लिम जर का एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्येने राहिले तर शक्यता अशीच होती की ऑलरेडी आंबेडकर वेगळी चूल मांडून बसले होते आणि त्यामुळे ऑलरेडी १५ टक्के लोक वेगळे झाले होते उरलेले हिंदू सुद्धा वर्णाने जातीत विभागलेले होते त्यामुळे जर काय अखंड राष्ट्र झाले असते तर ४० टक्का मुस्लिम लोकांची स्वतःची स्वतंत्र पार्टी तयार झाले असती आणि मुस्लिम कितीही भांडत असले तरी जर का जीहाद पुकाराला गेला झाला की ते एक होतात त्यामुळे 101% मुस्लिम लोकांची सत्ता अखंड हिंदुस्तानावर राहिली असती तेव्हा जे झाले ते बरेच झाले तेव्हा उगाचच पाकिस्तान आणि बांगलादेशाबद्दल शोक करू नये जे झाले ते इतिहासाचे भाग झाले आणि जर का हिंदुत्वाच्या तत्त्वज्ञानाशी प्रामाणिक आणि निष्ठावान राहायचे असेल आणि अखंड राष्ट्र खरोखर निर्माण करायचे असेल तर मग पाकिस्तान आणि बांगलादेश जाऊ द्या आधी भारतामधल्या सर्व मुस्लिमांना हिंदू करून दाखवा त्यासाठी काय करता? काही प्लॅन आहे का ?नुसत्या वावड्या उडवल्या जातात कसलाही ॲक्शन प्लॅन ठेवायचा नाही कायम गोंधळ करत राहायचे आणि त्याचा फायदा उठवायचा आणि ब्राह्मणी हितसंबंध जपायचे याच्या पलीकडे जोपर्यंत हिंदुत्ववाद जात नाही तोपर्यंत हिंदुत्ववादाला कितीही वर्षे सत्ता मिळाली तरी "अखंड हिंदुस्तानामध्ये सर्वजण हिंदू" हे हिंदुत्ववादाचे स्वप्न साकार होणे शक्य नाही कारण त्यासाठी लागणारा कसलाही ॲक्शन प्लॅन हिंदुत्ववादी लोकांच्याकडे नाही पुन्हा समजा असे सर्व काही झाले तर मग वर्ण जाती व्यवस्था आणणार आहेत का की नवा वर्ण जातमुक्त हिंदुस्तान निर्माण करणार आहेत हे प्रश्न आहेतच
थोडक्यात काय मुस्लिम या विषयावर काँग्रेसने उगाच आपल्या नसलेल्या मिशा पिळू नयेत आणि हिंदुत्ववादी लोकांनी याबाबतीत नेमका ॲक्शन प्लॅन तयार असल्याशिवाय बोलू नये
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment