भारताचा वैचारिक इतिहास आणि गांधीतंत्र १ श्रीधर तिळवे नाईक 


भारत हा एक असा देश आहे जिथे संस्कृती कधी तुटलेली नाही तिचे सातत्य तुटलेले नाही त्यामुळेच भारताचा विचार करताना सांस्कृतिक सातत्याचा विचार सातत्याने होतो आणि अनेकदा विचार परंपरेच्या नावाने मागे न्यायला जातो त्यामुळेच गांधींच्या सारखा स्वतःला पारंपारिक समजणारा विचारवंत जेव्हा भारतीय पटलावर आवरतो तेव्हा आपणाला भारतीय म्हणजे काय परंपरा म्हणजे काय आणि भारतीय परंपरा म्हणजे काय असे प्रश्न निर्माण करावे लागतात 


भारताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जर काही असेल तर ते म्हणजे इथली जीवन प्रणाली ही पूर्णपणे मोक्ष केंद्रित आहे आणि मोक्ष ही अनुभव प्रणालीच्या केंद्रस्थानी असलेली गोष्ट आहे जगाच्या इतिहासामध्ये मोक्ष केंद्रस्थानी असलेला हा एकमेव देश आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि ते लक्षात घेतले तरच गांधीजी आपणाला अधिक चांगले कळतात नाहीतर गांधीजी कळत नाहीत.


मानवी जीवन शरीर प्रणालींच्याकडून अनुभव प्रणालींच्याकडे हळूहळू वळत गेले तसे तसे मनुष्य स्वतःच्या पाशवीपणापासून मुक्त होत अधिकाधिक मानवी होत गेला भारतामध्ये या दिशेने सर्वाधिक प्रगती मोक्षाच्या क्षेत्रात झाली कारण मोक्षाचा आरंभ भगवान शंकर यांच्यामुळे भारतात झाला त्याउलट युरोपमध्ये मात्र गरीब संस्कृतीमध्ये मोक्षएवजी मोक्षा ऐवजी तर्ककेन्द्री तत्त्वज्ञानाचा उदय झाला आणि त्यांची दिशा ही तत्त्वज्ञानाची दिशा विज्ञानाची दिशा बनली त्यामुळेच घरीच लोकांच्या अनुभव प्रणालीच्या केंद्रस्थानी आपणाला अनेकदा केंद्रस्थानी आपणाला अनेकदा तत्त्वज्ञान दिसते अगदी तिथल्या नाटकांचा सुद्धा आपण अभ्यास केला तर आपणाला तिथे स्पष्टपणे केऑस आणि डिसऑर्डर यांच्या मधला संघर्ष दिसतो भारतामध्ये मात्र भारतीय नाटकांच्या मध्ये हा संघर्ष मोक्ष विरुद्ध धर्म असा झालेला दिसतो. किंवा मग काम विरुद्ध धर्म अर्थ विरुद्ध धर्म काम विरुद्ध अर्थ असा झालेला दिसतो अपवादात्मक वेळेला काम विरुद्ध मोक्ष असाही झालेला दिसतो त्यामुळेच भारत जेव्हा अनुभव प्रणालीच्या युगामध्ये होता तेव्हा आपणाला हे स्पष्टपणे स्वीकारावे लागते की भारत हा पूर्णपणे इतर जगापेक्षा वेगळा होता. 


विज्ञानाच्या कालखंडामध्ये मनुष्य अनुभवांकडून ज्ञानाकडे विज्ञानाकडे सरकत गेला आणि साहजिकच अनुभव प्रणाली ऐवजी विचार प्रणाली किंवा विज्ञान प्रणाली उदयाला आली आणि गांधीजींचा जो सगळा व्यवहार आहे तो आपणाला या विज्ञान प्रणालीच्या युगामध्ये वावरताना दिसतो .


भारतामध्ये आपणाला जर का विज्ञान प्रणाली आणि तंत्र प्रणाली यांचा विचार करायचा असेल तर आपणाला आपली भारतीय धारा तपासावी लागते कारण याबाबतीत आपण टिपिकल शैव आहोत भारतामध्ये विज्ञान प्रणाली अवतरण्याच्या आधीच विद्या प्रणाली अस्तित्वात होत्या हे आपण लक्षात घेतले पाहिजे . दर्शन हा या विज्ञान प्रणालींचा कणा असला तरी तो प्रामुख्याने मोक्ष केंद्री होता हे आपण लक्षात घेतला पाहिजे त्या उलट दर्शनाबरोबरच आपल्याकडे अर्थशास्त्र आणि कामशास्त्र हे सुद्धा शैव लोकांनी विकसित केलेले होते आणि युरोशियन धर्मांच्या आवर त्यांचा प्रभाव पडलेला होता म्हणजेच एका अर्थाने विद्या प्रणाली ही अधिक व्यापक गोष्ट आहे कारण तिच्यामध्ये फक्त दर्शन येत नाही तर तिच्यामध्ये अर्थशास्त्र आणि कामशास्त्र सुद्धा येते या अर्थाने विद्या या नेहमीच अधिक व्यापक होत होत्या हे आपण लक्षात घेतले पाहिजे याशिवाय वार्ता होती ती वेगळीच गोष्ट आहे . तिचाही समावेश विद्येमध्ये होतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे .


सर्वसाधारणपणे भारतामध्ये विद्या ह्या नेहमीच सहा मार्गाने पुढे सरकतात 


१ मोक्षिय विद्या प्रणाली : यामध्ये संपूर्ण समाज हा दुय्यम मानला जात होता आणि व्यक्ती ही पूर्णपणे केंद्रस्थानी होती . या विद्या प्रणाली मध्ये जे काही असते ते आत्मरत आत्मगत आत्मस्थित असते आणि आत्मरतीचा , आत्म गतीचा आणि आत्मवृत्तिचा अविष्कार म्हणजे सामाजिक कृती बनत जाते. सर्वसाधारणपणे संपूर्ण समाजाचा त्याग करत जे मोक्षाची साधना करतात असे लोक अनेकदा या अंगाने मांडणी करत असतात भारतात अलीकडच्या काळामध्ये अशी मांडणी आपणाला जे कृष्णमूर्ती यांनी केलेली दिसते . आणि त्यांनी एक नवीन तंत्र प्रणाली आपल्यासाठी सादर केली जी ज्ञानतंत्रकेंद्री होती असे आता स्पष्ट होते आहे .


२ सुत्तीय विद्या प्रणाली : यामध्ये परंपरेने चालत आलेल्या सूत्रांनाच प्रमाण मानून त्यांच्याप्रमाणे संपूर्ण जीवनशैली घडवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि आजही जातो अलीकडचा इस्लाम हा त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे इथे दैवी मानले गेलेल्या पारंपारिक ग्रंथाप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न होतो. ब्राह्मण समाजात वावरणारे लोक असे आहेत का किंवा ब्राह्मणधर्म असा आहे का हा एक फार मोठा प्रश्न नेहमीच निर्माण होतो पण कर्मठ ब्राह्मण्यवाद मांडणारे जे लोक आहेत ते यामध्ये नक्की येतात याबाबतीत त्यांचे इस्लामशी असलेले साम्य लक्षणीय आहे . एका अर्थाने श्रुती स्मृती पुराणोक्त अशा प्रकारची मांडणी या लोकांच्याकडून नेहमी केली जाते . हे प्रामुख्याने पुरोहित वर्गाकडून आणि मानसिक ते कडून येत असते . सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपणाला असे दिसते की गांधीजी या लोकांशी जुळवून घेत होते परंपरेचा आधार ते नवीन विचार मांडण्यासाठी कसा करता येईल ते पाहत होते म्हणजे अस्पृश्यतेच्या संदर्भामध्ये ते लक्ष्मण शास्त्री जोशी यांना पुढे करत परंपरेचा आधार कसा अस्पृश्यतेला नाही हे पटवून देत होते . आपल्याकडे हा प्रकार अनेकदा झालेला दिसतो पण प्रॉब्लेम असा येतो की आपल्या परंपरेत अस्पृश्यतेला आधार नाही हे म्हणताना नेहमी तुम्ही कोणती परंपरा घेता कारण आपण जर का ब्राह्मण परंपरा स्वीकारली तर ब्राह्मण परंपरेमध्ये सतीला आधार म्हणता येईल असे काही दिसत नाही परंतु वैष्णो परंपरेमध्ये मात्र आपणाला स्पष्ट आणि स्वच्छ पणाने सती जाण्याचे पुरावे मिळतात विशेषतः महाभारतामध्ये ते अनेक ठिकाणी आहेत किंबहुना महाभारतामध्ये सती प्रथा अस्तित्वात आली आता इथे परंपरा कुठली स्वीकारायची मुळात गांधी स्वतः वैष्णो परंपरा स्वीकारणारे होते तर या महाभारत या ग्रंथातील परंपरा सतीच्या संदर्भामध्ये अत्यंत स्पष्ट आहे आणि ती सतीच्या बाजूने अशा वेळेला तुम्ही काय करणार त्यामुळे परंपरेच्या अंगाने नव्हतेचा साक्षात्कार घडवणे शक्य नसते परंतु गांधीजींनी हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये खूप वेळा केलेली दिसते मग त्यांच्या नंतर लक्षात असे आले की या परंपरेच्या आधार घेण्याच्या पद्धतीने काम करता येत नाही त्यामुळे मग त्यांनी नंतर नंतर अधिकच परखडपणाने भूमिका घ्यायला सुरुवात केली .


मुळातच पुरोहित ही मानसिकता असे आहे की जी अशी आहे की जी नेहमीच परंपरेचा गवगवा करत बसते पण आश्चर्याची गोष्ट असे असते की भारतातली ब्राह्मण ही परंपरा अनेकदा नव्या गोष्टी व्यवस्थित पारंपारिक फोर मध्ये निर्माण करत फॉर्ममध्ये निर्माण करत त्या कशा प्राचीन आहेत हे सिद्ध करत असते म्हणजे इथे परंपरा कमी आणि संधी साधूपणा जास्त असतो देवांना आपल्या तालावर नाचवण्याची जेवढी हौस भारतीय पुरोहितांना आहे तेवढी ती कदाचित कुठल्याच जगातल्या पुरोहितांना नाही आजही या विद्या प्रणालीचा प्रभाव ओसरलेला नाही उलट ते आता पुन्हा एकदा पुनर्जीवीत होतो का असा प्रश्न निर्माण झालेला आहे


३ वित्तीय विद्या प्रणाली : ही विद्या प्रणाली प्रामुख्याने वाणीपणी किंवा वैश्य किंवा जैन अशा पार्श्वभूमीतून उदयाला आलेल्या लोकांच्याकडून येत असते आणि गांधींच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे त्यांची ही वित्तीय विद्या प्रणालीची पार्श्वभूमी ! या पार्श्वभूमीतून यापूर्वी सुद्धा भगवान महावीर यांच्यासारखे अत्यंत मोठे विचारवंत निर्माण झालेले होते परंतु हे लोक शेवटी मोक्षिय विद्या प्रणालीकडे वळलेले दिसतात त्यांनी त्यांचे दर्शन स्वतंत्रपणे मांडलेले दिसते गांधीजींना असे स्वातंत्र्य मिळवता आले का या प्रश्नाचे उत्तर आपण शोधायला गेलो तर आपणाला स्पष्ट दिसते की गांधीजींना मोक्ष न मिळाल्याने ते शेवटपर्यंत वित्तीय विद्या प्रणाली मध्येच घुटमळत राहतात . म्हणजे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गांधीजी संत नव्हते तेव्हा त्यांना हेच म्हणायचे असते की गांधींना मोक्ष मिळवता आलेला नाही . त्यामुळे त्यांना संत म्हणता येणार नाही पण गांधीजींनी संत बनण्याचा प्रयत्न केला नाही का तशी साधना केली नाही का तर या प्रश्नाचे उत्तर हो त्यांचे संपूर्ण आयुष्य हे मोक्षाची साधनाच होते असे दिसते . मात्र त्यांचा मार्ग हा भक्तीचा होता काय याबद्दल मला प्रचंड शंका आहे माझ्या मते त्यांचा मार्ग हा कर्माशी अधिक निगडित आहे. म्हणजे एका अर्थाने ते संत बनायला चाललेलेच नव्हते ते कर्मयोगी बनायला चालले होते हे आपण लक्षात घेतली पाहिजे बाबासाहेब जेव्हा म्हणतात की ते संत नव्हते तर ते अर्धे सत्य आहे कारण मुळात संत बनण्याचा त्यांचा प्रयत्नच नव्हता अन्यथा त्यांनी सुद्धा अनेक अभंग भजने वगैरे लिहिली असती पण तो त्यांचा पिंड नव्हता त्यापेक्षा कर्माच्या साह्याने पुढे सरकायचे असेच काहीतरी त्यांचे झालेले आहे आणि म्हणूनच ते सार्वजनिक जीवनात संतांच्या पेक्षा अधिक महत्त्व कमवून बसले . कारण सामाजिक जीवनात कर्मयोगी अधिक महत्त्वाचे असतात ते कर्मसिद्ध असतीलच असे नाही गांधीजी कर्मसिद्ध नव्हते मात्र कर्मयोगी होते . त्यामुळेच ते भारतीय स्वातंत्र्याची चळवळ उभी करण्यामध्ये मग्न झाले. त्यांचा कर्मयोग हा त्यांनी विकसित केला . मुख्य म्हणजे तो प्रत्यक्ष अस्तित्वात असलेला होता कुठल्यातरी ग्रंथामधला किंवा महाकाव्यातला काल्पनिक कर्मयोग नव्हता . म्हणूनच त्यांना आपण महात्मा म्हणतो . महात्मा म्हणजे दुसरे तिसरे काही नसते तर महान कर्मयोगी असणे असते . खुद्द महात्मा फुले यांची दिशा सुद्धा अशीच कर्माची दिशा होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे . त्यामुळे गांधीजींच्या आधी कोण या प्रश्नाचे खरे उत्तर महात्मा फुले हेच आहे आणि महात्मा फुले यांच्या आधी शिवाजी महाराज असे होते असे दिसते . आपण शिवाजी महाराजांना श्रीमंतयोगी म्हणतो त्यापेक्षा श्रीमंत कर्मयोगी म्हणणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मग चित्र अधिक स्पष्ट दिसायला लागते .


वित्तीय विचार प्रणालीचे रूपांतर व्यवहार प्रणाली मध्ये करणे हे सर्वाधिक सोपे असते आणि महत्त्वाचे सुद्धा असते कारण अनेकदा हे लोक व्यवहारांमध्ये वावरत असतात . त्यामुळेच त्यांचे प्रत्यक्ष सामाजिक व्यवहारावर अत्यंत बारकाईने लक्ष असते. गांधीजींच्या बाबतीत आपणाला हे वारंवार घडताना दिसते . गांधीजींची तपशीलबाज नजर ही फार फेमस आहे पण गांधी हे कर्मयोगी होते हे एकदा लक्षात आले की असे का होते हे सहज लक्षात येईल ज्या ज्या माणसाला कृती करायची असते त्याला तपशील नीट पाहावे लागतात त्याला अमूर्त गोष्टी चालत नाहीत . अनेकदा कर्म करणारा मनुष्य हा आपला आतील आवाज ऐकतच कर्म करत असतो . गांधीजी ही याला अपवाद नव्हते .


४ नित्तीय विद्या प्रणाली : या विद्याप्रणालीमध्ये नैतिक विचार आणि व्यवहार अतिशय महत्त्वाचा असतो आणि समाजाचा चालत असलेला नैतिक विचार आणि व्यवहार हा नीट चालावा नीतिमत्तेप्रमाणे चालावा असा आग्रह असतो हे लोक स्वतः सत्ता कारणी असले तरी कधीही सत्तेचा गैरवापर करत नाहीत ते कायमच नीतीला धरून सत्तेचे राजकारण खेळत असतात अलीकडे या काळातले सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत. या लोकांना सत्ता हवी असते परंतु त्यांच्या दृष्टीने सत्ता हे नैतिक परिवर्तनाचे साधन असते . गांधीजींच्यावर याही विद्या प्रणालीचे संस्कार आहेत किंबहुना वित्तीय आणि नित्तीय अशा दोन्ही विद्या प्रणालीचे मिलन घडवण्याच्या प्रयत्नात गांधीजी आपणाला दिसतात . अशा प्रकारच्या समन्वयाला बाबासाहेब आंबेडकर यांचा नकार आहे त्याऐवजी त्यांचे लक्ष हे श्रमिकांच्याकडे जास्त आहे . आज सुद्धा श्रमिकांना वित्तीय विचार प्रणाली पासून वेगळे काढण्याचे प्रयत्न सुरू असतात मला स्वतःला त्याविषयी प्रचंड शंका आहे . माझ्या मते श्रमिक हे वित्तीय आणि खत्तीय अशा दोन्ही विचार प्रणालींनी संयुक्त असतात . प्राचीन काळामध्ये मात्र वित्तीय विद्या प्रणाली मध्येच वैष्णव लोकांनी वैश्य आणि शूद्र यांचा समावेश केलेला होता आणि त्यामुळे हे लोक एकत्रच काम करत होते भारतात जो मार्क्सवादाचा पराभव झाला त्याचे सर्वात मोठे कारण शैव आणि वैष्णव धर्मामध्ये असलेली या दोघांची युती होय . त्यामुळे वर्ग संघर्ष निर्माण होण्याऐवजी वर्ग समन्वय निर्माण करण्याची आस कायमच राहिली आणि गांधीजी कायमच प्रतिनिधित्व करत राहिले .


५ सत्तीय विद्या प्रणाली : या लोकांना सत्याशी काहीही देणे घेणे नसते नीतिमत्तेशी काहीही देणे घेणे नसते आणि कधी कधी तर वित्तीयतेशी सुद्धा काहीही यांना देणे घेणे नसते . हे लोक फक्त सत्ताकारण करत असतात आणि सत्तेसाठी नीतिमत्ता सोयीची असेल तर मग हे नीतिमत्तेचे प्रश्न उभे करतात उपस्थित करतात जर एखादी नीतिमत्ता सत्ता मिळवण्यामध्ये अवघड अडचण असेल तर ती नीतिमत्ता फेकायची यांची तयारी असते हे लोक कुठल्याही पक्षांमध्ये असू शकतात आणि सतत सत्ता मिळवणे आणि सत्ता टिकवणे एवढाच यांचा खेळ चाललेला असतो आपल्याकडे या विद्या प्रणालीची मांडणी कौटिल्याने त्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये अतिशय व्यवस्थितपणे केलेली दिसते अनेकदा ब्राह्मण समाज आणि क्षत्रिय समाज हा या विद्या प्रणालीच्या अंगाने काम करत असतो अलीकडे आंबेडकरवादी दलित सुद्धा या दिशेने जाणार हे आता स्पष्ट होत आहे . त्यामुळेच रामदास आठवले अनेक पक्षांच्या बाजूने उतरत अनेक पक्षांशी युती करताना सहज रित्या दिसतात . यांना सत्तासाधू म्हणायला हरकत नाही कारण हे सतत सत्ता साधत असतात . भारतातला जवळजवळ 90% क्षत्रिय वर्ग हा या विद्या प्रणालीचा कट्टर पुरस्कार करणारा आहे. त्याच्या दृष्टीने इतर सर्व विद्या प्रणाली या सत्तेच्या प्राप्तीच्या आणि सत्ता टिकवण्याच्या प्रयत्नाच्या क्रियाशीलता आहेत ऍक्टिव्हिटीज आहेत . या लोकांच्या वर त्यामुळे सततच नैतिकतेचा अंकुश ठेवावा लागतो कारण या लोकांना कसलीही नैतिक चाड असत नाही मग हे तोंडाने काहीही बोलोत. या विद्या प्रणालीच्या लोकांना आपण जितक्या लवकर सामाजिक आणि राजकीय जीवनात नारळ देऊ रिटायर करू तितके समाजाचे जास्त भले आहे मग ते कुठल्याही पक्षात असोत. या लोकांची पार्श्वभूमी ही सर्वसाधारणपणे सर्वाधिक क्षत्रिय नावाच्या वर्णांमध्ये दिसते. किंवा मग राजकारणी नावाच्या वर्गामध्ये दिसते . अनेकांचा जन्म क्षत्रिय वर्णांमध्ये किंवा राजकारणी वर्गामध्ये झालेला दिसतो . हे पारंपारिक पातळीवरच अशा प्रकारचे सत्ता खेळ खेळण्यांमध्ये सशक्त असतात . अनेकदा सर्वसामान्य माणसे विशेषता गुलाम प्रवृत्तीची सामान्य माणसे यांच्यामागे सहज लागत असतात . कारण या लोकांना सुद्धा सत्तेत सहभाग हवा असतो .


६ खत्तीय विद्या प्रणाली : ही विद्या प्रणाली प्रामुख्याने शेतकरी आणि उत्पादक कामे करणारे आणि अलीकडे ज्यांचा समावेश प्रामुख्याने ओबीसी आणि बी सी वर्गामध्ये करण्यात आलेला आहे यांच्या मधून आलेल्या लोकांच्या ठाई दिसते यामध्ये सर्वात उत्तम नाव हे महात्मा फुले यांचे आहे . वास्तविक या विद्याप्रणालीला सर्वाधिक पाठिंबा मिळायला पाहिजे होता कारण या प्रणाली मधूनच शैव धर्म उदयाला आला होता परंतु जे या वर्गाचे कैवार घेणारे लोक होते विशेषतः डावे लोक त्यांचे शैव-धर्माशी कसलेच नाते नसल्याने त्यांनी अशा प्रकारची विद्या प्रणाली महात्मा फुले यांच्यानंतर विकसितच करता आली नाही त्यांनी केली नाही आणि आज आपणाला त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तोटा झालेला दिसतो . पूर्वी या लोकांना वार्ता नावाची विद्या स्पष्टपणे क्षेत्र म्हणून देण्यात आलेली होती या वार्ता हिचा विकास जसा या लोकांनी घडवला तसा कोणीच घडवू शकले नाही कारण विज्ञान आणि तंत्रज्ञान हे वारतेचे प्रमुख अधिष्ठान आहे . वैष्णव धर्माच्या आणि गीतेच्या उदया नंतर मात्र त्यांना पाप योनीत टाकल्यामुळे यांचे महत्त्व पूर्णपणे लुप्त होत गेले आणि त्याचा प्रचंड तोटा आपणाला झालेला दिसतो . इंग्रजांच्या काळामध्ये आपण पुन्हा एकदा या दिशेने प्रगती करायला सुरुवात केली. मुस्लिम राजवटीत प्रामुख्याने वार्ता या गोष्टीशी निगडित असणारे अनेक लोक मुस्लिम होत गेले आणि वार्ता ही मोगल कालखंडामध्ये मुस्लिम प्रधान इस्लाम प्रधान होत गेली. आज सुद्धा काही लोक मुस्लिमांची या अंगाने चेष्टा करत असतात कारण त्यांना अजून सुद्धा वार्ता किती महत्त्वाचे असते हे कळलेले नाही. मात्र गाडी दुरुस्त करताना त्यांना हे लोक चालत असतात . असो पुढे मुघल कालखंडातच यांचे अध:पतन झाले आणि त्यामुळे आपण जगाच्या आर्थिक नकाशावरून हळूहळू औरंगजेबानंतर गायब होत गेलो.( औरंगजेब नीच आणि हलकट असला तरी वार्ता या विद्येबाबत प्रचंड जागृत होता.)


बसवेश्वर यांनी याबाबतीत खरे तर खूप छान सुरुवात करून दिली होती परंतु नंतरच्या लोकांनी शैव धर्म जितका दडपता येईल तितका दडपला आणि त्याचा दुष्परिणाम स्पष्टपणे झालेला दिसतो. पुढे मग महात्मा फुले यांनी याचे पुनर्जीवन केलेले दिसते  


ही विद्या प्रणाली अत्यंत गुंतागुंतीची बनत गेली कारण ती साम्राज्यवादी बनत गेली आणि इंग्रजांच्या रूपाने तिने भारतीयांचे प्रचंड शोषण केले. आता मात्र आपण तिला केंद्रस्थानी आणण्यात यशस्वी झालेलो आहे मात्र पुन्हा एकदा आता तिच्या जागी सुत्तीय विद्या प्रणाली येते की काय अशी शंका येते आहे. 


भारतीयांचा विचार हा नेहमीच याच विद्या प्रणालींच्या संदर्भामध्ये एक्टिव असतो 


महात्मा गांधी हे या विद्या प्रणालींच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये उभे होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यांनी प्रत्येक विद्याप्रणालीकडून काय काय घेतले ते सुद्धा नीट तपासावे लागते मात्र त्यांच्यावर तीन विद्या प्रणालींचा प्रचंड प्रभाव होता हे आता स्पष्ट होते आहे या विद्या प्रणाली म्हणजे नित्तीय विद्या प्रणाली ,वित्तीय विद्या प्रणाली आणि मोक्षिय विद्या प्रणाली ! त्यामुळेच ते आयुष्यभर यांचा समन्वय साधत राहिले . सर्व समाजांच्या मध्ये सुसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहिले त्यांना यामध्ये यश मिळाले नाही पण काही काळ का होईना पण राजकारणामध्ये एक सुसंवादाचा काळ त्यांच्यामुळे स्टिकला हे आता मान्य करावे लागते.


श्रीधर तिळवे नाईक



Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती