वगळणीचे दोन प्रकार आणि जगाचे आणि भारतातले बदललेले मॅपिंग! श्रीधर तिळवे नाईक
21 व्या शतकामध्ये काही गोष्टी स्पष्टपणे नव्याने सामोरे आलेल्या दिसतात आणि त्या खरोखरच धक्कादायक आहेत त्यातील एक गोष्ट म्हणजे उत्तर आधुनिक संस्कृतीचा विचार करता करतात कळत नकळत काही संस्कृतीनी काही वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे
यामध्ये दोन महत्त्वाचे बदल भारताशी संबंधित आहेत त्यामुळे त्यांची नोंद घ्यायला हवी
पहिला बदल पहिली वगळणी आहे कळत नकळत अलीकडे युरोपमधून रशियाला युरोप खंडाचा भाग म्हणून वगळणे सुरू झालेले आणि त्याला युरेशिया असे स्वतंत्र नाव देऊन आशिया खंडामध्ये सुद्धा अनेकदा ठेवलेले दिसते खरे तर हे फार पूर्वीच राहायला पाहिजे होते कारण आशिया खंडाचेच युरेशिया आणि भारतीय किंवा इंडियाना असे दोन भाग होतात हे आता सर्वांनी स्वीकारावे हे उत्तम आहे त्यातील उत्तर आशिया म्हणजे पूर्वीचा संपूर्ण मोठा महा रशिया चीन मंगोलिया वगैरे सर्व आणि भारतीया किंवा इंडियाना म्हणजे संपूर्ण हिमालयापासून थेट खालपर्यंत पोचलेला सावत एशिया ! खरे तर कधी ना कधीतरी हे होणारच होते ते आता व्हायला लागले असे दिसते
दुसरा बदल दुसरी वगळणी मात्र महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत हानिकारक आहे आणि ती म्हणजे दक्षिणात्य भारताने महाराष्ट्राला चक्क दक्षिणात्य संस्कृतीतून हल्ली वगळायला सुरुवात केलेली आहे . एकेकाळी शिवाजी महाराज स्वतःला दख्खनचे म्हणवून घेत होते त्या महाराष्ट्रावर आता दक्षिण भारतातून बाहेर पडण्याची वेळ यावी हे एका अर्थाने या देशातल्या ब्राह्मणांचे उत्तरेकडून आलेल्या महाराष्ट्रात सेटल झालेल्या प्रचंड लोंढ्याचे आणि एकंदरच हिंदी संस्कृतीचा प्रचंड होत चाललेला विस्तार कसलाही प्रतिकार न करता स्वीकारण्याचे जे काही घाट घातले गेले त्यांचे विजय आहेत . मला तर आता शंका आहे की मुळामध्ये महाराष्ट्राला किंवा मराठी माणसाला खरोखरच या गोष्टीची थोडी तरी तमा राहिली आहे का ? मला स्वतःला वाटले होते की सातवाहन वाकाटक आणि शिवाजी महाराजांच्या दिशेने महाराष्ट्र जाईल परंतु तो तसा गेलेला दिसत नाही तो उत्तरकाळातले पहिल्या बाजीरावानंतरचे पेशवे आणि वारकरी पंथाच्या दिशेने गेला आणि वारकरी पंथाचे सगळे राम कृष्ण हरी हे तिन्ही देव उत्तरेकडून उत्तरीकरण घेऊन आल्यामुळे बहुदा वारकरी पंथाचा विजय आणि प्रसार हाच आता उत्तरेचा विजय आणि प्रसार झालेला दिसतो . बहुदा या गोष्टीला आता खुद्द दक्षिणात्य लोकांनीच मान्यता दिलेली दिसते त्यामुळेच दक्षिणेची चर्चा करताना आता पूर्वीसारखा महाराष्ट्र कोणी दख्खनचा भाग म्हणून विचारात घेत नाही . मला एक गोष्ट समजत नाही महाराष्ट्र नेमका कशासाठी आता शिवाजी महाराज की जय म्हणत असतो ? तुम्ही आता ना शिवाजी महाराजांचा शैवधर्म फॉलो करत आहात ना त्यांचा आपण साउथ इंडियन आहोत दक्षिणात्य आहोत दख्खनचे आहोत हा आग्रह फॉलो करत आहात . मग शिवाजी महाराज नेमके हवे आहेत कशाला ?
यातून निर्माण होणारा एक मोठा प्रश्न म्हणजे यापुढे युरेशिया आणि उत्तर भारत यांची युती भारतामध्ये राज्य करणार आहे का ?
असो या दोन बदलांच्यामुळे आणि या बदललेल्या मॅपिंग मुळे नेमके काय परिणाम होणार आहे हे आता अस्पष्ट आहे परंतु हळूहळू ते दिसायला लागतील अशी चिन्हे आहेत
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment