पोषण म्हणजे काय श्रीधर तिळवे नाईक
पोषण म्हणजे स्वतःच्या किंवा इतर जीवाच्या सातत्याची घेतलेली सर्वांगीण काळजी ! सातत्यामध्ये प्रामुख्याने जनुक सातत्य आणि शारीरिक सातत्य येते याशिवाय शरीरामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टींचे सातत्य सुद्धा यामध्येच येते
पोषणाचा संबंध प्रामुख्याने इंधनासारखा आहे. शरीराला काम करण्यासाठी इंधन लागते आणि हे इंधन त्याला अन्न, श्वास आणि पाणी यांच्यामार्फत मिळत असते या गोष्टी माणसाला निसर्गाने फुकटात दिलेले आहेत परंतु अलीकडे त्यावर सरकारचे नियंत्रण प्रस्थापित झालेली दिसते आणि सरकार या नियंत्रणाच्या नावाखाली अत्यंत चुकीचे निर्णय घेत आहे की काय अशी शंका अलीकडे येत आहे. खरे तर या तिन्ही गोष्टींच्या बाबतीत सरकार हेच प्रमुख पोषण करते असते कारण या गोष्टी जनतेच्या असतात आणि खरे तर संपूर्ण निसर्गाच्या असतात यातूनच निसर्ग म्हणजे फक्त मानवी समाज काय असा प्रश्न निर्माण होतो कारण मानवाच्या व्यतिरिक्त असणाऱ्या कुठल्याही प्राण्याविषयी या या पोषणाविषयी आपण कसलीही नैतिक जबाबदारी घ्यायला तयार नाही आहोत जणू काही पृथ्वी ही माणसासाठीच निसर्गाने तयार केली अशा तऱ्हेने आपण वापरत आहोत .
अन्न पाणी आणि श्वास याशिवाय ज्ञानाचे पोषण व्हावे म्हणून त्याला व्यवस्थित शिक्षण मिळावे लागते
याशिवाय भावनांचे पोषण व्हावे म्हणून त्याला व्यवस्थित अनकंडिशनल प्रेम मिळावे लागते प्रत्येक पालकाचे हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुलांना आणि त्यांच्या मुलांना प्रेम देणे अलीकडे काही लोक मूर्खासारखे आजोबाजींना वेगळे करत आहेत वास्तविक आजी आणि आजोबा हे प्रेमाचे पोषण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असे जैविक घटक असतात परंतु एकंदरच आत्ताच्या पिढीचा इमोशनल कोशन कमी झालेला आहे त्यामुळे तिला ही बेसिक गोष्ट कळत नाही .
याशिवाय प्रत्येक मनुष्य स्वावलंबी व्हावा म्हणून त्याला स्वावलंबनाचे पोषण मिळावे लागते
याशिवाय जीव सृजनशील व्हावा म्हणून त्याला सृजनात्मक पोषण मिळावे लागते
याशिवाय त्याला कृती नीट करता याव्यात क्रिया नीट करता याव्यात म्हणून कौशल्य कमवावे लागते आणि त्यासाठी कौशल्यात्मक पोषण नीट व्हावे लागते
याशिवाय त्याला श्वास आणि वावर नीट करता यावा म्हणून पुरेशी जागा मिळावी लागते म्हणजेच अवकाशात्मक पोषण नीट मिळावे लागते
याशिवाय त्याला आरोग्य नीट राहावे म्हणून आरोग्याचे पोषण नीट मिळावे लागते
याशिवाय त्याला दिशा नीट कळावी नीतीचे मार्गदर्शनात्मक पोषण नीट मिळावे लागते अन्यथा मती नीतिविना वावरायला लागते आणि तिची माती होते कायदे म्हणजे सर्व सामान्य नीतीच असते जी सर्व समाजाने मिळून ठरवलेली असते.
याशिवाय त्याला मोक्ष मिळावा म्हणून मोक्षाचे सुद्धा पोषण नीट मिळावे लागते
तेव्हा पोषणाचे हे सर्व दहा प्रकार त्याच्या बाबतीत नीट झाले तरच मग त्याचे पालन पोषण नीट झाले असे आपण म्हणतो .
प्रत्येक समाजाचे हे कर्तव्य आहे की प्रत्येक मुलाला त्याने हे पोषण नीट द्यावे लागते ज्याचे हे पोषण नीट होते त्याला आपण सुपोषित म्हणतो आणि ज्याचे हे पोषण नीट होत नाही त्याला आपण कुपोषित म्हणतो
ज्या समाजातल्या सुपोषित नागरिकांची संख्या 100% असते तो समाज हा आदर्श मोक्ष समाज समजावा.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment