मोक्ष : टाईट इफेक्ट्स

 मार्क झुकरबर्गसाठी एक कविता

१

चांगली कविता काळ कोसळवत जाते 

आणि करुणा सिद्ध करत जाते 


तिच्यामुळे त्वचेवर उठलेली वादळे 

व्हॅलिड होतात 


एक ओव्हरलोड झालेला फ्लो 

फ्लॉवर बनतो 


धर्म गिलोटिनसारखा अवजड 

आणि माझी मान मरतानाही प्रकाशमान 


२


तू माझा अकाउंट चालू ठेवण्याचे पेटंट कधी मिळवलं 

मला कळवलंही नाही 

आणि आता मी मेल्यानंतर जिवंत 

माझा ऑलगॅरीदम

तुझ्या ताब्यात 


पण माझ्या मोक्षाचे तू काय करू शकतो 


ती एकच गोष्ट अशी आहे 

जी तुला डाऊनलोड करता येणे शक्य नाही 


३


ए आय हे जर का वास्तव असेल 

तर विस्तव कशाला म्हणतात 


चिन्हातला विस्तव किती खरा किती काल्पनिक ?


लोकांना चिन्हातला काल्पनिक विस्तवच 

वास्तव म्हणून आवडायला लागलाय 

याचा किती फायदा घेशील ?


माणसे ईश्वर बदलत राहतात 

पण प्रार्थना त्याच ठेवतात 


तू नव्या युगाचा ईश्वर आहेस 

किंवा ईश्वराचे आरटीफिशियल इंटेलिजन्स आहेस 


तिकडे एक सिद्ध हस्तलेखक तक्रार करतोय 

शिवाप्रमाणे डान्स करणाऱ्या लोकांची 

त्याला डान्स नसणारा शिवशंभू परत हवाय 


आणि इकडे तू 

तुला तुझ्या सर्व फेसबुक अकाउंट वरून 

शंकराला हाताळायला हवे आहे 


प्रश्न इतकाच 

शंकर तुझ्या तावडीत सापडण्याइतका 

तुझ्या नेटवर्कच्या गामध्ये दम आहे ?


तू विटंबना ठरशील 

की सौंदर्य वाटशील ?


तू मला कदाचित मरणानंतर ही ऍक्टिव्ह ठेवशील खरा 

पण त्या ऍक्टिव्ह असण्याला 

एक्टिवा इतके तरी महत्त्व असणार आहे का ?


हसण्यापासून ते बनण्यापर्यंत 

बसण्यापासून ते चालायला लागण्यापर्यंत 


मी अनेक वॉल्स घरंगळताना पाहिलेल्या आहेत 


माणसे उत्क्रांत होतात 

म्हणूनच माणसांना मोक्ष मिळण्याची जास्त शक्यता असते 


एक हलकासा क्लिक 

माणसाचे जडत्व काढून घेऊ शकतो 


सतत टिकटिक करणे 

सतत टॅप करणे 

सतत tiktok करणे 

आणि तरीही गॅप राहिलेला पाहून 

चिंतित होणे 


दुःखाचे राजहंस मानस सरोवरात पोहताना पाहणे 

हा सुद्धा शौक आहे कित्येक माणसांचा 


सत्तेची सॅडीस्ट चेअर 

माणसाला सतत खोळंबून ठेवते 


मला वाटले होते मी मेल्यानंतर तरी का होईना 

मला अनुपस्थितीचे भाग्य लाभेल 

पण तुझ्या उपस्थितीने ते भाग्य हिसकावले गेले आहे 


आपण एक जगाचा तुकडा आहोत 

आणि आपली लायकी झाडाच्या पाना इतकी सुद्धा नाही 


तरीही जंगला एवढा अहंकार 

माज आणि ताज 

लाज आणि गाज 


कवितांना सुद्धा किनारे असतात 

फक्त पाणी भरणारे लोक हवे असतात 


मी कधीच तुझ्या सिल्याबसचा पोर्शन झालो नाही 


स्क्रीनवर अलीकडे सतत गनशॉट्स 

जितक्या बंदुका भाषेमध्ये आढळतात 

तितक्या कदाचित प्रत्यक्षात नसतील 


युद्ध जितके चिन्हांच्यात आढळते 

तितके ते कदाचित लढले जात नसेल 


पण निदान यात सुटका होती 

मेल्यानंतर हे सर्व नाहीसे होणार होते 


आता ही ही शक्यता गेली 


अनेक माहीत नसलेल्या गोष्टींचा मी मेल्यानंतरही भाग असेन 


ज्यांना या जगात थांबायचं आहे 

त्यांच्यासाठी ही कृपाही असेल 

पण ज्यांना थांबायचं नसेल त्यांच्यासाठी ?


आपल्या नंतर काय 

हा प्रश्न आम्ही पूर्वी सहज सोडून द्यायचो 

कारण मातीचा स्वभाव आम्हाला माहीत होता 


पण आता इंटरनेटचा स्वभाव 

आणि तुझ्या फेसबुकचे अंतरंग 

कसलाही अंदाज देत नाही 


मी म्हणायला म्हणू शकतो 

मी फेसबुक फाट्यावर मारतो 

पण मेल्यानंतरही ज्याला फाटे फोडता येतात 

त्याला कसे काय फाट्यावर मारणार ?


मेल्यानंतर आमच्या बॉडीचे वजन कशावरून वाढणार नाही ?


अनंत होत जाणे आणि आनंद होत जाणे 

यांच्या दरम्यान एक ऐश आहे 


शून्यात परतलं 

की अनंतात उपस्थिती फारशी नसायची 

पण आता तुझ्या फेसबुकमुळे 

आणि मृत्यूनंतर तयार होणाऱ्या ऑल गैरिदम मुळे माझी बॉडी मेल्यानंतरही झगमगू शकते 


चेहरा कितीही धुतला तरी 

माझे डाग शाबूत राहू शकतात 


मला झालेले रोग 

तपशीलवार उठू शकतात 


मी तोंड दिलेल्या भिंती 

त्यांच्या भाषेत बोलू शकतात 


मी तोड म्हणून काढलेले रस्ते 

कोड म्हणून सडेतोड होऊ शकतात 


मेल्यानंतरही तुझे होऊन राहायचे 

हा ही विनोद नाही काय ?


तू म्हणशील 

मोक्षानंतर माणूस हसतो 

तुम्ही हसत रहा 


पण त्यांच्याही स्मायली तू बनवणार नाहीस याची काय गॅरंटी? 


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीज मधील मोक्ष : टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)

स्त्री श्रीधर तिळवे नाईक 


१


शोषण होण्यापूर्वीच्या स्त्रीचा चेहरा कसा दिसतो 


आतल्या आत स्वतःसाठी उपोषण करणाऱ्या स्त्रीचा चेहरा कसा दिसतो 


कसा दिसतो खिडकी नसलेल्या भिंतीचा चेहरा 

कसा दिसतो फोकस नसलेल्या कॅमेराचा चेहरा 


कसा दिसतो इथून तिथे तिथून इथे बेडकासारख्या उड्या मारणाऱ्या पुरुषत्त्वाचा चेहरा 


तिच्या दोन हातांचे वृक्ष जेव्हा उचलले जातात 

तेव्हा किती फळे कोसळतात 

किती ज्ञान फळे सळसळतात 


छतावरून 36 इंची छाती चाचणी देता देता कशी गायब होते 


बलात्कार करणाऱ्याला कम्फर्टेबल बघून 

लाज शरम न वाटणाऱ्या लोकांचा चेहरा नेमका कसा असतो 


फॅमिली साइट्स हॉरर नाईटस मध्ये बदलणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यांचे प्रतिबिंब नेमके कसे पडते 


प्रत्येक स्त्री नेहमीच रिकाम्या पोटाने चालत असते का 


तुम्ही फार पर्टिक्युलर आहात 

पण बाईच्या अणुरेणूचा 

साधा केस सुद्धा तुम्हाला कळलेला नाही 


२


घराला स्वच्छतेचा येणारा वास मला आवडतो 


गुलाबी हात लाजत जेव्हा म्हणतात 

आय लव यू 

तेव्हा माझ्यात 100 गुलाब फुललेले असतात 

हजार काट्यांना डावलत 


तरीही इतकं पवित्र असणार गंगाजल 

नको त्या विसर्जनासाठी वापरणारे लोक 

नेमके किती हलकट असतात ?


३


एक कप बोर्ड हलतोय 

एक भिंत चालवली जातीये 

घर उखडता यावे म्हणून 


पोरींना भावली समजणारा प्रभाव 

नेमका कुठल्या प्राण्याने स्पॉन्सर केलेला असतो ?


उन्हाळ्याचा भडक 

मातीमोल करत जाणारा खोडवा 


उमलत चालणारे रक्त कमळ 

बळी देण्यासाठी वापरले गेले 

तर कसे दिसते ?


न्यूजना लिपस्टिक समजणारे वर्तमान 

ओठ लपवता लपवता भाषा मारली जाते 


सह्याद्रीचे वय कोणी मोजत नाही 

आणि हिमालयाच्या प्राचीनतेची गॅरंटी देणाऱ्या शेकडो दंतकथा 


मी श्वास म्हणून काय घ्यावे ह्या असल्या गलिच्छ हवेत ?


४


खोलवर पुरुषसत्ताक म्हणता म्हणता

त्याहून अधिक खोल पशुसत्ता दिसावी ?


मी आजकाल व्हिडिओजना टाळ्या वाजवत नाही 

त्यांच्या कानाखाली ठेवून देतो 


टकटकला टॉकटॉक समजणारे लोक 


माझे कान बहिरे करण्याचे कारस्थान यशस्वी झाले 

आणि आता माझे डोळे आंधळे करण्याचे कारस्थान सुरू आहे 


चिवट समुद्र किनाऱ्यांची दमट ऐश 

लोक कुठल्या गोष्टीत ऐश्वर्य शोधतील सांगता येत नाही 


आज काल दरवाजांना कुलूप लागत नाही 

चाव्या लागतात 

आणि योग्य त्या कुलपानी त्या उघडाव्या लागतात 


कुलपे चालून येतात दरवाजांच्यावर 

पास किज नापास 

शिफ्ट किज श्रीमंतांच्या साठी राखीव 


ज्यांच्या नावाने ढोल वाजवावा 

त्यांचीच पोलखोल 

गोल गोल घुमा 

भल्या भल्यांचा चुना 


मी खाली मान घालून आहे मोक्षानंतर सुद्धा 


माझ्या मोक्षाने साधा बलात्कार सुद्धा जर दुरुस्त होणार नसेल 

तर मी तो सांड पाण्यात सोडावा का ? 


माझं मोहनजोदडो झालंय


मी अधिक उत्खनन करण्याआधीच संपवा मला 


शेवटी त्वचेच्या पलंगाखेरीज इतिहासात काहीच उरत नाही 


फार फार वर्षांपूर्वी काळीज नावाचा एक राजा राज्य करत होता 


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: 

टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)

संपूर्ण इकॉनोमी उचलून चालला 

एक 

जो ढग आहे 

की आकाश आहे कळत नाही 


तो चाललाय 

संपूर्ण जंगल कापून 


सर्व माणसे शुद्रांच्यात ढकलत 


त्याचे कारस्थान कळत नाही 

कारण त्याला अनेक चेहरे आहेत 

आणि त्याला आव्हान देऊ शकणारा 

त्याला अनेक चेहऱ्याने पराभूत करू शकणारा रावण 

त्याने आधीच 

एका मंदिरात गाडलाय 


आता फक्त त्याचे चेहरे गुणगुणतायेत मुखवट्यांचे पोस्ट truth गाणे 


तो चाललाय सर्वच घेऊन 

फक्त त्याला स्थायिक कुठे व्हायचे ते कळत नाही 


तो कधी अमेरिकेकडे बघतो 

कधी इंग्लंडकडे 


कदाचित त्याच्या प्लॅनमध्ये अमेरिका आणि इंग्लंड 

फक्त दाखवण्यासाठी असतील 

आणि तो एका वेगळ्याच देशात 

आगळ्याच भूगोलात 

सर्व काही घेऊन सेटल होईल 


बँकांच्यातून कर्ज म्हणून पैसा उचलला गेलाय 

देवळांच्यातून सोने म्हणून पैसा उचलला गेलाय 

लोकांच्याकडून फंड म्हणून पैसा उचलला गेलाय 


ही एक संपूर्ण उचलेगिरी आहे 

आणि उचलणारा 

आपण देव आहोत असे घोषित करतो आहे 


कदाचित 100 वर्षांपूर्वीच 

या कारस्थानाचा पाया घातला गेला होता 

आता फक्त उडणारी बिल्डिंग दिसते आहे 


ही एक पद्धतशीर केली गेलेली विष्णू शाळा आहे 

जिने शंकर शाळा पराभूत केलीये 


अडाणी असणारे अडाणशोट 

चढान शेटच्या बोटानुसार 

डान्स करतायेत 


त्यांना माहिती नाही 

डान्स फ्लोरची आधीच चोरी झालेली आहे 

त्यांना फक्त तरंगते ठेवण्यात कमालीचे यश मिळालेले आहे 


एक सर्वंकष उचल बांगडी 

एक संपूर्ण वर्ण प्लॅनिंग 


आपण आता फक्त पहायचे 

उडत गेलेले इकॉनॉमिक ढग 

न पडलेले पाऊस 


शेवटी इंद्र फार पूर्वीपासून पाऊस आखून होता 


एक पाठीचा कणा थेट उचलला गेलाय 

आणि त्याची जाणीव ही नसलेला

एक मोठा समाज 

तुंबलेली लघवी मोकळी करत 

मुतण्याचा आनंद फिलिंग घेत 

स्वतःला किडनीत जिवंत ठेवतो आहे 


ब्रेन कुठे ठेवायचा हे कळले नाही 

की असे होते 


ट्रम्प कार्ड प्रत्येक गोष्ट पॅक करत स्वतःला उडण्यासाठी सज्ज करत चाललंय 


आणि जनता जनाबाई 

चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग 


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)

या देशात आता जगावेसे वाटत नाही 

इथल्या आयुष्यात थांबावेसे वाटत नाही 


तो काळ गेला जेव्हा निसर्ग हिरवा होता 

बिल्डिंगज होत्या पण थोडासा गारवा होता 

आता फक्त सर्वत्र वाळवंटच वाळवंट 

मनुष्य सुद्धा जगतोय बनून एक उंट 


आखून दिलेल्या तंबूत चालावेसे वाटत नाही 

या देशात आता जगावेसे वाटत नाही 


दिसत नाही अशी एक निराशा सर्वत्र 

कळत नाही अशी हिंसेची भाषा सर्वत्र 

कोणाला कधी अटक होईल येत नाही सांगता 

कोण कुठे सडेल अटकळ नाही येत मांडता 


जगणे म्हणजे टिकणे झाले टिकावेसे वाटत नाही 

या देशात आता जगावेसे वाटत नाही 


जिथे तिथे सर्वत्र काहीतरी गडगडणारे 

जे जे उभे आहे खाली खाली पडणारे 

ते लोक रद्दीत गेले जे होते धडपडणारे 

आता फक्त चोर उरलेत सर्वत्र बडबडणारे  


खूप काही करायचे होते करावेसे वाटत नाही 

या देशात आता जगावेसे वाटत नाही 


कुठल्याही खिडकीतून काहीही येऊ शकते 

आपले म्हणावे ज्याला तेच कुत्रे भुंकते 

नोकरशाहीचे नाक सदोदित शिंकते 

एकच खेळ चाललेला कोण हरते कोण जिंकते 


मैदान देखील सडलेले उतरावेसे वाटत नाही 

या देशात आता जगावेसे वाटत नाही 


कधीकाळी देशावर मनापासून केले प्रेम 

पण आता कोणीही करू शकतो तुम्हास फ्रेम

भल्या भल्या इमर्जन्सीत सोडला नव्हता देश 

रक्तापासून कधीही तोडला नव्हता देश 


इथल्या आता कशाशीही जोडावेसे वाटत नाही 

या देशात आता जगावेसे वाटत नाही 


एक तर झुंड किंवा आहेत सर्वत्र गुंड 

सर्वत्र तरस आहेत जंगल त्यांचे त्यांचे खंड 

सिंहांना मारण्याच्या सुपार्‍या दिल्या गेलेल्या 

मारणाऱ्यांच्यामध्येसुद्धा बेलगाम कंड 


मूर्ख लोकांच्याकडून मरावेसे वाटत नाही 

या देशात आता जगावेसे वाटत नाही 


त्यापेक्षा आपण समाधी घ्यावी हे बरे 

नदीचे पाणी सुद्धा झाले इथे तोतरे 

कळत नाही कधीही काय खोटे काय खरे 

ज्याला त्याला भरले आहे फक्त आता कापरे 


वाटते निघावे इथे रहावेसे वाटत नाही

या देशात आता जगावेसे वाटत नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीजमधील मोक्ष टाईट 

इफेक्ट्स या काव्यफायलीतून)

Hips Don't Lie ( शकिरासाठी)


१ 


मांड्या अजूनही खोटं बोलत नाहीत 

आणि म्हणूनच सगळ्यांची पंचाइत झालेली आहे 


ओळखीच्या बायका 

खोटं बोलत नाहीत तेव्हा अनोळखी वाटायला लागतात 


कोणी त्यांना बियर समजतं कोणी बर्गर कोणी सॉस कोणी पिझ्झा 


पण त्यासमोर ठाकतात तेव्हा 

त्या शकिरा होतात 

आणि पुरुष फक्त त्यांना शकीला समजतात 


त्यांचे डर्टी पिक्चर गाडीत बसून 

खायला पुरुषांना आवडते 


त्या टॉयलेट मधून निघतात तेव्हा 

त्यांचे मोबाईल सेक्सी वाटतात 


त्या घरामधून निघतात तेव्हा 

त्यांच्या साड्या सेक्सी वाटतात 


त्या ऑफिसमधून निघतात तेव्हा 

त्यांच्या पर्स सेक्सी वाटतात 


खोटेपणा जगणाऱ्या पुरुषांना हे पेलत नाही 

त्यांना फक्त लवकर सर्व काही हवे असते 

आणि बायका स्लो मोशन मध्ये त्यांना शांतपणे आजमावत असतात 


बायका आपल्या पायावर उभ्या आहेत 

यातच अनेकांना प्रॉब्लेम असतो 

त्यांना पुरुषांना किती मजा हवी 

याची नीट जाण असते 


काही वडापाव खायला तयार 

तर काहींना फाईव्ह स्टार हॉटेल जेवण 


पण बायका खोटं बोलत नाहीत 

अजूनही मांड्या खोटं बोलत नाहीत 


२


त्यांच्या नुसतं मांड्या म्हटलं तरी 

लोकांना काहीतरी अश्लील वाटते किंवा सेक्सी 


त्यांच्यात नैसर्गिकपणे कानात बड घालण्याची 

आणि आपल्या छातीतून वड उगववण्याची क्षमता असते 


वंश वृक्षाच्या होममेड कल्पना 

त्या कधी त्याबाबतीत त्याच्या वल्गना 

साजऱ्या करत नाहीत 


चिन्ह सृष्टीत त्या पडत नाहीत कधी ढिल्या 

किंवा प्रत्यक्षामध्ये होत नाहीत शिथिल 


त्यांना आपली कातिल कॅटेगरी नीट माहीत असते


त्यांना माहीत असते की काही बायका अशाही आहेत 

ज्यांच्या मांड्या खोटं बोलतात 


पण त्यांना हेही माहित असते 

की अशांच्या वाऱ्याला उभे राहू नये 

जोवर त्या खरं बोलायला शिकत नाहीत


त्यामुळेच काही बायका त्यांचा दुस्वासही करतात 

अशा बायकांच्याकडे त्या दुर्लक्ष करतात 

हं म्हणतात

त्यांना माहित असते अशा बायकांच्या श्वासात दम नसतो

चमचम असते  


परंपरा भक्कम असेल तर स्वीकारावी 

रक्कम असेल तर विवेक वापरून स्वीकारावी 

आणि ढक्कन असेल तर फेकून द्यावी 

इतके शहाणपण त्यांच्याकडे असते 


कारण त्यांनी आपल्या मांड्यात  

आणि मांडणीत 

खरेपणा लपवलेला असतो 


३


मांड्यांनी खरं बोलायला सुरुवात करून 

21 वर्षे झालेली आहेत


ज्ञानाभोवती ओवाळलेल्या दुर्वा 

दुर्गेकडून प्राप्त झालेली शक्ती 


पुरुष फक्त मनातल्या मनात मांडे खातायेत 

आणि खरं बोलणाऱ्या मांड्या त्यांना काहीही खाऊ देत नाहीत 

त्यांना माहित आहे 

पुरुषांना मांड्या पचत नाहीत  


म्हणून तर त्या अलीकडे 

बिंदास बिकनीमध्ये हिंडत असतात 

सेल्फिज टाकत असतात 


पुरुष डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी 

त्या सेल्फीज पहात असतात 


व्हिडिओंच्या किनाऱ्यावर 

कमर्शियल पणा सुद्धा असू शकतो 

पण त्याचा अंदाज घेणे 

वाळूतल्या शहामृगांना कसा येणार ?


४


"तुमच्यासारख्या मुली ''

हे तर त्यांनी आयुष्यभर ऐकलेले असते 


पण त्या विचलित होत नाहीत 

चलित होतात 

खेळणाऱ्या होतात 

त्यांना भटक भवानी हा शब्द आवडतो 

कारण त्यांना भवानीची ताकद माहित असते.


पुढे जाण्याचा ससेमिरा त्यांनाही सतावतो 

गॉगल लावून हिंडणारा हुकूमशाह त्यांना ओळखता येतो 


कोण शिवलिंगर टाकतो 

कोण लिंगर टाकतो 

कोण लंगर टाकतो


आणि कोण फक्त 

वृषणाई टाकतो 

हे त्या ओळखून असतात 


त्या गुरुनानकांच्यावर श्रद्धा ठेवतात 

आणि कधी कधी कॅनडाच्या दिशेने पण निघून जातात 


त्या बसवेश्वरांच्या श्रद्धा ठेवतात 

आणि कधीकधी आखाताला निघतात 


त्या शंकरावर विश्वास ठेवतात 

आणि अमेरिकेला निघतात 


कधी कधी त्या स्पष्ट स्वच्छ नास्तिक असतात 

आणि जगभर निघतात 


ईश्वर संकुचित झाला 

की माणसे खोटे बोलायला शिकतात 


भव्य दिव्य इमोशन 

आणि प्रचंडपणाच्या कैफाचा 

आवेग 


वक्ष सपाटी मोजणारे लोक 

मोडीत काढावे लागणार 

याची त्यांना कल्पना असते 


बाईला मातृत्वावरून सुद्धा ओळखता आले पाहिजे 

याची त्यांना चाड असते 


म्हणूनच त्या 

शकिराचा ताल धरत 

म्हणत राहतात 


Baila en la calle de noche (uh, yeah)

Baila en la calle de día (let's go)

Baila en la calle de noche (uh, yeah)

Baila en la calle de día (let's go)


So be wise (sí), and keep on (sí)

Reading the signs of my body (uno, dos, tres, cuatro, no fightin')


कारण 

hips don't lie like cheaps 

श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 


( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


तुम्ही सभ्यतेच्या वाटा बंद करणार आहात का ?


लढे कितीही सामाजिक असोत 

वाटाघाटी नेहमी कौटुंबिक व्हाव्यात 

इतकेही शहाणपण आता लोप पावले आहे का ?


हातात काचा घेऊन आंदोलन धावत होते का 

ते तर फक्त आरसे दाखवत होते 

त्यात तुम्ही काय पाहिले 

हे कधी पब्लिकमध्ये येऊन सांगणार आहात काय ?


मुलांना अक्कल नसेल 

तर तुम्ही गुडघे कशाला दाखवता ?


मुलांचे रक्त तापले असेल 

तर तुम्ही काय त्यांना हार्ट अटॅक देणार ?


नम्रतेचा गरुड आक्रमक वाटत नाही 

कोऑपरेशनची सुद्धा सवय लागते 

एका अधिकारात वरात काढणाऱ्यांना ती लागत नाही 


हा देश म्हणजे काही संघ नव्हे 

हा देश सर्व संघांचा संघात आहे 


तुम्ही सतत अन कम्फर्टेबल 

अनफेअर 

कर्टसी दाखवायला गेले 

त्यांना कोर्ट दाखवणारे 


जर लोकशाही विरोधात असाल 

तर लोकशाहीत निवडणुकीला उभा राहूच नका 


आणि लोकशाहीच्या बाजूने असाल 

तर तिची सभ्यता पाळा 


सत्ता कोणालाच परमनंट ऍडमिशन देत नाही 

तिचे स्टेटस कायम टेम्परेरी असते 


खुर्च्यांच्या पेक्षा राजकारणी लोकांची संख्या 10 पट या देशात 

त्यामुळे एक बसतो 

तेव्हा नऊ खुर्ची खाली लपून त्याला खेचायला बसलेले असतात  


भाषा इंटरप्रेटेशनच्या तावडीत देण्याचे दिवस संपलेले आहेत 

आता फक्त ध्वनी आहेत आणि फुत्कार 


प्रत्येक वेळी बिळातून साप काढाल 

तर लोकही नागपंचमी विसरून जातील 


नको तितक्या लोकांची नको त्या लोकांची रिक्रुटमेंट्स 

त्यांच्या फ्रस्टेशनच्या तावडीत सापडलेल्या महत्त्वकांक्षा 

कसलीही उपयुक्तता नसलेली वाक्ये आणि त्यांचे प्रवक्ते 


प्रत्येक जण सत्तेत स्थलांतर करायला उत्सुक 

तुम्ही कोणा कोणाला किती विसा आणि पासपोर्ट वाटणार आहात ?


मुख्य म्हणजे तुमच्या पाठीच्या कण्याचे काय ?


की तो तुम्ही आता शोभेच्या कामाला जुंपलेला आहे ?


अर्थव्यवस्था तेव्हा फापलते 

जेव्हा संधी व्यवस्था संधी साधू लोकांच्या ताब्यात जाते 


तुम्ही आमच्यासारख्या साधूंची संगत सोडली 

आणि संधीसाधूंची संगत पत्करली 

तेव्हाच याची बीजे रुजलेली होती 


तेव्हा सहनशीलता संपल्यासारखे वागू नका 

मॅच्युरिटी म्हणजे बँकेत ठेवलेली एफडी नव्हे 

मॅच्युरिटी ही स्वतःच एक बँक असते 

आणि ती बँकेबल ठेवायला लागते 


संघर्ष पूर्वीसारखे कंपॅटिबल राहिलेले नाहीत 

म्हणून काय आपण प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात ट्रबल मेकर व्हायचे ?


देश प्रेमाच्या नावाने गाढवे विकणे बंद करा 


नाहीतर हातात असलेले घोडे निघून जातील 


आणि तुम्ही सांगत राहाल अस्तित्वात नसलेल्या कुरुक्षेत्राच्या काल्पनिक कहाण्या 


तेव्हा थोडे माणसात या 

शिस्तीत या 

मोक्षात या 

द्वादशशीलात या 


राजाने करुणेचा अवतार असायला हवे 


शेवटी ही मुले आपण बाहेरच्या देशातून मागवलेली नाहीत 

किमान याचे भान ठेवा 


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष या सिरीज मधील मोक्ष टाईट इफेक्ट या काव्य फाईलीतून)

श्रीधर तिळवे नाईक 


( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 


( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)

श्रीधर तिळवे नाईक 


( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 


( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)

श्रीधर तिळवे नाईक 


( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 


( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)

श्रीधर तिळवे नाईक 


( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 


( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)

श्रीधर तिळवे नाईक 


( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीज मधील मोक्ष: टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)



( मोक्ष सिरीज मधील मोक्ष : आफ्टर इफेक्ट या काव्यफायलीतून)




५६७८९१०

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती