अवस्था तंत्र , भारतीय धर्म आणि ज्युदाइक धर्म श्रीधर तिळवे नाईक
अलीकडे पुन्हा एकदा ज्युडाइक म्हणजे (ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म) धर्मांच्या मध्ये काही बाबतीत वाद पेटलेला दिसतो. मुळातच मोक्षाचा पत्ता नसल्याने या धर्मांच्या मध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झालेले दिसतात त्यातील एक प्रॉब्लेम म्हणजे ईश्वरा बरोबर आपले अवस्थात्मक नाते काय आहे ? याबाबत उडालेला गोंधळ होय. अशा प्रकारचा वाद भारतामध्ये सुद्धा भक्ती चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला दिसतो . त्याच्या मुळाशी नेमके काय आहे ? तर त्याच्या मुळाशी अवस्था तंत्र आहे म्हणूनच त्याचा आता आपण सविस्तर विचार करणार आहोत.
शैव श्रुतीमध्ये भगवान शंकर यांनी जी काही तंत्र दिली त्यामधले एक तंत्र त्यांनी सुवास यांना दिले . या तंत्राला आपण आता अवस्था तंत्र म्हणू शकतो . हे तंत्र नेमके काय होते हे आता ऐतिहासिक पातळीवर सांगणे अवघड होऊन बसले तरी त्याची साधारणपणे कल्पना करता येते . या तंत्राच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणात काम झाले कारण त्याचे काय करायचे हे सुरुवातीच्या काळात युरेशियन लोकांना कळत नव्हते. साहजिकच युरेशियन वैदिक परंपरेने सुवासाचे रूपांतर दुर्वास ऋषींच्या मध्ये करून त्यांची अवहेलना करायला सुरुवात केली. मुळात नावापासूनच अवहेलनात्मक बदल घडवणे हे युरेशियन लोकांचे वैशिष्ट्य आहे. आता कुठला माणूस स्वतःचे नाव दुर्वास ठेवेल किंवा कुठली माता आपल्या मुलाचे नाव दुर्वास ठेवेल पण युरेशियन परंपरा मात्र असल्या घाणेरड्या गोष्टी सहजरित्या करू शकते . आगम परंपरेतल्या सर्वच गोष्टींना जास्तीत जास्त भ्रष्ट स्वरूपात सादर करणे हा युरेशियन परंपरेचा छंदच आहे . अलीकडे फेसबुक वर तर पुन्हा एकदा तो मोठ्या प्रमाणातच बोकाळलेला असल्याने या अवस्था तंत्राबाबत फार मोठा गोंधळ निर्माण झालेला दिसतो म्हणून पुन्हा एकदा मी त्याची मांडणी करत आहे . अवस्था तंत्रानुसार आपण एका तळातल्या अवस्थेत असतो आणि तिथून उन्नत होत आपण सर्वात शेवटी शून्य अवस्थेला पोहोचतो त्या अवस्थेला पोहोचणे म्हणजेच मोक्ष होय.
या तंत्राच्या मते सर्वात पहिली अवस्था ही शून्य म्हणजे शिव अवस्था आहे आणि तिथूनच जगाची संसाराची निर्मिती झाली. शिवाने पापणी लवायच्या आत संसार निर्माण केला .
दुसरी अवस्था ही युग्म अवस्था आहे जिथे पापणी लवल्यानंतर शिव आणि शक्ती दोन्ही स्पष्टपणे निर्माण झाले मात्र ते एकमेकांच्या युग्म अवस्थेत होते आणि आहेत .
तिसरी अवस्था विशिष्ट भेद आहे जिथे शिव शक्ती एकत्र नांदायला लागतात आणि संसाराचे निर्माण करतात. शिव महाप्राण स्वरूपात जातो आणि ईश्वर म्हणून ओळखला जातो तर शक्ती ही संसार निर्माण करणारी जगाची आई म्हणजे जगदंबा बनते .
चौथ्या अवस्थेत मात्र भेद निर्माण होतो आणि शिव प्राण बनतो आणि शक्ती शरीर बनते . त्यामुळे जीव आणि शिव यांच्यात भेद निर्माण होतो . हा भेद मायात्मक असतो .
पाचव्या अवस्थेत पूर्ण भेद निर्माण होतो इथे प्राण स्पंद म्हणून काम करायला लागतो तर शक्ती त्या स्पंदातून किंवा स्पंदनच्यामुळे निर्माण झालेला पुंज म्हणून काम करायला लागते सर्वसाधारण आपला जो आत्ताचा इहनिष्ठ जीव असतो तो पूर्ण भेद या स्वरूपात असतो .
या पूर्ण भेदाकडून शून्य अवस्थेला जाणे म्हणजेच मोक्ष होय .
या तंत्रामध्ये सर्व लक्ष शरीरावर असते आणि शरीराच्या अवस्थांच्यावर असते .
या तंत्राचे पुनर्जीवन आचार्य शंकर यांनी केले आणि त्यांचा काल नेमका कोणता होता हे आजही निश्चित होत नाही. याचे कारण युरेशियन परंपरेने त्यांचे विसर्जन स्वतःच्या परंपरेमध्ये केलेले आहे आणि आचार्य शंकर आणि शंकराचार्य यांच्यामधून आद्य शंकराचार्य नावाचे व्यक्तिमत्व निर्माण केलेले आहे . आज सुद्धा यातून निर्माण झालेले लिखाण कुणाचे आहे हा प्रश्न पडतो म्हणजे आद्य शंकराचार्य यांच्या नावे सांगितले जाणारे जे ग्रंथ आहेत त्यापैकी कुठले आचार्य शंकरांचे आहेत आणि कुठले आद्य शंकराचार्य यांचे आहेत हे सांगणे फार कठीण झालेले आहे.
पाशुपत दर्शनानुसार आचार्य शंकर हे नकुलिश यांच्यानंतर आणि बहुदा महावीर बुद्धानंतर होऊन गेलेले पाशुपत आचार्य आहेत . त्यांचा कालखंड साधारणपणे इसवी सन पूर्व पाचवे शतक असावा . त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा पंच सिद्धांचे पुनर्जीवन केले आणि शिव,शक्ती, विनायक ,स्कंद आणि नंदी या आद्य पंच सिद्धांना दैवी स्वरूप दिले . त्यांच्यानंतरच हे लोक देव झाले . हे आचार्य शंकर हेच हिंदू धर्माचे संस्थापक आहेत आणि हा हिंदू धर्म जैन आणि बौद्ध यांच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा धर्म बनत गेला . खुद्द रामायण महाभारतावर सुद्धा त्याचा प्रचंड प्रभाव पडलेला दिसतो .
मात्र सम्राट कनिष्क यांच्यानंतर बौद्ध धर्माने पुन्हा एकदा सर्वांच्यावर आघाडी घेतली . त्यांना हे करताना हिंदू धर्मातले अनेक भाग आत्मसात करायला लागले ह्या काळामध्ये शैव धर्म हा लोकधर्म म्हणूनच ओळखला जात होता आणि लोकांच्या त जर का आपला धर्म प्रसार पावायचा असेल तर आपणाला त्याची काही तत्वे आत्मसात करावी लागतील ही गोष्ट काही बौद्ध आचार्यांच्या लक्षात आली आणि त्यातूनच मग महायान आणि नंतर वज्र यान तयार झाले याचा परिणाम आपणाला थेट बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर नकारात्मक पद्धतीने झालेला दिसतो आंबेडकरांना महायान आणि वज्रयान या दोन्ही यांनाना नकार द्यावा लागला याचे कारण त्यांना कुठेतरी याची कल्पना होती की यांच्या जडणघडणीमध्ये हिंदू धर्माचा फार मोठा वाटा आहे . प्रत्यक्षामध्ये मात्र जगभर पसरलेला जो बौद्ध धर्म आहे तो स्पष्ट आणि स्वच्छपणाने महायान व वज्रयान बौद्ध धर्म आहे म्हणजेच एका अर्थाने हिंदू बौद्ध धर्म आहे . त्यामुळेच हिंदू धर्मातल्या सर्व संकल्पना आपणाला या दोन्ही यानांच्या मध्ये जगभर आढळतात .
पुढे आद्य शंकराचार्य यांनी आठव्या शतकामध्ये या अवस्था दर्शनाचे पुनर्जीवन केले . पुन्हा एकदा पंचायतन असे नाव देऊन पंच सिद्ध त्यांनी स्थापन केले मात्र नंदी ऐवजी त्यांनी सूर्य म्हणजे यम आणला कारण पाचव्या शतकानंतर भारतामध्ये सूर्य पूजा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित झाली होती . त्यामुळे नंदी ऐवजी त्यांनी सूर्य पूजा सामावून घेतली . ज्याचा फायदा घेऊन पुढे वेदांतांमध्ये सूर्य म्हणून विष्णू आणला गेला आणि पंचायतनामध्ये विष्णूचा समावेश रामानुजाचार्य यांनी केला आणि संपूर्ण हिंदूधर्म आपल्या ताब्यात घेतला . आजही हिंदू धर्माची स्थापना आचार्य शंकर यांनी केली असे आम्ही मानतो . आचार्य शंकर यांनी स्थापन केलेल्या या हिंदू धर्मामध्ये वैष्णवांचा समावेश नाही याचे कारण या काळामध्ये मुळातच वासुदेव धर्म अस्तित्वात होता पण वैष्णव धर्म अस्तित्वात नव्हता. तो पुढे जैन , पाशुपत , हिंदू आणि बौद्ध या धर्मांना शह द्यायचा म्हणून आणला गेला विशेषत : जैन आणि बौद्ध या दोन धर्मांना शह देण्यासाठी म्हणूनच वासुदेव धर्मामधून वैष्णव धर्माची निर्मिती झाली . या धर्माने अत्यंत जाणीवपूर्वक शक्ती स्वीकारली. मात्र तिचे स्वरूप महालक्ष्मीमय केले . प्रत्यक्ष वासुदेव धर्मामध्येच लक्ष्मी होती की नाही हा फार मोठा वादाचा विषय आहे. माझे स्वतःचे मत असे आहे की ही मुळातच वैश्यवर्णीय लोकांची देवता होती . तिची सांगड शैव धर्मामधील श्री या धनदेवतेशी घालण्यात आली आणि त्यातून आत्ताचे महालक्ष्मीचे स्वरूप अवतरलेले आहे . पुढे जेव्हा वैश्य वर्ण जैन धर्मामध्ये प्रवेश करू लागला तसे वैश्य वर्णाचे सर्व देव आणि देवता जैन धर्मामध्ये दाखल झाल्या . याला कारण अर्थातच समुद्र पर्यटन बंदी होती. ज्यांना व्यापार करायचा होता त्यांना आपला वैदिक धर्म बदलण्या वाचून पर्याय नव्हता . याशिवाय या काळामध्ये भगवद गीतेमध्ये वैश्य वर्णाचा समावेश पाप योनीमध्ये करण्यात आला . वैश्य वर्णामधले जे स्वाभिमानी लोक होते त्यांना हा वैष्णव धर्माने भगवद्गीतेच्या द्वारे दिलेला पाप योनीचा दर्जा सहन होणे शक्यच नव्हते. या लोकांनी हा दर्जा सहन करत ब्राह्मण वैष्णव परंपरेमध्ये राहण्यापेक्षा जैन धर्मात धर्मांतर करणे स्वीकारले . आज त्यामुळे जैन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वैश्य लोक दिसतात . किंबहुना जैन धर्म हा वैश्य लोकांचा धर्म आहे किंवा व्यापारी लोकांचा धर्म आहे अशा प्रकारची टीका केली जाते पण त्यामागे असलेली ही पार्श्वभूमी कोणी लक्षात घेत नाही.
या वैष्णव धर्माने ज्या काही गोष्टी स्वीकारल्या त्यामध्ये अवस्था तंत्र होते आणि त्यामुळे साहजिकच पुढे ते वेदांती हिंदू धर्मामध्ये अद्वैत तत्त्वज्ञान म्हणून प्रस्थापित झाले . मराठीतल्या जवळजवळ सर्व संतांच्या मध्ये त्यांच्या वाङ्मयांच्या मध्ये आपणाला या अवस्था दर्शनाची चर्चा दिसते . किंवा किमान उल्लेख दिसतो अर्थातच सर्वाधिक मोठ्या प्रमाणात जी मांडणी आली ती ज्ञानदेव यांच्याकडून आली. त्यांनी शंकराचार्यांचे अद्वैत मत अधिक पुढे नेले .
पुढे बाराव्या शतकामध्ये जसा जसा वेदांत हिंदू धर्म अधिकाधिक वैष्णव बनत गेला तसा तसा अद्वैत सिद्धांत काही प्रमाणामध्ये ओसरू लागला मुळात भक्तीमध्ये अद्वैत की द्वैत की विशिष्ट अद्वैत असा प्रश्न अनेक संतांना पडलेला दिसतो . याची सुरुवात रामानुजाचार्य यांनीच केली होती त्यांनीच प्रथम अद्वैत सिद्धांताला आव्हान दिले .
या अवस्था तंत्राच्या संदर्भात जी प्रगल्भता आपणाला भारतीय धर्मांच्या संदर्भात दिसते ती प्रगल्भता आपणाला अब्राहमीक धर्मांच्या संदर्भामध्ये दिसत नाही याचे कारण स्पष्ट आहे या धर्मांना मोक्षाची कल्पना नाही. साहजिकच तिथे अवस्थांच्या बाबतीतले अनेक प्रश्न निर्माण झालेले दिसतात याबाबतीत सर्वसाधारण मांडणे असे आहे की
१ मी आणि ईश्वर एकच आहे आय ऍम दॅट आय एम असे ईश्वर एकदा मोजेसला म्हणतो . जॉन ८ :५८ मध्ये जीजस सुद्धा एकदा मी आब्राहमपूर्वी होतो असे म्हणतो तेव्हा तो नकळत पणे मीच ईश्वर आहे असे सांगत असतो. मार्क २: ५-७ मध्ये सुद्धा तुम्हीच तुमच्या पापांना क्षमा करू शकता असे जीजस म्हणतो तेव्हा तुम्हीच देव आहात असे तो सुचवत असतो मात्र ज्याप्रमाणे भारतीय लोक ठामपणाने सांगतात मीच ब्रह्म आहे किंवा मीच शिव आहे त्या पद्धतीचा ठाम पणा आपणाला जीजस मध्ये दिसत नाही याचे कारण त्याला शिव अवस्था किंवा अद्वैत अवस्था प्राप्त झालेली नाही आचार्य शंकर यांचे मी शंकर आहे मीच शंकर आहे मी शिव आहे मी शिव आहे हे गीत खूप गाजले होते आजही ते गाजतच आहे . हा त्यांचा शिव अवस्थेचा साक्षात्कार आहे आणि ते तो ठामपणे मांडत असतात अशा प्रकारचा ठाम पणा ना मोजेस मध्ये आहे ना जीजस मध्ये आहे . उपनिषदांच्या मधला मीच ब्रह्म आहे हा साक्षात्कार सुद्धा ठाम पणाने आलेला आहे . हा ठामपणा आपणाला कुठल्याही ज्यूडाइक टेक्स्ट मध्ये दिसत नाही याचे कारण मुळातच अवस्था मान्य नाही. शिव आणि शक्ती हे युग्म मान्य नाही या धर्माची सुरुवात ईश्वरापासून होते
२ मी देवाचा पुत्र आहे: आपण जर संपूर्ण नवीन टेस्टामेंट वर नजर टाकली तर त्यामध्ये जीजस स्वतःला अनेकदा मी देवाचा पुत्र असे म्हणत असतो . किंवा आपल्या ईश्वराला तो पिता म्हणतो . याचा अर्थ विशिष्ट अद्वैत स्वीकारले गेलेले आहे तो शिव किंवा शक्ती स्वीकारत नाही तर त्याऐवजी ईश्वर स्वीकारतो . त्याला तो नाव पण देतो . किंबहुना या सर्व धर्मांना एकेश्वरी धर्म असे म्हटले जाते त्याचे कारण हे सर्व धर्म एकाच ईश्वरावर विश्वास ठेवतात . आपल्याकडे सुद्धा ज्याला ईश्वर तंत्र म्हटले जाते तिथे एकच ईश्वर मानला जातो आणि त्याची भक्ती केली जाते. त्यामुळेच आपल्याकडे अनेकदा शिवलिंगाला ईश्वर म्हटले जाते आणि भक्ताने फक्त एका आणि एकाच शिवलिंगाची पूजा केली पाहिजे . मग हे शिवलिंग त्रंबकेश्वर असो नाहीतर पाताळेश्वर असो . ईश्वर लिंगाची जी संकल्पना आहे ती एकेश्वरी संकल्पना आहे . यामध्ये तुम्ही फक्त शिव आणि शिव या तत्त्वाचीच पूजा करत असता . हा एका अर्थाने एक तत्ववाद आहे . खरे तर शिवाला तत्व म्हणावे की नाही हा सुद्धा प्रश्न आहे त्याला सत्व म्हणावे का असाही प्रश्न आहे जर का आपण त्याला सत्व म्हटले तर आपण असे म्हणू शकतो की हा एकसत्ववाद आहे जीजस हा ईश्वराचा स्वीकार तत्व म्हणून करत नाही तर सगुणात्मक ईश्वर म्हणून करतो त्यामुळेच त्याच्याशी तो माणसाप्रमाणे माणूस समजून बोलतो. मात्र या ईश्वराचे आपण पुत्र आहोत असे तो स्पष्ट सांगतो इतकेच नाही तर तुम्ही सुद्धा सर्व देवाचेच पुत्र आहात असेही तो सांगतो या गोष्टीला छेद दिला तो मोहम्मद पैगंबर यांनी ! त्यांनी माणूस हा देवपुत्र आहे ही गोष्ट स्पष्टपणे नाकारली . याचे कारण मुळातच त्यांचा ईश्वराशी फारसा संबंध आला नव्हता . त्यातूनच तिसरी घोषणा आली ती म्हणजे मी माणसाचा पुत्र आहे आणि साहजिकच मग त्यांना जीजस हा सुद्धा माणसाचाच पुत्र होता असे सांगावे लागले आणि यामुळेच इस्लाम विरुद्ध ख्रिश्चन असा वाद निर्माण झाला . महंमद पैगंबर यांना जीजस हा देवाचा पुत्र आहे हे मान्य नव्हते ते त्यांना माणसाचा पुत्र मानत होते . आपणाला पवित्र कुराण या ग्रंथामध्ये अनेकदा हे दिसते
३ मी माणसाचा पुत्र आहे: सर्वसाधारणपणे ईश्वराने मोझेसशी थेट संवाद साधलेला दिसतो म्हणजे इथे ईश्वर निर्गुणात्मक नाही तर सगुणात्मक आहे याउलट अशा प्रकारचे थेट संवाद जीजस बरोबर फार कमी झालेले दिसतात . महंमद पैगंबर यांच्याशी मात्र ईश्वराने थेट संपर्क फारसा साधलेला दिसत नाही त्याऐवजी ईश्वराचे देवदूत त्यांच्याशी जास्त संबंध साधताना दिसतात. म्हणजे एका अर्थाने इथे अद्वैत आणि विशिष्ट अद्वैत लोप पावलेले असून फक्त द्वैत दिसते भेद दिसतो . याचा इस्लामवर काय परिणाम झाला हे स्पष्ट आहे . इस्लाम हा पूर्णपणे मनुष्याला केंद्रस्थानी ठेवणारा धर्म आहे त्याच्यामध्ये दैवी म्हणावे असे फारसे काही नाहीच कारण मुळातच अशा प्रकारच्या दैवीपणावर मोहम्मद पैगंबर यांनी विश्वास ठेवला नाही त्यांची दैवीपणाची व्याख्या सुद्धा मानवाला धरूनच दिसते. साहजिकच माणसांच्या आसक्तीचा जेवढा मोठ्या प्रमाणामध्ये इस्लाममध्ये स्वीकार केला गेलेला आहे तितका आधीच्या धर्मांच्या मध्ये स्वीकार केला गेलेला नाही त्यामुळेच धर्मासाठी खोटे बोलले तरीसुद्धा चालते अशा प्रकारची वाक्ये आपल्याला इस्लाम मध्ये आढळतात . पुरुष हा पॉलीगमस असतो हे सुद्धा गृहीत धरलेले दिसते त्यामुळे त्याला चार लग्नाची परमिशन दिलेली दिसते पण बायकांनी मात्र मोनोअँडरस राहिले पाहिजे अशी सक्ती आहे . इथे सरळ सरळ पुरुषसत्ताकवाद दिसतो म्हणूनच अनेक पुरुषांना अलीकडे इस्लाम धर्म आकर्षित करताना दिसतो .
जगाच्या सर्व भूगोलांच्यामध्ये मोक्षाची आस असणारे लोक नेहमीच निर्माण होतात अशा लोकांच्या पुढे जेव्हा धर्म उभे राहतात तेव्हा त्यांचे काय करायचे हा फार मोठा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. त्यातूनच मग हादिस ही उपवाट ज्यू धर्मात निर्माण होते . सुफी ही उपवाट इस्लाम मध्ये निर्माण होते . पण यांचा सामाजिक आणि धार्मिक परिणाम शून्य असतो अनेकदा तर या उपवाटांच्यामध्ये सुद्धा मुख्य वाट घुसते आणि तिला ताब्यात घेते . त्यामुळे अब्राहमिक धर्मांच्या मध्ये मोक्ष कधीही नीट रुजलेला दिसत नाही त्याचा परिणाम असा होतो की शिव अवस्था किंवा अद्वैत अवस्था यांना स्पष्ट आणि स्वच्छ नकार मिळत राहतो . मीच अल्लाह आहे असे म्हणणाऱ्या मन्सूरला शेवटी धर्मद्रोही म्हणून सुळावर चढवले जाते .
वास्तविक माणसाच्या बाबतीत शिवा अवस्था संभव अवस्था आहे . किंबहुना सांभवी विद्या म्हणजे या संभाव्यतेचा केलेला पाठलाग आहे. शंभूने दिली म्हणून शांभवी /सांभवी असे तिला म्हणतात . शंकराचे मूळ नाव शंभू होते हे मी अनेकदा सांगितलेले आहेच. आजही आदिवासी लोकांच्या मध्ये शंभू हेच नाव प्रचलित आहे .
प्रश्न असा आहे की जर का एखादा धर्म मोक्षाला नकार देत असेल तर त्याचे करायचे काय ? सर्वधर्मसमभाव जोपर्यंत एका राज्यात असलेले सर्व धर्म हे भारतीय धर्म असतात तोपर्यंत सर्वधर्मसमभाव नीट चालतो आणि ठीक असतो अगदी जिथे सर्वच धर्म ज्युदाइक धर्म आहे तिथे सुद्धा सर्वधर्मसमभाव काही प्रमाणामध्ये शक्य आहे.परंतु जर का एखाद्या राज्यामध्ये दोन्ही प्रकारचे धर्म आलेले असतील तर मग सर्वधर्मसमभाव कसा शक्य होणार. इसवी सन १००० नंतर भारताची खरी पंचायत इस्लाम मुळे झालेली आहे . कारण सर्वधर्मसमभाव शक्यच नव्हता आणि इस्लाम मुळात मोक्ष स्वीकाराला शेवटपर्यंत तयार झाला नाही . काही लोक अपवाद होते पण ते अपवादच राहिले ते कधीही मुस्लिम धर्माचे मुख्य धारा बनले नाहीत . शेवटी त्यांच्या नावाने कबीर पंथ वगैरे स्वतंत्र पंथ निर्माण झाले पण ते मुख्य गाभा झाले नाहीत तशा प्रकारच्या अफवा पुरोगामी लोकांनी पसरवल्या खऱ्या परंतु त्या खऱ्या नाहीत हे हळूहळू स्पष्ट होत गेले . शिव अवस्था किंवा शून्य अवस्था किंवा कैवल्य अवस्था किंवा निर्वाण अवस्था किंवा ब्रह्म अवस्था किंवा अद्वैत अवस्था मान्य नसलेल्या धर्मांचे तुम्ही काय करणार कारण हे लोक तर ही गोष्ट शक्यच नाही असे मानतात . त्यामुळे या धर्मांच्या मध्ये ना शून्य अवस्था आहे ना युग्म अवस्था आहे . यांची सुरुवात संसार आणि ईश्वरांच्या पासून होते. हे लोक संसार आधी मानत नाहीत तर ईश्वर आधी मानतात आणि ईश्वराने संसार निर्माण केला असे मानतात . म्हणजे क्रमाच्या बाबतीत सुद्धा इथे मत भिन्नता आहे . याचे कारण शिव आणि शक्ती यांना मान्य नाही . त्यांच्या धर्माची सुरुवात ही ईश्वर त्यानंतर त्याने सात दिवसात निर्माण केलेला संसार आणि मग त्यानंतर जीव अशी होते . मोक्षाचा संबंध हा शिव आणि शक्ती यांच्याशी असल्याने साहजिकच मोक्षाच्या अवस्थेची या लोकांना कल्पना सुद्धा करवत नाही . त्यामुळे सर्वधर्मसमभाव हा एक फार मोठा भ्रम आहे तो आपण जितक्या लवकर आपल्या वैचारिकतेतून काढून टाकू इतके बरे त्यापेक्षा कुठे कुठे मतभेद आहे का आहे याची मांडणी आणि तपासणी आपण जितकी नीट करू तितके कदाचित आपण एकमेकाला जास्त नीट समजून घेऊ . वस्तुस्थिती अशी आहे की भारतीय धर्म आणि ज्युदाइक धर्म हे दोन्ही दोन टोकावर उभे आहेत. ते उगाचच एकाच टोकावर उभे आहेत असे दाखवणे म्हणजे अडाणीपणा दाखवणे होय . या अडाणीपणामुळेच फाळणी टळली नाही. मुस्लिम संस्कृती स्पष्टपणे स्वतंत्र असल्यानेच आम्हाला स्वतंत्र राष्ट्र हवे अशी जिना यांची मागणी होती. ती नीट समजून सुद्धा घेण्याचा प्रयत्न आपल्याकडे पुरोगामी लोकांनी केलेला नाही याचे कारण अस्तित्वात नसलेली एकात्मता त्यांनी पाहिली . हा अशा प्रकारचा धार्मिक रोमँटिसीजम शेवटी प्रचंड मोठ्या हिंसेमध्ये रूपांतरित होतो हा इतिहासाचा दाखला आहे तोच आपल्या इथे पुन्हा एकदा गिरवला गेला आणि फाळणीमध्ये प्रचंड हिंसा झाली आयुष्यामध्ये तुम्ही इतरांना काय समजता हे जितके महत्त्वाचे आहेत त्याहून अधिक महत्त्वाचे इतर तुम्हाला काय समजतात हे ही महत्त्वाचे आहे. इस्लामच्या दृष्टिकोनातून सर्व गैर मुस्लिम हे शत्रू आहेत आणि पुढेही शत्रूच राहणार त्यामुळे या धर्माचे काहीही आणि कसलेही हृदय परिवर्तन करता येणे शक्य नाही . हीच गोष्ट ज्यू धर्मा बाबत आहे. किंबहुना इस्लाम हे ज्यू धर्माचे पुनर्जीवन आहे फक्त ज्यू धर्मामध्ये धर्मप्रचाराविषयी आग्रह नाही म्हणून सर्व वाचले. इस्लाम बाबत हा आग्रह उलट्या दिशेने गेलेला दिसतो आणि तो प्रचंड टोकाचा आहे . त्यामुळे इतरांच्या वाचण्याची शक्यता नाही. जेव्हा तुमचे लक्ष देवाकडे आणि नैतिकतेकडे कमी आणि माणसाकडे आणि धर्म प्रचाराकडे प्रसाराकडे जास्त असते तेव्हा जे काही होते ते इस्लाम मध्ये झालेले आहे. त्यातच मोहम्मद पैगंबर हे शेवटचे प्रेषित आहेत असे मांडल्याने पुढे काही सुधारणा होण्याची शक्यता नाही . हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे जिथे सरोवर समुद्राला गिळण्यासाठी सज्ज आहे . हे घडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ईश्वर आणि मनुष्य यांच्यामध्ये पूर्ण भेद स्वीकारण्यात आलेला आहे. अशी भेद व्यवस्था जगातल्या इतर कुठल्या धर्मांच्यामध्ये नाही . त्यामुळेच प्रेषित असलेले महंमद पैगंबर आपल्या घरामध्ये गुलाम ठेवू शकतात . आता असे लोक इतरांना गुलाम बनवायला बाहेर पडले तर त्यात आश्चर्य ते काय ? कुराणामध्ये याचे अनेक दाखले आपणाला मिळतात . पुढे मग संपूर्ण इतिहास इतरांना गुलाम बनवणे किंवा मुसलमान बनवणे याच एका गोष्टीचा इतिहास बनून जातो.
म्हणूनच मी नेहमी म्हणतो की शिव अवस्था किंवा शून्य अवस्था आपण सर्वांनी स्वीकारायला हवी . जे लोक माणूस आणि देव यांच्यात भेद करतात ते कधीही दैवी बनण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि जोपर्यंत तुम्ही दैवी बनायला जात नाही तोपर्यंत तुम्ही साधे माणूस सुद्धा बनत नाही. तुम्ही मग पशु मध्येच रेंगाळत राहता. तुमचा आदर्श दैवीच असला पाहिजे तर कुठे तुम्ही मानवी बनता अन्यथा मानवी बनण्याची क्षमता सुद्धा तुम्ही गमावून बसता. यातूनच मग एका पाशवी पणाची सुरुवात होते . पाशवीपणाला प्रतिष्ठा देणारा कुठलाही धर्म हा कितीही आकर्षक असला तरी शेवटी पाशवी पणालाच वाढवत बसतो . त्यामुळेच माणसाचा आदर्श हा नेहमी द्वादशशीलता असला पाहिजे. त्यातून निर्माण होणारी नैतिकता असला पाहिजे . अलीकडे हा प्रयत्न मनुष्य जातीने सोडून दिलेला आहे की काय असाच प्रश्न पडतो . शैव श्रुतीमध्ये पाशवीपणापासून सुरुवात होते पण ही श्रुती तिथेच थांबत नाही उलट माणसांमध्ये पाशवीपणामुळे निर्माण होणारे आणि माणसाला अधिक पाशवी बनवणारे पाश कसे तोडायचे याच्या विचार केला जातो त्यासाठी ११४ तंत्रे सांगितली जातात . आणि त्याला सुरुवातीला माणूस बनवत शेवटी दैवी बनवले जाते . जीवामध्ये जैविक म्हणजे फक्त पाशवी नसते तर मानवी आणि दैवी ही असते . म्हणूनच जीव जिवाकडून शिवाकडे जातो . माणसाच्या मेंदूच्या संरचना जशा जशा जास्त उलगडत जातील तसे तसे हे अधिक सिद्ध होईल .
भारतामध्ये आद्य शंकराचार्य यांच्यामुळे घडलेली सर्वात मोठी घटना जर कुठली असेल तर ती म्हणजे अवस्था तंत्र संपूर्ण धार्मिक चर्चेच्या केंद्रस्थानी येणे . त्यामुळेच त्याचा इतका सविस्तर विचार करावा लागला .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment