प्राणाचे आणि समाजाचे सैतानीकरण श्रीधर तिळवे नाईक
मला असे वाटते की आता आपण डी कन्स्ट्रक्शन वगैरे गोष्टी जास्त विचारात घेण्यापेक्षा ज्या मूलभूत गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे त्याच घ्याव्यात अनैतिक सैतानी गोष्टींचा भडीमार आणि प्रचार हे आजच्या युगाचे वैशिष्ट्य बनून गेलेले दिसते हे वैशिष्ट्य नेमके कोण स्पॉन्सर करते हे सुद्धा एकदा बघणे आवश्यक आहे
जगामध्ये अनेकदा या वाईटपणाचे काय करायचे हा प्रश्न सर्वत्र उपस्थित झालेला असतो मानवाच्या संस्कृती पासूनच हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
सर्वसाधारणपणे दोन पद्धतीने याचा विचार झालेला दिसतो पहिली पद्धत शैव धर्माची शैव श्रुतीची आहे तर दुसरी पद्धत जुडाईक धर्माची आहे शैव श्रुतीमध्ये सर्वसाधारणपणे शक्तीच्या दोन दिशा दिसतात पहिली ही मोक्षाकडे जाते तर दुसरी संसाराकडे जाते परंतु ही दुसरी जेव्हा अधिकाधिक प्रवृत्ती बनते आणि संसाराच्या दिशेने आणि संसाराच्या विस्ताराच्या दिशेने जायला लागते तसे तसे मनुष्य आपले तारतम्य विसरायला लागतो आणि कुठल्याही मार्गाने आपला विस्तार झाला पाहिजे
१ कुठल्याही मार्गाने आपले जैविकीकरण सर्वत्र पसरले पाहिजे आपला वंश विस्तार पसरला पाहिजे आपल्याला जास्तीत जास्त स्त्रिया केव्हा पुरुष उपभोगता आले पाहिजेत आपल्यालाच सर्वाधिक चांगले आरोग्य लाभले पाहिजे आणि त्यासाठी आपल्याकडेच सर्व आरोग्य व्यवस्था असली पाहिजे आपले तिच्यावर नियंत्रण असले पाहिजे
२ कुठल्याही मार्गाने आपल्या विचारांचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे आपल्यालाच लोकांनी विद्वान म्हटले पाहिजे .जास्तीत जास्त लोकांनी आपली मते मान्य केली पाहिजेत .
३ कुठल्याही मार्गाने आपल्या सुखासाठी आपण धडपड केली पाहिजे कुठल्याही मार्गाला मार्गाने आपल्याला सुख प्राप्त झाले पाहिजे आपल्याशी सर्वच लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी नाते निर्माण केले पाहिजे जास्तीत जास्त लोक आपल्या संपर्कात पाहिजेत सर्व लोकांनी आपले ऐकले पाहिजे
४ कुठल्याही मार्गाने आपण आपल्या अस्तित्वाचा विस्तार केला पाहिजे सत्ता प्राप्त केली पाहिजे इतरांच्यावर अधिकार गाजवता आला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला मते दिली पाहिजेत
५ कुठल्याही मार्गाने सृजनशीलतीमध्ये आपण घुसले पाहिजे त्या सृजनशील तेवर पूर्ण नियंत्रण आणले पाहिजे आपल्याला ती खरेदी करता आली पाहिजे वेळप्रसंगी चोरी करून दुसऱ्यांच्या सृजनशीलतेची चोरी करून ती सृजनशीलता आपण आपल्या नावावर करून घेतली पाहिजे आपला तिच्यावर मालकी हक्क प्रस्थापित केला पाहिजे
६ कुठल्याही मार्गाने आपण जास्तीत जास्त आराम मिळवला पाहिजे कमीत कमी श्रम केले पाहिजेत कमीत कमी मेहनत केली पाहिजे जास्तीत जास्त दास निर्माण केले पाहिजेत नोकर निर्माण केले पाहिजेत जे आपल्यासाठी श्रम करतील
७ आपण या जगातली जास्तीत जास्त जागा व्यापली पाहिजे जास्तीत जास्त जागांच्या मध्ये आपली उपस्थिती निर्माण झाली पाहिजे
८आपण या जगामध्ये सर्वाधिक काळ जगलो पाहिजे आपले आयुष्य अधिक अधिक असले पाहिजे आपण शंभर पेक्षा जास्त वर्षे जगलो पाहिजे.
९ आपण जास्तीत जास्त स्वातंत्र्य उपभोगले पाहिजे आणि वेळप्रसंगी इतरांचे स्वातंत्र्य हिसकावून घेतले पाहिजे इतरांच्या स्वातंत्र्यावर आपले नियंत्रण असले पाहिजे
१० आपण जास्तीत जास्त आनंद आल्हाद प्रज्ञा आरोग्य आपल्या बाजूने वळवले पाहिजे त्यासाठी मग इतरांना दुःख झाले तरी चालेल पण आपल्याला सुख मिळाले पाहिजे आपल्या नावाने पंथ चालले पाहिजेत आपल्या नावाने संघटना चालल्या पाहिजेत देवाने निसर्गाने सुद्धा आपले ऐकले पाहिजे देवाने निसर्गाने आपल्या नवसाला पावले पाहिजे
अशा प्रकारच्या १० आसक्ती हळूहळू या शक्तीच्या विस्ताराच्या आकांक्षा पोटी निर्माण व्हायला लागतात आणि तिथूनच मग ज्याला आज आपण सैतानी गोष्टी म्हणतो त्यांचा जन्म होतो
हा सैतान म्हणजे दुसरा तिसरा काही नसून आसक्तीने घडवलेले सीडक्शन होय आसक्तीचा विस्तार मोह होय . तो माणसाला नेहमीच पडत जातो कारण तो आपल्याला प्रचंड सुख देईल असे त्याला वाटत असते यातूनच मग अनेक गोष्टी निर्माण होतात यामध्ये सर्वात जर का मोठी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे मनुष्य केवळ हा सैतानीपणा स्वतःमध्ये ठेवत नाही तो बाकीच्यांना सुद्धा आपल्यासारख्या सैतानी क्रियांनी भारवून टाकण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या कर्माचे समर्थन करता येईल केवळ मी स्वार्थी सैतानी नाही तर संपूर्ण जग स्वार्थी सैतानी आहे या जगातला प्रत्येक मनुष्य स्वार्थी आणि सैतानी आहे हे सिद्ध करणे त्याला अत्यंत आवश्यक वाटत असते कारण एवढे सर्व केल्यानंतर सुद्धा आत मध्ये जो प्राण म्हणजेच सगुण शिव बसलेला असतो तो त्याला सतत पोखरायला लागतो तो त्याला सतत सांगायला लागतो की तू जे काही करतो आहेस ते चुकीचे आहे यातूनच मग अनेकदा गिल्ट निर्माण होतो आणि तो बॅलन्स करण्यासाठी म्हणून माणूस दानधर्म वगैरे करत बसतो . किंबहुना धर्माचा प्रचार होण्याचे सर्वात मोठे कारण माणसाला वाटणारा हा गिल्ट आहे. माणसाच्या आत मध्ये तो प्राणामुळे निर्माण होतो आणि प्राण म्हणजे दुसरा तिसरा काही नसून मोक्षासाठी तळमळणारा सगुण शिव असतो. त्याला स्वतःला निर्गुण व्हायचे असते परंतु तो शक्तिमान झाल्याने त्याला निर्गुण होणे कठीण होते शक्तीला स्वतःचा अनंत विस्तार कायमच प्रेमात पाडत असतो आणि त्यामुळेच शक्ती विस्ताराच्या कामांमध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेत असते संसार करण्यास अत्यंत उत्सुक असते आतुर असते संसार थाटण्यासाठी उत्सुक असते यातूनच मग जीवन सतत निर्माण होत असते संसार सतत निर्माण होत असतो पण माणूस हा असा प्राणी आहे की त्याला प्राण सतत शिवाकडे न्यायला पाहत असतो . सर्व प्राण्यांच्या मध्ये हे असते का हा एक फार मोठा प्रश्न आहे सर्व झाडांच्या मध्ये सुद्धा मोक्षाची तळमळ असते का हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे परंतु माणसाबाबत मात्र निर्विवादपणे सांगता येते की त्याच्यात ही मोक्षाची नैसर्गिक ओढ स्थायी स्वरूपात काम करत असते
त्यामुळेच मग वाईटातला वाईट मनुष्य सुद्धा एकीकडे संसार विस्ताराचा आसक्तीचा मोह आणि दुसरीकडे मोक्षामुळे येणारा गिल्ट यांच्या द्वंद्वात सापडत राहतो हा खरा द्वंद्वात्मक संघर्ष असतो आणि मनुष्य त्यामध्ये जगत असतो त्याचा विचार न करता तुम्ही संसाराची मांडणी कितीही पद्धतीने करा कशाही पद्धतीने करा संसार पुन्हा पुन्हा वाईटपणामध्ये सापडत राहतो .
वस्तुस्थिती अशी आहे की मोक्ष अपरिहार्य आहे आणि तरीसुद्धा मोक्षाकडे कोणीही फारसे वळत नाही . याचे कारण माणसाला आत वळण्याऐवजी बाहेर वळण्यामध्येच जास्त रस असतो आणि हा रस शक्ती पुन्हा पुन्हा निर्माण करत असते तिने थाटलेला संसार पुन्हा पुन्हा करत असतो . पण कधी ना कधीतरी या सगळ्याचा फुगा फुटतो आणि मग अचानक माणसाला अधून मधून का होईना पण वाटायला लागते की यातून सुटावे सुटका व्हावी सुटका करून घ्यावी आणि तिथेच मग मोक्षाची ठिणगी पडते .
आपल्याकडे हा मोक्ष अधिकच गुंतागुंतीचा करण्यामध्ये जैन आणि बौद्ध धर्मांचा प्रचंड वाटा आहे या लोकांनी अत्यंत कठीण अशा साधनांचे आणि दोन नवीन तंत्रांचा शोध लावला ज्यामध्ये ब्रह्मचर्य आणि टोकाची अहिंसा हे फाउंडेशन होते आणि इथूनच सामान्य माणसाला मोक्ष अशक्य वाटायला लागला त्यातच पुन्हा जर का तुम्ही श्रमण संघांचे नियम वाचले तर त्यांची संख्या कधी 200 कधी 300 अशी दिसते आता इतके नियम पाळून जर का मोक्षाची साधना करायची असेल तर मग सर्व काही कठीण होते . वास्तविक द्वादशशीलता पुरेशी आहे आणि तेवढीच पाळली तरी खूप झाली परंतु हे जे काय 300 आणि 500 नियमांचे त्रांगडे असते ते माणसाला मोक्ष हे फार कठीण प्रकरण आहे असे वाटून घ्यायला प्रवृत्त करते आणि मोक्षापासून परावृत्त करायला लागते म्हणजे स्वतःच्या जगण्यासाठी कुठल्याही माणसाची हिंसा करू नये इतका नियम ठीक आहे परंतु मग त्याच्यामध्ये सुद्धा अमुक प्राण्याचे मास खावे अमुक प्राण्याचे मास खाऊ नये बटाटा खाऊ नये कांदा खाऊ नये वगैरे भानगडी सुरू झाल्या की सामान्य माणूस वैतागायला लागतो एका अर्थाने सामान्य माणसाने मोक्षाची साधना करूच नये अशी नंतरच्या जैन आणि बौद्ध लोकांची इच्छा होती काय असा प्रश्न पडावा इतके हे नियमांचे कोलाहल निर्माण झालेले दिसतात . त्यामुळे अलीकडे साधकाला प्रथम या सगळ्या नियमांचाच समाचार घ्यावा लागतो. म्हणजेच एका अर्थाने अतिनियम घातक होत जातात आणि ते माणसाला पुन्हा पुन्हा सैताना मध्ये ढकलायला लागतात आणि मनुष्य सैतानाचे कृत्य करायला लागतो काही काही धर्म तर स्वतः सैतान बनतात . कारण अनेकदा त्यांचे प्रेषित सैतानाने झपाटलेले असतात आणि त्या नादामध्ये ते काहीही बरंळत असतात . या लोकांना कसलाही साक्षात्कार झालेला नसतो पण हे लोक तसा दावा करायला लागतात. प्रत्यक्षामध्ये त्यांना स्वतःचे राज्य स्थापन करायचे असते आणि स्वतःचे राज्य निर्माण व्हावी म्हणून ते स्वतःची राजकीय आयडियालॉजी निर्माण करतात आणि त्यालाच धर्माचे नाव देऊन टाकतात इथे धर्म हा शिवाचा न राहता शक्तीचा न राहता चक्क सैतानाचा बनून जातो . मानवी इतिहासामध्ये वारंवार असे धर्म निर्माण झालेले आहेत त्यांना माणसांची हिंसा करायला माणसांच्या मध्ये युद्ध घडवायला कसलीही लाज वाटलेली नाही सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हे लोक नंतर दुसऱ्यांचे धर्म सुद्धा खराब करायला लागतात
आणि इथूनच नेहमी प्रश्न पडतो की आपण स्वतःला खराब करून का घ्यावे ?
आपण खराब म्हणून जग पण खराब आपण खराब म्हणून प्रत्येक मनुष्य खराब हा जो काही माणसाचा प्रकार चाललेला असतो तो गिल्ट मधून अपराधगंडामधून निर्माण होतो .
प्रश्न असा आहे की या प्रकारावर उपाय काय मग ? सैतान यावर अत्यंत सोपे उपाय मुद्दाम सोपे सुचवायला लागतो हा सैतान अनेकदा माणसांच्या मधल्या आळसाने किंवा आसक्तीने बनलेला असतो कारण समाज तर या गोष्टींच्या वर चालत नाही म्हणजे सरकार काही भ्रष्टाचारावर चालत नसते सरकार नेहमी आपल्या लोकांच्या सु आचारावर चालत असते उद्या जर का सगळंच लोकांनी कायदा मोडायला सुरुवात केली तर काय होईल उदाहरणार्थ प्रत्येक ड्रायव्हरने आपल्या हिशेबानेच बेकायदेशीरपणे गाड्या चालवायला सुरुवात केली ट्रॅफिकचे नियम तोडायला सुरुवात केली तर ट्रॅफिक जाम होईल तेव्हा ट्रॅफिक चालतो कारण जास्तीत जास्त ड्रायव्हर लोकांनी ट्राफिकचा नियम पाळलेला असतो .
समाजाचे सुद्धा असेच असते समाज सुविचारावर चालत असतो प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणीतरी तुकाराम मुंढे छोट्या किंवा मोठ्या प्रमाणात उपस्थित असतो आणि तो आपले कार्य प्रामाणिकपणाने करत असतो म्हणून सरकार चालत असते पण दुर्दैवाची गोष्ट अशी की राजकारणी लोकांना अनेकदा ही गोष्ट लक्षात येत नाही विशेषतः काही राजकारणी फार ह****** असतात आणि ते सैतानाने झपाटले गेलेले पछाडलेले असतात या अशा लोकांची डोकी थोडी लोकांनीच ठिकाणावर आणावी लागतात कारण हे स्वतः तर खराब असतातच परंतु हे इतरांना सुद्धा खराब करायला सुरुवात करतात त्यातूनच मग सत्ता खराब करते आणि संपूर्ण सत्ता संपूर्ण खराब करते अशा प्रकारचे भाषीत जन्माला येते
प्रश्न असा आहे की खराब पणा हा शॉर्टकट का बनत चालला आहे ? हा अलीकडच्या काळा पासूनच आहे की हा पूर्वीपासूनच आहे ? आपण जर का इतिहास काढून बघितला तर असे दिसते की फार प्राचीन काळापासूनच हे सर्व काही असेच सुरू आहे आणि सैतान सतत विजयी होताना दिसतो आणि नंतर अंतिमत: तो पराभूत होतो .
( मी इथे सैतान शब्द वापरल्यामुळे काही जणांना आश्चर्य वाटेल म्हणून काही खुलासा करतो आपल्याकडे याबाबतीतले राजकारण इतके टोकाचे आहे की काही हलकट धर्मांनी सैतानाला राक्षस असे नाव दिले वास्तविक हा राक्षस म्हणजे रक्षक समाज आहे आणि तो शैव समाज आहे पण शैव समाजाची जितकी बदनामी करता येईल तितकी करायची हे सुद्धा एक धोरण असते आणि हे धोरण सैतानी आहे या धोरणाचा अलीकडे जेव्हा प्रतिवाद सुरू झाला तेव्हा मग त्यावर विचार करण्याची वेळ आली. भारतातला ज्याला रक्षक समाज म्हणतात ज्यांचे प्रमुख यक्ष होते त्यांची पूजा नेहमीच रक्षक म्हणून केली गेली होती रक्षक देवता म्हणून केली गेली होती आपल्याकडे प्रामुख्याने दोन प्रकारचे रक्षक होते पहिले यक्ष यक्षिणी आणि दुसरे भैरव भैरवी अगदी गौतम बुद्ध सुद्धा खत्तीय रक्षक वीर समाजात जन्मलेला होते जो यक्षाची पूजा करत असे अलीकडच्या काळामध्ये यक्षाची पूजा करणारे त्याच्या मातेचे भितीचित्र उपलब्ध झालेले दिसते .यावर उपाय म्हणून या संपूर्ण लेखांमध्ये मी सैतान हा शब्द वापरलेला आहे . कारण भारतामध्ये आता तो पूर्णपणे प्रचलित झालेला दिसतो .)
सैतान सैतानाला निर्माण करत असतो सैतान सैतानाचा वंश चालवत असतो आणि अनेकदा मनुष्य त्याचे केवळ माध्यम बनत जातो आणि म्हणूनच सैतानाची निर्मिती करण्याचा कारखाना म्हणून जगाकडे आपल्या समाजाकडे बघता येते . सैतान हे जास्त चांगले रीतीने संघटित होतात कारण आपण अल्पसंख्यांक आहोत याची त्यांना कल्पना असते मात्र ते संघटितच अशा रीतीने होतात की वाटते की सर्वत्र सैतानांचे बहुसंख्यांक राज्य उभे आहे चांगुलपणा हा नेहमीच एकट्याने उभा राहण्याचा प्रयत्न करतो शिवाय प्रत्येक चांगुलपणा हा युनिक चांगुलपणा असतो त्यामुळे मतभेद खूप होतात प्रत्यक्षात हे सर्व अभिव्यक्तीतले मतभेद आहेत परंतु चांगले लोक हे लक्षात घेत नाहीत आणि म्हणूनच ते अनेकदा भांडत बसतात जगामध्ये त्यामुळेच प्रत्यक्ष बहुतांशी माणसे सैतानाला जितके अंतरावर ठेवता येईल तितके ठेवत असतात कारण दैनंदिन व्यवहार सैतानाच्या साह्याने चालूच शकत नाहीत ते कायमच प्राणाच्या सहाय्याने चालवावे लागतात म्हणजे उदाहरणार्थ सत्या विषयी खरे बोलणे आणि व्यवहारिक खरे बोलणे ही प्राणल गोष्ट आहे आणि खोटे बोलणे ही सैतानी गोष्ट आहे आता तुमच्या घराचा विचार करा आणि सगळेजण एकमेकांशी 24 तास खोटे बोलून बघा काय होते तुमचे घर दोन दिवस सुद्धा चालू शकणार नाही . स्वतःला शैतान समजणारे लोक सुद्धा अनेकदा खरे बोलत असतात कारण त्यांचाही व्यवहार खरे बोलण्यावर अवलंबून असतो . म्हणजे एखाद्या स्मगलर ने मी तुला युरेनियम आणून देतो असे म्हटले तर तो त्या जागी कांदे पाठवू शकत नाही तिथे त्याला खरेपणा पाळावा लागतो तरच तो व्यवहार विश्वासार्ह बनतो म्हणजे सैतानाची विश्वासार्हता सुद्धा खरे बोलण्यातूनच निर्माण होते म्हणजे विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी सैतानाला सुद्धा खरे बोलावे लागते . सदा सर्वकाळ खोटे बोलणे त्यालाही शक्य होत नाही . मग तरीही सैतानाचा प्रचार झाला आणि सैतान विजयी झाला असे का वाटते तर याचे सर्वात मोठे कारण जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा राजकारणामध्ये आपण अकारण सैतान असलेल्या माणसाला निवडून देतो . प्रशासनामध्ये भ्रष्टाचारी माणसाला मान द्यायला लागतो जोपर्यंत राजकारणामध्ये आपण सैतानी लोकांना निवडून देतो आहोत तोपर्यंत सैतान राज्य करत राहणे अटळ आहे सुधारणा करायची असेल तर सरकारमध्ये , शासन संस्थेमध्ये आणि प्रशासन संस्थेमध्ये सैतान निवडून येणार नाहीत किंवा त्यांची नेमणूक होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. दुर्दैवाने आता तेच होत नाही उलट जेवढा corrupt माणूस तितका तो बरा अशी माणसाची धारणा असते कारण माणसा मधला सर्वात मोठा सैतान म्हणजे त्याचा आळस असतो त्यामुळेच सरळ मार्गाने ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून मागणी करणे ती लावून धरणे यापेक्षा चिरीमिरी देऊन आपला फॉर्म आपली एप्लीकेशन ताबडतोब मिळवणे माणसाला जास्त सोयीचे वाटते कारण मेहनत करायची नसते . विशेषत: कंटाळवाण्या मेहनतीला श्रमांना मनुष्य लगेच कंटाळतो प्रत्यक्षात समोरच्या नागरिकांना कंटाळायला लावणे हेच भ्रष्टाचारी माणसाचे सैतानी लक्षण असते . त्याला पैसे हवे असतात म्हणून तो बरोबर फायली पेंडिंग ठेवायला लागतो आणि फायली पेंडिंग ठेवणे हे सैतानाचे काम आहे . त्या उलट अनेकदा सामान्य माणसांनाच ज्या आवश्यक गोष्टी करायच्या असतात त्या करायच्या नसतात आणि त्यातूनच मग सैतान प्रवेश करतो आळस आणि मोह ही सैतानाची प्रवेशद्वारे आहेत. चांगल्या मार्गाने जगायचे तर कष्ट करावे लागतात आणि आपण सर्वांनी ही कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच मग सैतानाला प्रतिबंध करता येईल . जर का एखादा सैतान सैतानी मागणी करत तुमची कागदपत्रे अडवत ठेवत असेल तर त्याला कसा धडा शिकवायचा हे आपल्याला महात्मा गांधींनी व्यवस्थित शिकवलेले आहे अशा लोकांच्या समोर सत्याग्रह करावा तोच उपाय आहे . कुठलेही प्रशासन लोकांच्या लोकसंख्येपेक्षा मोठे असत नाही एवढे आपण लक्षात ठेवावे. चांगले लोक संघटित होत नाही म्हणून सैतानी संघटनांचे फावते. खरंतर प्रत्येक सरकारी अप्लिकेशनच्या संदर्भामध्ये एक एक नागरिक संघटना निर्माण झाली म्हणजे उदाहरणार्थ सातबारा संघटना तर बरेचसे काम होऊ शकते पण आपल्याला संघटितच व्हायचे नाही . ईश्वराचे संघटन करावे लागते ते झाले तर सैतान पराभूत होतो . मात्र हे संघटन करताना त्यामध्ये ईश्वर शाबूत ठेवावा लागतो आणि सैतानाला सेंटीमीटर मध्ये सुद्धा जागा मिळणार नाही याची काळजी घ्यावी लागते .
सैतान आपल्यामध्ये प्रचार करणार नाही प्रसार पावणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी लागते . विस्ताराची आसक्ती ही अत्यंत नैसर्गिक आहे त्यामुळे ती नीट पहावी लागते मात्र ही आसक्ती आवश्यक गोष्टींच्या पुरती लिमिटेड करावी लागते.याला मी लिमिटेड आसक्ती म्हणतो . ही जर का आपल्याला साधली नाही तर कधी ना कधीतरी आपलेसुद्धा डीसऑनस्टीफिकेशन सुरू होते . आणि मग सैतानाची एन्ट्री होते . अलीकडे तर काही पालक स्वतःच आपल्या मुलांच्या आयुष्यात सैतानाला स्वतःच एन्ट्री करू देतात किंवा स्वतः सैतान म्हणून एन्ट्री करतात. म्हणजे मुलांना खोटे बोलायला आपण लहानपणापासूनच शिकवतो आणि मग मोठी झाल्यावर ही मुले जेव्हा तुमच्याशीच खोटे बोलायला लागतात तेव्हा मग तुम्हाला त्या खोटेपणाचा त्रास व्हायला लागतो पण मुळात मुलाला खोटे बोलायला शिकवायला कोणी सांगितले होते ? तुम्ही स्वतःच अनेकदा संस्कार करताना मुलांच्या आयुष्यामध्ये सैतानाच्या सर्व डायमेन्शन घुसवता त्यांना नंगानाच करू देता आणि मग नंतर त्या गोष्टी तुमच्या आयुष्यावर तुमच्या म्हातारपणावर आदळायला लागल्या की मग पश्चाताप सुरु करता . तेव्हा स्वतः सैतानांच्या त्या डायमेन्शन घेऊन स्वतःच्या मुलांच्या आयुष्यात प्रवेश करता आणि नंतर जे उगवले त्याबद्दल पश्चाताप करत बसता. असे पश्चाताप कामाचे नसतात कारण संस्कार हे इतके खोल होत जातात की सैतान हलता हलत नाही आणि मग तो मोठेपणी बरोबर तुमच्यावर सूड उगवतो . एका अर्थाने हेच तुमचे कर्मफळ असते . तुम्ही मुलांना धूर्तपणा शिकवता आणि मुले मग नंतर तुमच्याच बाबतीत धूर्त बनतात तुम्ही मुलांना पैसे मिळवायला शिकवता आणि मग मुले पैशासाठी घर सोडून जातात आणि नंतर पैसे आणि पालक यांच्यात निवड करायची वेळ येते तेव्हा पैसे निवडतात
तेव्हा प्रथम कोण बीज टाकते याचा पालक म्हणून विचार करा .मुळात सर्व गोष्टी कुठून सुरू झाल्या आहे हे नीट पहा . त्याचबरोबर संपूर्ण जग कसे तुमच्या मुलांना सैतान बनवायला उत्सुक आहे त्याची कल्पना द्या. चांगल्यावर विश्वास ठेवा चांगल्यामुळे सर्व गोष्टी वाईट बनतात हे जे समीकरण झालेले आहे त्याला कारण आपण संपूर्ण सामाजिक आणि राजकीय व्यवस्था सैतानाच्या ताब्यात दिलेली आहे त्यामुळे सैतान विजयी होताना वाटतो पण प्रत्यक्षात असे घडत नाही याचे कारण कधी ना कधीतरी या सैतानाची वाट लागणे अटळ असते . अनेकदा आपली आसक्तीच लिमिटेड राहत नाही त्यातून मग गोंधळ निर्माण व्हायला लागतात . तथाकथित अनैतिक आणि श्रीमंत आयुष्य जगायची स्वप्न पाहण्यापेक्षा नीट आयुष्य जगण्याचे स्वप्न पहा ते जास्त गरजेचे आहे. अनेक श्रीमंत लोक नीट जगण्यातून श्रीमंत झालेले आहेत पण लोकांना त्यांच्याविषयी अफवा पसरवण्यातच मजा येते याचे कारण जे वाईट मार्गाने स्वतःला सैतान बनवून श्रीमंत झालेले असतात ते लोक या लोकांना आणि त्यांच्या श्रीमंतीला बदनाम करत असतात . श्रीमंती वाईट नाही पण चांगल्या मार्गाने सुद्धा श्रीमंत होता येते . मुळात अवस्था अशी आहे की आपण सैतानांच्या इतक्या प्रभावात आलेलो आहोत आणि मीडिया स्वतः सैतान बनलेला आहे की आपल्याला असे वाटायला लागते की जगातला प्रत्येक श्रीमंत हा फक्त सैतानाची कामे करूनच श्रीमंत झालेला आहे प्रत्यक्षामध्ये त्याच्या श्रीमंतीमध्ये ईश्वराचा जास्त वाटा आहे. तो जर का सतत खोटे बोलला असता किंवा त्याने सतत हत्या केली असती तर त्याला कधी श्रीमंत होता आले नसते याची खात्री बाळगा . त्याची जी टीम बनलेली आहे ती अनेकदा त्याच्या सत्कृत्यामुळे बनलेली असते . आणि चांगल्या कृत्यांचे अतिशय उत्तम संघटन हा कुठल्याही श्रीमंतीचा पाया असतो . या लोकांना भ्रष्टाचार करायला प्रवृत्त करणारी व्यवस्था ही अनेकदा राजकीय व्यवस्था असते . राजकारणातल्या आणि प्रशासनातल्या लोकांना कमिशन लागते आणि सारा गोंधळ तिथूनच सुरू होतो . कमीत कमी कष्टाने जास्तीत जास्त पैसे मिळवण्याचा भ्रष्टाचार हा सर्वात सोपा मार्ग असतो शॉर्टकट असतो आणि म्हणूनच त्याचा मोह पडत असतो . त्यापेक्षा या लोकांना मेहनत करायला लावणे अत्यंत आवश्यक आहे . ते कसे करता येईल त्याचा विचार करणे आता आवश्यक बनलेले आहे.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment