जनरेशन जी चे आंदोलन , आत्म्याचा प्रश्न , व्यवस्था गेली संरचना गेली आणि आता पुढे नेटवर्किंग काय? श्रीधर तिळवे नाईक 


अनेक पुरोगामी लोक अलीकडे आपण या z जनरेशनला समजून घेतले पाहिजे आपण या z जनरेशन पासून तुटले आहोत अशी मांडणी करत आहेत त्यांच्याकडे पाहिले की असे वाटते की हे खरे असावे. त्याच वेळेला आपण असे पाहतो की जे सत्ताधारी लोक आहेत त्यांच्यापैकी सुद्धा अनेकांना ही z जनरेशन कशी काम करते हेच लक्षात येत नाहीये त्यामुळेच या आंदोलनाचा प्रतिकार कसा करावा हे काही त्यांना नीट समजलेले नव्हते आणि समजत नाहीये .


नेहमीप्रमाणे खोटारडेपणा , खोडसाळपणा आणि अपप्रचार असा प्रकार सुरू झालेला आहे पण त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे या लोकांना कळत नाही. दंतकथांच्यावर विश्वास ठेवण्याचा एक काळ मधल्या काळात आला होता पण आता ही जी नवीन z जनरेशन आली आहे ती या सगळ्या दंतकथांच्या स्पॉन्सरशिपवर कदाचित विश्वास ठेवणार नाही फक्त या z जनरेशन मधले काही अंधताबद्ध लोक यावर विश्वास ठेवतील पण असे अंधताबद्ध लोक प्रत्येक जनरेशनमध्ये असतात आणि अनेकदा ते प्रस्थापित लोकांच्या बाजूने असतात . काँग्रेसच्या काळात हेच लोक काँग्रेसच्या बाजूने होते . डाव्या लोकांच्या काळात डाव्या बाजूने होते . हे लोक आता हिंदुत्ववादी आहेत कारण त्यांच्या हितसंबंधांचे जाळे सध्या तरी हिंदुत्ववादी लोकांशी जोडले गेलेले आहे जोपर्यंत हिंदुत्ववाद सत्तेवर तोपर्यंत हे लोक हिंदुत्ववादी एकदा का हिंदुत्ववाद पराभूत झाला तर हिंदुत्ववादाचा त्याग करायला यांना थोडासुद्धा वेळ लागणार नाही. लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की यांच्या या सर्व खटाटोपामागे पूर्वीही कसलाही नैतिक कणा आणि विचार नव्हता आणि आत्ताही नाही फक्त स्वार्थ होता आणि आहे त्यामुळे त्यांना फार विचारात घेण्याची गरज नाही .


खरा प्रश्न असा आहे की पुरोगामी लोकांना अशी परात्मता या जनरेशन बद्दल अचानक का आली ? का त्यांना ही पिढी आपल्यापासून तुटली आहे असे वाटते आहे ? मुख्य प्रश्न हे आहेत.


खरेतर या प्रश्नाची चर्चा सर्वात प्रथम पुरोगामी कालखंडामध्ये हेगेल याने केली आणि मग अनेक लोकांनी ही चर्चा पुढे नेली त्यामध्ये कार्ल मार्क्सचासुद्धा फार मोठा वाटा होता आणि त्याने कामगाराला भांडवलशाही मध्ये काम करताना कशी परात्मता वाटायला लागते ते सांगितले आणि त्या मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला पुढे अस्तित्ववादी लोकांनी तर परात्मता ही फार मोठी गोष्ट आहे अशा प्रकारे मांडणी करत आधुनिकतेमध्ये उपस्थित असलेल्या परात्मतेचे सगळे आयाम शोधायला सुरुवात केली .


मुळातच हा सगळा प्रश्न आत्मतेचा आहे आणि सर्वात विचित्र गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे शैव श्रुतीमध्ये आत्मा नावाची संकल्पना नाही. ही संकल्पना युरेशियन लोकांच्याकडून आलेली आहे . शैव श्रुतीमध्ये प्राण ही संकल्पना आहे आणि महाप्राणाला ईश्वर म्हणतात जो या संपूर्ण जगामागे आहे. किंबहुना ईश्वर ( शैव शब्द ईशान,) शब्दाची व्याख्या किंवा महाप्राण या शब्दाची व्याख्या शिवाची संसारामध्ये असलेली उपस्थिती अशी करावी लागते .हा प्राण अमर आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्नच कधी साधक लोकांना पडलेला नाही त्यामुळे त्याची शैव-धर्मांच्या मध्ये चर्चा पण नव्हती ती नंतर आली पण परलोक केंद्री श्रद्धा असणाऱ्या अनेक लोकांच्या बाबतीत मात्र आपणाला असे दिसते की त्यांना मात्र हा प्रश्न पडलेला आहे शैव श्रद्धेमध्ये आपणाला पूर्वज लोक नावाची संकल्पना दिसते आणि हा पूर्वज लोक त्यांना प्रत्यक्ष आकाशात दिसत होता आणि त्यांना असे वाटत होते की आकाशात कुठेतरी आपले पूर्वज आहेत मात्र त्यानंतर हे जे स्वर्ग नरक वगैरे प्रकरण आले ते काही शैव लोकांच्या मध्ये सुरुवातीला नव्हते त्यांच्यामध्ये फक्त पूर्वजलोक आणि आत्ताचा पृथ्वी लोक एवढे दोनच लोक होते. त्यामुळेच स्वर्ग आणि नरक हे दोन लोक त्यांनी युरेशियन लोकांच्याकडून घेतले आणि नंतर आत्मा ही सुद्धा गोष्ट त्यांनी घेतली पण त्याचे काय करायचे हे त्यांना कळले नाही. त्यांच्या दृष्टीने प्राण असणे आणि प्राण जाणे यांच्या दरम्यानच आयुष्य असते .त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास होता की नाही याबद्दलचा कसलाही निष्कर्ष आपण काढू शकत नाही कारण खुद्द शंकरानेच असा काही निष्कर्ष काढलेला नाही अगदी वैष्णव असलेल्या महाभारतामध्ये सुद्धा भगवान शंकर याबद्दल काहीही अंतिम सांगत नाहीत कारण त्यांनी काही अंतिम सांगितलेलेच नाही याची महर्षी व्यास यांना कल्पना आहे हा संसार चालवण्यासाठी अशा संकल्पना उपयुक्त आहेत असेच महाभारतातले भगवान शंकर सुद्धा पार्वतीशी बोलतात . मुळातच आत्मा ही संकल्पनाच सुचलेली नाही कारण माणसाच्या आधारशीलाला आधार म्हणून प्राण ही संकल्पना शोधली गेली आणि त्यामुळेच ज्याच्यात प्राण असतो तो जीव आणि या जीवांच्या मध्ये ज्यांच्यात प्राण जास्त असतो तो मनुष्य व कमी असतो ते प्राणी अशी व्याख्या केली गेली आणि या जीवांच्या मध्ये मग प्राणी हा वेगळा काढला गेला आणि या प्राण्यांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ प्राणी म्हणून माणसाचा विचार केला गेला .मात्र हा विचार करताना कायमच माणूस पशु आहे हे लक्षात ठेवले जाते . माणसाविषयीच्या कसल्याही रोमँटिक डिवाइन कल्पना शैव श्रुतीमध्ये अस्तित्वात नाहीत . त्यानंतर मग इसवीसन पूर्व 1000 नंतर घुसवल्या गेल्या आणि इसवी सन ९०० आद्य शंकराचार्यांच्या नंतर त्या शैवश्रुती मध्ये सुद्धा प्रस्थापित झाल्या.


मग आत्मा म्हणजे काय तर माझ्या मते आत्मा म्हणजे आर्टिफिशियल प्राण जो मेंदूमध्ये शरीरामध्ये तयार होतो याला अहं व मद असे नाव दिले होते आणि तो नसला किंवा नाहीसा झाला की मग माणसाला मोद मिळतो आनंद मिळतो अशी त्यांची साधी संकल्पना आहे त्यातूनच मोदक ही संकल्पना जन्मली आणि मोदक म्हणजे आनंद देणारी गोष्ट अशी तिची व्याख्या आहे गणपतीला मोदक आवडतात म्हणजे आनंद देणाऱ्या गोष्टी आवडतात . आपण या जनरेशन चा विचार केला तर तिला सुद्धा फक्त मोदक म्हणजे आनंद देणाऱ्या गोष्टी आवडतात असे दिसते. दुर्दैवाने आपल्याकडे ब्राह्मण वादाने सर्वच गोष्टी खराब केल्या तशा मोद मोदक आणि मद यांचा संबंध न बघताच त्या सर्व गोष्टी खराब करून टाकल्या आणि कर्मकांडात विरघळवून टाकल्या जोपर्यंत मद आहे तोपर्यंत तुम्हाला मोद आणि शिव उपलब्ध होऊ शकत नाही मोक्ष मिळू शकत नाही असा हा ज्ञानतंत्राचा सिद्धांत आहे . ज्ञान सुद्धा आनंददायी असले पाहिजे हा त्याचा पाया आहे. त्यामुळेच गणेशोत्सवामध्ये आपण जास्तीत जास्त आज सुद्धा आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो तो ज्ञानाबरोबरच ज्ञान मिळाल्याच्या आनंदाचा उत्सव असतो. त्यामुळेच जनरेशन z त्यामध्ये उत्साहाने भाग घेताना दिसते . अनेक नव बौद्ध विचारवंतांना आपली z पोर गणेशोत्सव मध्ये नाचतात म्हणून अवघडल्यासारखे होते कारण त्यांना ही जनरेशन कळत नाही त्यामुळेच आत्मतेच्या गोष्टींची चर्चा या जनरेशनला फारशी करावीशी वाटत नाही . कारण तिचा संबंध प्राणाशी आहे.


दुर्दैवाने झाले असे आहे की इतिहास दत्त परिस्थितीमुळे आता युरेशियन श्रुतीचा आत्मा सिद्धांत सगळीकडे पसरलेला दिसतो यामुळे शेवटी गौतम बुद्ध यांना निर्वाणप्राप्तीची म्हणजेच मोक्ष प्राप्तीची चर्चा करताना अनात्मता सिद्धांत मांडावा लागला . या मागचे कारण अतिशय उघड होते कारण आत्मता ही नेहमीच वैदिक श्रद्धेमध्ये प्रस्थापित झाली होती जरी प्राण ही संकल्पना त्यांनी अनार्य लोकांच्याकडून स्वीकारली होती तरीसुद्धा मुख्य संकल्पना आत्मा हीच होती काही लोक तर असे होते की जे प्राण आणि जीव यांच्यात फरक करत नव्हते आणि त्यामुळेच अनेकदा आज सुद्धा शैव लोकांच्या मध्ये जीव गेला म्हणजेच प्राण गेला किंवा प्राण गेला म्हणजेच जीव गेला अशी संकल्पना दिसते .


मोक्षा नंतर जेव्हा धर्म आला तेव्हा मग नवीन धर्मयुग आणि धम्मयुग आले आणि या नवीन युगामध्ये मग साहजिकच एक नवा सिद्धांत उदयाला आला तो म्हणजे एकात्मता सिद्धांत ! परमात्मा आणि आत्मा यांचे मिलन झाले की ते एकात्म होतात एक होतात त्याला एकात्मता म्हणतात . यामागे मुळातच ईश्वर एकच आहे अशी संकल्पना आहे म्हणजेच परमात्मा एकच आहे आणि तो जो एक आहे त्यामध्ये जेव्हा माणसाचा आत्मा विसर्जित होतो तेव्हा मग आपोआपच त्याला ईश्वर प्राप्ती होते हे असे एकात्म होणे म्हणजेच मोक्ष होय. इथे प्रत्येक जीवाला आत्मा असतो अशी संकल्पना आहे आणि त्यातूनच मग जीवात्मा अशी संकल्पना पुढे विकसित झालेली दिसते .


या सर्व गोष्टींना छेद देणारी गोष्ट विज्ञानाच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या पुरोगामी कालखंडामध्ये निर्माण झाली ती म्हणजे निरीक्षक सब्जेक्ट ! या कालखंडामध्ये धर्म नाकारता यावा म्हणून आत्मा पुन्हा एकदा चर्चेला आला आणि याची चर्चा करताना निरीक्षकाला सब्जेक्ट आला पुढे याला विरोध करण्यासाठी म्हणून आत्मा हा शब्द पुन्हा आणला गेला आणि मग जगात असलेल्या आत्म्याचे करायचे काय त्यातून मग alienation ही संकल्पना उदयाला आली परात्मता हा शब्द तिला पर्यायी मराठी शब्द म्हणून आपल्याकडे आला कारण अशा प्रकारचा आत्मा alienation या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. मुळातच हेगेल याने जेव्हा हा शब्द वापरला तेव्हा त्याला युरेशियन श्रुतीतलाच आत्मा अभिप्रेत असावा या धार्मिक ख्रिश्चन मांडणीला छेद म्हणून जडवादी लोकांनी हा आत्मा जडापासून आत्मा तयार होतो अशी मांडणी केली म्हणजे आत्मा स्वीकारला पण," आत्मा म्हणजे जडापासून तयार झालेला मी "अशा त्याची व्याख्या केली. त्यामुळेच पुरोगामी लोक जेव्हा आत्मा हा शब्द वापरतात तेव्हा त्याचा अर्थ ही व्याख्या जे सांगते तो असतो हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. मी स्वतः जेव्हा हा शब्द वापरतो तेव्हा मलाही हाच अर्थ अभिप्रेत असतो.


हेगेल हा फार ख्रिश्चन धार्मिक मनुष्य होता आणि त्याने संपूर्ण पुरोगामी प्रकल्पाला काही प्रश्न विचारले होते जे कांट मुळे निर्माण झाले होते . माणसाचा आत्मा या जगामध्ये जेव्हा येतो तेव्हा तो परमेश्वराच्या आत्म्यापासून तुटतो त्याच्याशी एकात्म होत नाही आणि म्हणूनच त्याला या जगा विषयी परात्मता वाटत राहते असा हा काहीसा सिद्धांत आहे पण कार्ल मार्क्सला हा शब्द या अध्यात्मिक अर्थाने अभिप्रेत नाही त्याचा आत्मा हा एका अर्थाने माणसाच्या मेंदूमध्ये तयार होणारा मी अशा रूपात येतो तो एक असा सिद्धांत मांडतो की भांडवलशाहीमध्ये उत्पादन करणाऱ्या कामगार वर्गामध्ये हा जो मी आहे तो उत्पादन तयार करताना त्या उत्पादनाशी आणि त्या उत्पादन प्रक्रियेशी एकात्म होत नाही कारण तो संपूर्ण उत्पादन क्रियेचा भाग नसतो तर ॲडम स्मिथ दाखवतो त्याप्रमाणे कळत नकळत तो केवळ उत्पादन नावाच्या क्रियेचा अंश असतो पार्ट असतो त्याला संपूर्ण उत्पादन अनेकदा बघायला सुद्धा मिळत नाही कुठल्यातरी एका उत्पादन प्रक्रियेच्या युनिटचा तो भाग असतो आणि मग साहजिकच त्या संपूर्ण उत्पादनाबद्दल आणि उत्पादनाच्या त्या अवाढव्य भांडवली प्रकल्पा बद्दल त्याला प्रेम वाटत नाही आत्मीयता वाटत नाही आत्मता वाटत नाही आणि म्हणूनच त्याला काम करताना परात्मता येते 


आज तुम्ही कुठल्याही फॅक्टरीमध्ये गेला तर तुम्हाला वेगवेगळे भाग दिसतात डिपार्टमेंट दिसतात आणि ही सर्व डिपार्टमेंट्स डिव्हिजन ऑफ लेबर याच्या आधारे अनेकदा निर्माण झालेली असतात साहजिकच प्रत्येक डिपार्टमेंट मधला श्रमिक हा संपूर्ण प्रक्रियेपासून तुटलेला राहतो पुरोगामी उत्पादन प्रक्रियेचे हे अटळ फलित आहे पुढे मग ते कार्पोरेट सेक्टर मध्ये तर प्रचंड वाढत जाते पुरोगामी मध्ये निदान अंश तरी दिसतो कार्पोरेट आधुनिक उत्पादन प्रक्रियेमध्ये तर तेही दिसत नाही आपण अनेकदा कुठल्या अंशाचे भाग आहोत तेच कळत नाही आणि त्यामुळेच मग माणसाच्या अस्तित्वाचे रूपांतर एखाद्या झुरळात झाल्यासारखे होते आधुनिक माणसाची ही शोकांतिका सर्वात प्रथम काफकाने अतिशय चांगल्या रीतीने समजून घेतली आणि त्यातूनच त्याची मेटामार्फोसीस ही कथा जन्मली त्याने असे दाखवून दिले की माणसाचे रूपांतर या उत्पादन प्रक्रियेमध्ये झुरळात होऊन जाते . आपलं आपलं छोटे छोटे झुरळाच्या जगाप्रमाणे झालेले जग हाताळत बसणे एवढेच त्याच्या हातात उरते. त्यामुळेच झुरळ झाल्यानंतर सुद्धा तो माणूस कामावर कसे जाता येईल याचाच विचार करतो कारण भांडवलशाही आणि कार्पोरेटशाही तुम्हाला सतत या दबावात ठेवते की तुम्ही उपस्थित असला पाहिजे उपस्थित असण्याचा हा दबाव प्रचंड असतो तो तुम्हाला अनेकदा झेपत नाही अनेकदा असे वाटते की या व्यवस्थेमध्ये आपण झुरळासारखे कोपच्यात जाऊन कुठेतरी लपून बसावे . आज सुद्धा कामावर जाण्यापूर्वी अनेकदा अशी अस्तित्वस्थिती तुम्हाला प्राप्त होताना दिसत असेल आढळत असेल .


तुम्ही जर बघितले तर प्राचीन काळामध्ये झुरळ ही काही शिवी नव्हती परंतु आधुनिक काळामध्ये मात्र ती तशी बनली आणि म्हणूनच मग काही लोकांनी तरुण लोकांना झुरळ म्हटले . यातूनच मग पुढे कॉक्रोच पार्टी जन्मली . आता रूपकाच्या पातळीवर असे आपण म्हणावे का की प्रामुख्याने शिक्षण नावाच्या कार्पोरेट सेक्टर मधली ही सर्व झुरळे कार्पोरेट वादाच्या विरोधात उभी राहिलेली आहेत . मोदी शहा वगैरे लोकांचा असा काही गैरसमज झालेला आहे का आणि तसा तो गैरसमज झाला असेल तर तो का झाला असेल याचे कारण उघड आहे कारण कार्पोरेट वादाला सर्वात अधिक उत्तेजन हे मोदी शहा यांच्या अर्थव्यवस्थेने दिलेले आहे त्यामुळेच वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये काम करणारी झुरळे एकत्र आली तर काय होऊ शकते याचा त्यांना अंदाज आहे . झुरळे ही अनेकदा वाईट कॉलर असतात आणि या आंदोलनामध्ये अनेक वाईट कॉलर लोकांची मुले रस्त्यावर उतरली आणि हे कळत नकळत आकलनाच्या पलीकडे गेले आणि म्हणूनच या सगळ्या झुरळांच्या बद्दल एक प्रकारे सर्वांनाच आकलनाची परात्मता आली.


त्यामुळेच ह्या आंदोलनात अनेकदा काय चालले आहे ते कोणालाच कळले नाही . प्रश्न असा आहे की या आकलनाच्या परात्मतेवर करायचे काय ? त्यातूनच मग आरटीफिशल पद्धतीने एकात्म होण्याची धडपड चाललेली दिसते . त्यातूनच मग मोदी instagram वर फ्रेंड्स म्हणतात . त्यातूनच मग निखिल वागळे आपणच जणू काय त्यांच्याशी कनेक्टेड होऊ शकतो असे भासवायला बघतात. हे असे भास होतात त्याचे कारण प्रत्येकाला कळत नकळत या लोकांशी एकात्म व्हायचे आहे. एका अर्थाने ही एकात्म होण्याची जी आसक्ती आहे जिच्यामध्ये अनेकदा सुरक्षितता असते आणि आपण तुटू अशी असुरक्षितता सुद्धा असते तिच्यामुळेच मग आपण तुटलो असलो की मग परात्मता निर्माण होते . सहाजिकच मग प्रत्येक जण आत्म हत प्राप्त करण्याची आत्मता प्राप्त करण्याची धडपड करतो एकात्म होण्याची धडपड करतो म्हणजे आधी दडपड आणि आता धडपड ! यातूनच मग एकात्म होण्याची एक निरंतर धडपड संपूर्ण फेसबुक वर सर्वांची चाललेली आपणाला दिसते. प्रश्न असा आहे की यामध्ये सर्वाधिक यशस्वी कोण होणार की हे लोक स्वतःलाच अलिप्त ठेवून स्वतःची अलिप्त चळवळ चालवत फक्त स्वतःची एकात्मता स्वतःच्या पुरती ठेवत आंदोलन करणार आहेत ?


अनेकांना हे लोक आवश्यक असा आणि अपेक्षित असा प्रतिसाद देत आहेत असे वाटत नाही आणि मग आकलनाची परात्मता वाढत जाते आणि तिच्यामुळेच एकात्मता चालवण्याची धडपड ही वाढत जाते . यातून कदाचित अनेकांना ब्रेकप फील होऊ शकतो वाटू शकतो. जितका ब्रेकअप तीव्र तितकी एकात्म होण्याची धडपड पॅचअप करण्याची धडपड तीव्र असा काहीतरी प्रकार सध्या चाललेला दिसतो .


प्रत्यक्षात कोणत्या प्रकारचा प्रश्न या पिढीला पडतो आहे? म्हणजे उदाहरणार्थ जर का आपण असे म्हटले की ही पिढी आंबेडकर वादाच्या प्रभावाखाली म्हणजेच इनडायरेक्टली बुद्धाच्या प्रभावाखाली आहे तर मग ही पिढी अनात्मवादी असणार आणि माझ्या मते खरोखरच ती तशी एका वेगळ्या अर्थाने झालेली आहे . या पिढीला आत्मा बितमा या गोष्टीची काय पडलेली नाही त्यापेक्षा ती प्राणाला महत्त्व देते प्राण्याच्या जिवंत असण्याला प्राणाच्या सळसळसणायला ती महत्व देत आहे.Make life alive हा तिचा अजेंडा आहे आणि मग हे करण्यासाठी जे जे करता येणे शक्य आहे ते ती करत असते यातूनच मग व्हिडिओ सुद्धा बनवले जातात ब्लॉग बनवले जातात. त्यांना लोकप्रियतेचा चस्का आहे. किंबहुना तीच त्यांची मुख्य आसक्ती आहे .


सर्वसाधारणपणे धर्मयुगामध्ये प्रत्येक सरंजामदार हा स्वतःचा सरंजाम निर्माण करत होता आणि त्याला शह देण्यासाठी म्हणून मग पुरोगामी कालखंडामध्ये राजेलोक व्यवस्था निर्माण करायला लागले आणि हळूहळू व्यवस्था सर्वांच्या बोडक्यावर बसली आधुनिक आणि उत्तर आधुनिक काळामध्ये मात्र व्यवस्था गेली आणि तिच्या जागी रचना आणि संरचना आली . कार्पोरेट ही एक संरचना आहे स्ट्रक्चर आहे साहजिकच मग उत्तर आधुनिकतेमध्ये विरचना डी कन्स्ट्रक्शन आली 


प्रश्न असा आहे की मग ही चौथ्या नवतेमधली आत्ताची पिढी काय करत आहे ? माझ्या मते ती स्वतःपुरता एक आकार निर्माण करते एक व्यवहार निर्माण करते याला आमच्या पिढीमध्ये आम्ही तामझाम म्हणायचो हा एक अर्थाने सरंजाम दाराच्या सरंजामाच्या विरोधातला शब्द आहे. तामझाम हा डेमोक्रॅटिक असतो . त्याचा आकार सुद्धा अमिबा सारखा असतो त्याला आपण माणसाच्या भाषेत आम्हीबा म्हणू. हा अमिबा सारखा असतो तो आपला आकार सतत बदलत असतो सतत प्रजनन करत असतो त्यामुळेच तो अनेकदा तुम्हाला कोड्यात पाडतो एका अर्थाने नेटवर्क फंक्शनने धारण केलेला चंचल आकार म्हणजे तामझाम आणि आम्हीबा होय . हा असा आम्हीबा आकार धारण करत हे लोक कधी एकटे तर कधी ग्रुपने सरकत राहतात या आंदोलनामध्ये असे अनेक ग्रुप सरकत राहिले अनेक तामझम सरकत राहीले आणि त्यामुळेच ते नेमके काय करतात हे अनेकांच्या लक्षातच आले नाही अगदी पोलीस फोर्ससुद्धा कन्फ्युज झाली . एका अर्थाने व्यवस्था आणि संरचना सिस्टीम आणि स्ट्रक्चर यांच्या पलीकडे गेलेले हे सर्व तामझ्झाम होते आणि म्हणूनच ते झेपले नाहीत . अनेक जण गोंधळात पडले पण त्यांना जर का चौथ्या नवतेची जीवनशैली माहिती असती तर असा गोंधळ उडालाच नसता . मी स्वतः असे अनेक कामझाम आणि तामझ्झाम वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने उभा करत जगलेला माणूस आहे त्यामुळे ते उभे करताना जे करावे लागते त्याची मला कल्पना आहे . ही एक एकाच वेळेला विचारपूर्वक केलेली उस्फुर्त प्रोसेस असते. प्राण तिच्या केंद्रस्थानी असतो आणि त्यामुळेच ती सातत्य मागत नाही फक्त आपले आकार परिस्थितीनुसार बदलत पुढे सरकत जाते जगत राहते मुख्य म्हणजे आनंदात जगत राहते जिवंत सळसळत जगत राहते . माझ्या अडा हॉ का बाणा सुना या कादंबरीमध्ये जो नायक आहे तो असा जगतो आणि म्हणूनच तो मराठी साहित्याला परवडला नाही . मात्र या जनरेशनला तो सहजगत्या पचला. 


प्रश्न असा आहे की हा तामझाम संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य घडवू शकतो का ? जर का त्याला भविष्य घडवायचे असेल तर त्याला तामझाम बरोबरच कामझाम सुद्धा निर्माण करावा लागेल शेवटी फक्त तामझामाने काय होत नाही त्यासाठी प्रत्यक्ष कार्य करावे दिसावे लागते काम करावे दिसावे लागते आणि खरा प्रश्न इथेच आहे की खरोखर कार्य करणार आहे काय आणि ते दिसणार आहे काय कुठलीही गोष्ट नष्ट करायला फार अक्कल लागत नाही पण नवीन गोष्ट निर्माण करायची असेल तर खूप मेहनत करावी लागते . नाहीतर आधीचे झालेले जे काम असते त्या कामाची कार्याची आणि योजनांची नावे बदलून त्याचे श्रेय घेण्याची पाळी येते . याला फार काही अर्थ नसतो पण आत्ताच्या पिढीमध्ये ही प्रवृत्ती प्रचंड प्रमाणात आहे . लेबल बदलायचे आणि उत्पादन तेच ठेवायचे . कारण कळत नकळत जाहिरातीचा इतका परिणाम झालेला आहे की यांना वाटते की जाहिरातीमध्ये फक्त ज्याप्रमाणे केवळ लेबल बदलून उत्पादन खपवता येते आणि तेही आपल्या नावाने खपवता येते त्याप्रमाणे सर्वच आयुष्याचे उत्पादन करता येते पण प्रत्यक्षात असे होत नाही आत्ताच्या भाषेत सांगायचे तर तुमचा ताम्जाम उघडा पडतो नागडा होतो दुसऱ्यांचे तामझाम उघडे पाडायला फार अक्कल लागत नाही स्वतःचे तामझाम कामझाम उभे करायला जास्त अक्कल लागते.


एका अर्थाने कॉपी पेस्टिंगचा हा झालेला दुष्परिणाम आहे प्रत्यक्ष राष्ट्र चालवताना हे फार कामाला येत नाही . येणार नाही .केवळ डिजिटल ने जग चालत नाही ते मांसलने चालते आरटीफिशल इंटेलिजन्सचा प्रभाव जरूर घ्यावा परंतु अजून तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मांसल flesh तयार करता आलेले नाही . तुम्ही डिजिटल मुळे जास्तीत जास्त फ्रेश होऊ शकता फ्लेश नाही. अजून तरी त्या अवस्थेला चिन्ह सृष्टी पोहोचलेली नाही . त्यामुळेच कामझाम महत्त्वाचा आहे या संकल्पनेमध्ये काम म्हणजे एकाच वेळेला कार्य आणि सेक्सी किक असे दोन्ही अभिप्रेत आहे . या दोन्ही गोष्टी कामझाममध्ये उपस्थित असतात . यातल्या फक्त एकाच्या उपस्थितीच्या आधारे जर कोणी काम करायला जाईल तर ते होणार नाही कारण दोन्ही गोष्टी या जनरेशनला लागतात आणि या दोन्ही गोष्टी असल्या तर मग परात्मता वगैरे भानगडी निर्माण होत नाहीत . प्राण पणाला लागले तरी चालतील पण आपण ते पूर्ण करायचे हा तामझाम आणि कामझाम यांचा उद्देश असतो . अनेकदा समोर डेड लाईन असते ती पाळायची हा उद्देश असतो . आपण फक्त टीमवर्क चांगले झाले तरच यशस्वी होऊ शकतो याची जाण असते . त्यामुळेच इथे नेटवर्क फक्त नेटवर्क राहत नाही ते टीमवर्क बनते .


हे आंदोलन म्हणजे एक फार मोठा महातामझाम होता त्याने चक्काजाम केला पण खरा प्रश्न आता महाकामझाम कसा उभा करणार यांचा आहे तो तुम्ही कसा कार्यजालीत करणार हा खरा प्रश्न आहे कारण तुमच्या भवताली अनेकदा आऊटडेटेड झालेले ल लागलेले लोक असतात कधी कधी तर अख्या पिढ्या असतात त्यांना बाजूला सारण्याची हिंमत दाखवावी लागते त्यातूनच मग तुमची एरोगंट रागीट कोपिस्ट अशा प्रकारची इमेज तयार होते किंबहुना ती जाणीवपूर्वक केली जाते कारण या म्हाताऱ्या लोकांना तुम्ही काय करता ते कळत नसते अनेकदा तुम्ही अल्पसंख्या असता. अशा वेळेला खूप काळजीपूर्वक टीमला पुढे न्यावे लागते . मग अचानक तुमचे थोडे फार यश बघून अनेक मुंगळे यायला लागतात गुळाची ढेप तयार होत नाही पण मुंगळ्यांच्या संख्यांच्या ढेपा तयार व्हायला लागतात या ढेपा नीट हाताळाव्या लागतात त्या सर्व तुमच्या गोष्टी तुमच्या नावाने कॅश करण्याऐवजी स्वतःच्या नावाने कॅश करायला बघतात . जणू हे सर्व काही आपणच बाहेरून मॅनेज केले असे सांगायला बघतात त्यातूनच मग तुमची सो कॉल्ड परदेशी मुळे शोधली जातात . पण हे सर्व करताना कधीही आपला संयम जाऊ देता कामा नये तो गेला की तुम्ही संपला . तो तसा जावा अशा पद्धतीनेच अनेक लोक फंक्शन करत असतात टोल तर अनेक असतात . पण आपण कधी भैरव आणि कधी निळकंठ व्हायचे ते व्यवस्थित ठरवून व्हायचे असते . अनेकदा तर विरोधी पक्ष जाणीव पूर्वक तुम्ही निळकंठ व्हावा म्हणून नव्या नव्या दंतकथा रचत असतो जेणेकरून तुम्ही फक्त विष पचवत राहा आम्ही अमृत पळवून नेऊ अशी यांची इच्छा आणि पॉलिसी असते अशा वेळेला शंकर असणे म्हणजे फक्त निळकंठ असणे नव्हे असे दणकून सांगावे लागते. फक्त निळकंठ राहिलात तर तुमचा राहुल गांधी होण्याची शक्यता असते . ते परवडत नाही . हे आंदोलन भैरव पण होते म्हणूनच भय निर्माण झाले . एकदा हे भय ओसरले की हळूहळू मग आक्रमण चालू होईल त्या वेळेला काय करायचे तर त्या वेळेला थोडे निळकंठ होऊन नेमके काय होते ते पाहावे लागेल . तांडव झाले प्रलय झाला आता पुन्हा एकदा सृष्टी निर्माण करण्याची वेळ आलेली आहे प्रश्न इतकाच आहे की नवीन पिढीला हे झेपणार आहे का की ही केवळ सुनामी लाट ठरून आणि ठरवून पुन्हा समुद्रात विसर्जित होणार आहे केली जाणार आहे ?


श्रीधर तिळवे नाईक


जनरेशन z जी चे आंदोलन , आत्म्याचा प्रश्न , व्यवस्था गेली संरचना गेली आणि आता पुढे नेटवर्किंग काय? श्रीधर तिळवे नाईक 

अनेक पुरोगामी लोक अलीकडे आपण या z जनरेशनला समजून घेतले पाहिजे आपण या z जनरेशन पासून तुटले आहोत अशी मांडणी करत आहेत त्यांच्याकडे पाहिले की असे वाटते की हे खरे असावे. त्याच वेळेला आपण असे पाहतो की जे सत्ताधारी लोक आहेत त्यांच्यापैकी सुद्धा अनेकांना ही z जनरेशन कशी काम करते हेच लक्षात येत नाहीये त्यामुळेच या आंदोलनाचा प्रतिकार कसा करावा हे काही त्यांना नीट समजलेले नव्हते आणि समजत नाहीये 


नेहमीप्रमाणे खोटारडेपणा , खोडसाळपणा आणि अपप्रचार असा प्रकार सुरू झालेला आहे पण त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे या लोकांना कळत नाही. दंतकथांच्यावर विश्वास ठेवण्याचा एक काळ मधल्या काळात आला होता पण आता ही जी नवीन z जनरेशन आली आहे ती या सगळ्या दंतकथांच्या स्पॉन्सरशिपवर कदाचित विश्वास ठेवणार नाही फक्त या z जनरेशन मधले काही अंधताबद्ध लोक यावर विश्वास ठेवतील पण असे अंधताबद्ध लोक प्रत्येक जनरेशनमध्ये असतात आणि अनेकदा ते प्रस्थापित लोकांच्या बाजूने असतात काँग्रेसच्या काळात हेच लोक काँग्रेसच्या बाजूने होते . डाव्या लोकांच्या काळात डाव्या बाजूने होते . हे लोक आता हिंदुत्ववादी आहेत कारण त्यांच्या हितसंबंधांचे जाळे सध्या तरी हिंदुत्ववादी लोकांशी जोडले गेलेले आहे जोपर्यंत हिंदुत्ववाद सत्तेवर तोपर्यंत हे लोक हिंदुत्ववादी एकदा का हिंदुत्ववाद पराभूत झाला तर हिंदुत्ववादाचा त्याग करायला यांना थोडासुद्धा वेळ लागणार नाही. लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की या सर्व यांच्या खटाटोपा पूर्वीही कसलाही विचार नव्हता आणि आत्ताही नाही फक्त स्वार्थ होता आणि आहे त्यामुळे त्यांना फार विचारात घेण्याची गरज नाही .


खरा प्रश्न असा आहे की पुरोगामी लोकांना अशी परात्मता या जनरेशन बद्दल अचानक का आली ? का त्यांना ही पिढी आपल्यापासून तुटली आहे असे वाटते आहे ? मुख्य प्रश्न हे आहेत.


खरेतर या प्रश्नाची चर्चा सर्वात प्रथम पुरोगामी कालखंडामध्ये हेगेल याने केली आणि मग अनेक लोकांनी ही चर्चा पुढे नेली त्यामध्ये कार्ल मार्क्सचासुद्धा फार मोठा वाटा होता आणि त्याने कामगाराला भांडवलशाही मध्ये काम करताना कशी परात्मता वाटायला लागते ते सांगितले आणि त्या मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला पुढे अस्तित्ववादी लोकांनी तर परात्मता ही फार मोठी गोष्ट आहे अशा प्रकारे मांडणी करत आधुनिकतेमध्ये परात्मतेचे सगळे आयाम शोधायला सुरुवात केली .


मुळातच हा सगळा प्रश्न आत्मतेचा आहे आणि सर्वात विचित्र गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे शैव श्रुतीमध्ये आत्मा नावाची संकल्पना नाही. ही संकल्पना युरेशियन लोकांच्याकडून आलेली आहे . शैव श्रुतीमध्ये प्राण ही संकल्पना आहे आणि महाप्राणाला ईश्वर म्हणतात जो या संपूर्ण जगामागे आहे. हा प्राण अमर आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्नच कधी साधक लोकांना पडलेला नाही त्यामुळे त्याची शैव-धर्मांच्या मध्ये चर्चा पण नव्हती ती नंतर आली पण परलोक केंद्री श्रद्धा असणाऱ्या अनेक लोकांच्या बाबतीत मात्र आपणाला असे दिसते की त्यांना मात्र हा प्रश्न पडलेला आहे शैव श्रुतीमध्ये आपणाला पूर्वज लोक नावाची संकल्पना दिसते आणि हा पूर्वज लोक त्यांना प्रत्यक्ष आकाशात दिसत होता आणि त्यांना असे वाटत होते की आकाशात कुठेतरी आपले पूर्वज आहेत मात्र त्यानंतर हे जे स्वर्ग नरक वगैरे प्रकरण आले ते काही शैव लोकांच्या मध्ये सुरुवातीला नव्हते त्यांनी ते युरेशियन लोकांच्याकडून घेतले आणि नंतर आत्मा ही सुद्धा गोष्ट त्यांनी घेतली पण त्याचे काय करायचे हे त्यांना कळले नाही. त्यांच्या दृष्टीने प्राण असणे आणि प्राण जाणे यांच्या दरम्यानच आयुष्य असते .त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास होता की नाही याबद्दलचा कसलाही निष्कर्ष आपण काढू शकत नाही कारण खुद्द शंकरानेच असा काही निष्कर्ष काढलेला नाही अगदी महाभारतामध्ये सुद्धा भगवान शंकर याबद्दल काहीही अंतिम सांगत नाहीत कारण त्यांनी काही अंतिम सांगितलेलेच नाही याची महर्षी व्यास यांना कल्पना आहे हा संसार चालवण्यासाठी अशा संकल्पना उपयुक्त आहेत असेच महाभारतातले भगवान शंकर सुद्धा पार्वतीशी बोलतात . मुळातच आत्मा ही संकल्पनाच सुचलेली नाही कारण माणसाच्या आधारशीलाला आधार म्हणून प्राण ही संकल्पना शोधली गेली आणि त्यामुळेच ज्याचा ज्याच्यात प्राण असतो तो जीव आणि या जीवांच्या मध्ये ज्यांच्यात प्राण जास्त असतो तो मनुष्य व कमी असतो ते प्राणी अशी व्याख्या केली गेली आणि या जीवांच्या मध्ये मग प्राणी हा वेगळा काढला गेला आणि या प्राण्यांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ प्राणी म्हणून माणसाचा विचार केला गेला .मात्र हा विचार करताना कायमच माणूस पशु आहे हे लक्षात ठेवले जाते . माणसाविषयीच्या कसल्याही रोमँटिक कल्पना शैव श्रुतीमध्ये अस्तित्वात नाहीत . त्यानंतर मग इसवीसन पूर्व 1000 नंतर घुसवल्या गेल्या आणि इसवी सन ९०० आद्य शंकराचार्यांच्या नंतर त्या शैवश्रुती मध्ये सुद्धा प्रस्थापित झाल्या.


मग आत्मा म्हणजे काय तर माझ्या मते आत्मा म्हणजे आर्टिफिशियल प्राण जो मेंदूमध्ये शरीरामध्ये तयार होतो याला अहं व मद असे नाव दिले होते आणि तो नसला किंवा नाहीसा झाला की मग माणसाला मोद मिळतो आनंद मिळतो अशी त्यांची साधी संकल्पना आहे त्यातूनच मोदक ही संकल्पना जन्मली आणि मोदक म्हणजे आनंद देणारी गोष्ट अशी तिची व्याख्या आहे गणपतीला मोदक आवडतात म्हणजे आनंद देणाऱ्या गोष्टी आवडतात . आपण या जनरेशन चा विचार केला तर तिला सुद्धा फक्त मोदक म्हणजे आनंद देणाऱ्या गोष्टी आवडतात अशी दिसते. दुर्दैवाने आपल्याकडे ब्राह्मण वादाने सर्वच गोष्टी खराब केल्या तशा मोद मोदक आणि मद यांचा संबंध न बघताच त्या सर्व गोष्टी खराब करून टाकल्या आणि कर्मकांडात विरघळवून टाकल्या जोपर्यंत मद आहे तोपर्यंत तुम्हाला मोद आणि शिव उपलब्ध होऊ शकत नाही मोक्ष मिळू शकत नाही असा हा ज्ञानतंत्राचा सिद्धांत आहे . ज्ञान सुद्धा आनंददायी असले पाहिजे हा त्याचा पाया आहे. त्यामुळेच गणेशोत्सवामध्ये आपण जास्तीत जास्त आज सुद्धा आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो तो आनंदाचा उत्सव असतो. त्यामुळेच जनरेशन z त्यामध्ये उत्साहाने भाग घेताना दिसते . अनेक नव बौद्ध विचारवंतांना आपली z पोर गणेशोत्सव मध्ये नाचतात म्हणून अवघडल्यासारखे होते कारण त्यांना ही जनरेशन कळत नाही त्यामुळेच आत्मतेच्या गोष्टींची चर्चा या जनरेशनला फारशी करावीशी वाटत नाही 


दुर्दैवाने झाले असे आहे की इतिहास दत्त परिस्थितीमुळे आता युरेशियन श्रुतीचा आत्मा सिद्धांत सगळीकडे पसरलेला दिसतो यामुळे शेवटी गौतम बुद्ध यांना निर्वाणप्राप्तीची म्हणजेच मोक्ष प्राप्तीची चर्चा करताना अनात्मता सिद्धांत मांडावा लागला . या मागचे कारण अतिशय उघड होते कारण आत्मता ही नेहमीच वैदिक श्रद्धेमध्ये प्रस्थापित झाली होती जरी प्राण ही संकल्पना त्यांनी अनार्य लोकांच्याकडून स्वीकारली होती तरीसुद्धा मुख्य संकल्पना आत्मा हीच होती काही लोक तर असे होते की जे प्राण आणि जीव यांच्यात फरक करत नव्हते आणि त्यामुळेच अनेकदा आज सुद्धा शैव लोकांच्या मध्ये जीव गेला म्हणजेच प्राण गेला किंवा प्राण गेला म्हणजेच जीव गेला अशी संकल्पना दिसते .


मोक्षा नंतर जेव्हा धर्म आला तेव्हा मग नवीन धर्मयुग आणि धम्मयुग आले आणि या नवीन युगामध्ये मग साहजिकच एक नवा सिद्धांत उदयाला आला तो म्हणजे एकात्मता सिद्धांत ! परमात्मा आणि आत्मा यांचे मिलन झाले की त्याला एकात्मता म्हणतात . यामागे मुळातच ईश्वर एकच आहे अशी संकल्पना आहे म्हणजेच परमात्मा एकच आहे आणि तो जो एक आहे त्यामध्ये जेव्हा माणसाचा आत्मा विसर्जित होतो तेव्हा मग आपोआपच त्याला ईश्वर प्राप्ती होते हे असे एकात्म होणे म्हणजेच मोक्ष होय. इथे प्रत्येक जीवाला आत्मा असतो अशी संकल्पना आहे आणि त्यातूनच मग जीवात्मा अशी संकल्पना पुढे विकसित झालेली दिसते .


या सर्व गोष्टींना छेद देणारी गोष्ट विज्ञानाच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या पुरोगामी कालखंडामध्ये निर्माण झाली ती म्हणजे निरीक्षक सब्जेक्ट ! या कालखंडामध्ये धर्म नाकारता यावा म्हणून आत्मा पुन्हा एकदा चर्चेला आला आणि याची चर्चा करताना परात्मता हा शब्द त्याला पर्यायी शब्द म्हणून आपल्याकडे आला कारण अशा प्रकारचा आत्मा alienation या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. मुळातच हेगेल याने जेव्हा हा शब्द वापरला तेव्हा त्याला युरेशन श्रुतीतलाच आत्मा अभिप्रेत असावा या धार्मिक ख्रिश्चन मांडणीला छेद म्हणून जडवादी लोकांनी हा आत्मा जडापासून आत्मा तयार होतो अशी मांडणी केली म्हणजे आत्मा स्वीकारला पण," आत्मा म्हणजे जडापासून तयार झालेला मी "अशा त्याची व्याख्या केली. त्यामुळेच पुरोगामी लोक जेव्हा आत्मा हा शब्द वापरतात तेव्हा त्याचा अर्थ ही व्याख्या जे सांगते तो असतो हे अनेकांच्या लक्षातच येत नाही.


हेगेल हा फार ख्रिश्चन धार्मिक मनुष्य होता आणि त्याने संपूर्ण पुरोगामी प्रकल्पाला काही प्रश्न विचारले होते जे कांट मुळे निर्माण झाले होते . माणसाचा आत्मा या जगामध्ये जेव्हा येतो तेव्हा तो परमेश्वराच्या आत्म्यापासून तुटतो त्याच्याशी एकात्म होत नाही आणि म्हणूनच त्याला या जगा विषयी परात्मता वाटत राहते असा हा काहीसा सिद्धांत आहे पण कार्ल मार्क्सला हा शब्द या अध्यात्मिक अर्थाने अभिप्रेत नाही त्याचा आत्मा हा एका अर्थाने माणसाच्या मेंदूमध्ये तयार होणारा मी अशा रूपात येतो तो एक असा सिद्धांत मांडतो की भांडवलशाहीमध्ये उत्पादन करणाऱ्या कामगार वर्गामध्ये हा जो मी आहे तो उत्पादन तयार करताना त्या उत्पादनाशी आणि त्या उत्पादन प्रक्रियेशी एकात्म होत नाही कारण तो संपूर्ण उत्पादन क्रियेचा भाग नसतो तर ॲडम स्मिथ दाखवतो त्याप्रमाणे कळत नकळत तो केवळ उत्पादन नावाच्या क्रियेचा अंश असतो पार्ट असतो त्याला संपूर्ण उत्पादन अनेकदा बघायला सुद्धा मिळत नाही कुठल्यातरी एका उत्पादन प्रक्रियेच्या युनिटचा तो भाग असतो आणि मग साहजिकच त्या संपूर्ण उत्पादनाबद्दल आणि उत्पादनाच्या त्या अवाढव्य भांडवली प्रकल्पा बद्दल त्याला प्रेम वाटत नाही आत्मीयता वाटत नाही आत्मता वाटत नाही आणि म्हणूनच त्याला काम करताना परात्मता येते 


आज तुम्ही कुठल्याही फॅक्टरीमध्ये गेला तर तुम्हाला वेगवेगळे भाग दिसतात डिपार्टमेंट दिसतात आणि ही सर्व डिपार्टमेंट्स डिव्हिजन ऑफ लेबर याच्या आधारे अनेकदा निर्माण झालेली असतात साहजिकच प्रत्येक डिपार्टमेंट मधला श्रमिक हा संपूर्ण प्रक्रियेपासून तुटलेला राहतो पुरोगामी उत्पादन प्रक्रियेचे हे अटळ फलित आहे पुढे मग ते कार्पोरेट सेक्टर मध्ये तर प्रचंड वाढत जाते पुरोगामी मध्ये निदान अंश तरी दिसतो कार्पोरेट आधुनिक उत्पादन प्रक्रियेमध्ये तर तेही दिसत नाही आपण अनेकदा कुठल्या अंशाचे भाग आहोत तेच कळत नाही आणि त्यामुळेच मग माणसाच्या अस्तित्वाचे रूपांतर एखाद्या झुरळात झाल्यासारखे होते आधुनिक माणसाची ही शोकांतिका सर्वात प्रथम काफकाने अतिशय चांगल्या रीतीने समजून घेतली आणि त्यातूनच त्याची मेटामार्फोसीस ही कथा जन्मली त्याने असे दाखवून दिले की माणसाचे रूपांतर या उत्पादन प्रक्रियेमध्ये झुरळात होऊन जाते . आपलं आपलं छोटे छोटे झुरळाच्या जगाप्रमाणे झालेले जग हाताळत बसणे एवढेच त्याच्या हातात उरते. त्यामुळेच जोरात झाल्यानंतर सुद्धा तो माणूस कामावर कसे जाता येईल याचाच विचार करतो कारण भांडवलशाही आणि कार्पोरेटशाही तुम्हाला सतत या दबावात ठेवते की तुम्ही उपस्थित असला पाहिजे उपस्थित असण्याचा हा दबाव प्रचंड असतो तो तुम्हाला अनेकदा झेपत नाही अनेकदा असे वाटते की या व्यवस्थेमध्ये आपण झुरळासारखे कोपच्यात जाऊन कुठेतरी लपून बसावे . आज सुद्धा कामावर जाण्यापूर्वी अनेकदा अशी अस्तित्वस्थिती तुम्हाला प्राप्त होताना दिसत असेल आढळत असेल .


तुम्ही जर बघितले तर प्राचीन काळामध्ये झुरळ ही काही शिवी नव्हती परंतु आधुनिक काळामध्ये मात्र ती तशी बनली आणि म्हणूनच मग काही लोकांनी तरुण लोकांना झुरळ म्हटले . यातूनच मग पुढे कॉक्रोच पार्टी जन्मली . आता रूपकाच्या पातळीवर असे आपण म्हणावे का की कार्पोरेट सेक्टर मधली ही सर्व झुरळे कार्पोरेट वादाच्या विरोधात उभी राहिलेली आहेत . मोदी शहा वगैरे लोकांचा असा काही गैरसमज झालेला आहे का आणि तसा तो गैरसमज झाला असेल तर तो का झाला असेल याचे कारण उघड आहे कारण कार्पोरेट वादाला सर्वात अधिक उत्तेजन हे मोदी शहा यांच्या अर्थव्यवस्थेने दिलेले आहे त्यामुळेच वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये काम करणारी झुरळे एकत्र आली तर काय होऊ शकते याचा त्यांना अंदाज आहे . झुरळे ही अनेकदा वाईट कॉलर असतात आणि या आंदोलनामध्ये अनेक वाईट कॉलर लोकांची मुले रस्त्यावर उतरली आणि हे कळत नकळत आकलनाच्या पलीकडे गेले आणि म्हणूनच या सगळ्या झुरळांच्या बद्दल एक प्रकारे सर्वांनाच आकलनाची परात्मता आली.


त्यामुळेच हे आंदोलनात अनेकदा काय चालले आहे ते कोणालाच कळले नाही . प्रश्न असा आहे की या आकलनाच्या परात्मतेवर करायचे काय ? त्यातूनच मग आरटीफिशल पद्धतीने एकात्म होण्याची धडपड चाललेली दिसते . त्यातूनच मग मोदी instagram वर फ्रेंड्स म्हणतात . त्यातूनच मग निखिल वागळे आपणच जणू काय त्यांच्याशी कनेक्टेड होऊ शकतो असे भासवायला बघतात. हे असे भास होतात त्याचे कारण प्रत्येकाला कळत नकळत या लोकांशी एकात्म व्हायचे आहे. एका अर्थाने ही एकात्म होण्याची जी आसक्ती आहे जिच्यामध्ये अनेकदा सुरक्षितता असते आणि आपण तुटू अशी असुरक्षितता सुद्धा असते तिच्यामुळेच मग आपण तुटलो असलो की मग परात्मता निर्माण होते . अधिकच मग सहाजिकच मग प्रत्येक जण आत्म हत्या प्राप्त करण्याची आत्महत्या प्राप्त करण्याची धडपड करतो आत्मता प्राप्त करण्याची धडपड करतो एकात्म होण्याची धडपड करतो म्हणजे आधी दडपड आणि आता धडपड ! यातूनच मग एकात्म होण्याची एक निरंतर धडपड संपूर्ण फेसबुक वर सर्वांची चाललेली आपणाला दिसते. प्रश्न असा आहे की यामध्ये सर्वाधिक यशस्वी कोण होणार की हे लोक स्वतःलाच अलिप्त ठेवून स्वतःची अलिप्त चळवळ चालवत फक्त स्वतःचे एकात्मता स्वतःच्या पुरती ठेवत आंदोलन करणार आहेत ?


हे लोक आवश्यक असा प्रतिसाद देत आहेत असे वाटत नाही आणि मग आकलनाची परात्मता वाढत जाते आणि तिच्यामुळेच एकात्मता चालवण्याची धडपड ही वाढत जाते . यातून कदाचित अनेकांना ब्रेकप सुद्धा फील होऊ शकतो वाटू शकतो. जितका ब्रेकअप तीव्र तितकी एकात्म होण्याची धडपड पॅचअप करण्याची धडपड तीव्र असा काहीतरी प्रकार सध्या चाललेला दिसतो .


प्रत्यक्षात कोणत्या प्रकारचा प्रश्न या पिढीला पडतो आहे? म्हणजे उदाहरणार्थ जर का आपण असे म्हटले की ही पिढी आंबेडकर वादाच्या प्रभावाखाली म्हणजेच इनडायरेक्टली बुद्धाच्या प्रभावाखाली आहे तर मग ही पिढी अनात्मवादी असणार आणि माझ्या मते खरोखरच ती तशी एका वेगळ्या अर्थाने झालेली आहे . या पिढीला आत्मा बितमा या गोष्टीची काय पडलेली नाही त्यापेक्षा ती प्राणाला महत्त्व देते प्राण्याच्या जिवंत असण्याला प्राणाच्या सळसळसणायला ती महत्व देत आहे.Make life alive हा तिचा अजेंडा आहे आणि मग हे करण्यासाठी जे जे करता येणे शक्य आहे ते ती करत असते यातूनच मग व्हिडिओ सुद्धा बनवले जातात ब्लॉग बनवले जातात. त्यांना लोकप्रियतेचा चस्का आहे. किंबहुना तीच त्यांची मुख्य आसक्ती आहे .


सर्वसाधारणपणे धर्मयुगामध्ये प्रत्येक सरंजामदार हा स्वतःचा सरंजाम निर्माण करत होता आणि त्याला शह देण्यासाठी म्हणून मग पुरोगामी कालखंडामध्ये राजेलोक व्यवस्था निर्माण करायला लागले आणि हळूहळू व्यवस्था सर्वांच्या बोडक्यावर बसली आधुनिक आणि उत्तर आधुनिक काळामध्ये मात्र व्यवस्था गेली आणि तिच्या जागी रचना आणि संरचना आली . कार्पोरेट ही एक संरचना आहे स्ट्रक्चर आहे साहजिकच मग उत्तर आधुनिकतेमध्ये विरचना डी कन्स्ट्रक्शन आली 


प्रश्न असा आहे की मग ही चौथ्या नवतेमधली आत्ताची पिढी काय करत आहे ? माझ्या मते ती स्वतःपुरता एक आकार निर्माण करते एक व्यवहार निर्माण करते याला आमच्या पिढीमध्ये आम्ही तामझाम म्हणायचो हा एक अर्थाने सरंजाम दाराच्या सरंजामाच्या विरोधातला शब्द आहे. तामझाम हा डेमोक्रॅटिक असतो . त्याचा आकार सुद्धा अमिबा सारखा असतो त्याला आपण माणसाच्या भाषेत आम्हीबा म्हणू. हा अमिबा सारखा असतो तो आपला आकार सतत बदलत असतो सतत प्रजनन करत असतो त्यामुळेच तो अनेकदा तुम्हाला कोड्यात पाडतो एका अर्थाने नेटवर्क फंक्शनने धारण केलेला चंचल आकार म्हणजे तामझाम होय . हा असा आम्हीबा आकार धारण करत हे लोक कधी एकटे तर कधी ग्रुपने सरकत राहतात या आंदोलनामध्ये असे अनेक ग्रुप सरकत राहिले अनेक तामझम सरकत राहीले आणि त्यामुळेच ते नेमके काय करतात हे अनेकांच्या लक्षातच आले नाही अगदी पोलीस फोर्ससुद्धा कन्फ्युज झाली . एका अर्थाने व्यवस्था आणि संरचना सिस्टीम आणि स्ट्रक्चर यांच्या पलीकडे गेलेले हे सर्व तामझ्झाम होते आणि म्हणूनच ते झेपले नाहीत . अनेक जण गोंधळात पडले पण त्यांना जर का चौथ्या नवतेची जीवनशैली माहिती असती तर असा गोंधळ उडालाच नसता . मी स्वतः असे अनेक कामजाम आणि तामझ्झाम वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने उभा करत जगलेला माणूस आहे त्यामुळे ते उभे करताना जे करावे लागते त्याची मला कल्पना आहे . ही एक एकाच वेळेला विचारपूर्वक केलेली उस्फुर्त प्रोसेस असते. प्राण तिच्या केंद्रस्थानी असतो आणि त्यामुळेच ती सातत्य मागत नाही फक्त आपले आकार परिस्थितीनुसार बदलत पुढे सरकत जाते जगत राहते मुख्य म्हणजे आनंदात जगत राहते जिवंत सळसळत जगत राहते . माझ्या अडा हॉ का बाणा सुना या कादंबरीमध्ये जो नायक आहे तो असा जगतो आणि म्हणूनच तो मराठी साहित्याला परवडला नाही . मात्र या जनरेशनला तो सहजगत्या पचला. 


प्रश्न असा आहे की हा तामझाम संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य घडवू शकतो का ? जर का त्याला भविष्य घडवायचे असेल तर त्याला तामझाम बरोबरच कामझाम सुद्धा निर्माण करावा लागेल शेवटी फक्त तामझामाने काय होत नाही त्यासाठी प्रत्यक्ष कार्य दिसावे लागते काम दिसावे लागते आणि खरा प्रश्न इथेच आहे की खरोखर कार्य करणार आहे काय आणि ते दिसणार आहे काय कुठलीही गोष्ट नष्ट करायला फार अक्कल लागत नाही पण नवीन गोष्ट निर्माण करायची असेल तर खूप मेहनत करावी लागते . नाहीतर आधीच काम झालेले असते आणि उगाचच त्या कामाची कार्याची आणि योजनांची नावे बदलून त्याचे श्रेय घेण्याची पाळी येते . याला फार काही अर्थ नसतो पण आत्ताच्या पिढीमध्ये ही प्रवृत्ती प्रचंड प्रमाणात आहे . लेवल बदलायचे आणि उत्पादन तेच ठेवायचे . कारण कळत नकळत जाहिरातीचा इतका परिणाम झालेला आहे की यांना वाटते की जाहिरातीमध्ये फक्त ज्याप्रमाणे केवळ लेबल बदलून उत्पादन खपवता येते आणि तेही आपल्या नावाने खपवता येते त्याप्रमाणे सर्वच आयुष्याचे उत्पादन करता येते पण प्रत्यक्षात असे होत नाही आत्ताच्या भाषेत सांगायचे तर तुमचा ताम्जाम उघडा पडतो नागडा होतो दुसऱ्यांचे तामझाम उघडे पाडायला फार अक्कल लागत नाही स्वतःचे तामझाम कामझाम उभे करायला जास्त अक्कल लागते आहे 


एका अर्थाने कॉपी पेस्टिंगचा हा झालेला दुष्परिणाम आहे प्रत्यक्ष राष्ट्र चालवताना हे फार कामाला येत नाही . येणार नाही .केवळ डिजिटल ने जग चालत नाही ते मांसलने चालते आरटीफिशल इंटेलिजन्सचा प्रभाव जरूर घ्यावा परंतु अजून तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मांसल flesh तयार करता आलेले नाही . तुम्ही डिजिटल मुळे जास्तीत जास्त फ्रेश होऊ शकता फ्लेश नाही. अजून तरी त्या अवस्थेला चिन्ह सृष्टी पोहोचलेली नाही . त्यामुळेच कामझाम महत्त्वाचा आहे या संकल्पनेमध्ये काम म्हणजे एकाच वेळेला कार्य आणि सेक्सी किक असे दोन्ही अभिप्रेत आहे . या दोन्ही गोष्टी कामझाममध्ये उपस्थित असतात . यातल्या फक्त एकाच्या उपस्थितीच्या आधारे जर कोणी काम करायला जाईल तर ते होणार नाही कारण दोन्ही गोष्टी या जनरेशनला लागतात आणि या दोन्ही गोष्टी असल्या तर मग परात्मता वगैरे भानगडी निर्माण होत नाहीत . प्राण पणाला लागले तरी चालतील पण आपण ते पूर्ण करायचे हा तामझाम आणि कामझाम यांचा उद्देश असतो . अनेकदा समोर डेड लाईन असते ती पाळायची हा उद्देश असतो . आपण फक्त टीमवर्क चांगले झाले तरच यशस्वी होऊ शकतो याची जाण असते . त्यामुळेच इथे नेटवर्क फक्त नेटवर्क राहत नाही ते टीमवर्क बनते .


हे आंदोलन म्हणजे एक फार मोठा महातामझाम होता त्याने चक्काजाम केला पण खरा प्रश्न आता महाकामझाम कसा उभा करणार यांचा आहे तो तुम्ही कसा कार्यजालीत करणार हा खरा प्रश्न आहे कारण तुमच्या भवताली अनेकदा आऊटडेटेड झालेले ल लागलेले लोक असतात कधी कधी तर अख्या पिढ्या असतात त्यांना बाजूला सारण्याची हिंमत दाखवावी लागते त्यातूनच मग तुमची एरोगंट रागीट कोपिस्ट अशा प्रकारची इमेज तयार होते किंबहुना ती जाणीवपूर्वक केली जाते कारण या म्हाताऱ्या लोकांना तुम्ही काय करता ते कळत नसते अनेकदा तुम्ही अल्पसंख्या असता. अशा वेळेला खूप काळजीपूर्वक टीमला पुढे न्यावे लागते . मग अचानक तुमचे थोडे फार यश बघून अनेक मुंगळे यायला लागतात गुळाची ढेप तयार होत नाही पण मुंगळ्यांच्या संख्यांच्या ढेपा तयार व्हायला लागतात या ढेपा नीट हाताळाव्या लागतात त्या सर्व तुमच्या गोष्टी तुमच्या नावाने कॅश करण्याऐवजी स्वतःच्या नावाने कॅश करायला बघतात . जणू हे सर्व काही आपणच बाहेरून मॅनेज केले असे सांगायला बघतात त्यातूनच मग तुमची सो कॉल्ड परदेशी मुळे शोधली जातात . पण हे सर्व करताना कधीही आपला संयम जाऊ देता कामा नये तो गेला की तुम्ही संपला . तो तसा जावा अशा पद्धतीनेच अनेक लोक फंक्शन करत असतात टोल तर अनेक असतात . पण आपण कधी भैरव आणि कधी निळकंठ व्हायचे ते व्यवस्थित ठरवून व्हायचे असते . अनेकदा तर विरोधी पक्ष जाणीव पूर्वक तुम्ही निळकंठ व्हावा म्हणून नव्या नव्या दंतकथा रचत असतो जेणेकरून तुम्ही फक्त विष पचवत राहा आम्ही अमृत पळवून नेऊ अशी यांची इच्छा आणि पॉलिसी असते अशा वेळेला शंकर असणे म्हणजे फक्त निळकंठ असणे नव्हे असे दणकून सांगावे लागते. फक्त निळकंठ राहिलात तर तुमचा राहुल गांधी होण्याची शक्यता असते . ते परवडत नाही . हे आंदोलन भैरव पण होते म्हणूनच भय निर्माण झाले . एकदा हे भय ओसरले की हळूहळू मग आक्रमण चालू होईल त्या वेळेला काय करायचे तर त्या वेळेला थोडे निळकंठ होऊन नेमके काय होते ते पाहावे लागेल . तांडव झाले प्रलय झाला आता पुन्हा एकदा सृष्टी निर्माण करण्याची वेळ आलेली आहे प्रश्न इतकाच आहे की नवीन पिढीला हे झेपणार आहे का की ही केवळ सुनामी लाट ठरून आणि ठरवून पुन्हा समुद्रात विसर्जित होणार आहे केली जाणार आहे ?

श्रीधर तिळवे नाईक 

जनरेशन जी चे आंदोलन , आत्म्याचा प्रश्न , व्यवस्था गेली संरचना गेली आणि आता पुढे नेटवर्किंग काय? २.श्रीधर तिळवे नाईक 

मागील लेखात आपण पाहिले की तामझाम म्हणजे काय आणि त्याचबरोबर हेही पाहिले की कामझाम म्हणजे काय आणि कामझामाची का आवश्यकता आहे ?

हा प्रश्न अभिजीत पुढेही असणारच कारण आता पुढे काय या प्रश्नाचा विचार तर करावाच लागेल परंतु या संदर्भात काय करायचे याविषयीचे कसलेही भाष्य आत्ता आलेले नाही याचे कारण स्पष्टपणे दिसते की प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे जेव्हा हे आंदोलन सुरू झाले तेव्हा मी एक सूचना केली होती की राहुल गांधींनी आता काही झाले तरी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी राष्ट्रीय चळवळ उभी करावी याचे कारण हेच होते कारण जोपर्यंत राजकीय व्यवस्था पारदर्शक होणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही राजकीय पक्ष स्थापन केले तरी त्याचा फायदा नाही त्यामुळे यापुढची चळवळ उभी करायची असेल तर सर्वात प्रथम बॅलेट पेपरवर निवडणूक या अंगाने आंदोलन करावे लागेल त्याला पर्याय दिसत नाही माझा अंदाज चुकला नाही तर कदाचित नरेंद्र मोदी आणि अमित शहा स्वतःच कदाचित बॅलेट पेपर वरच्या निवडणुकीवर घेतील कारण शेवटी त्यांना सुद्धा स्वतःची पारदर्शकता सिद्ध करायची आहे आपण निवडणूक जिंकल्या त्या लोकांच्या अस्सल खऱ्याखुऱ्या  मतावर हे त्यांना ही बिंबवायचे आहे त्यामुळे शक्यता अशी आहे की अशा प्रकारचे आंदोलन निर्माण झाले तर जो प्रकार शैक्षणिक सुधारणांच्या बाबतीत झाला तो प्रकार होऊ शकतो म्हणजे ज्यासाठी आंदोलन केले गेले होते त्या शिक्षण क्षेत्रातल्या काही सुधारणा सरकारने ताबडतोब केलेल्या दिसतात त्या संदर्भात काही ताबडतोब निर्णय घेतलेले दिसतात आता याकडे विरोधी पक्ष दुर्लक्ष करणार हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे वास्तविक या गोष्टीला एक स्वागत द्यायला हवे होते परंतु सध्या विवेक कोणाकडे उरलेला नाही . हे स्वागत देऊन जर का सुधारणा आवश्यक असतील तर त्या कोणत्या याविषयी चर्चा झाल्या असत्या तर फार बरे झाले असते . 

अभिजीत ने जी स्टेटमेंट दिलेली आहेत त्यावरून तो स्पष्टपणे असेच म्हणत आहे की निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार होतो आहे आता असे होते तर मग राहुल गांधी काय झोपा काढत होते काय?  मुख्य म्हणजे बॅलेट पेपरवरची निवडणूक घ्यायला हवी असा आग्रह ते का धरत नाहीत मुख्य म्हणजे यासाठी आंदोलन करा यावेळी लागणार हे स्पष्टच आहे आणि जर का आंदोलन करायचे असेल तर प्रॉब्लेम नेमका कुठे येतो आहे . की याही बाबत आंदोलनाचे नेतृत्व कोणी करायचे असा प्रश्न आहे .

मला व्यक्तिगत पातळीवर असे वाटते की पारदर्शकता हा मुद्दा असेल तर आपण शांतपणाने हे नेतृत्व अभिजीत कडे देऊन टाकावे नवीन झेड जनरेशन काय करते हे त्यामुळे स्पष्ट होईल शेवटी काय आहे राहुल गांधींच्या नावाला कळत नकळत एक राजकीय वलय आहे आणि तो काळीमा सुद्धा आहे कारण काँग्रेसबाबत सर्वकाही फार छान छान होते यावर आता कोणाचाच विश्वास उरलेला नाही त्या उलट अभिजीत नवा आहे त्यामुळे त्याच्याकडे जर का या संदर्भात नेतृत्व दिले तर मला वाटते की एक पारदर्शकता या सगळ्याला प्राप्त होईल आणि त्याने हे नेतृत्व स्वीकारावे . हा तामझामकामझाम कसा उभा करायचा हे त्यालाच ठरवू द्या कारण हे आंदोलन आता तरुणांचे होत चालले आहे आणि त्यांच्याच पिढीकडे हे सर्व जावे हे उत्तम. सरकारने सुद्धा आवश्यक तेवढीच शिस्तीची भूमिका घ्यावी आंदोलकांनी तामझामकामझाम बेशिस्त होणार नाही याची काळजी घेणे आता आवश्यक आहे तुमच्या पहिल्या प्रयत्नाला सहजरीत्या उत्स्फूर्तपणे  पाठिंबा दिला गेला परंतु प्रत्येक वेळेला उस्फूर्त आणि बेशिस्त तामझाम कामझाम परवडणार नाही. 

त्यामुळे खरोखरच ज्या गोष्टी अभिजीत बोलत आहे त्या गोष्टीच्या संदर्भात जर का त्याला असे वाटत असेल की राजकीय सुधारणा व्हायला हव्यात तर त्याने सर्वात प्रथम करो बॅलेट आंदोलन चालवावे 

श्रीधर तिळवे नाईक 


तामझाम

कामझाम


तामझाम

कामझाम


 तामझाम

कामझाम



तामझाम

कामझाम


तामझाम

कामझाम


 तामझाम

कामझाम


तामझाम

कामझाम


तामझाम

कामझाम


 तामझाम

कामझाम


तामझाम

कामझाम


तामझाम

कामझाम


 तामझाम

कामझाम


तामझाम

कामझाम


तामझाम

कामझाम


 तामझाम

कामझाम



तामझाम

कामझाम


तामझाम

कामझाम


 तामझाम

कामझाम


तामझाम

कामझाम


तामझाम

कामझाम


 तामझाम

कामझाम

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती